✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गीतगुंजन - १२ : Black Or White -> Michael Jackson

प
प्रास यांनी
Fri, 01/20/2012 - 20:20  ·  लेख
लेख
संगीताच्या दुनियेत अनेक प्रतिभावान संगीतकार, गीतकार आणि गायक झालेत की ज्यांची खाजगी आयुष्य कशी का असेनात त्यांच्या संगीतावर आणि अदाकारीवर रसिकांनी आपला जीव ओवाळून टाकला आहे आणि अशा गंधर्वांचे - शापित गंधर्वांचे स्थान त्यांच्या मनात अढळ आहे. अशाच शापित गन्धर्वान्पैकी एक आहे 'किंग ऑफ पॉप' - 'मायकल जॅक्सन' अर्थात आपला 'एमजे'. ३-४ वर्षांच्या मायकलने आपल्या बहिण-भावांबरोबर संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर 'जॅक्सन ५' नावाचा ग्रूप तयार करून त्यात आपली अदाकारी दाखवू लागला. पण कुटुंबियांचा हा ग्रूप त्याच्या प्रतिभेसाठी अपुरा होता. जाणत्या वयात त्याने आपली स्वतंत्र वाट चोखाळली. १९८० च्या दशकापासून घोंगावणारं ही 'एमजे' नावाचं वादळ अखेर २००९ साली त्याच्या अकाली मृत्यूने शमलं. 'एमजे'ने दाखवलेल्या अदाकारीला संपूर्ण जगाने प्रणाम केलेला आहे. त्याचे आणि त्याच्या गाण्याचे, अदाकारीचे लाखो करोडो चाहते संपूर्ण दुनियाभर पसरलेले आहेत. शेवटी 'एमजे'ही एक माणूस होता आणि त्याच्याही हातून चुका झाल्या. त्याची गोर्‍या कातडीच्या आणि कॉकेशन चेहरेपट्टीच्या आकर्षणाची जगभरात खिल्ली उडवली गेली कारण यापायीच त्याने स्वत: वर अनेक कॉस्मेटिक शल्यकर्मे करून घेतली होती. त्याच्या या नादापायी त्याने दुर्लक्षिले की लोकांना तो त्याच्या प्रतिभेमुळे आणि अदाकारीमुळे आवडतोय, त्यांचं त्याच्या दिसण्याशी काहीही देणं घेणं नाहीये. तरी यामुळेच तो लोकापासून दुरावला. एकटेपणामुळे त्याला व्यसनं जडली. त्याने केलेली लग्नं नि त्याची मुलंही हे देखील त्याला त्याच्या एकटेपणापासून वाचवू शकली नाहीत. एका बाजूला जगभरातील लोकप्रियता आणि एका बाजूला एकटेपणा यांच्यात 'एमजे' पुरता पिचून गेला नि त्याचं वास्तवाचं भान सुटत गेलं. अनेक गाणी आहेत 'एमजे'ची ज्यांना इथे स्थान नक्की मिळेल पण त्यातलं एक गाणं नक्कीच असेल - "Black or White".
'मायकेल'चं "Black or White" हे गाणं १९९१ साली त्याच्या 'डेंजरस' या अल्बम मध्ये प्रकाशित झालं. 'एमजे'च्या स्वत:च्या विचारसरणीशी उलट असं गाणं कधी त्याच्याकडून दिलं जाईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. आयुष्यभर गोरी त्वचा आणि कॉकेशन चेहरा मिळवण्याचा प्रयत्न करणा~याने असं गाणं देणं हाच किती प्रचंड विरोधाभास होता! पण 'एमजे'च्या जगभरातल्या चाहत्यांनी त्याचं हे गाणं अगदी डोक्यावर घेतलं. एक तर मोठ्या काळाच्या विश्रांतीनंतर 'एमजे'चं हे गाणं प्रकाशित झालेलं आणि त्याच्या वैयक्तिक आवडीपेक्षा लोक त्याच्या दैवी प्रतिभेवर फिदा होते. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की ३ आठवड्यातच जगभरातल्या चार्टस मध्ये १ ल्या क्रमांकावर पोहोचलं. या गाण्याच्या विडिओमध्ये 'मायकेल'ने जगभरातील निरनिराळ्या नृत्याविष्कारांना स्थान दिलेलं आणि त्यांच्या पदन्यासावर आपली पावलंही थिरकवलेली. व्यक्तिश: मला 'एमजे'चा हा विडिओ खूप आवडलेला आणि हे गाणंही. एमजेच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्याने हा विडिओ एका कथेच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला आहे आणि त्यात तेव्हाचा स्टार बाल-कलाकार आणि त्याचा लहानगा मित्र 'मकॅले कुल्किन' नि 'जॉर्ज वेन्ट' तथा 'टेस हार्पर' वगैरे प्रभृतींनी धमाल केलीय. मला खात्री आहे की तुम्हालाही नक्की आवडेल......
आणि हे संपूर्ण गाणं I Took My Baby On A Saturday Bang Boy Is That Girl With You Yes We're One And The Same Now I Believe In Miracles And A Miracle Has Happened Tonight But, If You're Thinkin' About My Baby It Don't Matter If You're Black Or White They Print My Message In The Saturday Sun I Had To Tell Them I Ain't Second To None And I Told About Equality And It's True Either You're Wrong Or You're Right But, If You're Thinkin' About My Baby It Don't Matter If You're Black Or White I Am Tired Of This Devil I Am Tired Of This Stuff I Am Tired Of This Business So When The Going Gets Rough I Ain't Scared Of Your Brother I Ain't Scared Of No Sheets I Ain't Scare Of Nobody Girl When The Goin' Gets Mean [L. T. B. Rap Performance] Protection For Gangs, Clubs And Nations Causing Grief In Human Relations It's A Turf War On A Global Scale I'd Rather Hear Both Sides Of The Tale See, It's Not About Races Just Places Faces Where Your Blood Comes From Is Where Your Space Is I've Seen The Bright Get Duller I'm Not Going To Spend My Life Being A Color [Michael] Don't Tell Me You Agree With Me When I Saw You Kicking Dirt In My Eye But, If You're Thinkin' About My Baby It Don't Matter If You're Black Or White I Said If You're Thinkin' Of Being My Baby It Don't Matter If You're Black Or White I Said If You're Thinkin' Of Being My Brother It Don't Matter If You're Black Or White Ooh, Ooh Yea, Yea, Yea Now Ooh, Ooh Yea, Yea, Yea Now It's Black, It's White It's Tough For You To Get By It's Black , It's White, Whoo It's Black, It's White It's Tough For You To Get By It's Black , It's White, Whoo गीतगुंजन - ११ गीतगुंजन - १० गीतगुंजन - ०९ गीतगुंजन - ०८ गीतगुंजन - ०७ गीतगुंजन - ०६ गीतगुंजन - ०५ गीतगुंजन - ०४ गीतगुंजन - ०३ गीतगुंजन - ०२ गीतगुंजन - ०१ छायाचित्रे आंतरजालावरून साभार

Book traversal links for गीतगुंजन - १२ : Black Or White -> Michael Jackson

  • ‹ गीतगुंजन - ११ : When I Come Around -> Green Day
  • Up
  • गीतगुंजन - १३ : Daddy Cool -> Boney M ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
3540 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

मस्त

प्रचेतस
Fri, 01/20/2012 - 20:28 नवीन
पाश्चिमात्य संगीत आतापर्यंत फक्त मायकेल जॅक्सनचेच ऐकत आलोय. 'ब्लॅक ऑर व्हाईट' हे पुष्प तर या मालिकेत हवेच होते. तुमच्या मालिकेतून जॅक्सनची अजूनही गाणी येतीलच. त्यांचीच आता वाट पाहात आहे.
  • Log in or register to post comments

झक्कास रे दादा. एक मात्र

गवि
Fri, 01/20/2012 - 20:48 नवीन
झक्कास रे दादा. एक मात्र वाटतं की गो-या कॉकेशियन स्किनचं आकर्षण आणि सर्जरी हे कितपत खरं कोण जाणे. त्याला व्हिटिलिगो होता आणि पांढ-या धब्ब्यांची संख्या फ़ार झाल्यावर नाईलाजाने युनिफ़ॉर्म रंग म्हणून तो वरुन काही लावायचा असं वाचण्यात आलं आहे.
  • Log in or register to post comments

खरं आहे गवि.

प्रास
Fri, 01/20/2012 - 22:12 नवीन
ओप्रा विन्फ्रेने घेतलेल्या त्याच्या मुलाखतीमध्ये तो हेच म्हणाला होता. असं असूनही मला कॉकेशन चेहेरेपट्टी आणि वर्ण या दोन्हीबद्दल मायकलला प्रचंड आकर्षण, नव्हे ऑब्सेशन होतं असंच वाटतं. वर्ण कदाचित श्वेतकुष्ठाने (व्हिटिलिगो) त्याला मिळाला असेल तरी कॉकेशन चेहरेपट्टीचं आकर्षण नसतं तर त्याने चेहर्‍यावर इतक्या वेळेला कॉस्मॅटिक सर्जरीज का केल्या असत्या? ओठ पातळ करण्याच्या शस्त्रक्रिया, कपाळ उंच करण्याच्या शस्त्रक्रिया, हनुवटीला खळी पाडण्याची शस्त्रक्रिया, गालाच्या हाडांची नैसर्गिक ठेवण बदलण्याच्या शस्त्रक्रिया आणि किमान ३-४ वेळा र्‍हायनोप्लास्टीज् (नाकाची ठेवण बदलण्याच्या शस्त्रक्रिया) करण्यासाठी इतर कोणती कारणं असती? शिवाय त्याने श्वेतकुष्ठामुळे त्वचेत होणारे बदल संपूर्ण शरीरावर सारखे असावे यासाठीही खूप खर्चिक चिकित्सा केलेली आहे. असो. मायकल कसाही दिसला तरी तो माझ्या आवडत्या कलाकारापैकी एक होता. त्याने, त्याच्या गाण्यांनी, संगीतानी आणि त्याच्या कलेच्या सादरीकरणानी मला प्रचंड आनंद दिलेला आहे. मी एमजेचा शेवटपर्यंत फॅन राहणार हे निश्चित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नेमके हेच गाणे मी आज दुपारी

अन्या दातार
Fri, 01/20/2012 - 20:49 नवीन
नेमके हेच गाणे मी आज दुपारी डाऊनलोडवून ऐकले आणि संध्याकाळी तुमचा हा भाग आला. हे बहुदा मी ऐकलेले पहिले इंग्रजी गाणे असेल. शब्द तर काही कळत नव्हते, पण धून खुप आवडली होती. धन्यवाद प्रास, लहानपणीच्या काही आठवणी जाग्या केल्याबद्दल :)
  • Log in or register to post comments

एम.जे. च हे एक माझ अतिशय आवडत

पियुशा
Sun, 01/22/2012 - 11:11 नवीन
एम.जे. च हे एक माझ अतिशय आवडत गाण ! झोपन्याआधी एकदा तरी कानात हेड्फोन घालुन फुल्ल व्होल्युंम मध्ये एकणार म्हण्जे एकणार ! हे गाण पहायलादेखील आवड्त कारण यातल्या भारतीय न्रुत्यशैलीला match करुन छान स्टेप्स केलेल्या आहेत मायकी ने :) वर अन्याने म्हट्ल्याप्रमाने गाण्यातले शब्द काही समजत नाही पण प्रास तुम्ही lyrics दिल्यामुळे गाण्याचाही प्रयत्न करुच :) धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा