उपासाचा किस...(घेतला का कधी?)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
7 May 2012 - 2:14 pm

बराच वेळ मनाशी
मी हाच विचार करत होतो
की उपासाला नेमका
हा किस कसा चालतो..?

उपासाला जड असे
काहिच खायचे नसते..म्हणे!
मग हे कसे चालते..?
बारश्याला तेराव्याचे गाणे?

खिचडी काय..नी..किस काय?
हलके थोडेच असतात..होय?
माणसे कशी शोधुन काढतात
उपवासालाच सुखाची सोय?

उपवसाला शास्त्रात म्हणे
निराहार ही संज्ञा आहे
पण लोक केवढा किस काढतात
की पाहुन वाटतं..काय हे..?

खिचडी काय...नी थालपिठं काय
सगळं जडच खातात
तर काहि दुसरं टोक गाठणारे
पाणी पिऊन उपाशी रहातात.

तुंम्ही म्हणाल,जाऊ द्या हो...
ज्याची त्याची अवड..!
मी म्हणतो,,बा धर्मा..
आता तुझ्या अस्थी सावड

धर्म ही अफूची गोळी
हे वचन आज मला पटलं
आणी त्यांना गुंगी का हवीये?
हे ही कोडं सुटलं

रोजचं जीवन जगता जगता
होते थोडी दमछाक...
म्हणुन ही थोडी मौज मजा
आणी हाच धर्माचा परिपाक.
==============================================================================

मागे मी,आंम्हा भिक्षुकांची त्या साबुदाण्याच्या खिचडीनी कशी दैना उडते,त्याची पिरेमं-मय व्यथा या http://www.misalpav.com/node/18998 कवितेतून मांडली होती. आज ही अठवण(आणी कविता) व्हायचं कारण म्हणजे,आज सकाळी एका कामाच्या ठिकाणी,एक नग,उपासाला खिचडी/किस हेच योग्य असताना...तुंम्ही, 'पोहे चालतील' हे कसं सांगता..? म्हणुन त्यानी स्वतः खाल्लेल्या खिचडीचे हात धूउन माझ्या मागे पडला. अता आंम्हीही,,ही तत्व-निष्ठांची जमात साबुदाण्यापेक्षा पचायला जड असली,तरी यांच्यावर दही टाकलं,की ही मऊ पडते...हे ओळखून बसलेलो आहोत. म्हणुन मी त्याला जे पचायला जड ते उपासाला कसं चालत..? असा ५००ग्रॅम चा प्रश्न टाकला. त्याला हा प्रश्न पचायला जड(च) असल्यामुळे,,,तो प्लेटमधल्या रताळ्याच्या किसासह,दुसर्‍या खोलीत चचला...आणी माझिही संभाव्य काथ्या-कुटातनं काहि क्षण सुटका जाहली...पण घरी येइ पर्यंत त्या रताळ्याच्या किसानी माझं डोकं हैराण केलं... स्वतःला ''आपण अतीशय धार्मिक आहोत'' असं म्हणवणारी माणसं,तत्वात जिंकुन व्यवहारात हरतात..हे काय कोडं आहे? हा विचार मला छळू लागला.

म्हणजे आज उपासाला प्रचलीत असलेल्या सर्व पदार्थांचं मूळतत्व ते केवळ खरकटे नाहीत,एवढच आहे...पण ते खाल्ल्यामुळे आपल्या पोटोबांना ओव्हरटाइमला बसावे लागते,हे उपवासाच्या दृष्टीनी योग्य आहे का..?असा प्रश्न का बरं पडत नसावा..? किवा पडत असला तरी, ते तो टाळतात..किंवा दुर्लक्षितात का..? उपवासाच्या मूळ तत्वाचा शास्त्र/परंपरेतला गर्भीत अर्थ-उपासाचे पदार्थ ज्या पासुन-बनवले जातात त्या गोष्टी म्हणजे-धान्यहोत नाहीत,पर्यायी त्या [धान्यासारख्या] खरकट्या नाहीत..म्हणुन उपासाला चालतात,असा आहे...ठिक आहे,हे तत्व मान्य..पण उपवास ही काही नुसती सुटी इहलौकिक गोष्ट नाही,उप-वास या शब्दाचा अर्थ-परमेश्वराच्या सांनिध्यात जाणं,त्याच्या निकट जाणं असा आहे. अता हे निकट जाताना त्या प्रीत्यर्थ काही उपासना करतांना,माणुस एकाग्र असावा हे गरजेचं आहे...म्हणुन तो त्या दिवशी निराहार करणारा असावा.. असंही आहे. निराहार,म्हणजे आळस/थकवा येणार नाही...यासाठी हलका आहार आणी तोही दिवसातून एकदाच...हा त्या निराहाराच्या तत्वामागचा व्यवहार आहे.

आज उपवासाला जे जडान्न खाल्लं जातं,,, ते नुसतच तात्विक नाही काय..? कारण त्यानी उपासाचा व्यवहार पाळण तर सोडाच,उलट त्याच्या हेतुलाच हरताळ फासला जातो..मग तरिही लोक व्यवहाराची
खिचडी करुन हा उपासाचा किस का घेतात..? आणी हे फक्त उपासाच्या बाबतीतच नाही,तर धर्मातल्या(लोकांना) नैतिक वाटणार्‍या/असणार्‍या अनेक कर्मकांडांच्या,समाज नियमांच्या बाबतीतही हे सगळ असच आहे...

पर्वाच एका मुंजीच्या कार्यक्रमात कर्नाटकमधुन आलेल्या एका वैदिकाशी (तो ही माझ्यासारखाच व्यवहारानी फक्त माणुस असल्यामुळे :-) ) माझी फक्कड दोस्ती जमली,आणी मधे मोकळ्या असलेल्या दोन तासात, धर्मातल्या निरनिराळ्या गोष्टींवर चर्चा करुन आंम्ही एका मतावर ठाम झालो...ते म्हणजे हे की,''वुई आर एंटरटेनींग टू पिपल्स'' ''आज आपण लोकांची करमणूक करित आहोत...'' माझे ते वैदिक मित्र या मतामुळे काहिसे खिन्न झाले होते...पण मी मात्र हसत होतो..त्यांनी त्याचं कारण विचारल्यावर,मी त्यांना म्हणलो... वुई आर एंटरटेनींग...एंटरटेनींग...अँड एंटरटेनींग... मग काय..? दोन मिनिटं आंम्ही दोघेही भरपूर मनापासुन हसलो... आणी होऊ घातलेल्या बटूला अंतरपाटामागे आणण्यासाठी ऑन स्टेज जाहलो... :-)

वावरसंस्कृतीधर्मसमाजजीवनमानविचारसद्भावनाअनुभव

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

7 May 2012 - 2:21 pm | सुहास..

???????????

??????

????

???

बर... .... व्हेजिटेरियन ला ........असो !! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2012 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा

@???????????

??????

????

???

बर... .... व्हेजिटेरियन ला ........असो !! Wink >>> तुमच्या प्रतिसादांचा अर्थ दुसर्‍यांना समजायला किती काळ जातो हो नक्की..? ;-)

चौकटराजा's picture

7 May 2012 - 7:00 pm | चौकटराजा

अ आ .. तुम्हाला + पाशा असे लिहायचे होते का की "उपासा"च बरोबर आहे ?

आजी कमी ऐकू येणार्‍या आजोबांना जोरात ओरडून "अहो.. तुम्हाला हवाय का कीस?"

असं हातात रताळ्याच्या किसाचा झारा पकडून विचारत असल्याची आठवण जागी झाली..

आजोबा एकदम हडबडून "आँ.. नको नको.." म्हणाले.

मी बराच वेळ हसलो त्यादिवशी.

"अहो.. तुम्हाला हवाय का कीस?"
"आँ.. नको नको.."
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

गुरुजी भन्नाट हो.

धनंजय's picture

7 May 2012 - 10:11 pm | धनंजय

असेच.

अगदी शेवटच्या कडव्यापर्यंत मी नर्मविनोदी शृंगाराची वाट बघत होतो.

(उपासाच्या खादाडीबद्दल मुद्दे सुद्धा चांगलेच आहेत, पण...)

प्रचेतस's picture

7 May 2012 - 2:39 pm | प्रचेतस

,आंम्हा भिक्षुकांची त्या साबुदाण्याच्या खिचडीनी कशी दैना उडते

अप्पाची खिचडी खाल्लीय का हो बुवा? या एकदा जिमखान्यावर सकाळी.

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2012 - 2:46 pm | अत्रुप्त आत्मा

@अप्पाची खिचडी खाल्लीय का हो बुवा? या एकदा जिमखान्यावर सकाळी >>> लै जुनी बात झाली... ही खिचडी म्हणजे शेंगदाण्याच्या भरडकुटाचा जरा अतीच मारा झालेली,आणी काकडी म्हणजे खच्चुन दही साखर घालून गोड केलेली...असते,,, असेही आंम्ही अता खात नाही,आणी ती मूळरूपा पेक्षा मेक-अप लै झालेली म्हणुन नकोच... :-)

रणजित चितळे's picture

7 May 2012 - 2:52 pm | रणजित चितळे

अगदी आपण दोघांनी एकदम सेम टू सेम प्रतिसाद दिला. इतके दिवस मला वाटायचे मलाच तीची चव वेगळी वाटते म्हणून.

रमताराम's picture

7 May 2012 - 3:23 pm | रमताराम

शमत हाय. आम्ही तरीही ती खिचडी खायची तयारी झाईर केली आहे (मान उतरुन देण्याच्या इष्टाईलने), अट एकच 'श्री ने त्या दिवशी त्या दुकानातला कळकटपणा साफ केला असला पाहिजे.' (थोडक्यात आम्हाला ही खिचडी कधीच खावी लागणार नाही.)

हल्ली यापेक्षा डेक्कनच्या सह्याद्री जवळ बिपिन मध्ये खिचडी चांगली मिळते असा अनुभव आहे. एकदा जमुया तिथं ब्रेड पॅटिस आणि बटाटेवडा चटणी सुद्धा चांगली मिळते तिथं.

विश्वेश's picture

5 Dec 2012 - 8:40 am | विश्वेश

उत्तम !!!

रमताराम's picture

7 May 2012 - 3:26 pm | रमताराम

दो. आ. प्र. का. टा. आ.

तुमचं कसं झालय,
रोज रोज खाता खिचडी आणि तूप
म्हणून राहिले नाही कसलेच अप्रूप.

स्पा's picture

7 May 2012 - 3:56 pm | स्पा

खिचडी सोडून आता जिलब्या खायला सुरुवात केलीन् काय?

रणजित चितळे's picture

7 May 2012 - 2:50 pm | रणजित चितळे

अप्पांची खिचडी हल्ली चांगली होत नाही (का माझी चव बदलली आहे) ती पूर्वीची चव नाही.

अवांतर
आपण पुण्यास कोठेशी असता?

धन्या's picture

7 May 2012 - 2:55 pm | धन्या

रोजचं जीवन जगता जगता
होते थोडी दमछाक...
म्हणुन ही थोडी मौज मजा
आणी हाच धर्माचा परिपाक.

अशी मौजमजा यजमानांच्या घरी करत जाऊ नका हो. नाही तर लोचा व्हायचा. :)

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2012 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा

@अशी मौजमजा यजमानांच्या घरी करत जाऊ नका हो. नाही तर लोचा व्हायचा >>>धन्यवाद,धनाजीराव... तुमची ही प्रतिक्रीया हा आता आमच्या धाग्याचा परिपाक... अहो वरती नीट वाचलं नै का...? आंम्ही बहुसंख्य ठिकाणी अता काय करत असतो... एंटरटेनींग...एंटरटेनींग...अँड एंटरटेनींग... (म्हणजे धर्मात सांगितलेलं असलं नसलं तरी- खरं /नैतिकतेच असेल ते नाही करायचं,लोकांना जे हवं आहे,आणी अवडतं ते करायचं... एंटरटेनींग. असं जे मी म्हणालो..ते हेच हो...!)

आणी धर्माच्या नावाखाली मौजमजा आमच्या सारखी माणसं करत नाहीत हो...
मग इथे असो किंवा तिथे.. :-)

अशी मौजमजा यजमानांच्या घरी करत जाऊ नका हो. नाही तर लोचा व्हायचा. >>

आपल्या अनुभव- विश्वाचे आम्हाला सदैव कौतुक वाटत आले आहे ;)

स्पा's picture

7 May 2012 - 3:47 pm | स्पा

संपादित

विनायक प्रभू's picture

7 May 2012 - 4:28 pm | विनायक प्रभू

पहीला उपासाचाच होता.

शुचि's picture

7 May 2012 - 6:49 pm | शुचि

उपास कसला घडला होता?

नाना चेंगट's picture

7 May 2012 - 6:50 pm | नाना चेंगट

जेवण मिळत नसल्याचा

पहा असल्या (म्हणजे साध्या भोळ्या हो ;) ) प्रश्नांना कशी तत्पर उत्तरे मिळतात ;)

नाना चेंगट's picture

7 May 2012 - 7:00 pm | नाना चेंगट

साध्या भोळ्या प्रश्नांची उत्तरे साधी भोळी असतात म्हणून मिळतात. :)

जरा अवघड प्रश्न विचारुन बघा... आमचे नेहमी उत्तर "पास" असे असेल. ;)

चौकटराजा's picture

7 May 2012 - 4:34 pm | चौकटराजा

उपासा हे काशमीरी नाव असेल तर मी किसाचा विचार करीन म्हणतो. पण कानडी असेल तर फुकट ही नको मला कीस

विनायक प्रभू's picture

7 May 2012 - 5:36 pm | विनायक प्रभू

कानडी बद्दल तुमचा काही तरी डीप रुटेड इश्यु दिसतोय.
आणि काशमीरी डीप रुटेड फँटसी.

शुचि's picture

7 May 2012 - 6:48 pm | शुचि

खरच

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2012 - 11:07 pm | अत्रुप्त आत्मा

हा धागा जिवंत केलाय,तसे जरा परतिसादही जिवंत करा हो संपादक... कोण कोण नेमकं काय काय बोलुन गेलं अठवतंही नाहीये,,,काय आहे? आमचेही कामाचे दिवस होते ना धागा काढला तेंव्हा. म्हणुन म्हणतोय ,कराच जरा जिवंत प्रतिसाद पण! :-)

अहो आत्मूदा पण ते कानडी अन काश मेरी आपलं काश्मीरी काय प्रकार आहे? नै म्हंजे प्रभूसरांच्या परतिसादात लिवलंय बगा म्हून इच्यारतुय ;)

तुम्ही म्हणताय म्हणून करीन पण हे काम कंटाळवाणं आहे. अगदी गरज असल्याशिवाय ही दुरुस्ती करायची नाही असं ठरवलय.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2012 - 4:53 am | अत्रुप्त आत्मा

अतिशय धन्यवाद. :-)

ज्ञानराम's picture

5 Dec 2012 - 9:34 am | ज्ञानराम

>>>>>>>> आजी कमी ऐकू येणार्‍या आजोबांना जोरात ओरडून "अहो.. तुम्हाला हवाय का कीस?"

असं हातात रताळ्याच्या किसाचा झारा पकडून विचारत असल्याची आठवण जागी झाली..

आजोबा एकदम हडबडून "आँ.. नको नको.." म्हणाले.

मी बराच वेळ हसलो त्यादिवशी. >>>>>>>>>>>>>


श्री गावसेना प्रमुख's picture

5 Dec 2012 - 9:48 am | श्री गावसेना प्रमुख

1