आता नवजीवनाची बरसात होणार ... भाग ५वा ....

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
7 Jun 2011 - 1:31 pm

मित्र हो,
उन्हाळा संपून गेला... आता नवजीवनाची बरसात होणार ... पुन्हा पालवी फुटून तरुतळांना तरारी येणार. तसाच नाडीग्रंथांना कथनाची पुन्हा उभारी येणार म्हणून ...

नाडी भविष्य पहायला गेलेला व्यक्ती मूर्ख वा भोळसट नक्कीच नसतो...
आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

प्रेषक – जी. ईश्वरन पुण्यातील नाडी केंद्राचे संचालक.

रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात होते माझे (ईश्वरनजींचे) स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे.

५. प्रश्न - मी आपणांकडून हे जाणून घेऊ इच्छितो की तुम्ही म्हणता की तुमचा भूतकाळ त्यांनी अगदी १०० टक्के तंतोतंत सांगितला. त्याने तुमच्या कडून सर्व माहिती कशी काढून घेतली (थोडक्यात तुम्ही त्याच्या खोटेपणाला कसे उघडे पाडू शकला नाहीत) त्याचे तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? आपल्या लेखात याचे उत्तर मिळत नाही.
उत्तर – वस्तुस्थिती अशी आहे की आपण माझा लेख अत्यंत काळजीपुर्वक वाचलेला नाही.(श्री. प्रेमानंदांनी रिसबुडांनी आपला लेख नीट काळजीपुर्वक वाचलेला नाहीत असे लेखात आधुनमधून फटकारले आहे. त्यातलाच हा एक उल्लेख)
ती अशी -
१. नंतर असे लक्षात आले की कुंडल्यांवर आमची व आमच्या आई-वडिलांची नावे लिहिलेली होती. अन्य माहिती गर्भित (सटल) प्रश्न विचारून मिळवली गेली.
२. काही प्रश्न विचारून त्यांची उत्तरे मिळवल्यावर तो (नाडीवाचक) आत गेला.त्याने एक (सुटी) ताडपट्टी आणली. (म्हणजे प्रश्न विचारते वेळी वाचल्या गेलेल्या माळेसारख्या दोरीने ओवून बंद केलेल्या ताडपट्टयांच्या व्यतिरिक्त) आणि त्यातून त्याने आमचे भूतकाळाचे वर्णन वाचले जे १०० टक्के सत्य होते.
३. सत्यता ही आहे की नाडीकेंद्रातर्फे काही लोक पेरून ठेवलेले असतात त्यांनी व नाडीपट्या शोधायसाठी नाडीवाचकाने विचारलेल्या प्रश्नातून सर्व माहिती मिळवली जाते. नंतर त्या आधारे नाडीपट्टी बनवून वाचली जाते. चुकीची उत्तरे दिली गेली तर भविष्य कथन ही चुकेल. तुम्ही दुसऱ्याची पत्रिका आपली म्हणून दिलीत तर भविष्यकथन तुमच्याकडून काढलेल्या माहितीच्या आधारे होईल ना की त्या पत्रिकेच्या आधारावरून. आपले नाव व व्यवसाय सोडता जी बरीचशी माहिती सांगितली जाते ती त्या ताडपट्टीवर नसणार. जे भविष्य कथन म्हणून केले जाते ते ढोबळमानाने सर्वांना लागू पडेल असेच असते.

माझी (ईश्वरनजींची)प्रतिक्रिया –
3. याचे साधे व सोपे कारण असे आहे की श्री. प्रेमानंदांनी वर सुचवलेला पर्याय नाडी पट्टया ऑर्डर प्रमाणे आत खोलीत बसून तयार केल्या जातात वगैरे सर्व अत्यंतिक कल्पनाविलास आहेत.....
भाग ४ समाप्त ... भाग ५ पुढे चालू...

. नाडीकेंद्रातील वाचक फक्त नाडीपट्टयातील मजकूर वाचू शकतात. त्यांना तो मजकूर कोरुन लिहिता येत नाही असे ते स्वतः प्रांजळपणे वेळोवेळी कबूल करतात. पण श्री. प्रेमानंदांसारखे लोक आपले तर्क खरे आहेत असे भासवण्याकरता त्यांना जबरदस्तीने ताडपट्ट्यात कोरून लेखनकरण्याच्या कार्यातील तज्ञ मानतात! श्री. प्रेमानंदांना ते ताडपट्टया लिहित असतात असे जर वाटत होते तर त्यांनी नाडी केंद्रवाल्यांना आत जाऊन पकडले का नाही त्यामुळे पुराव्याशिवाय बोलण्यात काय मतलब आहे?
४. या संदर्भात एक नाडी केंद्रचालक व नाडीपट्टयांचा सांभाळकरणारा म्हणून मी यावर प्रकाश टाकू शकतो. जेथे नाडी पट्टया ठेवल्या जातात त्या खोलीत अन्य कोणाला प्रवेश दिला जात नसला तरी तेथे काय असते व काय चालते याचा खुलासा माझ्यासारखा नाडी केंद्रसंचालकच करू शकतो. त्या खोलीत गुप्तपणे लिखाण वगैरे काहीही चालत नाही. पुण्यासारख्या शहरात गेली १०-१२ वर्षे नाडी केंद्रचालवणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तिचे जबाबदारीपुर्वक हे लेखन आहे याचे भान ठेऊन मी जे सांगतो त्याचे महत्व वाचकांनी जाणावे. कोणत्याच नाडीकेंद्रातून असे लपवून नव्या ताडपट्ट्या तयार करण्याचे काम केले जात नाही.
५. नाडीपट्यांची पॅकेट्स नीट व्यवस्थित एकावर एक लावून ठेवलेली असतात. नाडी वाचक कधी कधी बसून तर बहुतेक वेळा उभ्याने त्या पट्ट्याच्या पॅकेट्स मधून योग्य त्या अंगठ्याच्या ठशाच्या समुहाच्या पट्ट्यांचे पॅकेट शोधत राहतो. तमिळनाडूच्या बाहेर चालू असलेल्या नाडीकेंद्रात एकावेळी नाडी पट्यांची सीमित पॅकेट्स मागवली जातात. त्या अनेकदा सुटकेसेसमधे ठेवलेल्या असतात. या व्यतिरिक्त काही पाने झाडावरून उतरवलेल्या झावळ्या, पैकी काही एक सारख्या कापून तयार ठेवलेल्या, मजकूर न लिहिलेल्या वा काही जागा मजकूर लिहायला मोकळा ठेवलेल्या, अशा ताडपट्ट्या जर नाडीकेंद्रात ग्राहकाच्या मिळवलेल्या माहितीस तात्काळ लिहायला ठेवलेल्या असाव्या लागतील पण तशा त्या नसतात. त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया (म्हणजे नेमके काय?) करण्याचा प्रश्नच येत नाही.
६. नाडी भविष्य पहायला आलेल्यात केंद्रातील आपल्या माणसे बसवायची शक्कल तमिळनाडू राज्यात कदाचित अमलात आणणे शक्य होईल.(तशी ती केली जात नाही तो भाग वेगळा) मात्र युक्तीने एखाद्या अनोळख्या व्यक्तीच्या नकळत त्याच्यी व त्याच्या आई-वडिलांचे, पत्नी-पतीचे नावे, शिक्षण, नोकरी-व्यवसाय, भावाबहिणींची, संततीची संख्या, जन्मदिवस आदि माहिती अत्यंत कमी वेळात काढण्यासाठी असामान्य वाकपटुत्व व तमिळभाषेवर प्रभुत्व असावे लागेल. त्याशिवाय अशी मिळवलेली माहिती जशीच्या तशी लक्षात ठेऊन ती एका ताडपत्रावर कोरून तयार करायची आदि तर्क करायला सोपे पण अमलात आणायला अशक्य आहेत. माणसे पेरण्याची शक्कल तमिलळनाडू राज्याबाहेरील भागातील केंद्रात चालवणे तर सर्वस्वी अशक्य आहे. कारण तमिळेतर भागात परिस्थिती नेमकी उलटी आहे. तेथे बाहेर बसलेल्या ग्राहकांची भाषा नाडीकेंद्रातील लोकांना येत नाही. नाडीवाचकांच्या संकोची स्वभावामुळे व भाषेच्या दुराव्यामुळे अनेक वेळा तोडक्यामोडक्या संभाषणांतून गैरसमज निर्माण होतात. या उप्पर कोणा नाडीकेंद्रातील माणसाने ग्राहकांशी घोळात घ्यायचा प्रयत्न केलाच तर त्यांच्या भाषेच्या-बोलण्याच्या धाटणीवरून व सामान्यतः रंगावरून तो केंद्राचा माणूस म्हणून तात्काळ पकडला जाईल.
७. या शिवाय हे ही लक्षात ठेवले पाहिजे की नाडी भविष्य पहायला गेलेला व्यक्ती इतका मूर्ख वा भोळसट नक्कीच नसतो की परक्याला आपली माहिती तो आपणहून देईल. खरे तर नाडी भविष्य प्रथम पहायला गेलेला प्रत्येकजण नाडीकेंद्राच्या व ते पहायला आलेल्या अन्य लोकांकडे साशंकतेने व सावधानतेने इतरांकडे पहात असतो. या शिवाय आम्ही, नाडीकेंद्रातील कर्मचारी, अंगठ्याचा ठसा घेताना ग्राहकांना सावध करतो की पट्टी शोधायची पद्धती काय असते व त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना फक्त हो किंवा नाही यातच उत्तरे द्या. आपणहून माहिती आम्हाला किंवा इथे जमलेल्या कोणाला देऊ नका.

भाग ५ समाप्त .. पुढे चालू...

धोरणमांडणीप्रकटनविचारमाहिती

प्रतिक्रिया

ए ढिंका चिका, ढिंका चिका, ढिंका चिका, ढिंका चिका रे ए ए ए... रे हे ए ए....
रिंगा रीका, रिंगा रीका, रिंगा रीका, रिंगा रिंगा रेssssssssssssssss...

शशिकांत ओक's picture

7 Jun 2011 - 6:02 pm | शशिकांत ओक

मित्रा,
किती वेळा रिंगा मारणार...लेखातील विचारांवर मत मांड ना वाचकांना आवडेल....
...माणसे पेरण्याची शक्कल तमिलळनाडू राज्याबाहेरील भागातील केंद्रात चालवणे तर सर्वस्वी अशक्य आहे....
आपण तर नाडी कथन ऐकलेत ना? आपल्याला तसे वाटत नाही काय?

आत्मशून्य's picture

7 Jun 2011 - 7:18 pm | आत्मशून्य

काका,
एव्हंड छान स्वागत केलं तरी प्रश्न मलाच ? आणी विरोध केला की "तिरकसतीरंदाज" ही पदवि देउन मोकळे.....

किती वेळा रिंगा मारणार...

किमान १२ वेळा... वर्षातून असं मूळ गाण्यातील प्रयोजन सांगतं.

लेखातील विचारांवर मत मांड ना वाचकांना आवडेल

वाचकांना काय आवडत हा विचार आपल्या विनंतीवरून मी केला व तो जर तूम्हालाही पटला तर तूम्ही नाडीग्रंथावर लेखन सोडाल याची १००% खात्री.

आपण तर नाडी कथन ऐकलेत ना? आपल्याला तसे वाटत नाही काय?

खोटं ठरलेलं भविष्य ऐकून मी नक्की काय वाटून घ्याव अशी अपेक्षा आहे ? मी या आधी नोंदवलेले नक्की काय आक्षेप आहेत याची आपणाला पूसटशी तरी आठवण आहे काय ? नाडी चमत्कार आहे की नाही याच्याशी मला देणे घेणे नाहीच आहे. फक्त ते खर , अटळ व अचूक भविष्य वर्तवते काय हेच जाणने महत्वाचे.

भविष्य काय मला सूध्दा वर्तवता येते. (हो काही पध्दतींचा अभ्यास आहे) पण ...... मी अजून त्याच्या प्रसाराचे व्रत घेतले नाही कारण त्यातील त्रूटी मला उघड मान्य आहेत. पण आपण हे गूरू आज्ञेने करता म्हणूनच टीका केवळ लेखातील मूद्यांवर व स्वनूभावर करत आलो आहे. आपणा बाबत अनादर नाही. पण एखाद्या गोश्टीचं मार्केटींग करणे आणी प्रसार करणे यातील फरक आपल्या सारख्या जेष्ठ व जाणत्या व्यक्तीला कळत नसेल यावर विश्वास नाही.

रामपुरी's picture

7 Jun 2011 - 11:28 pm | रामपुरी

एखाद्या गोश्टीचं मार्केटींग करणे आणी प्रसार करणे यातील फरक आपल्या सारख्या जेष्ठ व जाणत्या व्यक्तीला कळत नसेल यावर विश्वास नाही
हे आवडलं. झोपलेल्याला जागं करता येतं झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही आणि कुणी फुकट कश्याचेही मार्केटींग करत नाही यावरून काय ते समजून घ्या.
(बाकी वरच्या "ज्येष्ठ" शब्दाला आक्षेप नाही पण "जाणत्या" शब्दावर अडखळलो. कदाचित हा अजाणतेपणा जाणतेपणावर "फायद्याचा पडदा" पडल्यामुळे आला असावा काय??? :))

५० फक्त's picture

7 Jun 2011 - 5:43 pm | ५० फक्त

हो लग्नाचा सिझन संपला आता पुढच्या तयारीला लागा - संदर्भ एक व्यनि.

५० फक्त's picture

7 Jun 2011 - 5:43 pm | ५० फक्त

हो लग्नाचा सिझन संपला आता पुढच्या तयारीला लागा - संदर्भ एक व्यनि.

तेच ते परत.

आणि

त्यांनी नाडी केंद्रवाल्यांना आत जाऊन पकडले का नाही त्यामुळे पुराव्याशिवाय बोलण्यात काय मतलब आहे?

या वाक्यापासून चार वाक्यांइतक्या चिमुकल्या अंतरातः

या संदर्भात एक नाडी केंद्रचालक व नाडीपट्टयांचा सांभाळकरणारा म्हणून मी यावर प्रकाश टाकू शकतो. जेथे नाडी पट्टया ठेवल्या जातात त्या खोलीत अन्य कोणाला प्रवेश दिला जात नसला तरी तेथे काय असते व काय चालते याचा खुलासा माझ्यासारखा नाडी केंद्रसंचालकच करू शकतो.

मग आत जाऊन का पकडले नाही असे का विचारले. परस्परविरोधी अंतर्विरोधी वाक्ये निदान एकमेकांपासून पानभर दूर तरी असावीत.

मुळात आत जाऊन लपून काही करण्याची गरज का भासावी? इतके सर्व स्पष्ट आहे तर मग गुलदस्त्यात का? शोधा ना ग्राहकादेखत त्याची पट्टी. "आत" जाऊन का घेऊन येता.

तुम्हाला संशय तोडायचा आहे की वाढवत ठेवायचा आहे?

तेच "बसवलेल्या आपल्या माणसांत".. अशी आडून आडून माहिती काढणारी बसवलेली माणसे तामिळच असतील असं कोणत्या तर्काने म्हटलंय कोण जाणे. तसेच नाडीवाचकांचा स्वभाव होलसेल सर्वत्र संकोचीच असावा असा नियम का बरे उद्भवला?

बादवे: अंगठ्याच्या ठशात काय क्लू असतो की ज्याने पट्टी सापडते ? काही संख्या कूटरुपात असते का अंगठ्याच्या डिझाईनमधे?

काय काय विचारत बसावे... चालू दे साहेब.

रामपुरी's picture

7 Jun 2011 - 11:41 pm | रामपुरी

नाड्या प्रत्येक वेळी नवीन कशाला बनवायला हव्यात? काहीतरी गिरगटलेलं फक्त त्यांनाच समजतं हे एकदा मान्य केलं की एका नाडीकेंद्राला १०-१५ नाड्या पुरतात की. तीच तीच परत परत आणून वाचायची कुणाला काय कळतंय? बिगरतमिळ माणसाला तमीळ म्हणून सांगायचं तमीळ माणसाला कूट तमीळ म्हणून सांगायचं... "तस्मात कुंभार हो गाढवास तोटा नाही" हे या बाबतीत शब्दशः लागू होतं... असो चालू द्या...

शशिकांत ओक's picture

7 Jun 2011 - 8:20 pm | शशिकांत ओक

मित्रा,
धन्यवाद.तुम्ही लेख वाचून त्यावर मत प्रदर्शन केलेत.

मग (बी,.प्रेमानंदांनी) आत जाऊन का पकडले नाही असे का विचारले. (नाडीकेंद्रातील ताडपट्या ठेवलेल्या खोलीत लोकांना जाऊन देत नाहीत अशी )परस्परविरोधी अंतर्विरोधी वाक्ये निदान एकमेकांपासून पानभर दूर तरी असावीत.

(कंस माझे)
वरील लेख हा बी प्रेमानंदांनी एका नाडीकेंद्रातील अनुभव लिहिलेल्या लेखावर आधारित आहे.
आपणांस माहित आहे की स्व. बी..प्रेमानंद हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे बुद्धिवादी संस्थाचालक होते. त्यांनी अनेक ठिकाणी लाखो रुपयांची आव्हाने देऊन, साहसी कृत्ये करुन अनेक खोटेपणा करणाऱ्यांची बुरखेफाड केली असे त्यांच्या लेखातून वाचायला मिळते.
त्यांच्या त्या निर्भयपणाचा मला आदर आहे. म्हणूनच त्यांनी ज्या नाडी केंद्रवाल्यांने आत बसून त्यांच्यासाठी असलेल्या ताडपट्यावर लेखन करतात असे वाटत होते त्यांना रेड हँडेड पकडायचे काम करायला हवे होते अशी कोणीही अपेक्षा करेल.
त्यांनी तेव्हाच नव्हे तर नंतरही कधी पुन्हा आणखी अन्य नाडीकेंद्रात जाऊन ताडपट्यालेखन करताना पकडून त्यांची बुरखेफाड केली का केली नाही हा प्रश्न माझ्याप्रमाणे, कै. रिसबुडांना ही पडतो. म्हणून रिसबुड त्यांना तमिल वाचायाला येते असे वाटून एका नाडीपट्टीच्या फोटोतील लेखन (तरी) वाचावे म्हणून तो पाठवायचे मान्य करतात. पण पाठवत नाहीत. अशी तक्रार प्रेमानंद या लेखात करतात. पण ज्या तमिळनाडूत ते वास्तव्य करून होते त्या राज्यात अनेक नाडी केंद्रे आहेत तेथील नाडीकेंद्रवाल्यांना कायमचा धडा शिकवायची संधी असताना ते पुन्हा नुसते जायचे टाळतात. अशा अग्रणी बुद्धिवादी व्यक्तीने नाडीवाल्यांना का पकडले नाही असे विचारले गेले नाही तरच नवल..
याउलट नाडीकेंद्रातील पट्ट्या ठेवलेल्या खोलीत सामान्यतः नाडीपहायला आलेल्यांना प्रवेश नसतो यात काही गूढ वा खोटेपणा करायसारखे नाही असे ईश्वरन यांनी सांगितले गेले आहे. नाडी केंद्राला बदनाम करायची चाल नसेल व ईश्वरनना त्या व्यक्तीच्या सचोटीची खात्री असेल, तर ती खोली पहायची मागणी कोणी केली तर ती पहायला दिली जाईल.असे त्यांनी पुढील भागात म्हटले आहे.

गवि's picture

8 Jun 2011 - 1:52 pm | गवि

अहो.. म्हणजे ज्यांच्या सचोटीविषयी शंका नाही अशांमधे हे प्रेमानंद नव्हते का? नसावेत.. म्हणून स्वतःहून त्यांना आत नेले गेले नाही. सरळ आत नेले असते तर धूसरता आणि प्रश्नोत्तरांचे मोहोळ टळले असते. "हा सूर्य हा जयद्रथ" प्रमाणे.

अर्थातच त्यांना प्रवेश अधिकृतरित्या नव्हता. अशावेळी त्याउप्पर जाऊन त्यांनी आपल्या पूर्वीच्या पद्धतीने तिथे आत जबरदस्तीने घुसून भंडाफोड लेव्हलला येऊन पर्दाफाश करायला हवा होता का?

तसा का केला नाही या प्रश्नात काय अर्थ आहे हो?

नाडी केंद्राला बदनाम करायची चाल नसेल व ईश्वरनना त्या व्यक्तीच्या सचोटीची खात्री असेल, तर ती खोली पहायची मागणी कोणी केली तर ती पहायला दिली जाईल.असे त्यांनी पुढील भागात म्हटले आहे.

कशाला एवढ्या पूर्वअटी? तिथे थेट आत येऊन कोणी जुन्या दुर्मिळ दस्तऐवजाला हानी पोचवेल असे वाटत असेल तर क्लोज सर्किट टीव्ही किंवा फिजिकल बॅरियर / काच असे काहीही करता येईल. आणि हे प्रत्येक इच्छुकाबाबत करता येईल. त्यात कंडिशन्स कशाला. ठेवा ना पारदर्शकता, जर वाद मुळातूनच उखडायचा असेल तर.

व्हाईट इंडियन हाउसवाईफच्या

http://www.whiteindianhousewife.com/2011/04/my-visit-to-a-nadi-astrologer/

या ब्लॉग एंट्रीत तर त्यांनी या स्त्रीला कसली कसली भीती घालून, त्याच्या निवारणासाठी मंत्रपाठ करण्याचे तेरा हजार मागणे हे म्हणजे अत्यंत खालच्या पातळीचे वाटले.

शशिकांत ओक's picture

9 Jun 2011 - 2:42 pm | शशिकांत ओक

आपल्या पूर्वीच्या पद्धतीने तिथे आत जबरदस्तीने घुसून भंडाफोड लेव्हलला येऊन पर्दाफाश करायला हवा होता का?

अर्थात हो.
जर ते ससाबांना टरकाऊ शकतात. अनेक इतरांचा जबरदस्तीने जाऊन भांडाफोड करून धमकावू शकतात त्यांनी नाडीकेंद्रवाल्यांचा पर्दाफाश करायला हवे होते असे मी म्हणत नाही तर कै. रिसबुडांची तशी अपेक्षा असावी म्हणून त्यांनी त्यांच्याशी प्रदीर्घ पत्रव्यवहार केला.
रिसबुड त्यांना विचारतात की नाडीग्रंथात पत्रिकांची अदलाबदल करायची मखलाशी करून देखील तुमचे १०० टक्के कथन बरोबर आले म्हणता ते कसे ? याचा त्यांना प्रश्न पडला आणि प्रेमानंदांनी केलेला स्वतः चा पाणउतारा सहन करून पत्रावर पत्रे लिहून प्रेमानंदांना त्यांनी त्यांच्या मासिकातून उत्तरे द्यायला भाग पाडले होते.
इकडे पुण्यात रिसबुड व प्रकाश घाटपांडे नाडीग्रंथांना थोतांड ठरवायला अंनिवार्तापत्रात लेख लिहीत होते आणि त्याच सुमारास प्रेमानंदांना आपण या नाडीग्रंथांतील भविष्यकथन १०० टक्के बरोबर आले असे कसे म्हणता असा सवाल करून भंडावले होते. नाइलाजाने प्रेमानंदांनी उत्तरे दिल्याचे त्यांच्या लेखन पद्धतीवरून वाटते.
ते प्रकरण संपुर्ण वाचू इच्छित असाल तर त्याची लिंक येथील सदस्य प्रकाशकाकांची इच्छा असेल तर त्यांच्याकडे कदाचित उपलब्ध असेल. विचारून पहा.

ठेवा ना पारदर्शकता, जर वाद मुळातूनच उखडायचा असेल तर.

अगदी बरोबर आहे.
पण ती पारदर्शकता कोणासाठी? जे विचारायला जाण्याची तसदी घेतील त्यांच्यासाठी.
बाजारात तुरी अन भट भटणीला मारी म्हटल्यासारखे. मिपावरील प्रतिसादातून माझ्याशी वाद घालून याविषयाला वाचा फोडायच्या आधी नाडी ग्रंथ अभ्यासा व नंतर त्या केंद्रवाल्यांशी यावर विचारणा केली तर ती जास्त सयुक्तिक होईल. नाही का?

गवि's picture

9 Jun 2011 - 2:56 pm | गवि

पण ती पारदर्शकता कोणासाठी? जे विचारायला जाण्याची तसदी घेतील त्यांच्यासाठी.

आता काय करावं?

अहो सर्वांसाठीच का नसावी पारदर्शकता.. असं म्हणतोय मी.. जे विचारायला जातात (तसदी घेतात) अशा सर्व (असंख्य) नाडी पाहणेच्छुक लोकांनातरी आहे का पारदर्शकता उपलब्ध? त्यात मग उगीच मला तिथे पाठवून आणि त्यांनी मला एकट्याला दिली पारदर्शकता समजा काय सिद्ध होणार आहे?

आणि त्यासाठी नाडीग्रंथांचा अभ्यास कशाला करायला हवा..? बाजारात तुरीचे उदाहरणही चुकीचे. कारण तुम्हीही मिपा फोरमच्या माध्यमातून / मार्फतच हे सर्व मांडता आहात. तुम्हाला प्रश्नांची अपेक्षाच नसेल तर तसे स्पष्ट केले तर बरे होईल. मग काही प्रतिक्रियाच द्यायला नकोत. थेट नाडीकेंद्रातच जावे हे उत्तम. तुम्ही काही बाबींची उकल इथेच याच मिपावर करु पाहताय अशा गैरसमजातून इथेच प्रश्नोत्तरे करत बसलो. क्षमस्व..

की माझि पट्टी मलाच का सूपूर्त केली जात नाही ? सगळ्या नकोत. मागच्या जन्मीच्या पण नकोत. फक्त या जन्मीचीच हवी आहे, कायमची. पूढच्या जन्मीची पट्टी पुढील जन्मी न्हेइन म्हणतो. पून्हा स्पश्ट करतो नाडी अटळ अचूक भविष्य वर्तवू शकते काय ? फक्त याविशयीच शंका आहे. आणखी काही नाही. माझा भूतकाळ मलाच त्रयस्थ व्यक्तीकडून जाणून घेण्यास मला रस नाही.

बादवे, गून्हे उघडकीला आणायला याचा उपयोग होइल काय ?

लंबूटांग's picture

8 Jun 2011 - 12:53 am | लंबूटांग

वाट बघा उत्तर मिळण्याची.

>>की माझी पट्टी मलाच का सूपूर्त केली जात नाही

हा प्रश्न कैकवेळा मी पण विचारला आहे आणि प्रत्येक वेळी सोयीस्कररीत्या उत्तर देण्याचे टाळले गेले आहे. ह्यासाठी मी नाडीकेंद्रात जाऊन 'अनूभव' घेण्याची काय गरज आहे हे ओकसाहेबच जाणोत.

दुवा क्र. १
दुवा क्र. २

अजून एक म्हणजे किती नाडीपट्ट्या आहेत एकूण?

नाही म्हणजे किती लोकसंख्या होणार आहे ह्या पृथ्वीची ते तरी कळेल. त्या लोकसंख्या विस्फोट वगैरे बोलणार्‍यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे तेही कळेल.

तसेच मग समजा क्ष इतकी लोकसंख्या होणार असेल एकूण तर मग आधीच प्लॅनिंग करून तेवढी लोकसंख्याच होऊ दिली नाही की मग कसे जगाचा विनाश वगैरे पण टाळता येईल ;)

असो मला तर हा नाडीपट्ट्यांची चिकाटी पाहून त्या अ‍ॅम-वे वाल्यांचीच आठवण होते.

गवि's picture

8 Jun 2011 - 1:24 pm | गवि

अजून एक म्हणजे किती नाडीपट्ट्या आहेत एकूण? नाही म्हणजे किती लोकसंख्या होणार आहे ह्या पृथ्वीची ते तरी कळेल. त्या लोकसंख्या विस्फोट वगैरे बोलणार्‍यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे तेही कळेल.

हेच आधी वाटायचं मलाही. पण एकदा त्याचं उत्तर मला मिळालं ते फारच "बिनतोड" होतं. सर्वांच्या पट्ट्या नसतातच मुळी. ज्यांच्या नशिबी आपली नाडी जाणून घेणं "लिहीलं" आहे तेवढ्यांच्याच पट्ट्या बनल्या आहेत. तेवढेच लोक बघायला आपोआप येतीलच.

आता बोला.. :)

Nile's picture

8 Jun 2011 - 1:38 pm | Nile

च्यायला, असंच जर असेल तर हे ओक साहेब उगाच डंका का बरं वाजवून राह्यले त्या नाड्यांचा? येणारे आपोआप येणार आहेत आणि ज्यांच्या नाड्या त्यांच्याकडेच साबूत आहेत ते नाही येणार असे असेल तर मग जाहिरात बाजी कशासाठी?

(उत्तर* अर्थातच आम्हाला माहित आहे आणि त्या उत्तराचा अन आमच्या नाडीचा काय समंध नाय)

(ज्या महामूर्खांना उत्तर माहित नाही त्यांच्यासाठी:- तुमच्या सारख्या मुर्खांना लुबाडणे हाच एकमेव उद्देश.)

फॉरेनमधूनही एखादी व्यक्ती तिच्या "लिखित" वेळेनुसार नाडी बघायला येऊ शकते. ती फॉरेनर असली तरी तिची नाडी मिळते.

व्हाईट इंडियन हाऊसवाईफ या मस्तशा ब्लॉगवरची ही एंट्री वाचाच :

http://www.whiteindianhousewife.com/2011/04/my-visit-to-a-nadi-astrologer/

वेगळा पर्स्पेक्टिव्ह.. एका परदेशी स्त्रीच्या नजरेतून.

मित्र हो,

हे ओक साहेब उगाच डंका का बरं वाजवून राह्यले त्या नाड्यांचा? येणारे आपोआप येणार आहेत आणि ज्यांच्या नाड्या त्यांच्याकडेच साबूत आहेत ते नाही येणार असे असेल तर

मी उत्तरे द्यायला टाळतो असा आक्षेपवर घेतला गेला आहे. त्या बाबत खुलासा -
निलें, मी खर तर मी डंका वाजवतोय असा आपला ग्रह असेल तर मनातून सर्वांनी काढावा. मी नाडीकेंद्रांची ना जाहिरात करतोय ना हे ज्योतिष कसेही करून बघायला जा असा माझा वा अन्य कोणाही नाडीग्रंथप्रेमीचा आग्रह असतो.
कारण आपण म्हटल्याप्रमाणे आपोआप कोण ते नाडी ग्रंथ पहायला जाईल ते कोणालाच सांगता येणार नाही.
मी फक्त प्राचीन भारतीय महर्षींनीच्या ज्ञानाच्या शाखेची सामान्य लोकांना माहिती असावी म्हणून हे लेखन करत आलो आहे. या विषयाचे वैशिष्ठ्य असे आहे की नुसते ऐकून वा वाचून अनेक शंका व संशय उपस्थित होतात. त्या शंकांना मी किंवा अन्य कोणी उत्तरे देण्याने समाधान होत नाही. मात्र नवे प्रश्न निर्माण होतात. म्हणून मी संशयवाद्यांना व इथल्या सदस्यांना अनुभव घ्या असे म्हणतो. त्यात नाडी केंद्रांचे भले व्हावे असा माझा उद्धेश नाही. माझी नाडी ग्रंथांशी ओळख व्हायच्या आधी ही केंद्रे चालत होती. रेल्वे टाईमटेबल विकत घेतो तेंव्हा प्रवासाला चला असे ते जाहिरात करत नाही. फक्त जायचे ठरवले तर उपयुक्त माहिती उपलब्ध करून देते.तसेच काहीसे नाडीवरील लेखनाचे आहे.
आपण म्हणता त्याप्रमाणे जाणारे जातील, न जाणारे नाही जातील. त्यात मला वाईट वाटायचे कारण नाही. नाडीवाले काही माझे चाचा-मामा नाहीत. हे आपल्याला सर्वांना माहित आहे. पण आर्थिक लाभाशिवाय ओकांना ही उठाठेव करायचे कारण काय असे वाटून चारित्र्यहनन करायला अशी विधाने सोईची पडतात म्हणून त्यांचा वापर केला जातो म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. इतकेच.

मित्र लंबूटांग आणि अन्य वाचक हो.

किती नाडीपट्ट्या आहेत एकूण?

जर या साध्या प्रश्नाचे उत्तर ओकांना ठाऊक नाही तर त्यांनी नाडीग्रंथ विषयाचा ओहापोह करावा का? असा मोहरा आपल्या सारख्यांचा असेल तर या प्रश्नाचे उत्तर - ठाऊक नाही - असे नाडी केंद्रवाले देतात. असे मी म्हणून ते आपल्याला मान्य होणार नाही.
अकबर - बिरबलाच्या गोष्टीतील कावळ्यांची संख्या किती याचे उत्तर खुद्द राजाला माहित नसल्याने बिरबलाने सांगिलेली संख्या जशी बरोबर असा विचार अनेकांच्या मनात येईल.
मात्र नाडीग्रंथांच्या बाबत परिस्थिती वेगळी आहे. ज्यांच्याकडे त्या ताडपट्टया आहेत त्यांच्या शिवाय कितीतरी लोकांकडे त्या विविध काळापासून त्या कुठ कुठे उपलब्ध आहेत याची गणना - शास्त्रोक्त मोजणी - त्यांना स्वतःला करता येत नही असे ते म्हणतात.
यावर अनेक प्रयत्न करुन झाले आहे पण ज्यांना नाडीग्रंथांची टिंगल टवाळी करायची आहे त्यांच्यासमोर असे विषय काढून उपयोग नाही असे वाटते. सदस्यांनी विनंती केली व त्याबाबत अभ्यासासाठी विचार करायला सदस्य पुढे येणार असतील तर त्यांच्याकरता देशाच्या यंत्रणेच्या पातळीवर आणि जागतिक पातळीवर काय प्रयत्न चालू आहेत याची थोडी फार माहिती उपलब्ध करुन देता येईल.
आपल्या सारख्या देशविदेशात वास्त़व्य करून असणाऱ्यांनी या विषयाला निंदेच्या पातळीवरून अभ्यासाच्या उच्च पायरीवर आल्यास अनेक गोष्टी विचारात घेता येतील.
त्यासाठी मी आपल्याला सदैव हात पुढे करून मदत मागत होतो. आहे. आता हात हातात घ्यायचा की झिडकारायचा आपण ठरवायचे आहे.

मित्रा,

माझि पट्टी मलाच का सूपूर्त केली जात नाही ?

तुमचा प्रश्न असा बिनतोड आहे की बस्स.
पुर्वी नाडी केंद्रवाल्यांशी मी देखील हेच म्हणून वाद घालून त्यांना सतावीत असे. त्यांनी दिलेल्या उत्तराने नंतर माझे समाधान झाले.
ते उत्तर मला इतरांनी कोणी सांगायचा प्रयत्न केला तर तो मी मानला नाही. म्हणतात ना सोनारानेच कान टोचलेले बरे असतात.
आपण नाडीकेंद्रातील लोकांना याचे उत्तर विचारावे अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे.
आपले भविष्य कथन बरोबर आले नाही असे आपले म्हणणे असेल तर त्याचा साक्षमोक्ष आपण त्यांना विचारून लावावा.
त्यांचे विचार मानणे किंवा ना मानणे आपल्या हाती आहे. ते काय म्हणतात ते आपण खुलासा करून सांगावे. आम्ही ते वाचायला उत्सुक असू.

सर, तुम्ही स्वतः फर्स्टहँड कधीच काहीच माहिती देत नाही. तुम्हाला नाडीकेंद्रवाल्यांनी पटेल असं समर्पक उत्तर दिलंय. अर्थातच तुम्हाला ते नीट माहीत आहे. पण आम्ही मात्र त्यांच्याकडे जाऊनच ते मिळवावं असं तुम्ही सुचवता.

यामुळे अ‍ॅम्वेच्या अ‍ॅनॉलॉजीला पुष्टी मिळते. मी तुम्हाला काही सांगणार नाही. जे प्रश्न असतील ते घेऊन अ‍ॅम्वेच्या "सेमिनार"मधे या.

"या सिस्टीमची कार्यपद्धती कशी आहे?"

.. "सेमिनार"ला या. तिथेच कळेल.

"वरच्या थरातल्या लोकांना यात फायदा आहे पण खालच्या थरातल्या अनेक लोकांना यात तोटा नाही का होणार?"..

"सेमिनार"ला या. तिथेच कळेल..

मित्रा,
माझे फर्स्ट हँन्ड अनुभव विविध लेखात सादर केले आहेत. काही गोष्टी स्वतः अनुभवाव्यात असे मी म्हणतो.

ते उत्तर मला इतरांनी कोणी सांगायचा प्रयत्न केला तर तो मी मानला नाही.

मी जर इतरांनी सांगितले म्हणून मानले नाही तर तुम्हाला ते उत्तर मी देऊन माना असे कसे म्हणू? असो.
आपण नाडीग्रंथांचा अभ्यास करायला आनंदाने तयार असाल तर सांगा.

तुम्ही उत्तरं द्या हो मानायचे की नाही ते आम्हाला ठरवू द्या की! तुमच्या प्रचाराचे धागे येणार असतील तर त्यावर प्रश्नं येतीलच. तुमच्या उत्तरांतूनच तुमची प्रामाणिकता प्राथमिकपणे दिसणार आहे. एखादी व्यक्ती जर माझ्या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे देत नसेल तर त्या व्यक्तीशी मी व्यवहार करण्याचे अपेक्षा करण्यात शहाणपणा नाही. त्या व्यक्तीचे सल्ले का मानावे?

मित्रा,

तुमची प्रामाणिकता प्राथमिकपणे दिसणार आहे

मी काही काळ इथे लेखन करत आहे. त्यातून मला काय म्हणायचे ते लिहिले गेले. त्यावर अनेक विचारणांबाबत मी उत्तरे दिली.
काही प्रतिक्रियांवर माझे मत ऐकायऐवजी त्या प्रश्नांचे निराकरण आपण स्वतः करावे असे मी म्हणालोत. ते सल्ले मानावे असा माझा आग्रह नाही.

मी काही काळ इथे लेखन करत आहे.त्यातून मला काय म्हणायचे ते लिहिले गेले.

तुमच्या मला वर दिलेल्या प्रतिसादात आणि ह्या प्रतिसादात विसंगती आहे. वरील वाक्य खरे असेल तर आम्ही तुम्ही यापुढे नाडीवर धागे काढणार नाही असे समजायचे का?

तुम्ही जितका काळ इथे लेखन केले आहे त्यात तुमच्या दाव्यांना विरोधच झालेला आहे, अनेकांनी तुमची स्प्ष्टीकरणं पटण्यासारखी नाही असे वारंवार सुचवले आहे. तरी तुमचे पुन्हा पुन्हा त्याच विषयावरचे लेख येणे काही थांबत नाही.

माझे मत ऐकायऐवजी त्या प्रश्नांचे निराकरण आपण स्वतः करावे असे मी म्हणालोत.

ठीक आहे, तुमचे म्हणणे कळाले, आता लेख थांबवा, बॉल आमच्या कोर्टात आहे असे म्हणायचे आहे ना तुम्हाला? मग आम्ही तो टोलवण्याची वाट पहा. जेव्हा आमच्या पैकी कोणीतरी केंद्रात जाईल आणि अभिप्राय लिहिल. ठीक?

मित्रा निले

आमच्या पैकी कोणीतरी केंद्रात जाईल

आमच्यापैकी कोणीतरी, केंव्हा तरी जाऊ असे मोघम का म्हणता?
नाडी हे थोतांड आहे. तेंव्हा ते पहायला जायची गरज नाही. यावरून खाली येत येत आता केंद्राला भेटून येऊ म्हणताना आपल्या वैचारिकतेची बदलती स्थिती कळली.
कधी कोणी गेलात तर मात्र आपल्यासंदर्भातील नाडी ताडपट्टीच्या फोटोचे, नाडीवहीतील लेखनाची नोंद असलेले
सर्व पुरावे नाडी ग्रंथ प्रेमींना सादर करावेत ही विनंती.

बघतो काय् जमतं का. पण काही उपयोग नाही राव

असे कंटाळून कसे होईल. नाडी ग्रथ हा विषय असा सहजासहजी संपणारा नाही. तो कित्येक शतके चालू आहे व तसाच चालू राहणार. माझे लेखन लोकांना मार्गदर्शक असे पर्यंत चालू राहील.

केव्हा कधी ते वैयक्तिक सोयी नुसार ठरवेन. जागतीक समस्येइतकी महत्त्वाची गोष्ट नसल्याने त्याला घाई करायची गरज नाही असे मला वाटते.

वैचारिक परिस्थिती बदलेली नाही, बस्टिंग करण्यातला मजा काही औरच. खरं तर तुम्ही माझी विजिट स्पॉन्सर करा, म्हणजे माझे जाण्याचे इन्सेंटिव्ह अजून वाढतील. (जेव्हा जाणार असेल तेव्हा अधिक चर्चा करू हवं तर)

असे कंटाळून कसे होईल.

दगडावर डोकं आपटण्यात मनोरंजन काही होत नाही. नाडी ग्रंथ विषय थोतांड आहे, इतिहासात अनेक थोतांडे शतकानुशतके चाललेली आहेत पण म्हणून ती खरी होत नाहीत. थोतांडाचा प्रचार करणारेही अनेक आहेत/असतात/होऊन गेलेत, अन त्यांचे अनुयायीसुद्धा अनेक आहेत/असतात/होऊन गेले आहेत. त्यामुळे तुम्ही काहीतरी भव्य दिव्य किंवा जगत् क्रांतीसदृश करत आहात असा स्वतःचा गैरसमज करून घेऊ नका.

त्याशिवाय, विचार करणार्‍याची क्षमता असणार्‍यांबरोबर चर्चा, तर्क वितर्क करता येतो आणि त्यात रसही असू शकतो, अन्यथा काही काळात कंटाळाच येतो.

शशिकांत ओक's picture

12 Jun 2011 - 8:10 pm | शशिकांत ओक

मित्रा,
निले,
आपल्या सुचनेसाठी धन्यवाद.

नाडी ग्रंथ विषय थोतांड आहे,

बस्टिंग करण्यातला मजा काही औरच

आपल्या आवडीचे काम आहे म्हणता तर सवड काढावी लागेल.

Nile's picture

13 Jun 2011 - 1:02 am | Nile

स्पॉन्सर कराल ना?

निले,
हिम्मतवानाला कशाला हवेत स्पॉन्सरचे टेकू?

Nile's picture

16 Jun 2011 - 3:17 am | Nile

इन्सेंटीव्ह हवं. जे करण्यात काही फायदा नाही हे माहित आहे, फक्त थोतांडाला थोतांड आहे हे पुन्हा एकदा म्हणण्याचा आनंद सोडून, त्या करता स्वतःच्या खिशाला चाट देण्यापेक्षा फूकटात करायला मिळाले तर आनंदात भर पडेल.

का, तुमचा तितका विश्वास नाही वाट्तं?

शशिकांत ओक's picture

11 Jun 2011 - 12:19 pm | शशिकांत ओक

मित्रा,

"या सिस्टीमची कार्यपद्धती कशी आहे?"

"नाडीच्या केंद्रात " जा. तिथेच कळेल..
एका तरुणाने विवेकानंदांना, '' एखाद्या रोग्यासी सेवा करताना मीज आजारी पडलो तर ?'' असा प्रश्न विचारला. विवेकानंद म्हणाले, '' तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते.
सेवा करायला सुरवात तर कर. तुला योग्य उत्तरे कळून येतील.

आत्मशून्य's picture

10 Jun 2011 - 12:49 am | आत्मशून्य

म्हणतात ना सोनारानेच कान टोचलेले बरे असतात. आपण नाडीकेंद्रातील लोकांना याचे उत्तर विचारावे अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे.

मी कोणत्याही नाडीरीडरला कोणत्याही कारणामूळे वैयक्तीकरीत्या ओळखत नाही.

तसच हैयो हैयैयो प्रमाणे माझा यात अभ्यास नाही म्हणून मला कोणता विशेष मानही नाही, वा मी कोणा कोणाला ओळखतो यावर कोणी कूठे धागेही काढले नाहीत.

तसच आपल्याप्रमाणे मी गूरू आज्ञेने नाडीप्रसाराचे कार्यही हाती घेतलेले नाही मग
मग मला नाडीपट्टीवाले उभं तरी करतील काय याची शंका/भीती मनात आहेच आहे पण संपूर्ण समाधान करणारे उत्तर देतील काय याविशयी तीव्र शंका मनात आहे.(होय उगीच सरकारी कारभाराप्रमाणे पून्हा या, इकडे जा तीकडे जा, तमूक वाजता या, ह्याना भेटा मग समाधान होइल असं काही करायचा निश्चीतच उत्साह नाही)

नाडी ग्रंथ चमत्कार आहे की नाही हा माझा कूतूहलाचा विषय नाही कारण मला चमत्काराचं अजीबात वावडं नाही. भविष्य अचूक असावं व शंका विरहीत असाव इतकीच अपेक्षा आहे. म्हणूनच जर इथे आपण लेखन करत आहात तर सदरील प्रश्नाचे उत्तर आपणच द्यावे. कोणीका टोचना आमचाच कान टोचला जाणार हे नक्की असेल की विषय मीटला. येऊद्या आपलं स्पश्टीकरण.

शशिकांत ओक's picture

10 Jun 2011 - 3:38 pm | शशिकांत ओक

मित्रा,

(नाडी केंद्रातील लोकांना) वैयक्तीकरीत्या ओळखत नाही.

सुरवातीला माझीतरी कुठे नाडीकेंद्राची ओळख होती.
उत्तरे आपणाला मिळवायची आहेत.त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. अशी माझी विनंती आहे.
मनःपूर्वक उत्तरे मिळवायची असतील तर आपल्याला कष्ट घायवे लागतील. न भेटताच असे होईल, तसे होईल अशी गाऱ्हाणी गाऊन कसे चालेल. मग करताय प्रयत्न....?

कि सल्ले देणार असे वागा तसे वागा ... हे करा ते करा म्हणजे उत्तर मिळेल. नाही प्रश्न तूमच्या लेखनाने निर्माण झालेत.. उत्तर तूमच्या लेखनातूनच सूस्पश्टपणे येऊदे. जर मनात तिव्र शंका निर्माण करणारं लिखाण करत आहात तर त्याचे समाधान करणारं लेखनही आपल्या कडून घडूदे. सल्ले देणं सोपं... नेमकी उत्तरे द्यायला इच्छाशक्तीचीही गरज असते. मग काय आहे का ती आपल्याकडे ?

शशिकांत ओक's picture

13 Jun 2011 - 5:53 pm | शशिकांत ओक

मित्रा,
आपले प्रश्न काय, शंका काय ?

आत्मशून्य's picture

16 Jun 2011 - 3:49 am | आत्मशून्य

आपले प्रश्न काय, शंका काय ?

०) नाडी ग्रंथ चमत्कार आहे काय याच्याशी मला काही देणे घेणे नाही, कारण चमत्काराशी मला काहीही वावडे नाही.

१) माझी पट्टी मलाच कायमस्वरूपी का दिली जात नाही ?

२) जर कर्मसिध्दांत सिध्द व्हायला भविष्य चूकवले जात असेल तर नाडी पाहून फायदा काय ? नाडी पेक्षा भविष्यजाणून घेण्याचे इतर मार्ग अवलंबणे योग्य नाही काय ?

३) मला माझा भूतकाळ जाणून घेण्यात खरोखर रस नाहीये, पण अचूक, तंतोतंत खरे ठरणारे, व न बदलता येणारे भविष्य नाडीग्रंथामधून प्रत्येकाला कळू शकते काय (सांगीतले जाते काय) ?

४) नाडीपट्टीद्वारेच भविष्य जाणून घ्यायची आपल्याला काही विषेश गरज आहे का ?

५) नाडीपट्टीप्रमाणे भविष्य अनूभवाला न येणार्‍यांना काय सल्ला आहे ?

६) समजा नाडी भविश्य अचूक मानले तर नाडीकेंद्र चालकांकडून याचा गैरवापर केला जाणार नाही एखाद्याचे भविश्य मॅन्यूपुलेट केले जाणार नाही याची काय हमी ?

(अंजलीना जोली व जेम्स मकवायरचा वाँन्टेड आठवला व त्यातील फ्रॅटर्नीटी ओफ असासिन्स ची कंन्सेप्ट आठवली कारण त्यामधेहीं काहीसं असचं नाडीपट्टीवरती नाही पण एका साध्या कापडाच्या पट्टीवरती मरणार्‍याचं नाव येत असे, पण त्यांच्याशी तूलना करत नाहीये )

ईश आपटे's picture

16 Jun 2011 - 2:27 pm | ईश आपटे

अंजलीना जोली व जेम्स मकवायरचा वाँन्टेड आठवला व त्यातील फ्रॅटर्नीटी ओफ असासिन्स ची कंन्सेप्ट आठवली कारण त्यामधेहीं काहीसं असचं नाडीपट्टीवरती नाही पण एका साध्या कापडाच्या पट्टीवरती मरणार्‍याचं नाव येत असे, पण त्यांच्याशी तूलना करत नाहीये

इंटरेस्टिंग तुलना आहे. गेव्ह मी सम न्यू पॉसिबिलीटीज टू थिंक.....................

शशिकांत ओक's picture

25 Jun 2011 - 6:19 pm | शशिकांत ओक

मित्रा,
ही घ्या आपल्या प्रश्नांची उत्तरे -
१) माझी पट्टी मलाच कायमस्वरूपी का दिली जात नाही ?
उत्तर - प्रश्न नाडीकेंद्राच्या अखत्यारीतील आहे. आपण नाडीकेंद्रातील लोकांना याचे उत्तर विचारावे अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे.

२) जर कर्मसिध्दांत सिध्द व्हायला भविष्य चूकवले जात असेल तर नाडी पाहून फायदा काय ? नाडी पेक्षा भविष्यजाणून घेण्याचे इतर मार्ग अवलंबणे योग्य नाही काय ?

उत्तर - जरूर. आपल्याला हवे तर अन्य मार्गांनी ते साध्य करू शकता. मात्र कथन चुकते किंवा नाही हे तर्क करून मला इथे विचारण्याचे कष्ट करून घेण्यापेक्षा अनुभवाने ठरवले तर ते जास्त योग्य ठरेल.

३) मला माझा भूतकाळ जाणून घेण्यात खरोखर रस नाहीये, पण अचूक, तंतोतंत खरे ठरणारे, व न बदलता येणारे भविष्य नाडीग्रंथामधून प्रत्येकाला कळू शकते काय (सांगीतले जाते काय) ?

उत्तर - होय. त्याच बरोबर जर काही बदलाव्या अशा नको वाटणाऱ्या घटना टाळावयाच्या किंवा त्याची तीव्रता कमी करून घ्यायची असेल तर व्यक्तीच्या कर्माने ते शक्य आहे म्हणून तेही नाडीग्रंथांतून व्यक्तीला मार्गदर्शन केले जाते.

४) नाडीपट्टीद्वारेच भविष्य जाणून घ्यायची आपल्याला काही विषेश गरज आहे का ?

उत्तर - नाडीग्रंथांतील महर्षींच्या प्रज्ञाशक्तीचे मार्गदर्शन ज्यांच्यासाठी आहे ते तेथे आपणहून जातात. अन्यजण तेथे फिरकत ही नाहीत. अगदी केंद्राच्या शेजारी राहणारे देखील. आपण माझ्याशी 'विशेष गरज आहे का?' असा तर्कवाद करून 'जाणार नाही' असे ठरवले तरी योग्य वेळ येताच तो व्यक्ती महर्षींच्या कथनाकडे वळतो. म्हणून नाडीतून भविष्य जाणून घ्यावे किंवा नाही एका अर्थाने आपल्या हातात नाही.

५) नाडीपट्टीप्रमाणे भविष्य अनूभवाला न येणार्‍यांना काय सल्ला आहे ?

उत्तर - काही सल्ला नाही.

६) समजा नाडी भविश्य अचूक मानले तर नाडीकेंद्र चालकांकडून याचा गैरवापर केला जाणार नाही एखाद्याचे भविश्य मॅन्यूपुलेट केले जाणार नाही याची काय हमी ?

उत्तर - ज्या अर्थी असा आपण प्रश्न करता आहात त्याअर्थी अशी घटना आपल्या संबंधात झाली आहे काय नसेल तर नुस्ता फिल्मी तर्क करायसाठी काहीही वाटून घेणे शक्य आहे.

माझ्या लेखनाचा उद्देश महर्षींच्या कथनांचा आलेला अनुभवकथन करायचा आहे.आपला किंवा इथल्या वाचकांच्या प्रश्नांचा रोख नाडीकेंद्रचालकांवर आहे.

केंद्रवाल्यांनी सचोटीने आपला व्यवसाय करावा असे अपेक्षित आहे. तसा तो भविष्य कथनाबाबत करतात असा माझा अनुभव आहे.

विविध आरोपांविषयी नाडीकेंद्रातर्फे काही निवेदन किंवा स्पष्टीकरण येत नाही असे लक्षात येऊन एका नाडी केंद्रचालकांशी विविध आरोपांच्या संबंधी त्याचे विचार जाणून घेतले. ते आत्तापर्यंत लेख मालेच्या रुपाने सादर होत आहेत. त्यातील पुढील भागात प्रकाश टाकला जाईल. असाच प्रयत्न अन्य नाडी ग्रंथ प्रेमींनी केल्यास मला आवडेल.
येथील नाडीग्रंथप्रेमी मृगनयनींचा दै. सामनामधे नाडीग्रंथांवर दणदणीत लेख प्रकाशित झालाय तो आपण वाचला असेल.

आत्मशून्य's picture

25 Jun 2011 - 9:04 pm | आत्मशून्य

१) माझी पट्टी मलाच कायमस्वरूपी का दिली जात नाही ?
उत्तर - प्रश्न नाडीकेंद्राच्या अखत्यारीतील आहे. आपण नाडीकेंद्रातील लोकांना याचे उत्तर विचारावे अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे.
- यालाच मूद्दा टोलावणे असे म्हणतात. आपलं नाडीसंबंधी सर्व लिखाणच मूळी नाडीकेंद्राच्या अखत्यारीतील गोश्टीशी आहे मग सर्वकाही तूम्ही त्यानाच का लिहू देत नाही आणी त्यानाच का समोर आणत नाही उत्तरे द्यायला ? म्हणजे कसं तूमच्या लीखाणातून निर्माण होणार्‍या प्रश्नांना तूम्हि कधीच समर्थपणे सामोरे जात नाही हे पून्हा पून्हा सिध्द होत असलेले लोकांना अनूभवाला येणार नाही.
:(

२) जर कर्मसिध्दांत सिध्द व्हायला भविष्य चूकवले जात असेल तर नाडी पाहून फायदा काय ? नाडी पेक्षा भविष्यजाणून घेण्याचे इतर मार्ग अवलंबणे योग्य नाही काय ?
उत्तर - जरूर. आपल्याला हवे तर अन्य मार्गांनी ते साध्य करू शकता. मात्र कथन चुकते किंवा नाही हे तर्क करून मला इथे विचारण्याचे कष्ट करून घेण्यापेक्षा अनुभवाने ठरवले तर ते जास्त योग्य ठरेल.
आता हे वास्तव मात्र आपल्या नाडीबाबत असलेल्या एकतर्फी हेकेखोर लिखाणाशी पूर्ण विसंगत वाटत नाही काय ? तसच यापूढे कथन चूकलय हे तर्काने न्हवे तर प्रत्यक्ष अनूभवानेच मला समजलेलं आहे हे कृपया कधीही विसरू नये.
:( :(

३) मला माझा भूतकाळ जाणून घेण्यात खरोखर रस नाहीये, पण अचूक, तंतोतंत खरे ठरणारे, व न बदलता येणारे भविष्य नाडीग्रंथामधून प्रत्येकाला कळू शकते काय (सांगीतले जाते काय) ?
होय. त्याच बरोबर जर काही बदलाव्या अशा नको वाटणाऱ्या घटना टाळावयाच्या किंवा त्याची तीव्रता कमी करून घ्यायची असेल तर व्यक्तीच्या कर्माने ते शक्य आहे म्हणून तेही नाडीग्रंथांतून व्यक्तीला मार्गदर्शन केले जाते.
आपणच म्हटलात ना की जर कर्मसिध्दांत सिध्द व्हायला भविष्य चूकवले जाते व घटना बदलणे टाळणे केले जात नाही मग आता पून्हा त्याच्याशी विसंगत विधान का करताय ?
:( :( :( :( :(

४) नाडीपट्टीद्वारेच भविष्य जाणून घ्यायची आपल्याला काही विषेश गरज आहे का ?
नाडीग्रंथांतील महर्षींच्या प्रज्ञाशक्तीचे मार्गदर्शन ज्यांच्यासाठी आहे ते तेथे आपणहून जातात. अन्यजण तेथे फिरकत ही नाहीत. अगदी केंद्राच्या शेजारी राहणारे देखील. आपण माझ्याशी 'विशेष गरज आहे का?' असा तर्कवाद करून 'जाणार नाही' असे ठरवले तरी योग्य वेळ येताच तो व्यक्ती महर्षींच्या कथनाकडे वळतो. म्हणून नाडीतून भविष्य जाणून घ्यावे किंवा नाही एका अर्थाने आपल्या हातात नाही.
मग हा नाडीचा प्रसार/जनजगृतीचा बेगडी अट्टहास कशाला जर त्यांचे गिर्‍हाइक आधीच फीक्स आहे. व नाडी विशयक जागृतीने त्यात कोणताही बदल होणार नाहीये ? मग हे केलं काय नाही केलं काय ? जाणारा तिथे जाणारच उगीच यावरती लेखन करून न जाणार्‍यांच्या भावनांशी/बुध्दीशी खेळ करायचा अधीकार कोणी दीला ?
:( :(

५) नाडीपट्टीप्रमाणे भविष्य अनूभवाला न येणार्‍यांना काय सल्ला आहे ?
काही सल्ला नाही.
या उत्तरापेक्षा कोणती गोश्ट अजून भ्रमनिरास करणारी असेल काय ?
:( :(

६) समजा नाडी भविश्य अचूक मानले तर नाडीकेंद्र चालकांकडून याचा गैरवापर केला जाणार नाही एखाद्याचे भविश्य मॅन्यूपुलेट केले जाणार नाही याची काय हमी ?
उत्तर - ज्या अर्थी असा आपण प्रश्न करता आहात त्याअर्थी अशी घटना आपल्या संबंधात झाली आहे काय नसेल तर नुस्ता फिल्मी तर्क करायसाठी काहीही वाटून घेणे शक्य आहे.
आपलं लिखाण हे चीत्रपटांच्या कथांपेक्षाही बालीश असताना जर मि त्याकडे गांभीर्याने पाहीलं असेल, त्याने प्रभावीत होऊन नाडी बघीतली असेल तर आपले वरील उत्तर संपूर्ण अप्रस्तूत आहे हे एव्हांना कोणाला सहज उमगेल (तूम्हाला सूध्दा).
:( :( :( :(

साहेब प्रश्न / आरोप हे नाडी केद्रांबाबतच होणार ना ? उगीच तूम्हाला आलेला अनूभव खरा अथवा खोटा अथवा आणखी कसं ? यावर कोण चर्चा करणार ? आपल लेखन हे नाडीबाबत कोणत्याही हेतूने असेल पण ते फार एकतर्फी, मनात विवीध शंका निर्माण करणारं (ज्याची समर्पक उत्तरे आजतागायत आपण दीली नाहीत) दीशाभूल करणारं व अत्यंत बेसलेस भासतं हे नम्रपणे नमूद करतो. उगीच मला आलेला अनूभवाच्या नावाखाली जर लिखाण असेल तर असे एकतर्फी लिखाण करताना तशी तळटीप वा इशारा आपल्या नाडी विशयक लीखाणात का देत नाही ? की हा अनूभव व्यक्तीप्रमाणे कमी जास्त वेगवेगळा अथवा चूक वा बरोबर ठरेल याची कोणतीही खात्री नाही, पूढील पावले व आर्थीक भूर्दंड स्वजबाबदारीवरच उचलावा. लेखनाबाबत कधीही तक्रार केलीत वा शंका आल्या तर त्याचे समाधान माझ्याकडून केले जाणार नाही.

आर्या अंबेकर's picture

8 Jun 2011 - 1:06 pm | आर्या अंबेकर

नाडीपट्ट्यांविषयी प्रथमच वाचते आहे. आपली माहिती उत्तम आहे. ज्ञानात भरच पडली थोडीफार!

मित्र हो,

"तिरकसतीरंदाज" ही पदवि देउन मोकळे.

माझ्या या लेखनातील महत्वाच्या मुद्याला वगळून तिरंदाजी करणाऱ्यांनी तिरप्या प्रश्नांची सरबत्ती जरूर करावी ...
मात्र त्यासोबत बी प्रेमानंदांनी केलेल्या वा न केलेल्या कामगिरीवर काही विचार व्यक्त करावेत ही विनंती.
जे त्यांना करता आले नाही किंवा त्यांनी करायचे टाळले त्याबाबत आपण काही करू शकाल काय?
करायची इच्छा असल्यास मी माझ्या बाजूने आपल्या अभ्यासकार्यास मदत करायला तयार आहे.
आर्या व अनेक नव्या मिपाकरांनी यात पुढाकार घ्यावा.

मित्र हो,
बी प्रेमानंदांनी केलेल्या वा न केलेल्या कामगिरीवर काही विचार व्यक्त करावेत ही विनंती.

ते न करता अन्य गप्पा व तर्क लढवून किती दिवस खोटे पणा लपवणार.
जे त्यांना करता आले नाही किंवा त्यांनी करायचे टाळले त्याबाबत आपण काही करू शकाल काय?
करायची इच्छा असल्यास मी माझ्या बाजूने आपल्या अभ्यासकार्यास मदत करायला तयार आहे.

आत्मशून्य's picture

10 Sep 2011 - 12:43 am | आत्मशून्य

नाडी भविष्य पहायला गेलेला व्यक्ती मूर्ख वा भोळसट नक्कीच नसतो...

पण आपण तसे बनलो होतो हे भविष्य पाहून आल्यावर मात्र जाणवते. १००%* लोकांचा हा अनूभव आहे की नाडीपट्टीमधील वर्तवलेले भविष्य** हे खरे ठरत नाही.

*१००% हा आकडा मी प्रत्यक्ष चौकशी केलेल्या लोकांशी संबधीत आहे. ज्यांना भेटलो नाहीते यात गृहीत धरू नयेत.
** भूतकाळातील ५-६ गोश्टी एकदम अचूक पण भविष्य ? नोही. प्रचंड तफावत.

शशिकांत ओक's picture

12 Sep 2011 - 5:30 pm | शशिकांत ओक

आत्मशून्य,
आपले उत्तर मला नेहमीचा भावते कारण तुम्ही नाडी ग्रंथांचा अनुभव घेतला आहेत. त्यात मिळालेले कथन तुमच्या संबंधी अचुक आलेले नाही ते का हा शोधाचा भाग आहे. असो.
त्यावर शाब्दिक चर्चा आपापसात करून उपयोग नाही कारण तो तुमचा वैयक्तिक अनुभवाचा भाग आहे.
अशा किती तरी आपल्यासारख्या केसेस आहेत कि त्यांची भविष्य कथने चुकली त्या बाबत मी माझ्या पुस्तकात काही उदाहरणेही दिलेली आहेत. आपण ती वाचली पण असतील. असो.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.