वातव्याधी सामान्य आहार
१)सकाळी ज्वारीची भाकरी किंवा गव्हाचा फुलका.
२),दोडका ,कारले,घोसाळे,पडवळ,लाल माठ,भोपळा,पालक,शिमला मिर्च,कोहळा, काटेमाठ,
राजगिरा,भेंडी,तांदुळचा.फ्लावर,कोबी,कोवळे वांगे फक्त
३)मुगाची डाळ,मुग तांदळाची खिचडी,
४)सफरचंद,मोसंबी,शहाळे,डाळिंब,अंजिर,बीट,सॅलड चालेल
५)गाइचे दुध,तुप, ताक दररोज घ्यावे.
६)उपिठ,शिरा भाजणीचे थालीपिठ,भरपुर साजुक तुप टाकुन
७)हुलग्याचे माडगे दररोज घ्यावे.
८)रात्री बाजरीची भाकरी खावी,त्यात १/४ च.सुंठ,२-३ लसुन पाकळ्या व २-३ च एरंड तेल टाकुन भाकरी
करावी व दररोज रात्री खावी
९)पुढील दोन महिने गरम पाणीच प्यावे.
वरिल सोडुन इतर कुठलाही आहार घेउ नये. सकाळेचे जेवन १० वा.च्या पुर्वी व रात्रीचे जेवन ८ वाजण्याच्या
आत घ्यावे.
१०)दिवसा झोपु नये.रात्री जागु नये
प्रतिक्रिया
28 Jun 2014 - 2:36 pm | किसन शिंदे
वातव्याधीतल्या आहाराबद्द्ल लिहिलत त्याबद्दल धन्यवाद, पण त्याचबरोबर वातप्रकृतीच्या माणसाला कोणकोणत्या व्याधी होतात/ होऊ शकतात त्याबद्दलही थोडं फार लिहावं अशी विनंती.
28 Jun 2014 - 7:09 pm | बाबा पाटील
आपली आज्ञा प्रमाण लवकरच सविस्तर लेख देतो.
28 Jun 2014 - 3:17 pm | रेवती
हुलग्याचे माडगे म्हणजे काय? मला पिठले माहितिये.
28 Jun 2014 - 4:37 pm | किसन शिंदे
हुलगे भिजवून त्याचा पेजसदृश पदार्थ करतात.
28 Jun 2014 - 8:26 pm | रेवती
ओके, समजले. धन्यवाद.
28 Jun 2014 - 4:48 pm | कवितानागेश
वाचतेय.
28 Jun 2014 - 6:20 pm | चित्रगुप्त
याप्रकारे आहारातून व्याधिंचा उपचार करणे हे उत्तमच, परंतु मुळात वातव्याधिचि लक्षणे सुद्धा द्यावीत. कित्येकदा आपल्याला होत असलेला त्रास नेमका कोणता आहे, वा त्या व्याधीचे नाव काय आहे, हेच ठाऊक नसते, त्यामुळे उपाययोजना शोधता येत नाही. मला स्वतःला सुमारे वीस वर्षे एक त्रास होता, परंतु त्याचे नाव ठाऊक नव्हते. ते समजल्यावर जालावरून त्याची कारणे ठाऊक करून घेता आली, आणि आहार-विहाराची काळजी घेऊन त्यातून सुटका करून घेता आली.
28 Jun 2014 - 7:08 pm | बाबा पाटील
http://www.misalpav.com/node/27828 यात लक्षणे व उपचार देत आहे. पुढच्या लेखात सविस्तर कारणे व त्यापासुनचे घरगुती उपाय देतो.
28 Jun 2014 - 10:27 pm | नानासाहेब नेफळे
गुडघेदुखीचा त्रास होणारी प्रकृती कोणती? वातप्रकृती.?
माझे वजन वाढतेय ,आहार तेवढाच आहे ,फक्त घरचं बंद करुन बाहेरचं खातोय.गुडघे प्रचंड दुखतात. वात कफ पित्त यापैकी कोणती प्रकृती असु शकते माझी व गुडघेदुखीवर आहारात काय बदल करावेत?
30 Jun 2014 - 11:16 am | विटेकर
पाटील बोवा ...
१. वात प्रकृतीच्या आणि मधुमेही लोकांनी भात खाउ नये असे म्ह्णतात ..भाताने वजन वाढते का? तसे असेल तर को़क णातील लोक जाड असायला हवेत ?
२. भात नको तर पोहे / मुरमुरे / चिरमुरे / भाजके पोहे हे पण वर्ज्य का ? की चालते ?
३. ज्वारीच्या भाकरीने साखर वाढते हे खरे का ? मधुमेही माणसाने खावे की खाऊ नये ?
४. भरपूर साजूक तूप ? हे जाड माणसाला चालेल का ? कोलेस्टेरॉल ची वाट लागेल का ? साक्षात्कारी ह्र्दयरोग .. पुस्तकात तूप खाऊ नका असे म्हटले आहे .. की ऑलोपथी ला तूपाचे वाव डे आहे ? ( मला तूप भयंकर आवडते म्हणून जरा सविस्तर विचारले ..)
५.तुरीची डाळ वर्ज्य का ?