जगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो
रणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो
ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो
नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो
आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो
सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो
सोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी
बलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी
दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
शिवकन्या
प्रतिक्रिया
8 Oct 2019 - 10:40 pm | जॉनविक्क
एखादी कथा वगैरे अवश्य लिहावी
9 Oct 2019 - 2:00 pm | गणेशा
मस्त.
दसर्यावर चे मेसेज वाचुन बोर झालो होतो, तसेच काहीसे असेल म्हणुन उघडली पण नव्हती कविता.
पण काय मस्त लिहिले आहे
ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो
नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो
आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो
सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो
वा वा