नवरात्र उत्सव २०१२ (टेंभी नाका) ठाणे.

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
21 Oct 2012 - 5:01 pm

नमस्कार मिपाकर मंडळी. :)

काल ठाण्याच्या टेंभी नाका स्थित देवीचे दर्शन घेउन आलो. :) या वेळी मदुराईच्या मिनाक्षी मंदीराची ७० फुट उंच प्रतिकॄती साकारण्यात आली आहे.
भाविकांच्या प्रचंड गर्दीचा ओघ आणि बाहेर खरेदीचा भरलेला बाजार पहायला मिळाला.एव्हढ्या गर्दीत फोटो कसे काढायला मिळतील असा विचार मनात डोकावुन गेला,पण संधी मिळाली. :)
देवीच्या या भव्य मंदिरात येताना २ भव्य कमानी उभारल्या आहेत त्या पहायला मिळतात.

१) कमान-१
नवरात्र उत्सव २०१२

२) कमान-२
नवरात्र उत्सव २०१२

३)देवळाचे प्रवेशद्वार
नवरात्र उत्सव २०१२

४)प्रवेशद्वारा समोरील भव्य सजावट.
नवरात्र उत्सव २०१२

५) या वेळी देवीच्या बर्‍याच जवळुन दर्शन घ्यायची सोय होती. पण तिथुन फोटो काढण्यास मनाई होती. लोक सतत समोर येत होते आणि दर्शन घेणार्‍यांची सतत उठबस सुरु होती,यातुन मला देवीचे सुंदर रुपडे टिपायचे होते. :)
नवरात्र उत्सव २०१२

६)अखेर देवीचे दर्शन घडले. :)
नवरात्र उत्सव २०१२

७)नाभी स्थानी श्रीयंत्र धारण केलेली ही देवी.
नवरात्र उत्सव २०१२

८)मुखदर्शन १
नवरात्र उत्सव २०१२

९)मुखदर्शन २
नवरात्र उत्सव २०१२

१०)दर्शन घेतल्यावर बाजाराकडे वळलो...नाना तर्‍हेच्या वस्तुंनी बाजार तुडुंब भरला होता.लोणच्या पासुन फालुद्या पर्यंत आणि पणत्यांपासुन ते खेळण्यांपर्यंत बाजार भरुन गेलेला दिसला.
नवरात्र उत्सव २०१२

११) आरश्यातली मिठाई ;)
नवरात्र उत्सव २०१२

१२)साडी / दागिने / पर्स आणि बांगड्या या वस्तु दिसल्यावर समस्त स्त्रीवर्गाला भूरळ पडते,हे वेगळं काही सांगायची गरज नाही. ;)(असं का ? हा गहन संशोधनाचा विषय ठरावा. ;) ) असेच या बाजारातील एक बांगड्यांचे दुकान ! ;)
नवरात्र उत्सव २०१२

(देवीचा दास) :)
मदनबाण.....

कॅमेरा:--- नि़कॉन डी-५१००
*फोटो कंप्रेस केलेले आहेत्,त्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.
कलादालनात अजुनही फोटो टाकता येत नाहीत ! :(

संस्कृतीकलाधर्मछायाचित्रणस्थिरचित्रप्रकटनसद्भावनाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

21 Oct 2012 - 5:14 pm | प्रचेतस

बाणाने काढलेले फोटो सुरेखच असतात.

सुकामेवा's picture

21 Oct 2012 - 6:47 pm | सुकामेवा

सुरेख

खुपच छान फोटो आलेत, मनापासुन आवडले

पैसा's picture

21 Oct 2012 - 8:56 pm | पैसा

मबा स्पेशल!

५० फक्त's picture

21 Oct 2012 - 9:35 pm | ५० फक्त

मबा स्पेशल्,लई भारी शब्द पैसातै.

अवांतर - श्री देवीकृपेने मा. कवि श्री. गणेशा यांना हे फोटो दिसावे अशी प्रार्थना.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Oct 2012 - 9:47 pm | अत्रुप्त आत्मा

शलाम कबुल कल्लो शाब.......! :-)

किसन शिंदे's picture

21 Oct 2012 - 10:20 pm | किसन शिंदे

तुझ्या या फोटोंची वाटच पाहत होतो.:) म्हटलं एवढ्या मोठ्या उत्सवाचे फोटो तु मिपावर टाकल्याशिवाय राहायचा नाहिस.:)
देवीच्या मुखदर्शनाचा पहिला फोटो अप्रतिमच!

तु संध्याकाळी गेलेलास का?
मी सुध्दा काल रात्रीच गेलो होतो पण दर्शनाची रांग पार मागे कोर्टापर्यंत गेलेली पाहून देवीचं दर्शन बाहेरूनच घेतलं. ;)

पाषाणभेद's picture

22 Oct 2012 - 7:54 am | पाषाणभेद

>>> देवीच्या मुखदर्शनाचा पहिला फोटो अप्रतिमच!
किस्नाशी सहमत. खुपच प्रसन्न मुर्ती आहे देवीची. नमस्कार.

मिठाईवाला असा गुंगलाय का? मला तर एकदम मस्त वाटला फोटो तो.

देवीचे फोटो अतिशय सुरेख.

मदनबाण's picture

22 Oct 2012 - 9:28 am | मदनबाण

धन्यवाद मंडळी ! :)
@ किसना...
हो, मी संध्याकाळीच गेलो होतो.
जरासे अवांतरः--- मध्यंतरी मला वाटतं चित्रगुप्त किंवा चौकटराजा यांच्या पैकी कोणीतरी मला redbubble या साईट बद्धल सांगितले होते,त्यांचा सल्ला मानुन तिथे फोटो चढवणे सुरु कले आहे. (दोघांनाही धन्स)
सध्या थोडेच फोटो चढवले आहेत्,जसा वेळ मिळेल तसे फोटो उपलोड करीन.

सध्याच्या नवरात्राचे फोटो इथे पहाता येतील :-
http://www.redbubble.com/people/kumarsnaps/collections/164148-navratri-u...

रेवती's picture

22 Oct 2012 - 8:03 pm | रेवती

मस्त फोटू बाणा.
आजकाल गणपतीउत्सवासारखेच नवरात्रही मोठ्या प्रमाणावर साजरे करतात वाटतं.
खरंतर नवरात्र हा घरगुती कुळधर्म म्हणून पूर्वी साजरा होत असे.

मदनबाण's picture

22 Oct 2012 - 8:30 pm | मदनबाण

आजकाल गणपतीउत्सवासारखेच नवरात्रही मोठ्या प्रमाणावर साजरे करतात वाटतं.
नाही,ठाण्यातल्या या देवीच्या उत्सवाला कै.आनंद दिघे यांनी १९७८ साली सुरुवात केली. माझ्या माहिती प्रमाणे दिघे साहेब हे "तंत्र" उपासक होते,तसेच या देवीची मूर्ती बनवण्याची काही विशेष नियमावली देखील आहे.मूर्तीसाठी आणलेल्या शाडू मातीची,पाटाची आणि स्वतः मूर्तीकाराची देखील पुजा केली जाते.देवीच्या बीज मंत्रापैकी एका मंत्राची सिद्धता करुन तो म्हणत म्हणत ही देवीची मूर्ती घडवली जाते.
***( ही माहिती अचूक असण्याची खात्री मी देउ शकत नाही.)

रेवती's picture

22 Oct 2012 - 9:34 pm | रेवती

धन्यवाद.

किसन शिंदे's picture

23 Oct 2012 - 12:26 am | किसन शिंदे

नाही,ठाण्यातल्या या देवीच्या उत्सवाला कै.आनंद दिघे यांनी १९७८ साली सुरुवात केली. माझ्या माहिती प्रमाणे दिघे साहेब हे "तंत्र" उपासक होते,तसेच या देवीची मूर्ती बनवण्याची काही विशेष नियमावली देखील आहे.मूर्तीसाठी आणलेल्या शाडू मातीची,पाटाची आणि स्वतः मूर्तीकाराची देखील पुजा केली जाते.देवीच्या बीज मंत्रापैकी एका मंत्राची सिद्धता करुन तो म्हणत म्हणत ही देवीची मूर्ती घडवली जाते.
***( ही माहिती अचूक असण्याची खात्री मी देउ शकत नाही.)

माहिती बरोबरच आहे.

त्या देवीची मुर्ती घडवताना मुर्तीतल्या प्रत्येक अंगासाठी एक वेगळा मंत्र आहे. त्या प्रत्येक मंत्राची सिध्दता करूनच ती संपुर्ण मुर्ती घडवली जाते. देवीच्या मुखासाठीचा जो मंत्र आहे त्याची २१ वेळा सिध्दता केली जाते म्हणूनच देवीची मुर्ती खुप प्रसन्न वाटते आणि तिच्यात एक प्रकारचा जिवंतपणा भासतो. :)

सालाबाद प्रमाणे यंदाही तुझ्यामुळे देवीचे दर्शन झाले. :)
_/\_

तुझ्या खरडवहीत असणारा फोटू याच देवीचा आहे/होता काय?

गणपा's picture

22 Oct 2012 - 9:44 pm | गणपा

हो हीच देवी ती.
सध्या फटू गायबलाय. :(

जेनी...'s picture

22 Oct 2012 - 10:42 pm | जेनी...

मुखदर्शन अप्रतिम .

स्मिता.'s picture

22 Oct 2012 - 10:52 pm | स्मिता.

वाह! सुंदर फोटो... देवीची मूर्ती तर अतिशय सुबक, रेखीव आहे.

चित्रा's picture

23 Oct 2012 - 4:24 am | चित्रा

माणसांचे फोटो एकदम जिवंत आहेत. लखलखाट, झगझगाट पाहून गर्दीत फिरून आल्यासारखे वाटले. आवडले.
पण आम्ही लहान असताना नवरात्र हे अगदी घरगुती प्रकरण होते. देवीच्या देवळात एकदा जात असू, पण ती देवीही साधी आणि बाहेर फक्त त्याच दिवसांमध्ये कमळे मिळायची त्याचे खूप आकर्षण वाटे.

लीलाधर's picture

23 Oct 2012 - 9:47 am | लीलाधर

मबा ल्येका फटू १ नंबर आलेत रे :)

अन्जलि's picture

23 Oct 2012 - 1:52 pm | अन्जलि

गेले कहि दिवस मला कोणतेच फोटो दिसत नहित काय करण असावे? देविचे फोटो बघाय्चे आहेत कोणि मदत करु शकेल का?

श्रेयाताई's picture

25 Oct 2012 - 10:59 am | श्रेयाताई

रेडबबल वर जाउन फोटो पाहून आले. सुरेख...! आता नवरात्रात खास ठाण्यात जायला हवे.