उलट तपासणी - भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
14 Feb 2013 - 7:33 pm

मित्रांनो,
काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी दैनिक रेल्वे प्रवासात सहज वाचायला मिळाले. त्यातील 'उलटतपासणी' हे सदर वाचून व अरुंधती राय ताईंनी काढलेल्या अनमोल विचारांच्या धाग्यात सहभागी न होता हा नवा धागा टाकावासा वाटला.
श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते. त्यांच्याशी वाद घालून त्यांचे वाभाडे काढणारे कमी. तरीही एकांनी त्यांच्यातील काही त्रुटी दाखवल्यावर त्यांनी दिलेले संयमी पण खणखणीत उत्तर इथे 'तोरसेकरांनी 'घ' चा 'मा' करू नये' या शीर्षकाने इथे सादर करत आहे. त्यांना ओळखणारे इथे अनेक असतील. परंतु त्यांचा किंवा त्याच्या लिखाणाचा संदर्भ या आधीच्या धाग्यातून वाचनात आलेला नाही. म्हणून हा धागा.

उलटतपासणी ब्लॉगची लिंक.

मांडणीसमाजजीवनमानराजकारणमाध्यमवेधशिफारसमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी दैनिक रेल्वे प्रवासात सहज वाचायला मिळाले.

हे महत्वाचं

मित्रांनो

आपल्या दहा वर्षातील टिका व आरोप यांनी मोदींना मोठेच बळ मिळाले आहे. मोदी हे आपल्या शत्रूव विरोधकांच्या आव्हानातून बळ मिळवतात. तेव्हा त्यांच्यावरील बदनामीच्या हल्ल्यापासून परावृत्त व्हावे लागेल. त्यापेक्षा मोदींसमोर खरेखुरे राजकीय कृतीशील आव्हान उभे करावे लागेल. कारण आरोप व बदनामीनेच मोदींना इतकी मजल मारता आलेली आहे. काहीसे चक्रावून सोडणारे असे सिद्दीकी यांचे विरोधाभासी विधान आहे. ते मोदींना शिव्याशाप देत बसलेल्यांना समजले नाही, समजून घेण्याची गरजही वाटलेली नाही. पण मोदी समर्थकांनी सिद्दीकींचे विधान काळजीपुर्वक समजून घ्यायला हवे आहे

उलटतपासणीत पुढे वाचा

शशिकांत ओक's picture

28 Aug 2013 - 4:46 pm | शशिकांत ओक

मित्रांनो,

सत्ताधार्‍यांनी अपेक्षा बाळगायच्या नसतात, तर स्वत:विषयी जनमानसात असलेल्या अपेक्षा पार पाडण्याचा
कसोशीने प्रयत्न करायचा असतो. पंधरा वर्षे दिल्लीच्या व पाच वर्षे राजस्थानच्या जनतेने कॉग्रेस पक्षाकडे सत्ता राबवण्याचा अधिकार सोपवून त्यांच्याविषयी अपेक्षा बाळगल्या होत्या. त्याबाबतीत जनतेची निराशा झाली, म्हणूनच त्यांनी त्या दोन्ही राज्यात त्या पक्षाला धुळीस मिळवले आहे. उलट मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यात भाजपा सत्तेवर होता, त्यांच्यावर तिसर्‍यांदा विश्वास दाखवताना, तिथे किमान काही अपेक्षा पुर्ण होत असल्याची पावती मतदाराने दिली आहे. म्हणजेच दोन राज्यात जनतेची अपेक्षापुर्ती झाल्याचे दिसते, तर दोन राज्यात जनतेचा अपेक्षाभंग झालेला आहे.

जागता पहारा मधील निवडणुकांच्या निकालानंतर भाऊ तोरसेकरांनी केलेले भाष्य

शशिकांत ओक's picture

15 Jan 2014 - 12:16 am | शशिकांत ओक

राजू श्रीवास्तव नावाचा एक नकलाकार आहे. त्याने टिव्हीवर रंगवलेली एक नक्कल आठवते. त्याने कथन केलेल्या त्या विनोदातून राजकीय मिमांसेत येणारा फ़रक स्पष्ट होऊ शकेल. उत्तरप्रदेशात तेव्हाच्या सरकारने प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचे धोरण आखले होते आणि त्यावर जोरदार चर्चा चालू होत्या. त्याच संदर्भात राजूने मोठा मस्त किस्सा तयार केला व रंगवला होता.
...त्यातला वयोवृद्ध कुत्रा पुढाकार घेतो आणि त्या चिकित्सक कुत्र्याला म्हणतो, ‘इथे कोणाला वीज येण्याची चिंता आहे? आपल्याला गावात वीज येण्याशी कर्तव्य नाही बाबा. आपला स्वार्थ फ़क्त वीजेच्या खांबाशी आहे, गावोगाव चौकाचौकात खांब असले, मग आपली टांग वर करण्याची सोय होते ना? ते खांब प्रत्येक ठिकाणी नसले, मग आपली किती गैरसोय होते? वीजेच्या निमित्ताने असे अधिक खांब लागले, तर केवढी मोठी समस्या निकालात निघेल त्याचा विचार कर.’ तात्काळ तोही कुत्रा विनाविलंब वीजेचे खांब घालण्याच्या प्रस्तावाला मान्यता देऊन टाकतो. ...

आपापले स्वार्थ व संबंध
धाग्यातून आगामी निवडणूकीत नरेंद्र मोदी हे कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे व ऐतिहासिक आव्हान असल्याचे त्याच पक्षाचे बुद्धीमान नेते जयराम रमेश का म्हणतात, तेच कोडे उलगडण्याचा हा एकूण प्रयास आहे.

शशिकांत ओक's picture

17 Apr 2014 - 11:37 am | शशिकांत ओक

============ वैधानिक इशारा =============

हा मजकूर मोदीग्रस्तांच्या मानसिक आरोग्याला अपायकारक ठरू शकतो.

१६ मे २०१४ च्या संध्याकाळनंतर निवडणूक आयोगालाही अंबानी अडाणींनी विकत घेतल्याचा गौप्यस्फ़ोट ऐकायची व सहन करण्याची मानसिक तयारी आतापासूनच ठेवलेली बरी; असे मला वाटू लागले आहे. कारण त्या दिवशी सकाळी सोळाव्या लोकसभेच्या मतदानाची मोजणी सुरू व्हायची असून साधारण संध्याकाळ होता होता, निकाल स्पष्ट होणार आहेत. त्यात निकाल मोदी विरोधात गेले, तर लोकशाहीचा मोठाच विजय झाल्याचा निर्वाळा दिला जाईल. पण उलट घडले, तर मात्र तेच लोक निवडणूक आयोग जातीयवादी, अंबानीचा हस्तक असे कुठलेही आरोप करू लागतील. चार महिने सत्याचाच विजय होतो अशी ग्वाही देणारेच सत्याचा गळा घोटला गेल्याचा आक्रोश करायला गळा काढतील.

४१ पैकि २४ परतिसाद तुम्चेच कि हो भौ. तुम्चा सोताचा धागा पर्सिद्द कर्न्याचा हा आन्कि येक क्शिन प्रय्त्न कल्ला बर्का. हा हा हा

मदनबाण's picture

14 Feb 2013 - 10:37 pm | मदनबाण

शशिकांतजी एक चांगला दुवा दिल्या बद्धल तुम्हाला दुवा देतो. :)

त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते.
त्यांचा ब्लॉग (अनेक उत्तम लेख या ब्लॉग मधे आहेत) वाचुन याची खात्री पटली.
असेच अजुन उत्तम दुवे यापुढेही आपण द्यावेत ही आपणास विनंती.

मित्र हो,
सेक्युलॅरिझमने किती समस्या निर्माण केल्या?

जिथे जिथे म्हणून सेक्युलर गोंधळ वा भोंगळपणा आहे, तिथे दहशतवाद व अराजक शिरजोर होताना दिसू लागले आहे. कारण घटनात्मक सरकार आपली हुकूमत सिद्ध करण्यात कमी पडते आहे आणि त्याचे प्रमुख कारण सेक्युलर थोतांडच असल्याचे दिसून येईल. जिथे त्याचा अभाव कमी आहे, तिथे काही प्रमाणात सरकार व सत्ता यशस्वी काम करताना दिसतील.

भाऊ तोरसकरांनी उलटतपासणी च्या दि १६ मार्च२०१३च्या धाग्यात
त्यातील शार्षकाच्या फोटोतील पाठफिरवून आलेल्या पोलिसावर चपला-जोड्यांचा व दगडांचा वर्षाव करणारा जमाव त्याचा पेहराव व आवेश सर्व काही सांगून जातो. सध्याच्या परिस्थितीचे केलेले विश्लेषण मननीय आहे.

अवघ्या जगाला भेडसावणार्‍या दोन समस्या
आज अवघ्या पुढारलेल्या जगाला कुठली ना कुठली समस्या भेड्सावत असल्याचे बातम्या वाचल्या, ऐकल्यावर आपल्या लक्षात येते. कुठे ती मंदीच्या आर्थिक संकटाची समस्या असेल, कुठे दहशतवाद वा भ्रष्टाचाराची समस्या असेल. शेकडो समस्या सांगता येतील. त्यावरचे हजारो उपाय सुचवले जात असतात व त्यातले काही शेकडा उपाय योजले जात असतात. पण या उपायांनी समस्या सुटायचे दूर राहिले. उलट तीच समस्या आणखी भीषण व रौद्र स्वरूप धारण करून समोर उभीच असते.

भ्रष्टाचार वा दहशतवाद ह्या आज जगाला भेडसावणार्‍या दोन सर्वात मोठ्या समस्या आहेत.

"नाही या नाहीत! भाऊ तोरसेकरांना या त्या समस्या वाटत नाहीत!"
मग त्या आहेत तरी कोणत्या ?

मानव जातीला सर्वाधिक भेडसावणार्‍या त्या दोन प्रमुख समस्या; कायद्याचे राज्य व आधुनिक शिक्षण अशा आहेत. आश्चर्य वाटले की नाही? कायद्याचे राज्य म्हणजे सुरक्षिततेची हमी आणि आधुनिक शिक्षण म्हणजे मानवाला प्रगत करण्याचा सर्वात उत्तम मार्ग; अशीच आपली समजूत असते. मग त्यांनाच मी समस्या म्हणू लागलो, तर कोणालाही आश्चर्य वाटणारच. कदाचित काहींना राग येईल, तर काहींना हा निव्वळ मुर्खपणाच वाटू शकेल. पण तो मुर्खपणा वाटत असला तरी ते मत बाजूला ठेवून माझे म्हणणे ऐकून घ्यावे; अशी माझी आग्रहाची विनंती आहे.

उलटतपासणीत वाचून विचार करा. त्यांचे म्हणणे सूक्ष्मपणे अगदी मुलतः बरोबर आहे असे वाटू लागले तर नवल नाही.

दाभोळच्या नरेंद्र बापूभक्तांसाठी स्पष्टीकरण
...हे काय चालवले आहे तोरसेकर? तुम्हाला लिहिता येते किंवा हा स्तंभ चालवत आहात म्हणून वाटेल ते लिहिले तरी ते लोकांना पटेल असे तुम्हाला वाटते का? इतके लोकांना गृहीत धरणे तुमच्यासारख्या पत्रकारांना शोभते का? तुम्हाला श्रद्धा किंवा काय ठेवायची आहे ती ठेवा ना! पण तुमच्या लेखांवर विश्वास ठेवणे हा काय दोष असेल का? बालमोहन यांनी जे लिहिले याला माझी पूर्ण सहमती आहे.... ... 'अंनिस'चे कार्य ज्यांना ठाऊक आहे ते लोक गप्प बसून हे कसे काय सहन करतात? (बालमोहन, अमेरिका)....
... यावर भाऊ काय म्हणतात?-- त्यांच्यासाठी खुलासा इतकाच, की माझ्यावर डोळे झाकून कोणी दाभोळकरांप्रमाणे विश्वास ठेवावा ही अपेक्षा मी कधीच केलेली नाही. कारण तो वैज्ञानिक दृष्टीकोन होऊ शकत नाही. तशी दाभोळकरांच्या चहात्यांना सवय असेल तर ती त्यांना लखलाभ होवो. मी दुसर्‍या कुणाच्या विधान वा दाव्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही आणि अन्य कुणी माझ्या लिखाणावर तसा आंधळा विश्वास ठेवावा; हेसुद्धा मला आवडणारे नाही. त्याला आपली विवेकबुद्धी कुणाच्या पायी शरण ठेवणे वा गहाण टाकणे म्हणतात. माझा वाचक असा असू नये; हीच माझी अपेक्षा असते. पण दाभोळकर भक्तीमुळे माझ्या चौकसपणाला आक्षेप घेणार्‍यांचे डोळे उघडे आहेत, हे कसे समजावे? कारण या दोघांनीही दाभोळकरांवर मी घेतलेल्या आक्षेपांची उत्तरे द्यायची टाळली आहेत. उलट मी शंका काढतो, याचा त्यांना राग आलेला आहे. आणि तो माझ्यासाठी नवा नाही.... ... भक्तीभावाशी विवेकबुद्धी व विज्ञाननिष्ठा टक्कर घेऊ शकत नसते. कारण या दाभोळकर भक्तांना त्यांच्याप्रमाणेच मी देखील त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या व्यक्तीची छाननी कऊ नये असे वाटते. त्यांना माझी चिकित्सा विचलीत करते. जेव्हा अशी अढळ निष्ठा तयार होते; तेव्हा तिला बुद्धी नव्हे भक्ती म्हणतात. आणि भक्ती वा श्रद्धेला विवेकी उत्तर नसते...
प्रकाश घाटपांडे's picture

31 Mar 2013 - 10:49 am | प्रकाश घाटपांडे

ब्लॊग वाचल्यावर मला तुमचीच पहिली आठवण आली होती.

प्रकाश घाटपांडे's picture

31 Mar 2013 - 10:51 am | प्रकाश घाटपांडे

मी खालील प्रतिक्रिया भाउंच्या ब्लॊगवर दिली होती.
अनुयायी मिळाले की झाला बुवा हा निकष लावला तर आज प्रत्येक क्षेत्रात बुवाबाजी आहे. दोन चार टक्के लोक प्रस्थापित नेते असतात दोनचार ट्क्के हे बंडखोर असतात.उरलेले लोक या किंवा त्या बाजूचे अनुयायी असतात. कुठलाही मनुष्य,नेता, चळवळ,विचार सर्वकाळ आदर्श असू शकत नाहीत. दाभोलकर अंधश्रद्धांची वा अंधश्रद्ध लोकांची टिंगल करत नाहित,द्वेष करत नाही. आता श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पनांबाबत मतभेत असू शकतात. प्राधान्याची क्रमवारीही वेगळी असू शकते. अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे वाहक असतात त्यामुळे हे काम अवघड आहे. आपण मांडा अंधश्रद्धा निर्मूलनाची दिशा कशी असावी? आपलही स्वागतच होइल.प्रत्येकानी आपापल्या पद्धतीने ही व्यापक समाजपरिवर्तनाची चळवळ चालवावी.

प्रकाश जी,
आपणास उलटतपासणी ब्लॉगच्या या धाग्याला उद्देशून केलेल्या लेखनावरून माझी अनेक दिवसांनी आठवण आली म्हणून तेथे प्रतिक्रिया द्यावीशी वाटली त्याबद्दल धन्यवाद. कारण आपण अंनिवाल्यांचे नाव टाकून दिले असावे - किमान त्यांनी तुम्हाला दूर करून वा ठेऊन - असा दुजाभाव वाट्याला आल्याचे आपल्या काही लेखनातून व बोलण्यातून वाटला म्हणून ...
खरे तर मला नेहमीच आपला आदर वाटत आला आहे. तो ही डॉ दाभोलकरांच्या आदराचाच एक भाग आहे. भले त्यांचे विचार वा पवित्रे नाडीग्रंथांच्या बाबत चुकीचे वा अशास्त्रीय असतील परंतु ते तळमळीने करत असलेले समाजप्रबोधनाचे कार्य प्रशंसनीय आहे हे ही तितकेच खरे. नाडीग्रंथांच्या बाबत अंनिसने प्रत्यक्ष अनुभव न घेता काढलेल्या निष्कर्षांच्या अशास्त्रीय पवित्र्यामुळे त्यांचे माझे विचार मिळत नाहीत, पर्यायाने आपल्याशी पटत नाही म्हणून त्यांच्या व स्व. रिसबुडांच्या व आपल्याबाबत निरादराची भावना मी ठेवत नव्हतो व आजही नाही. असो.
नाडीग्रंथांचा उल्लेख आला आहे म्हणून सहज कानावर घालतो की आपण ज्योतिष तंत्र मंत्रचा 2012 दिवाळी अंक वाचलात काय? तो अंक व नंतर मार्च २०१३ चा ग्रहांकितचा असे दोन्ही अंक नाडीग्रंथांवरील अनेक विषयांना वाहिलेले होते. त्यात नाडीविरोधकांची बाजू काय तेही समाविष्ट होते. पुर्वी मला कोऱ्या कागदांवर नाडी ग्रंथांचे वाचन होते असे म्हणणे म्हणजे शुद्ध .. पणा आहे असे मत नमूद केले गेले होते. आता तर यापुढे जाऊन तसेच आणखी उत्तरेत एके ठिकाणी वाचन घडते याची व्हीडिओ क्लिप ही सादर केली गेली आहे. अर्थात म्हणून तुम्ही वा दाभोंनी नाडीग्रंथांवरील मत बदलावे असा आशावाद अपेक्षित नाही. फक्त काय प्रकार आहे याची छानबीन करायला मला आपल्यासारख्या चिकित्सकाची जोड मिळाली तर आनंद वाटेल, अंनिस बरोबर आले तर चांगले, नाही आले तरी अभ्यासकार्य चालू राहिले पाहिजे या मताचा मी आहे. असो.
आपल्या उलटतपासणीवरील विचारांवरील माझे तिथे नमूद झालेले विचार इथल्या सदस्यांसाठी खाली देत आहे.
भाऊ,

...कुठलाही मनुष्य,नेता, चळवळ,विचार सर्वकाळ आदर्श असू शकत नाहीत. दाभोलकर अंधश्रद्धांची वा अंधश्रद्ध लोकांची टिंगल करत नाहित,द्वेष करत नाही. ...

प्रकाश घाटपांडे याचे वरील कथन दोन्ही डगरीवर हात ठेवणारे म्हणून फसवे आहे. याचा अर्थ एक तर दाभो ही त्यांच्या विचारकांसाठी आदर्श उरलेले नाहीत. दाभोनी अं नि. ची दिशा स्वतः ठरवली आहे. बक्षिसाचे आमिष दाखवून ते लोकांच्या अंनि करू इच्छितात. दाभो त्यांच्या विरोधकांची निंदा वा नालस्ती करत नाही असे म्हणणे साहसाचे ठरेल. अंनि कसे असावे असे मत त्यांनी कोणाला मागितले आहे? (तसे नसेल तर)काय तर म्हणून भाऊंनी ते द्यावे.

न्या. काटजू हे माजी न्यायमुर्ती आहेत व म्हणूनच त्यांच्या मतप्रदर्शनाला महत्व आहे. शिवाय आज ते प्रेस कौन्सिल या सरकार नियुक्त स्वायत्त संस्थेचे अध्यक्ष आहेत. तेव्हा त्यांच्याकडून काही जबाबदार मतप्रदर्शनाची अपेक्षा केली जात असते...हयातभर इतरांच्या कायदा पालनाचे न्यायनिवाडे करणार्‍याने आज त्याच कायद्याच्या अधिकार व मर्यादांचे काटेकोर पालन करण्यापेक्षा पळवाटा शोधण्यासाठी बुद्धी वापरावी, ही देशातील बुद्धीवादी व प्रतिष्ठीत समाज घटकाच्या नैतिकतेचीच शोकांतिका आहे. कारण काटजू यांचे निवृत्तीनंतरचे वागणेच त्यांच्याबद्दल आशंका निर्माण करणारे होते आहे.

त्यांच्या इतका संजयदत्तचा दुसरा कोणी शत्रू नाही असे म्हणायची वेळ त्यांनीच आणून ठेवली आहे. कारण त्यांनी ज्या उतावळेपणाने व घाईगर्दीने ही भूमिका जाहिर केली, त्यामुळे आता संजय दत्तला शिक्षेतून माफ़ी देण्याचे काम काटजूंनी सरकार व राष्ट्रपती-राज्यपाल यांच्यासाठी अवघड करून ठेवलेले आहे. कारण या प्रकरणाचा त्यांनी इतका गवगवा केला आहे, की आता त्यातून सार्वत्रिक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दोन दशकांच्या अफ़ाट कष्टानंतर गुन्हा सिद्ध होऊन दोषी ठारलेल्या माणसाला दया म्हणून शिक्षा माफ़ करायची असेल; तर त्यासाठी आधीचे इतके उपदव्याप करायचेच कशाला? त्यासाठीचा खर्च जनतेने सोसावा तरी कशाला? कारण ही कायद्याची व न्यायाची प्रक्रिया फ़ुकटात होत नाही. त्यासाठी करोडो, लाखो रुपये जनतेच्या पैशातून खर्च होत असतात. काटजू वा संजय दत्तचे मित्र तो खर्च सोसत नाहीत. त्यामुळेच शिक्षा माफ़ीची मागणी वा शिफ़ारस करणार्‍याला प्रथम या तमाम गोष्टींचा विचार करणे भाग असते. तो सामान्य माणूस करत नाही. पण ज्याची अवघी हयात न्यायप्रक्रियेत गेली त्या काटजूंनाही असा व्यापक सर्वांगिण विचार सुचत नसावा? मग त्यांच्या ज्ञान व बुद्धीबद्दल शंका घेणे भाग होऊन जाते.

उलट तपासणी ब्लॉगवरील काटजू व अन्य बुद्धिवादी विचारकांनी तोडलेले तारे व त्यावर भाऊंच्या विचारांचे निवडक लेख
न्या. मार्कंडेय काटजुंना न्याय कितीसा कळतो?
संजयदत्त प्रकरणाने कायद्याचा खरा चेहरा दाखवला
न्यायावरच बोळा फ़िरवणारे कायद्याचे राज्य

शशिकांत ओक's picture

2 May 2013 - 11:48 pm | शशिकांत ओक

उलटतपासणी - तो छुपा चेहरा महेश भट्टचा होता...
भाऊ तोरसेकर सध्या गुजराथमधील दंगलीच्या मागील काही सत्ये सांगता आहेत जी फारच कमी लोकांना माहित आहेत...

आजकाल आपण बातम्यांमध्ये स्वयंसेवी संस्था असे शब्द वारंवार वाचत वा ऐकत असतो. प्रत्यक्षात जिथे सरकारी यंत्रणा तोकडी पडते; तिथे लोकांच्या मदतीला धावून जाणार्‍या कार्यकर्त्यांची सेवाभावी फ़ौज, असे त्याचे स्वरूप मानले जात होते. पण अलिकडल्या काळात अशा संस्था ही मोठमोठी बिनभांडवली दुकाने होऊन बसली आहेत. लोकांच्या हालअपेष्टा, दु:ख, यातना हे अशा संस्थांसाठी मोठे भांडवल होऊन बसले आहे. शिवाय त्यांना संयुक्त राष्ट्रसंघ, युनेस्को, अम्नेस्टी अशा विविध जागतिक संघटनांचे पाठबळ मिळत असल्याने; स्थानिक सरकारांवर त्यांचे खुप दडपण येत असते. मानवाधिकार सनद वा तशाच इतर करार व जाहिरनाम्यामुळे; अशा स्वयंसेवी संस्था म्हणजे कुठल्याही देशात घटनाबाह्य सत्ताकेंद्र बनून गेल्या आहेत....
...गुजरातची दंगल हा असाच सुगीचा व्यापार या लोकांनी करून ठेवला आहे. विविध संस्था, विश्वस्तनिधी व जगभरचे देणगीदार यांचे पैसे लुटण्यासाठी गरीबांचा वापर करण्याचा हा एक साळसूद उद्योग बनला आहे. ...

पिडितांच्या यातनांचे भांडवल करणार्‍या सेवाभावी संस्था

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Feb 2013 - 10:43 am | श्री गावसेना प्रमुख

यांची जीवावर येतेय हो ओक साहेब.

मूळ इस्लामी साहित्याची विज्ञान व तर्काच्या आधारावर चिकित्सा करता येते" या वाक्यातला ‘साहित्याची’ हा शब्द गहाळ करून

हे तर कन्व्हर्टींग्,हल्ले,तोडफोड्,बाटवणे ह्यातच अग्रेसर होते.

शशिकांत ओक's picture

15 Jan 2014 - 12:32 am | शशिकांत ओक

इब्न खालदून नावाचा एक विख्यात इतिहासकार चौदाव्या शतकात होऊन गेला. त्याचा ‘मुकदीमा’ हा ग्रंथ जगभर इतिहासाच्या अभ्यासात एक प्रमाणग्रंथ मानला जातो. कारण त्याने जगाच्या मानवी इतिहासाचे एक परिमाण आपल्या सिद्धांतातून मांडले आहे. कुठलेही राजघराणे, प्रस्थापित सत्ता, साधारण चार पिढ्यांनंतर रसातळाला जाते आणि त्याला त्याच्या संस्थापकांचीच चौथी पिढी कारणीभूत होते; असे खालदून म्हणतो. किंबहूना एखादी नवी राजसत्ता प्रस्थापित होत असतानाच, तिच्या विनाशाची बीजे त्यात पेरली जातात; असाही त्याचा दावा आहे. त्याची खालदूनने केलेली कारणमिमांसाही मोठी रोचक आहे. मानवी इतिहासातील अशा सत्तासंघर्षाचे विश्लेषण करताना त्याने ‘असाबिया’ म्हणजे विस्थापितांच्या टोळीनिष्ठेचा एक सिद्धांत मांडलेला आहे. असाबिया म्हणजे प्रस्थापित नागरी समाजाच्या बाहेर व मोकाट अपारंपारिक जीवन जगणार्‍या टोळी जीवनात जमावातील लोकांची परस्पर एकजीनसी निष्ठा. ज्या निष्ठेसाठी वा बांधिलकीसाठी आत्मसमर्पण करण्याची कटीबद्धता त्यांच्यात आढळून येते; अशा टोळीवादी बंधूभावाला खालदून ‘असाबिया’ म्हणतो.

‘असाबिया’चा आधुनिक अविष्कार

मुक्त विहारि's picture

15 Feb 2013 - 9:13 pm | मुक्त विहारि

धन्स.

असेच अजुन उत्तम दुवे यापुढेही आपण द्यावेत

पाकिस्तान हा विषय ज्यांना अभ्यासावा लागतो वा वाटतो त्यांच्यासाठी एक लिंक
वन पाकिस्तान
त्यातील एक लेटेस्ट बातमी पाकी शिपायाला मारून भारतीय जवानाच्या बलिदानाचा बदला?
indian-troops-kill-pakistani-soldier-near-kashmir-border

याठिकाणी पाकि पेपर, नियतकालिके, टीव्ही व अन्य प्रसिद्धी माध्यमांच्या सर्व लिंक्स एकत्र दिलेल्या आहेत.

शरद पवार म्हणजे, ‘कहीपे निगाहे कहीपे निशाना’

तोंडाने जा किंवा बाजूला व्हा; म्हणायचे नाही, पण समोरच्यावर तशी पाळी आणायची, यालाच राजकारण म्हणत असतात.

वा भाऊ फार सुंदर विश्लेषण ... काकांना पुतण्याने 'वाचवा' म्हणून इतिहासात हाक दिली होती...
इथे पुतण्याने काकांना 'मला वाचव' म्हणायची पाळी आणली जात आहे. किती ही झाले तरी शरदराव आता अस्ताचलाचे नायक आहेत. वय व शरीर स्वास्थ्य त्यांच्या विरोधात आधीच आहे . शिवाय घरोब्यातील लोकांची अरेरावी आता त्यांना 2014 पर्यंत ऐकून घ्यावी लागणार... तिकडे करुणानिधींवर 'करुणाजनक' प्रसंग पुत्रांनी हमरी तुमतीवर येऊन आणला आहे... त्यावर आपले भाष्य वाचायला आवडेल...

तर्री's picture

23 Feb 2013 - 8:51 am | तर्री

सेक्युलर म्हणून चाललेल्या खेळाचे दुष्परिणाम दहा वर्षे लोक भोगत आहेत आणि त्या्पासूनच तर लोकांना मुक्ती हवी आहे. तर तोच नको असलेला पर्याय लोकांसमोर ठेवून मोदींना कसे रोखता येईल? मोदीविषयीचे आकर्षण नेमके कशामुळे आहे, त्याचा तरी त्यांच्या विरोधकांनी विचार केला आहे काय?

भाऊंच्या हया ब्लॉग ची लिंक दिल्याबद्दल .

शशिकांत ओक's picture

2 Apr 2013 - 11:44 pm | शशिकांत ओक

मोदी म्हणजे २००२ च्या दंगली, असेच चित्र कायम रंगवले गेले. आता तेच दिडशहाणे मोदी देशाचे प्रधानमंत्री होतील काय, अशी चर्चा करीत आहेत. आपण ज्याची दहा वर्षे अखंड बदनामी केली व ज्याला दंगलखोर म्हणूनच लोकांपुढे पेश केले; तर लोकांना तोच माणूस आवडण्याचे कारण काय?

मितभाषी's picture

24 Feb 2013 - 12:12 am | मितभाषी

धन्यवाद
ब्लोगची लिन्क दिल्याबद्दल.

दिसण्यातला आणि बघण्यातला नेमका फ़रक

बघण्यासाठी नजर लागते किंवा इच्छा असावी लागते. अन्यथा दिसणे शक्य असले तरी बघणे अशक्य असते. आपोआपच प्रत्येकाला वेगवेगळे दिसू शकते; वेगवेगळे जाणवू शकते. बुधवारी दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले; तेव्हा त्यांनीही त्यासंबंधात एक चांगले उदाहरण दिले. भाषण करताना मध्येच तहान लागली तर घसा ओला करायला तिथे जे पाण्याचे ग्लास ठेवलेले होते. ते उचलून त्यांनी श्रोत्यांना दाखवले आणि म्हटले जो सकारात्मक विचार करील तो म्हणेल यात अर्धे पाणी आहे तर नकारात्मक विचार करणारा अर्धे रिकामी आहे असे म्हणेल. पण मी (म्हणजे मोदी) तिसर्‍या प्रकारचा माणूस आहे. मी म्हणतो हे ग्लास संपुर्ण भरलेले आहे. त्यात अर्धे पाणी व अर्धी हवा आहे. इथे बघण्यातला व दिसण्यातला फ़रक पडतो. अर्धे ग्लास रिकामे असू शकत नाही; हे वैज्ञानिक सत्यच आहे. पण ते किती लोक डोळसपणे बघू शकतात. आता कोणी म्हणेल, अर्धी हवा आहे म्हणजे काय मोठे? तशी आसमंतामध्येही हवा आहेच की सर्वदूर. मग अर्ध्या ग्लासात हवा असण्यात कुठली सकारात्मकता आली? तर त्याचे उत्तर असे, की त्या हवेचाही उपयोग होऊ शकतो का, याचा विचार ती आहे; असे डोक्यात असेल तरच होऊ शकतो. जिथे आपण फ़क्त अर्ध्या ग्लास पाण्याचाच साधन सामग्री म्हणून विचार करतो; तिथे मोदी अर्धा ग्लास हवेचाही उपयोग करून घेता येईल काय याचा विचार करतो, असा त्याचा अर्थ आहे

.
....विचारांचे अंतरंग शोधणारा प्रयास...

या लेखातील एक उतारा :
....शहाणे व बुद्धीमंत आणि सामान्य माणुस यात एक मोठा फ़रक असतो, तो म्हणजे जे दिसते ते बघण्याची सामान्य माणसाची क्षमता. नेमकी उलट स्थिती बुद्धीमंत लोकांची असते. जे साध्या डोळ्यांनीही दिसू शकते, त्याच्यासाठीही शहाण्यांना चष्मा लावूनच बघायची सवय असते. सहाजिकच त्यांना असलेले दिसत नाही आणि नसलेले दिसत असते.....
----- वाहवा -----

शशिकांत ओक's picture

26 Feb 2013 - 12:57 pm | शशिकांत ओक

दहशतवादाला धर्म नसतो (?)

The institute for Jihadi research"The institute for Jihadi research - ब्रि. मलिक">

आपल्या माध्यमातून, वॄत्तपत्रातून वा टिव्हीच्या वाहिन्यांवर जे शहाणे दहशतवादाबद्दल बोलत असतात, त्यांना मी पोपटपंची करणारे म्हणतो, तेव्हा मी असा कोण शहाणा लागून गेलो आहे, असा प्रश्न वाचकाच्या मनात येऊ शकतो आणि तो अजिबात चुकीचा नाही. तेव्हा आधी असे मी का म्हणावे; त्याचा खुलासा करणे अगत्याचे आहे. त्याचे कारण असे, की या सगळ्यांपेक्षा ब्रिगेडीयर मलिक यांच्या मताला अधिक महत्व आहे. कारण ज्या जिहादचा अनुभव आपण नित्यनेमाने घेत असतो, त्याची रणनिती व व्याख्या मुळात याच मलिकनी तयार केलेली आहे.

ब्रिगेडीयर एस. के. मलिक यांच्या निरुपणाचा गोषवारा हा आहे. त्यांच्या विवेचनपुर्ण पुस्तकाला झिया उल हक यांनी खास प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यामुळेच बाकीचे काय बोलतात, त्याला मलिक यांच्या मूळ सिद्धांताची जोड व संदर्भ नसेल; तर त्यांची सगळी बडबड निव्वळ पोपटपंचीच ठरते.
...दुबळी धर्मश्रद्धा दहशतीला आमंत्रण देत असते. त्यामुळेच जिहादच्या पुर्वतयारीसाठी मुस्लिमेतर शत्रूच्या धर्मश्रद्धा डळमळीत करण्याची अत्यावश्यक असते. पण त्याचवेळी मुस्लिमांच्या धर्मश्रद्धा कडव्या करण्याचीही गरज असते. मानसिक दुबळेपणा तात्पुरता असतो, पण धार्मिक श्रद्धेचा दुबळेपणा कायमस्वरूपी असतो. मानवी आत्म्याला फ़क्त दहशतच स्पर्श करू शकते.’...
...
जर शत्रूची श्रद्धा ढासळून टाकली, तरच त्याच्या काळजात धडकी भरवता येते. म्हणजेच त्याला दहशतीच्या प्रभावाखाली आणता येतो. म्हणूनच अंतिमत: शत्रूची धर्मश्रद्धा डळमळीत करण्यालाच सर्वाधिक महत्व असते. ज्यांच्या धार्मिक श्रद्धा पक्क्या व भक्कम असतात, त्यांच्यावर दहशतीचा कुठलाही परिणाम होत नाही.

...धर्मश्रद्धेच्या बळावर किंवा दुबळेपणावर (दहशतवाद) साधला जातो, हा त्यातला मुळ सिद्धांत आहे आणि आपण रोजच्या चर्चेतून काय ऐकत असतो? दहशतवादाला धर्म नसतो. आता सांगा तुम्ही बोधप्रद चर्चा ऐकत असता कि दहशतवाद जिहाद यावर पोपटपंची ऐकत असता?...

अवघ्या सातशे रुपयात रोजगार हमी योजना? अतिशयोक्ती वाटते ना? पण तेच शंभर टक्के सत्य आहे. एका नेत्याच्या खिशातल्या सातशे रुपयांनी अशी अभूतपुर्व योजना सुरू झाली होती. तिची सुरूवात आजचे गृहमंत्री आर आर पाटिल यांच्या जन्मगाव तासगावात झाली. कारण तेव्हाच्या विधान परिषदेचे सभापती वि. स. पागे त्याच तासगावचे. त्यांच्याच शेतीमध्ये जे मजूर लागायचे; त्यासाठी खर्चाव्या लागणार्‍या मजूरीच्या हिशोबातून पागेंना ही कल्पना सुचली. घरात किती पैसे आहेत, अशी विचारणा त्यांनी पत्नीकडे केली. त्यांनी सातशे रुपये असे उत्तर दिल्यावर पागेसाहेबांनी मनोमन हिशोब केला. त्याचा अर्थ तेवढ्या पैशात पंधरा मजूरांना २० दिवस आपल्या शेतात काम देता येईल. त्या काळात शेतमजूराला दिवसाचा रोजगार दोन वा तीन रुपये मिळत असे. तो हिशोब त्यांच्या डोक्यात घिरट्या घालत राहिला.

वाचा व अभिप्राय कळवा...

सुनील's picture

21 Mar 2013 - 11:19 pm | सुनील

१४ वा प्रतिसाद!

१३ पैकी ७ प्रतिसाद एकट्या धागाकर्त्याचेच ;)

म्हणून हा १४ वा. आता कसं ५०-५० झालं ;)

बाकी तोरसेकरांचे लेख चाळले. मनोरंजक वाटताहेत. विकांतासाठी राखून ठेवलेत ;)

शशिकांत ओक's picture

22 Mar 2013 - 12:16 am | शशिकांत ओक

सुनील,
वरवर चाळून काय उपयोग...
आपल्यासारख्या लोकांनी भाऊ तोरसेकर यांच्या विचारांशी सहमत असावे असे नाही. पण वैचारिक मरगळ दूर व्हावी यासाठी काही वाचायला ठेवतो कधी कधी...

चिंतामणी's picture

27 Mar 2013 - 12:54 am | चिंतामणी

श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात

सहमत.

मी नेहमीच त्यांचे ब्लॉगवरचे लेख वाचत असतो. बातम्यांचे वस्तुनिष्ठ पृथक्करण वाचनिय असते.

अनिरुद्ध प's picture

3 May 2013 - 6:22 pm | अनिरुद्ध प

शशिकान्तजि,
धन्यवाद ब्लोगच्या माहितीबद्दल आभार्,तसेच 'नमो'ना सलाम कारण या सगळ्यात अत्यत एकाकी पडुन सुद्धा त्यानि आपले कार्य चालु ठेवले.

विजुभाऊ's picture

5 Aug 2013 - 11:31 pm | विजुभाऊ

पंचवीस प्रतिसादात स्वतः लेखकाचेच १३/१४ प्रतिसाद आहेत.
या पेक्षा स्वतन्त्र लेख लिहीला असता की

मित्रा हा धागा भाऊ तोरसेकरांच्या विविध विषयावरील लेखनावर आधारित आहे. कदाचित आपल्यला त्यांचे गॅलिलिओवरील विचार मान्य होत नसतील तर त्यावर आपले विचार मांडावेत.मला सल्ला देऊन काय उपयोग?

चित्रगुप्त's picture

28 Aug 2013 - 8:57 pm | चित्रगुप्त

भाऊ तोरसेकर यांचा गॅलिलिओवरील विचारांच्या वरील धागा कोणता?

चित्रगुप्त's picture

28 Aug 2013 - 8:42 pm | चित्रगुप्त

भाऊ तोरसेकरांचे विविध विषयावरील लेखनाशी परिचय करून दिल्याबद्दल आभार. विशेष म्हणजे त्या लेखनातील उतारे आणि दुवे दिल्यामुळे मिपाकरांना आपापल्या आवडीप्रमाणे हवे ते लेख वाचणे शक्य झाले आहे. असेच माहितीपूर्ण धागे देत रहावे.

चित्रगुप्त's picture

28 Aug 2013 - 9:13 pm | चित्रगुप्त

तोरसेकरांचे दोन लेख:

सत्यमेव न दिसते
http://humalog.blogspot.fr/2012/07/blog-post_7044.html?showComment=13777...

कुठे गडबड झालीय?
http://humalog.blogspot.fr/2012/08/blog-post.html

शशिकांत ओक's picture

28 Aug 2013 - 11:10 pm | शशिकांत ओक

रंजक वाचनीय व मननीय आहेत...
याशिवाय एक धागा देत आहे ... यावर आपले विचार वाचायला आवडेल...
डॉ. अमित गोस्वामींच्या भाषण ऐकावे.. क्वांटम एक्टिव्हीस्ट याविषयावर भाषणाचा धागा ऐकावा...