पारंपरिक बायकांच्यात,
एक गोष्ट कॉमन असते.
आई झाल्यावर त्यांच्यातली,
बायको बरीचशी मरते.
सगळ लक्ष मुलांकडे,
त्यांचं सुख पहिलं!
नवरा म्हणजे शंकराची पिंडी,
वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं!
''अग तुला काही होतय का ?
मी स्वंयपाक करू का ? "
" तुम्ही स्वयं - पाक'च करता!
तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! )
"कशाला मरतेस? मलाच मार!
प्रेम तुझ गेलं कुठं!?" :(
"जरा पोरांकडे लक्ष दिलं,
तर वाटायला लागलं का? सगळ सुटं सुटं!? "
"तीच कुठे आहेत फक्त?
मीही नाही का तुझा!?"
"आहाहाहा !!! लै लाडात आलास रे आज?
मी माझा...मी माझा!"
"अगे दुष्ट दुष्ट बाई
कीती दगड हाणतेस?
नाशिक.. नागपूर.. कोल्हापूर.. सोलापूर!!!?
काय काय मधे आणतेस?"
"तु जरासा बाजूला हो
मंजे यातलं का...ही तुला लागणार नाही.
आणि काय रे आधीची मी बायको
आत्ताच कशी झाले रे बाई!?"
"नाही नाही..नाही,
तस्स का...ही नाही!
शब्द वापरताना चुकून,
ज..राशी झाली घाई!"
"सोंग बाकी छान घेता,
तुम्ही नवरे लोक."
"आज सोडणार(च) नाहियेस का?
धर की ठोक!धर की ठोक!"
"ज्जा! कार्टी शाळेला जायच्येट
डबा उचल आणि तु ही पळ!"
"ठीक.संध्याकाळी उरलेलं भांडू
आता..खा..झोप आणि कमव बळ!"
"माझ्यातली बायको गेली..,
तर तुझ्यात बाप आण की!?"
"तेच म्हटलं..जाता जाता
एक तरी हाण की!!!"
"किती रे कातडी निबर!?????
नवरेपणाचा हा कळस आहे!!!!!!"
"नाय गग्गग्गग्ग...मी नव्हे तो कडक पिंपळ,
मी साधा मऊ पळस आहे!!!"
"कित्ती दुष्ट आहेस रे मेल्या...,
हसता हसता रडवलस!"
"पण आज मात्र ह्या नवर्यातल्या
बापाला तू पढवलंस!"
"ज्ज्जा आता लवकर..
आणि लवकर परतंही ये!"
"येतो ग सखे लवकर
तोपर्यंत थोडी गाई गाई घे!"
चला आता मी ही
तुमचा,
इथेच पूर्ण विराम घेतो.
नवर्यामधला बाप,
सापडतो का? पाहून येतो!
====०====०====०====०====
अतृप्त...
प्रतिक्रिया
31 Jul 2019 - 4:43 pm | यशोधरा
=))
अवांतर: ती अर्धीच राहिली आहे ना म्हणे एक लेखमालिका?
31 Jul 2019 - 4:47 pm | जॉनविक्क
लेखक महोदय अतिशय थोडक्यात व खुसखूशीतपणे फार मार्मिक (टोला) मारतात
:)
31 Jul 2019 - 5:40 pm | कंजूस
विडंबन येणार.
31 Jul 2019 - 6:29 pm | अत्रुप्त आत्मा
दुत्त दुत्त कं का? का? =))
31 Jul 2019 - 8:26 pm | इरामयी
:)
बायकोला वाचायला दिलंत का? "दुष्ट दुष्ट" चं त्यामुळेच "दुत्त दुत्त" झालेलं दिसतंय बहुतेक.
31 Jul 2019 - 8:52 pm | गड्डा झब्बू
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी,
sahyadree, अनर्थशास्त्र, अभंग, अविश्वसनीय, आगोबा, आता मला वाटते भिती, आरोग्यदायी, पाककृती, कॉकटेल रेसिपी, गरम पाण्याचे कुंड, चौरागढ, जिलबी, फ्री स्टाइल, बाल साहित्य, भयानक हास्य, पाकक्रिया, शुद्धलेखन, आईस्क्रीम, ओली चटणी, पारंपरिक पाककृती, मायक्रोवेव्ह, लाडू, वडे, शाकाहारी, मौजमजा
अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे :-))
31 Jul 2019 - 8:56 pm | गड्डा झब्बू
अरेच्चा... चुकून प्रतिसादा ऐवजी उपप्रतिसाद दिला गेला! अतृप्त आत्म्या क्षमा असावी...
31 Jul 2019 - 9:49 pm | जॉनविक्क
31 Jul 2019 - 10:51 pm | अत्रुप्त आत्मा
@अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे. - - -. खिक्क!!! आपण प्राचीन मिपाकर नाहीत असे दिसते! असो!
1 Aug 2019 - 1:50 am | गड्डा झब्बू
खरे आहे, आम्ही प्राचीन अर्वाचीन मिपाकर नाही... पण जे जे चांगले त्यास चांगले आणि जे जे वाईट त्यास वाईट म्हणण्याचे धारिष्ट दाखवतो हे ही नसे थोडके...
31 Jul 2019 - 8:35 pm | कंजूस
बालभारतीतील कविता आणि धडे वाचून उट्ट उट्ट काढणार बाळ याच खफवर.
पाळण्यातच कविता ऐकल्यात बाळाने.
31 Jul 2019 - 9:55 pm | सस्नेह
दु दु अगोबाची दु दु बायको कशी काय बॉ झाली ?
=))
31 Jul 2019 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा
31 Jul 2019 - 11:19 pm | अभ्या..
आमच्या गावाचं नाव हाय कवितेत म्हणून मला कविता लै आवाडली.
1 Aug 2019 - 11:28 am | श्वेता२४
म्हनून मलाबी आवाडली ;))
31 Jul 2019 - 11:46 pm | पाषाणभेद
संसारीक काव्य.
बुवा, लईच भारीयेरे हे काव्य!
आमालाबी समजायचं शिकीव की.
1 Aug 2019 - 1:55 am | गड्डा झब्बू
आवडली आहे ही कविता पण थोडं एक्स्ट्रा लिहिला ही चुकी झाली म्हणायची...
1 Aug 2019 - 6:36 am | कंजूस
संसारीक काव्य लिहा.
जनतेची मागणी पूर्ण करा
1 Aug 2019 - 7:31 am | नाखु
जसा तवा चुल्ह्यावर
आधि हाताले चटके,मग मिळते (गोड) भाकर !!
संसारायनी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु
1 Aug 2019 - 10:59 am | नावातकायआहे
सुमार.
बुवा, लिहित रहा. टच जातोय....
1 Aug 2019 - 1:17 pm | चौकटराजा
आगोबा मोड ऑन ..
सदर कविता म्हंजे लांबलचक परंतु अर्थगर्भ रचनेचा एक उत्कट नमुना ठरावा .जुन्या ठरलेल्या नवर्याची मस्त व्यथा मांडण्यात कवि यशस्वी होताना दिसतो .ज्या , ज्यज्याज्या अशा शब्दांना गडे , प्रिये अशी आणखी काही जोड असती तर लाडिक रस क्र १० चा परिपोष खुलून दिसला असता ! ......तरी देखील कविता एक अनोखाच प्रत्यय देऊन जाते . .. विचारावंस वाटतं ... कस्स नेमकं तुम्हांसच हे जमतं हो ?
1 Aug 2019 - 1:22 pm | कंजूस
आगोबांना त्याच्याच गल्लीत भेटता येईल काय?
1 Aug 2019 - 3:17 pm | नाखु
"आगोबांना वैधानिक इशारा आहे काय"
या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे
स्थळ घारेशास्री सभागृह चिंचवड
प्रमुख वक्ते,चौकट राजा
विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर
निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार
(बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते)
वेळ वक्त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीनुसार ठरविणार आहोत
1 Aug 2019 - 5:21 pm | चौकटराजा
वि सू -सदर घारेशास्त्री सभागृहाच्या बाहेर फायर ब्रिगेड गाडीची व्यवस्था केली आहे !
1 Aug 2019 - 5:10 pm | खटपट्या
तुमची पण समोरची पार्टी डांबीस निघाली तर.... असो.
घरोघरी...
3 Aug 2019 - 12:48 am | अत्रुप्त आत्मा
3 Aug 2019 - 1:40 pm | अत्रुप्त आत्मा
@सुमार.
बुवा, लिहित रहा. टच जातोय.... --- Noted.
@प्रमुख वक्ते,चौकट राजा
विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर
निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार
(बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते). ---.
@