.

'रम्या' चा एक नयनरम्य, सर्वांग-सुंदर नृत्याविष्कार.

Primary tabs

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
26 May 2012 - 3:04 pm

थोडीशी पार्श्वभूमी:
सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. एकदा सहज टीव्ही वाहिन्यांची चाळवाचाळव करत असता एका 'मद्रासी' सिनेमातील नृत्य चाललेले दिसले. नर्तिका आकर्षक होती, तिचे काहीसे शृंगारिक हावभाव, पार्श्वभूमीला मंदिराच्या प्रांगणात चाललेले विविध गतिमान कलाविष्कार, संगीतातील आणि एकूण चित्रीकरणातील नाट्यमय गतिमानता इतकी भावली, की ते गाणे पुन्हा पुन्हा बघावे, ऐकावे, असे वाटू लागले. परंतु सिनेमाचे नाव व भाषा, नर्तकीचे नाव वगैरे काहीच ठाउक नव्हते, पुन्हा ते गाणे वाहिनीवर केंव्हा येईल कुणास ठाउक, त्यापेक्षा आपण त्याची सीडीच मिळवूया, असे ठरवून दिल्लीतल्या विविध बाजारात 'मद्रासी फिल्मोके डान्स की सीडी' हुडकू लागलो.
शेवटी 'पालिका बाजार मे देखो' असा सल्ला मिळाला, आणि तिथे गेल्यावर 'दुकान नंबर पंधरा' मध्ये जावे, असा. 'पंधरा' मध्ये लगेच लक्षात आले, की आपण योग्य जागी पोचलेलो आहोत, परंतु तिथल्या शेकडो सीड्यातून नेमकी हुडकायची कशी? सीडीवर लिहिलेला तमिळ/मलयालम/कानडी मजकूरही वाचता येत नव्हता. शेवटी त्या सर्व सीड्या बघायच्या ठरवून त्या उद्योगाला लागलो, आणि आश्चर्य... मला भावलेल्या त्याच नर्तकीचा फोटो असलेली सीडी मिळाली. "ये तो रम्या है" असेही कळले.
(http://en.wikipedia.org/wiki/Ramya_Krishnan)
मग काय, घरी येउन रोज अनेकदा ते सुंदर नृत्य बघू लागलो, आणि घरी येईल त्यालाही आग्रहाने दाखवू लागलो... हा क्रम काही काळ चालला, मग कालांतराने ते गाणे मागे पडले, आणि मी नवनवीन गोष्टीत गुंतत गेलो.... अलीकडे 'एक सुंदर अरबी गाणे' हा धागा मिपावर टाकल्यावर ते गाणे आवडल्याची रसिकांची पावती आली, आणखी अशी काही सुंदर गाणी आहेत का, अशीही काहीनी पृच्छा केली, तेंव्हा पुन्हा अचानक रम्याच्या त्या गाण्याची आठवण आली. आज ते गाणे इथे देताना मला विशेष आनंद होतो आहे:

आता या गाण्याविषयी:
अगदी सुरुवातीला उत्कंठावर्धक सुरावट कानावर पडते, अन कमळांनी भरलेल्या जलाशयातून वर येणारे नृत्यमुद्रेतले दोन सुंदर हात.. आणि त्या मागोमाग पाण्यातून वर येणारी एक सुंदरी आपल्या दृष्टीस पडते... तिचे सुंदर, मोकळे काळे केस हवेत उडवत पाणी झटकणे आपण मुग्ध होऊन बघतोय, तोच ती मंदिराच्या पायर्‍या लगबगीने चढून, धावत जाऊन आपल्या गौरांगाला चंदन- लेप करून, नखशिखांत आभूषणे लेउन नृत्यासाठी तयार होते. एवढ्याश्या वेळात अतिशय गतिमान रीतीने अनेक नर्तक, मंदिराचे प्रांगण, श्रीकृष्णाची मूर्ती, सुवर्णालंकृत गजराज, वेगात फिरणार्‍या रंगीबेरंगी छत्र्या, कथकली नृत्यातील भावमुद्रा, नर्तकीचे क्लोजअप्स, असे विविध दृश्यानुभव आपल्या प्रतीतीस येतात... लाला नंदलाला.... अशी गाण्याची सुरुवात होऊन उत्सवी ठेक्यावर, (संस्कृत ?) मंत्रोच्चाराच्या गजरात अतिशय वेगाने गाणे पुढे सरकते... पुढे पौराणिक वेशभूषेतील सोंगे, सिंहाचे तोंड असलेला नृसिंह, दुष्ट- कपटी वाटणारी एक व्यक्ती, राधा-कृष्णाचे जोडपे, अशी अनेक दृश्ये येत रहातात. रम्याचे मोहक हावभाव, नृत्यमुद्रा, वेशभूषा, हे बघत असता आपण केंव्हा या नृत्याविष्काराच्या शेवटाला येऊन पाहुचतो, कळतही नाही, आणि आपण ते पुन्हा बघण्यासाठी उद्युक्त होतो.
हे गीत कोणत्या भाषेतील आहे, त्याचे नेमके शब्द काय आहेत, अर्थ काय आहे, हे कुणाला ठाऊक असल्यास कळवावे.

हे गाणे इथे बघा:
http://www.youtube.com/watch?v=Jj7cnrc6oIk

नृत्यसंगीतसंस्कृतीचित्रपटशिफारसअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

27 May 2012 - 7:39 pm | संजय क्षीरसागर

आवडला

मुक्ती's picture

27 May 2012 - 7:57 pm | मुक्ती

हे गाणं होय? अशी जीतेन्द्र आणि श्रीदेवी नाहीतर जयाप्रदाची कित्ती कित्ती गाणी पाहिल्येत आम्ही!

संजय क्षीरसागर's picture

27 May 2012 - 9:30 pm | संजय क्षीरसागर

त्यामुळे त्यांचा स्वतःचा सौंदर्य पाहण्याचा वेगळा नजरीया आहे. जीतेन्द्र , श्रीदेवी जयाप्रदाची पूर्वीची गाणी आणि सध्याची रंगवैविध्य, कॉस्ट्यूम्स,नृत्यातली फॉरमेशन्स, प्रेझंटेशन टेक्निक्स यामधे नजाकतीच्या अँगलनं कमालीचा फरक आहे, त्या दृष्टीनं पाहा तुम्हाला वेगळेपणा जाणवेल.

नॅन्सी अजरामचे अरबी गाणे, आणि तमिळ चित्रपटातील हे गाणे, यांची भाषा, गीताचा अर्थ न कळणे, हे सौदर्यास्वादास पोषकच, असे मला वाटते.
गाण्याचा अर्थ कळत असल्यास आपण त्या अर्थात अडकत जातो , आणि काही कारणाने गीतात व्यक्त झालेल्या विचारांशी आपण असहमत असल्यास एकंदरित रसभंग होत जातो.
अशी परभाषेतील अर्थ न कळणारी, पण ऐकायला-बघायला सुंदर असलेली आणखी गाणी कळवा.

परिकथेतील राजकुमार's picture

28 May 2012 - 5:10 pm | परिकथेतील राजकुमार

चित्रगुप्त काका तुमचे वय काय आहे हो ? नक्की ६०+ असणार, हो ना ?

अहो रम्याचे नृत्य कसले बघताय ? हे म्हणजे समोर अप्सरा आल्यावरती तिच्या पदराचे काठ बघत बसल्यासारखे झाले.

अच्छा ! म्हणजे यालाच "धर्म - अर्थ - काम - मोक्ष हे पुरुषार्थ, बद्ध - मुमुक्षु - साधक - सिद्ध, या अवस्था आणि अष्टांगयोग " म्हणायचे का ;)

स्मिता.'s picture

29 May 2012 - 3:45 pm | स्मिता.

मग वय वर्षे ६०+ लोकांनी काय बघणे / करणे अपेक्षीत आहे?

तसेच, हे म्हणजे समोर अप्सरा आल्यावरती तिच्या पदराचे काठ बघत बसल्यासारखे झाले चा काही अर्थ लागला नाही, त्याचा खुलासा कराल का?

सुहास..'s picture

29 May 2012 - 3:54 pm | सुहास..

हे म्हणजे समोर अप्सरा आल्यावरती तिच्या पदराचे काठ बघत बसल्यासारखे झाले >>>

नदीचा काठ बघावा ;)

परिकथेतील राजकुमार's picture

29 May 2012 - 4:11 pm | परिकथेतील राजकुमार

मग वय वर्षे ६०+ लोकांनी काय बघणे / करणे अपेक्षीत आहे?

ज काही शरिरास आणि मनास झेपेल ते ते.

तसेच, हे म्हणजे समोर अप्सरा आल्यावरती तिच्या पदराचे काठ बघत बसल्यासारखे झाले चा काही अर्थ लागला नाही, त्याचा खुलासा कराल का?

ह्याचा खुलासा केवळ पुरुष सदस्यांना देण्यात येईल.

क्षमस्व.

आमच्या पत्रिकेत ग्रह जरा उलटे पडले आहेत...
... म्हणजे ऐन तारुण्यात आम्ही दासबोध, जे. कृष्णमूर्ती इत्यादिंची पारायणावर पारायणे केली, वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत एकूण अगदी बोटावर मोजण्याएवढे सिनेमे बघितले असतील, तेही फक्त ओपी नय्यर यांच्या संगीतासाठी...
आता वय साठ. तरूणपणी बघायचे राहून गेले, म्हणून जणू आता आम्हाला हा नाच-गाणी सिनेमाचा चळ लागला...
....कालाय तस्मै नमः ???

तुम्हाला कोण आवडत यापेक्षा कुणी तरी आवडत हे विशेष आहे, तुम्ही निश्चींत चालू ठेवा! दासबोध आणि कृष्णमूर्ती सुटले म्हणजे तुमची सृजनात्मकता शिल्लक आहे हे मी नक्की सांगू शकतो. >`आम्हाला हा नाच-गाणी सिनेमाचा चळ लागला', असं मात्र म्हणू नका!