सुप्रसिद्ध गायक मेहदी हसन यांचे निधन झाले आहे अशी बातमी नुकतीच समजली. त्यांना अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली!
या निमित्ताने त्यांनी गायलेल्या गझलांबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल चर्चा व्हावी ही अपेक्षा!
माझ्याकडून हे...
सुरूवातीचा संवाद ऐकण्यासारखा आहे.
***
प्रतिक्रिया
13 Jun 2012 - 1:44 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
ह्या आवाजाने खुप आनंद दिला आहे, देत राहील.
इश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गगती देवो.
13 Jun 2012 - 1:45 pm | बिपिन कार्यकर्ते
मिका, त्यांनी गायलेली एखादी तुमची आवडती गझल शेअर करा की!
13 Jun 2012 - 4:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
एखादी वेगळी काढून दिली तर इतर गझल खुणावत राहतील. पण त्यांनीच गायलेल्या गझलेतील एक शेर त्यांच्या निधनाची बातमी ऐकून झटकन आठवला, तो देतो....
यातल्या बेदिली वर जो सुर लागला आहे कि, माशा अल्ला!!
13 Jun 2012 - 1:48 pm | ऋषिकेश
अरेरे! श्रद्धांजली
13 Jun 2012 - 1:49 pm | अन्या दातार
रंजिश ही सही
13 Jun 2012 - 10:42 pm | पिवळा डांबिस
मेहंदी हसन यांना श्रद्धांजली.
"आ फिरसे, मेरे दिलको रिझाने के लिये आ..."
असं म्हणावसं वाटतंय...
13 Jun 2012 - 1:51 pm | परिकथेतील राजकुमार
श्रद्धांजली.
13 Jun 2012 - 1:55 pm | ढब्बू पैसा
मेहदी हसन म्हटलं की हृदयात एक बारीक कळ उठतेच. अजपर्यंत कित्येक सांजवेळा त्यांच्या गझलांनी अर्थपूर्ण्/आर्त झाल्या आहेत.मन हळवं झालेलं असताना हा आवज रुतत जातो आतपर्यंत.
हा आवाज लौकीकार्थाने शांत झालाय आज. नेमकं काय वाटतंय सांगता येत नाहीये.
माझी आवडती गझल म्हणजे
मैं खयाल हूँ किसी और का..
13 Jun 2012 - 2:07 pm | स्मिता.
पुलंवरचा लेख वाचत नाही तोवर हे वाचलं आणि हळवं व्हायला झालं. आपल्या भावविश्वात जागा करून असलेले लोक एक-एक करून सोडून जात आहेत.
13 Jun 2012 - 2:12 pm | गवि
एक स्वर्गीय आवाज गेला. फार दु:खद..
13 Jun 2012 - 2:37 pm | कवितानागेश
ह्म्म..
यांच्या तरुणपणची काही गाणी त्यांनी पकिस्तानी सिनेमांसाठी गायली आहेत.
त्यातला त्यांचा आवाज इतका तरल आहे, की असा दुसरा कुठाही आवाज मीतरी आजपर्यंत ऐकला नाही.
13 Jun 2012 - 2:47 pm | मूकवाचक
मेहदी हसन यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मेहदी हसन यांची कित्येक रूपे तरळून गेली डोळ्यासमोरून. त्यांच्या अप्रतिम गायकी आणि दैवी, दर्दभर्या आणि गहिर्या आवाजाइतकीच त्यांचे मिश्किल हास्य ही एक खास लक्षात राहणारी आणि दैवी स्पर्श लाभलेली गोष्ट!
मेहदी हसन यांची साथ करणे हा एक विलक्षण अनुभव असला तरी ते एक प्रकारचे आव्हानही असायचे. 'इक खलिश को हासिले उम्र रवा रहने दिया' ही रूपक तालातली गझल. ही पहिली ओळ गाताना दोनदा वैचित्र्यपूर्ण सम येते, पहिली इक मधल्या 'इ' वर आणि दुसरी साधारणपणे हासिले मधल्या 'हा' वर. ही एक गल्ली चुकवणारी जागा. अशा मुश्किल जागा मेहदी हसन साहेबांच्या गझलमधे नेहेमी असायच्या. बरेचदा कसलेले तबलजीपण तिहाई घेउन दुसर्या ('हा' वरच्या) समेला यायचे. त्यावर मेहदी हसन मिश्किलपणे हसत हसत म्हणायचे, "इस गझल मे तिहाई मारना मुश्किल हो जाता है तबला बजानेवाले के लिये, और वोह इस तरहसे आयी तो फिर संभलना मुश्किल हो जाता है गवैयेके लिये भी". हे सगळे अर्थातच बेमालूमपणे त्या तबलजीला संभाळून घेतल्यानंतरचे भाष्य असायचे.
शक्यतो एकाच रागात गझलचा विस्तार करणे त्यांना आवडायचे. 'वोह जरासी बात पर बरसोंके याराने गये, लेकिन इतना तो हुआ कुछ दोस्त पहचाने गये' या अनवट रागातल्या गझलमधे त्यांचे भाष्य रेकॉर्ड झालेले आहे, "अगर कोई घंटा दो घंटा गवैय्या गाये, तो उसी राग को फैलाना है, उसी मे बढना है. और अगर मै इसमे कोमल तीव्र और फलाँ फलाँ सूर लगा दू, तो समझ लो के मेरे अंदर जो मटेरियल है, उसमे कुछ कमी है".
रागदारी, ताल आणि लयीवरची त्यांची हुकूमत जबरदस्तच होती. एकदा मैफिल आटोपून परत येताना त्यांच्या स्वरमंडलची अशी काही सुरावट वाजली, की भूप रागात कोमल धैवत असे स्वरूप असलेला नवीन राग मेहदी हसन साहेबांना सापडला. पुढे 'अब के हम बिछडे' ही गझल त्याच रागात ते गायले. 'मालवून टाक दीप' ची चालही त्याच भूपकली रागातली. 'खुली जो आंख तो वो था न वो जमाना था' या गझल मधे असणारा दर्द, विराणपणा त्यांनी भंखार सारख्या तुलनेने अप्रचलित रागात अक्षरशः काळीज हेलावेल अशा पद्धतीने ओतला. या विलक्षण प्रतिभासंपन्न कलाकाराबद्दल बोलावे तितके थोडेच आहे.
पुन्हा एकदा या अनभिषिक्त गझलसम्राटाला भावपूर्ण श्रद्धांजली!
13 Jun 2012 - 2:49 pm | अक्षया
मेहदी हसन यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
13 Jun 2012 - 3:50 pm | चौकटराजा
मेहदी हसन यांच्या पेक्षा गुलाम अली यांचा प्रभाव माझ्या कानावर जास्त पडला. गायनातील
जागा हे कदाचित कारण त्याला असेल. पण आवाजाची जात म्हणाल तर मेहदी साहेब मखमली , मुलायम !
मेहदी साहब की आवाजसे जिंदगीमे मेहंदी का रंग छाया
हसन जो आप थे तो हसीन बेखुदी हो गयी
13 Jun 2012 - 5:22 pm | नि३सोलपुरकर
दु:खद.. बातमी.
भावपूर्ण श्रद्धांजली..
13 Jun 2012 - 6:46 pm | मैत्र
"मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो... मुझे तुम कभी भी भुला ना सकोगे..
कभी नाम बातों में आया जो मेरा... तो बेचैन होके दिल थाम लोगे..
किसीने जो पूछा सबब आसुओं का.. बताना भी चाहो बता ना सकोगे"...
दुवा
गुलाम अली साहेबांची जादू और आहे. पण मेहदी हसन एका वेगळ्या उच्च स्थानावर होते.
या दिग्गज, बुजुर्ग कलाकाराला श्रद्धांजली...
13 Jun 2012 - 7:51 pm | बिपिन कार्यकर्ते
अगदी!
तुलना नाहीच... दोघेही महानच! पण समहाऊ मेहदी हसन यांचे गारूड किंचित अधिक आहे!
13 Jun 2012 - 8:49 pm | तिमा
मेहदी हसन यांचे गारुड कदाचित त्यांचा वैशिष्ठ्यपूर्ण आवाज व मुख्यतः 'अर्थपूर्ण गझल्सची' निवड यामुळे असावे.
शिवाय ते गाताना गुलाम अली यांच्यासारख्या 'अॅक्रोबॅटिक्स' करत नसत, शब्दाला जास्त महत्व देत.
14 Jun 2012 - 1:24 pm | मैत्र
जिंदगी में तो सभी ..
आणि
गुलोंमें रंग भरे
केवळ अप्रतिम... दैवी देणगी लाभलेला मनुष्य अल्लाला प्यारा झाला ...
13 Jun 2012 - 8:06 pm | पैसा
श्रद्धांजली.
14 Jun 2012 - 12:44 am | दादा कोंडके
मेहंदी हसन माझा सर्वात आवडता गझल गायक. गझल गायकांमध्ये मेहंदी हसन, गुलाम अली, अहमद हुसेन-महमद हुसेन, हरिहरन अस्सल वाटतात. (मातृभाषा दुसरी असूनसुद्धा हरिहरननी उर्दूवर जबरदस्त मेहनत घेतलिये). मला व्यक्तीशः (जगजीत सिंग ठीक) पण अनुप जलोटा, पंकज उधास, तलत अझिज भावत नाहीत. कुमार वयात गुळगुळीत स्वच्छ आवाज आवडायचे आणि खरखरीत आवाजात गायलेलं शास्त्रीय संगीत आणि गझला आवडायच्या नाहीत. पण नंतर (पहिला प्रेमभंग झाल्यावर :)) अगदी उलट झालं आणि "तयार गला" आणि "दर्द" म्हणजे काय हे कळलं.
मेहंदी हसनने गायलेली आवडती गझल म्हणजे अहमद फराज साहेबांची ही गझल,
अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिलें
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें
ढूँढ उजडे हुए लोगों में, वफ़ा के मोती
ये खजाने, तुझे मुमकिन है, खराबों में मिलें...
तू खुदा है, न मेरा इश्क फरिश्तों जैसा
दोनों इंसान है, तो क्यूँ इतने हिजाबों में मिले
ग़म-ऐ-दुनिया भी ग़म-ऐ-यार में शामिल कर लो...
नशा बढता है, शराबें, जो शराबों में मिलें
आज हम दर पे खींचे गए जिन बातों पर
क्या अजब, कल वो जमाने को निसाबों में मिले
अब न वो मैं हूँ, न तू है, न वो माजी है फ़राज़
जैसे दो साए तमन्नाओं के सराबों में मिले
आत्ता ही गझल दुसर्या टॅब मध्ये लागली आहे आणि ऐकताना अंगावर शहारे आलेत! कसं फेडायचं यांचं ऋण? :(
15 Jun 2012 - 1:29 am | संजय क्षीरसागर
तसं काय हयात असलेली व्यक्ती देखील स्मृतीत पुनर्ज्जिवित झाली नाही तर बेदखलच असते, आणि...
गेलेली व्यक्ती स्मृतीत पुनर्ज्जिवित झाली की आसपासच असते
त्यामुळे खरी श्रद्धांजली त्या व्यक्तीला स्मृतीत निरंतर ताजं ठेवण्यात असते आणि ते केलं की मग श्रद्धांजली वहावी लागत नाही...
अब कहां बिछडेंगे हम हरसू जो यादोंमे मिलें
जिस तरह अपने अपनोंसे तनहाई में मिलें
16 Jun 2012 - 7:39 am | सुधीर काळे
मला त्यांची "रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामां हो गये" ही गझल खूप आवडते. शब्दही मस्त आहेत तिचे. पक्क्या रागदारीत गाणारा हा गझलिया म्हणूनच मला फार आवडतो. त्यांचे एक पंजाबी गाणेही मला खूप आवडते. "रंजिशही सही" तर त्यांची "सिग्नेचर गझल"च!
15 Jun 2012 - 2:11 pm | सुमीत भातखंडे
मी नाही ऐकलेले फारसे.
पण "पत्ता पत्ता, बुटा बुटा" ही गझल मेहदी साहेब आणि हरिहरन या दोघांच्या आवाजात ऐकल्ये. दोन्ही अप्रतिम आहेत.
ही गझल पहिल्यांदा "सा रे ग म प लिट्ल चँप" मधे हरिहरन यांनी गाऊन दाखवली, तेव्हा ऐकली.
कंप्लीट व्हर्जन जालावर शोधत असताना मेहदी साहेबांनी गायलेली मिळाली.
हरिहरननी थोडी जास्त सजवून गायल्ये असं वाटलं...म्हणजे ताना-मुरक्यांचा भरपूर वापर अशा अर्थाने. अर्थात तेही मस्तच वाटतं ऐकायला.
मेहदी हसन यांनी तीच गझल एकदम शांत टेंपो मधे गायल्ये. कानावरून हलकं मोरपीस फिरवावं, अक्षरशः तसं वाटतं एक-एक शब्द ऐकताना.
पण आवाजाची जात म्हणाल तर मेहदी साहेब मखमली , मुलायम !
...वादच नाही