टक्कल

utkarsh shah's picture
utkarsh shah in जनातलं, मनातलं
2 May 2011 - 8:57 am

त्याचं काय झालं....

(असा सुरुवात केल्याने सगळे लक्ष देऊन ऐकतात अस अनुभव आणि बहुधा पु. ल. देशपांडेनी पण सांगितलाय... असो.)

परवा दिवशी PMT स्टॉपवर उभा होतो. सगळ्या PMT कचरा भरल्यासारखे वाहत होत्या... कोणतीच बस आमच्या स्टॉपवर थांबत नव्हती. रिक्षावाले इतके पैसे मागत होते की त्यात अजुन थोडे पैसे टाकले असते तर एक नेनो आली असती.तर तिथे आमचे एक काका भेटले.काका म्हणजे शेजारी राहत होते. बरेच दुखी आणि कष्टी दिसत होते.मी विचारले ,"काका, काय झाले कसल्या चिंतेत आहात?"

(त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे मधुराचे पण ६ महिन्यापूर्वीच लग्न झाले.आणि तिच्या लग्नाची चिंता कमी करायला अख्या सोसायटीचे मुले एका पायावर तयार होते.पण तिला तिचा हिरो आधीच मिळाला होता. मग एक आठवडाभर सगळे देवदास सोसायटीतून सुस्कारे सोडत , निराश नजरेने फिरत होते.)

"चिंता म्हणजे अरे माझे केस गळताहेत रे राजा !!!"

--------------------------------------------------------------------------------

अहो मग त्यात काय एवढे आता झाल कि वय हे मनातले वाक्य मी मनातच ठेवले.

"अहो एवढ्या लवकर, अजून वयच काय तुमचे?"

"बघ ना! अरे सगळे उपचार केले, तेले लावली , गोळ्या खाल्या , कडू औषधे ढोसली पण उपयोग शून्य!!"

शून्य म्हणताना प्रचंड निराशा.

"अहो काका तुम्ही एवढी चिंता करू नका.त्यामुळे हि केस गळतात "

माझं राहुन राहुन त्यांच्या टक्कलाकडे लक्ष आणि परत माझ्याच डोक्याकडे हात जायला लागला.... त्याच्या समोर उभं राहणं मला अवघड जात होतं

"अरे बाबा डोक्यावर जर पुरेसे केस असतील तरी तुम्हाला ते दुःख नाही कळणार.... पण एकदा का डोक्यावरचे केस उडायला लागले की डोक्यात केसाशिवाय विचारच राहत नाही... टक्कल पडल्यानी सगळं आयुष्यच बदलुन जातं हो." असे म्हणून ते निघून गेले.मग नकळत मी विचारात पडलो. खरच कसे वाटत असेल टक्कल पडल्यावर?

समोर एक भिकारी दिसला, जाड, राठ, गुंता झालेले पण अगदी खांद्यांपर्यंत केस होते.ते पाहून मला देखील कळलं कि भिकारी देखील सुखी असतात. फक्त त्यांना माहित नसते ते सुख त्यांच्या अंग-खांद्यावरून लोळण घेत असते.

रस्त्यावरच्या एका विक्रेत्यानी मला कंगवा हवा का म्हणुन विचारलं. बहुधा हाच प्रश्न त्याने काकांना विचारला असता तर तो कंगवा त्याच्याच पोटात खुपसुन त्याला ठार मारलं असतं त्यांनी. थोडं पुढे गेलो तर एका मुलानी हातात एक पॅम्प्लेट ठेवलं.... जाहिरात होती... त्याची सुरवात वाचली आणि खचलोच... पहिलीच ओळ होती - "टक्कलग्रस्त पुरुषांसाठी...."

बिचारे काका. त्याचं सांत्वन करायला घरी गेलो आणि परत सुरु झाले त्यांचे टक्कल पुराण...

" तुला सांगतो बाळा, एक वेळ व्यसनी, निरोद्योगी, मवाली मुलांची लग्न ठरतात पण टकल्या मुलांची लग्न ठरता ठरत नाहीत. झालंच आणि तुम्ही कितीही तरुण असा, अगदी कॉलेजमधल्या मुलीही तुम्हाला ‘काका’ म्हणुन हाक मारतात.हे सुद्धा एक वेळ सहन करता येईल.पण तुम्हाला काका म्हणणा-या त्या आगाऊ मुली तुमच्या बायकोला ताई म्हणतात.लोक माझा उल्लेख वेगळ्या प्रकारे करतात. ‘तो पोस्टात काम करणारा काळे’ किंवा ‘तो पहिल्या मजल्यावरचा काळे ’ असं न म्हणता ‘तो टकल्या’ असं म्हणायला लागतात.तुरळक केसातून रोज आरशात दिसणा-या तुमच्या टकलामुळे तुम्हाला आरशाचा राग यायला लागतो.लोकांना आपली आठवण होते म्हणुन झावळ्यातुन दिसणा-या चंद्राचा, टक्कल चमकतं म्हणुन सूर्याचा, उरलेसुरले केस उडतात म्हणुन तुम्हाला वा-याचा राग यायला लागतो. लांब केसाच्या, जाड केसाच्या, रंगीत केसाच्या स्त्री-पुरुषांचा तुम्हाला राग यायला लागतो. कंगवा, तेल, शॅम्पु आणि तत्सम वस्तु विकणा-या कंपन्यांचा, त्यांच्या जाहिरातींचा तुम्हाला राग यायला लागतो. न्हाव्यांचा राग यायला लागतो. थोडक्यात तुम्हाला बहुतेक सगळ्या जगाचाच राग यायला लागतो आणि तुम्ही चिडचिडे होता.आपलं टक्क्ल म्हणजे जीवन-मरणाचा सामाजिक प्रश्न असल्यासारखा सगळे लोक तुम्हाला सल्ला द्यायला लागतात. त्यांच्या सल्ल्यानी आणि इलाजानी तुमचे उरले-सुरले केसही गळुन जातात. सल्ला देणारी हलकट माणसं तुम्हाला ‘तुम्ही टकले आहात’ हे विसरु देत नाही. निदान मला तरी जगानी हे विसरुन दिलं नाही. मला जितका त्रास होतो तेवढा सगळ्या(टकल्यां)नाच होतो की नाही कोणास ठाऊक? "

तिथून मी अर्थातच काढता पाय घेतला. आणि आज मला कळलं होत कि भिकाऱ्याकडे पण हेवा वाटावा अश्या गोष्टी असतात.बऱ्याच वेळेस आपण सुखी असतो पण आपल्याला ते सुख कशाचे आहे हेही माहित नसते. नशीब अजून माझ्याकडे माझे प्राण प्रिय केस अजून शिल्लक आहेत.

तुमचं काय ?

मांडणीविनोदसमाजजीवनमानप्रकटनअनुभवप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

2 May 2011 - 9:49 am | किसन शिंदे

कमाल आहे ब्वा....गेल्या वेळी आम्ही पुण्याला गेल्तो तवा तर पी.एम.टी माणसचं वाहत व्हती. :D

सगळ्या PMT कचरा भरल्यासारखे वाहत होत्या...

ह्ये नवीन कंत्राट कधीपासन घ्येतलं.;)

विनायक बेलापुरे's picture

2 May 2011 - 11:58 am | विनायक बेलापुरे

जास्त विचार करु नका, आहेत ते केस पण जातील गळून.

थिंक पोझिटीव्ह.

असं म्हणतात गर्ल्स लाइक (कम्प्लिट) बाल्ड हेड्स.

अनुभवी टक्कल पडलेल्यानी प्रकाश टाकावा.

ओ भाउ नुकत्याच लग्न झालेल्या केट ला विचारा... विल्यम पण थोडा टकला आहेच की...!!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 May 2011 - 12:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सगळं जग त्या केटकडे पाहत असतांना तुम्ही त्या विल्यमच्या टकलाकडे का पाहत होतात? ;)

शिल्पा ब's picture

2 May 2011 - 1:11 pm | शिल्पा ब

<<<सगळं जग त्या केटकडे पाहत असतांना तुम्ही त्या विल्यमच्या टकलाकडे का पाहत होतात?
असते ज्याची त्याची आवड...तुम्हाला भारी चौकशा!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 May 2011 - 2:22 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

असते ज्याची त्याची आवड...

हे बाकी खरे!! ;)

तुम्हाला भारी चौकशा!!

चौकश्या काय? चांभार चौकश्या असं म्हणा! सवयीच वाईट लागल्या, काय करणार?

लै भारी....
म्ह्णून सांगितल ना... केट्ला विचार.... किमान तिनं तरी पाहीलं असावं... टक्कल...!!!

इंटरनेटस्नेही's picture

2 May 2011 - 12:57 pm | इंटरनेटस्नेही

मस्त!

गणेशा's picture

2 May 2011 - 1:04 pm | गणेशा

छान लिहिले आहे ..

इंटरनेटस्नेही's picture

2 May 2011 - 1:22 pm | इंटरनेटस्नेही

मस्त!

पियुशा's picture

2 May 2011 - 2:02 pm | पियुशा

मस्त लिहिलय :)

धन्यवाद इंटरनेटस्नेही , गणेशा,विकाल ,शिल्पाताई , मिसळलेला काव्यप्रेमी, विनायक बेलापुरे, किसन शिंदे, पियुशा..

स्वानन्द's picture

2 May 2011 - 3:39 pm | स्वानन्द

तुमच्या सहीतले वाक्य आवडले!!

लेख ही छान :)