गाडी चालवणा-या समस्त लोकांपैकी फार कमी लोकांना पॅरलल पार्किंग व्यवस्थित जमतं. माझ्या सोसायटीतल्या काही महाभागांना तर पार्किंग नावाचं काही असतं हेच माहित नाही; ते येतात आणि जिथे भिंत समोर येईल तिथे गाडी थांबवून उतरून घरी जातात. असो.
पॅरलल पार्किंग हे खूप महत्वाचं स्किल आहे स्किल, माझ्या मते. आणि ते यायला हवं. ते वाटतं तितकं कठीण नव्हे. जराशी भूमिती, जरासं गणित, आणि जरासा अंदाज आला, की झालं.
मी, मला कळलेलं पॅरलल पार्किंग इथे तुम्हाला सांगावं म्हणतो.. :)
प्रतिक्रिया
30 Nov 2013 - 5:48 pm | पुष्करिणी
परफेक्ट :)
30 Nov 2013 - 5:54 pm | सुहास..
बर झाल मी सायकल वापरतो ;)
बाकी पुण्यात ( पुण्यातल्या पेठांमध्ये ) दुचाकीच काय साधी सायकल पार्क करणे ही ईतकी मोठी कला आहे की ती ब्रम्हदेवाला कितपत जमेल याबाबत साशंक आहे :)
30 Nov 2013 - 6:17 pm | उपास
अतिशय उपयुक्त वेल्ला..
पॅरेलेल पार्किंग व्यवस्थित करणारे काही महाभाग गाडी बाहेर काढताना धसमुसळेपणा (बहुतेक्वेळा) अतिआत्मविश्वासामुळे पाहिलेत..
बरं, हे भारतात ठीक आहे, अमेरिकावाल्यांसाठी पुढचं वर्जन द्या ;)
30 Nov 2013 - 6:21 pm | नितिन थत्ते
स्टेप ४ मध्ये दाखवलेल्या स्थितीत गाडी कधीही पार्क करू नये. अन्यथा मधल्या जागेत दुचाकी आणून उभी केली जाईल आणि तुम्ही बसाल बोंबलत.
2 Dec 2013 - 11:04 am | आनन्दा
अहो स्टेप ४ काय, स्टेप ५ ला पण मी पाहिलेय दुचाकी कोंबलेली, हँडल लॉक.... आणि मग मी अशी दुचाकी रस्त्यावर मध्यभागी आणून उभी करून ठेवतो (यात मी सूड घेणे, या पेक्षा त्या गाडीवाल्याच्या हँडललॉक चा जास्त भाग असतो.)... आता खा शिव्या!!
30 Nov 2013 - 6:27 pm | स्पंदना
हात तेरे की.
मला वाटल काय स्टेपनी वगैरेला हल्ली पॅरलल पार्किंग म्हनतात की काय.
असो. काय वांदा न्हाय.
हा तर कस करायच, गाडी दुसर्या गाडीच्या मागच्या खिडकीपर्यम्त आपली पुढची खिडकी येइपर्यंत आणायची. मग रिव्हर्स टाकायचा आणि गाडी आत वळवायची. जोवर रस्त्याच्या बाजुच्या गटारीचा कर्ब आपल्य गाडीच्या मागच्या भागाने झाकलेला दिअस्त नाही साईड मिरर मध्ये तोवर टर्न मारत रहायचा. एकदा मिररमध्ये कर्ब झाकला गेला की स्टीअरींग उलट्या बाजुला फिअरवायला सुरवात करायची. तोवर आपण दोन्ही गाड्यांच्या मध्ये पोहोचलेले असतो. मग गाडे लायनित आली असली ठिक नाहीतर थोडी पुढे मागे करुन लावुन द्याची. हा.का.ना.का.
1 Dec 2013 - 4:51 pm | जेनी...
आयशप्पथ मी हीच ट्रीक वापरते , एक्दम इज्जीबिज्जि
30 Nov 2013 - 6:37 pm | यसवायजी
छान.
फक्त सगळ्या फटुत बॉक्सऐवजी गाडी दावली असती तर बेस झालं असतं..
न्हाई म्हंजी ते ताँड कुटं आनी ... कुटं हे पुढच्या फटुत लौकर समजलं न्हाई. ;)
30 Nov 2013 - 6:57 pm | तिमा
पॅरलल पार्किंग नीट येण्यासाठी आधी रिव्हर्स नीट यायला पाहिजे. तेच बहुतेकांचं कच्चं असतं!
30 Nov 2013 - 7:25 pm | सौंदाळा
छान.
पुण्यात याचा सराव आपोआप होवुन जातो.
लाल महालाच्या समोरच्या गल्लीत, बाजीराव रस्त्यावर, आपटे रस्त्यावर वगैरे पॅरलल पार्कींग करुन आता तयार झालोय.
आधी चुकुन पॅरलल वर्किंग वाचले.
अवांतरः लई तरास होतो हो. एक असाइन केलेले काम, मग जरा हे बघुन घे, अमुकतमुकला थोडी मदत कर, हे अर्जंट आहे हे आधी करु ('करु' बरं का 'कर' नाही म्हणजे करणार मीच पण उगाच 'करु') वगैरे वगैरे.
पॅरलल पार्कींग खुप बरं त्यापेक्षा.
30 Nov 2013 - 7:55 pm | अन्या दातार
आता पॅरॅलल पार्किंगमधून गाडी बाहेर कशी काढायची यावरही एक लेख येउद्यात. :)
30 Nov 2013 - 8:06 pm | अत्रुप्त आत्मा
@पॅरॅलल पार्किंगमधून गाडी बाहेर कशी काढायची >>> =)) आले रे आले... बरेच महिन्यांनी काडी...आपलं ते हे...गाडी सम्राट आले! =))
30 Nov 2013 - 8:35 pm | बाबा पाटील
याच्यात आपन एकदम एकस्पर्ट माणुस हाय बघा, चुकुन डाक्टर झाल बघा नायतर डायव्हर व्हणार हुतो.बाइ आण बाटली सोडली तर डायव्हरचे सगळे माज आपण दाखवु शकतो,नाद खुळा ...
1 Dec 2013 - 8:11 am | वेल्लाभट
पेशन वाले हात म्हन्जे तुमी पन ! लई झाक वाटलं जानून !
30 Nov 2013 - 10:58 pm | पैसा
आमच्या सोसायटीत असे महाभाग आहेत की ते गाडी भिंतीला काटकोनात लावत नाहीत. शेजारची गाडी काटकोनात आणि यांची तिरपी. मग २ गाड्यांची जागा अडते. माझ्या नवर्याने एकदा अशी सापटीत गाडी मोठ्या पराक्रमाने लावली. दुसर्या दिवशी शेजार्याने गाडी बाहेर काढताना आमच्या गाडीच्या मागच्या दाराला मजबूत चरे पाडले!
1 Dec 2013 - 8:10 am | वेल्लाभट
मीही आमच्या सोसायटीत यावरून राडे घालून झालेत. पण उपयोग नाही. मुलांबद्दल खरं असं न बोलावं पण आमच्या सोसायटीतली मुलं तद्दन नतद्रष्ट आहेत. मुद्दाम आमच्या गाडीवर ब्लेड ने डिझाईन करताना रंगे हात पकडलेलं आहे त्यांना. मुर्दाड्पणा, उद्धट उत्तरं बघाल तर शब्दाशब्दाला कानशिल लाल करावंसं वाटतं. घरी जाऊन कंप्लेंटी करून आलो तर आई बाप अर्थातच त्यांचे बाप निघाले. त्यामुळे.... पुन्हा राडा.
असो. हे ड्रायव्हिंग क्लास मधे शिकवणं गरजेचं आहे. परदेशात यावर ४ लेक्चर्स असतातच ड्राय्व्हिंग कोर्स मधे. माझी बहीण जी तिथे असते, ती सांगत होती.
1 Dec 2013 - 10:01 pm | रेवती
अगदी पैतै. हेच म्हणते. एका नातेवाईकांनी नवी गाडी घेऊन तिची पूजा, हार बीर प्रकरणे झाल्यावर थोड्यावेळाने येऊन बघतात तर मुलांनी दगडाने चरे पाडले होते. सोसायटीकडे तक्रार करून काही उपयोग नाही झाला.
बाकी धाग्याचा विषय चांगला आहे. मला आजकाल हे असले पार्कींग करावे लागते. परवाच प्यारलल पार्कींग करताना मागच्या गाडीत बसलेल्या बुवाला भयंकर अस्वस्थपणा आला. मला वाटले की आपले काहीतरी चुकले असावे. मुलाला बाहेर उरतवून बघायला सांगितले तर तसे काही नव्हते. त्यच्या आणि माझ्या गाडीमध्ये आणखी एक नॅनो गाडी पार्क होईल इतकी जागा शिल्लक होती. उगीच शहाणपणा चालला होता त्याचा!
1 Dec 2013 - 11:10 pm | जेनी...
=))
1 Dec 2013 - 12:16 pm | दिपक.कुवेत
१७ वेळा ती गाडि मागे/पुढे/तिरकि करण्यापेक्षा जरा पुढे जाउन मोकळि जागा / पार्किंग लॉट असेल तीथे जाउन पार्क करतो. आपसुक चालण्याचा व्यायाम पण होतो! (पार्किंग लॉट ते गंतव्य स्थान)
1 Dec 2013 - 2:29 pm | श्रीगुरुजी
मस्त माहिती आणि प्रात्यक्षिक. वाचताना मनोमन सराव करत होतो.
1 Dec 2013 - 4:02 pm | प्रसाद गोडबोले
मला माझी पॅरलल ची व्याख्या बदलावी लागणार वाटतं
माझ्या साठी ||||||||| हे पॅरलल होतं हो ... आता _ _ _ _ _ _ _ _ ह्याला पॅरलल म्हणावे लागेल ...
1 Dec 2013 - 4:42 pm | आनंद
================= भिंत
- - - - - - - - - कार
म्ह्णुन पॅरलल.
1 Dec 2013 - 8:04 pm | प्रसाद गोडबोले
आईन्स्टाईन रॉक्स :D
2 Dec 2013 - 8:41 am | स्पा
मस्त.. . बाकी आमच्या एका मित्राचे हे असे पुढे मागे कर्ण्यातच उरलेले पेट्रोल संपले, गाडी शेवटी पार्क झालीच नाही, तेव्हापासुन चार चाकीचा धसका घेतलेला आहे, आपली बाईक बरी :-D
2 Dec 2013 - 11:47 am | शिल्पा ब
हसु हसु खोकला आला ना !
2 Dec 2013 - 10:29 am | Dhananjay Borgaonkar
अजुन एक नवी पद्धत, सर्वात सोपी(बाकीच्या लोकांचे हाल झाले तरी चालतील).
जिथे आधीच गाडी पार्क केली असेल आणि आजुबाजुला कुठेच जागा नसेल तर पार्क केलेल्या गाडीला आपली गाडी पॅरलेली पार्क करायची आणि पार्किंग लाईट्स चालु ठेवायचे. सध्या ही खुपच प्रचलीत आहे पद्धत. बाकीच्या लोकांना त्रास झाला तरी चालेल पण आपलं काम होत पटकन.
ल़क्ष्मी रोड,जे.एम रोड, एफ्.सी. रोड गर्दीच्या अशा अनेक ठिकाणी पार्क केलेल्या गाड्या सर्रास दिसतात. रस्ता पण अडवायचा आणि वर माज देखील करायचा. माझी खुप भांडणं होतात अशा लोकांबरोबर.
2 Dec 2013 - 11:24 am | चित्रगुप्त
होता होईल तो चारचाकी घराच्या अंगणातच उभी करून जास्तीत जास्त सायकल वापरणे सुरु केले आहे, तरी आता हे करून बघणार. दोन उभ्या गाड्यांच्या मधे आपली गाडी नेण्यासाठी आपल्या गाडीच्या पुढे आणि मागे कमित कमी किती फूट जागा उपलब्ध असणे गरजेचे असते?
2 Dec 2013 - 4:31 pm | शैलेन्द्र
कमित कमी ६ फूट(३-३ फूट मागे पुढे)
3 Dec 2013 - 2:08 am | बहुगुणी
पहिल्या व्हिडिओतील पुढच्या गाडीची नंबरप्लेट काचेतून दिसण्याची step बर्यापैकी मदतीची ठरते:
बाकी आणखी काही वर्षांत खूपश्या गाड्या स्वयंचलित रीत्या असं पार्किंग करू शकतील...
3 Dec 2013 - 5:24 am | राजेश घासकडवी
शार्प टर्न घेऊन मागे फूटपाथवर गाडी चढवायची आणि मग उलटीकडे वळवून उतरवायची. कित्तीही टाइट स्पॉट असूदे, या मेथडने भन्नाट पार्क होते.
रीअर व्ह्यू कॅमेरा असला तर लेखातल्या पद्धतीने पार्क करणं फारच सोपं जातं.
3 Dec 2013 - 7:33 am | वेल्लाभट
हां, हे राईट आहे. जेंव्हा पॅरलल करत नसेन तेंव्हा मी नेहमी पुढचं फुटपाथकडचं चाक चढवतो फुटपाथवर आणि पुढे जाऊन उतरवतो. चाक आणि फुटपाथात मिमी ची जागा ठेवून पार्किंग होतं.
रस्ता अरुंद असेल तर फुटपाथकडची दोनही चाकं फुटपाथ वर असतात. गाडी तिरकी. पण रस्त्यावर २ फूट अधिक जागा. तसंही, फुटपाथ हे काय चालण्यासाठी असतात का!
3 Dec 2013 - 2:52 pm | बाळ सप्रे
सचित्र माहिती छानच!! समांतर पार्किंगची योग्य पद्धत माहिती नसल्याचा आणखी एक तोटा म्हणजे - आपण जेव्हा योग्य पद्धतीने पार्किंग करण्यासाठी वरील चित्रातील स्टेप १ ला जाउन थांबतो तेव्हा दुसरं कुणीतरी चित्र क्र.४ प्रमाणे गाडी घुसवतो :-)
3 Dec 2013 - 3:02 pm | बाळ सप्रे
समांतर पार्कींग न येणे हे तंत्र माहित नसण्यामुळे होते.. पण अशा प्रकारच्या आणखी चुका ज्या डोक्यात जातात त्यातील एक खालीलप्रमाणे..

3 Dec 2013 - 4:30 pm | योगी९००
अशा प्रकारचे पार्किंग करताना मध्ये किती जागा आहे ते जास्त important आहे. वरील दोन्ही videos मध्ये पुढे-मागे भरपूर जागा आहे. त्यामुळे toyota prius चे स्वयंचलित पार्कींग जेमतेम जागा असेल तर कदाचित उपयोगी नाही पडणार...काय माहीत?
मला माझी गाडी + पुढे-मागे १-१ फुट अशी जागा मिळते. त्यामुळे पार्कींगला खुप वेळ लागतो.
बाकी आपल्या गाडीच्या लांबीचा अंदाज न आल्याने फसलेले पार्कींग मात्र बर्याचदा पाहीले आहे...