"अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा" हे विष्णुशास्त्री व कृष्णशास्त्री चिपळूणकर या पिता-पुत्रांनी (यातील वडील कोण व मुलगा कोण, हे विसरलो - कृपया सांगावे) अनुवादित केलेले पुस्तक माझ्या लहानपणी घरात होते. ते नेहमी वाचायचो. फारच अद्भुत वाटायच्या त्या गोष्टी. मुख्य म्हणजे त्या आवृतीत कुणा इंग्रज चित्रकाराची फार छान चित्रे होती. पुढे याची नवीन आवृती बघितली, त्यात मात्र पूर्वीची चित्रे नसून नवीन सुमार दर्जाची चित्रे बघून विरस झाला होता.
पुढे असेही समजले, की चिपळूणकरांनी अनुवाद करताना सर्व 'अश्लील' मजकूर गाळून टाकून ती 'सोवळी' आवृत्ती बनवली होती, त्यामुळे पुढे मराठीत 'ओवळी' आवृत्ती पण (बहुधा गौरी देशपांडे लिखित) प्रसिद्ध झाली होती....
...."अरबी भाषेतील" बद्दल आणखी कुणाच्या आठवणी, माहिती ? हे जालावर मराठीत उपलब्ध आहे का?
कुणी ते इंग्रज चित्रकार वाले मराठी पुस्तक बघितले आहे का?
एक अमोल खजिना: १९५६ सालच्या मराठी "चांदोबा" तील "सिंदबाद च्या सफरी" इथे वाचा. (पृष्ठ ३६ वर)
प्रतिक्रिया
27 Aug 2011 - 3:01 pm | अत्रुप्त आत्मा
असच बेचव करून ठेवण्याची आपल्या कडे आजही परंपरा आहे,,,मग ते साहित्य कोणतंही असो...५/७ वर्षा पूर्वीचं कार्टून नेटवर्क आठवून पहा...फेनटेस्टीक ४,जस्टीस लीग,सुपर घोस्ट, डेक्सटर्स लेबोरेटरी, अशी कित्येक चांगली/चांगली कार्टुन्स उडवून,,,त्या जागी सगळा (सर्वाथानी) एकाच आकाराच्या चायनीज बाहुल्यांचा आशयहीन ''शो'' गेले काही वर्ष सूरू आहे,याची या निमित्तानी अठवण झाली... :-(
चांदोबा- आहाहा... अठवणींचं कीती मोठ्ठं द्वार उघडल,आणी नुसतं उघडलं नाही तर,तुंम्ही दीलेल्या लिंकींग रोडवरून तिकडे जाताही आलं...त्याबद्दल मनापासुन धन्यवाद...
अवांतरः-चंपक,ठकठक वगैरे कुठे मिळेल हो..या मायाजालात...? :-)
28 Aug 2011 - 12:07 am | चित्रगुप्त
चंपक मधील "डिंकू" हे पात्र तुम्हाला आठवते का?
मला आठवते....
....कारण ती माझीच निर्मिती होती. बरेच वर्ष मी चंपक मधे "डिंकु" चित्रकथा बनवत होतो, मग ते बंद झाले.
"चांदोबा" चा जालावर मला लागलेला शोध हा माझ्यासाठी 'या शतकातील सर्वात जास्त महत्वाची व आनंददायक बातमी' आहे.
28 Aug 2011 - 3:37 pm | अत्रुप्त आत्मा
ऊं$$$$.. :cry: ..आमी नाइ जा....आता आमाला...डींकूचं गुप्त-चित्र पायजे.... :smile:
27 Aug 2011 - 3:09 pm | स्मिता.
चांदोबाची लिंक येथे देवून काकांनी एक खजिनाच उघडून दिलाय. लग्गेच वाचायला सुरुवात केली आहे.
29 Aug 2011 - 12:22 pm | माझीही शॅम्पेन
हाय रे कर्मा !! पार नोस्ताल्जिक करून टाकल तुम्ही !!! भाषांतर करताना अगदी योग्य शब्द वापरलेले आहेत (ते कितीही अश्लील / अश्लाघ्य वाटले तरी) .
राहून राहून वाटत कि गौरी देशपांडे यांच्या सारख्या अवलिया लेखिकेला कधीच यथा-योग्य मान मिळाला नाही !
29 Aug 2011 - 11:45 pm | पक्या
http://www.onlinemagazineshub.com/champak.html इथे क्लिक केल्यास ती एक आवृत्ती वाचता येतेय. (http://champakmag.delhipress.in/index.aspx)
पण चांदोबा सारखे चंपक से संस्थळ नाहिये बहुतेक.
30 Aug 2011 - 12:05 pm | आदिजोशी
मुळात ह्या कथा लहान मुलांसाठी आणत असल्याने त्यांचा अनुवाद करताना चिपळूणकरांनी त्या सोवळ्या केल्या ह्यात काही नवल नाही. नको त्या वयात नको ती वर्णनं वाचायची काही गरज नाही. त्याला कथेची वाट लावणं म्हणत नाहीत. उलट त्या तशा सोवळ्या केल्यामुळे पालकांनी मुलांना वाचू दिल्या ह्याबद्दल चिपळूणकरांचे आभारच मानायला हवेत.
मोठी झाल्यावर मुलं स्वतंत्रपणे हवं तितकं ओवळं साहित्य वाचू शकतातच की.
31 Aug 2011 - 4:59 pm | चित्रगुप्त
...... सोवळ्या केल्यामुळे पालकांनी मुलांना वाचू दिल्या ह्याबद्दल चिपळूणकरांचे आभारच मानायला हवेत.....
....शंभर टक्के सहमत.
एरव्ही एकाही मराठी वाचकाला या कथा वाचता आल्या नसत्या.
आणि ती चिपळूणकरी शैली, एकसमयावच्छेकरून, खचितच, राक्षसाला उद्देशून 'अगे लंडी'... वगैरे शब्दप्रयोग ... सर्वच अद्भुत.
'चांदोबा' आणि 'अरबी भाषेतील' ने बालपण जितके समृद्ध केले, तसे आणखी कशानेच नाही.
चांदोबा च्या १९५२ पासून च्या निवडक मुखपृष्ठांचा संग्रह करत आहे; पुरेशी जमल्यावर मिपावर दाखवण्याचा विचार आहे.
31 Aug 2011 - 12:03 pm | निनाद
अरेबियन नाईटस १ ते १६ रसिकच्या स्थळावर उपलब्ध आहेत!
ही घ्या अधिक माहिती
अरेबियन नाईटस १ ते १६
अनुवाद देशपांडे गौरी
प्रकाशक श्री गजानन बुक डेपो
दुवा http://erasik.com/books/MARATHI/information/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%...
31 Aug 2011 - 5:05 pm | आत्मशून्य
वा.... खतरनाक गोश्टी. त्यातल्या एका माणसाला कोणतरी जादूने त्याच्या ३ इच्छा पूर्ण होतील असा वर(?) देतो व ते तो कसे त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून वाया घालवतो, परीणामी स्त्रिया कशा मूर्ख असतात त्यांच्यावर का विसंबू नये असे तात्पर्य सागणारी धमाल(व अश्लील) कथा तर अजूनही स्मरणात आहे.