मराठी जालावर आल्यापासून जे काही लोक ओळखीचे झाले आहेत, जीवाभावाचे मैतर झाले आहेत, त्यात प्राजुचं नाव अगदी आवर्जून घ्यावं असं. मराठी आंतरजालावर जे काही लोक अगदी सातत्याने आणि चांगलं लेखन करतात त्यातही तिचं नाव अगदी अग्रणी आहे. तिच्या सुंदर कविता / गझला मराठी संस्थळांवर नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. तर अश्या या आमच्या मैत्रिणीच्या कवितांचा एक अल्बम येऊ घातलाय ही बातमी कुठून कुठून कानी येतच होती. आता प्राजुचा स्वभाव माहिती असल्यामुळे हा अल्बम एकदम नीटनेटका आणि झकास होणार हे नक्की असे वाटतच होते. साधारण दीड दोन महिन्यांपूर्वी प्राजुच्या 'फुलांची आर्जवे' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला हजर रहायचा योग आला होता. तेव्हाच या अल्बमचा प्रकाशन सोहळाही लवकरच होणार आहे असे कळले होते. तेव्हा पासून या कार्यक्रमाची वाट बघणे चालू होते.
मध्यंतरी, प्राजुने हा सोहळा १८ जुलैला पुण्यात होणार आहे असे कळवले आणि बर्याच लोकांकडून 'या समारंभाला हजर राहू' अशा अर्थाचे निरोप मिळाले. या निमित्ताने प्राजुला प्रत्यक्षात भेटायची संधी मिळणार होती आणि आपल्या मैत्रिणीचे कौतुक करायला जातीने हजर रहायचेच असे तेव्हाच ठरवले. निरोप आले, निरोप दिले गेले. प्ल्यानिंग झाले आणि आम्ही १८ जुलैला सकाळी पत्रकार भवन, पुणे इथे जमलो. मी, अदिती, परा, पेठकर काका, राजे, चंद्रशेखर महामुनी, सोनाली घाटपांडे, प्रकाश घाटपांडे, मनिष, पुण्याचे पेशवे, दत्ता काळे, लिखाळ, शाल्मली, टार्या, राजेश घासकडवी, धम्या, अविनाश कुलकर्णी, श्रावण मोडक, मराठमोळा अशी दणदणीत उपस्थिती होती. प्राजु जातीने स्वागत करून गेली.
कार्यक्रम बरोब्बर १० ला सुरू होणार असल्याने बरेच लोक १०.३० पर्यंत आले. त्यामुळे आमच्या सारख्या टैमवर आलेल्या लोकांना जिन्यात उभे राहून धिंगाणा करायला वाव मिळाला. आल्यागेल्या लोकांवर लक्ष ठेवत, आम्ही जिन्यात गर्दी करून उभे होतो. एक दोन पुणेरी आज्यांनी आमच्याकडे थोडा जळजळीत कटाक्ष टाकून आम्ही लोकांना अडचण करतो आहोत हे आमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला खरा. पण काही अस्सल पुणे-३० लोकही आमच्यातच असल्याने ते कटाक्ष रामानंद सागरच्या रामायणातल्या बाणांप्रमाणे मोडून पडले. शिवाय प्राजुच्या नात्यातले लोक सोडले तर एकगठ्ठा अशी आमचीच व्होटब्यांक असल्यामुळे प्राजु पण आमच्या दंग्याकडे कानाडोळा करून होती. ;)
कार्यक्रम १०.३० ला मात्र अगदी सुरूच झाला. कार्यक्रमाला बरेच ओळखीचे चेहरे दिसत होते. काही चेहरे टीव्ही आणि चित्रपटातून दिसणारे तर काही जालावर दिसणारे. बर्याच मराठी कार्यक्रमातून किंवा चित्रपटातून दिसणारे, प्रसिद्ध कलाकार श्रीरंग गोडबोले आणि नटरंग या चित्रपटाचे दिग्दर्शक रवि जाधव हे या कार्यक्रमाला अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. कार्यक्रमाची धुरा मंजुश्री गोखले यांनी सांभाळली. सुरूवातीला प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत आणि त्यांचे दोन शब्द वगैरे झाले आणि कार्यक्रमाला खर्या अर्थाने सुरूवात झाली ती अल्बम मधल्या गाण्यांच्या आणि त्या गाण्यांवर केलेल्या सुंदर नृत्यांच्या सादरीकरणाने. पौलमी पेठे, अमृता काळे, मधुरा दातार, संगिता चितळे इत्यादी कलाकारांनी अल्बम मधली गाणी पेश केली. प्राजुनेही तिचे मनोगत व्यक्त केले. तिच्या आयुष्यातला एक अतिशय आनंदाचा क्षण ती आमच्या सर्वांबरोबर वाटून घेत होती... अतिशय भावनाविवश झाली होती. काय बोलू आणि काय नको असे झाले होते तिला. सगळ्या आभारप्रदर्शानात तिने आपणा सगळ्या जालिय मित्रमंडळींचे खास आभार मानले. त्यावेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट (आम्हीच केलेला) सगळ्यात जास्त होता. ;)
प्राजुचे पती आणि अल्बमचे निर्माते जगदीश पाहुण्यांचे स्वागत करताना.
अमृता का़ळे
संगिता चितळे
पौलमी पेठे
प्राजु आणि जालिय मैत्रिण शाल्मली
नक्की किती मोठे व्हायचे त्याचे परिमाण सांगताना श्रावण मोडक आणि बाजूला आज्ञाधारक अभ्यासू लिखाळ भावोजी.
लिखाळ भावोजी की जान खतरे मे... द डेंजर बिहाइंड.
आधुनिक भरतभेट किंवा शिवाजी-अफझलखान भेट.
अवघडलेल्या अवस्थेतही जीवाच्या भितीमुळे बळंच कसं हसावं याचा वस्तुपाठ देताना परा
शूर आम्ही सरदार.... बाजीराव पेशवे (पहिले की दुसरे ते अजून नक्की कळले नाहीये. माणूस बेरकी आहे. कळू देत नाही.)
हात जायबंदी करून घेताना प्राजु...
पुणेरी इंगा बघितलेला राजेश घासकडवी पुणेरी इंगा दाखवणार्या परा बरोबर...
आम्हाला काय ब्वॉ कोणी नेलं नाही कधीच समर्थ भोजनालयात, म्हणून मग आम्हीच गेलो आणि फोटो काढून हौस भागवली. मागे आमचे आधारस्तंभ (पहिले का दुसरे) बाजीराव ऊर्फ पुण्याचे पेशवे. कोपर्यात अर्धा मराठमोळा आणि मागे (काकूंना घाबरून) तोंड लपवत पेठकर काका.
ऑटोग्राफ घ्यायच्या निमित्ताने पुढे पुढे करताना परा, मनिष, आदिती आणि आपल्याला हे असं का नाही सुचत या विचाराने व्यथित टार्या.
एकंदरीत कार्यक्रम सुरेखच झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच भेटता आले बर्याच दिवसांनी. शिवाय या निमित्ताने काही जालिय भरतभेटी झाल्या, जुने मित्र परत भेटले. आपुलकीने चौकशी झाली, विचारपूस झाली. मजा आली. काही लोकांना जायची घाई असल्याने ते पळाले. आमच्या सारखे काही निरूद्योग लोक आता एकत्रच जेवू म्हणून एका हाटेलाकडे प्रयाण करते झाले. तिथेही दंगा झालाच भरपूर.
विचारविनिमय.
नंतर म्हणत होता टार्या की हेल्मेट सोडून देणार होता... एका फटक्यात काम तमाम.
टार्या त्याच्या खेळण्याबरोबर.
भाळी चंद्र असे धरिला... वडारवाडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे धडाडीचे तरूण नेतृत्व धमालदादा बारामतीकर देशमुख
विद्वज्जनांना अन्नदान केल्याचे पुण्य मोजताना पेठकर काका.
संध्याकाळच्या बैठकीचे नियोजन करताना मंडळी. पेठकर काकांच्या आधाराने (कसाबसा) उभा असलेला राजे. ;)
***
प्राजुच्या निमित्ताने असेच अजून बरेच प्रसंग आम्हाला उपभोगायला मिळो हीच इच्छा. कीप इट अप, प्राजु. :)
प्रतिक्रिया
19 Jul 2010 - 1:56 am | मस्त कलंदर
अरे वा!! कार्यक्रम मस्तच झालेला दिसतोय..
प्राजु, पुन्हा एकदा अभिनंदन.
या वाक्याशी सहमत आहे.. पण ते ज्या फोटोखाली आहे ते वाचून अंमळ भीती वाटतेय. :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
19 Jul 2010 - 3:01 am | मुक्तसुनीत
असेच म्हणतो. प्राजु व सर्व संबंधितांचे अभिनंदन.
19 Jul 2010 - 7:38 pm | विकास
प्राजूचे अभिनंदन आणि बिपिनला मस्त फोटोंबद्दल धन्यवाद!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
19 Jul 2010 - 9:51 pm | बिपिन कार्यकर्ते
बिपिनला मस्त फोटोंबद्दल धन्यवाद!
साहेब, ते सगळे फोटो अदितीने काढलेले आहेत. :)
बिपिन कार्यकर्ते
21 Jul 2010 - 3:09 am | क्रेमर
श्री विकास, सुनीत यांच्याप्रमाणेच म्हणतो. धन्यवाद, अभिनंदन व शुभेच्छा.
-क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.
19 Jul 2010 - 2:05 am | शिल्पा ब
छानच झाला म्हणायचा प्रोग्राम =D> =D> ... बाकी बरेच चेहरे बघायला मिळाले या निमित्ताने... आनंद झाला.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
19 Jul 2010 - 2:18 am | सुनील
कार्यक्रम दणक्यात झाला हे तर दिसतच आहे! अल्बम उत्तम असणारच याची खात्री आहेच!
हुकल्याची चुटपुट लागली हे खरे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
19 Jul 2010 - 2:32 am | शुचि
कार्यक्रम मस्तच झाला असणार. फोटोवरून कळतय.
=D> =D> =D>
शिवाजी-अफजल भेट हा हा!!! मस्त लेख.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
19 Jul 2010 - 2:48 am | मीनल
धन्यवाद.
सारा वृतांत मिळाला.
मी या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही. पण प्राजूची खूपदा आठवण काढून तिला शुभेच्छा जरूर दिल्या.
या तिच्या स्वप्नपूर्तीत आपण खारीचा वाटा उचलला आहे. आपण तिची पाठ थोपटायचीच शिवाय आपली ही.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
19 Jul 2010 - 3:44 am | केशवसुमार
वृत्तांत आणि खतरनाक फोटो..
सर्वात आधी प्राजू आणि जगदिश यांचे आभिनंदन.. =D> =D>
धन्यवाद बिकाशेठ,इथे बसून आम्ही अंदाज बांधू शकतो काय धमाल आली असेल प्रकाशनाला आणि त्या नंतरच्या कार्यक्रमाला... डेफिनेटली मिस्ड इट..:(
वडारवाडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे धडाडीचे तरूण नेतृत्व =)) =)) =))
शिवाजी-अफझलखान भेट >:D< फोटो ऑफ दी सेंचुरी.. डोळे पाणावले हसून हसून.. =)) =)) =))
19 Jul 2010 - 4:36 am | नंदन
कार्यक्रम दणक्यात पार पडलेला दिसतोय. पुनश्च अभिनंदन, प्राजु!
बाकी भरतभेट, समर्थ, दुकानदार आणि ग्राहकांचे मनोमीलन इ. पाहून डोळे पाणावले :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Jul 2010 - 5:53 am | Nile
हेच म्हणतो. अभिनंदन!!
बाकी फोटो पाहुन डोळे पाणावले आणि पोटात दुखले!
-Nile
19 Jul 2010 - 11:09 pm | दशानन
:)
खुपच सुरेख कार्यक्रम झाला.
खुप दिवसानंतर एवढ्या सगळ्या मित्रांना भेटलो प्रचंड आनंद झाला.
काही गोष्टीचे मोल करता येत नाही असे म्हणतात, त्यातीलच एक ही भेट जी नक्कीच अनमोल आहे, आज फोटो रुपाने ते जेव्हा हवे तेव्हा पाहू शकतोच पण अजून काही मित्रांची अनुपस्थीती नक्कीच जाणवली ती देखील परिपुर्ण झाली असती तर अत्यांनद झाला असता.
दंगा प्रचंड केला, अगदी सुरवातीपासून शेवट पर्यंत...
मनसोक्त हसणे व खिदळणे जवळ जवळ ३ तास अमर्यादितपणे चालू होते त्यांना कुठल्या शब्दात व्यक्त करावे हेच समजत नाही आहे, पण थॅक्स ऑल... तुमच्या सर्वांच्यामुळे खुप खुप मज्जा आली...
बिका & फॅमेली (+१) , यमी (आच्रत बाव्लत) , धम्या ( लेटलतिफ) , पेठकरकाका (सामनावीर) , टार्या ( हि & ही स्टाईल... काल नाही पडला तो बाईक वरुन) पर्या ( ह ल क ट) , राजेश ( गरिब बकरा), मोडक ( मॅजिक मुड मध्ये) , ममो (बा*** बें** २४ बीयर व तो व मी नाईंसाफि ;) न सांगता पळून गेला.. ) , लिखाळ & फॅमेली ( ग्रेट.. सलाम साहेब) , पुप्या ( ह***** गाय्ब झाला मध्येच सोडून), घाटपांडेकाका( हिरोहोंडा प्रेमी) , मीम सदस्य दत्ता काळे (शांत कसे रहावे ह्यांच्याकडून मी शिकतो आहे ;) ), सोनाली ( धडाडीची कार्यकर्ती), प्रसन्नदा (पुणेरी) (बिझी बी) आणी चंद्रशेखर महामुनी ( क्या कहे....... देव देव आनंद... ;) )
आम्ही मज्जा केली......... तुम्हाला टुक टुक =))
19 Jul 2010 - 4:39 am | प्रियाली
प्राजुचे अभिनंदन!
शिवाजी अफझलखान भेट. =)) =)) =)) =)) हा फोटो मिपाच्या मुख्यपृष्ठावर येणे गरजेचे आहे. ;) ह. घ्या.
19 Jul 2010 - 5:04 am | चित्रा
मस्त वर्णन! झकास फोटो.
प्राजु, कार्यक्रम चांगलाच झाला असे दिसते आहे ((अवांतर -साडीचा रंग छान आहे. )
शिवाजी अफझलखान भेट. हा फोटो मिपाच्या मुख्यपृष्ठावर येणे गरजेचे आहे.
=))
+१!
बारामतीकरांना "साहेबांचे" फोन येतात का काय सतत?!
19 Jul 2010 - 10:03 pm | मिसळभोक्ता
कार्यक्रम छानच झालेला दिसतो.
(संध्याकाळचा कार्यक्रम हार्वेस्ट क्लबात होता काय रे ?)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
19 Jul 2010 - 10:10 pm | बिपिन कार्यकर्ते
हो... हार्वेस्ट क्लबातच. पण दुपारीच केला कार्यक्रम. ;)
बिपिन कार्यकर्ते
19 Jul 2010 - 10:31 pm | मिसळभोक्ता
घोडे फरार होण्यासाठी मुठा नदीच्या तीरासारखी दुसरी जागा नाही.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
19 Jul 2010 - 5:36 am | सहज
वृत्तांत, फोटो, त्याच्ये कॅप्शन सगळेच एकसे बढकर एक!
शिवाजी-अफजल भेट पाहून तर खरच डोळे पाणावले! पुणेरी दुकानदार आता फारसे हलकट वाटत नसतील गुर्जींना ;-) बिका अॅज युज्वल प्रसंग ओढावताच निरपराध्याचा बळी द्यायला तयार. लिखाळभावोजी नव्हे तर डेंजर कोणत्या दिशेला आहे हे मिपाकरांना दिसतेच आहे. :>
पुन्हा एकदा प्राजुतैंचे अभिनंदन!
19 Jul 2010 - 7:38 am | नितिन थत्ते
प्राजूचे मनापासून अभिनंदन.
(हे न लिहिण्याइतका आमचा उपास काही महत्त्वाचा नाही). :)
बिकाजीरावांचा वृत्तांत नेहमीप्रमाणेच झकास.
नितिन थत्ते
19 Jul 2010 - 2:22 pm | भाऊ पाटील
प्राजूचे मनापासून अभिनंदन!
बिकारावांचा वृत्तांतही झकास!
(थत्ते काका लिन्कसाठी धन्यवाद. मला अजून खव ची सुविधा नाही...म्हणून येथेच लिहितो).
19 Jul 2010 - 7:48 am | स्मिता_१३
खुसखुशीत वृत्तांत !!!
स्मिता
19 Jul 2010 - 9:31 pm | धनंजय
प्राजु यांचे अभिनंदन. खुसखुशीत वृत्तांत!
19 Jul 2010 - 8:41 am | उदय
प्राजुचे अभिनंदन !
वृत्तांत झकास आहे.
19 Jul 2010 - 8:49 am | चतुरंग
लै जबरा रिपोर्टिंग हो बिका! लै म्हणजे लै धम्म्म्माल केलेली दिसते राव.
फोटू आणि वर्णने एकसो एक भारी आहेत. बरीच गँग जमा झाली होती की..एक चांगली धमाल चुकली म्हणायची....
टार्याचे फोटू घ्यायचे म्हणजे क्यामेरा वाईडअँगल करुन फ्रेम उभी धरावी लागणार ! ;)
प्राजू आणि जगदीशचे मन्:पूर्वक अभिनंदन.
(चुटपुटणारा)चतुरंग
19 Jul 2010 - 9:06 am | सहज
टार्याला बघुन बरे वाटले. टार्या लवकरात लवकर परत यावा ही मनोमन इच्छा व संबधीतांना विनंती.
19 Jul 2010 - 1:41 pm | छोटा डॉन
+१, अगदी हेच म्हणतो.
सर्व महारथ्यांचे फोटो पाहुन आनंद झाला.
प्राजुताईचे कौतुक आहेच, फक्त हा सोहळा पाहण्यासाठी पुण्यनगरीत जाणे जमले नाही ह्याची चुटपुट लागुन राहिली आहे.
मस्त वाटले एकदम.
असे प्रसंग वारंवार येऊ व अमची तिथे उपस्थिती असो हीच इच्छा !!!
------
छोटा डॉन
19 Jul 2010 - 9:08 am | यशोधरा
प्राजु, अभिनंदन!
19 Jul 2010 - 9:11 am | प्रभाकर पेठकर
कार्यक्रम नक्कीच खुप छान झाला. बरेचसे मिपाकर भेटले. रविवार सकाळ कारणी लागली.
नंतर रविवार दुपार आम्ही कारणी लावली हे दिसते आहेच. पण प्राजुच्या धुंद गाण्यांच्या मैफिलीच्या नशेला 'काट्याने काटा' काढण्यावाचून गत्यंतरच उरले नाही. तनाने आणि मनाने अलौकिक तृप्ती अनुभवली.
------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
19 Jul 2010 - 10:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्राजुचं खूप कौतुक वाटलं, ती आपली मैत्रीण आहे याचा फार आनंद झाला, म्हणून उगाचच आम्ही 'मॅडम'च्या पुढेपुढे करून घेतलं. पुनश्च एकदा प्राजुचं अभिनंदन.
पेठकर काकांचा तोकडा प्रतिसाद अजिबात आवडला नाही. कार्यक्रमाच्या वेळेस पेठकर काका आमच्या मागच्याच रांगेत बसले होते आणि काका अगदी तन्मतेने आपण LLB* असल्याचं वेळोवेळी सिद्ध करत होते. हसू लपवण्याचं माझं शाळा-कॉलेजातलं स्किल उपयोगात आलं. लिखाळगुरूजी आणि गुर्जी दोघांनीही मधूनच अवांतर प्रतिसादात, आपलं, कमेंट्समधे भर टाकत आपली जालीय प्रतिमा चुकीची आहे हे सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. लोकलज्जेस्तव त्या कमेंट्स लिहीता येणार नाहीत, क्षमस्व.
आम्ही सगळ्यांनी प्राजुच्या अल्बमच्या निमित्ताने खूपच मजा केली ते या फोटोंमधे दिसतं आहेच. पण श्री. बिपिन कार्यकर्ते यांनी स्वप्नपूर्तीचे साक्षीदार म्हणत बाटल्यांचे फोटो का टाकले हे कळलं नाही!
अदिती
LLB*: Lord of Last Benches
20 Jul 2010 - 1:55 am | रेवती
नुकतेच जर्मनीत काढलेले फोटू पाहिले तर लगेच या कार्यक्रमाचे.....!
काय करावे बरे? :?
रेवती
19 Jul 2010 - 9:17 am | प्रकाश घाटपांडे
पुरावा म्हनुन फोटो देता काय रे लेकांनो? सांगा बरं अल्बममदल्या कंच्या कंच्या कवितांची गानी झालेली हायेत ते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
19 Jul 2010 - 9:49 am | Pain
१) नेमका मी पुण्यातून बाहेर पडल्यावरच सगळे चांगले कार्यक्रम / भेटी व्हायला लागल्या :(
( पुण्यात असताना मिपा माहिती नव्हते) असो.
२) टारझन आणि अदिती पुण्यात आहेत हे माहिती नव्हते.
३) मला कविता आवडत नाहीत पण प्राजु यांच्या ब्ब्लॉगवरील गोष्टी आवडल्या. तशा अजून मिळाव्यात...
19 Jul 2010 - 9:53 am | विनायक पाचलग
मस्त ...
कोल्हापुरातील कार्यक्रमाला मी उपस्थित असीन ...
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
19 Jul 2010 - 10:52 am | llपुण्याचे पेशवेll
सह्हीच..
पण आम्ही नसू.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
20 Jul 2010 - 1:52 am | रेवती
ए काय रे त्याला असं म्हणतोस?
रेवती
19 Jul 2010 - 10:46 am | वेताळ
प्राजुतै व जगदीश साहेबाचे अभिनंदन......
फोटो पाहुन डोळे पाणावले 8|
कोल्हापुरला कधी कार्यक्रम आहे?
विशेषतः टारझन चे फोटो मस्त आलेत. :D
वेताळ
19 Jul 2010 - 10:45 am | वल्लरी
प्राजूचे अभिनंदन.
वृत्तांतही छान..बिका शैलीत... :)
---वल्लरी
19 Jul 2010 - 11:29 am | अवलिया
अभिनंदन :)
--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
19 Jul 2010 - 11:34 am | मराठमोळा
सर्वच फोटो छान आले आहेत.
कार्यक्रम आणी प्रत्यक्ष भेटी दोन्ही मस्तच. :)
धन्स बिका.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
19 Jul 2010 - 11:39 am | Dhananjay Borgaonkar
एक नंबर फोटो आले आहेत. बिपिनदा आधि नाही का सांगायच मी पण आलो असतो. पेठकर काकांच हॉटेल माझ्या घराच्या बाजुलाच आहे.
19 Jul 2010 - 12:10 pm | जागु
बिपीनदा छान अहवाल.
आणि प्राजुला परत एकदा शुभेच्छा.
19 Jul 2010 - 12:12 pm | स्वाती दिनेश
प्राजुचा कार्यक्रम आणि कट्ट्याचा कार्यक्रमही दणक्यात झालेला दिसतो आहे.
फोटो बघून आम्ही तेथे नसल्याची चुटपुट लागली.
प्राजुचे परत एकदा अभिनंदन!
स्वाती
19 Jul 2010 - 12:54 pm | वाहीदा
=D> =D> प्राजू चे अभिनंदन =D> =D>
खास बिका श्टाईल वृत्तांत आवडला.. मिपा गैंग ने ढिंगच्याक धमाल केली हे फोटो वरून जाणवलं
प्राजू ताई, साडी मस्तच ग . कलर छान खुलून दिसतोय !
पण हे काय कोणीच कसे व्हिडीयो चे शुटींग केले नाही ?
अल्बम मधल्या गाण्यांचा अन गाण्यांवर केलेल्या सुंदर नृत्यांच सादरीकरण अन नो व्हिडीयो :?
प्राजू ताईचा आवाज खुप गोड आहे असे ऐकून होतो व्हिडीयो मुळे तो ऐकायला ही मिळाला असता .
प्राजु चा मनखुलास हसताना जालिय मैत्रिण शाल्मली बरोबरचा फोटो झकास !!
प्राजू ताई अन जगदिश यांचा फोटो मिपाच्या मुख्यपृष्ठावर येवो हि मिपा संपादकांस विनंती
~ वाहीदा
19 Jul 2010 - 1:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
दोन छोट्या क्लिप्स आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डींग प्राजुकडे असेलच.
क्लिप १, क्लिप २
अदिती
19 Jul 2010 - 10:28 pm | मीनल
बरं झालं क्लिप्स टाकल्यास.
प्राजूचे बोलणे तर छानच. खरेखुरे, अगदी आतून आलेले!
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
19 Jul 2010 - 1:01 pm | संजय अभ्यंकर
प्राजुताईंचे अभिनंदन!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
19 Jul 2010 - 1:27 pm | समंजस
+१
मस्त! छान!! =D>
19 Jul 2010 - 1:32 pm | मेघवेडा
अभिनंदन प्राजुतै!
19 Jul 2010 - 1:58 pm | घाटावरचे भट
अभिनंदन प्राजुतै. आणि कार्यक्रमास यायला न जमल्याने मिपा ग्यांगची भेट हुकल्याबद्दल वाईट वाटत आहे.
19 Jul 2010 - 2:06 pm | विजुभाऊ
लै मिस केले राव. राजे आणि बिपीनशी फोनवर बोलणे झाले आणि कळाले की आपण नक्की कायकाय मिस केले.....:(
अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे
19 Jul 2010 - 2:17 pm | गणपा
वाह मस्तच झालेला दिसतोय कार्यक्रम कम कट्टा.
त्या निमित्ताने आम्हाला आचे बरेच जालिय मित्रांच परत दर्षन झालं.
>>लिखाळ भावोजी की जान खतरे मे... द डेंजर बिहाइंड.
नीट पहा हो बिकाजी आम्हाला तुमचीच जान खतरे में दिसतेय ;)
19 Jul 2010 - 5:47 pm | ब्रिटिश टिंग्या
अभिनंदन प्राजु!
- टिंग्या
19 Jul 2010 - 5:59 pm | रेवती
मस्त रे बिका!
छान लिहिलास वृत्तांत!
आम्हाला तिथे हजर न राहताही कार्यक्रमाचा आनंद मिळाला (थोडा!;)). सगळ्या मिपा जमावाचे फोटू पाहून आनंद झाला.
प्राजु परत आली की आम्हाला तिच्याकडूनही कार्यक्रमाच्या आठवणी ऐकायला मिळतील.
रेवती
19 Jul 2010 - 6:58 pm | प्रभो
मस्त वर्णन बिकाशेठ......
प्राजुतै चे अभिनंदन....
तिच्यकडून आल्यावर पार्टी घेऊच... ;)
19 Jul 2010 - 7:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिका, कार्यक्रमाचा वृत्तांत मस्त डकवलाय.
धन्यु.....!
-दिलीप बिरुटे
19 Jul 2010 - 7:30 pm | आनंदयात्री
अभिनंदन प्राजु !!
आणि कार्यक्रमाला हजेरी न लावता आल्याबद्दल माफी सुद्धा मागतो.
बिका वृत्तांताला नाव फार छान दिलेस, यानिमित्ताने तु काहीतरी लिहलस तरी !
19 Jul 2010 - 7:33 pm | टिउ
क्या बात है! सोहळा मस्तच झाला असणार...दंगा पण सॉलीड झालाय, फोटोवरनं कळतंय...
अभिनंदन प्राजुतै! :)
19 Jul 2010 - 7:40 pm | jaypal
सर्वात आधी प्राजू आणि जगदिश यांचे आभिनंदन.. =D> =D> =D>
बिका सुंदर वृतांत आणि सही बोलके फोटो. नयेऊन लै (जणांना) मिस केल राव. असो.
"वडारवाडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे धडाडीचे तरूण नेतृत्व धमालदादा बारामतीकर देशमुख" यां माझ्या कडुन सप्रेम भेट
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
19 Jul 2010 - 7:41 pm | लिखाळ
वा ! छान वृत्तांत, छान फोटो (मी ज्यात आहे ते अजूनच छान :) )
प्राजुचे पुन्हा अभिनंदन!!
-- लिखाळ.
देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.
19 Jul 2010 - 9:12 pm | ब्रिटिश
प्राजुतै मनापास्न आभिनंदन.
याला जमल आसता त मोट्या मोट्या लोकांना भेटाला मिल्ला आसत.
मिथुन काशिनाथ भोईर
19 Jul 2010 - 11:17 pm | क्रान्ति
वृत्तांत बिपिनदा. फोटूचे टायटल्स तर लैच भारी! या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोर मिपाकर मंडळींचं [फोटूत का होईना!] दर्शन घडलं. =D>
अदिती, क्लिप्सबद्दल धन्स. :)
प्राजु, पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. =D>
क्रान्ति
अग्निसखा
19 Jul 2010 - 11:21 pm | स्वाती२
अभिनंदन प्राजु!
छान वृत्तांत बिपिनदा.
अदिती क्लिप्स बद्दल धन्यवाद.
19 Jul 2010 - 11:51 pm | भडकमकर मास्तर
प्राजुचे अभिनन्दन
आणि एकदम मस्त वृत्तान्त....
फोटो झभरडस्ट आहेत...
विशेषतः टार्या आणि परा ... अगदी फोटोशॉप वापरल्यासारखं वाटतंय....
20 Jul 2010 - 1:31 am | अंतु बर्वा
अभिनंदन प्राजु..!!
20 Jul 2010 - 10:43 am | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार.
आपण सर्वजण उपस्थित राहिलात.. त्यामुळे कार्यक्रमाला चांगली रंगत आली.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
20 Jul 2010 - 11:06 am | पिवळा डांबिस
सर्व संबंधितांचे अभिनंदन!!!
फोटोही झकास उतरले आहेत!!!
या आनंददायी प्रसंगाच्या निमित्ताने श्री. टारझन यांचं डिसमिसल रद्द करता येणार नाही का?
जर समारंभाला आणि मिपावरच्या फोटोसाठी त्यांची उपस्थिती चालते तर मेंबरशिप दिल्यानेच असा काय विशेष अनर्थ होणार आहे?
या सर्व गोड समारंभ वर्णनांत तेव्हढाच एक मिठाचा खडा असल्यागत लागत होतं....
चुका सगळ्यांकडून कधी ना कधी होतात...
त्या सांभाळून घेतो तो खरा ज्ञाता!!!!
बघा, जरा विचार करा....
आपला,
पिडां
21 Jul 2010 - 1:55 am | संदीप चित्रे
आणि दंगाही उच्च झालेला दिसतोय.
आता प्राजु इथे आली की लवकरच सीडी हातात पडेल आणि गाणी ऐकता येतील :)
21 Jul 2010 - 5:14 am | शहराजाद
सुरेख वर्णन व छायाचित्रं.
21 Jul 2010 - 6:09 am | आमोद शिंदे
प्राजुताईंचे जोरदार अभिनंदन. सीडी आणि पुस्तके कुठे मिळतिल?