...

प्रियाली's picture
प्रियाली in जे न देखे रवी...
19 Aug 2011 - 1:34 am
संगीतप्रेमकाव्यधर्ममुक्तकविडंबनसुभाषिते

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 5:04 pm | प्रियाली

ह्या विषयावर कविता अपेक्षित.
कोण घेतोय पुढाकार?

इतके कठीण नाही स्त्रीकडून अपेक्षा करणे पण तशी अपेक्षा करायला फारसे पुरुष तयार नसावेत की काय असा प्रश्न पडला कारण परिवर्तन त्यांच्या पथ्यावर पडणारे नाही. ही बघा कशी वाटते -

बायका हव्या आहेत...
आजच्या पुरुषांना हव्या आहेत बायका
कणखर, खंबीर आणि कर्तृत्ववान बायका,
शारीरिक पुरुषत्व असूनही मानसिक दौर्बाल्याला समजून घेणार्‍या
आजच्या जगात पुरुषांना सर्वपरिने साथ देण्यास उत्सुक असणार्‍या बायका

बँकांची कामं तुंबली असता
आनंदाने ती कामे करणार्‍या बायका,
घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभ्या राहणार्‍या बायका,
रडारडीच्या सिरिअल्सवर थुंकणार्‍या बायका,
माहेरच्यांची फुका बढाई न मारणार्‍या बायका,
पुरुषांना पॅरलल पार्किंग शिकवणार्‍या बायका,
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करणार्‍या बायका,

कुठे मिळतील अशा बायका?,
इतिहासातही तशा होत्याच
वर्तमानात संख्या वाढते आहे,

लिंगनिरपेक्ष समानतेसाठी या बायकांसाठी सर्वांनाच ट्रेनिंग सेंटरमध्ये भरती व्हावे लागेल कदाचित ;)

शुचि's picture

19 Aug 2011 - 6:55 pm | शुचि

>> रडारडीच्या सिरिअल्सवर थुंकणार्‍या बायका,
माहेरच्यांची फुका बढाई न मारणार्‍या बायका,
पुरुषांना पॅरलल पार्किंग शिकवणार्‍या बायका,
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करणार्‍या बायका, >>

हाहा मस्त!!

विनायक प्रभू's picture

19 Aug 2011 - 7:02 pm | विनायक प्रभू

पथ्यावर पडणार नाही हे मात्र खरे.
मग पत्थ्यावर पडणार्‍या काही ओळी येउ द्यात.
मी टंकल्या असत्या पण नको.
फारच त्रास होइल सगळ्यांना.

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 7:04 pm | प्रियाली

टंका की. त्रास तुम्हाला होतो की दुसर्‍यांना ते नंतर बघता येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 7:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रिया हव्या आहेत
आजच्या जगात हव्या आहेत स्त्रिया
कणखर, विचारी आणि कर्तृत्ववान स्त्रिया,
शारीरिक पुरूषत्व असलेल्या माणसांचीही मनं समजून घेणार्‍या
आजच्या जगात समता पहाण्यास उत्सुक असणार्‍या स्त्रिया

कष्टाची कामं समोर दिसता
हातात यंत्र उचलणार्‍या स्त्रिया,
घराबाहेर पडून स्वतःची ओळख शोधणार्‍या स्त्रिया,
स्त्रीदाक्षिण्यावर थुंकणार्‍या स्त्रिया आणि
जातीची फुका बढाई न मारणार्‍या स्त्रिया,
मुलांनाही स्वयंपाक शिकवणार्‍या स्त्रिया,
जागोजाग पेटणार्‍या युद्धाचा विरोध करणार्‍या स्त्रिया,

कुठे मिळतील अशा स्त्रिया?
इतिहासातही थोड्या होत्याच
वर्तमानात संख्या वाढते आहे,

समानतेसाठी सर्वांनाच ट्रेनिंग सेंटरमध्ये भरती व्हावे लागेल कदाचित

विजुभाऊ's picture

22 Aug 2011 - 5:54 pm | विजुभाऊ

अरे अरे अरे अरे........
कवितेतली भावना चांगली आहे

प्राजु's picture

19 Aug 2011 - 7:36 pm | प्राजु

ख त रा!!
प्रियाली बाई ऐकत नाही कोणाला... !
मस्तच गं.

चेतन सुभाष गुगळे's picture

5 Oct 2011 - 10:15 am | चेतन सुभाष गुगळे
श्रावण मोडक's picture

19 Aug 2011 - 12:51 pm | श्रावण मोडक

कविता आणि प्रतिसाद वाचून वाटू लागलं, 'संस्थळ वयात आलं'*! ;)
*मराठी नाटकाविषयी असं माधव मनोहरांनी म्हटलं होतं. हा केवळ अतिरिक्त खुलासा आहे!!!

"या जॉनला कोणीतरी कोपर्‍यात घेऊन जमेल तितपत आडवा हाणा रे.."

नगरीनिरंजन's picture

19 Aug 2011 - 4:11 pm | नगरीनिरंजन

कसं जमणार? त्याला मागूनपुढून शरीरयष्टी आहे म्हणे.

गवि's picture

19 Aug 2011 - 4:14 pm | गवि

अच्छा.. म्हणजे फोटोत त्याच्यामागे असलेली व्यक्ती यष्टीरक्षक आहे तर.

धमाल मुलगा's picture

19 Aug 2011 - 8:24 pm | धमाल मुलगा

गव्यानं मुसंडीच मारली की. :D

लै झ्याक्क मजा आली आजच्या सुक्कीरवारच्या संध्याकाळचा माहौल बनला हों...

जाताजाता (जॉनप्रेमींना काडी.): तो जॉन पदोपदी ज्याची सहीसही कॉपी करत असतो त्या Antonio Banderas च्या बाबतीत जॉनप्रेमींचं मत जाणून घ्यायला उत्सुक. ;)

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 8:29 pm | प्रियाली

जाताजाता (जॉनप्रेमींना काडी.): तो जॉन पदोपदी ज्याची सहीसही कॉपी करत असतो त्या Antonio Banderas च्या बाबतीत जॉनप्रेमींचं मत जाणून घ्यायला उत्सुक.

दोघे नकटे आहेत पण मी नेहमी 'चेहरा क्या देखती हो?' असा प्रश्न स्वतःला विचारते. मला तर ब्रॅड पीटही नकटा वाटतो. ;)

धमाल मुलगा's picture

19 Aug 2011 - 9:00 pm | धमाल मुलगा

समस्त नकट्यांतर्फे ह्या वाक्याचा निषेध नोंदविण्यात येत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 9:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नकटं असण्यात काय वाईट आहे ब्वॉ? मी पण नकटीच आहे, माझी आवडही नकटी असण्यात काय गैर आहे.

बाकी जिथे अभिजात साहित्यही कशा-ना-कशावर आधारित असतं तिथे जॉननेही Antonio Banderas ची नक्कल केली तर कुठे बिघडलं? त्यातून इथे कोणाला पडलं आहे त्याच्या अभिनयक्षमतेचं?

उत्तम नक्कल करणं ही पण एक कलाच हो! आमचा लाडका सोनू निगम नाही का खूप मजेशीर नकला करत? आणि मायकल जॅक्सनची नक्कल केलेलं दिवाना दिल हे गाणंतर सुपरहिट आहेच.

धमाल मुलगा's picture

19 Aug 2011 - 9:26 pm | धमाल मुलगा

हाय हाय मिर्ची!!! =))

काय तीर बराब्बर लागलाय! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 9:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

होय तर. आहेच आमचा जॉन मिरचीसारखा तेजतर्रार! "वस्तू बनवायला" Antonio Banderas चा काही काही उपयोग नाही.

धमाल मुलगा's picture

19 Aug 2011 - 9:34 pm | धमाल मुलगा

>>आहेच आमचा जॉन मिरचीसारखा तेजतर्रार!
पण टोण्याला अजून तलवारीचे चपळ हात करता येत नाहीत की नीट पिस्तुलं चालवता येत नाहीत :P

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 9:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

संबंधच काय जॉनने तलवारी आणि बंदूका चालवण्याचा आणि त्याची वस्तू बनवण्याचा? अनुष्कावैनींना इंटीग्रेशन आणि टेनिस खेळता येतं याचा तरी कुठे पुरावा आहे?
बाकी गव्हर्नेटरला येतात हो पिस्तुलं चालवायला. पण शी: त्याचे टॉपलेस फोटो टाकायचे का?

धमाल मुलगा's picture

19 Aug 2011 - 9:46 pm | धमाल मुलगा

असो.
'मोठे व्हा' असं तरी कसं सांगू आता? रॉबर्ट रॉड्रिक्सलाच विचारा हे प्रश्न. :P

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 9:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा वाक्प्रयोग जुना झाल्याचं वरच्या प्रतिसादातून लक्षात आलं. बाकी चालू द्या, असंही आता म्हणता येणार नाही. पण ते एक असो.

नगरीनिरंजन's picture

20 Aug 2011 - 9:21 am | नगरीनिरंजन

सांड आणि बैलात जो फरक असतो तोच फरक आहे अँटोनिओ आणि जॉन मध्ये हे आमचे वैयक्तिक मत आहे. बाकी चालू द्या.

पण टोण्याला अजून तलवारीचे चपळ हात करता येत नाहीत की नीट पिस्तुलं चालवता येत नाहीत

धम्या त्याला 'जे' चालावायचं ते चालवता येतं ह्ये काय कमी आहे का?

सध्या केवळ कवितेचा आणि प्रतिसादांचा लुत्फ घेत आहे. :)

नितिन थत्ते's picture

19 Aug 2011 - 3:37 pm | नितिन थत्ते

कुठेतरी वाचलं होतं "स्त्रीला एकाच* पुरुषाकडून सगळं हवं असतं आणि....".

एकूण कवितेतल्या अपेक्षा वाचून ते खरं ठरलं.
*कवयित्रीने पुरूष हवे आहेत असे अनेकवचनी म्हटल्याने एकाच पुरूषाकडून सगळ्या अपेक्षा नाहीत असे म्हणता येईल.

वाक्याचा दुसरा भागही खराच असणार. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 6:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुठेतरी वाचलं होतं ...

एकेकाळची मध्यमवर्गीय मानसिकता अशी की छापलेलं दिसलं की खरं मानायचं. याचं नवं व्हर्जन मी अलिकडेच ऐकलं, वय वर्ष साडेसहाचा एक पोरगा, "इंटरनेटवर प्रकाशित झालेलं सगळं खरंच असतं."
तर मतितार्थ हा की, "मोठे व्हा".

"स्त्रीला एकाच* पुरुषाकडून सगळं हवं असतं आणि....".

हेच ते, ज्याची त्याची समज, जाण वगैरे. एखाद्या किंवा काही स्त्रियांबाबत हे खरं असेलही म्हणून उगाच सगळ्या स्त्रियांबद्दल जेनेरिक विधान का करता आहात चिच्चा?

कवयित्रीने पुरूष हवे आहेत असे अनेकवचनी म्हटल्याने एकाच पुरूषाकडून सगळ्या अपेक्षा नाहीत असे म्हणता येईल.

गर्ल कॉमरेडरीची काळजीही आहे कवयित्रीला, असा माझा अंदाज! पण म्हणून एकाच पुरूषाने या सगळ्या गोष्टी केल्या तर आनंदच आहे हो!

नितिन थत्ते's picture

19 Aug 2011 - 6:12 pm | नितिन थत्ते

>>एकाच पुरूषाने या सगळ्या गोष्टी केल्या तर आनंदच आहे हो!

तेच तर. अर्धा भाग खरा ठरतोय. ;)

>>तर मतितार्थ हा की, "मोठे व्हा".

हे मोठे व्हा हेही आम्ही इंटरनेटवरच वाचलं ना !!!!!! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 6:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तेच तर. अर्धा भाग खरा ठरतोय

होय ना! आमच्यासाठी मात्र दिवास्वप्नच. असो. तो काय "spice of life" काय तो आम्हीही चाखतो. ;-)

हे मोठे व्हा हेही आम्ही इंटरनेटवरच वाचलं ना

'सगळं खरं नसतं' या वाक्याचं विरूद्धार्थी वाक्य 'सगळं खोटंच असतं' असा नाही ना!

पैसा's picture

19 Aug 2011 - 6:41 pm | पैसा

धम्माल!

प्रियाली, अदिती आणि शुचि यानी काही म्हणायला शिल्लक ठेवलं नाही!! तेव्हा तिघीनाही साष्टांग नमस्कार!

विकास's picture

19 Aug 2011 - 7:24 pm | विकास

कविता पुरूषावरील असल्यामुळे, "अखुड शिंगी, बहुकामी" अपेक्षा आहे असे म्हणतो... :-)

या वर्णानाशी बर्‍यापैकी जुळेल असा एकमेवाद्वितीय पुरूष फक्त हाच असेल ;)

त्याला अ‍ॅक्शनमध्ये पहायचे असेल तर पूर्ण चित्रपट पहायचा पेशन्स आहे का नाही याची चाचणी करण्यासाठी आणि नाहीतर निव्वळ स्वत:ला विसरायला म्हणून खालील चित्रफीत पहा:

---------------------------------------------------------------------------------------
बाकी या विषयावरील Multiplicity नामक मजेशीर चित्रपट जर पाहीला नसला तर अवश्य पहा!

धनंजय's picture

19 Aug 2011 - 9:22 pm | धनंजय

प्रतिसादातली चित्रे बघा राव!

शिंगाळू (इंग्रजी अनुवाद सांगू का?) हरकाम्या/बहुकामी हवा

विकास's picture

19 Aug 2011 - 9:40 pm | विकास

"हरकाम्या" हा जास्त चपखल शब्द आहे.

शिंगाळू (इंग्रजी अनुवाद सांगू का?)

हिंट डोक्यावरून गेली... अवश्य सांगा.

धमाल मुलगा's picture

19 Aug 2011 - 9:43 pm | धमाल मुलगा

शिंग =horn
शिंगाळू = horny.

काय राव, मान्सानं इतकंपण सभ्य असू नये राव.

श्रावण मोडक's picture

19 Aug 2011 - 9:59 pm | श्रावण मोडक

काय लेका तूही... छ्या. त्यांनी विचारलं, तू सांगितलंस - इतकं सोपं आहे का हे? ;)

रेवती's picture

20 Aug 2011 - 12:10 am | रेवती

धमुण्णा, तुझी का रे इतकी चिडचिड चाल्लिये मगापास्नं?

आनंदयात्री's picture

19 Aug 2011 - 10:06 pm | आनंदयात्री

काय चावटपणा लावलाय रे मुलांनो !

रेवती's picture

20 Aug 2011 - 12:40 am | रेवती

आता बास करा मंडळी!
माझ्यासारख्या शिनियर शिट्टीझनला मधे पडायला लावू नका.;)
मगाशीच एक जान की कायसे नावाचा शिनेमात काम कर्णारा बुवा भेट्ला होता.
म्हटलं,"मेल्या तुला पुरेशे पैशे मिळ्तात की नै? आमचा माळीबुवासुधा आंगभर कपडे घालून येतोय."
त्याचं उत्तर आयकायला कै थांब्ले नै, तुळशीला पाणी घालून आपली घरात परत आले.

आनंदयात्री's picture

20 Aug 2011 - 12:51 am | आनंदयात्री

क्काय !! (रंगाकाका माळीकाम पण करतात !!)

पळा ..

रेवती's picture

20 Aug 2011 - 1:04 am | रेवती

मिळाला का वेळ मिपावर यायला!
भांडी घासून झालेली दिस्तात, चला लाँड्रीकडे.......
रांधा, वाढा, उष्टी काढा असं कर्णार्‍यांनी जास्त प्रश्न विचारू नयेत्.......आपण बरं नि आपलं काम बरं!

आनंदयात्री's picture

20 Aug 2011 - 1:07 am | आनंदयात्री

माझ्या डोळ्यासमोर "आवारा पागल दीवान" मधला परेश रावल आला !!

नंदन's picture

20 Aug 2011 - 2:31 am | नंदन

असा बगीचा डोळ्यासमोर आला :)

अप्पा जोगळेकर's picture

20 Aug 2011 - 9:54 am | अप्पा जोगळेकर

कविता आणि त्यानंतर चालु झालेला दंगा याने खूपच मनोरंजन झाले.

यानिमित्ताने आमचाही थोडासा फुटकळपणा -

बायका हव्या आहेत...
आजच्या पुरुषांना हव्या आहेत बायका,
आधुनिक, नखरेल आणि आकारबाज बायका,
स्त्रीत्वाचे भांडवल न करणार्‍या बायका
आणि पुरुषांच्या ह्या जगात स्वकर्तृत्वाने स्थान निर्माण करणार्‍या बायका.

दुपारच्या वेळेत डेस्कवर न झोपणार्‍या बायका,
चहा पिऊन झाल्यावर घरी पळण्याचे वेध न लागणार्‍या बायका,
प्रॉडक्शन रीलीजसाठी उशिरापर्यंत थांबणार्‍या बायका,
आणि डिफेक्ट आल्यावर हात वर न करणार्‍या बायका.

बसमधे लेडिज सीटवरुन उठायला न लावणार्‍या बायका,
आणि लोकलच्या जेन्टस डब्यात न लुडबूडणार्‍या बायका,
हॉटेलातल्या जेवणाचा तिरस्कार करणार्‍या बायका,
आपण असताना कशाला पाहिजे कामासाठी बाई असं म्हणणार्‍या बायका,
सायनाची मॅच बघू देणार्‍या बायका,
आणि सचिनच्या सेंचुरीवर उड्या मारणार्‍या बायका,
भाड्याच्या घरातसुद्धा पिरपिर न करणार्‍या बायका,
आणि चिक्कार पैसे मिळवूनसुद्धा टिमकी न वाजवणार्‍या बायका.

कुठे मिळतील अशा बायका?,
इतिहासात अस्तित्वात नव्हत्याच.
वर्तमानातदेखील औषधालासुद्धा सापडत नाहीत.
ट्रेनिंग सेंटर उघडलं तरीसुद्धा भविष्य धूसरच आहे.

नगरीनिरंजन's picture

20 Aug 2011 - 11:48 am | नगरीनिरंजन

ओ अप्पा
असं दंगा चालू असताना उगीच खरंखुरं शिरेस नाही व्हायचं बरं का...अडचण होते ना.

प्रियाली's picture

20 Aug 2011 - 3:22 pm | प्रियाली

वरील काही ओळींतून फुटकळपणा सिद्ध होतोय खरा. ;)

पुरुष सॉफ्टवेअर टेस्टींग करतात तेव्हा हास्यास्पद दिसतात, हे काम बायकांना शोभून दिसतं असं माझ्या एका अमेरिकन मैत्रिणीचं म्हणणं होतं. असं काही नसतं, लिंगनिरपेक्ष समानता बाळग असं सांगून मी थकले होते पण तिचा आपला तोच हेका की टेस्टींग करताना सहनशील असावं लागतं, डिफेक्ट काढून दाखवला की इतरांनी केलेला अपमान सहन करावा लागतो... हे बायकी काम, पुरुषांचा तो प्रांतच नव्हे पण मला नाही हं पटत असलं काही. ;)

आपली
(टेस्ट को-ऑर्डिनेटर) प्रियाली

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Aug 2011 - 8:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गेल्या अडीच महिन्यात लोकलींमधे 'जेण्टस' डबा आला आहे आणि फेसबुक, ट्वीटर, मिपा, मटा, बीबीसी, न्यूयॉर्क टाईम्स, पोलिस टाईम्समधे एक साधी खरड, बातमी, चौकट काहीही नाही. फारच कुचंबणा होते ब्वॉ परदेशात राहून! :-(

आपल्याला तर बुवा "भयंकर कंटाळा आला आहे!" असल्या तक्रारी दुपारच्या जेवणानंतर घरी जाईपर्यंत करण्यापेक्षा दुपारी डेस्कावर डुलकी काढायला आवडतं. आणि दिवस कोणताही असो, चार वाजताचा चहाचा ब्रेक सहाच्या स्नॅकब्रेकपर्यंत वाढवून गप्पा मारायला फार मजा यायची. आख्ख्या 'विश्वाचं गॉसिप' करायला इतर कोणती वेळ चांगली असणार?

बाकी प्रियालीशी बाडीस.

पैसा's picture

21 Aug 2011 - 7:18 pm | पैसा

mithun

हिंदी पिच्चरातला ओरिगिनल टॉल डार्क अ‍ॅण्ड हॅण्डसम हीरो!

तो डार्क टॉल ह्यान्डसम असेल पण बोलायला लागला की मात्र शेजारच्या माणूस दोन मैलांवर असल्यासारखे का बोलतो कोण जाणे?

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 9:38 am | चेतन सुभाष गुगळे

<< कुठे मिळतील असे पुरुष? >>

असं कसं काय विचारू शकता तुम्ही? पुरूष म्हणजे काय निर्जीव वस्तू आहेत काय मिळायला? निर्जीव वस्तू मिळतात तर सजीव व्यक्ती भेटतात. असो, तुम्हाला असे पुरूष कुठे भेटतील किंवा मिळतील असा प्रश्न विचारावासा वाटला कारण तुमच्या
कवितेत व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करणारे पुरूष "इतिहासात दुर्मिळ होते वर्तमानातही थोडेथोडकेच आहेत" असं तुम्ही पुढे म्हणताय.

आता प्रौढ असणारे पुरूष हे स्त्रियांनीच घडविलेले आहेत. आम्ही लहान असताना आमचे बाबा चरितार्थाकरिता कार्यालयात नोकरीला जात. साधारण दहा तास तरी घराबाहेर असत. आम्ही जास्त काळ आईच्याच सहवासात असू. त्याचप्रमाणे शाळेत ही शिक्षकांपेक्षा शिक्षिकांचीच संख्या जास्त होती. साधारण हाच अनुभव अनेकांचा असतो की वयाच्या अठरापर्यंत व्यक्ती घडत असते आणि या घडण्याच्या काळात अवतीभवती असणार्‍या प्रौढ व्यक्तींपैकी पुरुषांपेक्षा स्त्रियाच (आई / आजी / काकू / शिक्षिका इत्यादी) जास्त असतात. असे असूनही स्त्रियांकडूनच घडविले गेलेले पुरूष स्त्रियांच्याच अपेक्षांप्रमाणे असत नाहीत ही आश्चर्याचीच गोष्ट आहे.

याबाबत माझा स्वत:चा एक अनुभव (विस्तारभयास्तव सविस्तर तपशील टाळून) इथे मांडतो. मी २००८ साली दिल्ली मुंबई असा प्रवास राजधानी एक्स्प्रेसने करीत होतो. तेव्हा सहप्रवासी महिलेशी माझ्या बराच वेळ मनमोकळ्या गप्पा रंगल्या. काही मुद्यांवर आम्ही एकमेकांशी चक्क वाद ही घातला. इतका वेळ संवाद साधल्यावर आम्हाला एकमेकांच्या व्यावसायिक व खासगी जीवनाविषयी देखील बरीच माहिती मिळाली त्याचप्रमाणे स्वभाविषयीही ढोबळ मानाने कल्पना आली. त्यावेळी मी तिशीत होतो तर ती महिला साधारण पंचेचाळिशीची असावी (कारण तिचा मोठा मुलगा इंजिनीयरिंगच्या दुसर्‍या वर्षात शिकत असल्याचे तिने सांगितले होते). शेवटी निरोप घेताना तिने मला सांगितले, "तुझ्या स्वभावातल्या काही गोष्टी मला पटल्या, तर अनेक बाबी खटकल्या. अर्थात तुझ्यासारख्या स्वभावाचा माझा मुलगा असेल तर मला आनंदच आहे. पण थॅंक गॉड माझा नवरा तुझ्यासारख्या स्वभावाचा नाहीय. अशा स्वभावाचा मुलगा मिळणे अतिशय अभिमानाचे ठरेल, पण असा नवरा मिळाला तर ते फारच त्रासदायक ठरणार."

म्हणजे तिला नवरा म्हणून त्रासदायक वाटू शकणारा पुरूषाचा स्वभाव तिच्या मुलाचा असेल तर अभिमान वाटतो यातच सारे काही आले. स्त्रिया अशा पद्धतीने जर मुलांना वाढवत असतील तर त्यांनी वाढवून मोठे केलेले हे पुरूष पुढे इतर स्त्रियांना नकोसेच वाटणार.

तरीही या वरून योग्य तो बोध घेऊन तुम्ही आताच वय वर्षे पाच किंवा त्याहून कमी वयाच्या मुलग्यांना तुमच्या अपेक्षांप्रमाणे घडवू / वाढवू शकता. त्याकरिता तुम्ही शिक्षिका होणे अतिशय उत्तम. कारण तुम्ही जास्तीत जास्त मुलांना घडवू शकाल. म्हणजे निदान पुढे पंधरा वीस वर्षांनंतर तरी त्यावेळच्या महिलांना तरी असे पुरूष कुठे मिळतील? हा गहन प्रश्न पडायला नको.

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 3:31 pm | प्रियाली

असं कसं काय विचारू शकता तुम्ही? पुरूष म्हणजे काय निर्जीव वस्तू आहेत काय मिळायला? निर्जीव वस्तू मिळतात तर सजीव व्यक्ती भेटतात. असो, तुम्हाला असे पुरूष कुठे भेटतील किंवा मिळतील असा प्रश्न विचारावासा वाटला कारण तुमच्या कवितेत व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करणारे पुरूष "इतिहासात दुर्मिळ होते वर्तमानातही थोडेथोडकेच आहेत" असं तुम्ही पुढे म्हणताय.

विडंबनांवर इतका गहन विचार करणार्‍या माणसांचे मला अतिशय कौतुक वाटत आले आहे. त्या कौतुकास गूगळे आज पात्र ठरले. अभिनंदन! ;)

आता प्रौढ असणारे पुरूष हे स्त्रियांनीच घडविलेले आहेत. आम्ही लहान असताना आमचे बाबा चरितार्थाकरिता कार्यालयात नोकरीला जात. साधारण दहा तास तरी घराबाहेर असत. आम्ही जास्त काळ आईच्याच सहवासात असू. त्याचप्रमाणे शाळेत ही शिक्षकांपेक्षा शिक्षिकांचीच संख्या जास्त होती. साधारण हाच अनुभव अनेकांचा असतो की वयाच्या अठरापर्यंत व्यक्ती घडत असते आणि या घडण्याच्या काळात अवतीभवती असणार्‍या प्रौढ व्यक्तींपैकी पुरुषांपेक्षा स्त्रियाच (आई / आजी / काकू / शिक्षिका इत्यादी) जास्त असतात. असे असूनही स्त्रियांकडूनच घडविले गेलेले पुरूष स्त्रियांच्याच अपेक्षांप्रमाणे असत नाहीत ही आश्चर्याचीच गोष्ट आहे.

याला पिढ्यान पिढ्या पुरुषप्रधान संस्कृतीत दबलेल्या स्त्रियांची मानसिकता म्हणतात आणि असे प्रसंग सांगून आपल्या वरची जबाबदारी झटकणार्‍याला प्रभूमास्तरांचा ए.एम.सी. उर्फ एम.सी.पी. म्हणतात. पुन्हा एकवार अभिनंदन!

थॅंक गॉड माझा नवरा तुझ्यासारख्या स्वभावाचा नाहीय. अशा स्वभावाचा मुलगा मिळणे अतिशय अभिमानाचे ठरेल, पण असा नवरा मिळाला तर ते फारच त्रासदायक ठरणार."

चला बाईंचे वर्तमान गर्तेत असले तरी भविष्य उज्ज्वल आहे. हे ही नसे थोडके.

तरीही या वरून योग्य तो बोध घेऊन तुम्ही आताच वय वर्षे पाच किंवा त्याहून कमी वयाच्या मुलग्यांना तुमच्या अपेक्षांप्रमाणे घडवू / वाढवू शकता. त्याकरिता तुम्ही शिक्षिका होणे अतिशय उत्तम. कारण तुम्ही जास्तीत जास्त मुलांना घडवू शकाल. म्हणजे निदान पुढे पंधरा वीस वर्षांनंतर तरी त्यावेळच्या महिलांना तरी असे पुरूष कुठे मिळतील? हा गहन प्रश्न पडायला नको.

छे! छे! मला वयाने वाढलेल्या पण बालबुद्धी राखणार्‍या पुरुषांना शिकवण्यात अधिक इंटरेस्ट वाटतो.

अवांतरः गूगळेंचा प्रतिसाद वाचून काही दिवसांपूर्वी एन.डी.टीव्हीवर तवलिनसिंग आणि चेतन भगत यांच्यातील बोलाचाल आठवली. ती पाहून खो खो खो हसले होते कारण तवलिनसिंग चेतन भगतवर इतक्या उखडल्या की (असे काहीसे) म्हणाल्या; "तू एक थर्डक्लास लेखक आहेस, तू लिहिलेल्या भंपक कादंबर्‍यांपायी तुला जेलमध्येच टाकायला हवे."
चेतन भगत बाईंच्या या अतिरेकीपणावर कसनुसा चेहरा करून "इतकं का मी वाईट लिहितो?" असं विचारता झाला. बिच्चारा!

बरे झाले बाईंनी गूगळेंचा प्रतिसाद नाही वाचला, नाहीतर एका ऐवजी दोन चेतनांना..... ;) ह. घ्या

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 3:54 pm | चेतन सुभाष गुगळे

माझा अतिशय नावडता लेखक आहे तो. फक्त जेल मध्ये त्याला सक्तमजूरी वर पाठवावे नाहीतर रिकामा बसला तर तिथे अजून काही तरी लिहील. किंवा सरळ त्याला फासावरच चढवावे.

दोनवेळा अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद.

पण

<< मला वयाने वाढलेल्या पण बालबुद्धी राखणार्‍या पुरुषांना शिकवण्यात अधिक इंटरेस्ट वाटतो.>>

ही इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर एखाद्या असायलम मध्येच रुग्णप्रशिक्षक व्हा.

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 4:01 pm | प्रियाली

ही इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर एखाद्या असायलम मध्येच रुग्णप्रशिक्षक व्हा.

तुम्ही योग्य जागी भेटलात याचा आनंद वाटतो. :) शिकवणी कधी सुरू करायची म्हणता? ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2011 - 6:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

श्री. गुगळे, तुम्ही हा धागा पूर्ण आणि नीट वाचला आहेत का अशी शंका आली. त्याशिवाय राजधानी एक्सप्रेसमधे भेटलेल्या एका स्त्रीशी झालेल्या गप्पांवरून तुम्ही समस्त किंवा बहुसंख्य स्त्रियांच्या विचारांची कल्पना करता आहात का अशीही एक शंका आली. अशी कल्पना करायला काही ना नाही, पण ती वस्तुस्थितीच्या कितपत जवळ जाणारी असेल याबाबतीत मला शंका आहे.

एकेकाळी नवर्‍याला घरकामात मदत करायला लावणार्‍या बायका, स्वतःच्या मुलाने सुनेस मदत केल्यास चिडतात वगैरे गोष्टी अनेक गोष्टींमधे वाचल्या आहेत.

त्याकरिता तुम्ही शिक्षिका होणे अतिशय उत्तम. कारण तुम्ही जास्तीत जास्त मुलांना घडवू शकाल.

हा हा हा ... शाळेत का मुलांना घडवतात? आमच्या वेळेस तर गधा मजदूरी केली की काम झालं इतपतच आम्हाला शाळेतून घडवलं गेलं.

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 6:50 pm | चेतन सुभाष गुगळे

श्रीमती ३_१४विक्षिप्त अदिती

तुमच्या शंकांचं निरसन करतो. त्याकरिता इथल्याच संदर्भांचा वापर करतो.

<<श्री. गुगळे, तुम्ही हा धागा पूर्ण आणि नीट वाचला आहेत का अशी शंका आली>>

या शंकेच्या निरसनाकरिता साक्षात याच धाग्याच्या उगमकर्त्या प्रियाली यांनी माझ्या प्रतिसादाला दिलेल्या उपप्रतिसादातील हे वाक्य वाचा.

<<विडंबनांवर इतका गहन विचार करणार्‍या माणसांचे मला अतिशय कौतुक वाटत आले आहे. त्या कौतुकास गूगळे आज पात्र ठरले. अभिनंदन!>>

मी धागा पूर्ण आणि नीट वाचला आहे हे समजण्याकरिता यापेक्षा मोठा पुरावा तो दुसरा कोणता?

<< त्याशिवाय राजधानी एक्सप्रेसमधे भेटलेल्या एका स्त्रीशी झालेल्या गप्पांवरून तुम्ही समस्त किंवा बहुसंख्य स्त्रियांच्या विचारांची कल्पना करता आहात का अशीही एक शंका आली. अशी कल्पना करायला काही ना नाही, पण ती वस्तुस्थितीच्या कितपत जवळ जाणारी असेल याबाबतीत मला शंका आहे.>>

या शंकेच्या निरसनार्थ तुमचीच पुढची वाक्यं वापरतो.

<<एकेकाळी नवर्‍याला घरकामात मदत करायला लावणार्‍या बायका, स्वतःच्या मुलाने सुनेस मदत केल्यास चिडतात वगैरे गोष्टी अनेक गोष्टींमधे वाचल्या आहे>>

वगैरे गोष्टी गोष्टींमध्येच वाचल्या असल्यात तरी त्या वस्तुस्थितीवर च आधारीत होत्या. अन्यथा ४९८ अ कलमाखाली केल्या गेलेल्या तक्रारींमध्ये पती, दीर ,सासरा या पुरूषमंडळींसोबतच सासू, नणंद, जाऊ या महिला मंडळींनाही आरोपी केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळाल्या नसत्या.

<<शाळेत का मुलांना घडवतात? आमच्या वेळेस तर गधा मजदूरी केली की काम झालं इतपतच आम्हाला शाळेतून घडवल>>

ते तुम्ही तुमच्या लिखाणातून सिद्ध करून दाखवित असताच शिवाय तुमच्या वापरकर्त्या नावा मधील एका शब्दावरून त्याची कल्पना येतेच. त्याविषयी आम्ही कुठलीही वेगळी शंका उपस्थित करणार नाहीत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2011 - 7:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या शंकेच्या निरसनाकरिता साक्षात याच धाग्याच्या उगमकर्त्या प्रियाली यांनी माझ्या प्रतिसादाला दिलेल्या उपप्रतिसादातील हे वाक्य वाचा.

पहिल्याच ओळीत प्रियालीने 'प्रेरणा' काय हे पण सांगितलं आहे.

वगैरे गोष्टी गोष्टींमध्येच वाचल्या असल्यात तरी त्या वस्तुस्थितीवर च आधारीत होत्या.

हे मी अमान्य करतच नाहीये. पण या आणि अशाच गोष्टींवरून सर्वसामान्य, बहुसंख्य स्त्रिया अशाच असतात असा काही तुमचा समज आहे का अशी शंका आली.

ते तुम्ही तुमच्या लिखाणातून सिद्ध करून दाखवित असताच शिवाय तुमच्या वापरकर्त्या नावा मधील एका शब्दावरून त्याची कल्पना येतेच.

आम्हाला आम्ही स्वकष्टाने कमावलेल्या ३.१४, अर्थात इरॅशनल, विक्षिप्तपणाचा पुरता अभिमान आहे; हा विक्षिप्तपणा शालेय शिक्षणातून आलेला नाही. असा काही संबंध जोडता आला तर तो निव्वळ योगायोग असेल याची कृपया सर्वांनीच नोंद घ्यावी.

----
अवांतरः "श्रीमती ३_१४विक्षिप्त अदिती" यातलं श्रीमती हे विशेषण पाहून अंमळ गंमत वाटली.

(आंतरजालावर निव्वळ आयडीरूपी) अदिती

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 7:16 pm | चेतन सुभाष गुगळे

<< अवांतरः "श्रीमती ३_१४विक्षिप्त अदिती" यातलं श्रीमती हे विशेषण पाहून अंमळ गंमत वाटली. >>

बहुधा हे विशेषण नको असावं. कारण पुढे विक्षिप्त शब्द येत असल्यावर श्रीमती तील मतीला रजा देणंच भाग आहे आणि नुसतं श्री विशेषण तर पुरूषांकरिताच वापरलं जातं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2011 - 7:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

छे, छे! श्री. हे लघुरूप श्रीयुत या शब्दाचं असतं, 'श्रीमती'मधे मती आहे, श्रीयुतमधे मतीचा संबंधच नाही. (या केविलवाण्या न-विनोदाबद्दल मला मिपा वाचकसंघाने माफ करावं अशी विनंती.)

'३_१४ विक्षिप्त अदिती' हा आंतरजालावरील आयडी आहे. तुम्ही आयडीशी संवाद साधता आहात, जिवंत माणसाशी नाही असं काहीसं सुचवायचं होतं. विशेषण नको आहे हा अंदाज योग्य आहे, पण विश्लेषण पारच चुकलं आहे.

आणि का हो, विक्षिप्त लोकांना मती का असू नये? आम्हीही माणूसच आहोत, आम्हालाही आपलं म्हणा.

अवांतरावरही विकेट काढता येते हे नवीनच आहे. एकेकाळी अवांतरावरून चांदण्या द्यायचे. पण ते एक असो.

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 4:12 pm | चेतन सुभाष गुगळे

अच्छा असे प्रशिक्षक आधी माझ्या हाताखालीच शिकायला येतात हे तुम्हाला कळले तर...

कधीही या. खाली संपर्क तपशील दिला आहेच.

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 4:16 pm | प्रियाली

अच्छा असे प्रशिक्षक आधी माझ्या हाताखालीच शिकायला येतात हे तुम्हाला कळले तर...

पुन्हा एकवार अभिनंदन! पण मी तुमची शिकवणी घेण्याबद्दल म्हणत होते.

खाली संपर्क तपशील दिला आहेच.

कृपया, मिपाचा वापर जाहीराती आणि धंद्यासाठी करू नये.

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 4:32 pm | चेतन सुभाष गुगळे

<<पुन्हा एकवार अभिनंदन! पण मी तुमची शिकवणी घेण्याबद्दल म्हणत होते.>>

अभिनंदनाबद्दल पुनश्च आभार पण मला शिकवणी द्यायचा विचार केलात म्हणजे तुमचा अंदाज चूकला म्हणायचा. तुमच्या माहितीकरिता - मी असायलममध्ये नसतो. माझ्या घरातच राहतो.

<< कृपया, मिपाचा वापर जाहीराती आणि धंद्यासाठी करू नये. >>

मी कधीच करीत नाही (तसं करायला मी ज्योतिषी थोडाच आहे?). माझे शत्रू सुद्धा माझ्यावर हा आरोप करू शकणार नाहीत. मी स्वाक्षरीत संपर्क तपशीलच फक्त देत असतो. व्यवसायाचा उल्लेख कधीच करीत नाही.