गीतगुंजन - २

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
11 Dec 2011 - 5:36 pm

गीतगुंजन - १

या प्रकारच्या संगीताचा नुसता उल्लेख ऐकला तरी मनात एक प्रकारचं अवस्थांतरण होतं. जणू झिंग चढल्यासारखी भावना होते. मन आणि तन दोन्ही झुलायला लावण्याचं सामर्थ्य यात आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. मी काही संगीताचा अभ्यासक नाही पण हा प्रकार आवडतो आपल्याला! अगदी लहान असताना जेव्हा पहिल्याने या प्रकारचं संगीत ऐकलं तेव्हाच का माहित नाही पण ते प्रचंड आवडून गेलेलं. आजही ती आवडण्याची भावना तसूभरही कमी झालेली नाही. हे संगीत उत्स्फुर्त आहे, सळसळतं आहे, नजाकतभरं आहे, कोणत्याही वयातल्या व्यक्तिला डोलायला लावणारं आहे, सरळ आहे, वाकडं आहे, जुनं आहे पण त्याचवेळी तितकंच नाविण्यपूर्ण आहे, करामती आहे, गूढ आहे आणि अगदी झणझणीत आहे कारण हे संगीत 'जॅझ' आहे.

असं म्हणतात की जॅझ संगीत हे पश्चिम आफ्रिकेतून अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या लोकांच्या लोकसंगीताचा युरोपियन तथाकथित अभिजात संगीताशी झालेल्या संकराचा परिणाम आहे. कुणास ठाऊक, मला माहिती नाही. पण युरोपियन वाद्यांवर निर्माण होणार्‍या या जॅझ संगीतावर असलेला कृष्णवर्णीयांचा ठसा कुणीच पुसू शकत नाही. गुलामगिरीच्या काळात झालेले शारीरिक श्रम विसरण्यासाठी आणि स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी कृष्णवर्णीयांकडून या संगीताची कास धरली गेली. पुढे गुलामगिरी कायद्याने बंद झाल्यावर अनेकांना या जॅझ संगीताने आधार दिला. हळू हळू हे संगीत मुख्य प्रवाहात सामील झालं आणि आता हे देखिल अभिजात संगीताचा एक भाग बनलं आहे.

गीतगुंजन - २ : All That Jazz

जॅझ संगीत खरोखरच एक उत्स्फुर्त संगीत आहे. ड्रम्स, ट्रंपेट, सॅक्सोफोन, डबल बॅस, पियानो आणि साडेतीन सप्तकात लीलया फिरणारा एक आवाज असं एखादं एकत्रित मिश्रण जेव्हा या जॅझ संगीतात तयार होतं तेव्हा तो एक खतरनाक अनुभव असतो. असाच अनुभव आपल्याला येतो 'All That Jazz' या गाण्यात.

या गाण्यात काय नाही? हॅरी 'स्वीट' एडिसनचं अफलातून ट्रंपेट आहे, बॉबी डरहॅमची ड्रम्सवरची अदाकारी आहे, बेनी कार्टरचा अप्रतिम सॅक्सोफोन आहे आणि याशिवाय या गाण्याला आपल्या डबल बॅसने तोलणारा रे ब्राऊन आहे. या सगळ्यांच्या बरोबरीने १९८९ साली रेकॉर्ड झालेल्या या गाण्यात, त्यावेळी अवघ्या ७२ वर्षांच्या असलेल्या एला फिट्झजेराल्डचा जबरदस्त आवाज आहे. एला फिट्झजेराल्ड, तुफान स्कॅटर आणि माझी जॅझ संगीतातली ऑलटाईम फेवरेट गायिका. हे गाणं, याच नावाच्या, तिच्या शेवटच्या स्टुडिओ अल्बममध्ये आहे.

मला खात्री आहे, 'All That Jazz' तुम्हाला नक्की आवडेल. एखाद्या जॅझ गाण्यात जे जे अपेक्षित असतं ते ते यात पुरेपूर उपस्थित आहे.

हे या गाण्याचे बोल -

I'm in love with you
And all that jazz
You're my dream come true
And all that jazz
Baby, you're too much
You've got the skin I love to touch
The skin I love to touch too much, mmm
And all that jazz
You have got the lips that suit my taste
And your fingertips can't be replaced
Oh, baby, what you've got, nobody has
And I've got you
And all that jazz

(Instrumental-Scatting Improvisation)

I said I'm in love with you
And all that jazz
You're my dream come true
And all that jazz
Baby, you're too much
You've got the skin I love to touch
The skin I love to touch too much, mmm
And all that jazz
You have got the lips that suit my taste
And your fingertips can't be replaced
Oh, baby, what you've got, nobody has
And I've got you
And all that jazz

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

11 Dec 2011 - 6:52 pm | सोत्रि

प्रास,

जबरदस्त लेख. जॅझ संगीत हा माझा आवडता प्रकार. रॉक आणि हार्ड रॉक च्या कानठळ्या बसवणार्‍या संगीतापेक्षा फारच सुंदर आणि कानाला गोड वाटणारा, अवीट :)

हे कर्णमधूर गाणे इथे टाकल्यामुळे जॅझचे नादमाधुर्य समजायला मदत होइल अशी आशा करतो. मी जवळजवळ १०-१५ वेळा ऐकले आत्तापर्यंत :)

मला सॅक्सोफोन हा जॅझची जान वाटतो, माझे आवडते इंस्ट्रुमेंट आहे हे. ह्या गाण्यात मधे ह्याचे जे काही पिसेस आहेत
ते फक्त ज ब र द स्त च, अफलातून! मी हे शिकायचा प्रयत्न केला होता पण मला एकंदरीतच सूर आणि ताल ह्यांची अक्कल नाही हे कळले आणि तो नाद सोडला. :(

असो, तुमच्या ह्या लेखामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या आणि पुढच्या भेटीत गप्पा झोडायला विषय मिळाला :)

- (सॅक्सोफोन वाजवायला जमले असे स्वप्न बघणारा) सोकाजी

अन्या दातार's picture

11 Dec 2011 - 6:54 pm | अन्या दातार

फक्त एकच गाणे? अजुन जरा लेख वाढवायला हवा होता असे वाटले. अजुन काही गाणी तरी द्यायचीत.

गवि's picture

11 Dec 2011 - 7:14 pm | गवि

प्रास the great..

हा भागही मस्त. जबरदस्त...

माझं अत्यंत आवडतं जॅझ गाणं म्हणजे Flip Fantasia (by US3)

Mobile वरुन video/audio link देता येत नाही. Sorry..

चित्रा's picture

11 Dec 2011 - 10:16 pm | चित्रा

ऑल दॅट जॅझ - च्या मूळ गाण्याच्या प्रसिद्धीचा फायदा शिकागो या चित्रपटात करून घेतला आहे.