रांगोळी! मराठी माणसाच्या दिवाळीमध्ये नवे कपडे, फराळ, अभ्यंगस्नान, उटणे व दिवाळीअंक यांच्या इतकेच महत्वाचे स्थान रांगोळी व रांगोळी प्रदर्शनाला आहे.
सध्या ठाणे येथे न्यु गर्ल्स स्कूल येथे रांगोळी प्रदर्शन सुरू आहे. गेली अनेक वर्षे मी हे 'बलवंत मित्रमंडळ' आयोजित प्रदर्शन महापालिका शाळा क्र. १९ येथे पाहत आलो आहे. यंदा शाळेचे पुनर्निर्माण कार्य सुरू असल्यामुळे प्रदर्शनाचे स्थळ बदलले आहे इतकेच, मात्र त्यातल्या कलाकारांचा सामाजिक दृष्टिकोन मात्र तसाच आहे. या प्रदर्शनात दरवर्षी त्या त्या वर्षातील महत्वाच्या घडामोडी रांगोळ्यांच्या रुपात अप्रतिमरित्या सादर केलेल्या दिसतात.
यंदा सुरू असलेल्या प्रदर्शनात सुद्धा ही परंपरा जपलेली आहे. या प्रदर्शनातील सामाजिक आशयाच्या मला आवडलेलया काही रांगोळ्या .
प्रतिक्रिया
29 Oct 2008 - 12:12 pm | वेताळ
कलाकाराचे हार्दिक अभिनंदन.
वेताळ
29 Oct 2008 - 9:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर रांगोळ्या आहेत.
सर्व कलाकाराचे हार्दिक अभिनंदन.
29 Oct 2008 - 12:12 pm | सहज
अशक्य!!!
स्पष्ट बोलल्याबद्दल माफी असावी, मिपावर अनेक [नामवंत देखील] चित्रकार आहेत पण ह्या रांगोळ्यांइतकी कमाल फारच क्वचित दिसली आहे.
ह्या रांगोळी कलाकारांना वंदन.
29 Oct 2008 - 12:13 pm | अनिल हटेला
क्या बात है !!
८ वी ,९ वीच्या विद्यार्थ्याची ही कला ?
सॉलीड !!!
१,२,३,४,५ ह्या क्रमानेच आवडली !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
29 Oct 2008 - 12:26 pm | सर्वसाक्षी
अनिल,
कलाकार हे शालेय विद्यार्थी नाहीत. हे प्रदर्शन शाळेत भरत असल्याबद्दल मी लिहिल्याने आपला गैरसमज झाला असावा. हे सर्व कलाकार वयाने मोठे आहेत आणि ते अनेक वर्षे रांगोळी काढीत आहेत.
दिवाळीच्या निमित्ताने शाळांना सुट्ट्या असतात त्यामुळे शाळा हे 'बिनखर्चिक' ठिकाण पहिल्या पसंतीचे असते. ५ रुपये प्रवेशमूल्य असलेल्या या प्रदर्शनाचा हेतू पैसे कमावणे हा नाही, मात्र पदरचे फार खर्चे होऊ नयेत यासाठी परवडेल असे ठिकाण शोधावे लागते.
29 Oct 2008 - 12:39 pm | अनिल हटेला
पहील्या चित्रात उमेश सुतार ८ !!!
अस लिहील आहे म्हणुन गोंधळलो ...
शंका निरसन केल्याबद्दल धन्यवाद !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
29 Oct 2008 - 12:46 pm | नंदन
सार्याच रांगोळ्या छान आहेत. त्यातही बाबा आमटे रेखाटलेली रांगोळी अधिक आवडली. त्यांचा चेहरा, वरचे शीर्षक, बाजूचे संकेतात्मक चित्र आणि त्याखालची अक्षरे - सारेच मस्त.
बोरिवलीत वजिरा नाक्याजवळ दिवाळीच्या सुमारास एका शाळेत भरणारे रांगोळी प्रदर्शनही असेच आवर्जून भेट द्यावी असे असते.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 Oct 2008 - 12:49 pm | घाटावरचे भट
बाबा आमट्यांचं चित्र झकासच!!! बाकी चित्रेही उत्तम आहेत, पण बाबांचं रंगावलीचित्र अधिक आवडलं....
--भटोबा
29 Oct 2008 - 11:08 pm | सर्किट (not verified)
मलाही स्वतःला आमट्यांचे चित्र सर्वाधिक आवडले.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
29 Oct 2008 - 1:12 pm | स्वाती दिनेश
ठाण्यात असताना दिवाळीच्या सुटीत रांगोळी प्रदर्शन पहायला जाणे ही एक अत्यावश्यक गोष्ट असे. मग तिथून भारलेल्या मनःस्थितीत येऊन घरी प्रयोग केले जात.(ते सगळे फसत ..हा भाग फार महत्त्वाचा नाही,:))
गुणवंत मांजरेकरांचे रांगोळी प्रदर्शनही फार खास !
गेल्या वर्षी दिवाळीला भारतात होते तेव्हा आवर्जून रांगोळी प्रदर्शन पहायला गेले होते. ह्या वर्षी त्याची झलक इथे दाखवलीत त्याबद्दल धन्यवाद साक्षीजी..
रांगोळ्या तर दरवर्षी प्रमाणेच अप्रतिम आहेत!
स्वाती
29 Oct 2008 - 2:20 pm | शाल्मली
अतिशय सुंदर रांगोळ्या !
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!!
--शाल्मली.
29 Oct 2008 - 2:28 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
29 Oct 2008 - 2:31 pm | विसोबा खेचर
साक्षिदेवा,
मिपावर सुंदर रांगोळ्यांचं प्रदर्शन मांडल्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो..! :)
सालं, आपलं या कलेवर विशेष प्रेम आहे...
आपला,
(रांगोळीप्रेमी) तात्या.
29 Oct 2008 - 3:34 pm | आवडाबाई
काढायच्या ठिपक्यांच्या किंवा फ्रीहँड रांगोळ्या जालावर कुठे मिळतील का हो?
हे वर जे काही आहे ते उच्चच आहे, आवाक्यातलं वाटत नाहिये
बाबा आमटे नं.१ !!
त्यांची ती मुद्राच सही आहे फार
(असंच मला सुधीर फडकेंचा हसणारा फोटो पाहून वाटतं, त्याला हार घातलेला बघीतला की गलबलून येतं)
29 Oct 2008 - 3:58 pm | बिपिन कार्यकर्ते
केवळ अप्रतिम...
खूपच सुंदर कलाकृति आहेत. रांगोळी ही कला खूप अवघड आहे. सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन.
साक्षीजी, जमल्यास आमच्या कौतुकाच्या भावना कलाकारांपर्यंत पोचवा.
बिपिन कार्यकर्ते
29 Oct 2008 - 6:54 pm | केशवसुमार
साक्षीशेठ,
सुरेख रांगोळ्यांची छायाचित्रे इथे दिल्याबद्दल धन्यवाद..सर्व कलाकारांचे अभिनंदन.. अतिशय सुरेख रांगोळ्या
अभियांत्रीकी महाविद्यालयात असताना मी ही रांगोळ्या काढायचो.. अतिशय मेहनीतीचे , चिकाटिचे आणि नाजूक काम आहे चूक करायला वाव नाही..६-७ तास एका जागी बसून राहायचा कंटाळा यायचा.. अता नुसते आठवले तरी पाठिला रग येते..
पुन्हा एकदा धन्यवाद..
आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन
(कुण्या एके काळी रांगोळी काढणारा)केशवसुमार
29 Oct 2008 - 7:14 pm | रेवती
अजून शब्द नाहीत.
रेवती
29 Oct 2008 - 8:25 pm | शितल
सुंदर रांगोळ्या.
:)
सर्वच आवडल्या. :)
29 Oct 2008 - 8:47 pm | चतुरंग
अतिशय उच्च चित्रे!
बाबा आमटे तर अक्षरशः पुढच्या सेकंदाला उठून बसतील की काय असे वाटावे इतके चैतन्यमय आले आहेत! =D>
रांगोळी ही विलक्षणच कठिण कला आहे. एकतर मोठ्या आकारातल्या चित्रांचे प्रपोर्शन, तोल सांभाळायचा हेच मुळात अवघड. त्यात व्यक्तिचित्र, रंगकाम आणि शेडिंग म्हणजे कमालच! B)
हा खजिना आमच्यासाठी लुटून आणल्याबद्दल धन्यवाद साक्षीजी!
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.
(माझी आई फार सुंदर रांगोळ्या काढायची. हल्ली गुडघेदुखीने सगळे बंद झाले. दिवाळीला मीही तिच्याबरोबर रंगवायला बसत असे. शेणाने सारवलेल्या जमिनीवर पणत्या, समया, आकाशदिवे असे काढून त्यात रंग भरायला फार आवडायचे मला. गेले ते दिवस.)
चतुरंग
30 Oct 2008 - 3:47 am | चित्रा
असेच :-)
ठाण्यातले हे प्रदर्शन एकेकाळी (!) पाहिले आहे. छान असायचे.
शेण, गेरू यांनी रांगोळीची जागा तयार करून घेण्यात मजा असे. आता शेणात परत हात घालेन असे वाटत नाही, पण तेव्हा शेणाने जमीन सारवण्यासाठी आम्ही मुली तयार असत असू.
29 Oct 2008 - 9:42 pm | भाग्यश्री
बाबा आमटे खरंच फार छान आलेत.. खरेखुरे वाटतायत.. फार आवडल्या सगळ्या रांगोळ्या!
30 Oct 2008 - 4:34 am | मृदुला
चित्रे फार सुंदर आहेत. बाबा आमटे व लोड शेडिंग विशेष.
अभियांत्रिकीच्या दिवसातील रांगोळी प्रदर्शनांची आठवण झाली.
30 Oct 2008 - 4:39 am | मदनबाण
व्वा. सॉलिड..
साक्षी महाराज इतक्या सुरेख रांगोळ्या टिपल्या बद्दल तुम्हाला धन्यवाद...
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
31 Oct 2008 - 1:36 pm | झकासराव
जबरा आहेत रांगोळ्या :)
................
बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय.
http://picasaweb.google.co.in/zakasrao