सहल १६०१२०११ ची.. रिपोर्ट. - भाग ०१

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
18 Jan 2011 - 2:34 pm

नमस्कार,
इथे आमंत्रण दिलं होतं त्याला प्रतिसाद देणा-या सर्वांचे आभार. आमंत्रण खरंच शॉर्ट नोटिस वर होतं त्याबद्दल क्षमस्वः. रविवारी दिवसभर फिरुन आलो त्याचा हा व्रुतांत.

हो नाही हो नाही करत आम्ही ४ जण उरलो होतो ट्रिपला जायला, मी, आत्मशुन्य, गणेशा व भरत. रविवारी सकाळी जरा लवकर उठुन तयारी सुरु केली, गाडी धुतली, पाण्याच्या बाटल्या, इंजिन ऑईल, ब्रेक, लाईट व महत्वाचे गाणि, दिवसभरासाठी.

सव्वा दहाला आत्मशुन्य वारजेला आला होता, आणि गणेशा त्याच्या घरुन निघालेला होता, त्याच्या गाडित काही तांत्रिक प्रॉब्लेम झाल्याने त्याला वारजेला पोहोचायला पावणेअकरा वाजले, तो आल्यावर लगेच निघालो, कात्रजला भरतला उचललं आणि खडी मशिन मार्गे एकदा रस्ता चुकुन सोलापुर हायवेला लागलो. एक वाजण्याच्या सुमारास आम्ही भुलेश्वरला पोहोचलो. खाली काही फोटो टाकत आहे आत्मशुन्यने काढलेले, गणेशाने काढलेले फोटो नंतर अपडेट करेन. (त्याचा कॅमेरा पुण्यातच विसरला आहे.) श्री. वल्लि व माझ्या या पुर्वीच्या धाग्यांत बरेच फोटो आहेत त्यामुळे फक्त नवेच फोटो टाकत आहे.

यात मध्यभागी असलेल्या शंकराच्या मुर्तीच्या हातात त्रिशुलाबरोबर नरमुंड असलेले एक शस्त्र आहे. तसेच या सर्व प्रतिमा या त्या त्या देवतांच्या स्त्री रुपातील आहेत. या वरुन हे स्थान वामपंथीयांचे असावे काय अशी चर्चा करणेत आली.
हे शिल्प कशाचे असावे ह्यावर सुद्धा ब-याच चर्चा होउन आपल्याला काही कळत नाही हा निष्कर्ष काढणेत आला.
हा शिखराचा भाग पेशव्यांनी बांधला आहे. (इति श्री. पुजारी.)
त्या शिखरातला हा बागुलबुवा.
या मंदिराची बाहेरची पुर्ण भिंत ही अशा छोट्या खोल्यांनी बांधलेली आहे, या खोल्यात आता एक -दोन विठोबा रखुमाईच्या मुर्ती आहेत, पण प्राचीन का़ळी या खोल्या असुन तांत्रिक साधना करणारे त्या वापरत असावेत असा एक आमचा अंदाज आहे.
अशा सर्व खोल्याच्या दाराजवळच्या खांबावर असे हत्ती कोरलेले आहेत ज्यांच्या सोंड व डोक्यावर या खोल्यासमोरचे छत तोलुन धरलेले आहे.
हे पण असेच कशाचे आहे हे न ठरु शकलेले शिल्प, यात दोन धनुर्धारी आहेत, एकाच्या मागे माकडे आहेत, वर बायका आहेत घरकाम करणा-या, त्यामुळे ह्यावर सुद्धा ब-याच चर्चा होउन आपल्याला काही कळत नाही हा निष्कर्ष काढणेत आला.
मंदिराच्या बाहेरुन एका बाजुला दिसणा-या फुलांच्या शेतीचा हा एक फोटो.

मग इथुन निघुन आम्ही सासवडला काही माहितगारांना विचारपुस करुन मोहीनि हॉटेल मध्ये आलो. तिथं व्यवस्थित मिसळपाव हाणुन, त्यावर चहा व लस्सीने पोटं पॅक करुन पुढे निघालो. वाटेत चांगवटेश्वर नावाचे शंकराचे मंदिर आहे. एकदम शांत आणि आडबाजुला असलेलं हे मंदिर आत्मशुन्य यांनी दाखवले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. हे मंदिर तथाकथितपणे भारतीय पुरातत्विय खात्याच्या ताब्यातआहे, आणि त्यांनी आपल्या सवयीप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे त्याची वाट लावणे सुरु केले आहे. सगळीकडे फोटो काढल्यास जबरदस्त शिक्षेची भिती दाखवलेली आहे तसेच फोटो काढल्यास आपणच कोणाला फोन करुन सांगायचे ते लिहिले आहे.

श्री. संत ज्ञानेश्वरांच्या वे़ळेचे श्री. चांगदेव हे दरवर्षी काही काळ अंधत्व व मॉनत्व स्विकारुन साधना करीत अशी काहीशी कथा या मंदिराची आहे. येथे असलेले शिवलिंग स्वयंभु आहे असे लिहिले आहे. मंदिरात १५- २० पाय-या चढुन जावे लागते आणि त्यावर मंदिर जोत्यावर बांधलेले आहे. समोरच्या अंगणात दोन बाजुला दोन दिपमाळा आहेत. येथे ही एक मोठा दगडी नंदी आहे, ज्यावर कर्मदरिद्री भापुखाने सिमेंट पेंट मारुन त्याच्या बो-या वाजवला आहे. हीच त-हा मंदिराची व कळसाची आहे. चांगवटेश्वर मंदिरातील शिवलिंग.
अतिशय अक्कलशुन्य व कल्पनादारिद्य असणा-या कोण्यातरी टेंडरचा आयट्म करायचा म्हणुन रंग दिलेला कळस. हा कळस त्याच्या मुळ रुपात खुप सुंदर दिसला असता पण ... या फोटोत दिसणा-या चाफाच्या झाडाच्या जाळीवर भारताचे पहिले राष्ट्र्पती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी या मंदिराला १९५८ साली भेट दिलेली होती अशी पाटि आहे.


मंदिराच्या अंगणातील दोन दिपमाळा.

आता पुढे मंदिरातील नंदी व खांबाचे काही फोटो आहेत. या मंदिरातील बहुतेक सगळया खांबांवर वेगवेगळे प्रसंग किंवा कलाकसुर आहे.

फोटो मधील जिवंत मनुक्ष श्री. आत्मशुन्य.

फोटो मधील जिवंत मनुक्ष श्री. गणेशा.
फोटो मधील जिवंत मनुक्ष श्री. भरत.

फोटो मधील जिवंत मनुक्ष म्हणजे प्रत्यक्ष मी, माझ्यासहित एवढा मोठा खांब एका फोटोत बसवल्याबद्दल आत्म्शुन्य यांना धन्यवाद.



यानंतर पुढे नारायणपुर येथे श्री. एकमुखी दत्त व नारायणेश्वर (शंकर) या दोन्ही देवळात गेलो. दत्ताचे देऊळ म्हणजे मोठा हॉल आहे, पण नारायणेश्वराचे देऊळ मात्र जुने दगडी आहे, आणि आत छान अंधार व खुप धुप लावुन वातावरण निर्मिती छान केलेली होती.

क्रमशः - ( लंच टाईम संपला, पुढचा भाग उद्या टाकेन, क्षमस्वः)

हर्षद.

हे ठिकाणविचारबातमीअनुभवशिफारसमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पा's picture

18 Jan 2011 - 2:46 pm | स्पा

सर्व फोटो अप्रतिम..... :)

मुलूखावेगळी's picture

18 Jan 2011 - 2:46 pm | मुलूखावेगळी

वा
छान झालीले आहे ट्रिप
आता लवकरच पुढचा भाग येउ द्या

नन्दादीप's picture

18 Jan 2011 - 2:50 pm | नन्दादीप

>>छान झालीले आहे ट्रिप....आता लवकरच पुढचा भाग येउ द्या
हेच म्हणतो.

च्यायला, सर्व मिपाकर पुण्यातच रहातात की काय??? जळतोय नुस्ता....यायला नाही जमत म्हणून.....

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jan 2011 - 2:52 pm | परिकथेतील राजकुमार

व हर्षद शेठ, फोटू आणि वर्णन झकासच.
पुढील भाग वाचुन सविस्तर प्रतिक्रीया देतोच :)

अवांतर :- अहो मिसळ चापलीत पण तीचा फोटू नाही टाकलात.

टारझन's picture

18 Jan 2011 - 3:27 pm | टारझन

:) एकंच नंबर फोटो

५० फक्त's picture

18 Jan 2011 - 2:55 pm | ५० फक्त

@ नंदादीप, नाही रे गणेशा मुंबईतुन आला होता.पुढच्या वेळी तु पण जमव. मजा करु.

बहुतेक - पुढच्या महिन्यात अम्रुतेश्वरला चाललोय रतनगडाच्या जवळ. यावेळी १५ दिवस आधी धागा काढेन.

हर्षद.

स्वाक्षरी ,------

प्रचेतस's picture

18 Jan 2011 - 3:15 pm | प्रचेतस

हर्षदभौ, अमृतेश्वरला जाणार तर साम्रदच्या जवळच्या सांदण दरीत जाउनच या. एकदम अप्रतिम आणि एकमेवाद्वितीय आहे.

विकाल's picture

18 Jan 2011 - 3:00 pm | विकाल

फोटो दुन्या भारी बर....

निस्ता धिन्गाणा केलाय...लै भारी !! येउ द्या...!!

प्रीत-मोहर's picture

18 Jan 2011 - 3:03 pm | प्रीत-मोहर

मस्त मस्त फोटो

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Jan 2011 - 3:03 pm | बिपिन कार्यकर्ते

छान फोटो मंडळी!!!

स्वाती दिनेश's picture

18 Jan 2011 - 3:13 pm | स्वाती दिनेश

फोटो मस्तच.. एकदा गेलेच पाहिजे भुलेश्वरला .. असे आता तेथल्या ट्रीपा आणि फोटो पाहून नक्कीच वाटायला लागले आहे.
स्वाती

सुत्रधार's picture

18 Jan 2011 - 3:17 pm | सुत्रधार

असेच बहरत रहा.
पुलेशु

प्रचेतस's picture

18 Jan 2011 - 3:20 pm | प्रचेतस

एकदम झक्कास वृत्तांत रे हर्षद. मजा आली वाचून.

>>शिखराचा भाग पेशव्यांनी बांधला आहे. (इति श्री. पुजारी.)

हे तितकेसे पटले नाही. इथल्या इस्लामिक आक्रमणातील मुर्तीभ़ंजनानंतर आदिलशाही सरदार मुरार जगदेव याने हे शिखराचे काम केले आहे असे आमच्या ऐकिवात आहे. म्हणून शिखराचा बराचसा भाग हा इस्लामिक शैलीतलाच वाटतो. अर्थात पेशव्यांनी नंतर थोडीफार डागडुजी केलीही असेल.
जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच.

मस्त.
रविवार स्त्कारणी लागला म्हणायचा तुम्हा सर्वांचा. :)
आम्ही नुसताच लोळुन घालवला.

यकु's picture

18 Jan 2011 - 3:30 pm | यकु

फोटो सुंदर!
खरंच शिल्पसौंदर्य आहे हे.
आणि दगडावरची तकाकी अगदी नवी दिसत असल्याने अगदी अलिकड्चे.. दोन चारशे वर्षातले असावे...
मूर्त्यांची तोडफोड आढळली नाही ना?

गणेशा's picture

18 Jan 2011 - 4:40 pm | गणेशा

मुळ मंदिर १३ व्या शतकात बांधलेले आहे. शिखर आणि काही भाग नंतर बर्याच काळाने भांधलेला आहे.

पहिल्यांदा हा गड म्हणुन बांधलेला होता असी नोंद आढळते. एंट्रंन्स मात्र गोमुखी सहजा सहजी लक्षात न येणारा आहे .. त्यावरुन नक्की कधी बांधकाम झाले असेन हे संशोधन विभागास कळु शकते.

--
मुर्ती शिल्पांची तोडफोड भर्पुर आहे, येथे जेंव्हा मुस्लिम राज्याचे सैन्य मुर्ती तोडत होते तेंव्हा भुंगे पिंडीतुन निघाल्याने ते पळुन गेले आणि बरेचसे मंदिर वाचले असे ऐकलेले आहे

गणेशा,

आठवणीबद्दल धन्यवाद,

भुलेश्वर मंदिराचा मुख्य दरवाजा हा एखाद्या जुन्या घरासारखा आहे, उन्हातुन आत गेल्यावर इतर देवळाप्रमाणेच लगेच गाभारा असेल असे वाटते आणि हात जोडले जातात. आम्ही बाहेर पडताना आलेल्या एका कुटुंबातील प्रत्येकाने तिथेच नमस्कार केला होता आणि आम्ही जाम हसलो होतो.

खरंतर घाट चढुन जाताना मंदिर किती ऊंच आहे ते कळतं पण आत जाताना नेमका घोळ होतो, पहिल्यांदा माझा पण झाला होता असा बकरा.

हर्षद.

आत्मशून्य's picture

18 Jan 2011 - 5:33 pm | आत्मशून्य

एका आजींनी गाभारा समजून दरवाज्यालाच नमस्कार केला आणी तेव्हड्यात आपण त्यातून खीदळत बाहेर पडलो होतो तर आतमधे असताना एका व्यक्तीने बाहेरून खीडकीतून आत डोकावत आपल्याला मंदीरात प्रवेश कसा केलात हे वीचारले होते :):):)

प्रचेतस's picture

19 Jan 2011 - 9:38 am | प्रचेतस

भुलेश्वर मंदिर चा परिसर गड म्हणूनच होता. 'दौलतमंगळ' असा उल्लेख आढळतो. पायर्‍यांच्या वाटेने गेलात तर प्रवेशद्वार, बुरुज, बांधकामाचे इतर अवषेशही दिसतात.

स्पंदना's picture

18 Jan 2011 - 3:44 pm | स्पंदना

मंदीरावरची कलकुसर किती छान टिपली आहे. आवडल.

करा करा मजा करा आम्ही कैलास जीवन लावुन लावुन वाचु.

RUPALI POYEKAR's picture

18 Jan 2011 - 4:00 pm | RUPALI POYEKAR

केवळ अप्रतिम फोटो

विनायक बेलापुरे's picture

18 Jan 2011 - 4:01 pm | विनायक बेलापुरे

झकास सहल , भुलेश्वराचे हेमाडपंती मंदीर आतून कमालीचे थंड आहे. भर दुपारी १ वाजता पोचला होतात, तेन्व्हा आत गेल्यावर भल्यामोठ्या नंदिजवळ एकदम गारेगार वाटले की नाहि ? ते फोटोत येणे कठिण आहे.

पुर्वी तिथे देवळात दुपारी गार निवांत झोपलेले असायचे आजूबाजुचे रिकामटेकडे.

मजा केलीत . छान ! पुढचा भाग येउ द्या लवकर.

श्री. विनायक,

आपला अनुभव अगदी खरा आहे, मंदिरात आत कुठेही गरमी जाणवत नव्हती, तसेच चांदवटेश्वरेच्या मंदिरात सुद्धा.

आणि हो कोणि रिकामटेकडे नाही दिसले पण एकुण गर्दी बरीच होती.

हर्षद.

डावखुरा's picture

18 Jan 2011 - 4:03 pm | डावखुरा

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\ सर्व छायाचित्रे अप्रतिम आणि वर्णनही \\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

प्यारे१'s picture

18 Jan 2011 - 4:30 pm | प्यारे१

भारी रे.....!!!

छान छान फटू!

शुचि's picture

18 Jan 2011 - 4:37 pm | शुचि

>> त्या त्या देवतांच्या स्त्री रूपातील प्रतिमा>>
वामपंथियांबद्दल मला काही माही माहीत नाही पण दुर्गा देवीस मदत करण्यास म्हणून प्रत्येक देवाच्या शरीरामधून त्या त्या देवाची शक्ती प्रकट झाली होती. यात ब्रह्माणी ही हंसारूढ आणि कमंडलूधरण केलेली, माहेश्वरी ही वृषभारूढ आणि हातात सर्प ल्यालेली, त्रिशूल धारीणी तर वैष्णवी ही गरूडारूढ आणि चक्र , गदा, शांड्ग् , शंख धारण केलेली होती. गुहा म्हणजे कार्तिकेयाची शक्ती कौमारी ही मयुरावर बसून राक्षसांवर तुटून पडली तर इंद्राची इंद्राणी ही ऐरावतावर खड्ग घेऊन राक्षसांवर चालून गेली.
______________________________________________

बाकी फोटो फारच छान आले आहेत.

एकूणच मंदीराची तोड्फोड बघताना फार फार वाइट वाटते, असे काम माणसे करूच शकत नाहीत हा वीचार मनी येतो, मग असे करणार्‍यांचे लिंग/धर्म/जात्/देश/पंथ कोणताही असो. तसेच शील्प आणी त्यातील प्रसंगावर तर P.H.D. पण करता येइल. एकूणच ट्रीप एकदम मस्त झाली. भरत आणी गणेशा बरोबरच,एव्हडी मस्त ट्रीप जमवल्याबद्दल हर्षदभाऊ आपले विशेष धन्यवाद .आपले वेळेचे गणित (म्यानेजमेंट)अचूक आहे म्हणूनच इतकी मंदीरे कोणतीही घाइ-गडबड न होता निवांतपणे बघता आली. आणी शेवटी ज्याला पूर्णब्रम्ह म्हटले जाते त्याचा सूध्दा अस्वाद मनसोक्तपणे घेऊन वेळेत परत येता आले. :)

प्राजक्ता पवार's picture

18 Jan 2011 - 5:00 pm | प्राजक्ता पवार

फोटो व वृत्तांत दोन्ही छान . पुढचा भागदेखील टाका.

"आणी शेवटी ज्याला पूर्णब्रम्ह म्हटले जाते त्याचा सूध्दा अस्वाद मनसोक्तपणे घेऊन वेळेत परत येता आले "

आत्मशुन्या, अरे मोहिनी मधल्या मिसळीचे व लस्सीचे फोटो टाकले नाहीत म्हणुन श्री.पराशेठ रागावले आहेत आणि तु आत्त्ताच त्या कॅलास अनुभवाचा उल्लेख करुन सगळ्यांना का उकसावत आहेस.

असो, उद्या जेवणसुट्टित तो पण भाग येईलच.

पाषाणभेद's picture

18 Jan 2011 - 5:45 pm | पाषाणभेद

मस्त फोटो आहेत.

रेवती's picture

18 Jan 2011 - 6:00 pm | रेवती

सगळी छायाचित्रे छान आली आहेत.
उद्याच्या लंच टाईमची वाट पाहू.;)

पुष्करिणी's picture

18 Jan 2011 - 6:09 pm | पुष्करिणी

ट्रिपचे फोटो आणि वर्णन सुंदर, पुढचा भाग लौकर टाका

फारच छान जमलाय ! मला पण यायचे होते, मात्र तेव्हाच मुंबईस जावे लागले ! :(
बाकी छायाचित्रे तर अप्रतिमच ! येऊ द्या पुढील भाग, वाट पाहतो ! :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Jan 2011 - 7:57 pm | निनाद मुक्काम प...

मस्तच
फोटो झकास आणि प्रवास वर्णन मोजकेच पण ओघवत्या शैलीमुळे चटकदार झालाय .
शाळांच्या सहली येथे आयोजित केल्या पाहिजे .जेणेकरून भारतीय शिल्पकला व संस्कृती बालवयात मुलांना उमजून येईन .

चिगो's picture

18 Jan 2011 - 9:49 pm | चिगो

मस्त फोटोज आणि वर्णन..
मजा करा...

>>असेच कशाचे आहे हे न ठरु शकलेले शिल्प, यात दोन धनुर्धारी आहेत, एकाच्या मागे माकडे आहेत, वर बायका आहेत घरकाम करणा-या, त्यामुळे ह्यावर सुद्धा ब-याच चर्चा होउन आपल्याला काही कळत नाही हा निष्कर्ष काढणेत आला.

राम-लक्ष्मण असावेत का?

आत्मशून्य's picture

19 Jan 2011 - 4:24 am | आत्मशून्य

आम्हाला सूध्दा त्या शिल्पचीत्राबाबत चर्चा करताना असे वाटले होते की ती राम आणी भरत भेट असावी पण त्या वेळेला वानरसेनेची ऊपस्थीती नसल्याने तो दावा फेटाळण्यात आला. तसेच आपण सांगता त्या प्रमाणे ते राम-लक्ष्मण आहेत असे गृहीत धरले तर तो प्रसंग कोणता समजावा ?

प्राजु's picture

18 Jan 2011 - 11:36 pm | प्राजु

छान आले आहेत सगळे फोटो.
आता उद्याच्या लंच टाइम ची वाट पाहतेय. :)

नरेशकुमार's picture

19 Jan 2011 - 7:05 am | नरेशकुमार

छान झाली आहे ट्रिप.
पुढचा भाग येउद्या लवकर !

चित्रा's picture

19 Jan 2011 - 7:26 am | चित्रा

देवळावर बरेच पक्षी दिसले :)

अतिशय सुंदर फोटो. पुढील फोटो आणि सहलीच्या वर्णनाच्या अपेक्षेत.

कानडाऊ योगेशु's picture

19 Jan 2011 - 11:54 am | कानडाऊ योगेशु

हे पण असेच कशाचे आहे हे न ठरु शकलेले शिल्प, यात दोन धनुर्धारी आहेत, एकाच्या मागे माकडे आहेत, वर बायका आहेत घरकाम करणा-या, त्यामुळे ह्यावर सुद्धा ब-याच चर्चा होउन आपल्याला काही कळत नाही हा निष्कर्ष काढणेत आला.

दोन धनुर्धारी..माकडे ह्यावरुन तरी हे शिल्प रामायणातला एखादा प्रसंग दाखवणारे आहे असे वाटतेय.

नमस्कार,

काल दुसरा भाग टाकणे शक्य झाले नाही, आज टाकला आहे, त्याची लिंक - http://misalpav.com/node/16391

वाचा व प्रतिसाद द्या.

हर्षद.