...

प्रियाली's picture
प्रियाली in जे न देखे रवी...
19 Aug 2011 - 1:34 am
संगीतप्रेमकाव्यधर्ममुक्तकविडंबनसुभाषिते

प्रतिक्रिया

पुरषाची गरज स्त्रियांना फक्त एका गोष्टीसाठी लागते जी तुम्ही विसरलात या यादीत प्रियाली
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पॅरलल पार्कींग!!!! ;)

अर्थात पॅरलल पार्किंग जमत नाही असे कारण दिल्याने (आवडत्या) पुरुषाने गाडीत घालून हिंडवून आणायची मजा घ्यायची असली तर कदाचित ठीक आहे.

बाकी विडंबन आवडले!

नाही तो निव्वळ विनोद होता. असो.

चित्रा's picture

19 Aug 2011 - 5:28 pm | चित्रा

अरे देवा. स्मायली काढायची राहिली. :)

आशु जोग's picture

5 Oct 2011 - 12:25 am | आशु जोग

>> पॅरलल पार्कींग!!!!

हा मात्र गुगली होता

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2011 - 3:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

निषेधाचे समर्थन.

इंटरनेटस्नेही's picture

19 Aug 2011 - 1:43 am | इंटरनेटस्नेही

अतिशय अपमानकारक कविता, तीव्र निषेध नोंदवतो.

मुक्तसुनीत's picture

19 Aug 2011 - 1:47 am | मुक्तसुनीत

कुणाचा निषेध ?
कुणाचा अपमान ?
नक्की कशाबद्दल निषेध ?

थोडेसे स्पष्टीकरण दिल्यास बरं होईल.

कळावे.

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 2:13 am | प्रियाली

कोणाचा कसला अपमान झाला बरे?

इंटरनेटस्नेही's picture

19 Aug 2011 - 9:15 pm | इंटरनेटस्नेही

कोणाचा कसला अपमान झाला बरे?

समस्त पुरुषवर्गाचा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 9:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कसा काय ब्वॉ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 1:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली, कविता आवडली. अस्सल पाशवी अभिव्यक्ती!

त्यातच ही माझी थोडी भर.
Get this widget | Track details | eSnips Social DNA

अभिजीत राजवाडे's picture

19 Aug 2011 - 2:23 am | अभिजीत राजवाडे

कविता तर छानच आहे अन तुम्ही केलेले तुमच्या आवाजातील सादरीकरण मला व (माझ्या) बायकोला दोघांनाही आवडले.

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 2:28 am | प्रियाली

वा! व्वा! ऐकायला मजा वाटली.

लय झ्याक रेकार्ड झालयं.

नंदन's picture

19 Aug 2011 - 8:39 am | नंदन

देव-वाणी आठवली ;)

Nile's picture

19 Aug 2011 - 1:56 am | Nile

रामा गड्यावर केलेली कविता आवडली. अशी गड्यावर केलेली कविता इतिहासात आढळणे विरळाच, त्यामुळे कवियत्रीच्या क्रांतिकारी विचारांचे कौतुक वाटते! :P

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 2:17 am | प्रियाली

तुझ्या घरी लेका ही कामं रामागडी करायचा तर मग आई काय करायची? बर्‍याचशा घरी ही कामे बायका करतात. कामवाल्या नाही, घरवाल्या. माझ्या घरीही ही कामे आम्ही दोघे करतो.

असो. मूळ कवितेचा जीवच कमी असल्याने तेवढंच लिहावं लागलं. अन्यथा,

पुरुष हवे आहेत, सलमानसारखे वारंवार, जिथेतिथे शर्ट काढून फेकणारे,
जॉन अब्राहमसारखी पुढूनमागून शरीरयष्टी लाभलेले,
चट्टेरीपट्टेरी चड्डीतही हँडसम दिसणारे,
ठिगळांच्या बनियनमध्येही खुलून दिसणारे पुरुष हवे आहेत.

अशी अनेक कडवी करता येतील.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 2:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मेले, वारले, खपले ... विनोदामुळे नव्हे, असे पुरूष स्वप्नात दिसल्यामुळे, हाय मर जावां!

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 2:36 am | प्रियाली

वर नायल्याच्या उपप्रतिसादात एक डिस्क्लेमर द्यायचा राहिला.

डिस्क्लेमर:
वरील कडव्यामुळे आपली लक्तरे पब्लिकमध्ये धुतली गेली असे कोणाला वाटले आणि निषेध* वगैरे करायची उबळ आली तर मी काडीची किंमत देणार नाही. ;)

* सल्लू आणि जॉनने असा निषेध केला तर गोष्ट वेगळी. ;)

इस बातपे जॉन अब्राहम का मेरा पसंदीदा गाना हो जाए ;)

http://www.youtube.com/watch?v=7_eP1xKrbKM

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 2:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा जॉन? मला हा गरीबांचा जॉन, मार्क रॉबिन्सन आणि कोणी जीनी दिसते आहे.

हो हाच जॉन. मला हा खूप आवडतो असं नाही पण मला ते गाणं खूप आवडतं.

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 2:48 am | प्रियाली

मार्क रॉबिन्सन आहे तो, शुचि. अर्थात तोही वाईट नाही.

जॉन अब्राहमला पुढूनमागून बघायचा असेल तर इथे बघा. मिपावर चढवले तर आहेतच इथले संस्कृती रक्षक अश्लील अश्लील ओरडायला. ;)

खालून दुसरा (शेकन्ड लाश्ट) फोटो बघाच बघा!

आनंदयात्री's picture

19 Aug 2011 - 2:50 am | आनंदयात्री

हं .... हे आले मचाकप्रेमी !! ;)

(सॉरी परा)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2011 - 4:05 pm | परिकथेतील राजकुमार

मला का बॉ सॉरी ?

बाकी हा कंपूने कंपूसाठी काढलेला धागा आहे असे निरिक्षण नोंदवतो.

प्रियालीतै सारख्या 'शिणिअर' व्यक्तिने अशी कविता करावी व असे प्रतिसाद द्यावे ह्याचे दु:ख झाले. आज आम्ही बालगंधर्व चौकात एक उदबत्ती लावून ह्याचा निषेध करूच !

एकतर ती आधी मिपावर कोणाला दिसत नाही आणि दिसते तेंव्हा हे असले भलते सलते काहीतरी करत असते ;)

७_१२ सतत साडेसाती

शुचि's picture

19 Aug 2011 - 2:51 am | शुचि

मस्तच!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 2:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

संस्कृती रक्षकांची भीती नको म्हणून मी हा रूद्राक्षांची माळ असणाराच फोटो टाकते. संस्कृतीही नको बुडायला आणि जॉनही दिसेल.

मला हा फोटोच जास्त आवडतो.

शेवटून दुसर्‍या फोटोत अँगल थोडा चुकलेला आहे, नै प्रियाली?

मुलीची पोझ स्ट्रॅटेजिक आहे ;) फोटो आवडला हेवेसांनल.

राजेश घासकडवी's picture

19 Aug 2011 - 3:03 am | राजेश घासकडवी

पूर्ण विदा नसताना असले भलतेसलते निष्कर्ष काढणं योग्य नाही.

शुचि's picture

19 Aug 2011 - 3:50 am | शुचि

How much I wish I had पूर्ण विदा. त्या फोटोग्राफरला मेल्याला मधेच थांबायची अवदसा सुचली. पूर्ण पायापर्यंत घेतला असता तर .... पण नाही :(
_________________

ऑन सिरीअस नोट - फोटो खूप सुरेख आहे. फोटोग्राफर ने बरोबर फ्रेम केलेला आहे. काहीही सुधारणा नको.

त्या फोटोग्राफरला मेल्याला मधेच थांबायची अवदसा सुचली. पूर्ण पायापर्यंत घेतला असता तर .... पण नाही.... :(

येथील (बर्‍यापैकी) ज्येष्ठ मिपाकर या नात्याने सतत कमरेखाली जाणे हे अयोग्य अन अश्लील आहे असे मत नोंदवतो....

बाकी, पायापर्यंत जाता जाता १८० अंशाच्या कोनात वळला असता तर अजुन छान वाटले असते.....

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 3:00 am | प्रियाली

असती अमुची बोटे इतकी सुंदर
तर आम्हीही जॉन सोबत असा फोटु काढला असता.

हं! शेवटून दुसरा फोटू अंमळ गंडला आहे खरा. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 3:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

असं नाही गं म्हणायचं:

अशीच अमुची बोटे असती सुंदर, नीमुळती।
आम्हीही फोटू काढला असता वदली प्रियाली (/अदिती)॥

आनंदयात्री's picture

19 Aug 2011 - 2:38 am | आनंदयात्री

अश्लील ,.. अश्लील !!

शुचि's picture

19 Aug 2011 - 2:40 am | शुचि

इतका आनंद बरा नव्हे ;)

नंदन's picture

19 Aug 2011 - 8:41 am | नंदन

अश्लील, अश्लील! अब्राहमण्यम्! ;)

पण दोष आमचा नाही हो. आम्ही वाढलो खेड्यात. नातवाला पाठीवर घेऊन शेणाने घर सारवणारी आजी आमची. तेव्हा कविता वाचून अशा सगळ्या आमच्या आज्या, मावश्या अन काकवांची खडतर आयुष्यंच आम्हाला आठवावी यात आमचा तो काय दोष? त्यामुळेच कवितेतील मागण्या पाहता त्यांना एखादा अशी सगळे कामं करणारा रामा गडी मिळाला असता तर कीती बरे झाले असते असा एक साधा अन सरळ विचार आमच्या भाबड्या मनात आला आणि आम्ही तो वेंधळेपणाने बोलून दाखवाला इतकेच. पण आमचा स्वभावच मेला गरीब त्याला आम्ही तरी काय करणार!

अर्थात, तिथेच आमचे चुकले म्हणा. तुम्हा मॉडर्नं, हुशार अन चान चान स्त्रियांच्या फेमीनीस्ट मागण्यांची कल्पना नसताना प्रतिसाद दिला हे आमचं खरंच चुकलं. तर ते असो. पण चुकीचे परिमार्जन म्हणून, उघड्या-नागड्या "पुरुषांना पुढून मागून" बघायच्या का असेनात, तुमच्या इच्छा पुर्‍या होवोत अशाच शुभेच्छा!

(सर्व पाशवी बायांनी हा प्रतिसाद हलके घेणे)

अभिजीत राजवाडे's picture

19 Aug 2011 - 2:25 am | अभिजीत राजवाडे

या मधे दिलेल्या गोष्टी तुम्ही जर जाणिवपुर्वक करत नसाल तर अजुन आपण कर्मठ समाजातच वावरतो आहे.

Nile's picture

19 Aug 2011 - 11:38 am | Nile

जाऊद्या हो "राज"वाडे साहेब! तुम्हाला सामान्यांच्या परिस्थीतीची काय ती कल्पना असणार. ;-)

जबरदस्त विडंबन.

ओरिजनल असतं तर मात्र पूढील निरीक्षण नॉंदवले असते

शारीरिक पुरुषत्व नसूनही मानसिक प्राबल्य जोपासणार्‍या बायकांच्या जगात त्यांना साथ देण्यास उत्सुक असणारे पुरुष

बि.डी.एस.एम म्हणा की.

घरात कचरा झाला असताना व्हॅक्युम क्लिनरने घर चकाचक करणारे पुरुष, किचनमध्ये आनंदाने भांडी घासून देणारे पुरुष,

थोडक्यात कॉम्प्योटर निरक्षर पूरूष, कारण निट आवरलेलं घर हे घरचा कॉम्प्योटर बिघडल्याचं लक्षंण आहे. म्हणजे तूम्हाला घरकामाला गडीच हवाय तरं.... बरं बरं. ठीकाय.

पुरुषी इगोवर थुंकणारे पुरुष

लिंगनिरपेक्ष समानता हाच या धाग्याचा मूळ धागा असल्याने तृतीयपंथीयांच्या उल्लेखाला अनूमोदन. बॉबी डार्लिंगशी संपर्क साधा.

घरच्या चुली फुंकणारे पुरुष

घरचि चूल कशीही असो, बाहेरच्या चूली कशा आहेत त्यावरच बहूतांश घरच्या चूलीचं भवितव्य अवलंबून असतं बघा...

अडचणीतही बायकोचाच सल्ला घेणारे पुरुष, घरासाठी मरमरून काम करणारे पुरुष

हे बघा सूसायडल टेंडन्सी असलेल्या व्यक्तींची मागणी करणे निरोगी मनाचे लक्षण न्हवे.

लिंगनिरपेक्ष समानतेसाठी या पुरुषांसाठी एखादं ट्रेनिंग सेंटर उघडावं लागेल कदाचित

लिंगनिरपेक्ष समानता अपेक्षित असताना केवळ पूरूषच हवेत अशी मागणि करणे, म्हणजे कम्यूनीजमच होय.

अभिजीत राजवाडे's picture

19 Aug 2011 - 2:21 am | अभिजीत राजवाडे

मी या कवितेतल्या विचारांशी १०० टक्के सहमत आहे.

कवितेसाठी अभिनंदन.

यात अपमानकारक काहीच वाटत नाही.

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 2:26 am | प्रियाली

:)

राजेश घासकडवी's picture

19 Aug 2011 - 2:34 am | राजेश घासकडवी

छान विडंबन, पण थोडं सात्विक झालेलं आहे. गर्ल कॉमरेडरीकडून जरा अधिक जहाल, जळजळीत, चमचमीत येईल अशी अपेक्षा होती. म्हणजे मालवणी चिकन ची अपेक्षा असताना चांगली पण घरगुती मटकीची उसळ मिळावी असं वाटलं.

पुरुष हवे आहेत, सलमानसारखे वारंवार, जिथेतिथे शर्ट काढून फेकणारे,
जॉन अब्राहमसारखी पुढूनमागून शरीरयष्टी लाभलेले,
चट्टेरीपट्टेरी चड्डीतही हँडसम दिसणारे,
ठिगळांच्या बनियनमध्येही खुलून दिसणारे पुरुष हवे आहेत.

ही कविता पूर्ण करावी अशी विनंती करतो.

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 2:38 am | प्रियाली

मालवणी चिकन ची अपेक्षा असताना चांगली पण घरगुती मटकीची उसळ मिळावी असं वाटलं.

आज गुरुवार आहे. बुधवार-शनिवार वेगळा माल मिळतो. तशी मी बनवलेली मटकीची उसळही चविष्ट असते. एकदा टाकेन पाककृती. ;)

बाकीची कडवी लवकरच पूर्ण करेन.

धनंजय's picture

19 Aug 2011 - 2:42 am | धनंजय

टॉडाहँ नंतरच्या दोन ओळीत नापास झालेले, पण बाकी चाचण्यांत पास होणारे कोणी सापडल्यास यादी पाठवून द्या.

चुली फुंकणे आजकाल ग्लॅमरस आहे, पण त्यानंतर ही भांडी घासण्याची कटकट नकोशी आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 2:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एक डिश वॉशरही घेऊन टाका, हाय काय, नाय काय!

आनंदयात्री's picture

19 Aug 2011 - 2:55 am | आनंदयात्री

डिशवॉशर आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 2:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

होय, बरीच वर्ष आहे. आत्ता ऑफिसात गेलाय, नाहीतर दाखवला असता!

आनंदयात्री's picture

19 Aug 2011 - 3:00 am | आनंदयात्री

=)) खपलो !!

धनंजय's picture

19 Aug 2011 - 3:16 am | धनंजय

डिशवॉशरला डिशवॉशर हवा म्हणून तर यादी मागवली.

नावातकायआहे's picture

19 Aug 2011 - 11:04 pm | नावातकायआहे

खल्लास ! __/\__

चिंतातुर जंतू's picture

19 Aug 2011 - 3:09 am | चिंतातुर जंतू

हा हा हा! अरे देवा, काय दिवस आले आहेत! कुठे ते एके काळचे 'आजची खादाडी'सोबतच्या पुष्ट स्त्रिया आपल्या दमदार छातीवर लेवूनही त्यांच्या भाराने अजिबात न वाकणारे आमचे 'रीतीभातीचे' संकेतस्थळ अन कुठे हे आजकालचे उच्छृंखल बाजारू संकेतस्थळ. जगदंब जगदंब!!!

- स्मरणरंजनाने चिंतातुर जंतू

जाताजाता: याची आठवण झाली:

मला एक पुरुष हवा आहे!
या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे
बटणं सापडत नाहीत म्हणून
आरडाओरडा करून
घर डोक्‍यावर घेणारा,
आमटीला फोडणी खमंग पडली
म्हणून खुशालून जाणारा,
केसांतून बोटे फिरली की,
बाळ होऊन कुशीत घुसणारा
दमदार पावलांनी तिन्ही सांजेचा
केविलवाणा अंधार उधळून लावणारा
पुरुष हवा आहे
या घराला - एक आडदांड पुरुष हवा आहे
नाही हे मी म्हणत नाही
या भिंतीच म्हणून राहिल्यात केव्हापासून

अनुराधा पोतदार
(कॅक्‍टस फ्लॉवर या काव्यसंग्रहातून)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 3:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता का म्हणे उच्छृंखल बाजारू? "लुटा लुत्फ तिरामिसूचा, आजच्या हंक जॉनसोबत" असं काही लिहीलं की रीतभात येणार का?

शुचि's picture

19 Aug 2011 - 4:02 am | शुचि

३ बायका आनंद उपभोगत आहेत हे बघवणार कसं?
लगेच यांची संकेतस्थळं "बाजारू" होतात .... कपाळाला आठ्या चढतात. रीतभात बुडते.
इतर धाग्यांवर धांगडधिंगा चालतो ते बरीक चालतं.

चिंतातुर जंतू's picture

19 Aug 2011 - 4:25 am | चिंतातुर जंतू

"लुटा लुत्फ तिरामिसूचा, आजच्या हंक जॉनसोबत" असं काही लिहीलं की रीतभात येणार का?

तिरामिसू एकवेळ चालेल पण हंक जॉनऐवजी एखादा दाक्षिणात्य मिशाळ, केसाळ पुष्ट पुरुष लुंगीत दाखवलात तर 'जुनी' रीतभात पाळाल ;-)

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 4:30 am | प्रियाली

पुरुष हवा आहे, अध्येमध्ये लुंगी वर करून पोटाशी बांधणारा ;)

फोटो येथून साभार.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 4:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या मुच्छडांमधे तुम्हाला का हो एवढा रस?

'आमची आवड' काय आहे हे पण आता तुम्ही पुरूष आम्हाला सांगणार का? एटा चॉलबे ना।

चिंतातुर जंतू's picture

19 Aug 2011 - 4:44 am | चिंतातुर जंतू

'आमची आवड' काय आहे हे पण आता तुम्ही पुरूष आम्हाला सांगणार का?

मग? शेवटी प्रश्न रीतीभातीचा आहे आणि त्यामुळे संकेतस्थळाच्या इज्जतीचा पण! स्थळज्येष्ठ सदस्यांनीच रीतभात सोडली तर मग आपली महान संस्कृती आपलं वस्त्रहरण होताना कुणाचा धावा करील?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 5:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हो, पण रीतभात काय तुमच्यासारख्या संकेतस्थळकनिष्ठ सदस्यांनी आम्हाला सांगायचं होय? व्यक्तीला वस्तू बनवून त्यांचे फोटो टाकणे हीच इथली 'जुनी' रीतभात; जुन्या काळीही आम्ही हेच करत आलो आहोत. बाकी कसली संस्कृती आणि कसल्या वस्त्रहरणाच्या गोष्टी करता तुम्ही नवखे लोकं?

इथे सापडतील :)

लोक अन रितभात हितार्थ जनहीत मे जारी...

चित्रा's picture

19 Aug 2011 - 11:26 pm | चित्रा

बासरीवाला लुंगीतला पुरुष आणि त्याच्याभोवतालच्या मॉडर्न गौळणी बघून डोळे दिपले.

भारी...

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Aug 2011 - 12:55 pm | बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

19 Aug 2011 - 2:56 pm | श्रावण मोडक

हंक जॉनऐवजी एखादा दाक्षिणात्य मिशाळ, केसाळ पुष्ट पुरुष लुंगीत दाखवलात तर 'जुनी' रीतभात पाळाल

अच्छा! या आवडी माहिती नव्हत्या. ;)

चेतन सुभाष गुगळे's picture

23 Aug 2011 - 11:43 am | चेतन सुभाष गुगळे

हंक म्हणजे काय? असा प्रश्न मला पडला. इंग्रजी - मराठी शब्दकोशातले अर्थ पाहिले. ते खालीलप्रमाणे :-

hunk (हंक) - (पाव, मांस इ. चा) जाड तुकडा
hunker (हंकर) - उकिडवा बसणे, वाकणे
hunkers (हंकर्स) - शरीराचा पार्श्वभाग, जघन
hunks (हंक्स) - लहरी वृद्ध माणूस, कंजूष माणूस

जॉनविषयी हंक हे विशेषण वापरताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Aug 2011 - 9:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्बनडिक्शनरीच्या मताप्रमाणे:
१. An attractive male, usually with nice chiseled abs and a very sexy tan.
२. Extremely Hot Male Model.
Usually Tanned, Built, Tall, And Poses In Underwear.
अजूनही पाच अर्थ आहेत, ते लिंकवर वाचता येतीलच.

ऑक्सफर्ड शब्दकोषानुसारः
१. a large piece of something, especially food, cut or broken off a larger piece:
२. informal a large, strong, sexually attractive man

डिक्शनरी.कॉमच्या लिंकवर हे सापडलं.
१. a large piece or lump; chunk.
२. Slang .

  • a handsome man with a well-developed physique.
  • a large or fat person.

भाईकाकांचं 'खुर्च्या' ऐकल्यापासून इंग्लिश->मराठी शब्दकोष पहाणं मी सोडून दिलं.

चेतन सुभाष गुगळे's picture

23 Aug 2011 - 10:12 pm | चेतन सुभाष गुगळे

इतके सगळे अर्थ देऊन भाषाविषयक माझ्या सामान्य ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद. पण माझं कुतुहल कायम आहेच.

<< जॉनविषयी हंक हे विशेषण वापरताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे?>>

प्रियाली's picture

23 Aug 2011 - 10:45 pm | प्रियाली

जॉनविषयी हंक हे विशेषण वापरताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे?

अदितीला कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते माहित नाही पण मला वरील सर्व अर्थ एकत्रित करून जितका व्यापक अर्थ निघेल तो चालेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Aug 2011 - 10:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

छे, छे, हे भाषाविषयक ज्ञान नसून ही इंटरनेटच्या अधिक वापराविषयक माहिती आहे.

हां, आणि हंकचा मला अभिप्रेत असणारा अर्थ तोच जो माणसाचं सर्वात जास्त वस्तूकरण करणारा, अश्लील आहे तो!

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 4:27 am | प्रियाली

कुठे ते एके काळचे 'आजची खादाडी'सोबतच्या पुष्ट स्त्रिया आपल्या दमदार छातीवर लेवूनही त्यांच्या भाराने अजिबात न वाकणारे आमचे 'रीतीभातीचे' संकेतस्थळ अन कुठे हे आजकालचे उच्छृंखल बाजारू संकेतस्थळ. जगदंब जगदंब!!!

बरं! बरं! इतके नाराज होण्याचे काही कारण नाही. सर्वांचेच पोट भरेल अशीही व्यवस्था करता येईलच की.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 4:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वरच्या त्या जॉनच्या फोटोत काय हात दाखवून अवलक्षण आहे का काय?

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 4:38 am | प्रियाली

त्याचं असं झालं की हात बाईचा कशावरून असा तांत्रिक मुद्दा राजेशनी काढला. शिवाय प्रियालीचा धागा... कुणाचा हात अचानक, कुठून कोणाच्या खांद्यावर येऊन पडतो असे प्रश्न लोकांना पडायला नकोत म्हणून स्वच्छ आणि स्पष्ट फोटो दिला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 4:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

छ्या, जुन्या मालकांनी सोय केली आहे की! म्हणून टाक "ज्याची त्याची जाण, समज, इ.इ ...."! हाय काय नाय काय!!

तरी एक बरं केलंस हां, सल्लूचा टॉपलेस फोटोच टाकलास.

राजेश घासकडवी's picture

19 Aug 2011 - 8:17 am | राजेश घासकडवी

या पुरुषाने तर कानात रिंगा देखील घातलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या उपयुक्तपणात 'दागिने शेअर करता येणारा' ही भर पडली.

मयुरा गुप्ते's picture

19 Aug 2011 - 3:28 am | मयुरा गुप्ते

मस्त जमलिये कविता!

जबरदस्त विडंबन.

--मयुरा.

प्राजु's picture

19 Aug 2011 - 7:45 am | प्राजु

सॉल्लिड करमणूक होतेय.

संपादकीय सल्ला : मस्करीची कुस्करी होणार नाही याची काळजी घ्या.

अर्रर्र...
श्रावणात काय हे भलतेच!;)
त्यावर श्रावणच पाळतोय आम्ही असं म्हणू नका बुवा/बै!

मुक्तसुनीत's picture

19 Aug 2011 - 8:36 am | मुक्तसुनीत

या धाग्यातली कविता आणि प्रतिसादातले अन्य लिखित विनोद मी मनापासून एंजॉय केले. कवितेमधे (काहीशा मिष्किलपणे) व्यक्त झालेल्या पुरुषप्रतिमेबद्दल मी प्रस्तुत कवितेच्या कर्तीच्या मतांशी सहमती व्यक्त करतो.

मात्र , जॉन अब्राहम आणि/किंवा इतर पुरुषविशेष यांची इथल्या धाग्यावर लावलेली अर्धनग्न चित्रे म्हणजे "आजची खादाडी" आणि इतर प्रसंगी इथल्या संकेतस्थळावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या स्त्रियांच्या कमी अधिक कपड्यांमधल्या चित्रांना दिलेली दाद आहे असं समजायचं काय ?

माझ्यापुरतं बोलायचं तर मला कुणाही लिंगी व्यक्तीची तोकड्या कपड्यांमधली चित्रे आणि मुख्यम्हणजे त्यावर केलेल्या कमेंट्स हा प्रकार अत्युच्च अभिरुचीचा वाटत नाही.

अर्थात "हॉट ऑर नॉट" इत्यादि स्वरूपाच्या गोष्टींवर बंदी घालायची काहीच गरज नाही. सेक्स-व्हॉयलन्स-धार्मिक संवेदनशील मजकूर- वैयक्तिक टिकाटिप्पणी वगळता कुठल्याही अभिव्यक्तीवर कदापि बंदी घातली जाऊ नये या माझ्या (आजवर ठामपणे जोपासलेल्या) भूमिकेत जराही बदल मी करत नाही. उपरोक्त कुठल्याही "सेन्सॉरेबल" प्रकाराला वगळता बाकी कुणीही काहीही लिहो नाहीतर डकवो, त्यावर बंदी नाही आणि माझी हरकतही नाहीच.

प्रश्न व्यक्तींना, त्यांच्या शारिरीक अवयवांना वस्तुरुप देण्याचा आहे. आजवर "आजची खादाडी" टाईप स्त्रीदेहाला वस्तुरूप करणार्‍या प्रवृत्तींबरोबर माझी रुचिभिन्नता मी व्यक्त करत आलो. इथे डकवलेल्या चित्रांच्या संदर्भातसुद्धा ही रुचिभिन्नता व्यक्त करणे मी अपरिहार्य समजतो आणि त्याची इथे नोंद करतो.

सहज's picture

19 Aug 2011 - 8:48 am | सहज

आले किरवंत आपलं विचारजंत आपलं ... जाउ द्या....

प्रियाली's picture

19 Aug 2011 - 3:05 pm | प्रियाली

या धाग्यातली कविता आणि प्रतिसादातले अन्य लिखित विनोद मी मनापासून एंजॉय केले. कवितेमधे (काहीशा मिष्किलपणे) व्यक्त झालेल्या पुरुषप्रतिमेबद्दल मी प्रस्तुत कवितेच्या कर्तीच्या मतांशी सहमती व्यक्त करतो.

धन्यवाद. :)

याचबरोबर, अर्धनग्न कत्रिनाचे फोटो पाहून एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील किंवा रुचीहिनता वाटत असल्यास मी क्षमा मागते आणि गरज भासल्यास केवळ कत्रिनाचा फोटो संपादकांनी क्रॉप करून लावावा अशी मी विनंतीही करते.

तरीही असे नमूद करेनच की कत्रिनाने घातलेले कपडे आज पार्ट्यांमध्ये, अ‍ॅवार्ड सेरेमनीला आणि इतर सार्वजनिक प्रसंगात सर्रास घातले जातात. ते तोकडे असले तरी प्रचलित आहेत असे वाटते. तांत्रिक भाषेत तो फोटो अर्धनग्नही नाही कारण खांदे, हात आणि पाय दाखवणे याला अर्धनग्न म्हणता येत नाही असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.

मात्र , जॉन अब्राहम आणि/किंवा इतर पुरुषविशेष यांची इथल्या धाग्यावर लावलेली अर्धनग्न चित्रे म्हणजे "आजची खादाडी" आणि इतर प्रसंगी इथल्या संकेतस्थळावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या स्त्रियांच्या कमी अधिक कपड्यांमधल्या चित्रांना दिलेली दाद आहे असं समजायचं काय ?

प्रश्नाचे उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलेले आहे. एखादी गोष्ट विनाकारण आणि वेळोवेळी होत गेली की ती उबगवाणी ठरते. मिपावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या चित्रांना आणि एखादे वेळी आलेल्या या धाग्याला एका पारड्यात तोलू नये ही विनंती. (तोट्याचा सौदा आहे. वजन सारखे भरणे केवळ अशक्य.)

प्रश्न व्यक्तींना, त्यांच्या शारिरीक अवयवांना वस्तुरुप देण्याचा आहे. आजवर "आजची खादाडी" टाईप स्त्रीदेहाला वस्तुरूप करणार्‍या प्रवृत्तींबरोबर माझी रुचिभिन्नता मी व्यक्त करत आलो. इथे डकवलेल्या चित्रांच्या संदर्भातसुद्धा ही रुचिभिन्नता व्यक्त करणे मी अपरिहार्य समजतो आणि त्याची इथे नोंद करतो.

मला वाटतं तसा उद्देश नव्हता पण चिंजंच्या प्रतिसादातून तशी गंमत केली गेल्याने इतरांनीही त्याला प्रतिसाद दिला असे वाटते. रुची ही रोज एकसारखी ठेवून भागत नाही, कधीतरी रुचीपालट करावा लागतो तसेच हे असावे. परंतु, रुचीपालट हा ही एखादेवेळेसच होतो यावरही विश्वास ठेवावा.

माझ्यापुरतं बोलायचं तर मला कुणाही लिंगी व्यक्तीची तोकड्या कपड्यांमधली चित्रे आणि मुख्यम्हणजे त्यावर केलेल्या कमेंट्स हा प्रकार अत्युच्च अभिरुचीचा वाटत नाही.

मला वाटतं आलेल्या कमेंट्स अतिशय साध्या आहेत. या संकेतस्थळाने वेळोवेळी यापेक्षा मोठ्या कमेंट्स आणि कॉम्प्लिमेंट्स (वहिनीपासून आयटम बॉम्ब) रिचवल्या आहेत आणि "हिक्क" सुद्धा केलेले नाही.

कत्रिनाच्या कपड्यांबद्दल उहापोह झाला आहेच, आता जॉन आणि सल्लूकडे वळू. त्यांनी कपडे न घालणे हा अभिरुचीचा प्रकार नसून आपल्या संस्कृतीचा प्रकार आहे. मिपाच्या उजवीकडे उघडे ज्ञानेश्वर महाराज बसले आहेत. त्यांच्या फोटोवर कोणी आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. (कृपया, ज्ञानेश्वर आणि जॉन यांच्यातील समान धागा केवळ "पुरुष" एवढाच आहे असे समजावे. बाकी, समानता नसावी.)

खालील फोटोवर कोणी आक्षेप घेईल असे वाटत नाही. येथेही खालचे पुरुष अर्धनग्न आहेत.


तुमच्या तरुण/लहानपणी हा फोटो घरात लावला होता का? तुमच्या नसला तरी इतर अनेकांच्या असेल -

सांगायचा मुद्दा एवढाच आहे की पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही आमची संस्कृती आहे. त्यात अभिरुचीहीनतेचा संबंध नाही परंतु कत्रिनाच्या अर्धनग्न नसलेल्या पण एखाद्याला तसे वाटू शकते टैप फोटोबद्दल मी माफी मागायला तय्यार आहे. :) पण अगदी त्याच फोटोसारखा राधाकृष्णाचा फोटो (जवळपास तेवढ्याच कपड्यांतला) माझ्या घरात विराजमान आहे असे नमूद करते.

From Untitled Album

* फोटो विविध संकेतस्थळांवरून घेऊन येथे लावले आहेत. ते मी काढलेले नाहीत.

मृत्युन्जय's picture

24 Aug 2011 - 4:11 pm | मृत्युन्जय

पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही आमची संस्कृती आहे. त्यात अभिरुचीहीनतेचा संबंध नाही परंतु कत्रिनाच्या अर्धनग्न नसलेल्या पण एखाद्याला तसे वाटू शकते टैप फोटोबद्दल मी माफी मागायला तय्यार आहे

आम्ही स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते आहोत ;)

चतुरंग's picture

19 Aug 2011 - 8:46 am | चतुरंग

पुढचा सगळा दंगा वाचून चमचमीत अंडाकरी ओरपल्यासारखं वाटतंय! ;)

(माजीडायपरचेंजर+डिशवॉशर+पुजारी+रामागडी) रंगा

रमताराम's picture

19 Aug 2011 - 9:55 am | रमताराम

अगदी ठाकरी शैलीतील रोकठोक कविता आवडली.

आमचीही प्रेरणा पुरुषच
हे पहिले वाक्य वाचून 'अखेर सरकार नमले' की काय अशी क्षणभर भीती वाटली. मग 'लिंक' लागली.

ऋषिकेश's picture

19 Aug 2011 - 10:02 am | ऋषिकेश

कंसातल्या पुरुषांची कविता आणि चर्चा आवडली :)

मन१'s picture

20 Aug 2011 - 3:37 pm | मन१

विडंबन आणि प्रतिक्रिया भन्नाट. विडंबन ज्या मूळ कवितेचे आहे, त्याबाबत श्रीमती आदितींशी सहमत.

आनंदयात्री's picture

21 Aug 2011 - 6:58 pm | आनंदयात्री

सेक्सिस्ट .. सेक्सिस्ट !!

विनायक प्रभू's picture

19 Aug 2011 - 12:43 pm | विनायक प्रभू

ह्या विषयावर कविता अपेक्षित.
कोण घेतोय पुढाकार?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Aug 2011 - 3:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'स्त्री हवी आहे' असा विषय घेऊन आपणच पुरुषांना हव्या असलेल्या अपेक्षित स्त्री बद्दलच्या भावना समृद्ध अनुभव किंवा कल्पनेच्या साह्याने मांडू शकाल असे वाटते. लेखन गद्य असले तरी त्याला आम्ही पद्य म्हणून वाचू त्याची कल्जी करु नये. :)

सर, लेखनासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे
(सरांचा विद्यार्थी)

गणेशा's picture

19 Aug 2011 - 3:45 pm | गणेशा

प्र.का.टा.आ.