दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-३)

चिंतामणी's picture
चिंतामणी in जनातलं, मनातलं
2 Mar 2011 - 9:44 pm

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१)

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-२)

संगीत दिग्दर्शक- एन. दत्ता.

एन. दत्ता उर्फ दत्ता नाईक हेसुध्दा दत्ताराम वाडकरांप्रमाणे मुळचे गोवेंकर. सचीन देव बर्मन यांचे सहाय्यक म्हणून अनेक वर्षे काम केले. त्याच बरोबर स्वतंत्र संगीतकार म्हणून अनेक अवीट गोडीची गाणी दिली.

राज खोसलांचा मिलाप (१९५५) या चित्रपटामधून स्वतंत्र संगीतकार म्हणून पदार्पण केले.

त्यांनी संगीतबध्द केलेली काही गाणी पुढील प्रमाणे.

चित्रपट- चंद्रकांता (१९५६)

मैं ने चाँद और सितारों की तमन्ना की थी
मुझको रातों की सियाही के सिवा कुछ न मिला

(म.रफी)

चित्रपट- साधना (१९५८)

औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाज़ार दिया
जब जी चाहा कुचला मसला, जब जी चाहा दुत्कार दिया .
(लता दिदींनी गाइलेले काळजाचे ठाव घेणार गाणे)

आज क्यों हम से पर्दा है, पर्दा है जी
आज क्यों हम से पर्दा है
(म.रफी, एस. बलबीर आणि कोरसने गाइलेली कव्वाली)

कहो जी तुम क्या-क्या - सुनो जी तुम क्या-क्या
कहो जी तुम क्या-क्या ख़रीदोगे
(लता मंगेशकर)

सँभल ऐ दिल
सँभल ऐ दिल तड़पने और तड़पाने से क्या होगा
जहाँ बसना नहीं मुमकिन वहाँ जाने से क्या होगा
(आशा भोसले व म. रफी यांचे युगलगीत)

चित्रपट- धूल का फूल (१९५९)

धड़कने लगे दिल के तारों की दुनिया
जो तुम मुस्कुरा दो
(आशा भोसले व महेन्द्र कपुर यांचे रोमँटीक युगलगीत)

कासे कहूँ मन की बात
हाँ कासे कहूँ मन की बात
बैरी बलमवा दुखिया कर गये सुख को ले गये साथ
कासे कहूँ मन की बात
(सुधा मलहोत्रा)

झुकती घटा गाती हवा सपने जगाए
नन्हा सा दिल मेरा मचल-मचल जाए
(आशा भोसले व महेन्द्र कपुर यांचे युगलगीत)

तेरे प्यार का आसरा चाहता हूँ
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हूँ
लता मंगेशकर व महेन्द्र कपुर यांचे युगलगीत)

चित्रपट- ११ हजार लडकीया (१९६२)

दिल की तमन्ना थी मस्ती में मंज़िल से भी दूर निकलते
अपना भी कोई साथी होता, हम भी बहकते चलते-चलते
(म.रफी)

चित्रपट- ब्लॅक कॅट (१९५९)
मैं तुम्ही से पूछती हूँ, मुझे तुम से प्यार क्यों है
कभी तुम दग़ा न दोगे, मुझे ऐतबार क्यों है
(लता मंगेशकर व म. रफी यांनी गाइलेले एक मधुर गीत)

चित्रपट- काला समंदर (१९६२)

मेरी तसवीर लेकर क्या करोगे तुम मेरी तसवीर लेकर
मेरी तसवीर लेकर क्या करोगे तुम मेरी तसवीर लेकर
मेरी तसवीर लेकर, दिल-ए-दिल जेएर लेकर
लुटी जागीर लेकर, जली तक़दीर लेकर
क्या करोगे क्या करोगे तुम मेरी तसवीर लेकर
मेरी तसवीर लेकर क्या करोगे तुम मेरी तसवीर लेकर
((आशा भोसले व म. रफी यांनी गाईलेली कव्वाली)

चित्रपट- चांदी की दिवार (१९६४)

अश्कों ने जो पाया है वो गीतों में दिया है
इस पर भी सुना है कि ज़माने को गिला है
(तलत मेहमुद)

चित्रपट- मीस्टर एक्स (१९५७)
लाल लाल गाल, जान के हैं लागु
हो, देख देख देख, दिल पे रहे काबु
होइ, चोर चोर चोर, भाग परदेसी बाबू
(पाश्चीमात्य संगीतावर आधारीत १९५७ साली प्रसीध्द झालेले, म. रफी यांनी गाईलेले गित)

कलासंगीतचित्रपटमाहितीआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

2 Mar 2011 - 11:02 pm | ५० फक्त

तेरे प्यार का आसरा चाहता हूँ
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हूँ

मैं तुम्ही से पूछती हूँ, मुझे तुम से प्यार क्यों है
कभी तुम दग़ा न दोगे, मुझे ऐतबार क्यों है

कहो जी तुम क्या-क्या - सुनो जी तुम क्या-क्या
कहो जी तुम क्या-क्या ख़रीदोगे

यातली एवढीच गाणि माझ्या ओ़ळ्खीची आहेत, बाकी नाही आता मिळवुन ऐकेन.

इन्द्र्राज पवार's picture

3 Mar 2011 - 12:01 am | इन्द्र्राज पवार

इंग्लंड-आयर्लंड क्रिकेटच्या दंग्यात सर्व मित्र गुंतलो असल्याने हा धागा उशीराच पाहात आहे. पण असो. का कोण जाणे मला सारखे वाटत होते की मा.दत्ताराम नंतर पुढे कधीतरी धागालेखक 'श्री.एन.दत्ता' यांच्यावर लेख इथे देणारच.

'धूल का फूल' चा उल्लेख आला ते छान झाले. कारण दोन महिन्यापूर्वीच विविध भारतीच्याच 'आज के मेहमान' मध्ये श्री.महेन्द्र कपूर यांची पूर्वीची रेकॉर्डेड आवृत्ती ऐकविण्यात आली होती. त्यावेळी त्यानी आपल्याला यश चोप्रा यानी त्यांच्याच रेकॉर्डिंग स्टुडिओत एन.दत्ता यांच्याकडे कसे नेले...आणि ते महेन्द्र कपूरचे केवळ दुसरे गाणे होते. (पहिले अगोदरच्याच आठवड्यात नौशाद यानी रेकॉर्ड केले होते. 'सोनी महिवाल' मधील 'हुस्न चला इश्क से मिलने, रात गजब की आयी...'. हे गाणे रेकॉर्डिस्ट श्री.कौशिक यानी सहज श्री.चोप्रा याना ऐकविले होते व "हा एक नवीन तरूण आहे, त्याची तयारी चांगली आहे" अशी शिफारस केल्यावर चोप्रानी महेन्द्र कपूरना बोलावून घेतले व "धूल का फूल' च्या युगलगीतास याचा आवाज कसा वाटतो ते पाहाण्यास एन.दत्ता याना सांगितले. त्या दिवशी पुरुष आवाजाची तालीम झाली आणि महेन्द्र कपूर याना हे बिलकुल माहीत नव्हते की स्त्री आवाजासाठी कोणत्या गायिका उद्या येणार आहेत....आणि दुसरे दिवशी ते उत्सुकतेने वाट पाहात असतानाच समोर आल्या त्या लतादिदी.....काय आनंद झाला असेल त्याना याची कल्पना त्यांच्या आवाजावरूनच येत होती. एन.दत्तांनी त्याच्याकडून ते युगलगीत...जे वर श्री.चिंतामणी यानी दिलेले आहेच...फार तन्मयेतेने उतरवून घेतले....आणि त्याच गाण्यापासून महेन्द्रकपूर यांची बैठक बी.आर.चोप्रा बॅनरमध्ये अशी काय घट्ट बसली की ती अखेरपर्यंत....त्याचे श्रेय त्यानी कृतज्ञातापूर्वक एन.दत्ता आणि श्री.यश चोप्रा याना दिले.

मराठी 'मधुचंद्र' या चित्रपटातील गाणीही एन.दत्ता यांचीच होती....तिथेही महेन्द्र कपूर होतेच.

एक गुणी संगीतकार....जरी दुसर्‍या फळीतील असला तरी...!

इन्द्रा

त्याच प्रमाणे त्यांनी "बाळा गाउ कशी अंगाई", "अपराध", "मामा-भाचे", "एक दोन तीन", "प्रीत तुझी माझी" इत्यादी मराठी चित्रपटांना संगीत दिले.

चिंतामणी's picture

10 Mar 2011 - 1:06 am | चिंतामणी

एन. दत्ता यांची गाणी येथे ऐका/ डाउनलोड करा.

http://gosong.net/dattaram.html