ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
22 Apr 2016 - 1:44 am

सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार,
पहिल्या भागाच्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल, तसेच प्रतिक्रिया/सूचनांबद्दलही धन्यवाद.

या पुणे विभागाच्या अनुदिनी गटाच्या अभिनव प्रयोगाची पावले मिसळपाव.कॉम, मायबोली.कॉम, ऐसीअक्षरे.कॉम या मराठी संकेतस्थळावरही या निमित्ताने पडली हे विशेष. या सर्व संकेतस्थळांवरही या प्रयत्नाचे चांगले कौतुक झाले. व्हॉटस्अॅप सारख्या माध्यमातूनही या अनुदिनीच्या लिंक्स सर्वत्र फिरत होत्या हे या अभिनव ध्वनी अनुदिनीचे यशच म्हणावे लागेल. खरंतर हा प्रयत्न पुणे विभागातील सर्व सभासद / नागरिक यांना मुंबई ग्राहक पंचायतीची माहिती मिळून असलेल्या संघांचे योग्य संघटन व्हावे व नवीन होणाऱ्या सभासदांना / संघाना माहिती मिळावी हा होता, पण मुंबईतून म्हणजेच अगदी दादर, माटुंगा पासून ते वसई, विरार, पालघर तसेच अगदी रत्नागिरीतूनही प्रतिक्रिया आल्यानंतर हा उपक्रम नक्कीच सर्वांपर्यंत पोहोचतो आहे याची खात्री झाली.

चला तर दुसरा भाग तयार आहे तुम्हाला माहिती पुरविण्यासाठी.

या भागात आपण मुंबई ग्राहक पंचायतीच्या गेले 41 वर्षे अविरत सुरु असलेल्या अभिनव वितरण पध्दतीची माहिती घेणार आहोत मुंबई ग्राहक पंचायतीचे जेष्ठ कार्यकर्ते तसेच सल्लागार श्री. कमलाकर पेंडसे यांचेकडून.

खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारुन आपल्याला ही माहिती ऐकता येईल.
ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था

आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारुन सदर फाईल डाऊनलोड करुन आपल्या मोबाईल, संगणक, पेन ड्राईव्ह ने टिव्हीवर अशा विविध पध्दतीने ऐकता येईल.
ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था

टिप - सदर लिंक मुंबई ग्राहक पंचायतीच्या गुगल ड्राईव्ह वरील ऑडियो फाईल डाऊनलोड करते.

सदर डाऊनलोड केलेली फाईल मुंबई ग्राहक पंचायतीच्या पूर्वपरवानगी शिवाय त्यातील माहिती बदलता, एकत्र करता, तसेच व्यावसायिक कामासाठी वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी.

सदर फाईल ही mp3 या स्वरुपातील असून 13 मिनिटे 32 सेकंदाची व 11 MB आकाराची आहे.

आपल्या प्रतिक्रीया/सूचना यांचे स्वागत आहे.

धन्यवाद.

अनुदिनी गट, मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग

सदर ध्वनी धागा मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचारअनुभवमाहितीसंदर्भ