ओक साहेब नाडी केंद्रवाले गप्प का? भाग २ पुढे चालू...
आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात असून माझे (ईश्वरनजींचे) स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे.
पुर्व संदर्भ - १. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी?
बी.प्रेमानंदांचे उत्तर – मला काही मोजके (a few) प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळाल्यावर तो (नाडीवाचक) आत गेला आणि त्याने आतून एक ताडपट्टी आणली. त्यातून त्याने जी वाचायला सुरवात केली त्यातून माझ्या जीवनाचा संपूर्ण भूतकाळ अगदी १००टक्के बरोबर होता. पण ते नाडीवाचन जे केले गेले ते चुकीच्या म्हणजेच माझ्याबरोबर आलेल्या एका लेडी डॉक्टरच्या पत्रिकेवरून केले गेले होते.(बी प्रेमानंद आपल्या लेखात म्हणाले होते की नाडीवाचकाला गोंधळात टाकण्यासाठी त्यांनी व बरोबर आलेल्या लेडी डॉक्टरनी आपल्या पत्रिकांची आदलाबदल करण्याची हातचलाखी केली होती.) नंतर असे समजले की आमची व आमच्या आई-वडिलांची नावे त्या पत्रिकांवर लिहिलेली होती. ती व अन्य माहिती नाडी वाचकांनी बेरकेपणाने गर्भित (सटल) प्रश्न विचारून विचारून आमच्याकडून मिळवली होती. खरेतर नाडीभविष्य पहायला आलेल्यात आपली काही माणसे (stooges) बेमालूमपणे मिसळून त्यांच्याकडून व नाडीवाचकाकडून माहिती अलगदपणे मिळवून ती ताडपत्रे बनवली गेली होती. (अधोरेखित ओकांचे) य़ात आश्चर्यचकीत होण्याची काहीच गरज नाही. कारण जातकाकडून चलाखीने माहिती काढून तीच त्याला पत्रिकात पाहून भविष्य म्हणून सांगण्याची युक्ती अन्य ज्योतिषी देखील इतकी सर्रास वापरतात. हीच साधी चलाखी नाडीवाले करतात.
माझे (ईश्वरनजींचे)स्पष्टीकरण –
१) अशा तऱ्हेचा लेखात की ज्यात नाडी पट्टयांचे खोटेपणा उघड केला गेल्याचा दावा केला जातो, अचुक व नेमकी माहिती अतिशय महत्वाची ठरते. मात्र संपूर्ण लेखात ते दोघे कोणत्या तारखेला, कोठल्या नाडी केंद्रात जाऊन आपली नाडी पट्टी पाहिली, त्यावेळी नाडीरीडर कोण होता. याचा सालेम या गावाच्या नावाव्यतिरिक्त पुसटसा उल्लेखही त्यात नाही.
२) दक्षिण भारतातील प्रचलित नाडी पट्टी शोधण्याचे काम व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्याच्या ठशांवरून केले जाते. त्यासाठी नाडीकेंद्रात जाताच ठसे घेतले जातात. पत्रिका किंवा कुंडली जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर ती नाडीपट्टीतून येणाऱ्या कुंडलीशी ताडून पहायला उपयोगी पडते. कुंडलीची-पत्रिकेची मागणी नाडीपट्टी शोधायला केंद्रातून केली जात नाही. बी प्रेमानंदांच्या संपूर्ण लेखात त्यांनी व बरोबरच्या व्यक्तीने अंगठ्याचा ठसा दिला असा ते उल्लेख करत नाहीत. हे नमूद करण्यासारखे आहे.
३) त्यांनी नाडी भविष्याला ठोकभावात थोतांड ठरवण्याबद्दलचे त्यांचे मत फक्त एका नाडी पट्टीच्या अनुभवावरून आधारित आहे. एका कुठल्यातरी निनावी केंद्रात कुंडलीवरून घेतलेल्या अशा परीक्षणातून नाडी पट्टीत व्यक्तीची नावे व अन्य मजकूर कोरून लिहिलेला असतो का नसतो हे ठरवण्यासाठीचा तो अंतिम पुरावा म्हणून मानता येणार नाही. उलट त्यांनी सामान्यतः नाड़ीकेंद्रातून दिली जाणारी वही व कॅसेट मिळवली किंवा नाही नसेल तर का मिळवली नाही या बाबत पुर्ण मौन पाळले आहे. त्यावहीत काय लिहिलेले होते याबद्दल त्यांन चकार शब्द लिहिलेला नाही. कारण आम्ही नाडीपट्टतील मजकूर एका ४० पानी वहीत प्रचलित तमिळ भाषेत ग्राहकाने न मागता लिहून देतो. तशी त्यांना मिळालेल्यावहीतील मजकुराची शहानिशा बी. प्रेमानंदांना फुकट करून घेता आली असती. पण नाडीग्रंथांना एका फुटकळ तो ही हातचलाखी करून मिळवलेल्या अनुभवावरून त्यांना संपुर्ण नाडी ग्रंथांना एका झटक्यात थोतांड म्हणायची घाई झाली होती. शास्त्रीय प्रयोगाचे पुनःपुन्हा परीक्षण हा निष्कर्ष त्यांनी का पाळला नाही याची कान उघाडणी कोण करणार?
२. रिसबुडांचा प्रश्न – जेंव्हा त्या नाडी वाचकाने त्या लेडी डॉक्टरच्या नावाचा व व्यसायाचा अचुक उल्लेख सांगितला त्यात ती बालरोगतज्ञ( Paediatrician) आहे की बाळंतपणाची (gynec) तज्ञ आहे ह्या फरकाला फारसे महत्व रहात नाही.
बी.प्रेमानंदांचे उत्तर – नाही कसा, त्यामुळे फार मोठा फरक पडतो. कारण नाडी वाचक तिच्या बद्दलचे भविष्यकथन माझ्या कुंडलीवरून करत होता. यारून असे सिद्ध होते की तो ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून ते करत नव्ह्ता. आम्ही आमच्या कुंडल्या आमची व आमच्या पालकांची नावे खोडून त्याला दिल्या होत्या. त्याच्या चुकीच्या कुंडल्यांवर आधारित भविष्यकथनामुळे आम्हाला हसू दाबुन ठेवणे अशक्य झाले.
माझे (ईश्वरनजींचे)स्पष्टीकरण –
१. श्री.प्रेमानंद आपण केलेल्या हातचलाखीचा उगीचच गवगवा करत आहेत. कारण त्यांनी कुंडल्यांची अदलाबदल केल्याने नाडी वाचकाच्या दृष्टीने फारसा फरक पडत नाही. बऱ्याचदा अनेकजण आपल्याजवळच्यांच्या नाडी पट्ट्या पहायला हाताच्या आंगठ्याचे ठसे त्यांच्या अपरोक्ष आणतात. जेंव्हा नाडीपट्टी सापडते तेंव्हा समोर बसलेल्याकडे पाहून भविष्य कथन करतात त्याचा अर्थ असा होत नाही की ज्याने ते ठसे प्रस्तूत केले त्याचे ते भविष्यकथन असते. पट्टी वाचली जात असताना ती व्यक्ती समोर हजर आहे किंवा नाही याचा यामुळे फरक पडत नाही.
२. या ठिकाणी ते म्हणतात की आम्ही आमच्या कुंडल्यांवरील नावे खोडून त्याला दिल्या होत्या. पण त्या आधीच्या उत्तरात ते म्हणतात (अधोरेखित केलेले वरील वाक्य वाचा ) की आमच्या कुंडल्यांवरील नावे वाचून त्यांनी नाडी पट्टीतील माहिती असल्याचे भासवले. यातले खरे काय ? मनाला येतील ती उत्तरे ठोकुन द्यायची असा खाक्या किती दिवस कामाला येणार?
३. रिसबुडांचा प्रश्न - मला तर उलट त्या नाडीवाचकाच्या हातचलाखीवर हसण्याऐवजी त्याने १०० सत्यमाहिती शोधण्याच्या त्याच्या कसबाचे कौतुक वाटले असते....
भाग २ समाप्त पुढे चालू...
प्रतिक्रिया
7 Apr 2011 - 2:08 pm | आचारी
मी अहमदनगर मध्ये राहतो मला जवळ्चे नाडि केद्राचा पत्ता मिळेल काय?
7 Apr 2011 - 9:42 pm | शशिकांत ओक
आचारी व अन्य मित्र हो.,
इथे वा अन्य ठिकाणी काहींनी नाडी केंद्रांचे पत्ते सांगावेत अशी फरमाईश केली आहे. आपली गरज जाणतो.
तथापि मला याठिकाणी असे पत्ते देणे प्रशस्त वाटत नाही कारण त्यामुळे मी नाडी केंद्रवाल्यांची जाहिरात करत आहे असा संशय निर्माण होतो. आपण माझे नाडी ग्रंथ भविष्य किं ५० रु, नितीन प्रकाशन पुणे हे पुस्तक वाचावे. त्यात महाराष्ट्रातील ५० नाडी केंद्रांचे पत्ते फीज आदि माहिती संकलित केली आहे.अघिक माहितीसाठी संपर्क खालील मो. क्रमांकावर रात्री ९ नंतर करावा ही विनंती.
8 Apr 2011 - 7:26 am | शिल्पा ब
<<<त्यामुळे मी नाडी केंद्रवाल्यांची जाहिरात करत आहे असा संशय निर्माण होतो. आपण माझे नाडी ग्रंथ भविष्य किं ५० रु, नितीन प्रकाशन पुणे हे पुस्तक वाचावे.
सगळ्या नाडीकेंद्रांची जाहिरात करण्यापेक्षा स्वतःच्याच पुस्तकाची जाहिरात केलेली काय वाईट!! याला म्हणतात व्यवहारीपणा.
8 Apr 2011 - 9:52 am | ईश आपटे
शिल्पा ब
ह्याला म्हणतात कोति मनोवृत्ती.........
कुणी ही काही नवीन चांगले करु लागला की , तो जाहिरात करतोय, त्याला कमिशन मिळतय म्हणून ओरडायच !!!!!!!!!!!!!!
अन पुन्हा मराठी माणूस मागे म्हणून खंत करायची..............
अशा प्रतिक्रिया वाचुन वाईट वाटत......................... केव्हा मराठी लोक न्यूनगंडातुन बाहेर येणार?
12 Apr 2011 - 7:59 pm | शिल्पा ब
अगदी अगदी...मला तर भारीच न्युनगंड आहे सगळ्याचा. आता हेच बघा ना, एवढं नाडी नाडी करुन प्राचीन ज्ञान वाटायचा प्रयत्न करताहेत तर मी त्याला आपला खो घालायचा प्रयत्न करतेय. जळ्ळी मेली सवय!!
8 Apr 2011 - 10:23 am | शशिकांत ओक
ईश,
आपण योग्य शब्दात समज दिलीत याबद्दल....
12 Apr 2011 - 7:39 pm | शशिकांत ओक
पहिला पाढा पंचावन्न!!
गगनविहारी आणि आपणासारखे अनेक नव मिपा मित्र हो,
नाडी ग्रंथ भविष्य हा विषय गेले काही वर्षे चर्चेत आहे. थोडक्यात असे की आपण असे मानतो की आपली रोजच्या व्यवहारातील नावे (अवकडहाचक्रातील नव्हे) आपल्या घरातील आईवडिलांच्या किंवा वरिष्ठांच्या सल्याने वा आवडीने ठेवले जाते. मात्र तीच नावे (आई, वडील, विवाहित असेल तर जोडीदाराचे) जर तमिळसारख्या सुदूर राज्यातील भाषेतील समजायला अवघड लिपीत, आपण निरा पितो त्या ताडाच्या झावळ्यांच्या कापून तयार केलेल्या पत्राप्रमाणे पट्ट्यात शिक्षण, नोकरी-व्यवसाय, जन्म दिनांकासकट, रामायण, महाभारत ग्रंथांत निर्देशित प्राचीन महर्षींच्या लेखनातून कोरून ठेवलेला आहे असे आढळले तर तो एक अविश्वसनीय प्रकार मानला पाहिजे. महर्षी आपापल्या नावानी सांगितल्याजाणाऱ्या ताडपत्राच्या पानातून व्यक्तीचे भविष्य कथन करतात. दैवी उपाय सुचवतात.
आता असे काही म्हटले की बुद्धिवादी विचारकांच्या कपाळाला आठ्या पडतात आणिअसे काही असूच शकत नाही असे ते अनुभव न घेताच म्हणू लागतात.
माझा या विद्येशी काही वर्षांपुर्वी परिचय झाला. आधी बनवाबनवी आहे असे वाटून आणि नंतर पुन्हा पुन्हा अनुभव घेऊन त्यातील सत्यता काय असावी याचा शोध घेण्यासाठी माझ्या हातून लिखाण झाले. ते पुस्तक रुपाने बाजारात आहे. त्यातून आपल्याला या विषयाची साद्यंत माहिती मिळेल.अशी आशा आहे.
भारतात आता अनेक नाडी केंद्रे स्थापित झाली आहे. परंतु त्या केंद्रातील लोक काही ना काही कारणांनी बुद्धिवादी विचारकांच्या म्हणण्याला दुर्लक्षुन उत्तरे द्यायचे टाळतात आणि त्यातून आणखी शंका व संशय बळावतो.
एका नाडी केंद्रातील संचालकांशी याबाबत चर्चा केली असता, त्यांनी बी. प्रेमानंदांच्या काही छापील लेखांतून सुचित केलेल्या विधानांवर आपले काय मत आहे ते समजून घेऊन मी वाचकांच्या विचारार्थ पुढे ठेवत आहे. लेख १९९६ -९७ च्या सुमाराचा आहे. पण हा विषय न शिळा होणारा आहे म्हणून त्याची मिपावाचकांना झलक मिळावी म्हणून हे लेखन केले आहे.
विज्ञानवादी लोक नाडी ग्रंथांना थोतांड ठरवण्याच्या नादात किती व कशी अशास्त्रीय विधाने करतात. जे नेहमी प्रत्यक्ष प्रमाण, अनुभवावर आधारित निष्कर्षांवर भर देतात तेच लोक नाडी ग्रंथांची त्यातील भाषेची व मजकुराची साधी प्राथमिक कसोटी करायला का टाळतात व मात्र गणिती आकडेमोडीतून व तर्कांवरून नाडी ग्रथांना असंभवनीय म्हणून थोतांड मानतात. प्रत्यक्षात नाडीग्रंथांचे सत्य स्वरुप काय आहे याचा अनेकानेक प्रयोग करून पडताळा घ्यावा व नंतर त्यांना वाटल्यास आपल्या तर्काधिष्ठित विचारांवर जरूर अटळ राहावे. असे करायला काय काय करायला हवे याचे मार्गदर्शन ही या लेखाचा नंतरचा भाग आहे.