गीतगुंजन - ३

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
12 Dec 2011 - 10:49 pm

गीतगुंजन - १
गीतगुंजन - २

गीतगुंजन - ३ : Fame

'फेम' डेविड बोवीचं १९७५ सालचं गाणं. काही दिवसांतच बिलबोर्ड काऊण्टडाऊनमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलेलं.

डेविड बोवी हा इंग्लंडमधला एक अवलिया कलाकार. लहान वयातच संगीतामध्ये कारकिर्द करण्याचा याने निश्चय केला. सुरुवातीला प्रचंड अपयशाला तोंड द्यावं लागलेल्या डेविडने जेव्हा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी खेळून 'झिगी स्टारडस्ट' या नव्या व्यक्तिरेखेला निर्माण केलं (१९७२) आणि त्याचं पर्यवसान एका नव्या 'रॉक-कल्ट' निर्मितीत झालं. 'झिगी स्टारडस्ट'च्या यशामुळे जगभरात त्याचा चाहता वर्ग निर्माण झाला आणि यथावकाश डेविड लॉस एन्जलिसला स्थायिक झाला (१९७४).

अमेरिकेमध्ये असताना १९७५ सुमारास त्याने त्याचं पहिलं, अमेरिकन चार्ट्स मधलं 'चोटीकी पादान'चं गाणं गायलं. तेच "फेम".

सुरुवातीच्या काळात, जेव्हा बोवी न्यू यॉर्कमध्ये रहायचा तेव्हा त्याची मूळ इंग्लिश गायक-संगीतकार आणि बीटल जॉन लेननशी भेट झाली. दोघांनी अनेकदा एकत्र जॅम सेशन्स केली. जॉनला बोवीचं संगीत आवडायचं पण तो त्याच्या संगीताला "लिपस्टिक लाऊन गायलेलं रॉक संगीत" म्हणायचा. याचा संदर्भ बोवीच्या 'झिगी' अवताराकडे असायचा.

अशाच एका जॅम सेशन दरम्यान बोवीच्या कार्लॉस अ‍ॅलोमर नावाच्या गिटारिस्टने लिहिलेल्या एका जबरदस्त रिफवर जॉन आणि डेविडने गीत-संगीत जुळवलं आणि गाणं निर्माण झालं, "फेम". यात जॉनने डेविडला बॅकिंग व्होकल देऊन साथ केलेली आहे.

"प्रिटी वूमन" (१९९०) या प्रसिद्ध चित्रपटातही हे गाणं चपखल योजलं गेलेलं आहे.

आनंद घ्या Fame '90' या भन्नाट फन्क रॉक - सॉल प्रकारच्या गाण्याचा......

इथे मूळ गाणं छान ऐकू येतं...

हे "Fame" गाणं

Fame, (fame) makes a man take things over
Fame, (fame) lets him loose, hard to swallow
Fame, (fame) puts you there where things are hollow
Fame (fame)

Fame, it's not your brain, it's just the flame
That burns your change to keep you insane (sane)
Fame (fame)

Fame, (fame) what you like is in the limo
Fame, (fame) what you get is no tomorrow
Fame, (fame) what you need you have to borrow
Fame (fame)

Fame, "Nein! It's mine!" is just his line
To bind your time, it drives you to, crime
Fame (fame)

Could it be the best, could it be?
Really be, really, babe?
Could it be, my babe, could it, babe?
Could it, babe? Could it, babe?

Is it any wonder, I reject you first?
Fame, fame, fame, fame
Is it any wonder you are too cool to fool
Fame (fame)

Fame, bully for you, chilly for me
Got to get a rain check on pain (pain)
(Fame)

Fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame,
fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame
Fame
What's your name?

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 Dec 2011 - 10:56 pm | प्रचेतस

जबरदस्त मालिका प्रास साहेब.
पाश्चात्य संगीताची बरीच माहिती होत आहे.

अन्या दातार's picture

12 Dec 2011 - 11:20 pm | अन्या दातार

ही रॉक स्टाईल का?
मस्त गाणे आहे.

प्रास's picture

12 Dec 2011 - 11:29 pm | प्रास

हे फन्क रॉक - सॉल (सोल) प्रकारचं गाणं आहे.....

यामध्ये रॉक संगीताला काहीसा टेक्नो आणि जॅझचा तडका लागलाय असं मला वाटतं आणि याचा एकत्रित परिणाम काहीतरी वेगळं पण ऐकायला छान वाटणार्‍या गाण्यात होतोय.

डेविडचं संगीत नक्कीच चांगल्या दर्ज्याचं होतं अन्यथा जॉन लेननसारखा कुणाचं जास्त कौतुक न करणारा आणि स्वतःला सर्वोत्तम समजणारा माणूस त्याबद्दल चांगलं बोलतो ना.

तुम्हाला गाणं आवडलं हे मला आवडलंय.

:-)

कॉलेजात असताना डेव्हिड बोईचं "जंप- दे से" असं गाणं बर्‍याचदा ऐकल्याचं आठवतं. चूभूदेघे.

शिवाय त्याचं एका अन्य लीडिंग प्रसिद्ध गायकासोबत मिळून म्हटलेलं गाणंही होतं.

पण त्याच्या गाण्यांशी त्याहून जास्त परिचय नव्हता. आणखी एक निवडक गाणं दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.