गीतगुंजन - १२ : Black Or White -> Michael Jackson

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
20 Jan 2012 - 8:20 pm

संगीताच्या दुनियेत अनेक प्रतिभावान संगीतकार, गीतकार आणि गायक झालेत की ज्यांची खाजगी आयुष्य कशी का असेनात त्यांच्या संगीतावर आणि अदाकारीवर रसिकांनी आपला जीव ओवाळून टाकला आहे आणि अशा गंधर्वांचे - शापित गंधर्वांचे स्थान त्यांच्या मनात अढळ आहे. अशाच शापित गन्धर्वान्पैकी एक आहे 'किंग ऑफ पॉप' - 'मायकल जॅक्सन' अर्थात आपला 'एमजे'.

३-४ वर्षांच्या मायकलने आपल्या बहिण-भावांबरोबर संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर 'जॅक्सन ५' नावाचा ग्रूप तयार करून त्यात आपली अदाकारी दाखवू लागला. पण कुटुंबियांचा हा ग्रूप त्याच्या प्रतिभेसाठी अपुरा होता. जाणत्या वयात त्याने आपली स्वतंत्र वाट चोखाळली. १९८० च्या दशकापासून घोंगावणारं ही 'एमजे' नावाचं वादळ अखेर २००९ साली त्याच्या अकाली मृत्यूने शमलं.

'एमजे'ने दाखवलेल्या अदाकारीला संपूर्ण जगाने प्रणाम केलेला आहे. त्याचे आणि त्याच्या गाण्याचे, अदाकारीचे लाखो करोडो चाहते संपूर्ण दुनियाभर पसरलेले आहेत. शेवटी 'एमजे'ही एक माणूस होता आणि त्याच्याही हातून चुका झाल्या. त्याची गोर्‍या कातडीच्या आणि कॉकेशन चेहरेपट्टीच्या आकर्षणाची जगभरात खिल्ली उडवली गेली कारण यापायीच त्याने स्वत: वर अनेक कॉस्मेटिक शल्यकर्मे करून घेतली होती. त्याच्या या नादापायी त्याने दुर्लक्षिले की लोकांना तो त्याच्या प्रतिभेमुळे आणि अदाकारीमुळे आवडतोय, त्यांचं त्याच्या दिसण्याशी काहीही देणं घेणं नाहीये. तरी यामुळेच तो लोकापासून दुरावला. एकटेपणामुळे त्याला व्यसनं जडली. त्याने केलेली लग्नं नि त्याची मुलंही हे देखील त्याला त्याच्या एकटेपणापासून वाचवू शकली नाहीत. एका बाजूला जगभरातील लोकप्रियता आणि एका बाजूला एकटेपणा यांच्यात 'एमजे' पुरता पिचून गेला नि त्याचं वास्तवाचं भान सुटत गेलं.

अनेक गाणी आहेत 'एमजे'ची ज्यांना इथे स्थान नक्की मिळेल पण त्यातलं एक गाणं नक्कीच असेल - "Black or White".

'मायकेल'चं "Black or White" हे गाणं १९९१ साली त्याच्या 'डेंजरस' या अल्बम मध्ये प्रकाशित झालं. 'एमजे'च्या स्वत:च्या विचारसरणीशी उलट असं गाणं कधी त्याच्याकडून दिलं जाईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. आयुष्यभर गोरी त्वचा आणि कॉकेशन चेहरा मिळवण्याचा प्रयत्न करणा~याने असं गाणं देणं हाच किती प्रचंड विरोधाभास होता! पण 'एमजे'च्या जगभरातल्या चाहत्यांनी त्याचं हे गाणं अगदी डोक्यावर घेतलं. एक तर मोठ्या काळाच्या विश्रांतीनंतर 'एमजे'चं हे गाणं प्रकाशित झालेलं आणि त्याच्या वैयक्तिक आवडीपेक्षा लोक त्याच्या दैवी प्रतिभेवर फिदा होते. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की ३ आठवड्यातच जगभरातल्या चार्टस मध्ये १ ल्या क्रमांकावर पोहोचलं.

या गाण्याच्या विडिओमध्ये 'मायकेल'ने जगभरातील निरनिराळ्या नृत्याविष्कारांना स्थान दिलेलं आणि त्यांच्या पदन्यासावर आपली पावलंही थिरकवलेली. व्यक्तिश: मला 'एमजे'चा हा विडिओ खूप आवडलेला आणि हे गाणंही. एमजेच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्याने हा विडिओ एका कथेच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला आहे आणि त्यात तेव्हाचा स्टार बाल-कलाकार आणि त्याचा लहानगा मित्र 'मकॅले कुल्किन' नि 'जॉर्ज वेन्ट' तथा 'टेस हार्पर' वगैरे प्रभृतींनी धमाल केलीय.

मला खात्री आहे की तुम्हालाही नक्की आवडेल......

आणि हे संपूर्ण गाणं

I Took My Baby
On A Saturday Bang
Boy Is That Girl With You
Yes We're One And The Same

Now I Believe In Miracles
And A Miracle
Has Happened Tonight

But, If
You're Thinkin'
About My Baby
It Don't Matter If You're
Black Or White

They Print My Message
In The Saturday Sun
I Had To Tell Them
I Ain't Second To None

And I Told About Equality
And It's True
Either You're Wrong
Or You're Right

But, If
You're Thinkin'
About My Baby
It Don't Matter If You're
Black Or White

I Am Tired Of This Devil
I Am Tired Of This Stuff
I Am Tired Of This Business
So When The
Going Gets Rough
I Ain't Scared Of
Your Brother
I Ain't Scared Of No Sheets
I Ain't Scare Of Nobody
Girl When The
Goin' Gets Mean

[L. T. B. Rap Performance]
Protection
For Gangs, Clubs
And Nations
Causing Grief In
Human Relations
It's A Turf War
On A Global Scale
I'd Rather Hear Both Sides
Of The Tale
See, It's Not About Races
Just Places
Faces
Where Your Blood
Comes From
Is Where Your Space Is
I've Seen The Bright
Get Duller
I'm Not Going To Spend
My Life Being A Color

[Michael]
Don't Tell Me You Agree With Me
When I Saw You Kicking Dirt In My Eye

But, If
You're Thinkin' About My Baby
It Don't Matter If You're Black Or White

I Said If
You're Thinkin' Of
Being My Baby
It Don't Matter If You're Black Or White

I Said If
You're Thinkin' Of
Being My Brother
It Don't Matter If You're
Black Or White

Ooh, Ooh
Yea, Yea, Yea Now
Ooh, Ooh
Yea, Yea, Yea Now

It's Black, It's White
It's Tough For You
To Get By
It's Black , It's White, Whoo

It's Black, It's White
It's Tough For You
To Get By
It's Black , It's White, Whoo

गीतगुंजन - ११
गीतगुंजन - १०
गीतगुंजन - ०९
गीतगुंजन - ०८
गीतगुंजन - ०७
गीतगुंजन - ०६
गीतगुंजन - ०५
गीतगुंजन - ०४
गीतगुंजन - ०३
गीतगुंजन - ०२
गीतगुंजन - ०१

छायाचित्रे आंतरजालावरून साभार

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

20 Jan 2012 - 8:28 pm | प्रचेतस

पाश्चिमात्य संगीत आतापर्यंत फक्त मायकेल जॅक्सनचेच ऐकत आलोय. 'ब्लॅक ऑर व्हाईट' हे पुष्प तर या मालिकेत हवेच होते.
तुमच्या मालिकेतून जॅक्सनची अजूनही गाणी येतीलच. त्यांचीच आता वाट पाहात आहे.

झक्कास रे दादा.
एक मात्र वाटतं की गो-या कॉकेशियन स्किनचं आकर्षण आणि सर्जरी हे कितपत खरं कोण जाणे.
त्याला व्हिटिलिगो होता आणि पांढ-या धब्ब्यांची संख्या फ़ार झाल्यावर नाईलाजाने युनिफ़ॉर्म रंग म्हणून तो वरुन काही लावायचा असं वाचण्यात आलं आहे.

प्रास's picture

20 Jan 2012 - 10:12 pm | प्रास

ओप्रा विन्फ्रेने घेतलेल्या त्याच्या मुलाखतीमध्ये तो हेच म्हणाला होता.

असं असूनही मला कॉकेशन चेहेरेपट्टी आणि वर्ण या दोन्हीबद्दल मायकलला प्रचंड आकर्षण, नव्हे ऑब्सेशन होतं असंच वाटतं. वर्ण कदाचित श्वेतकुष्ठाने (व्हिटिलिगो) त्याला मिळाला असेल तरी कॉकेशन चेहरेपट्टीचं आकर्षण नसतं तर त्याने चेहर्‍यावर इतक्या वेळेला कॉस्मॅटिक सर्जरीज का केल्या असत्या? ओठ पातळ करण्याच्या शस्त्रक्रिया, कपाळ उंच करण्याच्या शस्त्रक्रिया, हनुवटीला खळी पाडण्याची शस्त्रक्रिया, गालाच्या हाडांची नैसर्गिक ठेवण बदलण्याच्या शस्त्रक्रिया आणि किमान ३-४ वेळा र्‍हायनोप्लास्टीज् (नाकाची ठेवण बदलण्याच्या शस्त्रक्रिया) करण्यासाठी इतर कोणती कारणं असती? शिवाय त्याने श्वेतकुष्ठामुळे त्वचेत होणारे बदल संपूर्ण शरीरावर सारखे असावे यासाठीही खूप खर्चिक चिकित्सा केलेली आहे.

असो. मायकल कसाही दिसला तरी तो माझ्या आवडत्या कलाकारापैकी एक होता. त्याने, त्याच्या गाण्यांनी, संगीतानी आणि त्याच्या कलेच्या सादरीकरणानी मला प्रचंड आनंद दिलेला आहे. मी एमजेचा शेवटपर्यंत फॅन राहणार हे निश्चित!

अन्या दातार's picture

20 Jan 2012 - 8:49 pm | अन्या दातार

नेमके हेच गाणे मी आज दुपारी डाऊनलोडवून ऐकले आणि संध्याकाळी तुमचा हा भाग आला.
हे बहुदा मी ऐकलेले पहिले इंग्रजी गाणे असेल. शब्द तर काही कळत नव्हते, पण धून खुप आवडली होती. धन्यवाद प्रास, लहानपणीच्या काही आठवणी जाग्या केल्याबद्दल :)

एम.जे. च हे एक माझ अतिशय आवडत गाण !
झोपन्याआधी एकदा तरी कानात हेड्फोन घालुन फुल्ल व्होल्युंम मध्ये एकणार म्हण्जे एकणार !
हे गाण पहायलादेखील आवड्त कारण यातल्या भारतीय न्रुत्यशैलीला match करुन छान स्टेप्स केलेल्या आहेत मायकी ने :)
वर अन्याने म्हट्ल्याप्रमाने गाण्यातले शब्द काही समजत नाही
पण प्रास तुम्ही lyrics दिल्यामुळे गाण्याचाही प्रयत्न करुच :) धन्यवाद.