काही संवाद

ॐकार's picture
ॐकार in जनातलं, मनातलं
13 Apr 2008 - 2:54 pm

आजानुकर्ण यांच्याशी गप्पा मारता मारता असे काही कल्पनारम्य संवाद सुचले. संवाद कल्पनेतले(च) आहेत. काही साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा, न आढळल्यास सुदैव!

संवाद १
(
वेळ : एकाची सकाळ, एकाची संध्याकाळ
माध्यम : जीटॉक-चॅट
स्थळ : नसत्या चौकश्या करू नका.
)

१: नमस्कार
२: नमस्कार
१: नविन काय लिहिले?
२: काही नाही. वेळच नाही मिळत हल्ली.
१: अच्छा. काल त्या पाककृतीवर तुमचा प्रतिसाद वाचला.
२: अं? हो हो.
१: पण त्यात तुम्ही कविता छान झाली आहे असं लिहिलयं!
२: असं काय? बहुदा झोपेत दिला प्रतिसाद. कवितेलाच द्यायचा होता खरा.
१: हेहेहे , प्रतिसाद झोपेतही देता पण लिहायला वेळ नाही! कमालच करता :प
२: हेहेहे, बरे बारीक लक्ष ठेवून असता तुम्ही ;), क्वालिटी कंट्रोल मध्ये काम करता काय?
१: छे छे. इथे सिलिकॉन व्हॅलीत आहे. म्यानेजर.
२: अच्छाच्छा! बरं आहे. हापिसातून मस्त टाईमपास होत असेल तुमचा फावल्या वेळात. इथे कविता टाकायची म्हटलं तरी सायबर कॅफेत यायला लागतं.
१: दिवसभरात काही ना काही वाचायला मिळतं , त्यामुळे असतो पडीक :ड
२: वाचन! बरी आठवण करून दिलीत. शेजार्‍याकडून पेपर परत घ्यायचाय. ह्या नविन लेखाच्या नादात मी पेपर वाचलाच नाही.
१: नवा लेख? कशावर?
२: मनोगतावर - मला हे मराठी शब्द नको आहेत अश्या शीर्षकाचा.
१: ?? नको आहेत? मग मनोगतावर टाकून काय करणार?
२: हवे आहेत म्हणून तरी लोक काय करतात? :प
१:खिखिखिखि
२:ख्यॅख्यॅ

संवाद २
(
वेळ : कोणालाच पत्ता नाही
माध्यम : जीटॉक-व्हॉईस
स्थळ : ठरते आहे...
)

१: नमस्कार
२: नमस्कार
१: उद्या भेटायचं का?
२: नाही. वेळच नाही मिळत हल्ली.
१: अच्छा. काल त्या पाककृतीवर तुमचा प्रतिसाद वाचला.
२: अं? हो हो.
१: पण त्यात तुम्ही कविता छान झाली आहे असं लिहिलयं!
२: असं काय? बहुदा प्यालो होतो. कवितेलाच द्यायचा होता खरा.
१: हेहेहे , लिहायला/प्यायला वेळ आहे! पण भेटायला नाही? कमालच करता :प
२: हेहेहे, बरे मोकळे असता तुम्ही भेटायला ;), इन्फी मध्ये काम करता काय?
१: छे छे. टेक्सटाईल मध्ये आहे.
२: अच्छाच्छा! मजा आहे. घरून मस्त टाईमपास होत असेल तुमचा फावल्या वेळात. इथे चर्चा टाकायची म्हटलं तर लोक कुत्रं चावल्यासारखे प्रतिसाद देत बसतात.
१: मला कुत्रा म्हणालात ?
२: छेछे! असंच म्हटलं. बरी आठवण करून दिलीत. मोत्याला इंजेक्शन देऊन आणायचे आहे. ह्या विडंबनाच्या नादात विसरलोच होतो.
१: विडंबन? कशावर?
२: मनोगत, मिपा. - माझे माहेर अंधेरी!
१: ?? लोकांना काही ताळतंत्र? चांगल्या गाण्याची वाट का लावता?
२: त्यांनाच विचारा की. तुम्ही नुसते इथे बोलता, एक प्रतिसाद प्रामाणिक द्याल तर शप्पथ!
१:खिखिखिखि
२:ख्यॅख्यॅ

संवाद ३
(
वेळ : ठरते आहे
माध्यम : फोन
स्थळ : ठरते आहे...
)

१: काय रे भा*
२: बोल भ**
१: उद्या बसायचं का?
२: नाही. वेळच नाही रे मिळत हल्ली.
१: अच्छा. काल त्या पाककृतीवर तुझा प्रतिसाद वाचला.
२: अं? हो हो.
१: पण त्यात तू कविता छान झाली आहे असं लिहिलयं!
२: असं काय? चुकीचा आयडी वापरला वाटतं. दुसर्‍याच आयडीने एका कवितेला द्यायचा होता खरा.
१: हेहेहे , किती आयडी तुझे? कमालच करतोस :प
२: हेहेहे, सगळेच वापरतात, तुझे नाहीत काय?
१: छे छे. एकच आहे.
२: अच्छाच्छा! काही मजा नाही मग. टाईमपास कसा होतो तुझा फावल्या वेळात? इथे लेख लिहायला घेतला की मी पूर्ण करून त्यावर स्वतः दोन तीन आयडींनी प्रतिसाद देऊनच सोडतो.
१: साईटवर नाही गेलो, नाही लिहिलं तर काही अडतं थोडच?
२: बरी आठवण करून दिलीस. साईटवर जायचं आहे. मजूराने घोळ केला आहे.
१: मजूर? नविन युजर? उपक्रमावर की मायबोलीवर?
२: अरे कंस्ट्रक्शन साईट!
१: ?? मला वाटले वेबसाईट! क्लीअर सांगत जा की राव!
२: अजून काय क्लिअर? तुम्ही भलत्याच जगात वावरता बुवा!
१:खिखिखिखि
२:ख्यॅख्यॅ

संवाद ४
(
वेळ : दुपार
माध्यम : फोन
स्थळ : कुठलातरी कट्टा
)

१: नमस्कार
२: नमस्कार
१: उद्या जेवणाचं नक्की का?
२: नाही. आजानुकर्णाने आजचं कळवलं नाही का? आजच आहे.
१: आजानुकर्ण?
२: अहो वेलणकरांच्या जागेत नव्हतं टाकलं. पण मिसळपावर सांगितलंच होत की.
१: कोण वेलणकर? अहो श्रीखंडाचं ठरलं होतं, मिसळपाव नव्हे!
२: असं काय? पेठकरांशीच बोला, त्यांचाच बेत आहे.
१: हेहेहे , आता काय दहा लोकांना फोन देणार काय तुम्ही?
२: हेहेहे, दहा लोकं? इथे ५-६ च आहेत. तात्यांना देऊ?
१: कोणालाही द्या,आणि आधी पत्ता द्या.
२: अच्छाच्छा! तुम्हाला पत्ता माहीत नाही तर. उपक्रमावरही आहे बातमी , तिथून घ्या. नाहीतर तात्यांशीच बोला, घ्या.
१: उपक्रम? कुठला तात्या? काय घेतलीत बितलीत की काय?
२: बरी आठवण करून दिलीत. अजून दारू प्यायची आहे. नव्या पोरांनी हट्ट धरला आहे.
१: पोरं? हट्टं? अहो लग्नकार्य आहे ना?
२: अहो कट्टा आहे हा!
१: गोडबोले ना? मी मुलाचा बाप बोलतोय, उद्याच्या लग्नाची व्यवस्था लागली का?
२: गोडबोले? छे छे. मी जोशी. काहीतरी गफलत आहे...
१:खिखिखिखि, राँग नंबर आहे वाटतं.
२:ख्यॅख्यॅ

हे ठिकाणसंस्कृतीवावरसमाजजीवनमानमौजमजामाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

13 Apr 2008 - 4:14 pm | केशवसुमार

ॐकारशेठ,
संवाद एकदम मस्त..ओळखीचे वाटले..;)
बाकी 'माझे माहेर अंधेरी' लिड चांगला दिलाय.. बघू काही करता येतं का ते..खि..खि..खि,...
केशवसुमार

विसोबा खेचर's picture

13 Apr 2008 - 4:28 pm | विसोबा खेचर

ॐकारा, तुझ्या कल्पकतेला दाद देतो रे!

संवाद बाकी छानच आहेत!

२: असं काय? चुकीचा आयडी वापरला वाटतं. दुसर्‍याच आयडीने एका कवितेला द्यायचा होता खरा.
१: हेहेहे , किती आयडी तुझे? कमालच करतोस :प

हे मस्तच! :)

बाकी दुसर्‍या आयडीने कवितेला प्रतिसाद द्यायचं तर सोडाच, काही लोक दुसरा आयडी घेऊन एका संस्थळावरच्या कविता दुसर्‍या संस्थळावर प्रसिद्धदेखील करतात! ;)

असो,

ॐकारा, तुझे संवाद आवडले रे, मजेशीर आहेत! ;)

पुढचेही काही संवाद येऊ देत रे, वाट पाहतो...

आणि लवकरच पुण्यात येतो आहे तेव्हा बसूच! खीखीखी!! :)

तात्या.

आनंदयात्री's picture

13 Apr 2008 - 4:54 pm | आनंदयात्री

>>, न आढळल्यास सुदैव!

एवढे कुठले सुदैव तुमचे :)

छान लेख, शेवटच्या प्यार्‍याग्राफ नी हहपुवा.