"नाडी पट्टया ऑर्डर प्रमाणे आत खोलीत बसून तयार केल्या जातात" - अत्यंतिक कल्पनाविलास - भाग ४

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
15 Apr 2011 - 6:17 pm
गाभा: 

आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
प्रेषक – जी. ईश्वरन पुण्यातील नाडी केंद्राचे संचालक.
रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात असून माझे (ईश्वरनजींचे) स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे.

४. प्रश्न – असे मानले जाते की शके ३०० च्या सुमारानंतर भविष्यशास्त्राच्या संदर्भात ऋर्षींचा उल्लेखांना सुरवात होते.त्यामुळे अस्सल नाडी पट्यांचे आयुष्य १७०० वर्षांपेक्षा जुने नसावे. हे मात्र नक्की की नाडी पट्ट्यात ऋषींचे उल्लेख येतात.
उत्तर – ओरिजिनल किंवा अस्सल ताडपट्टया असतात हे मानणेच मुळात चुकीचे आहे. त्या पट्ट्या ग्राहक जेंव्हा ते ऐकायला येतो त्यावेळी तयार केल्या जातात. पण त्या प्राचीन दिसाव्यात यासाठी त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते. तथापि त्या पट्यांचे आयुष्य मात्र शोधता येईल. त्यावरून नाडी पट्टयांचा खोटेपणा सिद्ध करता येईल.
माझी प्रतिक्रिया –
1. या ठिकाणी नोंद करायला हवी की जर्मनीतील एका थॉमस रिटर नावाच्या व्यक्तीने भारतातून एक नाडी पट्टी मिळवून त्याची कार्बन १४ कसोटी त्यांच्या देशातील अत्यंत प्रगत अशा प्रयोग शाळेत केली आहे. शिवाय त्यांनी त्या नाडी पट्टीतील मजकुराची जर्मनीतील तमिळभाषा तज्ज्ञांकडून स्वतंत्रपणे करवून घेतली आहे. त्यात त्या तज्ज्ञांनी असे म्हटले की पट्टीतील मजकूर कोणत्या तरी धार्मिक ग्रंथांचा किंवा पौराणिक कथांचा नसून खरोखरच कोणा एकाचे भविष्यकथन आहे. कार्बन कसोटीच्या निर्णयात असे म्हटले गेले की ती पट्टी कमीतकमी ३५० ते ४०० वर्षे जुनी असावी. जर एका परदेशी व्यक्तीला कार्बन कसोटी करता येत असेल तर आम्हा भारतीयांना ती करायला कोणी आडवले आहे?
2. विविध नाडी केंद्रातून असे अनेकदा सांगितले जाते की सध्याच्या उपलब्ध नाडी पट्ट्या तंजावूरच्या सर्फोजी राजे भोसले (१७९२ ते १८३२) या मराठा राजाच्या काळात पुनर्लेखित केल्या गेल्या. त्यामुळे असे शक्य आहे की ताडपट्टयावरीन मजकूर प्राचीन असावा मात्र त्यामानाने ताडपट्ट्या ३०० वर्षांच्या आसपासच्या जुन्या असाव्यात. हे म्हणणे जर्मनीतील कार्बन १४ कसोटीच्या शोधकार्याच्या उपपत्तीवरून ही सिद्ध होते.

५. प्रश्न - मी आपणांकडून हे जाणून घेऊ इच्छितो की तुम्ही म्हणता की तुमचा भूतकाळ त्यांनी अगदी १०० टक्के तंतोतंत सांगितला. त्याने तुमच्या कडून सर्व माहिती कशी काढून घेतली (थोडक्यात तुम्ही त्याच्या खोटेपणाला कसे उघडे पाडू शकला नाहीत) त्याचे तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? आपल्या लेखात याचे उत्तर मिळत नाही.
उत्तर – वस्तुस्थिती अशी आहे की आपण माझा लेख अत्यंत काळजीपुर्वक वाचलेला नाही.(श्री. प्रेमानंदांनी रिसबुडांनी आपला लेख नीट काळजीपुर्वक वाचलेला नाहीत असे लेखात आधुनमधून फटकारले आहे. त्यातलाच हा एक उल्लेख)
ती अशी -
१. नंतर असे लक्षात आले की कुंडल्यांवर आमची व आमच्या आई-वडिलांची नावे लिहिलेली होती. अन्य माहिती गर्भित (सटल) प्रश्न विचारून मिळवली गेली.
२. काही प्रश्न विचारून त्यांची उत्तरे मिळवल्यावर तो (नाडीवाचक) आत गेला.त्याने एक (सुटी) ताडपट्टी आणली. (म्हणजे प्रश्न विचारते वेळी वाचल्या गेलेल्या माळेसारख्या दोरीने ओवून बंद केलेल्या ताडपट्टयांच्या व्यतिरिक्त) आणि त्यातून त्याने आमचे भूतकाळाचे वर्णन वाचले जे १०० टक्के सत्य होते.
३. सत्यता ही आहे की नाडीकेंद्रातर्फे काही लोक पेरून ठेवलेले असतात त्यांनी व नाडीपट्या शोधायसाठी नाडीवाचकाने विचारलेल्या प्रश्नातून सर्व माहिती मिळवली जाते. नंतर त्या आधारे नाडीपट्टी बनवून वाचली जाते. चुकीची उत्तरे दिली गेली तर भविष्य कथन ही चुकेल. तुम्ही दुसऱ्याची पत्रिका आपली म्हणून दिलीत तर भविष्यकथन तुमच्याकडून काढलेल्या माहितीच्या आधारे होईल ना की त्या पत्रिकेच्या आधारावरून. आपले नाव व व्यवसाय सोडता जी बरीचशी माहिती सांगितली जाते ती त्या ताडपट्टीवर नसणार. जे भविष्य कथन म्हणून केले जाते ते ढोबळमानाने सर्वांना लागू पडेल असेच असते.
माझी (ईश्वरनजींची)प्रतिक्रिया –
1. मी आधी म्हटल्याप्रमाणे व्यक्तीची नाडीपट्टी स्त्रियांच्या डाव्या व पुरुषांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या ठशावरून शोधली जाते. पत्रिका वा कुंडलीवरून नाही. श्री. प्रेमानंदांनी अंगठ्याच्या ठशांचा पुसटसा देखील उल्लेख आपल्या लेखात केलेला नाही. हे कसे काय? खरे तर त्यांच्यासारख्या प्रखर बुद्धिवादी व्यक्तीने या बाबत खुप ढोल पिटायला हवे होते, कि अंगठ्यांच्या ठशांच्यावरून भविष्य कथन करतो असे म्हणणे म्हणजे निव्वळ देखावा असावा. आदि.
2. त्यांचे हे कथन की तो नाडीवाचक आत गेला व त्याने आतून आणलेल्या एका ताडपट्टीतून त्यांचे भविष्यकथन करण्यात आले. त्यात त्यांचा भूतकाळ १०० टक्के बरोबर आला. यात काही गफलत आहे. कारण सर्व नाडी पट्टयांना असलेल्या भोकातून दोरी माळेप्रमाणे ओवून बंद केलेल्या असतात. अशा ताडपट्ट्या दोन लाकडी बॅटन सारख्या पट्ट्यांच्यामधे घट्ट बंद करुन वर उरलेल्या दोरीने ते पॅकेट जाम गच्च बांधून टाकले जाते. जेंव्हा केंव्हा नाडी पट्टीत आपली पट्टी सापडली असे ग्राहक म्हणतो तेंव्हा ती पट्टी त्या ओवून बांधलेल्या पॅकेटमधलीच असते. त्त्यामुळे श्री. प्रेमानंद कोणत्या नाडीकेंद्रात गेले होते याबद्दल प्रश्न पडतो. अशी एक सुटी नाडीपट्टी आतल्या खोलीतून आणून जर भविष्यकथन केले जात होते तर त्याच वेळी त्यांनी वाचकाला व केंद्र प्रमुखाला तशी विचारणा का केली नाही? आश्चर्य असे की त्यांच्यासारखा प्रत्येकाचा खोटारडेपणे उघडे पाडण्याच्या कलेत तज्ञ, शिवाय जो स्वतः कुंडल्यांची अदलाबदल करण्याची हातचलाखी करतो त्यालाही नाडी वाचकांच्या खोटेपणाला उघड करता आले नाही ? ‘असे असेल-तसे असेल’ असे शुष्क तर्क करण्यापलिकडे ते गप्प बसतातच कसे? आणि त्या नाडी वाचकाने केलेल्या ‘भविष्यकथनात १०० टक्के सत्य सांगण्यात आले’ या भुलावणीला बळी कसे पडलो असे सांगतातच कसे व का? पुन्हा पुन्हा नाडी केंद्रांना स्वतः वा आपले तरबेज चेले पाठवून नाडी केंद्रांचा खोटेपणाचा धंदा आजही चालवू का देतो?
3. याचे साधे व सोपे कारण असे आहे की श्री. प्रेमानंदांनी वर सुचवलेला पर्याय नाडी पट्टया ऑर्डर प्रमाणे आत खोलीत बसून तयार केल्या जातात वगैरे सर्व अत्यंतिक कल्पनाविलास आहेत.

भाग ४ समाप्त ... पुढे चालू...

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

15 Apr 2011 - 11:55 pm | आत्मशून्य


ती पट्टी कमीतकमी ३५० ते ४०० वर्षे जुनी असावी.

ती पट्टी कमीतकमी ३५० ते ४०० हजार वर्षे जुनी असायला नको का ?

विविध नाडी केंद्रातून असे अनेकदा सांगितले जाते की सध्याच्या उपलब्ध नाडी पट्ट्या तंजावूरच्या सर्फोजी राजे भोसले (१७९२ ते १८३२) या मराठा राजाच्या काळात पुनर्लेखित केल्या गेल्या.

त्यांच्या अशा सांगण्याला केवळ ते संगतात यापलीकडे काही महत्वाचा पूरावा आहे काय ? तसेच असे करायला तीतकेच महत्वाचे कारण आहे काय ? इतके मोठे लेखन ३००-४०० वर्षांपूर्वी घडले असताना इतीहासात याची नोंद का नाही ? तसेच इतर कोण्या पौराणीक अथवा ऐतीहासीक व्यक्तींनी त्यांची पट्टी पाहील्याची अथवा त्यांच्या सोबतीच्या लोकांनी तसे केल्याची कोठे पूसटशी देखील नोंद का नाही ? हे पट्टीवाचन वगैरे सगळं अचानक सध्याच का केलं जातय ? जर का हे रूशीमूनींच्या काळापासून घडत आहे अस्तीत्वात आहे तर ?

माझा चमत्कारांना वीरोध नाही ते घडतात, घडले आहेत यावर माझा ठाम वीश्वास आहे... पण....नाडीरीडर भूतकाळ व्यवस्थीत सांगतात पण भवीष्यकाळ नाही, वाइट गोश्टी खर्‍या ठरतीलच पण चांगल्या नाही, तस्च जर माझी पट्टी माझ्या समोर वाचली आहे तर ती कायमस्वरूपी मला का देऊन टाकली जात नाही ? एकूणच माझ्या मनातील शंका बघता व त्यांना तूम्ही ऊत्तरे देण्याचे सोयीस्कर पणे ज्या प्रकारे टाळत आहात त्या वरून जर नाडी रीडींग (फोर अरग्यूमेंट सेक)चमत्कार मानला तरी ही गोश्ट अत्यंत अमंगल/अनीश्ट पध्दतींवर आधारीत आहे असे का मानू नये ?

नोट : मी आपले नाडीग्रंथांवरील लीखाण केलेले पूस्तक वाचले आहे. ते वाचून सूध्दा मनात प्रश्न आहेतच.


ग्राहक जेंव्हा ते ऐकायला येतो त्याचवेळी इथे लीहता येइल काय ?

हा प्रश्न तुम्ही बी प्रेमांदांना (ते वारले पण त्यांच्या इथल्या चेल्या ना)विचारताय ना कारण तेच तसे म्हणतात. पट्या तयार करायची प्रक्रिया कशी असते हा प्रश्न प्रेमानंदांनी उत्तर द्यायचा आहे. ते तसे उत्तर देतात की नाहीत ते पुढे कळेल. नाडीकेंद्रवाल्यांना यावर काय म्हणायचे आहे ते नंतर येईलच.

वाइट गोश्टी खर्‍या ठरतीलच पण चांगल्या नाही,

या वरून गोष्टी घडतात फक्त आपल्याला हव्या त्या प्रमाणे त्या घडत नाही अशी आपली तक्रार आहे. पण त्यावर असे म्हणता येईल काही काळ थांबा. कदाचित अपेक्षित चांगल्या घटना ही होतील. नव्हे होतात. हाच अंदाज माझ्या बहिणीने केला होता. तिने नंतर शांति-दीक्षा केल्यावर परिस्थिती बदलली असे तिचे मत झाले. पाहू तुमच्या बाबतीत काय होते ते.

माझी पट्टी माझ्या समोर वाचली आहे तर ती कायम स्वरूपी मला का देऊनाटाकली जात नाही ?

या लेखमालेचा उद्देश अशा प्रश्नांवर नाडीकेंद्रवाल्यांचे उत्तर काय आहे ते समजून घेणे हा आहे. पाहू ते काय म्हणतात ते.. मग तुम्हाला काही विचारायचे असेल तर आणखी लेखातून ते कळावे.
हलकेच घ्या ...
एकदा एका केशकर्तनालयात ग्राहकचे कर्तन जरा जास्त झाल्याने गोट्यावरून हात फिरवत तो उखडला.त्यावर कर्तनकाराने झाडूने केस एकत्र केले व त्यांच्या हाती देत म्हणाला, आपला माल आहे हवा तसा लाऊन घ्यावा,

आपण म्हणता तसे नाडी ग्रंथ पाहून आल्यावर प्रश्न संपत नाहीत उलट ते आणखी निर्माण होतात असा माझा ही अनुभव आहे.

या वरून गोष्टी घडतात फक्त आपल्याला हव्या त्या प्रमाणे त्या घडत नाही अशी आपली तक्रार आहे.

नाही , तसा गैरसमज कृपया करून घेऊ नये. तक्रार नक्की काय करायची आहे कीव्हां नाही हे सर्व शंकासमाधानानंतरच ठरवता येइल, तो पर्यंत मला गैरसमजाच्या अथवा आरोपांच्या ठीकाणी ऊभे करू नका. काही लोकांशी चर्चा झाली त्यामधे "वाइट गोश्टी खर्‍या ठरतीलच पण चांगल्या नाही अथवा भूतकाळ योग्य असतो पण भवीष्य योग्य ठरेलच असे नाही" हा सूर ऐकायला मीळाला.

तूमचेच ऊदाहरण घेऊन या अनूशंगाने एक प्रश्न ऊपस्थीत करतो, आपण वयाच्या ४५व्या वर्षी सर्वप्रथम नाडी पाहीली. मग वयाच्या ४६व्या वर्षापासून ते आज पर्यंत आपल्या संदर्भात कीती टक्के वर्तवलेल्या घटना अचूक ठरल्या (भूतकाळ नको फक्त ४६ व पूढचे सांगावे)?

माझे स्वतःच वीचाराल तर मला सूखाच अजीर्ण होइल की काय असं वाटू लागलं होतं माझी पट्टी ऐकल्यानंतर. सगळ काही फील गूड लीहलं होतं. म्हणूनच मी सूरूवातीला थोडा अचंबीतही झालो होतो. पण जेव्हा तूम्ही सांगीतलंत की कर्मसीध्दांत सीध्द व्हायला चूकीचे भवीश्य नाडीरीडर मूद्दाम सांगतात तेव्हां मात्र माझ भवीष्य ऐकून खात्रीच झाली की भलेही त्यांना माझ्या भवीष्याचे ज्ञान झाले असेल(वीशेषतः वाइट घटनांचे जे माझ्या पासून दडवण्यात आले असा संशय आहे), पण मला ते "कर्मसीध्दांत सीध्द व्हायला" सांगण्यात आलेले नाहीये, म्हणून मन खरोखरच धास्तावलं आहे , की असे कोणते भोग भोगणे , दीव्य पार करणे आता माझ्या नशीबी आहे व माझ्या जीवाचे बरे वाइट तर होणार नाहीना :(

कर्मसीध्दांत सीध्द होण्यावरून वीचारतो, असा आयूश्यातील एक क्षण दाखवा जेव्हा कर्मसीध्दांत आपल्याला लागू होत नाही ? संपूर्ण आयूष्यच आपण ते जगत असतो. मग जर या कारणा वरून भवीष्य दडवले जात असेल, चूकीचे सांगीतले जात असेल तर अशा कोणाचे नाडीरीडींग बरोबर येइल ?

एकदा एका केशकर्तनालयात ग्राहकचे कर्तन जरा जास्त झाल्याने गोट्यावरून हात फिरवत तो उखडला.त्यावर कर्तनकाराने झाडूने केस एकत्र केले व त्यांच्या हाती देत म्हणाला, आपला माल आहे हवा तसा लाऊन घ्यावा,

एकदा एका नाडीवाल्याने पण नाडी कापली, तीचावर हात फीरवून बघीतला तर लक्शात आलं ती कमी भरली,मग मी सूध्दा त्याच्यावर ऊखडलो तर तो उलटा म्हणतो कसा की जास्त नाडीचे जास्त पैसे मोजावे लागतील.

आपण माझ्या (अथवा इतरांनी ) वीचारलेल्या प्रश्नाची कीमान नोंद घेतली आहे याची जेव्हां पोच देता तेव्हांच यामधे यावीषयी अजून माहीती मीळेल असा हूरूप व ऊत्साह वाढतो त्याचा परीवर्तन अनूभवाच्या कसोटीत वीश्वासामधे होण्यासाठी अर्थातच वाट पहायची माझी तयारी आहे. पण म्हणून प्रश्न नीर्माण होणे थांबणार नाही. व मूद्दा हाच आहे वर्तमानातील नीर्माण होणारे, झालेले प्रश्न नाडीग्रंथ सोडवू शकत नसेल तर भूत , भवीश्याचा मागोवा ते कसे घेणार ?

शशिकांत ओक's picture

20 Apr 2011 - 10:31 pm | शशिकांत ओक

आणि इतरांचा अनुभव एक सारखाच असेल असे नाही.
माझ्यासंदर्भात कथनकेलेल्या व नंतर १०० टक्के सत्य घडल्या काही गोष्टी मी सादर केल्या आहेत त्याशिवाय काही व्यक्तीगत असल्याने त्यांची कथने इथे करणे प्रशस्त वाटत नाही. तरीही ज्या सादर केल्या त्यातून आपणांस झलक मिळाली असेल.

आत्मशून्य's picture

21 Apr 2011 - 3:18 am | आत्मशून्य

आपला अनुभव आणि इतरांचा अनुभव एक सारखाच असेल असे नाही.

अगदी बरोबर, पण म्हणून जर मला अनूभव आला नाही तरी इतरांना तो येइल असे मी म्हणावे अशी आपली अपेक्षा नक्कीच नसणार. आणी मला तर तसं का घडल हे जाणून घ्यायची ऊत्सूकता आहेच.

एक व्यक्ती म्हणून माझ्या(व प्रत्येक इच्छीत व्यक्तींच्या) अनूभवांच्या कसोटीवरसूध्दा नाडीभवीश्य सकारात्मक ऊतरणे तीतकेच महत्वाचे नाही काय ?

जसं आपल्याला अनूभव आले तसच मला सूध्दा यावा हीच प्रामाणीक इच्छा माझ्या मनात आहे, पण अजून तस काही घडले नसल्याने(जसं प्रेडीक्ट केलं आहे त्यानूसार) मन बरच सशांक आहे.

बर आता अजून तसं का घडल नाही याच ऊत्तर कोणाचा "कर्म सीध्दांत साध्य व्हावा म्हणून" हे असेल तर मग त्या अनूशंगाने माझ्या भवीतव्यावीशयी भीती मी माझ्या वरील प्रतीक्रीयेत आधीच व्यक्त केली आहे :(

आत्मशून्य
आपल्याला भय नक्की कशाच वाटत आहे मी समजलो नाही..
कधी कधी आपल्या आयुष्यात थ्रिलींग काही तरी घडावे असे आपल्याला वाटत असते, तसे काही नाडी पट्ट्यातुन न निघाल्याने ही नैराश्य येउ शकते.
माझ्या मते जर पुढील घटना चांगल्या असतील, तर आपण समाधानाने त्यांचा स्वीकार करावा असे मला वाटते.

आत्मशून्य's picture

22 Apr 2011 - 11:56 am | आत्मशून्य

आपल्याला माझे भय समजलं नाही ?

प्रतीक्रीया प्रमाणाबाहेर मोठी होइल म्हणून मी ते ऊदाहरण जसे च्या तसे इथे लीहू शकत नाही, तरीही मूद्दा कळावा म्हणून इतकेच सांगतो की जेव्हां नाडीरीडर मूद्दाम भवीष्य चूकवतात तेव्हां त्यामागे एखादी घटणा टळू नये हा ऊद्देश असतो व म्हणून त्या घटनेचे ज्ञान जाणीवपूर्वक करून दीले जात नाही अन्यथा सदरील व्यक्ती त्यामधे छेडछाड करू शकतो.

यासंदर्भात ओक साहेबांनी त्यांच्या पूस्तकात लीहलेल्या ऊदाहरणात एका माणसाला ८५ वर्षे अत्यंत सूखी आयुश्य सांगीतले गेले, नंतर त्या माणसाचे लग्न झाले (ते कोणाशी होणार हे सूध्दा नाडीमधे सांगीतले होते) पण अत्यल्प काळातच त्याचा अपघात होऊन तो स्वर्गवासी झाला. या चूकीच्या भाकीताबाबत (८५ वर्षे आयुष्य आहे) बाबत असे स्पश्टीकरण दीले आहे की त्याच्या पत्नीला वीधवा बनायचा अटळ योग होता. जर त्या माणसाला तूम्ही अल्पायुशी आहात हे आधीच सांगीतले असते तर त्याने वीधवा होण्याचे दूखः कोणाच्या नशीबी येऊ नये म्हणून लग्नच केले नसते. म्हणजेच ज्या व्यक्तीशी त्याचे लग्न होणार होते तीचा कर्म सीध्दांत सीध्दा व्हावा म्हणून सदरील गृहस्थाचे नाडी रीडींग मूद्दाम चूकवले गेले, असे म्हटले आहे.

कारण जर एखादी चांगली गोश्ट घडणार असेल तर कोण व्यक्ती ती कशाला चूकवेल पण जर काही वाइट घडणार असेल तर तो व्यक्ती ती घटना टाळायचा प्रयत्न करेल म्हणून मूद्दाम भवीष्य चूकवले जाते. आता जर माझे भवीष्य चूकलेचे अनूभवाला येत आहे जे अत्यंत "फील गूड" लीहले होते तर मग मला भवीतव्याची चींता वाटणे, जीवाची काळजी वाटणे स्वाभावीक नाही काय ? :(

इथे प्रतिसाद डीलीट करता येत नाहीत काय स्वतला

आपण थ्रिलर घटनेच्या नैराश्याचे बळी ठरत आहात असे मला वाटत आहे. अमेरिकेत अशी अनेक उदाहरणे टीन एज मुलांमध्ये दिसुन येतात. आपण टीनएजर्स असल्यास , एक विनंती की थोड सबुरीने घ्याव. विचार केला तर प्रत्येक क्षणात थ्रिल आहे(ओशो वाचा ). तारुण्यात भविष्याची चिंता जरुर करावी, पण वर्तमानातल्या सुंदर गोष्टी मध्ये ही बर्‍याच दा नावीन्यता असते.
आपण नाडि ग्रंथांचे समर्थक आहात का विरोधक हे अजुन स्पष्ट होत नाहिए.............

आत्मशून्य's picture

22 Apr 2011 - 12:25 pm | आत्मशून्य

आपण थ्रिलर घटनेच्या नैराश्याचे बळी ठरत आहात असे मला वाटत आहे

ह्म्म.. त्या नैराश्यातून बाहेर आल्यावर मला पृथ्वी गोल दीसेल का ?

आपण नाडि ग्रंथांचे समर्थक आहात का विरोधक हे अजुन स्पष्ट होत नाहि

मी तूमचा वीरोधक नाही एव्हडेच फक्त समजून घ्या म्हणजे झालं.

अमेरिकेत अशी अनेक उदाहरणे टीन एज मुलांमध्ये दिसुन येतात. आपण टीनएजर्स असल्यास

ऊत्तम सल्ला, ओशो तर फारच मनोरंजक. सर्व नाडी केद्रांतून ओशोची पूस्तके वीकावीत ही आपल्याला शीफारस.

इश साहेब, बाकी तूम्ही नाडीग्रंथ वीरोधक का बनला आहात ?

आपण थ्रिलर घटनेच्या नैराश्याचे बळी ठरत आहात असे मला वाटत आहे. अमेरिकेत अशी अनेक उदाहरणे टीन एज मुलांमध्ये दिसुन येतात. आपण टीनएजर्स असल्यास , एक विनंती की थोड सबुरीने घ्याव. विचार केला तर प्रत्येक क्षणात थ्रिल आहे(ओशो वाचा ). तारुण्यात भविष्याची चिंता जरुर करावी, पण वर्तमानातल्या सुंदर गोष्टी मध्ये ही बर्‍याच दा नावीन्यता असते.
आपण नाडि ग्रंथांचे समर्थक आहात का विरोधक हे अजुन स्पष्ट होत नाहिए.............

आत्मशून्य अन्य मित्र हो,

नाडी ग्रथांना धार्मिक आवरणातून बाहेर काढून त्यातील लेखन मानवी जीवनाला आकार द्यायचे काम करत असेल तर त्याची योग्य कदर आपण भारतरीयांनी करायला हवी.

तमिळ भाषेतील जाणकार जोपर्यंत त्यात रस घेत नाहीत तोवर याला चालना मिळणे जिकिरीचे आहे. नुकताच एक जागतिक कार्यशाळा चेन्नईला झाली त्यात नाडी ग्रंथांतील भाषेच्या अंगाने अभ्यासकार्यावरील एक प्रबंध पाठवला गेला. विविध विदेशी विश्वविद्यालयातून ही यावर काम चालते पण त्याचा गवगवा होत नाही. लंडन व कोलंबोतून दोन विद्वानांनी नाडीग्रंथांवर खूप शोधकार्य करून तीन पेपर प्रकाशित केले आहेत. नाडी ग्रथांना धार्मिक आवरणातून बाहेर काढून त्यातील लेखन मानवी जीवनाला आकार द्यायचे काम करत असेल तर त्याची योग्य कदर आपण भारतरीयांनी करायला हवी.

भारत सरकारच्या 'National Mission for Manuscripts' under Min of Tourism and Culture.
"राष्ट्रीय पाण्डुलिपि मिशन" मार्फत सर्व ताडपट्यांच्या ग्रंथांची गणना व संवर्धन करायचे काम चालते. विशेषतः तमिळ भाषेतील ताडपट्ट्यांची जबाबदारी Indian Institute of Asian Studiesचेन्नई व Institute of Pondichery या इंडॉलॉजीवर काम करणाऱ्या दोन संस्थांकडे दिलेली आहे. त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. तर नाडी केंद्रवाले त्यांनी असे काही ठरवले असेल तर सहकार्य करू असे निदान म्हणतात पण पुढे येऊन कोणी काम करायला तयार नाहीत .आता त्यातील ज्ञानाचा नीरक्षीर विवेक करून घेणे हे आपल्या हाती आहे.

आज एक नाडी ग्रंथ प्रेमींची बैठक एका ताडपट्टीवरील लेखनाच्या प्रात्यक्षिकसाठी माझ्या घरी होणार आहे त्यात आपल्याला सामील व्हायला मी आपल्याला व अन्य नाडी विषयावर अधिक माहिती घ्यायला उत्सुक व्यक्तींना येण्याचे मी निमंत्रण करतो. वेळ सायं ४ ते ६ अधिक माहितीसाठी संपर्क -०९८८१९०१०४९.

शशिकांत ओक's picture

17 Apr 2011 - 9:40 pm | शशिकांत ओक

प्रात्यक्षिक संपन्न...

नाडी ग्रंथांना ज्योतिष शास्त्राच्या दडपणाखाली न ठेवता नाडीग्रंथांतील भाषा व लिपीच्या अंगाने त्यातील शब्दयोजना व काव्यरसातील रत्ने मिळवण्यासाठी झालेल्या प्रात्याक्षिकात, एका ३० इंच लांबीच्या, एरव्ही कधीही पहायला मिळणार नाही अशा विरळा ताडपट्टीचा अभ्यास तमिळ तज्ज्ञाकडून केला गेला. त्यातील भविष्यकथन ही तितकेच विलक्षण व थक्क करणारे होते. मात्र त्यावेळी ज्यांच्यासाठी ती पट्टी लिहिली गेली होती त्यांना त्यात सहभागी होता आले नाही याची चुटपुट लागून राहिली.

त्यातील भविष्यकथन ही तितकेच विलक्षण व थक्क करणारे होते.

मात्र त्यावेळी ज्यांच्यासाठी ती पट्टी लिहिली गेली होती त्यांना त्यात सहभागी होता आले नाही याची चुटपुट लागून राहिली.

जे सहभागी (हजर) च नव्हते त्यांच्या बाबतीतले भविष्यकथन विलक्षण आणि थक्क करणारे होते हे विशेष आवडले.

टारझन's picture

21 Apr 2011 - 10:23 am | टारझन

सौजन्याची ऐशी तैशी ह्या नाटकातला राजा गोसावी उर्फ नाना बेरक्याचा एक डायलॉग आठवला ..

"पिळतंय तिच्यायला नुसतं .. पिळतंय .. पिळतंय .. "

- स्वप्निकांत झोप

शशिकांत ओक's picture

22 Apr 2011 - 12:27 pm | शशिकांत ओक

टारझन राव,
प्रतिसादाच्या सौजन्याचा फायदा....
पिळून पिळून... आमरस मिळतो.
मात्र उशीर केला तर ना कोय़ी, ना साली असा बेरका न्याय होतो.
नावांच्य़ा पारंब्यावरील आपल्या कल्पनेचे झोके मात्र रंजक.. टारझनवरही मात करतात, ...

अर्चिस's picture

21 Apr 2011 - 11:14 am | अर्चिस

अरे बापरे!!!!!!!!!!. पुढे चालू काय..... हे सगळ्च चालू आहे

पिलीयन रायडर's picture

24 Apr 2011 - 7:30 pm | पिलीयन रायडर

"डायरी ओफ व्हाईट ईन्डीयन हाउसवाइफ" हि वेब साइट पहा... त्यात तुमच्या नाडी केन्द्रा चा एका परदेशी महिलेला आलेला अनुभव लिहिला आहे...

शशिकांत ओक's picture

7 May 2011 - 9:24 am | शशिकांत ओक

मित्र हो,
असे लोकांचे अनुभव असतात.

मन१'s picture

7 May 2011 - 1:19 pm | मन१

ह्यांची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे, हे ससाबाच्या मागील धाग्यात त्यांनी केलेल्या ससाबाच्या नाडीपट्टीच्या उल्लेखावरुन वाटतय.

श्री ओक पुन्हा पुन्हा शेकडो धागे काढुन आणि हजारो प्रतिक्रिया देउन अफाट आत्मविश्वासाने क्वचित होणारी टिंगल्ही झेलुन नाडीचं जे समर्थन करायचे, त्यातुन ते खरच प्रामाणिक आहेत का काय असं वाटायचं.

सध्या त्यांची ससाबाच्या धाग्यावर प्रतिक्रिया वाचली आहे, त्यामुळं पुन्हा सांगतो(खास त्यांच्या ष्टायलित, वेगवेगळे फाँट वापरुन)

नाडीची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे.
नाडीची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे
नाडीची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे

नाडीची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे

नाडीची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे

नाडीची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे

च्यायला, इथुन रंगीत टंकन जमेना. छ्या.

--मनोबा

मन१'s picture

7 May 2011 - 1:21 pm | मन१

ह्यांची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे, हे ससाबाच्या मागील धाग्यात त्यांनी केलेल्या ससाबाच्या नाडीपट्टीच्या उल्लेखावरुन वाटतय.

श्री ओक पुन्हा पुन्हा शेकडो धागे काढुन आणि संख्येनं पावसाच्या थेंबांइतक्या प्रचंड प्रतिक्रिया देउन हिमालयाइतक्या आत्मविश्वासाने क्वचित होणारी टिंगल्ही झेलुन नाडीचं जे समर्थन करायचे, त्यातुन ते खरच प्रामाणिक आहेत का काय असं वाटायचं.

सध्या त्यांची ससाबाच्या धाग्यावर प्रतिक्रिया वाचली आहे, त्यामुळं पुन्हा सांगतो(खास त्यांच्या ष्टायलित, वेगवेगळे फाँट वापरुन)

नाडीची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे.
नाडीची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे
नाडीची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे

नाडीची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे

नाडीची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे

नाडीची विश्वासार्हता ही श्री सत्य साईबाबा,त्यांचे चमत्कार व पुनर्जन्म ह्यांच्याइतकीच आहे

--मनोबा