गीतगुंजन - ११ : When I Come Around -> Green Day

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
12 Jan 2012 - 4:00 pm

गीतगुंजन - १ गीतगुंजन - २
गीतगुंजन - ३ गीतगुंजन - ४
गीतगुंजन - ५ गीतगुंजन - ६
गीतगुंजन - ७ गीतगुंजन - ८
गीतगुंजन - ९ गीतगुंजन - १०

१९९५ मध्ये एम टीवी भारतात येऊन काही वर्षंच झाली होती. सुरूवातीला चक्क दूरदर्शनवरच दिवसातल्या दोन तासात ते दाखवलं जातं होतं ते ही आठवतंय. पुढे केबल टीवीच्या माध्यमातून एका संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून एम टीवीने आपल्या घरात प्रवेश केला. मी देखिल त्याच सुमारास हे चॅनल बघायला सुरूवात केली होती. इंग्लिश कळण्याची मारामार होती पण रॉक, पॉप आणि ब्लूज संगीताचं आकर्षणही तितकंच होतं. ते असं स्वस्थ थोडीच बसवू देत होतं? काही वेळा अधाशासारखं समोर दिसेल ते ऐकत होतो. त्यातूनच टेस्ट डेवलप होते असं कुणीतरी सांगितलं होतं. रॅपचं फॅड जोरात होतं. शब्द तेव्हा कळायचेच नाहीत पण ताल झिंग आणायचा.

याच सुमारास हळूहळू अशा संगीत प्रकारांचे उपप्रकारही असतात असं समजू लागलं. मग एक दिवस ऐकलं 'ग्रीन डे'चं "When I Come Around."

बिली जो आर्मस्ट्राँग, माईक डर्न्ट आणि ट्रे कूल या ऐन विशीतल्या मुलांचा बँड होता 'ग्रीन डे', आणि त्यांचं संगीत पंक रॉक प्रकारचं होतं. बिलीने आपल्या मैत्रिणीशी एड्रियेनेशी झालेल्या ब्रेक अप नंतर हे गाणं लिहिलेलं. (पुढे तिच्याशीच त्याने लग्नही केलं.) या गाण्याचं संगीत आणि सादरीकरण तेव्हाही खास वाटलेलं. त्याचे शब्दही सहज समजतील असेच आहेत.

या गाण्याच्या निमित्ताने तेव्हा मला एक साक्षात्कारही झालेला, तो ही तुमच्याशी वाटून घेण्यात हरकत नाही. याच दिवसात अचानक कॉलेजमधल्या अनेक मुलांकडे एकाच वेळी सारख्या डीझाईनचे स्वेटर्स आणि टी-शर्टस दिसायला लागले. फिकट रंगावर त्यातल्याच गडद छटेचे आडवे पट्टे. अगदी या ग्रीन डेच्या गाण्यात बिलीने घातलेल्या डिझाईनचेच. तेव्हाच मला कळलं, पाश्चात्य संगीताचं क्षेत्र आता भारतातील मुलांचीही स्टाईल घडवू लागले होते.

एकदा आनंद घ्या या पंक रॉक प्रकारच्या गाण्याचा.

हे अख्खं गाणं -

I heard you crying loud,
all the way across town
You've been searching for that someone,
and it's me out on the prowl
As you sit around feeling sorry for yourself
Well, don't get lonely now
And dry your whining eyes
I'm just roaming for the moment
Sleazin' my back yard so don't get so uptight
you been thinking about ditching me

No time to search the world around
Cause you know where I'll be found
When I come around

I heard it all before
So don't knock down my door
I'm a loser and a user so I don't need no accuser
to try and flag me down because I know you're right
So go do what you like
Make sure you do it wise
You may find out that your self-doubt means nothing
was ever there

You can't go forcing something if it's just
not right

No time to search the world around
Cause you know where I'll be found
When I come around

No time to search the world around
Cause you know where I'll be found

When I come around
When I come around
When I come around
When I come around

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

हे गाणं फार गाजलं होतं टॉपचार्टस् मधे..

एक वेगळ्याच प्रकारचा बँड कव्हर करुन गीतगुंजनला खर्‍या अर्थाने व्हर्सटाईल बनवत आहेस रे प्रास.

बास्केट केस की अशा काहीतरी नावाचा आल्बम होता का?

प्रास's picture

12 Jan 2012 - 4:45 pm | प्रास

हे गाणं त्यांच्या 'डूकी' नावाच्या अल्बममध्ये होतं. बास्केट केस हे त्यांचं आदल्या वर्षीचं वेगळं गाणं होतं.

एक वेगळ्याच प्रकारचा बँड कव्हर करुन गीतगुंजनला खर्‍या अर्थाने व्हर्सटाईल बनवत आहेस रे

प्रयत्न करतोय. :-)

अन्या दातार's picture

12 Jan 2012 - 4:59 pm | अन्या दातार

साधारण महिन्याभरापूर्वीच मित्राकडून बोलेव्हार्ड ऑफ ब्रोकन ड्रीम्सबद्दल आणि ते गाणेसुद्धा ऐकले. लागलीच या ग्रुपची इतरही गाणी ऐकली. रॉक स्टाईलमधले हे गाणेही सुंदरच आहे. :) मागे वाजणारा घुंगरासारखा आवाज लक्ष वेधून घेतो.
गीतगुंजनमध्ये ग्रीनडेचे हॉलिडे येईल असे वाटले होते.

लगे रहो प्रासभौ.

प्रास's picture

12 Jan 2012 - 8:45 pm | प्रास

मागे वाजणारा घुंगरासारखा आवाज लक्ष वेधून घेतो

मागे वाजणारा घुंगरांसारखा आवाज (तुम्ही म्हणताय तो, बहुतेक) या गाण्याची बॅस लाईन आहे. याच काय ग्रीनडेच्या ऑलमोस्ट सगळ्याच गाण्यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण बॅस-लाईन आढळते....

गीतगुंजनमध्ये ग्रीनडेचे हॉलिडे येईल असे वाटले होते

अजूनही येईल.... का येवढ्यातंच 'गीतगुंजन' आवरतं घ्या म्हणताय :-o

मेघवेडा's picture

12 Jan 2012 - 8:45 pm | मेघवेडा

ग्रीनडेची बूलिव्हार्ड ऑफ ब्रोकन ड्रीम्स, १२१ गन्स, हॉलिडे, वेक मी अप व्हेन सप्टेंबर एण्ड्स, टाईम ऑफ युअर लाईफ, क्लोजिंग टाईम इ. गाणी मला खूप आवडतात. हे एकच तेवढं त्यातल्या त्यात कमी आवडलं होतं. :P

तुमच्या गीतगुंजन मध्ये ग्रीन डे येईल असं वाटलं नव्हतं. लगे रहो प्रासभौ! :)

प्रास's picture

12 Jan 2012 - 8:49 pm | प्रास

हे एकच तेवढं त्यातल्या त्यात कमी आवडलं होतं

कमीकडून जास्तीकडे असा प्रवास व्हावा हा.... ;-)

तुमच्या गीतगुंजन मध्ये ग्रीन डे येईल असं वाटलं नव्हतं

का बरं...?

'पंक रॉक वगैरे कुठे टॉम पेटी, डेव्हिड बोवी, जॉन बॉनज्यॉवी, मायकल जॅक्सन वगैरे प्रभृतींसोबत' असं वाटलं म्हणून म्हटलं ग्रीनडे पाहून आश्चर्य वाटलं पण प्लेझंट सर्प्राईझ होतं. :)

आता रोनन कीटिंग (व्हेन यू से नथिंग अ‍ॅट ऑल) वर वगैरेसुद्धा लिहाच. :)

प्रास's picture

12 Jan 2012 - 9:01 pm | प्रास

ग्रीनडे पाहून आश्चर्य वाटलं पण प्लेझंट सर्प्राईझ होतं.

धन्यवाद! :-)

आता रोनन कीटिंग (व्हेन यू से नथिंग अ‍ॅट ऑल) वर वगैरेसुद्धा लिहाच

जरूर, आनंदाने..... :-)