विष्णूजी की रसोई...अनाहिता कट्टा वृत्तांत

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in जनातलं, मनातलं
7 Apr 2014 - 9:10 pm

डिसक्लेमर : मधुमेह किंवा गोडाची एलर्जी असलेल्यांनी या शिकरण टाइप धाग्यापासून लांबच रहावे.

कॉल्लिंग अनाहीतास ……… असे करून आमच्या इरोपस्थित मृणालिनी बाईनि त्या भारतवारीला येत आहेत तरी आपण सर्वंजणीनी भेटुन कट्टा करायचा आहे हो अशी दवंडी दिली अनाहिता मध्ये. मग काय… पोरगी माघारपणाला येत आहे (जरी नेरूळ सासर असले तरी) आमच्यासाठी तर माघारपणाला येत आहे म्हंटल्यावर आम्ही साऱ्या मुंबैकारणी स्वागताला हजरच. :dance: तर स्वागत हि शेवटी थोडे राजेशाही वाटायला हवे म्हणून " विष्णुजी कि रसोई, ओवळे नाका, ठाणे ठिक सकाळी ११ वाजता" येथे करण्याचे आयोजिले. सगळी सांगोवांगी, फोन अ फ्रेंड, रामराम (आपले ते व्हाटस अप) वर सगळ्यांना पिंगवून सगळ्याजणी जमल्या. अस्मादिक मात्र गेल्या कट्ट्याला जागल्या प्रमाणे आणि रविवार असल्या कारणाने सुस्त येस टी च्या कृपेमुळे सगळ्याच्या नंतरच नियोजित ठिकाणी पोहचल्या.

ठाणे ओवळे नाका इथे उतरून पहिल्या एका टपरीवजा हॉटेल मालकास विष्णुजी कि रसोई कुठे आहे रे बाबा? असे विचारले. केवढा मोठा तरी प्रश्नचिन्ह त्या बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर *unknw* . माझ्या मनात तर अरे तुझे विष्णु जी कि रसोई नाही माहित मग ठाण्यात राहतोस तरी कशाला असे काहीसे आलेले :-| शेवटी चारपाच रिक्क्षावाले, २ आजोबा यांना विचारून झाले. सगळ्याचे उत्तर माहित नाही. ऑ? आता असेच घरी जावे लागते आहे कि काय असा प्रश्न येउन गेला. मीच मधुराला फोन करून काही स्थळखुण आहे का विचारले. तर म्हणाली कि नवीन पेट्रोल पंपाचे काम चालू आहे त्याच्या बाजुला. तरी ७ मिनिटे चालून सुद्धा कुठे हि बांधकाम चालू असलेले दिसले नाही. शेवटी एक "सोलकढी" नामक हॉटेलात शिरून एकदम गरीब भाव चेहऱ्यावर आणत तिथल्या मेनेजरला ओशाळवाणे हसत पत्ता विचारला. मराठीदाक्षिण्य दाखवत त्याने मला सांगितले याच रस्त्यावर सरळ चालत जा ५ एक मिनिटावरच आहे. त्याचे आभार मानुन बाहेर आले. मनात म्हंटले हेमे, कसली आहेस ग तू, एका हॉटेलात शिरून सरळ दुसऱ्या हॉटेलचा पत्ता विचारतेस. नगच आहेस बाई … खिक्क. शेवटी त्याने सांगितल्या प्रमाणे बोर्ड दिसला. हुश्श …. म्हणजे कट्ट्याला हजेरी लागणार आपली. :yahoo:

दरवाज्यातुन आत जाताच चिमण्याचा किलबिलाट ऐकू आला. ( म्हणजे काय? आणखीन कोण असणार?). आत जाताच एक मस्त डायलॉग चिटकवला " कुठे फेडाल ग हि पाप, १ किलोमीटर चालवले मला, २ किलो वजन कमी झाले न?" असे म्हणत हसत हसत विराजमान झाले. माझ्या अगोदरच सौ. मुवी, कस्तुरी, अजया, सूर( २कन्या समवेत), सविता ००१, अद्वेय ( सुपुत्र समवेत ), मीच मधुरा( त्यांच्या कन्ये समवेत), दुर्गावी, इनिगोय( त्यांच्या सुपुत्र समवेत), मोक्षदा आणि सेंटर ऑफ कट्टा मृणालिनीने अगोदरच हजेरी लावली होती. उशीरा आल्यामुळे अजयाने बहरेन इथुन आणलेल्या अत्तर आणि चॉकलेटला मला मुकावे लागले :'-( अजयाच्या घरी असलेल्या झाडावरचे आवळे तेवढे पदरात पडले तेच पवित्र मानले आणि आम्ही सुद्धा काही कमी नाही असे म्हणत वसई गावातले नुकतेच तोडुन आणलेले जाम स्टाटर म्हणून समोर टिपोय वर टाकताच दोन मिनिटात गुडूप पण झाले. मग बसल्या बसल्या सगळ्याची ओळख परेड झाली आणि गप्पांना वेग आला. १२. १५ चे १. १५ झाले हे पोटात कावळे काव काव करायला लागल्यावर समजले. मग भोजनस्थित झालो. हसत खेळत अस्सल महाराष्ट्रीयन आणि पंजाबी जेवणाचा फडशा पाडला. जेवण सांगता श्रीखंड व आइसक्रीमने करण्यात आली. अमंळ जेवण जास्त झाले म्हणून परत सोप्यावर ठाण मांडण्यात आले आणि पाहतो तर समोरच पानाचे काऊन्टर दिसले. मग काय दोन दोन पानाबरोबर परत गप्पाचा फड रंगला. प्रत्येकीला त्यांची बाकीचे हि कामे व बाहेर तात्काळले ड्रायवर असल्याने व मुले सुद्धा दंगामस्ती करून झाल्याने पेंगुळली होती. शेवटी जड अंतकरणाने आणि तुडुंब पोटाने विष्णुजीच्या रसोइतुन बाहेर पडलो. पण तरीही आजबाजूच्या अतिशय शोभिवंत व जून्या कालीन वस्तु समवेत फोटो काढण्याचे मोह आवरेना. शेवटचे फोटोशेशन करून पुढच्या कट्ट्याची सुपारी अजयाच्या घरी देऊन सगळ्या जणी *BYE* करून पांगल्या. फोटो आणि बाकी काही तपशीलवार प्रतिसादातून पुरवले जातील.

हे ठिकाणजीवनमानमौजमजाप्रकटनसद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

7 Apr 2014 - 9:15 pm | यशोधरा

मस्त लिहिला आहे वृ हेमे, आवडला.

अवांतर : संजीवनी मंत्र म्हट्ला गं. २५००/- ला पडला मंत्र!

शिद's picture

7 Apr 2014 - 9:22 pm | शिद

मस्त वृत्तांत... :)

फक्त संमं सांगुन

पोरगी माघारपणाला येत आहे

चे 'माहेरपणाला' बदल करुन घ्या.

मुक्त विहारि's picture

7 Apr 2014 - 9:26 pm | मुक्त विहारि

आवडला...

अजया's picture

7 Apr 2014 - 9:49 pm | अजया

काही क्षणचित्रे!
१.सर्व छायाचित्रे मोक्षदा ताईंनी काढली आहेत.अत्यंत उत्साहाने त्या सर्व जणींमध्ये मिसळून गेल्या!
२. सौ.मुविनी कट्ट्याला हजेरी लावुन कुटुंब रंगलय कट्ट्यात चा प्रत्यय दिला.विशेष म्हणजे त्या आम्हा सर्व जणींना प्रथमच भेटल्या आहेत असे वाटलेच नाही!पण त्यांनी वड्या आणल्या नव्हत्या ,त्यामुळे वड्या मुविच बनवत असावेत असं
वाटतय!
३.भावनाने मस्त किस्से आणि विडंबनं ऐकवुन मजा आणली कट्ट्याला!
४.सर्व बच्चा मंडळींनी आयांना अजीबात त्रास न दिल्याने कट्ट्याला जास्तच मजा आली!
.

सुरुवातेला जमलेल्या मैत्रिणी

.
.

मिळून सार्‍याजणी!

(लाल कपड्यांमध्ये अद्वेय आणि पुढे अद्वेयचा मुलगा अद्वेय, बाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस, इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया, अजया च्या मागे दुर्गावी, तिच्या पुढे सविता ००१, साविच्या मागे कस्तुरी, तिच्या बाजूला भावना कल्लोळ, पुढे सौ मूवी, बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर - आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा . ....+)
.
.
.

फोटोंमध्ये न दिसणार्‍या दोन अनाहितांनी फोनमधुन कट्ट्याला हजेरी लावली होती.सानिकाने पश्चिमेकडुन आणि मनुराणीने पूर्वेकडुन!आमच्या इतक्याच उत्साहाने त्याही या कट्ट्याच्या ठरवण्यापासुन सहभागी होत्या. त्यामुळे फोनमधुन असल्या तरी त्या कट्ट्याला आल्या होत्याच.

सानिकास्वप्निल's picture

7 Apr 2014 - 10:39 pm | सानिकास्वप्निल

कट्टा दणक्यात होणार खात्रीच होती, खुसखुशीत वृत्तांत भावनाकल्लोळ आणी मस्तं फोटो मोक्षदाताई :)
ह्या कट्ट्याला यायला जमले नाही म्हणून जळजळ झाली खरी पण मैत्रीणींशी गप्पा मारून खूप छान वाटले, मागच्या कट्ट्याची आठवण आली :)

अनाहिता रॉक्स!!

फोटो आणि वृत्तांत छानच आहेत. कट्ट्याला हजर नसलो तरी तिकडे काय चालू असेल, भेटल्या असतील का सगळ्याजणी, काय गप्पा चालू असतील, आता फोन करू का नंतर असे बरेच प्रश्न पडत होते.
सर्व अनाहितांनी ठरवल्याप्रमाणे मागच्या वेळेप्रमाणे कट्टा जोरदार यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन.
आणि असेच अनेक कट्टे भविष्यात होण्यासाठी खूप शुभेच्छा. जमेल तेवा आणि जमेल तशी हजेरी लावली जाईलच.

हा आता खरेच इनो ची बाटली ,सोडा -लिंबू ,कोकम सरबत काय हवे ते घ्या पण जरूर घ्याच .याची खरी गरज आहे आता काहींना
ताक,

1

चिंचेचे सार

https://farm8.staticflickr.com/7450/13690327384_971a0617b9.jpg

आरोही's picture

7 Apr 2014 - 10:33 pm | आरोही

3
चिंचेचे सार

वडाभात
3

अजया's picture

7 Apr 2014 - 10:49 pm | अजया

खरडा आणि ठेचा
.
.
पाकातली बोरं!
.
लसूण फ्राय

अग मी या फोटो ची वाट बघत होते मोक्षदा ताई कडून अजून असतील बघ चटण्यांचे जवळ जवळ ५-६ प्रकार होते त्याचे पण फोटो काढलेत ग ...;-)

तीळाची चटणी,दाण्याची चटणी,पंचामृत
.

अरेरे हा फोटो माझ्याकडून टाकायचा राहिला होता ....घ्या आता हा बघा ...होऊ दे जळजळ ... ;-)

1

श्रीरंग_जोशी's picture

9 Apr 2014 - 9:27 am | श्रीरंग_जोशी

पाकातली बोरं - लहानपणी शाळेबाहेर मिळायची. मधल्या सुटीत अनेकदा खायचो. आजही ती चव जीभेवर रेंगाळत आहे :-).

सौ.मुवि's picture

8 Apr 2014 - 9:22 pm | सौ.मुवि

ह्यांनी वड्या केल्या होत्या.त्या संपल्या. आता पुढच्या वेळी, वड्या नक्की आणीन.

बादवे,

कट्टा मस्त झाला.तुम्हा सगळ्या जणींना भेटून मला खूप आनंद झाला.

खरे तर, तुम्हा सगळ्या जणींना भेटण्यापुर्वी मनांत थोडी धाक-धूक होती, की आपण इथे नविन आहोत.सगळ्या जणी आपल्याशी कशा वागतील.पण पहिल्या क्षणा पासूनच तुम्ही मला तुमच्या सामावून घेतलेत.

रोजच्या रांधा-वाढा अन उष्टी काढा, ह्या सरधोपट रहाटगाडग्यातून थोडे वेगळे पण मिळाले.त्यामुळे मजा आली.

स्पंदना's picture

9 Apr 2014 - 5:14 am | स्पंदना

वाह! कश्या का असेना पण एक्स्प्रेस झाल्या तुम्ही अन त्याचा अतिशय आनंद वाटला.
मुवि आम्हाला खुप आमचे वाटतात अन त्यांच्या म्हणुन तुम्हां बद्दलपण तोच जिव्हाळा आहे.
कळावे
अपर्णा

अपर्णा तै, प्रत्येक वाक्याशी सहमत ....सौ .मूवी छान वाटले तुम्हाला भेटून ...+)

आरोही's picture

9 Apr 2014 - 2:34 pm | आरोही

वरतून तिसऱ्या फोटो मध्ये लाल कपड्यांमध्ये मी आणि पुढे माझा मुलगा अद्वेय,माझ्याबाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस ,इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया ,अजया च्या मागे दुर्गावी,तिच्या पुढे सविता ००१ ,साविच्या मागे कस्तुरी ,तिच्या बाजूला भावना कल्लोळ ,पुढे सौ मूवी ,बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा ..+)

आरोही's picture

9 Apr 2014 - 2:41 pm | आरोही

प्रतिसाद फोटो च्या खाली का येत नाहीये ?????

प्रतिसाद फोटोच्या खालीच आहेत.

ओळंबा लावा. (प्लंब बॉब)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
थोडे खाली आहेत एवढंच.

आरोही's picture

9 Apr 2014 - 2:38 pm | आरोही

वरतून तिसऱ्या फोटो मध्ये लाल कपड्यांमध्ये मी आणि पुढे माझा मुलगा अद्वेय,माझ्याबाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस ,इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया ,अजया च्या मागे दुर्गावी,तिच्या पुढे सविता ००१ ,साविच्या मागे कस्तुरी ,तिच्या बाजूला भावना कल्लोळ ,पुढे सौ मूवी ,बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा . ....+)

फोटो टाकले हे छान झालं. मस्त मस्त वृत्तांत :)

खटपट्या's picture

7 Apr 2014 - 9:52 pm | खटपट्या

ओळख परेड हि होऊन जाउद्या

पैसा's picture

7 Apr 2014 - 9:57 pm | पैसा

मस्त वृत्तांत आणि फोटो! सगळी छोटी मंडळी पण मज्जेत दिसताहेत! करा धमाल!

आरोही's picture

7 Apr 2014 - 9:59 pm | आरोही

खरेच मस्त कट्टा झाला न ...सकाळी ११ .३० वाजेपासून ३.३० फक्त धमाल नुस्ती....खरेतर बच्चे कंपनी नि सुद्धा खूप एन्जोय केले ..सगळी अगदी आधीपासून एकमेकांना ओळखत असल्यासारखी मिसळली एकमेकांत ..माझा मुलगा तर आज पण इनि च्या मुलाची आठवण काढत होता ...+)

इनिगोय's picture

7 Apr 2014 - 11:01 pm | इनिगोय

अगदी अगदी.. बहुतेकजणी समोरासमोर पहिल्यांदाच भेटल्या आहेत हे जाणवलंसुद्धा नाही.
मला घरी गेल्यावर ज्युनिअर्सनी केलेल्या धांगडधिंग्याचा डिट्टेल अपडेटही मिळाला! बैलगाडीवर कस्सली धमाल केली आणि खुर्च्यांखाली कस्से लपलेलो याच्यासकट. :-D
मस्त रिफ्रेश झालो सगळ्या!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2014 - 10:01 pm | अत्रुप्त आत्मा

फोटूssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss!!! :-/

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2014 - 10:05 pm | अत्रुप्त आत्मा

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.............बोमल्यावरनं कमेंट जाईपर्यंत फोटू आले सुद्धा! :)
आता ओळख परेडsssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss :-/

=))

मितान's picture

7 Apr 2014 - 10:02 pm | मितान

मस्त झालाय कट्टा...:)
बाकी गॉसिप वाचायच्या आशेने आले होते पण.....
हेमे, तुझसे ये उम्मीद न थी :(

अग आणि मोक्षदा ताई ने आणलेली मोगऱ्याचे गजरे आणि चाफ्याची फुले पण तुला नाही मिळाली भावने... .....+)

वा! मस्त झालेला दिस्तोय कट्टा. यञ्जॉय!

अजून खादाडी चे फोटो यायचे आहेत जरा वाट बघा .... +)

केदार-मिसळपाव's picture

7 Apr 2014 - 10:20 pm | केदार-मिसळपाव

देशात एकुणच कट्टा करण्याचे पेव फुटलेले दिसते.
फोटो छान आहेत. बाकी अनहिता मंडळी कुठेही मागे नाहित. कट्टाही अगदी तोडिस तोड आहे.
आणि कट्ट्याचा वृतांत अनाहिता सदरात न टाकता सर्वसामाण्य जणतेच्या विभागात टाकल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.

आत्मशून्य's picture

7 Apr 2014 - 10:34 pm | आत्मशून्य

कट्टा आवडल्या गेल्या आहे... अनाहीताचा कट्टा हा तुलनेने कमी दिसणारा प्रकार आहे. याची वारंवारता वाढवली पाहिजे.

लंबूटांग's picture

8 Apr 2014 - 1:27 am | लंबूटांग

देशात एकुणच कट्टा करण्याचे पेव फुटलेले दिसते.
फोटो छान आहेत.

सहमत.

आणि कट्ट्याचा वृतांत अनाहिता सदरात न टाकता सर्वसामाण्य जणतेच्या विभागात टाकल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.

अनाहितांचा वृत्तांत इथे टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. जर वेगळा विभाग आणि त्यांचाच कट्टा आहे तर मग हे इथे कशाला?

असो. बरेच अनुत्तरीत प्रश्न आहेत त्या विभागाच्या गरज आणि जस्टिफिकेशन(मराठी शब्द?) बद्दल त्यात हा अजून एक.

किती वेळ राहतोय हा प्रतिसाद ते संमंच जाणे.

प्रभाकर पेठकर's picture

8 Apr 2014 - 1:30 am | प्रभाकर पेठकर

जस्टिफिकेशन(मराठी शब्द?) = समर्थनियता??

पियुशा's picture

8 Apr 2014 - 10:50 am | पियुशा

@ लंबूटांग -अनाहितांचा वृत्तांत इथे टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. जर वेगळा विभाग आणि त्यांचाच कट्टा आहे तर मग हे इथे कशाला?
का ? तुमची काही हरकत ?
सगळ्या मिपाकराना वाचता यावा म्हणुनच टाकला असेल ना ?
बाकी कट्टा एकदम झक्कास बर का :)

आरोही's picture

7 Apr 2014 - 10:41 pm | आरोही

शेवभाजी
5

झुणका
6

चना मसाला
7

पनीर बटर मसाला
7

दाल तडका
8

जीरा राईस
9

जेवण के फोटो डकवने वालो, मिपा की जनता माफ नहीं करेंगी!! ;)

आत्मशून्य's picture

7 Apr 2014 - 10:52 pm | आत्मशून्य

अनाहिता मधे नसल्याचे दुखः निर्माण करणारा धागा. णीशेद..!णीशेद..!णीशेद..!

पैसा's picture

7 Apr 2014 - 11:02 pm | पैसा

खादाडी मस्तच आहे!

आरोही's picture

7 Apr 2014 - 11:05 pm | आरोही

पै तै, चटण्यांचे हि खूप प्रकार होते परत श्रीखंड ,फुलके ,भाकरी,रोटी ,नान आणि खमंग अशी गरमागरम कांदाभजी पण होते ...+)

आरोही's picture

7 Apr 2014 - 11:06 pm | आरोही

पै तै, चटण्यांचे हि खूप प्रकार होते परत श्रीखंड ,फुलके ,भाकरी,रोटी ,नान आणि खमंग अशी गरमागरम कांदाभजी पण होते ...+)

ए तायांनो आधीच जळजळ झालीय. अभी रुलाओगे क्या हमे :( :'(

हेच म्हणते. बस, अब रुलाओगे क्या!

विकास's picture

7 Apr 2014 - 11:06 pm | विकास

चांगला वृत्तांत. परत शोधाशोध करायची वेळ आल्यास खालील नकाशा दाखवा. ;)

एकदा जाऊन आल्यावर परत शोधाशोध कशी करावी लागेल बर ?????;-)

प्रभाकर पेठकर's picture

8 Apr 2014 - 2:00 pm | प्रभाकर पेठकर

विकासजी,

ह्यातून कसे शोधायचे? 'विष्णुजीकी रसोई' ह्या व्यतिरिक्त कांहीच खुणा नाहीत. आणि तेच तर शोधायचे आहे.
हे दृष्य ७-८ हजार फुटांवरून पाहिल्यासारखे वाटते आहे. रस्त्याच्या मुख्य आणि ढोबळ खुणाही दिसत नाहियेत.

ब़जरबट्टू's picture

9 Apr 2014 - 8:02 am | ब़जरबट्टू

काका, त्या चित्रावर जा, व उंदिराची कळ दाबा जरा, ७-८ हजारावरुन ७०-८० किमी वर सहज याल तुम्ही... :)

ब़जरबट्टू's picture

9 Apr 2014 - 12:26 pm | ब़जरबट्टू

किमी नाय.. फूट .. फुट.. फुअतोयच आता.. :))

मधुरा देशपांडे's picture

7 Apr 2014 - 11:14 pm | मधुरा देशपांडे

जबराट कट्टा आणि वृत्तांत. काल चेपूवर फोटू बघूनच जळजळ झाली होती. आता डीट्टेल वृत्तांत आणि त्यावर खाद्यपदार्थांचे फोटू बघून तर खूपच झाली. त्यात अजून भर म्हणून माहेरचे वऱ्हाडी पदार्थ. वडा भात आणि झुणका आणि पाकातली बोरं आणि... हाय राम...

रेवती's picture

7 Apr 2014 - 11:33 pm | रेवती

नाही मी बोलत आऽऽता! ;)

सानिकास्वप्निल's picture

8 Apr 2014 - 12:03 am | सानिकास्वप्निल

खादाडीचे फोटो बघून जळजळजळ्जळ होतेय ...किती किती तो छळवाद....श्या
पाकातली बोरं ....आईग्ग्गं....

प्यारे१'s picture

8 Apr 2014 - 12:48 am | प्यारे१

आसुरी आनंद झाला!
आपल्या पाकृ आमची अशीच जळजळ होत असते.

बा द वे, विष्णु मनोहर हे आमच्या मातोश्रींच्या आवडीचे शेफ आहेत. उपलब्ध साहित्यामध्येच उत्तम पाकॄ बनवण्याचं कौशल्य हेच उत्तम बल्लव असण्याचं लक्षण आहे. ते कौशल्य विष्णू मनोहरांच्या कार्यक्रमामध्ये वारंवार दिसतं.

बॅटमॅन's picture

8 Apr 2014 - 12:17 am | बॅटमॅन

पाकातली बोरं हा नक्की काय प्रकार आहे बादवे> कृपया जाणकारान्नी मार्गदर्षण करावे ही इणंती.

मला वाटतं पाकात ते लहान बोराएवढे रसगुल्ले असतात. अतिशय चविष्ट लागतात.

बॅटमॅन's picture

8 Apr 2014 - 12:57 am | बॅटमॅन

रसगुल्ले? मग बोरं कशाला म्हणतील त्याला? असो. असतीलही, आपल्याला काय शेवटी चव उत्तम लागल्याशी कारण म्हणा.

हाहाहा अरे मी खाल्लेले - रसमालाईच पण अनेक लहान लहान रस्गुल्ला बोराएवढे घातलेली. अफाटच लागते :)

बॅटमॅन's picture

8 Apr 2014 - 1:02 am | बॅटमॅन

वा जबराटच!!!

आनन्दिता's picture

8 Apr 2014 - 3:35 am | आनन्दिता

नै शुचि ही खरोखरची छोटी बोरं साखरेच्या / गुळाच्या पाकात शिजवलेली असतात... ऑस्स्स्स्स्स्स्म्म्म लागतात...

शुचि's picture

8 Apr 2014 - 3:38 am | शुचि

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2014 - 11:42 am | डॉ सुहास म्हात्रे

रसमालाईच पण अनेक लहान लहान रस्गुल्ला बोराएवढे घातलेली. तिला अंगूरमलाई म्हणतात. मस्त असते.

मधुरा देशपांडे's picture

8 Apr 2014 - 1:05 am | मधुरा देशपांडे

जी आपली नेहमीची बोरे असतात, ती वाळवतात आणि मग त्यांना गुळाच्या कि साखरेच्या पाकात शिजवतात. विदर्भात आणि बहुधा खानदेशात देखील हा प्रकार केला जातो. प्रमाणासहित पाकृ माहित नाही. जमल्यास ज्येष्ठ महिलांना विचारून सांगेन.

सॉरी मी एक पदार्थ खाल्ला होता ज्यामध्ये रसमलाईत लहान लहान बोराएवढे रसगुल्ले होते. मला वाटला त्याबद्दलच आपण बोलता आहात :(

मधुरा देशपांडे's picture

8 Apr 2014 - 1:10 am | मधुरा देशपांडे

तुम्ही म्हणताय ती अंगूर मलाई असावी. :)

येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!!!!!!!!!! :)

ऐला भारीचे की प्रकार! धन्स.

ब़जरबट्टू's picture

8 Apr 2014 - 12:56 pm | ब़जरबट्टू

विदर्भात हा सहज आढळतो.. वाळलेली बोरे पातळ साखरेच्या पाकात थोडी मुरु दिली की झाले, चटमट एकदम... :)

आता उन्हाळा सुरु झाला की, आंबा रस, वड्यांची भाजी, व त्या भाजीत ही बोरे मस्त.. आहाहा...

(तोंपासु )बजरू...

त्रिवेणी's picture

8 Apr 2014 - 2:25 pm | त्रिवेणी

साखर नाही, गुळाचा पाक.

मधुरा देशपांडे's picture

8 Apr 2014 - 2:37 pm | मधुरा देशपांडे

साखरेचा पण असतो. दोन्ही प्रकार आहेत.

हवालदार's picture

8 Apr 2014 - 2:07 pm | हवालदार

हा प्रकार प्रथमच ऐकला. बोरे अह्मदबादी घ्यायची की गावठी?

रमेश आठवले's picture

8 Apr 2014 - 7:53 pm | रमेश आठवले

फोटोतली बोरे अमदावादी नाहीत. ती बोरे लंब गोलाकार असतात आणि आपल्याकडे मिळतात त्या पेक्षा मोठ्या आकाराची. त्यांचा रंग हिरव्यापासून पिकण्याच्या स्थिती प्रमाणे पिवळा होत जातो - पण ती सहसा लाल होत नाहीत.

अप्पा जोगळेकर's picture

8 Apr 2014 - 12:22 am | अप्पा जोगळेकर

छानच हो.

व्वा! कट्टा आणि कट्टा वृत्तांत दोन्ही झकास. अनाहिताचे असेच वाढते कट्टे होवोत आणि संम्मेलनं भरोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.

खटपट्या's picture

8 Apr 2014 - 1:32 am | खटपट्या

हे सर्व पदार्थ तिथे रोज मिळतात ? कि स्पेशल सांगावे लागतात ? कारण हे ठिकाण माझ्या घरापासून जवळ आहे. जाता येईल.

प्रभाकर पेठकर's picture

8 Apr 2014 - 1:36 am | प्रभाकर पेठकर

प्रत्येक कट्ट्याच्या खादाडीच्या वर्णनाशेवटी त्या त्या उपहारगृहाचा संपर्क क्रमांक देण्याची प्रथा सुरु करावी असे सुचवितो.

विश्णूजी की रसोई,ओवळा नाका ,ठाणे
९००४७९५४३२.
९९६७५४२८०५

खटपट्या's picture

8 Apr 2014 - 10:26 am | खटपट्या

धन्यवाद अजया तै

भीडस्त's picture

8 Apr 2014 - 12:44 pm | भीडस्त

<<पुढच्या कट्ट्याची सुपारी अजयाच्या घरी देऊन सगळ्या जणी Bye करून पांगल्या>>

जीडीसीच्या पाप्यांनासुद्दील दया आवातानं एखान्दिशी...
;-) ;-)

म्हणजे पो ट दु खी छातीतली ज ळ ज ळ
एकदाची थांबेल तरी...

बा भिडस्ता, जीडीसीच्या पाप्यांना आवतानं कधीपासुन लागायला लागली?
जळजळीसाठी इनो घे ;)

प्रभाकर पेठकर's picture

8 Apr 2014 - 2:03 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद.

कौशी's picture

8 Apr 2014 - 3:14 am | कौशी

फोटो आणि कट्टा वृत्तांत आवड्ला.

रसरशीत अन खुसखुशीत कट्टा झाला.
मी नेमकी मुलांबरोबर बाहेर गेले होते नाहीतर नक्कीच हजेरी लागायची होती.
चटण्यांच वर्णन येइल का गो बायांनो?

कंजूस's picture

8 Apr 2014 - 7:57 am | कंजूस

संजिवनी मंत्र २५००/ ,तर गायत्रि मंत्र कितीला ?
हे पदार्थ स्वत: वि०म० येऊन करतात का फक्त हॉटेल (खाणावळ)चे नाव आहे ?

प्रमोद देर्देकर's picture

8 Apr 2014 - 8:33 am | प्रमोद देर्देकर

छान कट्टा आणि वृत्तांत

दाल तडकाचा फोटो बघुन काय काय होतय ते कस सांगु?

सगळ्या अनाहितांचे खुप खुप धन्यवाद!! माझ्यासाठी सगळ्याजणी अगदी खास वेळ काढुन आल्या. खुप छान वाटले. प्रत्येकीला पहिल्यांदाच भेटत होते, पण कुठेही असे जाणवले नाही. असे वाटत होते जसे काही बर्‍याच वर्षांपासुन एकमेकांना ओळखतोय. खरच खुप छान दिवस गेला तो. मस्त एंजॉय केले सगळ्यांनी. धन्स सर्वांना. :)

प्रभाकर पेठकर's picture

8 Apr 2014 - 2:06 pm | प्रभाकर पेठकर

'अनाहिता' ऐवजी मुख्य फलकावर निमंत्रण पाठविले असते तर बरेच जणं आले असते.

निवेदिता-ताई's picture

8 Apr 2014 - 10:54 am | निवेदिता-ताई

मस्त्...मस्त...

एकदम सही कट्टा आणि वृतांत :)