✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

...

प — प्रियाली, Fri, 08/19/2011 - 01:34

प्रतिक्रिया द्या
31241 वाचन

💬 प्रतिसाद (150)

तेच तर म्हणतोय

धनंजय
Fri, 08/19/2011 - 03:16 नवीन
डिशवॉशरला डिशवॉशर हवा म्हणून तर यादी मागवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

खल्लास ! __/\__

नावातकायआहे
Fri, 08/19/2011 - 23:04 नवीन
खल्लास ! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अरेरे!

चिंतातुर जंतू
Fri, 08/19/2011 - 03:09 नवीन
हा हा हा! अरे देवा, काय दिवस आले आहेत! कुठे ते एके काळचे 'आजची खादाडी'सोबतच्या पुष्ट स्त्रिया आपल्या दमदार छातीवर लेवूनही त्यांच्या भाराने अजिबात न वाकणारे आमचे 'रीतीभातीचे' संकेतस्थळ अन कुठे हे आजकालचे उच्छृंखल बाजारू संकेतस्थळ. जगदंब जगदंब!!! - स्मरणरंजनाने चिंतातुर जंतू जाताजाता: याची आठवण झाली: मला एक पुरुष हवा आहे! या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे बटणं सापडत नाहीत म्हणून आरडाओरडा करून घर डोक्‍यावर घेणारा, आमटीला फोडणी खमंग पडली म्हणून खुशालून जाणारा, केसांतून बोटे फिरली की, बाळ होऊन कुशीत घुसणारा दमदार पावलांनी तिन्ही सांजेचा केविलवाणा अंधार उधळून लावणारा पुरुष हवा आहे या घराला - एक आडदांड पुरुष हवा आहे नाही हे मी म्हणत नाही या भिंतीच म्हणून राहिल्यात केव्हापासून अनुराधा पोतदार (कॅक्‍टस फ्लॉवर या काव्यसंग्रहातून)
  • Log in or register to post comments

आता का म्हणे उच्छृंखल बाजारू?

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/19/2011 - 03:51 नवीन
आता का म्हणे उच्छृंखल बाजारू? "लुटा लुत्फ तिरामिसूचा, आजच्या हंक जॉनसोबत" असं काही लिहीलं की रीतभात येणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

छोड यार

शुचि
Fri, 08/19/2011 - 04:02 नवीन
३ बायका आनंद उपभोगत आहेत हे बघवणार कसं? लगेच यांची संकेतस्थळं "बाजारू" होतात .... कपाळाला आठ्या चढतात. रीतभात बुडते. इतर धाग्यांवर धांगडधिंगा चालतो ते बरीक चालतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

जॉन? नक्को बाई!

चिंतातुर जंतू
Fri, 08/19/2011 - 04:25 नवीन
"लुटा लुत्फ तिरामिसूचा, आजच्या हंक जॉनसोबत" असं काही लिहीलं की रीतभात येणार का?
तिरामिसू एकवेळ चालेल पण हंक जॉनऐवजी एखादा दाक्षिणात्य मिशाळ, केसाळ पुष्ट पुरुष लुंगीत दाखवलात तर 'जुनी' रीतभात पाळाल ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आप्पडिया

प्रियाली
Fri, 08/19/2011 - 04:30 नवीन
पुरुष हवा आहे, अध्येमध्ये लुंगी वर करून पोटाशी बांधणारा ;) Image removed. फोटो येथून साभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

च्यायला ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/19/2011 - 04:36 नवीन
त्या मुच्छडांमधे तुम्हाला का हो एवढा रस? 'आमची आवड' काय आहे हे पण आता तुम्ही पुरूष आम्हाला सांगणार का? एटा चॉलबे ना।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

रीतभात

चिंतातुर जंतू
Fri, 08/19/2011 - 04:44 नवीन
'आमची आवड' काय आहे हे पण आता तुम्ही पुरूष आम्हाला सांगणार का?
मग? शेवटी प्रश्न रीतीभातीचा आहे आणि त्यामुळे संकेतस्थळाच्या इज्जतीचा पण! स्थळज्येष्ठ सदस्यांनीच रीतभात सोडली तर मग आपली महान संस्कृती आपलं वस्त्रहरण होताना कुणाचा धावा करील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हो, पण रीतभात काय

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/19/2011 - 05:14 नवीन
हो, पण रीतभात काय तुमच्यासारख्या संकेतस्थळकनिष्ठ सदस्यांनी आम्हाला सांगायचं होय? व्यक्तीला वस्तू बनवून त्यांचे फोटो टाकणे हीच इथली 'जुनी' रीतभात; जुन्या काळीही आम्ही हेच करत आलो आहोत. बाकी कसली संस्कृती आणि कसल्या वस्त्रहरणाच्या गोष्टी करता तुम्ही नवखे लोकं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

हवेत तसे काही जुने, चिरंजीव फोटू

नंदन
Fri, 08/19/2011 - 08:48 नवीन
इथे सापडतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

ही आमची लुंगी अन हिच्यावर आमचा फार जीव...

Nile
Fri, 08/19/2011 - 13:31 नवीन
लोक अन रितभात हितार्थ जनहीत मे जारी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

बासरी वाजवणारा

चित्रा
Fri, 08/19/2011 - 23:26 नवीन
बासरीवाला लुंगीतला पुरुष आणि त्याच्याभोवतालच्या मॉडर्न गौळणी बघून डोळे दिपले. भारी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हा पण चाल्तोय का बघा!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 08/23/2011 - 12:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अच्छा!

श्रावण मोडक
Fri, 08/19/2011 - 14:56 नवीन
हंक जॉनऐवजी एखादा दाक्षिणात्य मिशाळ, केसाळ पुष्ट पुरुष लुंगीत दाखवलात तर 'जुनी' रीतभात पाळाल
अच्छा! या आवडी माहिती नव्हत्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

हंक म्हणजे काय?

चेतन सुभाष गुगळे
Tue, 08/23/2011 - 11:43 नवीन
हंक म्हणजे काय? असा प्रश्न मला पडला. इंग्रजी - मराठी शब्दकोशातले अर्थ पाहिले. ते खालीलप्रमाणे :- hunk (हंक) - (पाव, मांस इ. चा) जाड तुकडा hunker (हंकर) - उकिडवा बसणे, वाकणे hunkers (हंकर्स) - शरीराचा पार्श्वभाग, जघन hunks (हंक्स) - लहरी वृद्ध माणूस, कंजूष माणूस जॉनविषयी हंक हे विशेषण वापरताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हे ही पहा

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/23/2011 - 21:04 नवीन
अर्बनडिक्शनरीच्या मताप्रमाणे: १. An attractive male, usually with nice chiseled abs and a very sexy tan. २. Extremely Hot Male Model. Usually Tanned, Built, Tall, And Poses In Underwear. अजूनही पाच अर्थ आहेत, ते लिंकवर वाचता येतीलच. ऑक्सफर्ड शब्दकोषानुसारः १. a large piece of something, especially food, cut or broken off a larger piece: २. informal a large, strong, sexually attractive man डिक्शनरी.कॉमच्या लिंकवर हे सापडलं. १. a large piece or lump; chunk. २. Slang .
  • a handsome man with a well-developed physique.
  • a large or fat person.
भाईकाकांचं 'खुर्च्या' ऐकल्यापासून इंग्लिश->मराठी शब्दकोष पहाणं मी सोडून दिलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

मूळ प्रश्न अनुत्तरीतच..

चेतन सुभाष गुगळे
Tue, 08/23/2011 - 22:12 नवीन
इतके सगळे अर्थ देऊन भाषाविषयक माझ्या सामान्य ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद. पण माझं कुतुहल कायम आहेच. << जॉनविषयी हंक हे विशेषण वापरताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे?>>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

उत्तर

प्रियाली
Tue, 08/23/2011 - 22:45 नवीन
जॉनविषयी हंक हे विशेषण वापरताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे?
अदितीला कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते माहित नाही पण मला वरील सर्व अर्थ एकत्रित करून जितका व्यापक अर्थ निघेल तो चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

छे, छे

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/23/2011 - 22:45 नवीन
छे, छे, हे भाषाविषयक ज्ञान नसून ही इंटरनेटच्या अधिक वापराविषयक माहिती आहे. हां, आणि हंकचा मला अभिप्रेत असणारा अर्थ तोच जो माणसाचं सर्वात जास्त वस्तूकरण करणारा, अश्लील आहे तो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

ना तेरी ना मेरी

प्रियाली
Fri, 08/19/2011 - 04:27 नवीन
कुठे ते एके काळचे 'आजची खादाडी'सोबतच्या पुष्ट स्त्रिया आपल्या दमदार छातीवर लेवूनही त्यांच्या भाराने अजिबात न वाकणारे आमचे 'रीतीभातीचे' संकेतस्थळ अन कुठे हे आजकालचे उच्छृंखल बाजारू संकेतस्थळ. जगदंब जगदंब!!!
बरं! बरं! इतके नाराज होण्याचे काही कारण नाही. सर्वांचेच पोट भरेल अशीही व्यवस्था करता येईलच की. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

वरच्या त्या जॉनच्या फोटोत काय

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/19/2011 - 04:36 नवीन
वरच्या त्या जॉनच्या फोटोत काय हात दाखवून अवलक्षण आहे का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

हात बाईचा कशावरून...

प्रियाली
Fri, 08/19/2011 - 04:38 नवीन
त्याचं असं झालं की हात बाईचा कशावरून असा तांत्रिक मुद्दा राजेशनी काढला. शिवाय प्रियालीचा धागा... कुणाचा हात अचानक, कुठून कोणाच्या खांद्यावर येऊन पडतो असे प्रश्न लोकांना पडायला नकोत म्हणून स्वच्छ आणि स्पष्ट फोटो दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

छ्या, जुन्या मालकांनी सोय

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/19/2011 - 04:40 नवीन
छ्या, जुन्या मालकांनी सोय केली आहे की! म्हणून टाक "ज्याची त्याची जाण, समज, इ.इ ...."! हाय काय नाय काय!! तरी एक बरं केलंस हां, सल्लूचा टॉपलेस फोटोच टाकलास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

या पुरुषाने तर कानात रिंगा

राजेश घासकडवी
Fri, 08/19/2011 - 08:17 नवीन
या पुरुषाने तर कानात रिंगा देखील घातलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या उपयुक्तपणात 'दागिने शेअर करता येणारा' ही भर पडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

हाहाहा!

मयुरा गुप्ते
Fri, 08/19/2011 - 03:28 नवीन
मस्त जमलिये कविता! जबरदस्त विडंबन. --मयुरा.
  • Log in or register to post comments

सॉल्लिड करमणूक

प्राजु
Fri, 08/19/2011 - 07:45 नवीन
सॉल्लिड करमणूक होतेय. संपादकीय सल्ला : मस्करीची कुस्करी होणार नाही याची काळजी घ्या.
  • Log in or register to post comments

अर्रर्र...श्रावणात काय हे

रेवती
Fri, 08/19/2011 - 08:28 नवीन
अर्रर्र... श्रावणात काय हे भलतेच!;) त्यावर श्रावणच पाळतोय आम्ही असं म्हणू नका बुवा/बै!
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

मुक्तसुनीत
Fri, 08/19/2011 - 08:36 नवीन
या धाग्यातली कविता आणि प्रतिसादातले अन्य लिखित विनोद मी मनापासून एंजॉय केले. कवितेमधे (काहीशा मिष्किलपणे) व्यक्त झालेल्या पुरुषप्रतिमेबद्दल मी प्रस्तुत कवितेच्या कर्तीच्या मतांशी सहमती व्यक्त करतो. मात्र , जॉन अब्राहम आणि/किंवा इतर पुरुषविशेष यांची इथल्या धाग्यावर लावलेली अर्धनग्न चित्रे म्हणजे "आजची खादाडी" आणि इतर प्रसंगी इथल्या संकेतस्थळावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या स्त्रियांच्या कमी अधिक कपड्यांमधल्या चित्रांना दिलेली दाद आहे असं समजायचं काय ? माझ्यापुरतं बोलायचं तर मला कुणाही लिंगी व्यक्तीची तोकड्या कपड्यांमधली चित्रे आणि मुख्यम्हणजे त्यावर केलेल्या कमेंट्स हा प्रकार अत्युच्च अभिरुचीचा वाटत नाही. अर्थात "हॉट ऑर नॉट" इत्यादि स्वरूपाच्या गोष्टींवर बंदी घालायची काहीच गरज नाही. सेक्स-व्हॉयलन्स-धार्मिक संवेदनशील मजकूर- वैयक्तिक टिकाटिप्पणी वगळता कुठल्याही अभिव्यक्तीवर कदापि बंदी घातली जाऊ नये या माझ्या (आजवर ठामपणे जोपासलेल्या) भूमिकेत जराही बदल मी करत नाही. उपरोक्त कुठल्याही "सेन्सॉरेबल" प्रकाराला वगळता बाकी कुणीही काहीही लिहो नाहीतर डकवो, त्यावर बंदी नाही आणि माझी हरकतही नाहीच. प्रश्न व्यक्तींना, त्यांच्या शारिरीक अवयवांना वस्तुरुप देण्याचा आहे. आजवर "आजची खादाडी" टाईप स्त्रीदेहाला वस्तुरूप करणार्‍या प्रवृत्तींबरोबर माझी रुचिभिन्नता मी व्यक्त करत आलो. इथे डकवलेल्या चित्रांच्या संदर्भातसुद्धा ही रुचिभिन्नता व्यक्त करणे मी अपरिहार्य समजतो आणि त्याची इथे नोंद करतो.
  • Log in or register to post comments

आले

सहज
Fri, 08/19/2011 - 08:48 नवीन
आले किरवंत आपलं विचारजंत आपलं ... जाउ द्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

स्पष्टीकरण

प्रियाली
Fri, 08/19/2011 - 15:05 नवीन
या धाग्यातली कविता आणि प्रतिसादातले अन्य लिखित विनोद मी मनापासून एंजॉय केले. कवितेमधे (काहीशा मिष्किलपणे) व्यक्त झालेल्या पुरुषप्रतिमेबद्दल मी प्रस्तुत कवितेच्या कर्तीच्या मतांशी सहमती व्यक्त करतो.
धन्यवाद. :) याचबरोबर, अर्धनग्न कत्रिनाचे फोटो पाहून एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील किंवा रुचीहिनता वाटत असल्यास मी क्षमा मागते आणि गरज भासल्यास केवळ कत्रिनाचा फोटो संपादकांनी क्रॉप करून लावावा अशी मी विनंतीही करते. तरीही असे नमूद करेनच की कत्रिनाने घातलेले कपडे आज पार्ट्यांमध्ये, अ‍ॅवार्ड सेरेमनीला आणि इतर सार्वजनिक प्रसंगात सर्रास घातले जातात. ते तोकडे असले तरी प्रचलित आहेत असे वाटते. तांत्रिक भाषेत तो फोटो अर्धनग्नही नाही कारण खांदे, हात आणि पाय दाखवणे याला अर्धनग्न म्हणता येत नाही असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
मात्र , जॉन अब्राहम आणि/किंवा इतर पुरुषविशेष यांची इथल्या धाग्यावर लावलेली अर्धनग्न चित्रे म्हणजे "आजची खादाडी" आणि इतर प्रसंगी इथल्या संकेतस्थळावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या स्त्रियांच्या कमी अधिक कपड्यांमधल्या चित्रांना दिलेली दाद आहे असं समजायचं काय ?
प्रश्नाचे उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलेले आहे. एखादी गोष्ट विनाकारण आणि वेळोवेळी होत गेली की ती उबगवाणी ठरते. मिपावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या चित्रांना आणि एखादे वेळी आलेल्या या धाग्याला एका पारड्यात तोलू नये ही विनंती. (तोट्याचा सौदा आहे. वजन सारखे भरणे केवळ अशक्य.)
प्रश्न व्यक्तींना, त्यांच्या शारिरीक अवयवांना वस्तुरुप देण्याचा आहे. आजवर "आजची खादाडी" टाईप स्त्रीदेहाला वस्तुरूप करणार्‍या प्रवृत्तींबरोबर माझी रुचिभिन्नता मी व्यक्त करत आलो. इथे डकवलेल्या चित्रांच्या संदर्भातसुद्धा ही रुचिभिन्नता व्यक्त करणे मी अपरिहार्य समजतो आणि त्याची इथे नोंद करतो.
मला वाटतं तसा उद्देश नव्हता पण चिंजंच्या प्रतिसादातून तशी गंमत केली गेल्याने इतरांनीही त्याला प्रतिसाद दिला असे वाटते. रुची ही रोज एकसारखी ठेवून भागत नाही, कधीतरी रुचीपालट करावा लागतो तसेच हे असावे. परंतु, रुचीपालट हा ही एखादेवेळेसच होतो यावरही विश्वास ठेवावा.
माझ्यापुरतं बोलायचं तर मला कुणाही लिंगी व्यक्तीची तोकड्या कपड्यांमधली चित्रे आणि मुख्यम्हणजे त्यावर केलेल्या कमेंट्स हा प्रकार अत्युच्च अभिरुचीचा वाटत नाही.
मला वाटतं आलेल्या कमेंट्स अतिशय साध्या आहेत. या संकेतस्थळाने वेळोवेळी यापेक्षा मोठ्या कमेंट्स आणि कॉम्प्लिमेंट्स (वहिनीपासून आयटम बॉम्ब) रिचवल्या आहेत आणि "हिक्क" सुद्धा केलेले नाही. कत्रिनाच्या कपड्यांबद्दल उहापोह झाला आहेच, आता जॉन आणि सल्लूकडे वळू. त्यांनी कपडे न घालणे हा अभिरुचीचा प्रकार नसून आपल्या संस्कृतीचा प्रकार आहे. मिपाच्या उजवीकडे उघडे ज्ञानेश्वर महाराज बसले आहेत. त्यांच्या फोटोवर कोणी आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. (कृपया, ज्ञानेश्वर आणि जॉन यांच्यातील समान धागा केवळ "पुरुष" एवढाच आहे असे समजावे. बाकी, समानता नसावी.) खालील फोटोवर कोणी आक्षेप घेईल असे वाटत नाही. येथेही खालचे पुरुष अर्धनग्न आहेत. Image removed. Image removed. तुमच्या तरुण/लहानपणी हा फोटो घरात लावला होता का? तुमच्या नसला तरी इतर अनेकांच्या असेल - Image removed. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही आमची संस्कृती आहे. त्यात अभिरुचीहीनतेचा संबंध नाही परंतु कत्रिनाच्या अर्धनग्न नसलेल्या पण एखाद्याला तसे वाटू शकते टैप फोटोबद्दल मी माफी मागायला तय्यार आहे. :) पण अगदी त्याच फोटोसारखा राधाकृष्णाचा फोटो (जवळपास तेवढ्याच कपड्यांतला) माझ्या घरात विराजमान आहे असे नमूद करते. Image removed.From Untitled Album * फोटो विविध संकेतस्थळांवरून घेऊन येथे लावले आहेत. ते मी काढलेले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही

मृत्युन्जय
Wed, 08/24/2011 - 16:11 नवीन
पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही आमची संस्कृती आहे. त्यात अभिरुचीहीनतेचा संबंध नाही परंतु कत्रिनाच्या अर्धनग्न नसलेल्या पण एखाद्याला तसे वाटू शकते टैप फोटोबद्दल मी माफी मागायला तय्यार आहे आम्ही स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते आहोत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

अरे वा, छान विडंबन!

चतुरंग
Fri, 08/19/2011 - 08:46 नवीन
पुढचा सगळा दंगा वाचून चमचमीत अंडाकरी ओरपल्यासारखं वाटतंय! ;) (माजीडायपरचेंजर+डिशवॉशर+पुजारी+रामागडी) रंगा
  • Log in or register to post comments

ठाकरी कविता

रमताराम
Fri, 08/19/2011 - 09:55 नवीन
अगदी ठाकरी शैलीतील रोकठोक कविता आवडली. आमचीही प्रेरणा पुरुषच हे पहिले वाक्य वाचून 'अखेर सरकार नमले' की काय अशी क्षणभर भीती वाटली. मग 'लिंक' लागली.
  • Log in or register to post comments

कंसातला पुरुष

ऋषिकेश
Fri, 08/19/2011 - 10:02 नवीन
कंसातल्या पुरुषांची कविता आणि चर्चा आवडली :)
  • Log in or register to post comments

:)

मन१
Sat, 08/20/2011 - 15:37 नवीन
विडंबन आणि प्रतिक्रिया भन्नाट. विडंबन ज्या मूळ कवितेचे आहे, त्याबाबत श्रीमती आदितींशी सहमत.
  • Log in or register to post comments

सेक्सिस्ट

आनंदयात्री
Sun, 08/21/2011 - 18:58 नवीन
सेक्सिस्ट .. सेक्सिस्ट !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

(स्त्री)

विनायक प्रभू
Fri, 08/19/2011 - 12:43 नवीन
ह्या विषयावर कविता अपेक्षित. कोण घेतोय पुढाकार?
  • Log in or register to post comments

सर तुम्ही लिव्हाच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/19/2011 - 15:08 नवीन
'स्त्री हवी आहे' असा विषय घेऊन आपणच पुरुषांना हव्या असलेल्या अपेक्षित स्त्री बद्दलच्या भावना समृद्ध अनुभव किंवा कल्पनेच्या साह्याने मांडू शकाल असे वाटते. लेखन गद्य असले तरी त्याला आम्ही पद्य म्हणून वाचू त्याची कल्जी करु नये. :) सर, लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे (सरांचा विद्यार्थी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

प्र.का.टा.आ.

गणेशा
Fri, 08/19/2011 - 15:45 नवीन
प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

कोणीच तयार नाही?

प्रियाली
Fri, 08/19/2011 - 17:04 नवीन
ह्या विषयावर कविता अपेक्षित. कोण घेतोय पुढाकार?
इतके कठीण नाही स्त्रीकडून अपेक्षा करणे पण तशी अपेक्षा करायला फारसे पुरुष तयार नसावेत की काय असा प्रश्न पडला कारण परिवर्तन त्यांच्या पथ्यावर पडणारे नाही. ही बघा कशी वाटते - बायका हव्या आहेत... आजच्या पुरुषांना हव्या आहेत बायका कणखर, खंबीर आणि कर्तृत्ववान बायका, शारीरिक पुरुषत्व असूनही मानसिक दौर्बाल्याला समजून घेणार्‍या आजच्या जगात पुरुषांना सर्वपरिने साथ देण्यास उत्सुक असणार्‍या बायका बँकांची कामं तुंबली असता आनंदाने ती कामे करणार्‍या बायका, घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभ्या राहणार्‍या बायका, रडारडीच्या सिरिअल्सवर थुंकणार्‍या बायका, माहेरच्यांची फुका बढाई न मारणार्‍या बायका, पुरुषांना पॅरलल पार्किंग शिकवणार्‍या बायका, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करणार्‍या बायका, कुठे मिळतील अशा बायका?, इतिहासातही तशा होत्याच वर्तमानात संख्या वाढते आहे, लिंगनिरपेक्ष समानतेसाठी या बायकांसाठी सर्वांनाच ट्रेनिंग सेंटरमध्ये भरती व्हावे लागेल कदाचित ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

छान आहे कविता.

शुचि
Fri, 08/19/2011 - 18:55 नवीन
>> रडारडीच्या सिरिअल्सवर थुंकणार्‍या बायका, माहेरच्यांची फुका बढाई न मारणार्‍या बायका, पुरुषांना पॅरलल पार्किंग शिकवणार्‍या बायका, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करणार्‍या बायका, >> हाहा मस्त!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

पथ्य

विनायक प्रभू
Fri, 08/19/2011 - 19:02 नवीन
पथ्यावर पडणार नाही हे मात्र खरे. मग पत्थ्यावर पडणार्‍या काही ओळी येउ द्यात. मी टंकल्या असत्या पण नको. फारच त्रास होइल सगळ्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

टंका की

प्रियाली
Fri, 08/19/2011 - 19:04 नवीन
टंका की. त्रास तुम्हाला होतो की दुसर्‍यांना ते नंतर बघता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

थोडा बदल करून लिहीलं आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/19/2011 - 19:28 नवीन
स्त्रिया हव्या आहेत आजच्या जगात हव्या आहेत स्त्रिया कणखर, विचारी आणि कर्तृत्ववान स्त्रिया, शारीरिक पुरूषत्व असलेल्या माणसांचीही मनं समजून घेणार्‍या आजच्या जगात समता पहाण्यास उत्सुक असणार्‍या स्त्रिया कष्टाची कामं समोर दिसता हातात यंत्र उचलणार्‍या स्त्रिया, घराबाहेर पडून स्वतःची ओळख शोधणार्‍या स्त्रिया, स्त्रीदाक्षिण्यावर थुंकणार्‍या स्त्रिया आणि जातीची फुका बढाई न मारणार्‍या स्त्रिया, मुलांनाही स्वयंपाक शिकवणार्‍या स्त्रिया, जागोजाग पेटणार्‍या युद्धाचा विरोध करणार्‍या स्त्रिया, कुठे मिळतील अशा स्त्रिया? इतिहासातही थोड्या होत्याच वर्तमानात संख्या वाढते आहे, समानतेसाठी सर्वांनाच ट्रेनिंग सेंटरमध्ये भरती व्हावे लागेल कदाचित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

अरे अरे अरे

विजुभाऊ
Mon, 08/22/2011 - 17:54 नवीन
अरे अरे अरे अरे........ कवितेतली भावना चांगली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ख त रा!! प्रियाली बाई ऐकत

प्राजु
Fri, 08/19/2011 - 19:36 नवीन
ख त रा!! प्रियाली बाई ऐकत नाही कोणाला... ! मस्तच गं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

दहाड ४४

चेतन सुभाष गुगळे
Wed, 10/05/2011 - 10:15 नवीन
http://www.youtube.com/watch?v=ZyJXLn_JwI8&feature=related
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

ओह्हो

श्रावण मोडक
Fri, 08/19/2011 - 12:51 नवीन
कविता आणि प्रतिसाद वाचून वाटू लागलं, 'संस्थळ वयात आलं'*! ;) *मराठी नाटकाविषयी असं माधव मनोहरांनी म्हटलं होतं. हा केवळ अतिरिक्त खुलासा आहे!!!
  • Log in or register to post comments

"या जॉनला कोणीतरी कोपर्‍यात

गवि
Fri, 08/19/2011 - 14:17 नवीन
"या जॉनला कोणीतरी कोपर्‍यात घेऊन जमेल तितपत आडवा हाणा रे.."
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा