शेती कामासाठी मजूर हवे आहेत....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
28 Oct 2016 - 11:44 am

प्रिय मिपाकरांनो,

होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो.

पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत.

सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य.

१. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल.

२. राहण्याची सोय केल्या जाईल.

३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल.

४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल.

५. मुलांच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय जिल्हा परीषदेच्या शाळेत केल्या जाईल.

६. २-३ पिढ्या पुरतील इतपत काम आहे. पालकांच्या मृत्यु पश्चात पाल्यांना शेतमजूर म्हणून प्राधान्य.

शक्यतो कुटुंबा सकट शेत-मजूर मिळाल्यास फार उत्तम.

कळावे, आपला लोभ आहेच.

आपलाच,

(गरीब शेतकरी) मुवि

समाजजीवनमानतंत्रराहणीमाहितीचौकशीमदत

प्रतिक्रिया

मी येतो. पगारबिगार काही दिला नाही तरी चालेल. ;-)

बादवे, शुभेच्छा. ओळखीत कुणी कुटुंबीय असतील तर सांगतो.

ते 'गरीब मजूर एस' लिहायचं राहिलं. संपादकांनो, इकडे थोडा औत ओढा. वाफा नीट करून द्या. आपलं ते प्रतिसाद संपादित करा. ;-)

मुक्त विहारि's picture

28 Oct 2016 - 11:53 am | मुक्त विहारि

आणि

आम्हाला थोडे फार फोटो काढायला शिकवा.

त्या बद्दल आम्हीच तुम्हाला गुरुदक्षिणा देवू.

टवाळ कार्टा's picture

28 Oct 2016 - 11:59 am | टवाळ कार्टा

कुठे हवे आहेत ते ठिकाण पण लिहा

..आणि पगाराची रेंज पण लिहा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Oct 2016 - 5:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओ टवाळाण्णा, त्यांना शेतमजुर हवेत, ऐटीतले (आयटीतले) बैल नव्हे. =))!! ;)!!

कपिलमुनी's picture

29 Oct 2016 - 11:46 pm | कपिलमुनी

बॅकअप प्लान असावा म्हणून टक्कू विचारत असेल

यशोधरा's picture

28 Oct 2016 - 12:51 pm | यशोधरा

भारी हो मुवि. अभिनंदन! कधी येऊ शेती बघायला?

प्रसाद गोडबोले's picture

28 Oct 2016 - 1:52 pm | प्रसाद गोडबोले

इंटरनेट आणि कामाच्या वेळेत मिसळपाव अ‍ॅक्सेस करायची सुविधा देत असाल तर मी ही यायला तयार आहे ;)

बाकी मुवी , आपण प्लॅन नुसार मार्गक्रमणा करीत आहात हे पाहुन आपल्या विषयी अतीव आदर आणि कौतुक वाटते !! ( खास प्रतिसाद द्यायला वाचनमात्र मोड मधुन बाहेर पडुन आलोय !)

आपला विनम्र
सीझर मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस्
Vi Veri Veniversum Vivus Vici

माझ्याकडे साईटवर कोकणातील काही मुले कामाला आहेत, त्यांनाच विचारुन बघतो. कोणी असे शेतमजूर भेटत असतील, तर तुम्हाला कळवतो.

विशुमित's picture

28 Oct 2016 - 2:30 pm | विशुमित

मुवि काका,
अश्या प्रकारे मजूर शेतीवर ठेवणे याला आमच्याकडे "सालाने" म्हणतात.

पण अनुभवावरून सांगतो तुम्ही एवढ्या सुविधा दिल्या तरी महाराष्ट्रीयन मजूर कुटुंब मिळणे खूप अवघड आहे.
काही गोष्टी सुचवू इच्छितो (तुम्हाला त्या नक्कीच माहित असतील तरी पण एक आस्था म्हणून).--
1) शिफारस करणारी व्यक्ती ओळखीची आणि विश्वासू असावी
2) आजकाल कोणतेच सालाने मजूर आगाऊ पैसे घेतल्या शिवाय कामाला येत नाहीत.
3) पैसे देण्या पूर्वी सर्व माहिती घेऊन ठेवा, प्रसंगी त्याचे राशन कार्ड/इलेकशन कार्ड/आधारकार्ड पण विचारून घ्या.
4) त्याच्या नकळत जमलं तर त्याच्या जन्म गावी एकदा चक्कर मारून या.
5) जर तुमचे राहण्याचे ठिकाण शेतावर असेल तर नक्कीच त्याची गुन्हेगारी प्राश्वभूमी तपासणे खूप गरजेचे आहे
6) शेती विषयी ज्ञान असणाऱ्यांनाच प्राधान्य द्या नाहीतर लाखाचे बारा हजार होयचे
7) शक्यतो निर्व्यसनी व्यक्ती पहा, नाहीतर त्याचा रोजचा तमाशा निस्तरता निस्तरता नाकी नऊ येईल (अनुभव सिद्ध )

अजून आठवले की सांगतो...

(बिहारी पोरं असत्यात, खूप कष्टाळू आणि हुशार असतात पण त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत. तुम्हाला चालत असतील तर तो पण पर्याय चांगला आहे)

मुक्त विहारि's picture

29 Oct 2016 - 12:08 pm | मुक्त विहारि

(बिहारी पोरं असत्यात, खूप कष्टाळू आणि हुशार असतात पण त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत. तुम्हाला चालत असतील तर तो पण पर्याय चांगला आहे)

"त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत."

समस्या जर साध्या असतील तर, नक्कीच "बिहारी मजूर" चालतील.

विशुमित's picture

29 Oct 2016 - 8:24 pm | विशुमित

साध्याच आहेत...

वर दिलेल्या पैकी च आहेत ...फक्त त्यातील जिन्हेगारी पार्श्व भूमी महत्वाची चेक करा.

बोका-ए-आझम's picture

28 Oct 2016 - 2:58 pm | बोका-ए-आझम

मिपाकरांना शेतमजूर म्हणून घेऊ नका. कट्टा सुरु होईल!;)

विशुमित's picture

28 Oct 2016 - 3:03 pm | विशुमित

हा हा हा ...
काम राहील बाजूला अन झ्याक्या चालू होतील...

घ्या! दिलात आमच्या कट्ट्यावर - आपलं ते, पोटावर पाय?

विशुमित's picture

28 Oct 2016 - 3:43 pm | विशुमित

चालतंय गप्पा मारत मारत काम करू...

कंटाळा पण यायचा नाही आणि 'रोज' पण भरेल

जल्लां मी येव क्कांय??

धाग्यावर लक्ष ठेवून आहे. मला पण हवे आहेत. आयटीतले नको पण. =))

मदनबाण's picture

30 Oct 2016 - 8:55 am | मदनबाण

आयटीतले नको पण. =))
अवं नोकरी मिळण्याच्या आधीच संधी नाकारताय की... हे काय बरं नव्ह ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

पैसा's picture

30 Oct 2016 - 10:14 am | पैसा

अटी बघ त्यांच्या! कामाच्या वेळेत मिपावर यायला मिळाले पाहिजे वगैरे प्याकेजे परवडणार नाहीत बाबा. मलाच टोपली घेऊन काम करत बसावे लागेल. =))

पाटीलभाऊ's picture

28 Oct 2016 - 5:21 pm | पाटीलभाऊ

कोणी फ्रेशर चालेल का :D

अभिजीत अवलिया's picture

28 Oct 2016 - 6:22 pm | अभिजीत अवलिया

पॅकेज किती ?

शेतीसाठी भरघोस शुभेच्छा!!

अता 'उपवासासाठी खजूर हवे आहेत...' अश्या धाग्याची वाट पहातोय...!

सतिश गावडे's picture

28 Oct 2016 - 9:34 pm | सतिश गावडे

सध्याच्या आयटी मजूर असलेला मात्र त्याआधीचा कोकणातील शेतीचा जवळपास दहा वर्ष अनुभव असलेला माणूस चालेल काय? ;)

एका कानड्या बरोबर दुसरा फ्री घेत असाल तर मी पण येतो :D

जोक्स अपार्ट ..

मस्तच काम काढलाय . लगे रहो :)

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2016 - 12:44 pm | टवाळ कार्टा

या दोघांवर मॅनेजरगिरी करायला मला घ्या =))

नाखु's picture

31 Oct 2016 - 10:19 am | नाखु

गुड गाईज नेव्हर रिक्वायर मॅनेजर्स.

पोपशास्त्री संतवचने प्रकरण ८ : लक्ष आणि लक्षणे मधील ओळ क्रं २१ मधून साभार

नितवाचक नाखु ओझेवाला

अद्द्या's picture

1 Nov 2016 - 11:55 am | अद्द्या

मला गुड गाय (इंग्रजी मधला ) म्हणाल्या बद्दल धन्यवाद काका :D

बॅटमॅन's picture

29 Oct 2016 - 10:52 pm | बॅटमॅन

क्या बात है मुवी सर. हेवा वाट्टो तुमचा.

(आयटीगधडा) बॅटमॅन.

जयंत कुलकर्णी's picture

30 Oct 2016 - 8:50 am | जयंत कुलकर्णी

मुवि, फार कमीजण स्वतःला पाहिजे ते करतात... उशिरा का होईना जे आवडेल ते करतात. आपण ते केले आहे याबद्दल तुमचे अभिनंदन... आता तुमच्या कट्ट्याला एक कायमस्वरुपी जागा मिळाले... :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2016 - 10:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेती कामासाठी मजूर भारतात मिळणे अशक्य वाटते. सालगड़ी वगैरे आता कोणी येत नाही. अमेरिकेत वगैरे शेती केल्यास नफ़ा आणि उत्तम मजूर मिळतील असे वाटते.
भारतात शेती, उद्योग यांना फार स्कोप नाही असे वाटते. बाकी आपली मर्जी. भारतात काहीच चांगलं नाही.

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

30 Oct 2016 - 10:30 am | संदीप डांगे

सहमत .

+१

तरीही भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे अद्यापही म्हटले जाते.

"भारतात काहीच चांगलं नाही."

त्यापेक्षा "भारतात बरेच काही चांगलं नाही." असे आमचे मत.

असो,

"भारतात काय उत्तम आणि काय वाईट?" हा ह्या धाग्याचा विषय नसल्याने आणि सध्या तरी "धरणी मातेची सेवा ही पण एक प्रकारे भारतमातेचीच सेवा," असे आम्हाला वाटत असल्याने, जास्त न लिहिता आपली क्षंमा मागतो.

"अमेरिकेत वगैरे शेती केल्यास नफ़ा आणि उत्तम मजूर मिळतील असे वाटते.भारतात शेती, उद्योग यांना फार स्कोप नाही असे वाटते."

अद्यापही आपण "कौटिल्याचे अर्थशास्त्र" हा ग्रंथ वाचललेला किंवा निदान नजरेखालून घातलेला दिसत नाही (त्या ग्रंथाचे मनन, चिंतन आणि अभ्यास तर फार दूरच्या गोष्टी.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2016 - 10:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> तरीही भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे अद्यापही म्हटले जाते.
आम्ही भारतावर प्रेम करणारे आणि आमचा भारत देश जसा आहे, तसा आहे, आणि जी जान से प्यारा आहे, असे स्वीकारणा-यांनी भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे जन्मजात मान्य केलं आहे. त्याबाबत आमचं कोणीही प्रबोधन करण्याची गरज नाही, असे मला वाटते

>>>>>>""धरणी मातेची सेवा ही पण एक प्रकारे भारतमातेचीच सेवा,"

धरणी मातेची सेवा आणि भारत मातेची सेवा कशी करायची ते आम्ही भारतीय आणि भारतावर प्रेम करणारे पाहुन घेऊ, आमच्यावर कोणाचे उपकार नको"

>>>>>> कौटिल्याचे अर्थशास्त्र" हा ग्रंथ वाचललेला किंवा निदान नजरेखालून घातलेला दिसत नाही
नाही. आम्ही भारतीय आमच्या सवडीने वाचून घेऊ, ज्यांना या देशातली कोणतीही गोष्ट आवडत नाही, अशांकडून आम्हाला आम्चाच ग्रन्थ समजून घेण्याची आवश्यकता वाटतं नाही. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे
(भारत देशावर प्रेम करणारा एक वेडा)

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2016 - 11:09 pm | टवाळ कार्टा

चांगल्या धाग्यात भलत्या विषयावर स्कोर सेटल कसे करावेत याचे आदर्श उदाहरण म्हणजे हा वरचा प्रतिसाद

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Oct 2016 - 11:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

बाकी ते स्कोर सेटल करणाऱ्या दोन पार्टी बघून घेवोत भावा, फक्त ह्या धाग्यात चांगले काय दिसले ते पण एकदा सांग, कळेल अश्या भाषेत

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2016 - 1:24 am | टवाळ कार्टा

एक मिपाकर स्वतः शेतीची सुरुवात करणार आहे, ते सुद्धा आजच्या काळात जिथे लोक शेतीपासून दूर जात आहेत, मिपाकरांकडे मदत मागितली, काय वाईट आहे?

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Oct 2016 - 11:15 am | कैलासवासी सोन्याबापु

मिपावर शेतमजूर मिळतात का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Oct 2016 - 11:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रेफरन्सेस किंवा माहिती मिळु शकते ओ बापुसाब.

@मुविकाका, गंगाधर मुटेंना विचारा ना एकदा.त्यांना शेती'काव्या'*** ( अनुभव आहे. फिल्डवर्क असलचं जर का तर सांगतील ना ते पण माहित असलेलं सगळं.

*** गनिमी'काव्या'च्या धर्तीवर शेती'कावा'.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Oct 2016 - 12:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

रेफरन्सेस किंवा माहिती मिळु शकते ओ बापुसाब.

आम्हाला काही तसे वाटत नाही बुआ, असो. To one his own , आपल्याला काय म्हणा.

मुक्त विहारि's picture

31 Oct 2016 - 9:55 pm | मुक्त विहारि

मिपावर तर नक्कीच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2016 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मिपावर शेतमजूर मिळतात का ?

जगातलं पहिलं आंतरजालीय शेतमजूरासाठीचं आवाहान असेल की कोना एका शेतकर्‍याने शेती करायला सुरुवात केली आणि शेतमजुर हवे आहेत म्हणून आवाहानही केलं होतं. इतिहासात याची नोंद होईलच असे वाटते. इ.स.२०९९ मधे कोणी शेतमजूराच्या टोळींनी वरील मसुदा वाचला तर आपली किती मोठी हातातली संधी गेली याचं त्यांना नक्की वाईट वाटेल.

बाय द वे, शेतमजूर मिपा आणि आंतरजालावर शेतावर कुठे काम करायला मिळेल का याचं जॉब सारखं सर्चींग करतील ही कल्पना मला मात्र भारी वाटत आहे. भविष्यात असं व्हायला पाहिजे खरं...! माझी आंतरजालीय शेती कल्पना.

शेतातील कामाचे स्वरुप
  शेतमजूर कामाचे दर  
स्त्री- पुरुष (दर)
कामाचे तास*

नांगरणी*
300
350-300*
8 तास (मध्यंतर तीस मिनिटे)

पेरणी*
वरीलप्रमाणेच
वरीलप्रमाणेच
वरीलप्रमाणेच

कापूस वेचणी (किलोप्रमाणे)*
400*
450-400*
वरीलप्रमाणे*

* अटी लागू                                       शेतमालक प्रा.डॉ.                                                    शेतीस्थळ  : मोबाईलने बारकोड स्कॅन करावा.                                                    सोबत आधारकार्ड आणावे.

-दिलीप बिरुटे

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Oct 2016 - 10:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्रा.डॉ. सर ४००₹/गासडी असेल हो वेचणावळ कपाशीची किलो मागे इतका भाव दिला तर राजे ३/४ भारत नागडा फिरंल मग रोज संक्षीचे धागे येतील ;)

बाकी तिच्यायला आजकाल गासडीला पण ४००₹/गासडी सुद्धा येत नाहीत बायका रोजंदारीला , बाप्ये ७५० अन बायका वेचणावळ रेट जवळपास ७०० सुरु आहे (असं हल्लीच ऐकिवात आलंय) , बाई वेचायला ठेवली कापूस का 'घरच्या वाती बत्तीले' म्हणून लेकाची एकदा एका दिवसात 5 किलो रुई मारलेली पकडली आहे मी माझ्या वावरात, असे धागे काढत बसले मालक तर मागं कापसाचा सर्वा (जमिनीवरील फरदड कापूस) सुद्धा घावणार नाही हाती, इतके सामान्यज्ञान २४ वर्षे रोज वरंबीवर हागुन अन दांडावर धुवून आलंय खरं आम्हाला.

मजूर कल्याण स्कीम वगैरे ते ही मिपावर घोषित करून काही होणार नाही , मजुरांवर सतत लक्ष ठेवणे हेच इष्ट, शेती नवीन असताना तर वैती वहिवाट पक्की करायला सुरुवातीची २ वर्षे तर अक्षरशः २४/७/३६५ डोस्के खपवायला लागते, अगदी भाकरी खायला बसलो तरी डोक्यात दांड (पाट) कुठं घालायचे, वखराच्या सरी कुठल्या दिशेने पक्क्या करायच्या म्हणजे ट्रॅक्टर किंवा बैलजोडी शेतात शिरायला अन बाहेर पडायला सोपे पडेल हे ठरवावे लागते, शेजाऱ्याने तूर कपाशीतल्या ओळी दाबू नये अन आपलेही नुकसान होऊ नये त्याप्रकारे वरंबी कश्या घालाव्या, पाट फोडून गाठ कुठं पडल ती अशी असावी की थकलेली बैलजोडी पीक न तुडवता तिथं पाण्यावर आणता यायला हवेत, एक न एक हजार मुद्दे असतात, 'इथे सल्ले मिळतील' वगैरेला काही अर्थ नसतो, हे वैयक्तिक मत आहे अन बाकी शहरी निमशहरी ग्रामीण कृषक-अकृषक वगैरे वादात शिरायची इच्छा नाही, मुवि सर अनुभव जसे आलेत त्या प्रमाणे सांगतोय, बाकी तुमची इच्छा

पैसा's picture

31 Oct 2016 - 10:53 pm | पैसा

पण कोकणात लक्ष ठेवूनही काही उपयोग नसतो. कामाला येतात ते उपकार केल्यासारखे. आमच्या काजूच्या बागेत बिया गोळा करायला येतात त्यांची कामाची पद्धत सांगते. सकाळी ९ वाजता येणार. आल्या की एकदा चहा करून पिणार. मग काजुबिया गोळा करायला सुरुवात. जेमतेम बारा झाले की थांबल्या. गेल्या घरी जेवाययला. तीन वाजता परत येतात. साडेचार वाजता परत एकदा चहा करून पितात. साडेपाच सहा झाले की निघाल्या घरी. एवढे करून दिवसभरात १०/१२ किलो बिया गोळा करत्तात. तेच आम्ही तीन तास काम केले तर १० किलो बिया गोळा करतो. मधे पानतंबाकू खाणे, चहा पाणी यात किती वेळ जातो परमेश्वराला माहीत. त्यांच्या घरच्या शेतीची कामे, पालख्या, जत्रा यासाठी नित्य आणि नैमित्तिक सुट्या सतत चालूच असतात. त्या दिवसात आम्ही तिथे हजर नसलो तर चोराना बागेत मुक्त प्रवेश. हा, आम्ही तिथे शेतघरात रहात नव्हतो तेव्हा काही इरसाल बाया संध्याकाळी सगळ्या घरी गेल्यावर परत येऊन पटापट मिळेल तेवढ्या बिया उचलून पळून गेलेल्याही सापडल्या आहेत. काजू बिया १००/१५० रुपये किलो म्हटले तर रोज २ किलो बिया चोरून नेल्या तर तीन महिन्यात एकेकीकडे मजुरीव्यतिरिक्त शंभरेक किलो बिया नक्कीच जात असतील. या गोष्टीला काही इलाज नाही. खविसासारखे वागले तर झाडांचे नुकसान करणे, शेतघराचे नुकसान करणे असे प्रकार गेल्याच वर्षी अनुभवले आहेत.

अर्थात मुविंशी बोलणे झाले त्याप्रमाणे ते असले पीक घेणार नाहीयेत. पण सावध रहावेच लागेल. कोकणी मजुरांकडून काम काढून घेणे भयंकर त्रासाचे आहे.

मुवि, तुम्ही नाम कडून काही लोक आणणार होतात ना?

विदर्भातली परिस्थिती फार वेगळी आहे.

आमच्या मामाने ह्या दराला त्रासूनच विदर्भात शेती करणे सोडून दिले.

तुम्ही ज्याला त्रास म्हणता, जसे "अगदी भाकरी खायला बसलो तरी डोक्यात दांड (पाट) कुठं घालायचे, वखराच्या सरी कुठल्या दिशेने पक्क्या करायच्या म्हणजे ट्रॅक्टर किंवा बैलजोडी शेतात शिरायला अन बाहेर पडायला सोपे पडेल हे ठरवावे लागते, शेजाऱ्याने तूर कपाशीतल्या ओळी दाबू नये अन आपलेही नुकसान होऊ नये त्याप्रकारे वरंबी कश्या घालाव्या, पाट फोडून गाठ कुठं पडल ती अशी असावी की थकलेली बैलजोडी पीक न तुडवता तिथं पाण्यावर आणता यायला हवेत, एक न एक हजार मुद्दे असतात,"

अगदी तसाच त्रास २० वर्षे गुलामगिरी करतांना भोगला आहे.

उद्या ट्रे वर्क कुणाला द्यायचे? केबल पुलींग कुणाला द्यायचे? २ पेयर आधी टाकू का १६ पेयर?

जंक्शन बॉक्स लावले खरे, पण त्याची झाकणे नीट लागत नाहीत, त्यांचे ग्रीसींग करायला हवे.

अद्यापही साईट वर मल्टी मीटर आलेले नाहीत. उद्या मीटींग मध्ये हा पॉइंट येणारच.

ट्रान्सपोर्टवाला जाण्या-येण्याचे अंतर वाढवत आहे.त्याला आत्ता दाबला तर ऐनवेळी दुसरा कुठूण आणायचा?

पुढच्या आठवड्यापासून रोझे चालू होणार.त्या आधीच जड कामे उरकून घ्यावी लागणार.

हार्ट कम्युनिकेटर एकच आहे त्यामुळे वर्क-शॉप मध्ये कॅलिब्रेशनचा स्पीड कमी पडतोय.गेले ३ महिने बोंबलतोय पण अद्यापही दुसरा हार्ट कम्युनिकेटर साईट वर नाही.

३ महिन्यांनी लूप टेस्ट चालू होइल आणि अद्यापही मेगरिंग मशीन नाही.तो शर्मा सध्या देतोय पण त्याला रोज त्यासाठी बाटली द्यावी लागते.

असो,

कुणाला गुलामगिरीत सुख तर कुणाला स्वमर्जीने २ घास खाण्यात समाधान.

पण बापू एक सांगू..... साला कितीही त्रास झाला तरी, बायकोच्या हातचा वरण-भात खाल्ला की, सगळे टेंशन खल्लास.

आणि खूपच त्रास व्हायला लागला की, सरळ एखादा मिपा कट्टा करायचा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Oct 2016 - 11:29 pm | कैलासवासी सोन्याबापु

वरती खाशा कोकणातले अनुभव वाचा काका, पैसा ताईने लिहिलेले, मूळ मुद्दा काय मनुष्य स्वभाव, अन त्याला असलेला नाईलाज, त्यात विदर्भ, कोकण वगैरे काही नसते हे लिहून घ्या असे म्हणतो.

दुसरे म्हणजे तुमचे म्हणणे शंभर हिश्याने पटलेले आहे, कोणाची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वातंत्र्यातली कोरडी भाकरी बरी, पण त्यालाही मेहनत आहे, गुलामगिरी पेक्षा जास्तच समजा पण आहेच, ती नाकारली जाऊ शकत नाही अन मी त्याचबद्दल बोलतोय हो बाकी काही नाही.

असो, तुमच्या कार्याला नाट लावणे हेतू नसून तुम्हाला खरेच काय करायला हवे ते सांगायचा (वाचा फुकट सल्ले ) हेतू होता, शंका न घेणे, बाकी तुम्ही सुज्ञ आहातच :)

लोभ असावा
बापुसाहेब

मुक्त विहारि's picture

12 Nov 2016 - 12:05 pm | मुक्त विहारि

१९७१ पासून म्हण्जे शाळेत गेल्या पासून झोप नामक प्रकरणापासून फार दूर होतो.

पण जेंव्हा पासून शेतात स्वत: राबायला सुरुवात केली तेंव्हा पासून निद्रा देवी प्रसन्न झाली.

भरपूर काम केल्या नंतर आणि कुणालाही जाब द्यायचा नाही, ह्या विचाराने मस्त प्रगाढ झोप लागते.

मजूरा आधारीत शेती करत नसल्याने, तो पण त्रास नाही.

मिरचीची रोपे लावायला गडी न मिळाल्यास, स्वतः रोपे लावायची धमक पण आहे आणि तशी ताकद पण आहे.

स्वतः पुरते कमवावे आणि संत गाडगे बाबांचे नांव घेत ४ घास खावेत, ह्या पलीकडे कसलीही आशा नाही.

ते जावू दे,

आमचा वानप्रस्थाश्रम बघायला कधी येताय?

मोदक's picture

12 Nov 2016 - 12:21 pm | मोदक

पत्ता द्या

दिलाय की राव त्यांनी!
हा बघा:

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2016 - 3:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर चांगले धागे असो वा नसो आपण नेहमीच उत्तम आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद देऊन आदर्शाचा एक वस्तूपाठ घालून दिला आहे, ते आम्ही अजिबात विसरलो नाही. =))

बाकी, आमच्या कौतुकाबद्दल मनापासून आभारी आहे.

-दिलीप बिरुटे

असे मिपावर धागे काढून शेती करता येणार नाही/शक्य नाही, त्याशिवाय आपल्यातले कोकणी बाले सगळे चाकरमानी आहेत, बाकी एकंदरीत प्रतिसाद पहाल तर माझे म्हणणे पटेल कदाचित तुम्हाला, शेती करतोय किंवा शेतकरी झालो असे म्हणून नुसते भागणार नाही काका, शेतकरी झालो हे कळायला आपल्यालाच ठरवावे लागते, इथे धागा काढून मजूर मिळण्याची शक्यता ह्यापेक्षा जास्त तुम्ही तुमची शेती जिथे आहे त्या संबंधित तालुक्यातील आठवडी बाजार किंवा मजूर अड्डयाला गेलात तर जास्त कळण्याची शक्यता आहे, तरी विचार करावा ही नम्र विनंती.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Oct 2016 - 10:55 am | कैलासवासी सोन्याबापु

*काही स्वानुभव आहेत शेतीचे, मजूर नियुक्तीचे वाटल्यास व्यनि कराल तिकडे साद्यांत सांगतो

भ ट क्या खे ड वा ला's picture

31 Oct 2016 - 11:29 am | भ ट क्या खे ड वा ला

मूवी ठिकाण सांगा .प्रतेक्ष भेटून काही सुचवू शकेन.अगदी थोडा का होईना पण शेतकरी म्हणून अनुभव आहे.

मुक्त विहारि's picture

31 Oct 2016 - 10:47 pm | मुक्त विहारि

खेरशेत नावाच्या गावात (चिपळूण आणि संगमेश्वरच्या मध्ये) प्रयोग म्हणून, एक एकर शेती ६ महिन्यांसाठी घेतली आहे.

२-३ महिन्यात तिथे रुळलो की, नक्की या.