गीतगुंजन - १५ : व्हॅलेन्टाईन डे स्पेशल

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
14 Feb 2012 - 5:21 pm

आज मिपावर व्हॅलेन्टाईन डे स्पेशल लेखांची दिवाळी उगवलीय तर म्हण्टलं आपणही यात आपली फुलबाजी पेटवून घेऊ या, म्हणून हा गीतगुंजन प्रपंच!

गीतगुंजन मालिकेमधलं आजचं गाणं म्हण्टलं तर बर्‍यापैकी जुनं आहे पण तितकंच ताजंही आहे. कारण ते सार्वकालिक प्रेम-भावनेविषयी आहे.

६०च्या दशकाला प्रचंड ताकदीच्या संगीतकारांची देणगी मिळालेली आहे. त्यातलंच एक नाव आहे (किंवा होतं म्हणू) सोनी बोनो. सोनी स्वतः गीतकार, संगीतकार, लेखक, गायक, निर्माता होताच तसाच तो हरहुन्नरी अभिनेताही होता. (पुढे तो नेताही बनला आणि अमेरिकन सेनेटचा सदस्य म्हणूनही निवडून आला.) आपल्या कारकिर्दीत त्याने अनेक छान गाणी लिहिली, गायली, सादर केली आणि टिव्हीवरही अनेक कार्यक्रम सादर केले. त्याची बायको होती 'चेरलिन सार्किसियन' (Cherilyn Sarkisian), जिला जग 'शेर्' (किंवा 'चेर्') नावाने ओळखतं. दोघे मिळून गाणी सादर करायचे टिव्हीवर कार्यक्रमही करायचे.

त्याकाळात गायक-संगीतकार 'बॉब डिलन'ने आपल्या गाण्याने एक नवा शब्द लोकप्रिय केलेला, तो म्हणजे (बहुदा) मुलींसाठी किंवा तसं कुणालाही प्रेमाने हाक मारण्यासाठीचा शब्द, 'बेब्'. या शब्दाच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याच्या दृष्टीने 'सोनी'ने एक युगलगीत लिहिलं, 'I Got You, Babe' आणि ते आपली पत्नी 'शेर्' बरोबर सादर केलं.

सोनी आणि शेर् दोघांचेही आवाज अगदी वैशिष्ठ्यपूर्ण आहेत आणि एकमेकांना साजेसेही. तिचा स्ट्राँग, काहीसा पुरुषी वाटणारा आणि त्याचा थोडासा अनुनासिक नि काहीसा रेकल्यासारखा आवाज या युगलगीतात एक वेगळीच गंमत निर्माण करतात. दोघांच्या आवाजातली हार्मनी सुंदर आहेच पण सोनीने या गाण्यात दिलेली मेलडी अगदी खुमासदार आहे. पण गाण्याची खरी लज्जत येते जेव्हा आपण सोनीचे शब्द समजून हे गाणं ऐकतो. मला हे एक 'पर्फेक्ट' युगलगीत वाटतं. सादरीकरणात तर आहेच पण त्यातल्या गीतलेखनातही हे 'पर्फेक्ट' आहे.

गीतातली भावनाही किती वैश्विक आहे बघा, आपल्याकडे कुठे प्रेम करणार्‍यांची भावना काही वेगळी असते?

ती म्हणतेय, लोक म्हणतात की तुम्ही तरुण आहात तुम्हाला काय माहिती जग काय आहे ते?

त्यावर तो म्हणतो की कल्पना नाही की त्यांचं म्हणणं कितपत खरं आहे पण आपण एकमेकांसाठी आहोतच.

गाणं ऐकताना लिरिक्स वाचत ऐकलं तर ते जास्त चांगलं समजून घेता येईल अशी सूचना (खास) देऊन ठेवतो. लक्षात घ्या, हे गाणं अमेरिकेतल्या 'बिलबोर्ड हॉट १००' चार्टमध्ये १ल्या क्रमांकावर आलेलं आहे तसंच जगभरातल्या अनेक चार्ट्समध्ये 'चोटीकी पायदानपर' राहिलेलं आहे.

आजच्या प्रेमदिनाला या 'खास' गाण्याचा जरूर आस्वाद घ्यायला हरकत नाही.

जागतिक प्रेमदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे!!

गाण्याचे लिरिक्स -

[HER:] They say we're young and we don't know
We won't find out until we grow
[HIM:] Well I don't know if all that's true
'Cause you got me, and baby I got you

[HIM:] Babe
[BOTH:] I got you babe I got you babe

[HER:] They say our love won't pay the rent
Before it's earned, our money's all been spent
[HIM:] I guess that's so, we don't have a pot
But at least I'm sure of all the things we got

[HIM:] Babe
[BOTH:] I got you babe I got you babe

[HIM:] I got flowers in the spring I got you to wear my ring
[HER:] And when I'm sad, you're a clown
And if I get scared, you're always around
[HER:] So let them say your hair's too long
'Cause I don't care, with you I can't go wrong
[HIM:] Then put your little hand in mine
There ain't no hill or mountain we can't climb

[HIM:] Babe
[BOTH:] I got you babe I got you babe

[HIM:] I got you to hold my hand
[HER:] I got you to understand
[HIM:] I got you to walk with me
[HER:] I got you to talk with me
[HIM:] Igot you to kiss goodnight
[HER:] I got you to hold me tight
[HIM:] I got you, I won't let go
[HER:] I got you to love me so

[BOTH:] I got you babe
I got you babe
I got you babe
I got you babe
I got you babe

गीतगुंजन - १४
गीतगुंजन - १३
गीतगुंजन - १२

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

कारमधे नेहमी लावतो हे गाणं..

यू बी ४० ने खास रेगी स्टाईलमधे आणि इतरही अनेकांनी याच्या वेगवेगळ्या व्हर्शन्स गायल्या आहेत..

मस्त..... आज घरी जाताना कारमधे परत ऐकणार.

प्रास's picture

14 Feb 2012 - 5:32 pm | प्रास

रेगे वर्जन डान्स नंबरसारखं वाटतं रे!

सोनी आणि शेर् यांचं सादरीकरण आजच्या दिवसाची 'प्रेमदिनी' भावना जास्त सुंदर प्रकारे व्यक्त करतंय असंच वाटतंय मला, म्हणून त्यांचंच वर्जन इथे दिलंय.

आजच्या दिवशी सोनी आणि शेर् नी गायलेलं गाणं गाडीतनं ऐकत जा.....

एकदम दिल-खुश होऊन जाशील, यार.....