आजवर लोकांनी बर्याच ठिकाणी सागरी जगाची, आकाशातल्या जगाची आणि अगदी गुन्हेगारांच्या, माफियांच्या जगाची देखील ओळख कुठेना कुठे वाचलेली असेल. अगदी थरारक, श्वास रोखुन वगैरे धरणारी घटनाक्रमांची मालीका चित्रपटाद्वारे देखील पाहिलेली असेल. पण आज मी तुम्हाला ओळख करुन देणार आहे ती एका अनोख्या विश्वाची, ज्याचे नाव आहे 'हॅकर्स वर्ल्ड' आणि त्यातल्या वर्चस्वासाठी खेळल्या गेलेल्या अविश्वसनीत लढायांची.
जसजशी संगणकाची ओळख वाढायला लागते तसतशी सगळ्यात आधी धास्ती वाटायला लागते ती व्हायरस नामक प्रकाराची. मग ओळख होते अँटीव्हायरसची. हळुहळु एकेक पायर्या चढत गेलो की मग फायरवॉल वगैरेची ओळख वाढते आणि त्याचवेळी आपल्या मनावर आणि मेंदूवर दहशत माजवणार्या आणखी एका घटकाची ओळख होते आणि तो घटक म्हणजे हॅकर.
खरेतर 'हॅकर्स पॅरेडाईज'शी माझी कधीना कधी ओळख होणार हे मी जाणुनच होतो. खरेतर आत्मस्तुती वाटेल पण हॅकर्स पॅरेडाईजला कधी ना कधी माझी गरज लागणार हे मी ओळखुनच होतो असे म्हणणे जास्ती योग्य ठरेल. तशी अजुन मी ग्रे-हॅट हॅकरची पातळी ओलांडली न्हवती, पण जे काही उद्योग मी केले होते ते माझी ख्याती योग्य त्या ठिकाणी पोहोचवायला समर्थ होते. असे गोंधळु नका, ग्रे-हॅट हॅकर हा हॅकरचा एक प्रकार आहे. इतर दोन प्रकार आहे व्हाईट-हॅट हॅकर आणि ब्लॅक-हॅट हॅकर्स. नावावरुन कोण काय करते हे तुमच्या लक्षात आले असेलच ना ?
ग्रे-हॅट हॅकर्सशी आपला संबंध सगळ्यात जास्ती वेळ आलेला असतो. तो बर्याचदा आपल्या लक्षात देखील येत नाही हा भाग वेगळा. पासवर्ड हॅक करणे, तुमच्या बँक खात्यात शिरणे, तुमची वेबसाईट-ब्लॉग उलटापालटा करुन टाकणे, तुमच्या संगणकात अनावश्यक प्रोग्रॅम्स भरुन ठेवणे असले उद्योग हे ग्रे हॅकर्स करत असतात. पैसा अथवा लुटमार हा ह्यांचा उद्देश कधीच नसतो. फक्त स्वतःच्या ज्ञानाचे प्रदर्शन अथवा अहंगंड कुरवाळणे म्हणा ना.
ब्लॅक-हॅट हॅकर्स म्हणजे ह्या जगाची सगळ्यात काळी बाजू. बँक अकाउंट हॅक करुन पैसे लांबवणे, इ-मेल अकाउंट हॅक करणे, संगणकातुन माहिती पळवणे, सोशल कम्युनिटीजची अकाउंटस हॅक करुन ती विकणे, क्रेडीट कार्डस नंबर विकणे हे ह्यांचे धंदे.
अगदी उलट बाजु म्हणजे व्हाईट-हॅट हॅकर्स. ह्यांना आपण इथिकल हॅकर्स म्हणुन देखील ओळखतो. मोठमोठ्या कंपन्यांच्या सुरक्षा यंत्रणांची काळजी घेणे, वेळोवेळी इतर कपन्यांना मदत करणे, सरकारला सह्हाय करणे हि सगळी पापभिरु कामे करण्यात हे हॅकर्स आघाडीवर असतात.
आणि ह्यातल्याच काही चांगल्या वाईट हॅकर्सची मोट बांधुन त्यांची एक स्वतंत्र संघटना कार्यरत आहे, जीचे नाव 'हॅकर्स पॅरेडाईज'. हि संघटना नक्की कधी अस्तीत्वात आली ह्याची खात्रीशीर माहिती कोणालाच नाही. पण अमेरीकेच्या 'स्कार्फ' आणि 'माऊस' ह्या दोन हॅकर्सनी हि संघटना सगळ्यात आधी चालु केली असे मानले जाते. आज जगातील छोटे मोठे १५०० हॅकर्स ह्या संघटनेसाठी कार्यरत आहेत. इतर गुन्हेगारी क्षेत्रात असते तेवढी रिस्क ह्या क्षेत्रात नक्कीच नाही. मुळात संगणकाशी निगडीतच सर्व गुन्हे असल्याने फक्त सुशिक्षीत लोकांचाच वावर इथे आढळतो. मालाची देवाण घेवाण वगैरे प्रकार नसल्याने एकमेकांची थोबाडे बघण्याची देखील गरज पडत नाही. फक्त मुखवटे आणि त्या मुखवट्यांची तेवढीच फसवी नावे.
साधारण २००५ पर्यंत हॅकर्स पॅरेडाईजचे काम व्यवस्थीत चालले होते. नवनव्या कंपन्या आणि त्यांच्यातील चढाओढ ह्यामुळे कधी न्हवे येवढा फायदा संघटना कमावत होती. मात्र प्रामाणीकपणाची कास न सोडणे ह्याच्याशी कटिबद्ध राहूनच. सर्व आलबेल असतानाच अचानक ठिणगी पडली, आणि ती ही प्रत्यक्ष संघटनेच्या मालकांच्यातच. कारण ? एकच.. अमाप पैसा आणि सुरक्षीततेची हमी.
रशियन्स लॉबीला अमेरीकन अवकाश कार्यक्रमाची माहिती पुरवणे हा हॅकर्स पॅरेडाईजला मिळालेला सध्याचा सर्वात मोठा आणि प्रचंड पैशाची रास ओतणार उद्योग. हे काम व्यवस्थीत चालु असतानाच अचानक एक दिवस 'माऊस'ची गाठ सिनेटर चार्ल हॉक्स बरोबर पडली आणि चित्रच पालटले. आजवर हॅकर्स अंडरग्राउंडनी कल्पनाही केली नसेल येवढी रक्कम आणि पुढच्या आयुष्याच्या सुरक्षीततेची हमी त्यांना देण्यात आली. आणि काम अतिशय सोपे होते... फक्त रशियन्सना डबलक्रॉस करणे.
'स्कार्फ' अर्थातच ह्याला तयार झाला नाही. अर्थातच परिणाम व्हायचा तोच झाला, संघटनेत उभी फूट पडली. एकमेकांची व्यावसायीक गुपीते जपण्याच्या शपथा घेउन 'स्कार्फ' आणि 'माऊस' वेगवेगळे झाले. ह्याचा परिणाम अर्थातच संघटनेवर देखील झाला आणि दोन्ही बाजुंना सगळ्यात मोठी अडचण निर्माण झाली ती प्रशिक्षीत हॅकर्सची. दोन्ही कडुन मोठ्या प्रमाणावर भरती चालू झाली, आणी अशाच एका लॉट मधुन मी 'माऊस'च्या संघटनेत प्रवेशकर्ता झालो. नव्या संघटनेचे नाव होते 'हॅकर्स अंडरग्राउंड'.
आता सायबर विश्वातील एका सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात घातक खेळाला सुरुवात होणार होती. दोन्ही शत्रु एकमेकांना ओळखुन होते, समोरच्याची शक्तीस्थाने आणि विकपॉईंटस देखील जाणुन होते. त्यामुळे आता सगळी मदार होती ती नविन भरती झालेल्या लॉटवर आणि त्यांच्या कर्तबगारीवरच. आता यशस्वी कोण ठरणार ह्यावर दोन संघटनांचेच नहितर दोन देशांच्या 'सॅटेलाईट्-डिस्ट्रॉयर' मिसाईलचे भवितव्य अवलंबुन होते.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
12 Aug 2010 - 1:24 pm | दिपक
ही इज बॅक.. मा फ़ेवरेट हॅकर.. :-)
पुढे कथा जबरदस्त कलाटणी देणार हे ठाऊक आहेच. येऊदेत उत्सुकता ताणलेलीच आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
12 Aug 2010 - 1:37 pm | सहज
वाचतोय हो.
ह्या परापासुन सावध राहीले पाहीजे बॉ. न जाणो काय काय शोधत असेल आपल्या संगणकावर. ;-)
12 Aug 2010 - 2:06 pm | Pain
नीट लिही रे. मागच्या वेळेसारखी चांगली सुरुवात करून शेवट काहीच्या काही करू नकोस.
आणि नव्या गोष्टी सुरु करण्याआधी जुनी पूर्ण करायला काय होत रे ?
12 Aug 2010 - 5:54 pm | चिंतामणी
आणि नव्या गोष्टी सुरु करण्याआधी जुनी पूर्ण करायला काय होत रे ?
१०० % सहमत.
(अनुभवी) चिंतामणी
14 Aug 2010 - 6:32 am | बहुगुणी
प्रकाटाआ
12 Aug 2010 - 1:59 pm | नगरीनिरंजन
वाचतोय. रोचक सुरुवात!
पु.भा.प्र.
12 Aug 2010 - 2:19 pm | शानबा५१२
(मला वाटल आपण फक्त ब्लॉगवर लिहता म्हणुन वेगळ्या एका लेखात प्रतिसाद दीला होता,तोच ईथे लिहत आहे.)
हॅकर्स अंडरग्राउंड
वाचायला फार मजा आली,पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.(काल्पनिक नसावं अस मनापासुन वाटत आहे,खुलासा करावा)
बाकी गुगलकडे ही भारी हॅकर्स असणार हे नक्की.
विषयांतर :
मधे पीएसपी ३००० हॅक करण्यासाठी मिरारोडच्या एका प्रसिद्ध हॅकरला भेटलो,त्याने हातवर केले.२००० सीरीज हॅक करता येत होती,ही ३००० नाही होत.
आमच्या काही हॅकींगमधल्या कामगिरीजः
१. गुगलची ५ खाती,फक्त मजेसाठी.
२ एटेलचे २५रु/दीन आकारणारे इंटरनेट साडेतीन वर्ष फ्री मधे वापरलं,नंतर एटेलने काही नवीन पध्दती आणुन सर्व बंद केल.मी तोपर्यंत ईतर ६-७ जणांना लाभ पोहचवला होता.
३.आता त्याचीच एक नवीन ईंटरनेट सुवीधा हॅक करुन वापरतोय.
४.ईतर ३ कंपण्यांना असच लुबाडलं.
५.हे पासवर्ड्,सॉफ्टवेर हॅक/क्रॅक करणारे पहीले फार कमवायचे आता ते रस्त्यावरही मिळतात म्हणुन गप्प झालेत.
टॅली वगैरेची सॉफ्टवेर २५-५०,००० ला वि़कणारा स्वःता सांगत होता,अगदी ईराक ते अमेरीका सर्व सेटींग्स असायच्या.
आपणही आमच्या कुज्ञानात भर टाकावी ही ईच्छा!
14 Aug 2010 - 1:42 am | आत्मशून्य
| ३.आता त्याचीच एक नवीन ईंटरनेट सुवीधा हॅक करुन वापरतोय.
ति कशिकाय बूवा ? थोडी व्यापक माहिती मीळाली तर बरे होइल.
12 Aug 2010 - 2:56 pm | निखिल देशपांडे
मस्त सुरवात रे सव्यसाची..
वाचतोय
12 Aug 2010 - 3:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुढे?
12 Aug 2010 - 4:55 pm | स्वाती२
वाचतेय.
12 Aug 2010 - 5:06 pm | स्वाती दिनेश
ते क्रमशः हॅक करायच्या कामाला लावलं पाहिजे ह्या संघटनेला ..
मस्त जमली आहे सुरुवात,लवकर टाक रे पुढे काय ते ?
स्वाती
12 Aug 2010 - 5:16 pm | छोटा डॉन
बेश्ट वातावरण निर्मीती झाली आहे.
पुढचा भाग फटाफट येऊ दे मालक ...
पराला ताकिद :
तुम्ही लै भारी हॅकर असाल आणि तुमच्यामागे ते अंडरग्राउंड हॅकर्स का काय ते असतील.
पण पुढचा भाग लवकर न टाकल्यास "तुमचा इथला आयडी हॅक करणे व त्याच्यातुन मनाला वाट्टेल तसा पुढचा भाग लिहणे" आम्हाला सहज शक्य आहे.
काय तो इशारा समजुन पुढचा भाग त्वरित टाकवा.
मॅटर खतम !!!
- ( आद्य हॅकर ) डॉन्या थॉमस गॅब्रियल
लिव्ह फ्री ऑर डाय हार्ट
12 Aug 2010 - 5:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वायदेआझम, आधी स्वतःचे लेख लिहा मग पराचा आयडी हॅक करा ... ;-)
12 Aug 2010 - 6:21 pm | मस्त कलंदर
डॉण्राव व अदिती दोघांशी एकदम सहमत!!!!!
बाकी, परा, लेख छानच हो...
12 Aug 2010 - 5:56 pm | चिंतामणी
हाय राम. इथे सुध्दा ???????????????
(त्रस्त) चिंतामणी
12 Aug 2010 - 5:57 pm | मदनबाण
परा वाचतोय रे... :)
12 Aug 2010 - 6:02 pm | मी-सौरभ
लै येळ लावू नका...
12 Aug 2010 - 6:08 pm | चिन्मना
वा! पहिला भाग तर बेश्ट जमला आहे. पुढचा भाग लवकर येईल अशी अपेक्षा आहे.
(वाचनोत्सुक) चिन्मना
12 Aug 2010 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त रे परा वाचतोय.........!
-दिलीप बिरुटे
12 Aug 2010 - 6:28 pm | घाटावरचे भट
मस्तच... लौकर पुढला भाग टाका मालक.
12 Aug 2010 - 7:06 pm | अनिल हटेला
उत्तम सुरुवात !!
पू भा प्र...............
परोबा, ;-)
12 Aug 2010 - 8:06 pm | निशदे
वाचत आहे...... येऊ द्यात
12 Aug 2010 - 10:54 pm | शिल्पा ब
मस्त जमलंय..पुढचा भाग कधी?
13 Aug 2010 - 12:19 am | पुष्करिणी
मस्त सुरूवात, पुढ्चा भाग लवकर येउदे..
13 Aug 2010 - 2:59 am | इंटरनेटस्नेही
अप्रतिम लेख आहे प.रा. सर.. पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.
13 Aug 2010 - 5:58 am | गांधीवादी
परा साहेब जमलाच तर एकदा आपल्या सगळ्या लाडक्या राजकारण्यांचा संगणक हॅक का काय ते करून त्यात कोणी, किती व कुठे कुठे पैसा दाबून ठेवला आहे ते, सरकारचा संगणक धुंडाळून कोणी, किती भ्रष्टाचार केला आहे ते जरा जनतेला कळवा (सरकारला नव्हे, जनतेलाच कळवा). लयी उपकार होतील बघा.
20 Aug 2010 - 5:49 pm | घाशीराम कोतवाल १.२
प रा म्होरला भाग कधी ?
20 Aug 2010 - 6:00 pm | मीनल
इथे ही वाचण्यात आले एका वेगळ्या हॅकर बद्दल!
21 Aug 2010 - 10:11 am | प्रकाश घाटपांडे
कुणाकुणाचे साहित्य चौर्य झाले आहे ते पहा. हा बोक्या सातबंडे काय करतो ते पहा.