वजन कमी करणारा आहार

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in जनातलं, मनातलं
4 Mar 2015 - 8:48 pm

वजन कमी करणारा आहार
१) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे.
२) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी.
३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा.
४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री) घालुन घेणे.
५) रात्रीचे जेवण ; दुपार प्रमाणेच घ्यावे.
६) जेवणात गोड पदार्थचा समावश करु नये. तसेच चिंकु, केळी, द्राक्ष,आंबा ही फळे सोडुन बाकी सर्व फळे खावीत.चाकलेट्स बेकरी प्राडक्टस ,शितपेय, फास्ट फुड, होटेलींग, मिठाई बंद करावी.
७) योग्य आहाराला योग्य व्यायाम व आयुवेदीक औषधीची जोड दिल्यास दर आढवडयाला एक ते दिड किलो वजन कमी होते व पुन्हा वाढत नाही तसेच शरीराचे कु्ठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
८)जेवणात मिठ कमी घ्यावे.

समाजजीवनमानराहणीऔषधोपचारलेखअनुभवशिफारससल्ला

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 9:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या व्यायामांना बरोब्बर अडीच ते पावणेतीन तास लागतात. त्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाईजेस मस्ट. व्यायामानंतर अंगावर वारा बसु देउ नका. गरम पाण्यानी अंघोळ करा. २ आठवड्यामधे फरक दिसायला लागेल. एकदा गोडी लागली की स्वतःहुन व्यायाम केला जातो.

प्रभाकर पेठकर's picture

10 Mar 2015 - 10:20 am | प्रभाकर पेठकर

सल्ला समतोल वाटतो आहे. सर्व कळतं, प्रयत्नही करतो पण सातत्य राहात नाही. पण सततच्या प्रयत्नांनी वजन कमी झालं नाही तरी आहे तिथे स्थिर आहे.

वेल्लाभट's picture

10 Mar 2015 - 12:22 pm | वेल्लाभट

कॅप्टन,
अ‍ॅरोबिक अ‍ॅनारोबिक चं प्रमाण चुकतंय माझ्या दृष्टीने तुमच्या सल्ल्यात. वेट ट्रेनिंग अधिक असावं. तसंच कार्डिओ रोजच्यारोज करणं श्रेयस्कर नाही. वाचलेली माहिती.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 1:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रत्येकाच्या शरिराप्रमाणे बदलतं...वेट ट्रेनिंग दुय्यम ठेवायचं कारण असं की मला मसल बिल्ट अप करायची हौस नाही. मला अ‍ॅरोबिक चा फायदा जास्त होतो. एक म्हणजे शरीर हालचालींमधे रहात दुसरं म्हणजे ताजतवानं वाटतं दिवसभर\.

वेल्लाभट's picture

10 Mar 2015 - 2:17 pm | वेल्लाभट

मला मसल बिल्ट अप करायची हौस नाही.

अतिशय चुकीचा समज. तुम्ही जो अ‍ॅरोबिक व्यायाम करता, किंवा ज्या दैनंदिन हालचाली करता त्या करायला मसल्स, जॉइंत्स, लिगामेंट्स बळकट असणे अनिवार्य आहे, त्यात हौसेचा भाग नाही. उद्या इतक्या कार्डियोला जोड पुरेशा स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंगची नसेल तर सांधे, अवयव दुखायला सुरुवात होऊ शकते. होते.

असेच आपापले समज करून घेऊन त्यानुसार आपणच चांगला वाईट व्यायाम ठरवून करणारे अनेक असतात. तसं नको.
तेंव्हा या गैरसमजाचा पुनर्विचार करा असा आग्रह करतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 3:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अतिशय चुकीचा समज. तुम्ही जो अ‍ॅरोबिक व्यायाम करता, किंवा ज्या दैनंदिन हालचाली करता त्या करायला मसल्स, जॉइंत्स, लिगामेंट्स बळकट असणे अनिवार्य आहे, त्यात हौसेचा भाग नाही. उद्या इतक्या कार्डियोला जोड पुरेशा स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंगची नसेल तर सांधे, अवयव दुखायला सुरुवात होऊ शकते. होते.

खरं आहे.
मी मसल ट्रेनिंग पुरेश्या प्रमाणात करतो. सद्ध्या स्पायनल इंज्युरीमुळे व्यायाम बंद आहे एवढचं. नाहीतर एकमेकांना पुरक प्रमाणामधे दोन्ही व्यायामप्रकार केले जातात. दिवाळी पर्यंत पुन्हा फिट टु वर्काउट होईन त्यावेळेला परत शुन्यामधुन सुरुवात करायची आहे. :(
त्यावेळेस तु म्हणतोय्स तसही करुन पाहिन. उपयोग झाला तर बेष्टचं की :)

वेल्लाभट's picture

10 Mar 2015 - 4:32 pm | वेल्लाभट

काही दिवसांपूर्वी मी एका पुस्तकाबद्दलचा धागा टाकला होता. तो बघा. ते पुस्तक वाचा जमल्यास दिवाळी पर्यंत. ही त्यातलीच वाचीव माहिती आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Jul 2015 - 1:12 pm | अनिरुद्ध.वैद्य

सहमत! चालणे फिरणे नंतर नंतर त्रासदायक होत गेल्याची उदाहरणे पाहिली आहेत :) स्नायू मजबूत नसतील तर काहीच शक्य नाही, त्यामुळे आधी स्नायू मजबूत करून मगच फिरणे, धावणे प्रकार सुरु :D

(अर्थात, नॉर्मली सगळ्यांचे स्नायू चालण्यासाठी मजबूत असतातच :) )

आयुर्हित's picture

10 Mar 2015 - 1:41 pm | आयुर्हित

कच्च दुध घेणे अतिशय धोकादायक आहे. दुधात क्षय रोगाचे विषाणू असू शकतात, जे तापविल्यानंतर मरतात.
त्यामुळे कच्चे नकोच.

गायीचे दुध घेतांना ती देशी (खोंड असलेली) गाय आहे हे तपासून पहा.
आजकाल पिशवीत जे दुध मिळते ते जर्शीचे असते, ते अतिशय हानिकारक आहे ज्याने ऑटीझम, कॅन्सर, मधुमेह सारखे आजार सुरु होणे कारणीभूत ठरत आहे.

त्यापेक्षा म्हशीचे तापवून साय काढलेले दुध कधीही चांगले!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 1:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कच्चं दुध म्हणजे पाश्चराईज्ड हो. पिशवी फोडल्यावर गारच्या गार प्यायचं. मला उकळवलेल्या दुधाचा वास सहन होत नाही त्यामुळे मी कच्च पितो.

काही वेळेला मध्येच वीज जाते, काहीवेळेला मशीन खराब झाले आहे म्हणून दुरुस्तीला बाहेर काढले किंवा बायपास केले असण्याची शक्यता जास्त असते.

काही ठिकाणी दुध घालणारेच त्यांच्या घरात दुध बनवून छापील पिशव्यांत पॅकिंग करतात.
बऱ्याच दुधसंकलन/पॅकिंग केंद्रात फक्त "डिग्री"(density) सोडले तर काहीही चेक होत नसते!
भारतात FDA आहे कि नाही असा मोठ्ठा प्रश्न आहेच. असलाच तर त्यांची पद्धतीही माहित असेलच!!

सुनील's picture

10 Mar 2015 - 2:55 pm | सुनील

काही वेळेला मध्येच वीज जाते, काहीवेळेला मशीन खराब झाले आहे म्हणून दुरुस्तीला बाहेर काढले किंवा बायपास केले असण्याची शक्यता जास्त असते.

काही ठिकाणी दुध घालणारेच त्यांच्या घरात दुध बनवून छापील पिशव्यांत पॅकिंग करतात.
बऱ्याच दुधसंकलन/पॅकिंग केंद्रात फक्त "डिग्री"(density) सोडले तर काहीही चेक होत नसते!

भारतात FDA आहे कि नाही असा मोठ्ठा प्रश्न आहेच. असलाच तर त्यांची पद्धतीही माहित असेलच!!

खरंय!!

एक म्हैस घ्यायचा विचार करतोय!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 3:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

घेतलीत तर कळवा. धारोष्ण दुधाची सोय होईल =))

कोणी गाय घेतलीत तर सांगा, म्हशीचं दूध पिणारी माणसं पण म्हशीसारखी आळशी होतात असं दिवकरकाकू एका पुस्तकात म्हणून गेल्यात.

सूड's picture

10 Mar 2015 - 4:02 pm | सूड

दिवेकरकाकू*

कपिलमुनी's picture

10 Mar 2015 - 7:16 pm | कपिलमुनी

भाकड झाली तर संभाळावी लागेल

दिपक.कुवेत's picture

10 Mar 2015 - 3:05 pm | दिपक.कुवेत

प्रचंड ईच्छा होत आहे कि दिलेलं डाएट आणि थोडा माफक व्यायाम करावा. आरशात पोटाचा घेर (स्वःताचचं) पाहिला कि प्रचंड लाज वाटते. ईच्छा खुप आहे पण सातत्याने करण्यात कमी पडतो.

शाम भागवत's picture

1 Jul 2018 - 9:56 pm | शाम भागवत

वजन कमी करणे, पोटाचा घेर कमी करणे, कोलेस्टेरॉल कमी करणे, acidity,triglycerides वगैरे वर मात करणे तसेच डायबेटीस पूर्वस्थितीतून बाहेर पडणे यासाठी डॉ जगन्नाथ दिक्षितांचा एक व्हिडीओ लिंक देत आहे.

पहिली ३० मिनिटे प्रास्ताविक झाल्यावर भाषण सुरू होते. ते टाळा असे सुचवत नसून काहीजण कंटाळून व्हिडिओच बंद करतात म्हणून सांगतो आहे.
भाषणाची लिंक<\a>
किंवा ही लींक नवीन पानावर काॅपी पेस्ट करा.https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

हे भाषण कै.श्रीकांत जिचकारांच्या या आॅडीओवर आधारीत आहे.
किंवा ही लींक नवीन पानावर काॅपी पेस्ट करा.https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGU

मुख्य म्हणजे हेच खा किंवा हे खाऊ नका अशी बंधने नाहीत. मटण मासे तूप लोणी सगळ चालते. २८००० जण सध्या या पध्दतीचा फायदा घेत आहेत.