चित्रपटांच्या इतिहासाबद्दल काही लिहावं अशी फार इच्छा होती. कारण ही माहिती मराठीत पुस्तकांव्यतिरिक्त आंतरजालावर कुठेही सापडली नाही. खुप दिवसांपासुन कुठल्यातरी मासिकातुन उतरवलेले संकलन मी आंतरजालावरुन साजेशी चित्र काढुन पुन्हा संकलीत केले. आणि हे आपल्यापुढे सादर करत आहे. काही चुका असल्यास दुरुस्ती करावी.
सर्व चित्रे आंतरजालावरुन साभार!
'आलम आरा' : भारतातील पहिला बोलपट
आलम आरा या भारतातील सर्वात प्रथम बोलक्या सिनेमाची कहाणी होती प्रेम कहाणी जी एक राजकुमार आणि जिप्सी म्हणजे भटक्या जमातीमधील मुलगी यांची आहे.जोसेफ डेव्हीड यांच्यापारशीनाटकावर आधारीत ही कहाणी होती.
कुमारपुरातला एक राजा. त्याच्या दोन भांडणार्या राण्या.दिलबहार आणि नवबहार. त्यांच्यातील दुश्मनी वाढत जाते जेव्हा एक फकीर भविष्य वर्तवतो की नवबहारचा मुलगा राजानंतर गादीवर बसेल. सुडाने पेटलेली दिलबहार राजाचा मुख्य मंत्री अदिल ला हाताशी धरते. कहाणी मधेच वाईट वळण घेते आणि दिलबहार मुख्यमंत्र्याला कैदेत टाकते व त्याची मुलगी आलम आरा हिला हाकलुन देते.
आलम आरा जिप्सी लोकांमधे वाढते.मोठी झाल्यावर आलम आरा पुन्हा राजवाड्यावर येते आणि इथेच तिची राजकुमारशी भेट होते. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात.
शेवट नेहमीप्रमाणे गोड. आदिलची कैदेतुन सुटका, दिलबहारला शिक्षा आणि प्रेमीयुगुलाचे लग्न.
निर्माता निर्देशकः श्री. अर्देशीर इराणी
नायक- नायिका: मा. विठ्ठल, झुबेदा
अन्य कलाकारः सखुबाई,
पृथ्वीराज कपुर
http://www.flickr.com/photos/67331221@N02/7335122522/
जगदीश सेठ
व वली मोहंमद खान ( W.M. Khan)
शुटींग- स्टुडिओ: इंपिरीयल/ ज्योती स्टुडिओ
मॅनेजरः रेळेदादा
संगितकारः फिरोजशहा मिस्त्री
चित्रपट फँटसी श्रेणीतील म्हणजे पोषाखी
उर्दु नाटकावर आधारीतः भाषा अस्सल उर्दु
मुळ नाटकाचा लेखक: डेवीड जोसेफ
पटकथा: डेवीड जोसेफ
चित्रपटाची लांबी: १०,५०० फुट
निर्मिती खर्चः ४०,००० रु.
पहिले गित: W.M. Khan यांनी फकिराच्या वेषात गायलेले- 'दे दे खुदा के नाम' ( हे पार्श्वगीत नाही)
गाजलेला डायलॉगः सखुबाईच्या तोंडी असलेला: " मेरे प्यारे भोले शोहर, तुम मत जावो, मेरी सीधी आँख फडकती है"
प्रिमियर शो: १४ मार्च १९३१- मुंबईतील पहिले कायम स्वरुपी थिएटर .... मॅजेस्टीक सिनेमा इथे.
चित्रपटात सर्वप्रथमः
ट्रॉलीचा शुटिंगसाठी प्रथम उपयोगः १९३१ 'चन्द्रसेना' मुकपट
प्रथमच पार्श्वसंगीत न वापरता, पार्श्वध्वनीचा वापरः १०३७, 'कुंकू'- दुनिया ना माने
प्रथमच समकालीन व्यक्तीच्या चरीत्रावर चित्रपटः १९४७ ' डॉ. कोटणीस की अमर कहानी'
प्रथमच वन शॉट वन सीनः डॉ. कोटणीस की अमर कहानी
प्रथम प्रादेशिक फिचर फिल्मः १९३२,'अयोध्येचा राजा'आज अस्तित्वात असलेला सर्वात जुना चित्रपटः 'अयोध्येचा राजा'
प्रथम रौप्यमहोत्सवी हिंदी चित्रपटः १९३४,'अमृतमंथन'
प्रथमच डोळ्याचा क्लोजअप ( टेलिफोटो लेन्सद्वारे): १९३४,'अमृतमंथन'
प्रथमच बॅकप्रोजेक्शनः १९३६,' अमरज्योती'
प्रथम सतत १०० आठवडे एकाच थिएटरमधे चाललेला भारतीय चित्रपटः १९४३, 'शकुंतला'
प्रथम अमेरीकेत व्यावसायिकदृष्ट्या प्रदर्शीत होणारा भारतीय चित्रपटः १९४३,' शकुंतला'
पहिला गायकः व.म. खान (आलम आरा)
पहिली गायिका: झुबेदा ( आलम आरा)
पहिला गुन्हेगारी पार्श्वभुमीवरचा चित्रपटः १९४३, 'किस्मत'
पहिला खलप्रवृतीचा नायकः अशोककुमार ( किस्मत)
प्रथम लॉस्ट ऍंड फाउंडः १९४३,' किस्मत'
पहिले चित्रप्रदर्शन ( चित्रपट नव्हे): १८९६, वॅटसन हॉटेल ( मुंबई)
प्रथम निर्माता निर्देशक : ह.स. भाटवडेकर उर्फ सावे दादा
प्रथम समाचार चित्र : १९०१ निर्माता: सावेदादा
हत्तीवर लॉर्ड आणि लेडी कर्झन
प्रथम फिचर फिल्मः ३ मे १९१३ " राजा हरिश्चंद्र" - दादासाहेब फाळके
प्रथम दक्षिण भारत फिल्मः १९१९, 'किचकवधम" - नटराज मुदलियार
प्रथम प्रेमकथा: १९३१, 'लैला- मजनु', 'शिरी- फरहाद'
दोन्हीचे कलाकारः मा. निस्सार, कज्जन
प्रथम ऐतिहासिक बोलपटः १९३९' पुकार'
प्रथम पौराणिक बोलपटः १९३२, "अयोध्या का राजा"
लिंगरिंग शॉटचा पहिला प्रयोगः १९३० 'खुनी खंजर'
पहिला देशभक्तीपर चित्रपटः १९३२,' हिंदोस्थान'
पहिले गाजलेले देशभक्तीचे गाणे: १९४३, (किस्मत) " दुर हटो ए दुनियावालो..."
प्रथम बाल मुकपटः १९३०,'राणीसाहेब"
प्रथम तमासगिर/ शाहिरी पार्श्वभुमीवरील चित्रपटः १९४५,' रामजोशी"
पहिला संगितकारः फिरोजशहा मिस्त्री, ( आलम आरा)
प्रतिक्रिया
6 Jun 2012 - 5:43 pm | जे.पी.मॉर्गन
छान माहिती. १०० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल भारतीय चित्रपटांविषयी अजून माहितीपूर्ण लेखन वाचायला आवडेल.
जे पी
6 Jun 2012 - 5:56 pm | किलमाऊस्की
आवडलं!
6 Jun 2012 - 6:03 pm | श्रीरंग
उत्कृष्ट संकलन.
>>प्रथम अमेरीकेत व्यावसायिकदृष्ट्या प्रदर्शीत होणारा भारतीय चित्रपटः १९४३,' शकुंतला'<<
हे वाचून कमालीचे आश्चर्य वाटले. :)
6 Jun 2012 - 6:05 pm | सदानंद ठाकूर
छान
6 Jun 2012 - 6:50 pm | Maharani
सुंदर संकलन!! अजुन लेख वाचायला आवडतील!!
6 Jun 2012 - 6:55 pm | जेनी...
वाचनेबल ...
प्रतिक्षेत ....
6 Jun 2012 - 7:10 pm | मुक्त विहारि
आवडले...
6 Jun 2012 - 7:13 pm | श्रीरंग_जोशी
या विषयावरची एवढीसारी माहिती फारच रोचकपणे मांडली आहे.
अजून येऊद्या...
6 Jun 2012 - 7:35 pm | JAGOMOHANPYARE
पहिला सर्वात जास्त ७० की ७८ गाणी असलेला षिणेमा इंद्रसभा १९३२
7 Jun 2012 - 12:20 am | चित्रगुप्त
इंद्रसभा मधील ही ७० की ७८ गाणी जालावर उपलब्ध आहेत का?
6 Jun 2012 - 7:36 pm | JAGOMOHANPYARE
पहिला रंगीत
पहिला रंगीत सिनेमास्कोप
पहिला थ्री डी
??
6 Jun 2012 - 8:19 pm | चौकटराजा
पहिला रंगीत ७० एमएम चित्रपट " अराउंड द वल्ड "
पहिला थ्री डी चित्रपट- छोटा चेतन
7 Jun 2012 - 7:27 am | शकु गोवेकर
१) श्री दादासाहेब फाळ्के यांच्या आधी श्री दादासाहेब तोरणे यांनी दि.१८ मे १९१२ रोजी मुंबई मध्ये कोरोनेश न सिनेमाटोग्राफ येथे ' श्री पुंडलीक ' हा मराठी चित्र पट रिलीज केला आहे

२) महान चित्र महशी श्री दादासाहेब फाळ्के यां चा दि.३ मे १९१३ रोजी मुंबई मध्ये कोरोनेशन सिनेमातोग्राफ

येथे 'राजा हरिश्चन्द्र ' हा चित्रपट दाख वला गेला आहे
या दोन्ही महान चित्रकमी ना सादर प्रणाम !
अहो, या दोन्ही व्यक्तीना विसरू नका
तसेच आपण मराठी आहात हे विसरु नका कारण
या दोन महान कलाकारांचा साधा उल्लेख देखिल तुम च्या लेखात दिसत नाही
तुम्ही जे लीहिले आहेत त्या घटना नंतर झाल्या आहेत
खरेतर या दोन्ही दादां बद्दल तुम्ही प्रथम लीहाय ला हवे होते -----
7 Jun 2012 - 8:58 am | अत्रुप्त आत्मा
छान सचित्र वर्णन :-)
अजुन येऊ द्या.
7 Jun 2012 - 10:59 am | पियुशा
काहीसा वेगळा अन माहीतीपुर्ण धागा आवडला .
8 Jun 2012 - 2:04 am | प्रभाकर पेठकर
चित्रपटांच्या इतिहासाबद्दल काही लिहावं अशी फार इच्छा होती.
पहिला 'अमुक' आणि पहिला 'तमुक' ही चित्रपटांची विशेषणे झाली 'इतिहास' नाही.
'आलम आरा' बद्दल जरा विस्तृत माहिती दिली आहे तशीच ह्या प्रत्येक चित्रपटाची विस्तृत माहिती दिली असती तर त्याला इतिहास म्हणता आले असते.
तरीपण बरीच विस्मयकारक माहिती मिळाली. जमल्यास ह्या प्रत्येक चित्रपटाचा इतिहास देता आला तर वाचायला नक्कीच आवडेल. तसेच, इतिहासात सनावळ्यांना महत्त्व असतेच. त्यामुळे सुरुवातीपासून क्रमानुसार माहिती देणे इष्ट ठरेल असे वाटते. सनावळ्या फारच मागेपुढे झाल्या आहेत. सर्वात शेवटी भानू अथय्यांना ऑस्कर मिळालेले सांगितले आहे पण कुठल्या कॅटेगरीत? कुठल्या चित्रपटासाठी वगैरे काही माहिती नाही.
लेख टाकण्यात झालेली घाई आणि परिणामतः आलेला विस्कळीतपणा दिसून येत आहे.
29 Nov 2016 - 6:14 pm | चित्रगुप्त
२०१२ मधे इथे फ्लिकर वरून दिलेले सर्व फोटो दिसेनासे झालेले आहेत. काय कारण असावे ?
30 Nov 2016 - 9:58 am | मराठी_माणूस
बर्याचश्या जुन्या धाग्यातले फोटो दिसत नाहीत.
30 Nov 2016 - 10:49 am | तुषार काळभोर
१) न वापरल्याने फ्लिकर अकाउंट बंद पडले असावे;
२) सदस्याने फ्लिकरवरून फोटो काढून टाकले असावेत
३) सदस्याने फ्लिकरवरून फोटोंचं शेअरिंग काढलं असावं