मिपाचे वैभव..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
27 Nov 2008 - 10:53 am

राम राम मिपाकरहो..

नुकताच मिपाकर सुनील यांनी 'मिपाचे बंद पडणे..' अशी तक्रार केली होती. त्या तक्रारीस तिथे आम्ही उत्तर दिले आहेच परंतु आमच्या उत्तराला सपोर्टिंग म्हणून आम्ही खाली काही चित्रे प्रकाशित करत आहोत.. या वरून मिपाची वाढती लोकप्रियता सहज लक्षात यावी..

आणि म्हणूनच आजूबाजूच्या संकेतथळावरील काही मिपाद्वेष्टी मंडळी मिपाच्या सर्व्हरवर अतिरिक्त कृत्रीम ताण आणून मिपा वारंवार बंद पाडत आहेत हे उघड आहे...

असो, या बाबतीत शक्य ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. लौकरच मिपावरील या भ्याड हल्ल्यांचा बंदोबस्त करण्यात येईल.. सर्व मिपाकरांनी आजपर्यंत जसे सहकार्य केले तसेच यापुढेही करावे अशी मायबाप मिपाकरांना कळकळीची विनंती...

हे पाहा मिपाचे वैभव...!

आपला,
(कृतज्ञ आणि कृतार्थ!) तात्या अभ्यंकर.

हे ठिकाणधोरणवावरप्रकटनसंदर्भमाहितीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

अवलिया's picture

27 Nov 2008 - 11:08 am | अवलिया

तात्यानु

लय म्हंजे लय भारी

फक्त मिपावर जे लोक भ्याड हल्ला करतात त्यांना शिवराज पाटिल प्रमाणे गोड गोड बोलुन सोडुन देवु नका.
तुमच्या बरोबर आम्ही आहोतच
पुढील वाटचालीस शुभेच्छा

अवलिया(उर्फ नाना चेंगट)

अभिजीत's picture

27 Nov 2008 - 12:26 pm | अभिजीत

सहमत.

झारीतल्या 'शुक्राचार्यां'चे निर्दालन कराच.

- अभिजीत

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 11:14 am | जैनाचं कार्ट (not verified)

बापरे !!!!
१० जीबी बान्डविथ एकट्या अमेरिके हून =)) उत्तर समोरच आहे तात्या !

मनो मनो !!!!!

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

सुनील's picture

27 Nov 2008 - 8:26 pm | सुनील

१० जीबी बान्डविथ एकट्या अमेरिके हून उत्तर समोरच आहे तात्या !

उत्तर नाही कार्ट्या, प्रश्न समोरच आहे, उत्तर शोधायचयं!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आंबोळी's picture

27 Nov 2008 - 11:14 am | आंबोळी

अभिनंदन तात्या,
आपण लावलेल्या रोपट्याचा वर्षाभरातच वटव्रुक्ष झालेला पाहताना आपणास नक्कीच कृतज्ञ आणि कृतार्थ वाटत असणार.
पुनःश्च अभिनंदन.
बाकी नानांशी सहमत.

आंबोळी

आनंदयात्री's picture

27 Nov 2008 - 11:18 am | आनंदयात्री

या लिचर्स वर उपाय म्हणुन मिपावर कॅपचा ऍक्टिव्हेट करावा का असे ऑफलाईन डिस्कशन आम्हा मित्रलोकात (मी, नीलकांत, कैवल्य, विनायक) झालेले स्मरते.
बहुतेक आता ती वेळ आलेली असावी !

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 11:22 am | जैनाचं कार्ट (not verified)

कॅपचा चा उपयोग नाही होनार.... कारण कॅपचा संगणकीय हिट्स नाही थांबवू शकत !

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

आनंदयात्री's picture

27 Nov 2008 - 11:26 am | आनंदयात्री

जर का कॅपचा संगणकीय हिट्स थांबवु शकला नसता तर तो अस्तित्वातच कशाला आला असता ??

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 11:42 am | जैनाचं कार्ट (not verified)

कॅपचा !
स्पॅम प्रोटेक्टर आहे.... !

मिपावर स्पॅमची अडचण नाही आहे.. हिट्स ची आहे... विनाकारण केलेली व्हिजिट !

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

आनंदयात्री's picture

27 Nov 2008 - 12:01 pm | आनंदयात्री

तुम्ही म्हणताय तर तसे समजु .. पण ती वरची लिंक वाचुन बघा एकदा.

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 12:09 pm | जैनाचं कार्ट (not verified)

युवा अड्डावर मी कॅपचा वापरला आहे भाऊ !

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

आनंदयात्री's picture

27 Nov 2008 - 12:15 pm | आनंदयात्री

मग तुमचे अभिनंदन अन वाढदिवसाच्या शुभेच्छा !

धमाल मुलगा's picture

27 Nov 2008 - 11:28 am | धमाल मुलगा

ह्यामुळे निदान स्वयंचलित शोषकांवर निर्बंध येतील.
अर्थात हे घरचं खाऊन बाहेरच्या उस्तवार्‍या करणार्‍यांनाही ठाऊक असणारच, ते लॉग इन करुन उद्योग करतील पण निदान त्यामुळे त्यांचा सुगावा तरी लागेल.

आणि हो, जेव्हा हे सगळं पुर्ण निस्तरलं जाईल तेव्हा तात्या, ह्या विघ्नसंतोष्यांची ऑनलाईन धिंड काढायला विसरु नका हो!
आम्ही येतोच हलग्या- लेझिम घेऊन ;)
एकदा का ह्या उद्योगांच्या बोलावत्या धन्याचं नाव उघड झालं की मग त्याला कोणी जवळ करणार नाही.
असल्या उद्योगी प्राण्यांना इतरही कोणी त्यांच्या संस्थळाला असलेल्या संभाव्य धोक्यामुळे दारात उभे करणार नाहीत.

असो,

मिपाची ही होणारी भरभराट पाहुन आम्हालाही अत्यानंद (प्रमोदकाका नव्हे) झाला :)

आनंदयात्री's picture

27 Nov 2008 - 11:34 am | आनंदयात्री

सदस्यांना सुद्धा लॉगिन झाले की एकदा किंवा से दर १०० पाने वाचल्यावर कॅपचा पेज आपोआप दिसेल अशीही व्यवस्था करता येईल बहुदा. मग ना सर्वर बदलायची गरज पडेल ना फुक्कटचा ताण सहन करायची.

मालकांनी, विश्वकर्म्यानी अन संपादन मंडळानी काय तो निर्णय घ्यावा असे इथे आवाहन करु इच्छितो.

ऋषिकेश's picture

27 Nov 2008 - 9:25 pm | ऋषिकेश

कॅपचा हा उत्तम उपाय वाटतो.. आनंदयात्रीशी सहमत
मराठी संस्थळाला कॅपचाचा विचार करावा लागावा यातच सारं काहि आलं.. अभिनंदन!

-(टोपीचा) ऋषिकेश

सरपंच's picture

27 Nov 2008 - 11:28 am | सरपंच

एका टायमाला ५३ सदस्य ऑनलाईन?

मेल्यानो मिपा बंद पडेल नायतर काय होईल? :)

तात्या.

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 11:43 am | जैनाचं कार्ट (not verified)

लिस्ट मध्ये माझं नाव पण आहे.... मेलो !

=))

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

अवलिया's picture

27 Nov 2008 - 11:47 am | अवलिया

खरेच की
मी पण आहे ह्या लिस्टमधे #:S

यशोधरा's picture

27 Nov 2008 - 12:25 pm | यशोधरा

>>आजूबाजूच्या संकेतथळावरील काही मिपाद्वेष्टी मंडळी मिपाच्या सर्व्हरवर अतिरिक्त कृत्रीम ताण

हे अजून एक वेगळ्या प्रकारचे दहशतवादी!! :O
ठीक बंदोबस्त करा यांचा तात्या..

राघव's picture

27 Nov 2008 - 12:38 pm | राघव

लय भारी! आमी समदे हाय तुमच्यासंगं...
मारा, झोडा... अजाबात सोडायचे काम नाय!
मुमुक्षु

वेताळ's picture

27 Nov 2008 - 6:34 pm | वेताळ

पण तात्या आपली काही तक्रार नाय बा. ह्या लोकाचं असच असत दुसर्‍याच चांगल चाललेले बगवत नाय.
बाकी मिसळपाव एका वर्शात एकदम जोरात आल आहे.
वेताळ

सर्वसाक्षी's picture

27 Nov 2008 - 7:59 pm | सर्वसाक्षी

तात्या,

हाटेलात आलेल्यांना बाहेर तिष्ठत रांगेत उभे ठेवण्यापेक्षा छप्पर वाढवा हो! मागच्या कट्ट्याला झालेल्या चर्चेचा आणि सूचनांचा विचार करावा ही नम्र विनंती.

शक्तिमान's picture

27 Nov 2008 - 9:06 pm | शक्तिमान

मागच्या कट्ट्याला काय झाले ते माहीत नाही.. पण छप्पर वाढवले तर उत्तमच!

बापरे. मराठी संकेतस्थळांवर असेही प्रकार होतात?
मराठी संकेतस्थळांचा जीव तो केवढा. त्यातही तंगड्या ओढणे वगैरे ....

शक्तिमान's picture

27 Nov 2008 - 9:04 pm | शक्तिमान

माझाही विश्वास बसत नव्हता असल्याप्रकारावर!
नुसतेच वाचले होते DOS बद्दल. आता प्रात्यक्षिकही पहायला मिळत आहे.

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Nov 2008 - 9:02 pm | ब्रिटिश टिंग्या

:O

ग्रेट ब्रिटनमध्ये ४५,६१३ हिट्स?

- ब्रिटिश टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

अवांतर : माझ्याच हिट्स जास्त आहेत की काय :?

शक्तिमान's picture

27 Nov 2008 - 9:10 pm | शक्तिमान

Traffic not viewed (bandwidth = 1.30GB)
या वरून अंदाज काढला आहे का DOS attack चा?

कपिल काळे's picture

27 Nov 2008 - 9:14 pm | कपिल काळे

<>

ह्या साठी मिपावर लॉगिन होण्याआधी वर्ड व्हेरिफिकेशन टाकता आले तर? म्हणजे अगदी पाहुण्यांसाठीसुद्धा तसेच. अड्रेस बार मधे मिपा.कॉम असे टाइप केल्यावर पहिल्यांदा वर्ड व्हेरिफिकेशन नंतर प्रवेश.

http://kalekapil.blogspot.com/

चतुरंग's picture

27 Nov 2008 - 9:33 pm | चतुरंग

ठराविक काळानंतर तुम्ही कोणतीच ऍक्टिविटी केली नाहीत तर आपोआप तुमचा आय्.डी. गमन करुन टाकायचा असे काही करण्याने बँडविड्थ वापरावर थोडा आळा बसेल असे वाटते.
सध्या मी एकदा मिपावर आलो की स्वतःहून गमन करेपर्यंत जेव्हा जेव्हा संगणक चालू करेन तेव्हा आपोआप 'आलेल्या सदस्यांमधे' गणला जातो!

('उपक्रम' हे संकेतस्थळ असे आहे. मी एकदा लॉग इन झालो आणि ठराविक काळ (साधारण ४८ तास असावे अंदाजे) फिरकलो नाही तर पुन्हा आल्यावर मला लॉगइन करावे लागते.)

चतुरंग

कोलबेर's picture

27 Nov 2008 - 9:37 pm | कोलबेर

अमेरिकेतील सभासद संखेने भारतातील सभासदांपेक्षा जास्त नसावेत. तरिही अमेरिकेतुन भारताच्या तुलनेत इतक्या पटीत हीट्स कशा काय? आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियामधुन भारतापेक्षा अधिक ट्रॅफिक कसा काय?