इप्रसारण.कॉम येथे कादंबरी वाचन- प्राजक्ता पटवर्धन

सुवर्णमयी's picture
सुवर्णमयी in जनातलं, मनातलं
2 Apr 2008 - 10:37 pm

उद्या गुरुवार दिनांक ३ एप्रिल पासून दर गुरुवारी अर्धा तास इप्रसारण. कॉम येथे प्राजक्ता पटवर्धन 'आवली' या तुकारामांची पत्नी आवली हिच्यावर लिहिलेल्या कादंबरीचे वाचन करणार आहेत. याविषयी अधिक माहिती http://www.manogat.com/node/12713 येथे वाचता येईल.

(तुकयाची आवली- लेखक- सौ मंजुश्री गोखले
मेहता प्रकाशन, पुणे )

त्या कार्यक्रमावर, त्या कादंबरीवर आणि आवलीविषयी मिसळपावकरांना असणार्‍या माहितीची देवाण घेवाण करता येथे यावी म्हणून ही चर्चा सुरु केली आहे. प्राजुला आम्हा सर्वांच्या शुभेच्छा.

कथासंस्कृतीनाट्यइतिहासप्रकटनविचारशुभेच्छा

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

2 Apr 2008 - 10:45 pm | प्रियाली

वा! प्राजु, अभिनंदन आणि शुभेच्छा.

व्यंकट's picture

3 Apr 2008 - 4:32 am | व्यंकट

म्हणतो.

व्यंकट

मुक्तसुनीत's picture

2 Apr 2008 - 11:48 pm | मुक्तसुनीत

तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ! या अनुभवाबद्दल केव्हातरी जरूर लिहा .

प्राजु's picture

2 Apr 2008 - 11:57 pm | प्राजु

सोनाली,
धन्यवाद. आवलीला मी पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. शब्दातून जर मी आवलीला लोकांपर्यंत तिच्या भावनांसकट पोचवू शकले तर ते यश लेखिकेचे असेल ..
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

इनोबा म्हणे's picture

3 Apr 2008 - 12:07 am | इनोबा म्हणे

आपल्या प्रयत्नांना यश येवो! 'संत ज्ञानेश्वर' या लेखाप्रमाणेच हा अनुभवही वाचायला मिळेल अशी आशा करतो.
मनापासून शुभेच्छा!

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

विसोबा खेचर's picture

3 Apr 2008 - 12:13 am | विसोबा खेचर

कार्यक्रमाकरता प्राजूला मनपासून शुभेच्छा! ती गेली अनेक दिवस या कार्यक्रमाकरता खूप मेहनत घेत आहे हे मला माहीत आहे. कार्यक्रम उत्तम होऊन तिच्या मेहनतीचं सार्थक होईल याची खात्री आहे...

मनापासून शुभेच्छा!

तात्या.

अवांतर -

याविषयी अधिक माहिती http://www.manogat.com/node/12713 येथे वाचता येईल.

च्यामारी, हाच लेख तू मिपावरही लिहिला होतास ना प्राजू?

प्लीज शोध पाहू जरा तुझ्या वाटचालीत! :)

असो...

आपला,
(गनिमांच्या दुव्याकडे नीट लक्ष ठेवणारा!) तात्या. :)

प्राजु's picture

3 Apr 2008 - 12:18 am | प्राजु

मिपावर आधी प्रकाशित केला होता.. मग तिकडे..
हा दुवा

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

पान्डू हवालदार's picture

3 Apr 2008 - 12:14 am | पान्डू हवालदार

आल द बेस्ट ...

बेसनलाडू's picture

3 Apr 2008 - 12:18 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

नंदन's picture

3 Apr 2008 - 1:03 am | नंदन

माझ्याही ह्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा. इप्रसारणच्या संकेतस्थळावर केवळ वारच दिसला, कार्यक्रमाची वेळ दिसली नाही. तुम्हांला शक्य झाल्यास,(आणि इप्रसारणच्या नियमांत बसत असल्यास) एखाद्या भागाचे ध्वनिमुद्रण इस्निप्सवर चढवून त्याचा दुवा येथे देता येईल का? त्यायोगे अधिक मिपाकरांना हे कादंबरीवाचन ऐकता येईल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुवर्णमयी's picture

3 Apr 2008 - 2:59 am | सुवर्णमयी

गुरुवारचे कार्यक्रम अमेरिकन वेळेनुसार गुरुवारी सकाळपासून कधीही श्रोत्यांच्या सोयीनुसार ऐकता येतात. प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाचे असेच आहे. या शिवाय त्या आठवड्यातील सोम-शुक्रवार चे कार्यक्रम शनिवार आणि रविवारी केव्हाही ऐकता येतात.(जवळजवळ ऑन डिमांड आणि २४*७ असे या साईटचे स्वरूप होत आहे.)

चतुरंग's picture

3 Apr 2008 - 3:31 am | चतुरंग

माहितीबद्दल धन्यवाद, सुवर्णमयी!

चतुरंग

ब्रिटिश टिंग्या's picture

3 Apr 2008 - 2:24 am | ब्रिटिश टिंग्या

कादंबरी वाचनास मन:पुर्वक शुभेच्छा अन् अभिनंदन!
कार्यक्रमाची वेळ कळवावी....

- टिंग्या

पिवळा डांबिस's picture

3 Apr 2008 - 4:17 am | पिवळा डांबिस

आवलीचं सिग्निफिकन्स काय आहे ते जाणुन घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
-डांबिसकाका

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2008 - 5:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कादंबरी वाचनास मन:पुर्वक शुभेच्छा अन् अभिनंदन!

धमाल मुलगा's picture

3 Apr 2008 - 11:07 am | धमाल मुलगा

हार्दिक शुभेच्छा, प्राजुताई!!!

एकदम मस्त होऊ दे तुझा हा (देखील) कार्यक्रम :-))

- (माणूसवेडा) ध मा ल.

केशवसुमार's picture

3 Apr 2008 - 11:30 am | केशवसुमार

प्राजुताई,
कादंबरी वाचनास मन:पुर्वक शुभेच्छा अन् अभिनंदन!
केशवसुमार.

मदनबाण's picture

3 Apr 2008 - 12:14 pm | मदनबाण

प्राजुजी कार्यक्रमाकरता आपल्याला शुभेच्छा!!!!!

आपला मि.पा वरचा लेख (तुकयाची अवली.. .. अवलोक) वाचला तो सुद्धा छान आहे.....

(मि.पा प्रेमी)
मदनबाण

सुवर्णमयी's picture

3 Apr 2008 - 8:03 pm | सुवर्णमयी

प्राजु, पहिला भाग आताच ऐकला, छान झाला आहे, आवडला.
पुढील भागांकरता शुभेच्छा.
सोनालि

वरदा's picture

3 Apr 2008 - 8:16 pm | वरदा

आज घरी जाऊन नक्की ऐकते गं... तुला मनापासून शुभेच्छा!

केशवराव's picture

4 Apr 2008 - 7:30 am | केशवराव

प्राजु ,
कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छ्या! आणि अभिनंदनही !
- - - - - - - - - - - केशवराव.

प्राजु's picture

4 Apr 2008 - 8:59 am | प्राजु

आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.
आजचा भाग-१ तरी चांगला झाला.. असे मित्र्-मैत्रिणींकडून कळले.. पुढे पाहू.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 9:47 am | मनस्वी

प्राजु
कादंबरी वाचनास मन:पुर्वक शुभेच्छा अन् अभिनंदन!

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 11:05 am | विसोबा खेचर

प्राजू,

आत्ताच एकिकडे काम करता करता ऐकला तुझा कार्यक्रम. सादरीकरण सुंदर आहे, बोलण्यात घरगुतीपणा, आपलेपणा आहे.

असो, पुढील कार्यक्रमाकरता शुभेच्छा...

तात्या.

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 11:06 am | विसोबा खेचर

प्राजू,

आत्ताच एकिकडे काम करता करता ऐकला तुझा कार्यक्रम. सादरीकरण सुंदर आहे, बोलण्यात घरगुतीपणा, आपलेपणा आहे.

असो, पुढील कार्यक्रमाकरता शुभेच्छा...

तात्या.

पान्डू हवालदार's picture

4 Apr 2008 - 8:17 pm | पान्डू हवालदार

फारच छान सदरीकरण ...

ऋषिकेश's picture

5 Apr 2008 - 12:34 am | ऋषिकेश

प्राजु,
कार्यक्रमाचे सादरीकरण, आवाजाची फेक आणि उतारचढाव आवडले.

पण बाकी पात्रांच्या भाषेचा गावरान बाज आणि आवली मात्र प्रामाणभाषेत बोलते हे खटकले.. तसेच सुरूवातीच्या प्रस्तावनेत छोटी वाक्ये असती तर काहि ठिकाणी श्वास अडकला नसता असे वाटून गेले. ह्या प्रामाणिक मताबद्दल राग मानणार नाहिस याची खात्री आहे म्हणून लिहायचे धाडस करतो आहे.

बाकी "कुणा पाप्याची नजर नको गऽऽ लागाया!!!" मधला ठसका, गावरान शब्दफेक लाजबाब .. :)))

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

-('मिसळ'लेला) ऋषिकेश