तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील. क्वचित असा एखादा असतो जो त्या कागदाला हातात घेऊन त्याला उलगडून पुन्हा सरळ करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या कागदात काय लिहिले आहे ते वाचण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याला पुन्हा त्याच्या हरवलेल्या पुस्तकात ठेवतो. रस्त्यात एखादा स्प्रिंग आणि स्पंज सापडला तर जरूर कुणीतरी त्याला दाबून बघतो. रस्त्यात दगड असला तरी कुणी सहसा त्याच्या वाटेला जात नाही!
समजा तुम्ही एकदा जगाला दाखवले की तुम्ही कुणालाही नेहमी खूश ठेवण्याचा प्रयत्न करता, मऊ आहात, स्पंज आणि स्प्रिंग आहात तर तुम्हाला सतत दाबून ठेवणारे लोक या जगात पुष्कळ मिळतील. पण जर जगाच्या दृष्टीने तुमची प्रतिमा स्प्रिंग अथवा स्पंज ऐवजी दगड अशी असली तर कुणी तुमच्या वाटेला जाईल का? नाही. कारण दगडाला स्प्रिंग सारखे दाबण्याचा प्रयत्न केला तर दाबणाऱ्याचा हात रक्तबंबाळ होईल तसेच दगडात इतरांचे रंग स्पंजासारखे शोषले जाण्याची शक्यता नसतेच!
नेहमी दगड बनावे असे नाही पण तुम्ही जर स्प्रिंग आणि स्पंज असाल तरी तुमची दुसरी बाजू मात्र विसरू नका.
म्हणजे कसे ते सांगतो. तुम्हाला माहीत आहेच की निसर्गनियमा नुसार म्हणजेच भौतिकशास्त्राच्या नियमानुसार कोणत्याही क्रियेला प्रतिक्रिया असतेच! त्यानुसार स्पंज आणि स्प्रिंग याना "प्रतिक्रियेची" दुसरी बाजू असतेच.
त्यानुसार, दाबले जाण्याची दुसरी बाजू (गुणधर्म) त्याच तीव्रतेने उसळणे हीच असते. तुम्ही स्प्रिंग असाल म्हणजे सतत दाबले जात असाल (म्हणजे भावनांचे दमन, सतत फक्त इतरांच्या स्वार्थाचा विचार करणे, स्वत:चा विचार सोडून!) तर स्प्रिंग हा जास्त दाबल्यास उसळतो आणि दगडापेक्षाही जास्त इजा करतो हे मात्र लोकांना दाखवायला विसरू नका. एवढेही अपेक्षांचे ओझे आणि वजन मनाच्या स्प्रिंगवर ठेवू नका की तुम्ही तुमचा उसळणे हा गुणधर्म विसरून जाल किंवा तुमच्यात उसळण्याची ताकदच उरणार नाही.
तुम्ही स्पंज असाल तर लक्षात ठेवा की एवढेही स्पंज बनू नका की तुमच्यात शंभर टक्के फक्त इतरांचा रंग शोषला जाईल आणि तुमच्या स्वत:च्या रंगाला जागाच राहणार नाही. स्पंजाची दुसरी बाजू (गुणधर्म) सुद्धा लोकांना दाखवायला विसरू नका. म्हणजे वेळ पडल्यास पिळल्यानंतर एका क्षणात स्पंज हा स्वत:तले शोषलेले सगळे काही बाहेर टाकून रिकामा होवू शकतो हेही जगाला दाखवून द्या. स्पंजाला अशा प्रकारे रिकामा होण्यास मदत करणारा सव्वाशेर, म्हणजेच त्याला पिळून (चांगल्या अर्थाने!) रिकामा करणारा आणि त्यात स्वसामर्थ्याचे रंग भरणारा कुणीतरी असतोच आणि तो कधीतरी भेटतोच.
तुम्ही कोण आहात? दगड, स्पंज की स्प्रिंग? पण लक्षात घ्या की तुम्ही दगड असलात तरी स्प्रिंग आणि स्पंज ला त्रास देऊ नका. कारण ते दोघे उलटले तर दगडाचेही तुकडे करू शकतात!
प्रतिक्रिया
24 Mar 2015 - 1:29 pm | सांगलीचा भडंग
अवघड आहे उत्तर देणे . सध्या तरी मला ओस्ट्रेलिया आणि भारताच्या मेच साठीचा आणि फ़ाइनल चा स्टेडियम मधला केमेरा व्हायला आवडेल . फुल झूम मागे पुढे करत सुखाने मेच बघत येईल. नंतर विमान व्हायला आवडेल . सगळ्या प्रसिद्ध ठिकाणाचा बर्ड'स आय व्हू बघायची इच्छा आहे
24 Mar 2015 - 1:31 pm | कपिलमुनी
लेख वाचून निर्वाण प्राप्त झाले आहे.
24 Mar 2015 - 1:39 pm | यसवायजी
फोटो पाठवा तुमच्या चरनकम्लांचा. _/\_
24 Mar 2015 - 2:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
फोटोबरोबर आम्हाला पादुकाही द्या पाठौन...रोज सकाळ संध्याकाळ डोकं आपटीन म्हणतो गुरुमाउली.
24 Mar 2015 - 2:02 pm | विशाखा पाटील
चुकून आस्था/संस्कार या वाहिन्यांची लिंक उघडली की काय?
24 Mar 2015 - 2:16 pm | स्पा
ऑ, अच्च जाल्ल ....
24 Mar 2015 - 6:11 pm | अत्रुप्त आत्मा
=========
24 Mar 2015 - 2:28 pm | अन्या दातार
खर्र-खर्रं सांगा सर, तुम्हाला हा लेख अत्रुप्त यांच्या या प्रतिसादावरुन सुचला का?
24 Mar 2015 - 4:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
एवढा जोर लाऊन ताणलेला प्रतिसाद आजवर पाहण्यात आला नाही. =))
24 Mar 2015 - 3:45 pm | आदिजोशी
आई बाबा, भाऊ बहिणी, मित्र मैत्रीणी, शिक्षक, वर्गमित्र, बॉस आणि बायको, ह्यांच्या मते आम्ही दगड आहोत :)
24 Mar 2015 - 3:58 pm | सस्नेह
तुम्ही दगड असलात तरी स्प्रिंग आणि स्पंज ला त्रास देऊ नका. कारण ते दोघे उलटले तर दगडाचेही तुकडे करू शकतात!
लक्षात ठेवा ! +D
24 Mar 2015 - 3:48 pm | कपिलमुनी
आज या धागामृताबद्दल धागाकर्त्यस मिपाचे साने गुर्जी पुरस्काराने पुस्पगुच्च देउन सन्मानण्यात येत आहे
24 Mar 2015 - 3:51 pm | सूड
ही अशी प्रवचनं केव्हापासून होतायेत?
24 Mar 2015 - 4:09 pm | निमिष सोनार
:-)
24 Mar 2015 - 4:28 pm | होबासराव
जे पेरले ते उगवते. तसेच पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते :- ईति निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!
24 Mar 2015 - 4:53 pm | तिमा
आम्ही सोफ्यातून बाहेर डोकावणारा स्पंज आहोत. त्यामुळे , जो तो आम्हाला लपवण्याचा प्रयत्न करतोय.
24 Mar 2015 - 6:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्पंज ठीक आहे, बराच शांत प्रकार आहे तो. :) नशीब, तुम्ही सोफ्यातून बाहेर डोकावणारी स्प्रिंग नाही ते ! ते प्रकरण फार क्लेशदायक आसतंय ;)
24 Mar 2015 - 8:26 pm | सस्नेह
आण्भवाचे बोल ! +D
25 Mar 2015 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
आण्भवच ! पण ते लोकांचे होते आणि आम्ही शिवून दिले होते :)
25 Mar 2015 - 2:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सोफे का अजुन काही =))
25 Mar 2015 - 3:12 pm | सस्नेह
त्यांचा व्यवसाय पाहता, ही 'कुशन्स' काही वेगळ्या प्रकारची असावीत असे वाटते +D
'मानवी स्पंज' हम्म...
25 Mar 2015 - 4:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
25 Mar 2015 - 5:56 pm | अत्रुप्त आत्मा
आय्यायाया! =))
26 Mar 2015 - 3:44 am | अभिजीत अवलिया
आई ग ... मेलो मी हसून हसून
25 Mar 2015 - 11:10 am | राजाभाउ
हे फारच भारी, हसता हसता खुर्चीतुन पडलो असतोना राव.
24 Mar 2015 - 5:49 pm | सतीश कुडतरकर
आजचा विषय:
ढुंगण टेकवण्याचा सोफा.
25 Mar 2015 - 4:49 am | खटपट्या
माझ्या मना बन दगड..
25 Mar 2015 - 7:44 am | मनीषा
हू आर यु?
हू एम आय?
आय इन द यु इन द यु इन विच आय इन द यु ......... *scratch_one-s_head* * *SCRATCH*
25 Mar 2015 - 8:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
25 Mar 2015 - 12:30 pm | होबासराव
इंग्लिस त असा बोल्ते जसा mad in england :- :- असा मी आसामी
समर्था नि मुर्खांची ईतकी लक्षणे लिहुन ठेवलि तरी पण ती कमि वाटतात :- पु.ल.
25 Mar 2015 - 2:46 pm | सूड
इंग्लिस तं एटला हायक्लास बोल्ते जसा mad in england
25 Mar 2015 - 2:48 pm | वेल्लाभट
गुड वन सर. गुड वन. इट रियली मेड मी थिंक. :)
25 Mar 2015 - 7:33 pm | मोहनराव
तुम्ही कोण आहात? दगड, स्पंज की स्प्रिंग?
च्यामारी कायच समजना.. जरा अजुन विस्कटुन सांगा की राव!!
(डोक्याचा दगड झालेला)
मोहनराव.
26 Mar 2015 - 3:42 am | अभिजीत अवलिया
मला ओळखणारे ह्या जगातले सर्वजन मला स्पंज समजतात. फक्त आमची अर्धंगिनी सोडून. तिच्या मते आम्ही पाषाण आहोत.Smile