चेन्नई पुणे चेन्नई -- भाग -२

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
5 Apr 2011 - 6:49 pm

चेन्नई पुणे चेन्नई -- भाग -१

शेवटी मी माझ्या लॅपटॉपवर गाणी लावली आणि उद्या हॉटेल बदलुया असा विचार करत झोपी गेलो..

सकाळी सवयीप्रमाणे अलार्म वाजायच्या आधीच जाग आली. अलार्म वाजु नये अशी सोय करुन पुन्हा झोपी गेलो. पुन्हा दचकून उठलो ते आपण चेन्नईमधे आहोत या विचाराने. आवरासावर करुन फुकटचा नाष्ता (हाटेलात काँप्लीमेंट्री असतो ना..) करायला रेस्टॉरंट मधे आलो. रात्री फक्त सँडविच खाल्लेले असल्याने सडकून भूक लागली होती. अशा वेळी आईच्या हातचे पोहे मिळाले असते तर ... जाउ देत.. मी मेन्यु कार्ड हातात घेतले. त्यावर सर्व प्रकार ओळखीचे होते पण जवळचा एकही नव्हता. ईडली सांबर म्हणजे कमीत कमी रिस्क म्हणून तेच घ्यायचं ठरवलं, मी मेन्यु ठरवेपर्यंत ४ वेळा वेटर "सोलींग सार.. कडड्ड्त्ड्ड्ड" असे काहीसे म्हणून गेला होता. मी त्याला बोलावून मुक्याप्रमाणे हातवारे करुन मेन्युकार्डवर ईडली कडे बोट दाखवले.

ऑर्डर येईपर्यंत माझ्या मनात विचार घोळु लागले. एखादे शहर कसे असावे, किंवा तिथली संस्कृती समजुन घ्यावी, खाद्य संस्कृतीची मजा घ्यावी, त्या शहरावर प्रेम करावे असे थोर सामाजिक विचार मला स्पर्शून गेले आणि अचानक मी विचारवंत, व्यापक दृष्टीकोन असलेला मोठा माणूस झालोय असा मला भास झाला. पण मी शेवटी सामान्य माणूसच की. :)
आता एखाद्या कट्टर शाकाहारी आणि देव देव करणार्‍या माणसाला मटणाच्या दुकानात काम करायला सांगितले तर तो ते काम आणि मांसाहाराची संस्कृती समजून घेण्यात धन्यता मानणार नाही, अगदीच काही मजबूरी असेल तोपर्यंत तरी. माझही काही असंच होतं मला साऊथ ईंडीयन जेवण आवडत नाही त्याला मी काय करणार. मी बेंगलोरात असताना माझा एक मित्र साऊथ ईंडीया च्या नावाने जाम वैतागायचा.. जाम शिव्या द्यायचा.. पण तो शेवटी एका कन्नड सुंदरीच्या प्रेमात पडला आणि त्याला भाताचे गोळे करुन खाणं अचानक आवडु लागलं होतं असं ऐकीवात आहे. लग्नानंतर ते दोघं प्रेमाने अगदी ५-६ फुटावरुन सुद्धा एकमेकांच्या तोंडात भाताचे गोळे भिरकवतात अशी सुद्धा एक बातमी आहे. असो, ज्याचे त्याचे अनुभव आणि आचार्-विचार.

दोन-चार ईडल्या खाऊन स्वारी रिसेप्शन मधे आली. जिथे जायचं तिथला पत्ता मॅनेजरला दाखवला.. दिवसपाळीचा मॅनेजर वेगळा होता, सौजन्यशीलही होता, त्याला ईंग्रजी येत होतं. :) . त्याने माझ्याबरोबर एक रूमबॉय पाठवला.. रिक्क्षा स्टँडपर्यंत, रिक्षावाल्याला पत्ता आणि पैसे किती ठरवायचे यासाठी. मला खरचं पेश्शल ट्रीटमेंट मिळाल्यासारखं वाटलं, खुप कौतुक वाटलं. आपण आधीच शहराबाहेर आहोत आणि ऑफिस हे इथुन आणखी ७-८ किमी लांब आहे अशी आनंददायक बातमी सुद्धा मला त्याने दिली.

२५० रुपये निगोशिएट करुन २१० वर शिवा ने आणले. मी रिक्षात बसलो, रिक्षा सुरु होताच रिक्षा ड्रायवर ने मला माझी लॅपटॉप बॅग मांडीवर घेण्यासाठी आज्ञावजा सूचना केली. मला काही कळेनासं झालं. त्याने प्रत्येक बसस्टॉप वर थांबून "ताम्बरम... ताम्बरम" असं काहीस ओरडायला सुरुवात केली तेव्हा मला कळालं की २५० मधले ४० रुपये वसूल करण्यासाठी हा डाव त्याने केलाय. मी बंड करायचं ठरवलं, बॅग पुन्हा बाजुला ठेवली आणि त्याला पॅसेंजर घेऊ नको असे बजावले.
ड्रायवर : "कड्ड्ड्तड्ड्फड्ड पेट्रोल क्खख्द्खिरिह्स्क्ज्द"... पेट्रोल महाग झाले आहे असे तो म्हणायचा प्रयत्न करतो आहे असं मला वाटलं. ७-८ किमी साठी किती पेट्रोल लागत असेल, डोक्यावरुन पाणी अर्धा लिटर.. म्हणजे जवळपास १५० रुपये तो असाच खिशात घालणार होता. माझी भाषा त्याला कळत नव्हती आणि त्याची मला.. याचा फायदा एकच की दोघांनी एकमेकाला कितीही शिव्या दिल्या तरी काही फरक पडणार नव्हता. :)

ड्रायवरः "$^%^(&&&()*(*)*)(*_&*^%"
मी: "हो हो. आमच्याकडचे रिक्षावाले पण असेच &%*&^&#@!^& आहेत." मी हसलो.. तोही हसला.
ड्रायवरः "(*(&*^%^%$####@$^^&%&"
मी: "काय सांगायचं राव. सकाळच्या ईडल्या लै पाणचट होत्या.." मी पुन्हा हसलो.. तोही पुन्हा हसला..

बराच वेळ हा खेळ चालु होता. माझ्या नशिबाने त्याला एकही पॅसेंजर मिळाला नव्हता, पण त्याचा बदला त्याने सुट्टे नाहीत असे सांगून २५० रुपये घेऊन निघुन गेला अशा प्रकारे घेतला. हापिसात आलो.. बर्‍याच लोकांना ईंग्रजी येते असे दिसले. जरा बरं वाटलं.

दुपारच्या जेवणात बरेच पर्याय उपलब्ध होते.. मी नवखा असल्याने कुणीच माझ्याबरोबर जेवण्याचा सवाल नव्हता. इथे पंजाबी पब्लीक बरचं दिसलं, आणि एक काऊंटर तर चक्क पंजाबी तडका नावाने होतं पण जगातले कोणतेही नविन कॅफेटेरिआ हे १-२ महिने चांगलेच वाटते खरी गंमत तिसर्‍या महिन्यात जाणवते. तरीपण हलकं काहीतरी खावं म्हणून बर्गर ऑर्डर केले. त्याने काहीतरी माझ्यासमोर ठेवले.

मी: "धिस इज नॉट बर्गर, आय हॅव ऑर्डरड् बर्गर."
तो: "धिस बर्गर सार." ते बर्गर आहे की नाही यावरुन माझी आणि त्याची शब्दिक लढाई सुरु झाली.. शेवटी.
मी: "नान ओरुदरे सुन्ना नूरदरे सुन्ना मथिरी" असे म्हंटल्यावर तो मात्र घाबरला आणि मग त्याने मला बर्गर सारखे दिसणारे पुन्हा काहीतरी आणुन दिले. रजनीकांतचा फेमस ड्वायलॉक पाठ केला होता इथे यायच्या आधी.. :).. कसा घाबरला.. असा मी मनातल्या मनात हसत ते बर्गर वाकडे तिकडे तोंड करत संपवले. आता मला बर्गर म्हंटले की अंगावर काटा येतो.

हापिसातली कामे उरकली. दुसरे चांगले हॉटेल सध्या उपलब्ध नसल्याने त्याच हॉटेलात १ आठवडा रहावं लागणार होतं. हापिसातून परतताना कुणीतरी बसने जा असा सल्ला दिला. हापिसाबाहेरच्या बस स्टॉप वर आलो आणि उभा राहिलो. त्यात मला बस आणि रस्ता विचारणारे ३-४ महाभाग भेटले. मी फक्त खांदे उडवून माहित नाही असे दाखवले. कित्येक बस आल्या आणि गेल्या.. माझ्यासाठी बसेस च्या बोर्डवर सगळी जिलेबीच होती.. (अरे हो .. बर्‍याच दिवसात जिलेबी खाल्लेली नाही.. आज खाऊया असे मनात आले.) नशिब बलवत्तर म्हणून नव्या एसी बस ज्या ईंग्रजी मधे ईलेक्ट्रॉनिक बोर्डमधे स्टॉपचे नावे दाखवतात त्यातली एक मिळाली. माझे हॉटेल ज्या एरिआ मधे आहे त्या स्टॉपचं नाव त्यात होतं.

क्रमशः

विनोदसमाजजीवनमानप्रवासनोकरीप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

>शहरावर प्रेम करावे असे थोर सामाजिक विचार मला स्पर्शून गेले >> LOL! भारी!
मस्त झाला आहे हा भागपण! :) नव्या शहरांमध्ये - खास करुन दक्षिणी शहरांमधून भाषेचा आणि लिपीचाही अडसर असल्याने सुरुवातीला जुळवून घ्यायला त्रास होतोच रे. :)हळूहळू होईल सवय. बंगलुरुला असताना मीही ह्यातून गेले आहे आणि तिथले रिक्षावालेही महान आहेत!

आम्हि मागल्या वर्शि चेन्नइला गेलेलो तेव्हा असाच एक रिक्शवाला भेट्ला होता ज्याने चेन्नै सेन्टृर्ल पासुन कोइम्बेड बस स्टोप पर्यन्त २५० रुपये भाड घेतले होते आनि ननतर जेव्हा आम्हाला वोल्वो बद्द्ल एकाने सान्गितले तेव्हा वाल्वोचे टि़किट होते
फक्त २० रुपये ! मग काय वोल्वोनेच फिरलो सगळि़क्ड,
खान्यबद्द्ल म्हनाल तर नानपासुन पराथ्यापर्यन्त
आनि चिकन पासुन फिशकारि ,बिर्यानि पर्यन्त सर्व मिळ्तय ,आनि चव हि छान आहे, चान्गल होट्ल शोधा आधि !
आम्हाला तर चान्गला अनुभव आला चेन्नै चा
बाकि एक सान्गते तिथ्ल्या सर्व लोकाना हिन्दि बर्यापैकि कळ्ते पन आप्ल्यासार्ख्याना गण्डवन्यासाथि ते आप्ल्याला वेड्यात काधत्तात
हे खुद्द आम्हाला एका गाईड नेच सान्गितले आहे
रुळायला वेळ लागेल तोपर्यन्त अनुभव एन्जोय करा आनि लिहा
पु.ले.शु.:)

सान्गते तिथ्ल्या सर्व लोकाना हिन्दि बर्यापैकि कळ्ते पन आप्ल्यासार्ख्याना गण्डवन्यासाथि ते आप्ल्याला वेड्यात काधत्तात.

ममोंची कानउघदनी झाली आहे.. आता ते यावर उपाय म्ह्नुन योग्य ति कल्जी घेतिल..

सुहास..'s picture

5 Apr 2011 - 7:05 pm | सुहास..

=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))

सुट्टी सत्कारणी लावतो आहेस रे !!

हाण्ण , हाण्ण !!

ड्रायवरः "$^%^(&&&()*(*)*)(*_&*^%"
मी: "हो हो. आमच्याकडचे रिक्षावाले पण असेच &%*&^&#@!^& आहेत." मी हसलो.. तोही हसला.
ड्रायवरः "(*(&*^%^%$####@$^^&%&"
मी: "काय सांगायचं राव. सकाळच्या ईडल्या लै पाणचट होत्या.." मी पुन्हा हसलो.. तोही पुन्हा हसला.. >>>

हा हा हा ...संवाद साधण्याचा हा एक नवाच मार्ग आहे ब्वा !!

तैरसादलम.कॉम ;)

अप्रतिम भाग ..
खुप मज्जा आली वाचताना .. लवकर येवुद्या पुढील भाग ..
विषेश करुन सांभाषण जास्त आवडले ..

"नान ओरुदरे सुन्ना नूरदरे सुन्ना मथिरी"
याचा काय अर्थ आहे ?

बाकी - लग्नानंतर ते दोघं प्रेमाने अगदी ५-६ फुटावरुन सुद्धा एकमेकांच्या तोंडात भाताचे गोळे भिरकवतात अशी सुद्धा एक बातमी आहे, हे जबरी ..
असेच निशिगंधा वाड आन अशोक सराफ यांचा एक पिक्चर आठव्ला अआणि तुमचा मित्र आणि त्याची बायको असेच बोलत असतील असे वाटले ..

लिहित रहा .. वाचत आहे..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Apr 2011 - 7:30 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>"नान ओरुदरे सुन्ना नूरदरे सुन्ना मथिरी" याचा काय अर्थ आहे ?
"मैने एक बार कहा तो सौ बार कहने के बराबर" असा काहीसा असावा.
अधिक प्रकाश ममो (किंवा हैय्यो हय्यय्यो) यांनी टाकावा अशी विनंती.

हैय्यो हय्यय्यो समाधीस्थ झाल्येत की काय?

टारझन's picture

5 Apr 2011 - 7:12 pm | टारझन

मी: "नान ओरुदरे सुन्ना नूरदरे सुन्ना मथिरी" असे म्हंटल्यावर तो मात्र घाबरला आणि मग त्याने मला बर्गर सारखे दिसणारे पुन्हा काहीतरी आणुन दिले.

<तेलुगु > नी यव्वा .. < /तेलुगु> दे घुमा के .. मस्त लेख रे .. येउ दे पटक्यास

श्रावण मोडक's picture

5 Apr 2011 - 7:16 pm | श्रावण मोडक

अजून थोडं लिही. पटकन वाचून होतं.

रेवती's picture

5 Apr 2011 - 7:16 pm | रेवती

छान! मजेशीर झाले आहे लेखन.
हलकं काहीतरी खावं म्हणून बर्गर ऑर्डर केले
हसून पुरेवाट झाली. त्यातलं चीज विसरलात काय साहेब?;)
अर्थात चीज विसरून मगच बर्गर खाण्यात मजा........नाहीतर मी १०० वेळा तरी "यात चीज आहे, यात चीज आहे" असे म्हणत खाणार .......त्यापेक्षा नकोच!.
पुढचे लेखन लवकर येऊ दे सार!;)

प्रीत-मोहर's picture

5 Apr 2011 - 7:54 pm | प्रीत-मोहर

हहपुवा...मस्त लेख ..फक्त पट्कन संपला वाचुन !!!

मराठे's picture

5 Apr 2011 - 9:05 pm | मराठे

तांबरम म्हणजे मेप्झ (अंधेरीच्या सीप्झ सारखं मेप्झ.._मॅड्रास_ एक्स्पोर्ट प्रमोशन झोन) मधे का हो आफिस तुमचं... २००५ चं एक वर्षं तिथं जात होतो.. दररोज टी. नगर वरून तांबरम ला जायचं म्हणजे एक मोठं दिव्य होतं त्यात रिक्षावाल्याने / बसवाल्याने ढांगचिक गाण लावली असतील तर मग काय विचारता! एक वेळ चंद्रावर ऑफिस असावं पण तांबरम मधे असू नये असं वाटायचं.

मराठमोळा's picture

5 Apr 2011 - 11:58 pm | मराठमोळा

नाही हो..
तांबरम पासून आणखी ८ किमी जी.एस.टी रोडवर दक्षिणेकडे..
मेप्झ आता थोडंसं शहरात मोडतं तरी.. पण आमचं हापिस म्हणजे कहर एरिआमधे आहे.. :)

वपाडाव's picture

6 Apr 2011 - 11:34 am | वपाडाव

त्यात रिक्षावाल्याने / बसवाल्याने ढांगचिक गाण लावली असतील तर मग काय विचारता !

याला मी काहीतरीच वाचले...
हाकानाका....
बाकी, ममो यांस पुनश्च रुंब नल्ला ! रुंब नल्ला !

दीविरा's picture

5 Apr 2011 - 11:38 pm | दीविरा

फार आवडले :)

"त्याला भाताचे गोळे करुन खाणं अचानक आवडु लागलं होतं असं ऐकीवात आहे. लग्नानंतर ते दोघं प्रेमाने अगदी ५-६ फुटावरुन सुद्धा एकमेकांच्या तोंडात भाताचे गोळे भिरकवतात "

हे तर फारच भारी :)

मृगनयनी's picture

6 Apr 2011 - 10:49 am | मृगनयनी

ड्रायवरः "$^%^(&&&()*(*)*)(*_&*^%"
मी: "हो हो. आमच्याकडचे रिक्षावाले पण असेच &%*&^&#@!^& आहेत." मी हसलो.. तोही हसला.
ड्रायवरः "(*(&*^%^%$####@$^^&%&"
मी: "काय सांगायचं राव. सकाळच्या ईडल्या लै पाणचट होत्या.." मी पुन्हा हसलो.. तोही पुन्हा हसला..

हा हा हा लई भारी! :)

ऐक्चुली.. चेन्नईमध्ये इन्फॅक्ट होल साऊथ इन्डियामध्ये - इन्च्लुडिन्ग कर्नाटका, आन्ध्रा... ( अय डोन्नो अबाउट केरला) ;) ऑटो पेक्षा बस परवडते.. आपल्याकडे (पक्षी : पुण्यामध्ये) पी एम पी एल' ने ज्या प्रवासासाठी १८ रुपये /माणुस आकारले जातात... ( साधारण २२ किलोमीटरसाठी)... त्याच अन्तरासाठी चेन्नईला ७ रुपये/ माणूस घेतले जातात!

वपाडाव's picture

6 Apr 2011 - 12:24 pm | वपाडाव

+१ टु मृग्गा...
हेच म्हंतोय...
हैद्राबदेत असताना मलाही हाच प्रश्न पडला होता...
मासिक पास (कुठुनही कुठवरही) ३५०/- फक्त अन पुण्यात ६००/- हे सर्व २००७ साली...
अन आता ५००/- अन १२००/- रिस्पेक्टिव्हली...
पुणे इझ कहर... :(

सविता००१'s picture

6 Apr 2011 - 10:38 am | सविता००१

फटाफट पुढील भाग येऊद्या

शिल्पा ब's picture

6 Apr 2011 - 10:43 am | शिल्पा ब

मस्त भाग...पुढचे सगळे पटापट टाका.

मराठमोळाजी,

छान लिहिताय.

पुढचे भाग लौकर येवू द्या हे वे. सां. न.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Apr 2011 - 10:53 am | llपुण्याचे पेशवेll

भरभर लिही रे.

sneharani's picture

6 Apr 2011 - 10:57 am | sneharani

मस्त! जरा अजुन थोड लिहा!येऊ देत पुढचे भाग!

स्पंदना's picture

6 Apr 2011 - 11:26 am | स्पंदना

ह ह पु वा.

काय काय आठवत म्हणौन सांगु? लिहा तुम्ही आम्ही कधी मधी आमचा मसाला पण अ‍ॅड करु.

छोटा डॉन's picture

6 Apr 2011 - 11:27 am | छोटा डॉन

शुभेच्छा

- छोटा डॉन

हरिप्रिया_'s picture

6 Apr 2011 - 11:51 am | हरिप्रिया_

मस्त मस्त..
येवुदे लवकर पुढचा भाग...

चावटमेला's picture

6 Apr 2011 - 12:25 pm | चावटमेला

हाही भाग आवडला, पुढचा लवकर येवूदे..

माझा चेन्नईचा (३ महिन्यांचा) अनुभव फारसा चांगला नाही. आख्या जगात आपली मुंबई बेष्ट.

सूड's picture

6 Apr 2011 - 5:38 pm | सूड

अगदी अगदी !! महिन्याभरात फेस आला होता माझ्या तोंडाला. कँटिनमध्ये त्यांचं ते इडीयापम का काय ते तेवढं चवीनं खायचो. एक दिवशी कधी नव्हे ते समोसा चाट पाह्यलं मेनुत आणि घेतलं खायला, तर तिथला सो-कॉल्ड सहकारी म्हणतो कसा, '' स्सुऽऽधांशु वाय्य आर यु यीटिंग दिस गॅर्बेज ??" आयला समोसा चाट म्हणजे 'गॅर्बेज' कधीपासून झालं, मलाच प्रश्न पडला. पुढे म्हणतो कसा,'' आय्य वोण्ट गिव्ह यीव्हन वण मार्क औट अफ ट्टेण ठु दिस, यीफ सन्वण अ‍ॅस्क मी !!"

निखिल देशपांडे's picture

6 Apr 2011 - 1:32 pm | निखिल देशपांडे

वाचतोय रे...
पुढचा भाग लवकर आणि अजुन थोडा मोठा येउदे

पुष्करिणी's picture

7 Apr 2011 - 1:22 am | पुष्करिणी

दोन्ही भाग मस्तच झालेत.
सर्वात भारी म्हण्जे इतर तमिळ चैन्नै वाल्या तमिळांना आपल्याइतक्याच शिव्या घालतात्.
मी चैन्नैत थोडे दिवस असताना तमिळ शिकायचा बराच प्रयत्न केला होता, वाचायला अवघड वाटली. प फ ब भ साठी एकच अक्षर तसच ट ठ ड साठी पण . बॉम्बे आणि पॉम्पे एकसारखाच , शब्द आणि सप्त एकसारखच, टाटा डाटा टाडा एकसारखाच लिहिताना.
उच्चार करताना 'ह' चा उच्चार 'गे' आणि 'त' चा 'द' करतात नेहमी...मोहन ला कायम मोगेSSSन आणि तरूणला दरूण असं म्हणतात, पण इंग्रजी स्पेलिंग मात्र बरोबर लिहितात. इंग्रजीत 'त' लिहिताना नेहमी त्याचा 'थ' करतात.
अशी निरिक्षणं करताना मजा यायची.

पण करूणानिधींच्या मुलीचं नाव मला अजूनही उच्चारता येत नाही :)

* पूण्डु कोळंबू (Poondu Kozhambu ) नक्की खा

कुंदन's picture

7 Apr 2011 - 1:52 am | कुंदन

माझ्या नावाचे असेच एक तमिळ इथे Kundan चे Kundhan करतोय , आता पुढ्च्या वेळेस त्याने असे केले की त्याला चांगले सुनावणार आहे.

वत्तल कोळंबु (vathal kuzhambu) आणि कत्रिकाय कोलंबु (kathirikai kuzhambu )
हे झक्कास तमीळ पदार्थ आहेत. एकदा भाताबरोबर हाणून पहा...

प्राजु's picture

7 Apr 2011 - 2:00 am | प्राजु

छान लिहितो आहेस रे!! :)

सखी's picture

12 Apr 2011 - 9:57 pm | सखी

छान लिहले आहे, हे वाचायचे मुद्दाम ठेवुन दिले होते, पुढचे भाग लवकर यावेत ही विनंती, म्हणजे वाचकांची लिंक तुटणार नाही.