✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रिय कॅटरीना,

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 07/21/2011 - 12:23  ·  लेख
लेख
प्रिय कॅटरिना, सर्वप्रथम म्हणजे तू सुरेख दिसतेस आणि माझ्यासारख्या बर्‍याच जणाना तुझं रुपडं आवडतं हे आवर्जून सांगतो. ते असो. परवा बाकी बेटा (तुला बेटा म्हणू का? आता मी चाळीशी पार केली आहे त्यामुळे तेच मला शोभून दिसेल!) :) कुठल्याश्या वृत्तवहिनीशी बोलताना तू स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन आहेस हे तू अगदी बिनदिक्कत सांगितलंस. शिवाय त्यात काही लपवण्यासारखं नाही हेही मनमोकळेपणाने सांगितलंस. पण हे बोलताना उदाहरण म्हणून तू राहूल गांधीचं नाव घेतलंस ती मात्र एक मज्जाच केलीस. त्याकरता सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन..! :) राहूल गांधीही जन्माने अर्धाच भारतीय आहे हे सत्यही तू अगदी निरागसपणे सांगितलंस त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटलं. परंतु जे लाचार काँग्रेसवाले भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहात आहेत त्याच्याच जन्माला आणि पर्यायाने पंचाला तू हात घातलास, ही गोष्ट कुणा चाणाक्षाने तुझ्या लक्षात आणून दिली असावी; :) आणि भलतीच भानगड नको म्हणून तू राहूलबाबत केलेल्या विधानावर नंतर माफी मागून मोकळीही झालीस..! पण मला सांग बेटा, तू काय चुकीचं बोललं होतीस? राहूलची माय जन्माने भारतीय नसून इटालियन आहे त्यामुळे राहूलही पूर्णत: भारतीय नाही हे सत्य आहे. मग तुला माफी मागायची गरज काय? झाला असता की जरा मस्तपैकी गह्जब! :) आणि बेटा, उद्या तशीच जर वेळ आली असती तर आम्ही सारे भारतीय तुझ्या पाठीशी होतोच की..! :) असो.. यातून मला वैयक्तिकरित्या इतकंच सांगायचं आहे की ज्या व्यक्ति आणि त्यांचे आईवडील हे जन्माने पूर्णत: भारतीय असतील त्याच व्यक्तिंना भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधीपक्ष नेता आणि तीनही सैन्यातील प्रमूखपद इत्यादी पदे भुषवता येतील..! सबब, बेटा कॅट, तुला विनंती की तुझं विधान मागे घेऊ नकोस आणि त्याकरता कुणाची माफी वगैरेही मागू नकोस... बाकी कसं चाल्लय बेटा? कुणाशी नव्याने काही सूतबीत जमवलंस की नाही?! :) तुझा, तात्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राजकारण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
बातमी
प्रतिक्रिया
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
57468 वाचन

💬 प्रतिसाद (173)

प्रतिक्रिया

काय तात्या, चक्क बेटा म्हणताय

पाषाणभेद
गुरुवार, 07/21/2011 - 12:28 नवीन
काय तात्या, चक्क बेटा म्हणताय तुम्ही. जुने दिवस विसरलात काय? धमाल मजा यायची दररोज वेगवेगळी डिश खातांना.
  • Log in or register to post comments

सबब, बेटा कॅट, तुला विनंती की

आत्मशून्य
गुरुवार, 07/21/2011 - 12:34 नवीन
सबब, बेटा कॅट, तुला विनंती की तुझं विधान मागे घेऊ नकोस आणि त्याकरता कुणाची माफी वगैरेही मागू नकोस...
सहमत, खोटं ते काय बोलली ? उलट तिला इतकेच म्हणायचे होते जस राहूलला भारतीय लोक राजपूत्र मानतात आपलंच समजतात, तसंच मलासूध्दा तितकच भारतीय समजावं भारताशी निगडीत समजावं.. यात चूक ते काय ? अनं माफी ती कसली मागायची ? जर सत्यच बोललं असेल तर ?
  • Log in or register to post comments

+१

सुनील
गुरुवार, 07/21/2011 - 12:38 नवीन
उलट तिला इतकेच म्हणायचे होते जस राहूलला भारतीय लोक राजपूत्र मानतात आपलंच समजतात, तसंच मलासूध्दा तितकच भारतीय समजावं भारताशी निगडीत समजावं सहमत! मग भले बॉलिवूडात इतकी वर्षे काढून हिंदीचा गंध का नसेना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

लॉजिक गंडलेय...

पंगा
गुरुवार, 07/21/2011 - 12:40 नवीन
पण मला सांग बेटा, तू काय चुकीचं बोललं होतीस? राहूलची माय जन्माने भारतीय नसून इटालियन आहे त्यामुळे राहूलही पूर्णत: भारतीय नाही हे सत्य आहे. मग तुला माफी मागायची गरज काय? झाला असता की जरा मस्तपैकी गह्जब! :)
माफ करा, तात्यासाहेब, पण त्याच न्यायाने आपणही जन्माने अर्धेच पुरुष आहात असे म्हणावे लागेल. पहा विचार करून.
  • Log in or register to post comments

माफ करा, तात्यासाहेब, पण

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/21/2011 - 12:43 नवीन
माफ करा, तात्यासाहेब, पण त्याच न्यायाने आपणही जन्माने अर्धेच पुरुष आहात असे म्हणावे लागेल.
सहमत आहे. जगात पूर्णपुरुष फक्त दोनच होऊन गेले कृष्ण आणि अर्जुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

अरे बापरे!

पंगा
गुरुवार, 07/21/2011 - 12:47 नवीन
जगात पूर्णपुरुष फक्त दोनच होऊन गेले कृष्ण आणि अर्जुन.
वरील लॉजिकने या विधानास काही अत्यंत चमत्कारिक अशी इंप्लिकेशन्स आहेत, एवढेच सुचवू इच्छितो. (समझने वाले को इशारा काफ़ी| ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

गप्प बसा की पंगा शेठ

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/21/2011 - 12:50 नवीन
गप्प बसा की पंगा शेठ :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

पूर्णपुरुष :)

अजातशत्रु
गुरुवार, 07/21/2011 - 13:59 नवीन
ते हि जगात?
जगात पूर्णपुरुष फक्त दोनच होऊन गेले कृष्ण आणि अर्जुन.
महापुरुष म्हणायचे आहे का? . . . . . . . . उरलेले इतर कोण? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

उरलेले इतर कोण? आपण खरंच इतके

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/21/2011 - 14:11 नवीन
उरलेले इतर कोण?
आपण खरंच इतके ढ आहात का तसे दाखवता ? दोनच होते असे सांगून वर त्यांची नावे दिल्यावर वरती पुन्हा 'उरलले कोण ?' हा मंद प्रश्न तुम्ही विचारुच कसे शकता ? तुम्हाला पूर्णपुरुष आणि महापुरुष ह्यातला फरक निदान माहिती असावा अशी अपेक्षा होती. असो... @..टिंनपाटपत्रु..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

अपेक्षाभंग?

अजातशत्रु
गुरुवार, 07/21/2011 - 15:41 नवीन
तुम्हाला पूर्णपुरुष आणि महापुरुष ह्यातला फरक निदान माहिती असावा अशी अपेक्षा होती.
तुमचा अपेक्षाभंग झाल्याबद्दल दिलगिर आहोत. ©º°¨¨°º© भाकडकथेतील बालकुमार ©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

फरक सांगुनच टाका

शाहिर
गुरुवार, 07/21/2011 - 18:00 नवीन
अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे नव्हती म्हणुन त्यांस पूर्णपुरुष म्हणायचे.. अशी माझी माहीती आहे .. भगवान कृष्णा बद्दल माहीती नाही ...कृपया असेल तर सांगावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां

गणपा
गुरुवार, 07/21/2011 - 18:09 नवीन
अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे नव्हती
*याला पुरावा काय? * याला म्हणजे या विधानाला शाहिरांना नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

शोभता का हे गणपा?

Nile
गुरुवार, 07/21/2011 - 18:22 नवीन
काय हे गणपाभौ? कशाला खाजगी प्रश्न विचारता आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां

आत्मशून्य
गुरुवार, 07/21/2011 - 22:58 नवीन
अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे नव्हती
अर्जुनाला असामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे होती असं सरळ सरळ म्हणा ना राव लोकं कन्फ्यूज होत्याल. त्याचे हात लांबीला गूड्घ्यापर्यंत पोचत असही ऐकलं होतं. बाकी व्हाय सामान्य पूरूषा निड टिट्स इज येट अन स्वाल्ड मिस्ट्री होय ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

तुम्हाला हवं म्हणूनच तुम्हाला

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/21/2011 - 23:13 नवीन
तुम्हाला हवं म्हणूनच तुम्हाला अनेक अवयव असतात असं नाही. आता पर्‍यासारख्या काही लोकांना नाही का गरजेपेक्षा अधिक अक्कल असते, पण ती काढता येत नाही. थोडं डार्विन, डॉकीन्स वगैरे वाचा म्हणजे ऑपॉप प्रश्नाचं उत्तर समजेल.
अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे नव्हती
जीवशास्त्र आणि व्याकरणदृष्ट्या हेच वाक्य योग्य वाटत आहे. अर्जुनाचं काय ते माहित नाही. करणला विचारलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

मुख्य विषयावर या लोकहो...

योगप्रभू
Fri, 07/22/2011 - 00:54 नवीन
कॅटऐवजी लोक अर्जुनाची स्तनाग्रे बघायला का जाताहेत, हे समजत नाही. (म्हणजे मला म्हणायचंय की, विषय कॅटचा चालला असताना एकदम वेगळी चर्चा कशासाठी?) -एक भोळाभाबडा प्रश्न-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

यो मॅन, ज्याची त्याची आवड हे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/22/2011 - 19:10 नवीन
यो मॅन, ज्याची त्याची आवड हे विसरू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

अगं काय हे? हसून पुरेवाट. काय

रेवती
Fri, 07/22/2011 - 19:18 नवीन
अगं काय हे?;) हसून पुरेवाट. काय रे बाबा! धागा कोणता, विषय भरकटत कुठे गेलाय.... कॅटने माफी मागून विषय संपवला तो याकरताच!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

काय हे म्हणजे?

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/22/2011 - 19:21 नवीन
काय हे म्हणजे? त्या कत्रिनाने काय दाखवलं, नाही दाखवलं आपल्याला कशाला फरक पडला पाहिजे? असेल तिची फिगर बरी, आपल्याला काय त्याचं, नाही का? अदितीताई अवखळकर पाटील संस्थापक, गर्ल कॉमरेडरी, मिसळपाव.कॉम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

खी खी तिचा शीला की जवानी नाच

रेवती
Fri, 07/22/2011 - 19:51 नवीन
खी खी तिचा शीला की जवानी नाच पाहून मला काही वाटलं नाही हे नमूद करू इच्छिते.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हे नमुद करणं 'जाता जाता:' असं

धमाल मुलगा
Fri, 07/22/2011 - 19:53 नवीन
हे नमुद करणं 'जाता जाता:' असं करायचं असतं हो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ओह्हो! आले का महाराज

रेवती
Fri, 07/22/2011 - 20:00 नवीन
ओह्हो! आले का महाराज लुडबुडायला! केळीच्या पानाची रेशिपी नसते हे तरी जाता जाता सांगते.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

तू कत्रिनाकडे करतेस तसं

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/22/2011 - 20:20 नवीन
तू कत्रिनाकडे करतेस तसं दुर्लक्ष कर गं धम्याकडे! नुस्ता रेसिप्या मागतो आणि स्वतः काही करत नाही हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हा हन्त हन्त!

धमाल मुलगा
Fri, 07/22/2011 - 20:46 नवीन
ज्याचे करावे भले...... ह्हंऽऽ.. असो! >>केळीच्या पानाची रेशिपी नसते हे तरी जाता जाता सांगते असते. आमच्या इकडल्या इंडियन स्टोअरमध्ये मिळणार्‍या पा.कृ.च्या पुस्तकात मी स्वतः पाहिलीए. थ्यांक्सगिव्हिंगच्या वेळी करतात स्पेशली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हो हो

सूड
Fri, 07/22/2011 - 20:53 नवीन
हो हो त्यात धमु ने लिहीलेली सुरळीच्या वड्यांची रेसिपी पण होती. काय छान लिहीलं होतं ....एक सुरळी घ्यायची आणि तिच्या वड्या पाडायच्या... हाकानाका..:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आहेच आमचा धमु हुशार, वाटलं

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/22/2011 - 20:54 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed. आहेच आमचा धमु हुशार, वाटलं काय तुम्हाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आला आता हाही! आत्ता प्रतिसाद

रेवती
Fri, 07/22/2011 - 21:01 नवीन
आला आता हाही! आत्ता प्रतिसाद देतानाचं धैर्य दाखवण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी कुठं जातं? आता ठरलं. पुढच्या अठवड्यात कॅटरिनाला (ही शिनेमातली नटी नव्हे.....कॅटवॉक करणारी रिना नावाची मुलगी आहे) बघण्याच्या कार्यक्रम ठरवलाय्.......तू सुरळीच्या वड्या करायच्यास. धम्याच्या नादी लागू नकोस्.....त्याचं लग्न झालय. तू तुझं भलं पहा बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तीऽऽऽ !!

सूड
Sat, 07/23/2011 - 00:17 नवीन
तीऽऽऽ !! मंगळीऽऽ !! रेवतीआज्जी काय ते जपून ठरव, जी मला आवडल्ये ती परदेशस्थ नाही म्हणून तू नकार देत्येस. कसं होणार माझं.... :D -जपून कार्य कर ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

श्या! हसून हसून दमले बुवा!

रेवती
Sat, 07/23/2011 - 01:43 नवीन
श्या! हसून हसून दमले बुवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जपुन कार्य करते =)) =)) =))

प्रीत-मोहर
Sat, 07/23/2011 - 10:28 नवीन
जपुन कार्य करते =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तिचा शीला की जवानी नाच पाहून

परिकथेतील राजकुमार
Sat, 07/23/2011 - 11:36 नवीन
तिचा शीला की जवानी नाच पाहून मला काही वाटलं नाही हे नमूद करू इच्छिते.
ओक्के ! रंगाकांकांचे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

या या या महिला आघाडीचीच कमी

गणपा
Fri, 07/22/2011 - 20:11 नवीन
या या या महिला आघाडीचीच कमी होती इथे. अदिती और रेवती बस दोनोही काफि है. आता डब्ब्ल शेंचुरी नक्की. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

याचाच अर्थ माझी बिघलेली

रेवती
Fri, 07/22/2011 - 20:29 नवीन
याचाच अर्थ माझी बिघलेली रेशिपी येणार आहे लौकरच! तुझा प्रतिसाद गृहित धरलाय हो गण्या! तेवढी जरा केळीची पानं पाठवून दे बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

रेशिपी म्हटली की आपला

गणपा
Fri, 07/22/2011 - 20:46 नवीन
रेशिपी म्हटली की आपला प्रतिसाद आलाच समज. ( आपल काय ठरलय? मी तुझ्या धाग्याचा टिरापी वाढवायचा अन तु माझ्या. ) ;) बाकी एकच पान काय आख्खी बाग पाठवतो. पत्ता व्यनी कर. :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

थ्यँक्स हा गण्स

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/22/2011 - 20:47 नवीन
थ्यँक्स हा गण्स! ;-) आता तू स्वयंपाकाची आघाडी सांभाळल्यावर डबल सेंच्युरीची आघाडी आम्हाला नको का सांभाळायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

का बे गणपा.. पा़कृ सोडुन बाकी

अर्धवट
Sat, 07/23/2011 - 06:20 नवीन
का बे गणपा.. पा़कृ सोडुन बाकी धाग्यावर हल्ली अंमळ जास्ती वेळ घालवायला लागलाय जणू.. फोकस करा की जरा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो अर्धवट, गणपा मिपावरचा

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 07/23/2011 - 09:03 नवीन
अहो अर्धवट, गणपा मिपावरचा बाब्या आहे. त्याने काही केलं तरी आम्ही ते उचलूनच धरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

अर्जुन vs एकलव्य

अजातशत्रु
Fri, 07/22/2011 - 12:47 नवीन
अर्जुनाला असामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे होती असं सरळ सरळ म्हणा ना राव लोकं कन्फ्यूज होत्याल. त्याचे हात लांबीला गूड्घ्यापर्यंत पोचत असही ऐकलं होतं. बाकी व्हाय सामान्य पूरूषा निड टिट्स इज येट अन स्वाल्ड मिस्ट्री होय ना ?
त्याचे हात कुठेही पोहोचोत, पण त्याच्या पेक्षा एकलव्यच श्रेष्ठ होता, बिचार्‍याचा अंगठा कापुन घेण्यात आला..नाहितर.......... -अ बीटर ट्रुथ दॅट नो वन वॉन्ट्स टू स्पिक अवांतरः या धाग्यावर अवांतर चर्चा नको, म्हणून इथेच थांबत आहे, वर पुर्णपुरुष असा उल्लेख आला होता, त्या बद्दलची तुकडा माहिती बाहेर आली,ते स्पष्ट व्हावे इतकेच त्या मागचा अंत्यस्थ हेतू होता, बाकि चालू द्या...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

वेगळे वळण?

सुनील
Fri, 07/22/2011 - 12:48 नवीन
बिचार्‍याचा अंगठा कापुन घेण्यात आला चर्चा आता वेगळे वळण घेणार काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

>>चर्चा आता वेगळे वळण घेणार

मनराव
Fri, 07/22/2011 - 12:51 नवीन
>>चर्चा आता वेगळे वळण घेणार काय?<< अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं राहिलं मागे.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/22/2011 - 13:00 नवीन
अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं राहिलं मागे.........
आले का आणले ? अंगठा कापून घेतला म्हणणारे जाती पातीच्या राजकारणाने अंध झालेले असतात त्याला काय करायचे :) द्रोणाचार्यांनी अंगठा मागितला ह्याचा अर्थ त्या अंगठ्याचा वापर धनुर्विद्येत न करण्याचे आश्वासन मागितले. पण द्रोणाचार्य पडले ब्राह्मण, आणि आम्ही तर आमचे आयुष्य ब्राह्मणद्वेषाला वाहून घेतले आहे :) आमची लायकी नाही, सवलती-आरक्षण मिळून शिक्षणात गती नाही, नोकरीत कुत्रे विचारत नाही आणि गल्लीत मुली विचारत नाहीत मग आम्ही बामणांच्या नावानी खडे फोडतो आणि स्वतःचे कमीपण झाकून टाकतो. मग ब्राह्मण स्वकर्तूत्वा वरती वर गेला हे मान्य न करता आम्ही आमच्या डोक्यावर पाय देउन तो वर गेला असे गळे काढतो आणि आमचे अपयश झाकतो. मग मिळेल तिथे आम्ही आमची गरळ बाहेर काढतो. काय हरकत हाय काय तुमची ? बामणशत्रु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

>>द्रोणाचार्यांनी अंगठा

नितिन थत्ते
Fri, 07/22/2011 - 13:27 नवीन
>>द्रोणाचार्यांनी अंगठा मागितला ह्याचा अर्थ त्या अंगठ्याचा वापर धनुर्विद्येत न करण्याचे आश्वासन मागितले. हे इंटरप्रिटेशन नवीन (मी आधी न वाचलेले) आहे. अर्थात असे इंटरप्रिटेशन केले तरी द्रोणाचार्य लगेच दोषमुक्त होत नाहीत. "अंगठा कापून मागणे" आणि "अंगठा धनुर्विद्येत न वापरण्याचे आश्वासन मागणे" यात फक्त तांत्रिक फरक आहे. आवडत्या (उच्चवर्णीय) शिष्याला वाचवण्याची (आणि त्यासाठी कनिष्ठ वर्णीयाचा बळी देण्याची) वृत्ती तशीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

इंटरप्रिटेशन नवीन (मी आधी न वाचलेले) आहे

अजातशत्रु
Fri, 07/22/2011 - 13:45 नवीन
यात आश्चर्य ते काय थत्ते साहेब चालायचच, ;) तरी मी हा असा तुमच्यासारखा उल्लेख केला नाही - आवडत्या (उच्चवर्णीय) शिष्याला वाचवण्याची (आणि त्यासाठी कनिष्ठ वर्णीयाचा बळी देण्याची) वृत्ती आहे. पण ते म्हणतात ना खाईल त्याला खवखवे, ज्यांना जिकडे तीकडे द्वेषच दिसतो, त्यांना असे अकलेचे तारे तोडण्यात असूरी आनंद मिळत असतो, . . {अंगठे बहाद्दर}
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

>>हे इंटरप्रिटेशन नवीन (मी

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 07/22/2011 - 14:40 नवीन
>>हे इंटरप्रिटेशन नवीन (मी आधी न वाचलेले) आहे. गो नि दांडेकरांचे महाभारत वाचा. त्यात असा स्पष्ट उल्लेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अर्थात असे इंटरप्रिटेशन केले

अप्पा जोगळेकर
Tue, 07/26/2011 - 21:21 नवीन
अर्थात असे इंटरप्रिटेशन केले तरी द्रोणाचार्य लगेच दोषमुक्त होत नाहीत. आणि एकलव्यसुद्धा दोषमुक्त होत नाही. व्यवहारशून्य पढतमूर्ख आणि एकलव्य यांना एकाच तागडीत तोलायला हरकत नसावी. अर्थात एकलव्याने राजीखुशीने हे केले की जबरदस्तीने त्याचा अंगठा तोडला गेला (जे झालेले असणे परफेक्टली पॉसिबल आहे) हे ठाऊक नाही. तसे असल्यास एकलव्याला 'व्यवहारशून्य' ऐवजी 'असहाय्य' म्हणावे लागेल. आवडत्या (उच्चवर्णीय) शिष्याला वाचवण्याची (आणि त्यासाठी कनिष्ठ वर्णीयाचा बळी देण्याची) वृत्ती तशीच आहे. असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं

अजातशत्रु
Fri, 07/22/2011 - 13:43 नवीन
तुम्हि स्वतःच्या अकलेचे तारे तोडण्यात लय हुशार आहात, डबक्यात राहणार अन् विचारहि तसेच साजेसे करणार तुम्हि, मि कोण आहे मला आरक्षण मिळते/घेतले का नाहि, या गोष्टी माहित नाहित तुम्हाला, त्या इथे सांगून उपयोगाचेहि नाही. इतकच सांगतो मी वेलसेटेल्ड आहे.बाकिच्या गोष्टि जाणून घेण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी प्रत्यक्ष भेटच घ्या आणि आपआपले कंड शमवा. {द्वेषकथेतिल खाजकुमार}
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

प्रत्यक्ष भेटच घ्या आणि

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/22/2011 - 13:47 नवीन
प्रत्यक्ष भेटच घ्या आणि आपआपले कंड शमवा.
Image removed. Image removed. तुमच्या वेलसेटल्डचे रहस्य हे आहे होय ? चान चान पण आम्हाला असले नवाबी शौक नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

प्रत्यक्ष भेटच घ्या आणि

अजातशत्रु
Fri, 07/22/2011 - 13:56 नवीन
इतक्या खालच्या पातळीवर आम्ही उतरत नाही, आमच्या बोलण्याचा अर्थ असा काढलात यावरुन तुम्हालाच त्यात भारी रस दिसतोय हे स्पष्ट आहेच, :) यासाठि एखादा पठान बघा, ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

यासाठि एखादा पठान बघा तुम्ही

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/22/2011 - 15:56 नवीन
यासाठि एखादा पठान बघा
तुम्ही बघितला आहेत तेवढा पुरे की. आम्हाला काय असे उद्योग करुन वेलेसेटेल्ड व्हायचे नाहीये .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

पर्‍या पर्‍या पर्‍या, यासाठी

llपुण्याचे पेशवेll
Wed, 07/27/2011 - 11:24 नवीन
पर्‍या पर्‍या पर्‍या, यासाठी आपल्याकडून एक ट्रीट तुला. :) (पर्‍याला इतिहास रीरायटींगसाठी ओसरी देणारा) पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा