थंडीच काळ आणी रात्रीचा वेळ,यष्टीतुन प्रवास करताना मस्त पेकी डुलकी लागत होती..
तेवढ्यात डोक्यावर टपली बसली,चिडुन मागे पाहील..मक्या होता "अय लिंबुटीबुं काय झोपतो.. बघ बाहेर जरा पळ्ती झाडे
आणी मस्त चांदण पडलय"
शेजारी बसलेला सुरज्या कानात कुजबुजला"च्या आयला,चांदण काय ह्यांच्या सोबत बघायच अस्त का ?थंडीत मस्त घरी
घरी पडायच सोडून नस्ती लफडी करतोय आपण"
मी काय बोलायच विचार करत स्वतःला लागणारी झोप आवरायाचा प्रयत्न करत होतो..पण मागच्या सिटवर बसलेले
मक्या,रावसाहेब,आणी बा़किची संघटना डोक्यावर टपल्या मारून मला जागा करायची,काही आवाज करायची सोय नाय.
आम्ही चाललो होते..नळदुर्ग जवळील एका पारधी आश्रमाला भेट द्यायला..सोबत ५० एक झाड लावण्यासाठी आणी दिवाळी
फराळ होता.
यष्टी आम्हाला रस्त्यावर सोडुन गेली,पुढे १०-१२ किमी पायी चालत पोहचताना दिवस वर आला,
फारस काम करायची गरज नसल्यामुळे लवकर आटपुन सगळे गप्पाचा फड रंगवत बसले..चर्चा आध्यात्मा कडे वळली,
एकजण तावातावाने वेद,धर्म,वाणप्रस्थआश्रमा बोलायला लागला.. तिथे काम करणारे कुलकर्णी काका शांतपणे
म्हणाले" मी आता नोकरीतुन रिटायर झालोय,मुल कामाला लागलीत..मी काय जंगलात जाउन तप करत बसु का ?
तुमचे विचार मला पटत नाहीत..मी ईथे बायको सोबत या लहान मुलांसाठी काम करतो हाच माझा वाणप्रस्थाश्रम आहे."
यावर रावसाहेबांनी त्यांना घोळात घेतल"राजे,चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो..
एकदा एक राजा प्रधानाला सांगतो..आपल्या राज्यात सर्वात विचारवंत माणसाला घेऊन ये ..मला आध्यात्मावर चर्चा करायची
आहे..प्रधान बराच शोध घेतो...पण राजाशी चर्चा करायची कुणाची हिम्मत होत नाही..कारण राजाला पटल नाही तर
गळ्याला फास..मग बेरकी प्रधान काहीतरी जुगाड करतो..आणी एका माणसाला राजा पुढे उभा करतो..
" म्हाराज्या हे माझ गुरु..तुमच्याशी चर्चा करतील..पण काही बोलणार नाहीत फक्त ईशारे करायचे मंजुर आहे का?"
राजा होकार देतो..राजा एक बोट दाखवतो..त्यावर गुरु दोन बोट दाखवतो..राजा खुश होतो..नंतर राजा हवेत हात
फिरवुन गोल काढतो..यावर गुरू आंगठा दाखवतो..राजा प्रंचड खुश होतो..गुरु ला भरभक्क्म दक्षीणा देउन पाठवुन देतो..
राणी विचारते "महाराजा तुम्ही काय प्रश्न विचारले?"
राजा" मी आधी विचारल आत्मा एकच आहे का ? यावर गुरुंनी आत्मा आणी परमात्मा हे दोन आहेत हे सांगितल.
नंतर मी विचारल या सृष्टीचे पालक किती ? यावर गुरुने मात्र तो एकच आसल्याच सांगितल..आणी माझ समाधान झाल"
ईकडे तो गुरु आपल्या मुळ गावी जातो..तो आसतो एक मेंढपाळ..त्याची बायको विचारते...राजान काय ईचारल..
मेंढपाळ" च्या आयला राजा हेंदरटच हाय..मला आधी म्हनला एक बकरी दे..म्या ईचार केला राज्याला एक कशी द्याची
म्हनुशान दोन घे म्हनलो..तर बेण आख्खा कळपच दे म्ह्नला ...च्या आयला घे खुट्टा म्हनलो,"
काय पटत काय? यावर सगळी कडे हास्याचे फव्वार ऊडाले होते.
=============================================================================
घटना जुनी आहे.. मी एका विद्यार्थी संघटनेत नवा आसतनाची..वर आलेली पात्रे आजही संघटनेत आहेत..त्यामुळे तपशीलात काही किरकोळ बदल केले आहेत..संघटनेला मी नाही सोडल आणी संघटनेने मला..ठोकुन काम करुन घेतल..
ईथे चालणारी चर्चा वाचुन जरा डायरी चाळली त्यात हा किस्सा सापडला.
प्रतिक्रिया
20 Dec 2014 - 11:53 am | मुक्त विहारि
असाच एक नॉन-व्हेज किस्सा पण आहे...
20 Dec 2014 - 11:56 am | जेपी
असाच एक नॉन-व्हेज किस्सा पण आहे...
करा व्यनी..
आणी, बर झाल आजुन टाक किस्से म्हणाला नाहीत याबद्दल संघटना आभारी राहिल. *biggrin*
20 Dec 2014 - 12:11 pm | मुक्त विहारि
प्रत्यक्ष भेटच महत्वाची...
"चिल्लर गेली खड्ड्यात आता फक्त रुपया" ह्या टाइपचा आहे...
20 Dec 2014 - 12:16 pm | जेपी
हम्म...
ते पण बरोबर आहे.सगळ इथेच बोलत बसलो तर भेटल्यावर तोंडाल कुलुप लागायच दोघाच्या .नंतर विचार कराल काय बोंरींग पोरगय.. *wink*
(कट्यावर श्रवण भक्त होणारा) जेपी
20 Dec 2014 - 12:21 pm | मुक्त विहारि
आमच्या बरोबर असतांना भले-भले मौन सोडतात.
बिंधास्त र्हावा...
20 Dec 2014 - 7:30 pm | टवाळ कार्टा
मी अपवाद होतो :)
20 Dec 2014 - 7:43 pm | जेपी
तुला व्यनी आला तर मलापण कर...
21 Dec 2014 - 5:02 am | मुक्त विहारि
तू पण बर्यापैकी बोलत होतास...
20 Dec 2014 - 7:30 pm | टवाळ कार्टा
मला पण व्यनी करावा ;)
20 Dec 2014 - 12:37 pm | कंजूस
खुट्टा दाखवून लाईक केलं आणि भलताच अर्थ काढलात तर दोघांना काहाडतील कळपाच्या भाईर.
21 Dec 2014 - 8:42 am | अत्रुप्त आत्मा
व्वा!!! एकदम ह्हेप्पी मोर्निंग झाली लेख वाचुन. *GOOD*