वो सांस हूं जो लबोंपे.....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
28 Feb 2011 - 9:46 pm

रफीसाहेबांची अनेक गैरफिल्मी गाणी आपल्याला माहीत आहेत, असतील. त्याची मजा काही औरच आहे. मुख्य म्हणजे कमीत कमी संगीत व ह्रदयाला भिडणारा त्या गाण्यांचा अर्थ आणि सरळ ह्रदयात एखादी सुरी उतरावी तसा मनाला भिडणारा साहेबांचा आवाज...... त्यातच त्या गाण्यात भावनांची तडफड असेल तर ते गाणे खरच ह्रदय कापत जाते. असेच एक गाणे....

वो सांस हूं,
लबोंपे जो आया नही अभी
आया नही अभी....
वो दर्द हूं जो दिलमे समाया नही अभी...
समाया नही अभी...
आता है ग़ुफ्तगू का खलिफा निगाहको...
ये मुज्दा तो मैने दिखाया नही अभी...
दिखाया नही अभी.....
लब्जोंमे आ रही है मेरे दिलकी धडकने..
पहलूमें तुमने मुझको बिठाया नही अभी..
बिठाया नही अभी...
क्यु तंग गया....
हुरूरे बुलंदीसे आसमान.....
सिजदे को मैने सर को झुकाया नही अभी...
झुकाया नही अभी...
वो सांस हूं.........

शेवटाला जाण्याची प्रत्येकाचीच धडपड असते. पण अपूर्णत्वाचा शाप हा सगळ्यांना कुठल्याना कुठल्या स्वरूपात छळतच असतो. म्हणून शायर म्हणतोय मी तर असा श्वास आहे की तो अजून ओठावरपण आलेला नाही. तेवढ्यातच माझा हा छळ होतोय. याच्या वेदनासुध्दा माझ्या ह्रदयात भरल्या नाहीत तोच माझी जायची वेळ झाली ?
माझ्या शब्दांचा अर्थ अजून माझ्या नजरेत उमटतोय, ही शूभवार्ता मी अजून कोणाला दाखवलीही नाही. खलिफा म्हणजे प्रतिनिधी (माझ्या विचारांचे प्रतिनिधी माझे शब्द). निगाह म्हणजे नजर आणि मुज्दा म्हणजे असा शुभ शब्द
की जो पहिल्यांदा उमटतो किंवा लिहीला जातो. जसा आपला " श्री ".
आता माझ्या ह्रदयाची धडधड माझ्या शब्दावाटे बाहेर पडेल ( जन्म ) आणि तू तुझ्या मांडीवर मला अजून बसवलेपण नाहीस ( मोठे होणे) तेवढ्यात हे परमेश्वरा घेऊन जायची कसली घाई ?
हे परमेश्वरा, तू एवढा का वैतागला आहेस या दुनियेला ? मी अजून तुझ्या प्रार्थनेसाठी माझे मस्तक झुकवलेले पण नाही...... सिजदा म्हणजे प्रार्थना...

अजून चांगला अर्थ लावता आला तर आपले स्वागत आहे.

जयंत कुलकर्णी.
येथे ऐका....

कलासंगीतकवितागझलआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

1 Mar 2011 - 2:33 am | बहुगुणी

अतिशय सुंदर परिचय करून दिलात, धन्यवाद! (प्रार्थना म्हणजे 'सिजदा' की 'सजदा'?)

अन्या दातार's picture

1 Mar 2011 - 1:39 pm | अन्या दातार

सदर गाण्याची एल.पी. रेकॉर्ड वगैरे आहे का तुमच्यकडे? हे रेकॉर्डींग त्यवरुन डीजिटाइझ केल्यासारखे वाटले. बाकी, गाण्याची चाल, शब्द, रफी साहेबांचा आवाज हे सगळेच उत्तम!

जयंत कुलकर्णी's picture

1 Mar 2011 - 1:44 pm | जयंत कुलकर्णी

एका पाकिस्तानी माणसाने हे गाणे यु-ट्युबवर टकले आहे. मी ते ध्वनिमुद्रीत केले व ऑडासिटीमधे त्याची साफसफाई ( जितकी करता येईल तेवढी) केली. बाकी मला काही माहीत नाही. मलाच खरंतर याचा शायर कोण आहे ही माहीती पाहिजे आहे. मिळेल का कुठे ?

वाहीदा's picture

1 Mar 2011 - 6:53 pm | वाहीदा

काका, लेख छान !

खरे तर मला यावर खूप लिहायला आवडेल ... पण कार्यालयात असल्याने लिहू शकत नाही
वेळ मिळाल्यावर नक्की लिहीन

तिमा's picture

1 Mar 2011 - 9:34 pm | तिमा

लेख आवडला.
'इतना टूटा हूं के छूनेसे बिखर जाऊंगा' ही गजल कोणी लिहिली आहे सांगाल का ? मला ती खूप आवडते.

बहुगुणी's picture

1 Mar 2011 - 11:46 pm | बहुगुणी

मोईन नझर यांची ही गझल गुलाम अलींच्या आवाजात इथे ऐकायला मिळाली.