माझा एक थरारक अनुभव

शिल्पा ब's picture
शिल्पा ब in जनातलं, मनातलं
16 Jul 2010 - 8:38 am

मुंबईत असताना कामानिमित्त मला ट्रेनने प्रवास करावा लागायचा....आधी ट्रेनने दादरला तिथून मग ट्रेन बदलून पुढे...मला सवय झाली होती...न होऊन सांगतेय कोणाला..
खरं तर गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास हा थरारकच असतो...त्याशिवाय कोणतंही विशेषण त्याला शोभून दिसत नाही...आधी भयानक गर्दीत हव्या त्या platform वर जाणे, तिथून हव्या त्या डब्यासमोर उभे राहणे आणि गाडी आली कि आपली पर्स आणि जीव सांभाळून त्या गाडीत चढणे आणि आपले स्टेशन आल्यावर काही सेकंदात परत आपला जीव आणि पर्स होता तसा घेऊन उतरणे हेच एक दिव्य असते...

त्या डब्यात चढताना बघणाऱ्याला गंमत वाटावी अशा घटना रोजच घडत असतात...एकदा गाडी थांबल्यावर बायकांच्या (सेकंडक्लासच्या) डब्यातून एक भरलेली गोणी धडपडली आणि मग तिच्यावर गोष्टीतल्या उद्रांसार्ख समोरचा काही दिसत नसल्यासारख्या एकावर एक अजून गोण्या येऊन आदळल्या...आम्ही अर्थातच फिदीफिदी हसून घेतले...अजून एकदा मी गाडीत चढताना अचानक कोणीतरी माझ्या पाठीत मारलं..मग मी संतापून दुसऱ्या एकीच्या पाठीत गुद्दा घातला...तिने पाहिलं आणि अजून मला मारायला धावली आणि मी पण प्रतिकाराच्या पवित्र्यात उभी राहिले पण गाडी सोडायचा धोका आम्हाला असल्या फालतू कारणासाठी घ्यायचा नसल्याने ते तिथेच थांबलं...

असो, तर काय ? हं..माझा अनुभव ....झालं काय कि मी नेहमीप्रमाणे दादरात उतरायला म्हणून दारात उभी होते...हि SSSSS गर्दी....तशातच गाडी थांबल्यावर मी उतरून घेतले पण....माझी पर्स कोणीतरी धरून ठेवली....इतर बायका मला धक्काबुक्की करून आत चढल्या आणि उतरल्या...मी आपली दारातच एक हात दांड्याला धरून उभी...ती बाई काही पर्स सोडायला तयार नाही...तिला वाटलं असेल जीवाच्या भीतीने मी पर्स सोडून देईन...पण त्यात माझे त्यावेळेसचे २-३ हजार रुपये होते शिवाय बस पास ,ट्रेन पास अजून काही चिल्लर गोष्टी...तर मी काही पर्स सोडली नाही आणि तिनेपण ...लोकल चालू झाली ....मी पण एका हाताने दांडा धरून ठेवला आणि पळत पळत दुसऱ्या हाताने त्या बाईच्या हातावर गुद्दे मारायला सुरुवात केली...गाडीने वेग घेतला आणि मी पण...शेवटी तिने पर्स सोडली....

एवढं सगळं गर्दीने गजबजलेल्या दादरातल्या स्टेशनवर....ना गाडीतल्या दारात उभ्या असलेल्यांनी मदत केली ना फलाटावर उभे असलेल्या कोणी काही इंटरेस्ट दाखवला.....हा प्रकार
झाल्यावर मी आपली जसं काही झालंच नाही अशी दुसरी लोकल पकडायला निघून गेले आणि इतरांसाठी काही झालेच नसल्याने तसाही काही वाटण्याचा प्रश्न आला नाही..

तर असा हा माझा एक अनुभव.

संस्कृतीवावरसमाजजीवनमानलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

Nile's picture

16 Jul 2010 - 9:03 am | Nile

असे अनुभव मजा आणतात खरं. यावरुन माझा बंगळुरातील एक अनुभव थोडक्यात सांगतो. हाफिसाची वेळ, बंगळुरातील बस पाहिली असेल तर गर्दीबद्दल सांगायला नको. दारातच उभे असल्याने नविन लोकांना बसमध्ये जाण्यास अडचण नेहमीचीच. असेच त्यादिवशीही. खिशात मोबाईल असल्याने माझा एक हात नेहमी खिशात असायच(मोबाईल चोरी नेहमीचीच) पाकिट वगैरे सुरक्षित बॅगेत. एक लठ्ठ माणुस तिसर्‍या पायरीवर उभाहोता. मी त्याला पार करुन पुढे जायला लागलो तर फारशी जागा नसल्याने मला जमेना, त्यानेही जागा करुन देत आहे असे केले, मग मी दोन्हीहाताने वरचे बार पकडुन स्वतःला खेचुन पुढे घेणार इतक्यात कुणीतरी माझ्या खिशात हात घालतोय असे जाणवले, त्या लठ्ठ माणसाने मला अधीकच आवळले. मी झटकन पुढे होउन मोकळा झालो आणि खिशात हात घालतो तर मोबाईल गायब. बंगळुरात बसेस्ना हायड्रॉलीक दारं. बंद. लगेच कंडक्टरच्या नावाने ओरडलो,, म्हणलं गाडी पोलिस स्टेशनला घ्या माझा मोबाईल चोरी झाला. चोरही घाबरला असावा, नविन असेल. त्या घाईगर्दीत(मी अर्थातच शोधतच होतो) एक हात दिसला, माझा मोबाईल त्या हातात. मी मोबाईल पटकन खेचुन घेतला, हात गायब झाला होता. मोबाईल स्वीच ऑफ केलेला होता. काहे क्षणांची गंमत. मोबाईल मिळाला, पुढे काही करण्यासारखं नव्हतं. त्या गर्दीतही जीव भांड्यात पडुन थंडगार वाटलं.

-Nile

विजुभाऊ's picture

16 Jul 2010 - 3:02 pm | विजुभाऊ

इतक्यात कुणीतरी माझ्या खिशात हात घालतोय असे जाणवले, त्या लठ्ठ माणसाने मला अधीकच आवळले.
अरे बापरे... नायल्या भलताच अवघड प्रसंग होता तुझ्यावर 8|

शेखर's picture

16 Jul 2010 - 10:21 am | शेखर

खरच थरारक अनुभव...
पण खालील वाक्य थरारक पणा कमी करते.
झाल्यावर मी आपली जसं काही झालंच नाही अशी दुसरी लोकल पकडायला निघून गेले

लिखाळ's picture

16 Jul 2010 - 10:36 am | लिखाळ

बापरे ! विलक्षणच !

मराठी, मुंबईकर चोर .. एक डेडली काँबिनेशन !!
किंवा
मराठी, मुंबईकर प्रवासी ... एक कोल्डमोस्ट पासिव काँबिनेशन
असे काही विषय सुचत आहेत. (त्या पुढे प्रतिसादांमध्ये 'चोर मराठी होती हे कशावरुन? इतर बघ्यांमध्ये परप्रांतीय नव्ह्ते कशावरुन? असे मुद्दे उपस्थित करायला आपणच वाव ठेवायचा .. म्हणजे प्रतिसाद भरपूर :) )

-- लिखाळ.
देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली ;)

Nile's picture

16 Jul 2010 - 10:43 am | Nile

देवाने विचारले अक्कल हावी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली

=)) =))

-पायदळ.

-Nile

यशोधरा's picture

16 Jul 2010 - 10:49 am | यशोधरा

अमराठी 'हावी' आणि मराठी 'हवी' मधल फरक न कळणार्‍या देवाकडून कशाला, असं ठरवलं असेल. पुणेकरच ते!

:D

संदीप चित्रे's picture

17 Jul 2010 - 12:17 am | संदीप चित्रे

जाता-येता पुणेकरांना नावं ठेवताना लोकांच्या अकलेवर नक्की काय (अमराठी) 'हावी' होतं ते आपल्याला कधीच कळणार नाही ;)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jul 2010 - 1:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मूळ प्रतिसाद लिहिणारा पुणेकरच असल्याने एक सुचना सुचली आहे:

"जाता-येता पुणेर्‍यां*ना नावं ठेवताना पुणेकर लोकांच्या अकलेवर नक्की काय (अमराठी) 'हावी' होतं ते आपल्याला कधीच कळणार नाही!" ;-)

अदिती

* अपशब्द वापरल्याबद्दल माफी!! ;-)

लिखाळ's picture

17 Jul 2010 - 12:09 pm | लिखाळ

अरे देवा !! पुणेकर असण्याचा अभिमान असूनही काही खटकले तर काही बिघडत नाही. रोज घरी आल्यावर मी रस्त्यातल्या बेमुर्वत वाहनचालकांच्या नावाने खडे फोडतो तसे इतर अनेक करत असतात. पुण्यातले वाहनचालक आणि त्यांचा असमंजसपणा, बेशिस्त हे विषय नवे नाहीत.
.. असो :)
--लिखाळ.
देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली. ;)

यशोधरा's picture

17 Jul 2010 - 12:42 pm | यशोधरा

पुणेकर असण्याचा अभिमान असूनही काही खटकले तर काही बिघडत नाही

खरंच. पुणेकरांकडे नि:पक्षपातीपणा आणि न्यायबुद्धी आहेच. O:)

भाऊ पाटील's picture

16 Jul 2010 - 1:23 pm | भाऊ पाटील

|देवाने विचारले अक्कल हावी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली

-अहो त्या पुणेकरांकडे आधीच अक्कल असेल म्हणून टू-व्हिलरची निवड केली असेल आणि देवाला अक्कलेऐवजी मुंबईकरांना सहनशक्ती द्यायला सांगितले असेल.
पुणेकर तसे उदार आहेत ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2010 - 1:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुणेकर तसे उदार आहेत

हे सांगा तुम्ही आणखी एका पुणेकर पीएचड्याला!!
ए लिखाळ, कधी होणार रे तुझा थिसीस?

अदिती

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2010 - 10:56 am | परिकथेतील राजकुमार

देवाने विचारले अक्कल हावी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली

=)) =))
काय हे ? काय हे ? लिखाळरावांची मस्तानी कॅन्सल ;)

माझा थरारक अनुभव तसा मी मागच्यावेळी मिपावर लिहिला आहेच. पण पुन्हा थोडक्यात सांगतो.
बिलाचे अर्धे पैसे न भरताच दारु ढोसून आमचा नान्या मला चौपाटीच्या बारवर एकटाच सोडुन गेला. पैसे पुरेसे नाहीत म्हणल्यावर वेटर्सनी माझ्याभोवती कडे केले. मी पण एका हाताने बाटली धरुन ठेवली आणि दुसर्‍या हाताने गुद्दे वगैरे मारायला लागलो.

एवढे सगळे चालु असुनही आजुबाजुच्या टेबलावरच्या कोणीचा त्यात इंट्रेस्ट दाखवला नाही, म्यानेजरने पण नाही. नशीब थोड्यावेळाने आमचा धम्या तिकडेच टपकला. मग बील वगैरे भरुन आम्ही जसं काही झालंच नाही असे दुसरीकडे ढोसायला निघून गेलो.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

16 Jul 2010 - 2:50 pm | अवलिया

अर्धवट माहिती पुरवली गेली आहे.

अर्धे अर्धे बील भरायची बोली होती पण पराकडे त्याच्या वाट्याचे पैसे नव्हते. दुर्देवाने त्या दिवशी माझ्याकडे पैसे कमी असल्याने मी पराला तु थोडा वेळ बैस मी येतोच असे सांगुन बाहेर आलो. कदाचित त्याला द्रव्याच्या सेवनाने आठवत नसावे. असो.

त्यानंतर मी बाहेर येवुन चारही दिशांना आकाशात नजर टाकली आणि एके ठिकाणी धुर उंचच उंच आकाशात जातांना दिसत होता तिकडे चालु लागलो. अखेर धुराच्या उगम स्थानी उमामहेश्वराच्या प्रसादाने जावुन पोचलो. दरवाजांवरची नावे वाचत अखेरीस योग्य ठिकाणी दार ठोठावले. एका माउलीने दार उघडले, आणि आमच्याकडे पाहुन दार फाटकन बंद करणार तोच आम्ही परवलीची खुण म्हणजे मार्लबरोचे पाकिट दाखवुन मी धम्याचा मित्र आहे असे सांगितले, तेव्हा प्रवेश मिळाला. असो.

यानंतर बराच वेळाने साग्रसंगीत (धम्याचा ) मेकअप झाल्यावर धम्या आणि मी रस्त्यावर आलो आणि हॉटेलाकडे जातांना मधेच माझी गाडी पंक्चर झाली. तेव्हा जवळच्याच बारमधे मी बसतो तु पराला घेवुन ये असे सांगुन मी धम्याला पाठवले. थोड्याच वेळात दोघे आले आणि आम्ही परत पारायणाला बसलो.

पराला हे सारे आठवत नाही,याचा गैरफायदा घेवुन आमचे काही हितचिंतक (आमचे हित झाले की ज्यांना चिंता वाटते ते ... हो तेच ते बरोबर लांब केसवाले) धम्याला त्यांनीच पाठवले असा अपप्रचार करत आहेत असे आम्हाला समजते म्हणुन सदर खुलासा.

कळावे.

--अवलिया

छोटा डॉन's picture

17 Jul 2010 - 12:26 am | छोटा डॉन

हे पहा अवलियासाहेब =)) =))

चारही दिशांना आकाशात नजर टाकली आणि एके ठिकाणी धुर उंचच उंच आकाशात जातांना दिसत होता तिकडे चालु लागलो.
........................
धम्या आणि मी रस्त्यावर आलो आणि हॉटेलाकडे जातांना मधेच माझी गाडी पंक्चर झाली.

???
म्हणजे काय ?
तुम्ही 'चालत होता' आणि चालता चालता 'तुमची गाडी पंक्चर झाली'.
आयला, हे अजबच म्हणावे लागेल.

माणुस ( पक्षी : तुर्तास तुम्ही ) गाडीवर कसा काय चालु शकतो ?

------
छोटा डॉन

चतुरंग's picture

17 Jul 2010 - 12:41 am | चतुरंग

अतिघाई अन चालता चालता गाडी पंक्चर होई! ;)

(पंपचर काढून मिळेल)चतुरंग

अवलिया's picture

17 Jul 2010 - 10:30 am | अवलिया

खरे तर प्रतिसाद देण्याची आवश्यकता नाही पण देत आहे कारण डान्राव आमचे मित्र आहेत.

मागे एकदा ते आणि मी पुनमला बसलो होतो. तेव्हा बोलता बोलता ते म्हणाले परवा मी परत चाललो आहे तेव्हा आपली भेट दोन महिन्यांनी येईन तेव्हा. मी बरे म्हटले. खरे तर डान्राव हे काही चालत चालत गेले नसणार, बस, रेल्वे किंवा विमान अशा वाहनानेच गेले असणार. पण बोली भाषा वळवावी तशी असते हे त्यांना माहित आहे. आणि आमच्या प्रतिसादाला प्रत्युत्तर देता येत नसल्याने शुद्धलेखन, अर्थाचे अनर्थ वगैरे वेळखाउ प्रकाराच अवलंब करत आहेत. सबब खुलासा.

--अवलिया

Pain's picture

17 Jul 2010 - 9:33 am | Pain

हितचिंतक (आमचे हित झाले की ज्यांना चिंता वाटते ते ...

=)) =)) =))

मनिष's picture

16 Jul 2010 - 11:01 am | मनिष

ह्म्म.

सदैव घाईत असणार्‍या मुंबईकरांकडून काय मदत मिळणार (ते बाँबस्फोटाचे सांगू, अश वेळेस कुठेही मदत करतातच लोकं)? रस्त्यात मरायला टेकलेला माणूस आला तर ओलांडून पुढे जातील, पण मदत नाही करणार!!!

(देवाने विचारले अक्कल/दयाबुद्धी हवी की लोकल? सगळ्याच मुंबईकरांनी 'लोकल' निवडली! ;) )
-- वायफळ

छोटा डॉन's picture

16 Jul 2010 - 11:11 am | छोटा डॉन

>>(देवाने विचारले अक्कल/दयाबुद्धी हवी की लोकल? सगळ्याच मुंबईकरांनी 'लोकल' निवडली! )

और ये लगा सिक्सर !!!
एक नंबर रे मनिष, एकदम 'कडक' जवाब. ;)

जा, आजपासुन मुंबैची १ लोकल तुझ्या नाववर केली ;)

------
(जाज्वल्य)छोटा डॉन

कानडाऊ योगेशु's picture

16 Jul 2010 - 2:45 pm | कानडाऊ योगेशु

जा, आजपासुन मुंबैची १ लोकल तुझ्या नाववर केली

कृपया इस लोकल से यात्रा न करे.यह लोकल कारशेड रवाना होगी!

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

भारद्वाज's picture

17 Jul 2010 - 12:37 am | भारद्वाज

कृपया इस लोकल से यात्रा न करे.यह लोकल कारशेड रवाना होगी!

...सही जवाब !!!

Nile's picture

16 Jul 2010 - 11:21 am | Nile

देवाने विचारले अक्कल/दयाबुद्धी हवी की लोकल? सगळ्याच मुंबईकरांनी 'लोकल' निवडली!

हाण च्यामारी! =)) =))

-ग्लोबल

-Nile

योगी९००'s picture

16 Jul 2010 - 12:40 pm | योगी९००

देवाने विचारले अक्कल/दयाबुद्धी हवी की लोकल? सगळ्याच मुंबईकरांनी 'लोकल' निवडली!
अक्कल असेल आणि लोकल नसेल..तर काय अकलेची घरी बसून काय चटणी वाटणार?

दयाबुध्दी काय मुंबईकरांनाच नसते असे नाही. बाकीच्या कोठल्याही शहरात हाच अनुभव येतो. समजा एखादा अपघात झाला, तर मदतीला आजूबा़जूचे रहिवासी किंवा दुकानदार प्रामुख्याने येतात. त्या भागातून प्रवास करणारा माणूस (जो घाईत असेल) थांबेलच असे नाही.

रस्त्यात मरायला टेकलेला माणूस आला तर ओलांडून पुढे जातील, पण मदत नाही करणार!!!

तुम्ही अशी मदत किती जणांना केली आहे? समजा एखादा गर्दूल्ला किंवा भिकारी मरायला टेकला असेल, तर तुम्ही जाल पुढे मदतीला?

खादाडमाऊ

सहज's picture

16 Jul 2010 - 11:09 am | सहज

एकदा मी लहान असताना, बाबा मला गणपतीचे देखावे पहायला घेउन गेले. असाच हात सुटला मी इकडे तिकडे बघत असता गर्दीत बाबा व मी वेगळे झालो. एका मंडपाच्या जवळ असल्याने तिथल्या कार्यकत्यांनी मला पाहीले व मी हरवलो आहे का विचारले. मी मान डोलावताच लगेच लाइड स्पीकरवरुन माझे नाव विचारुन जाहीर केले. लगेच बाबा तिथे आले व आमची ताटातूट संपली. [जय पुणे, जय सार्वजनीक गणेशोत्सवाचे कार्यकर्ते, जय लाउडस्पीकर. बघा तेव्हा लाउडस्पीकर नसता तर अवघड होती कीनै परिस्थिती? असो त्यावर वेगळी चर्चा होउ शकते]

मी तसा घाबरलो होतो व एखादा रट्टा खायची मनाची तयारी ठेवली होती. पण बाबांनी मला मारले नाही उलट ते जे काही बोलले ते मी अजुनही लक्षात ठेवले आहे. ते म्हणाले पुढे तुला आयुष्यात हे वाक्य उपयुक्त होईल. वाक्य होते,"चल तुझ्यासाठी कॅडबरी घेउ. आणी हो, तुझ्या आईला हे सांगू नकोस हं"

स्मिता_१३'s picture

16 Jul 2010 - 11:12 am | स्मिता_१३

>>> चल तुझ्यासाठी कॅडबरी घेउ. आणी हो, तुझ्या आईला हे सांगू नकोस हं

=))
स्मिता

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2010 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार

वाक्य होते,"चल तुझ्यासाठी कॅडबरी घेउ. आणी हो, तुझ्या आईला हे सांगू नकोस हं"

वाक्य काळजात कोरुन ठेवण्यासारखे. ह्या एका वाक्यात जणु तुम्हाला जीवनाचे सारच कळाले असे म्हणायला हरकत नाही.

माझ्या आगामी 'हरवलेल्या बाबाची कहाणी' मध्ये हे वाक्य घ्यायला आपण परवानगी द्याल का ?

©º°¨¨°º© संदिप ख ©º°¨¨°º©
आमचे राज्य

पांथस्थ's picture

16 Jul 2010 - 11:51 am | पांथस्थ

तुझ्या आईला हे सांगू नकोस हं

=)) =)) =)) =)) =))

काय तयारी करुन घेतलीये लहानपणी. एक नंबर आहे.

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

ह्याचा उलगडा झाला!! :B

चतुरंग

पाषाणभेद's picture

16 Jul 2010 - 11:15 am | पाषाणभेद

मुंबईची लोकल म्हणजे एक भयानक सत्य आहे.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

निखिल देशपांडे's picture

16 Jul 2010 - 11:25 am | निखिल देशपांडे

याच्या एकदम उलटा अनुभव असलेला किस्सा डोळ्याने पाहिला आहे.
एक बाई प्लॅटफॉर्म वरुन दारात उभ्या असलेल्या बाईची पर्स ओढत होती... गाडी चालु झाल्या झाल्या गाडीतल्या बाईने पर्सला धरुनच प्लॅटफॉर्म वर उडी घेतली. भांडण फारच विकोपाला गेले. शेवटी लेडी कॉन्स्टेबल आली आणि तीने भांडण सोडवले. सगळ्यात महत्वाचे गाडीत उभ्या असणार्‍या बाईचीच ती पर्स होती. प्लॅटफॉर्मवरची बाई बनाव करत होती. म्हणजे तुमच्या एकदम उलटा अनुभवच की...

त. टी :- हा अनुभव मुंबईतल्या प्लॅटफॉर्मवरच आला आहे. ठाण्याचा नाही ;)

स्वगत:- काय हे अधःपतन मुंबई, गर्दी, लोकल, बेदरकारपणा, मदत न करायची वृत्ती हे सगळे असुन मुंबईला शिव्या घालणारे प्रतिसाद येत नाहीत.

(मुंबईकर, पुणेकर, नागपुरकर, आणि अर्थातच... जाउद्या)निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Jul 2010 - 11:43 am | llपुण्याचे पेशवेll

स्वगत:- काय हे अधःपतन मुंबई, गर्दी, लोकल, बेदरकारपणा, मदत न करायची वृत्ती हे सगळे असुन मुंबईला शिव्या घालणारे प्रतिसाद येत नाहीत.
अहो पुणेकर सभ्य आहेत, किरकिरे नाहीत. आणि छोट्या छोट्या अपराधांसाठी इतरांना माफ करतात...
(खुद के सांथ बातां: ही १००+ प्रतिसादी धाग्याची सुरुवात म्हणावी का? )

पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

निखिल देशपांडे's picture

16 Jul 2010 - 11:56 am | निखिल देशपांडे

अहो पुणेकर सभ्य आहेत, किरकिरे नाहीत. आणि छोट्या छोट्या अपराधांसाठी इतरांना माफ करतात...
=)) =)) =))
बरोबर पुणेकर कधी चुकीचे नसतातच...
बाकीच सगळे उगाचच पुण्याला नावे ठेवतात...
असो काही जुने धागे वाचायची आज अंमळ ईच्छा होत आहे.

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Jul 2010 - 12:04 pm | llपुण्याचे पेशवेll

सहीच.. वाटचाल सुरू. :)

पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

छोटा डॉन's picture

16 Jul 2010 - 11:27 am | छोटा डॉन

माझाही मुंबई लोकलबाबत भयानक अनुभव आहे.

एक ४-५ महिन्यापुर्वी काही कामानिमित्त मुंबईला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. मी आणि आमचा एक आंतरजालिय मित्र ( जो आजकाल 'संपादक' म्हणुन मिरवत असतो, असो ) आम्ही दिवसभर "जिवाची मुंबई"करुन परत आपल्या घरी म्हणजे ठाण्याला परतत होतो.
रात्रीची ९.३० ची वेळ असावी, छ.शि.ट. वरुन लोकल पकडली ( अ‍ॅक्च्युअली तिथुनच सुटली ), बसायला जागा मिळाली नाही व उभारुन प्रवास करणे नशिबी आले, हा भयंकर अपमान आम्ही च्युईंगमसोबत गिळुन टाकला ( फक्त अपमान , च्युईंगम नव्हे ).
नंतर कुठलेसे स्थानक आले आणि काय झाले कळेना पण एखाद्या धाग्यावर धडाधड अवाम्तर प्रतिसाद यावेत तशी फटाफट माणसे आत घुसली व कंप्लिट राडा झाला. आम्ही एकेकडे, आमचे पाय एकीकडे, आमची कंबर एकीकडे, आमचे डोके ( + मेंदु ) एकीकडे ह्या अवस्थेत आम्ही अलमोस्ट २० मिनिटे प्रवास केला.

एवढा मिपावर जगप्रसिद्ध असलेला ब्लॉगर आपल्या डब्यात आहे हे लोकांना कळालेच नाही, आम्हाला अजिबात बसायला जागा मिळाली नाही व सुटसुटीत असे उभेही राहता आले नाही. ना गाडीतल्या दारात उभ्या असलेल्यांनी मदत केली ना आत बसलेल्या कोणी काही इंटरेस्ट दाखवला.....
हा प्रकार पाहुनही आमचे दोस्त जसं काही झालंच नाही असे दाखवुन रिक्षा पकडायला निघून गेले .
तर असा हा माझा एक अनुभव.

ह्यावरुन आम्हाला त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या 'बजबजपुरी' नामक संस्थळावरची '** *** आणि मुंबई पाहिली' हे सुवचन आठवुन गेले पण त्याचीही कुणास पत्रास नव्हती, असो.

------
छोटा डॉन

निखिल देशपांडे's picture

16 Jul 2010 - 11:33 am | निखिल देशपांडे

हा प्रकार पाहुनही आमचे दोस्त जसं काही झालंच नाही असे दाखवुन रिक्षा पकडायला निघून गेले .

=)) =)) =)) =)) =))
थरारक अनुभव होता नै??
शेवटी तुझे अभिनंदन. यावर तु एक लेख लिहिणार होतास पण प्रतिसाद तरी टंकलास..
अय्या तु कित्ती कित्ती छान लिहितोस रे तुझे अनुभव...
मी तर बुवा पहिल्या दिवसा पासुन तुझ्या प्रतिसादांचा फॅनच आहे.

(मिरवणारा संपादक डॉण्याचा मित्र)निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2010 - 11:39 am | परिकथेतील राजकुमार

एवढा मिपावर जगप्रसिद्ध असलेला ब्लॉगर आपल्या डब्यात आहे..

'आणि तो नुकताच 'झेंडा' पाहुन आलेला आहे' हे वाक्य अ‍ॅड करायचे राहिले का ?

ह्यावरुन आम्हाला त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या 'बजबजपुरी' नामक संस्थळावरची '** *** आणि मुंबई पाहिली' हे सुवचन आठवुन गेले पण त्याचीही कुणास पत्रास नव्हती, असो.

=)) =))

=))

=)) =))

च्यायला तुला एक कधी काय आठवेल.

सोनेरी राघु
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

Nile's picture

16 Jul 2010 - 11:42 am | Nile

आम्ही दिवसभर "जिवाची मुंबई"करुन परत आपल्या घरी म्हणजे ठाण्याला परतत होतो.

हे पहा झेंडाधारी छोटे डाण बंगलोरवाले, ही चुक तुमची आहे. ठाणे हे काय गाव आहे का जाण्याचे?? च्यायला नको तिथे जाता अन मग लोकांनी धुतले म्हणुन गाता. मुळात तुम्ही तिथे जाण्याच्या आधी माहिती काढुन गेला होता का? (अरे त्या धाग्यावरचा प्रतिसाद खाली चिकटवा रे.

-आणेकर.

-Nile

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2010 - 11:48 am | परिकथेतील राजकुमार

ठाणे हे काय गाव आहे का जाण्याचे??

सहमत.
आता ठाण्यातलीच काही नाठाळ लोक पुण्यात वस्ती करुन राहिली आहेत हा भाग वेगळा ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विंजिनेर's picture

16 Jul 2010 - 12:04 pm | विंजिनेर

आता ठाण्यातलीच काही नाठाळ लोक पुण्यात वस्ती करुन राहिली आहेत हा भाग वेगळा

पुण्याबाहेर पराभाऊ, पुण्याबाहेर..
आजकाल गावकुसाबाहेर बेसुमार वाढत चाललेल्या बंगाल्यांच्या वस्तीत एखाददुसरं भगवं क्वार्टर 'ठाण' मांडून बसलेलं दिसतं तेव्हा आमची नजर आकाशगंगा आणि दिर्घिकांमधे हरवून जाते :)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2010 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार

पुण्याबाहेर पराभाऊ, पुण्याबाहेर..

धन्यवाद धन्यवाद.

आमच्याकडून टंकनात अंमळ चूक झाली खरी.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

छोटा डॉन's picture

16 Jul 2010 - 12:03 pm | छोटा डॉन

ह्या घटनेच्या निमित्ताने आणखी काही खुलासे करु इच्छितो.

१. मुंबईला जाण्याचे आम्हाला रितसर आमंत्रण होते, अगदी अक्षता घेऊन कुणी आमच्या घरी आले नसले तरी कायदेशीर आमंत्रण होते.
तसेच मुंबईत गेल्यावर मुक्कामाची सोय म्हणुन त्या मित्राकडुनही कायदेशीर आमंत्रण होते, अक्षता घरी गेल्यावर दिल्या.

२. ठाण्याच्या बाबतीत आमच्या मनात कसलाही पुर्वगृह नव्हता.

३. जाण्याआधी आम्ही 'माफक' माहिती काढुन गेलो होतो.

४. 'झेंडा' हा सिनेमा पाहणे ही घटना ह्याच्याशी इर्रिलेव्हंट आहे ( पार्किंग स्पेस इतकीच ), उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. माझ्या आख्ख्या प्रतिसादात मी कुठेच 'झेंडा'चा पुसटसासुद्धा उल्लेख केलेला नाही.

------
छोटा डॉन

विजुभाऊ's picture

16 Jul 2010 - 12:07 pm | विजुभाऊ

कायदेशीर आमंत्रण होते.

याला मराठीत समन्स म्हणतात . कोणत्या गुन्ह्यासाठी हे समन्स होते

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2010 - 12:16 pm | परिकथेतील राजकुमार

'झेंडा' हा सिनेमा पाहणे ही घटना ह्याच्याशी इर्रिलेव्हंट आहे ( पार्किंग स्पेस इतकीच ), उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. माझ्या आख्ख्या प्रतिसादात मी कुठेच 'झेंडा'चा पुसटसासुद्धा उल्लेख केलेला नाही.

'आपण जनतेकडून दुर्लक्षीले जात आहोत' , 'आपल्यावर अन्याय होत आहे' , ' आपली दखल घेतली जात नाहीये' अशी तिव्र भावना मनात 'झेंडा' चित्रपट नुकताच पाहण्यात आला असल्याने जागी झाली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

शेखर's picture

16 Jul 2010 - 12:23 pm | शेखर

=))

आता राज चा उद्धव झाला आणी उद्धव चा राज... ;) झेंड्याचा धंद्याला मरण नाही.

Nile's picture

16 Jul 2010 - 12:18 pm | Nile

मुंबईला जाण्याचे आम्हाला रितसर आमंत्रण होते

म्हणजे तुम्ही गेलात फुकटात वर ही मिजास!!

२. ठाण्याच्या बाबतीत आमच्या मनात कसलाही पुर्वगृह नव्हता.

हेच म्हणतोय, फुकटात बोलावणे आले तर थोडी माहिती काढुन जायला नको?

३. जाण्याआधी आम्ही 'माफक' माहिती काढुन गेलो होतो.

तुमचीच चुक,अन तीही माफक नव्हे.

४. 'झेंडा' हा सिनेमा पाहणे ही घटना ह्याच्याशी इर्रिलेव्हंट आहे

बरं मंग?

उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका.

त्याचा इथे काय समंध?

माझ्या आख्ख्या प्रतिसादात मी कुठेच 'झेंडा'चा पुसटसासुद्धा उल्लेख केलेला नाही.

मी फक्त तुम्हाला झेंडाधारी म्हणलंय. पिच्चरचा इथे काय समंध? कीती तो पुर्वग्रह!

-Nile

श्रावण मोडक's picture

16 Jul 2010 - 12:16 pm | श्रावण मोडक

नंतर कुठलेसे स्थानक आले आणि काय झाले कळेना पण एखाद्या धाग्यावर धडाधड अवाम्तर प्रतिसाद यावेत तशी फटाफट माणसे आत घुसली व कंप्लिट राडा झाला. आम्ही एकेकडे, आमचे पाय एकीकडे, आमची कंबर एकीकडे, आमचे डोके ( + मेंदु ) एकीकडे ह्या अवस्थेत आम्ही अलमोस्ट २० मिनिटे प्रवास केला.

छ्या... याचा मुंबईच्या लोकलचा काय संबंध? हा पोटातल्या द्रव्याचा परिणाम. त्यामुळं मेंदूत भ्रम होतात. उगा आपलं लोकलच्या नावे बिल फाडायचं! ;)

छोटा डॉन's picture

16 Jul 2010 - 12:26 pm | छोटा डॉन

>>... याचा मुंबईच्या लोकलचा काय संबंध? हा पोटातल्या द्रव्याचा परिणाम. त्यामुळं मेंदूत भ्रम होतात. उगा आपलं लोकलच्या नावे बिल फाडायचं!

हं, कदाचित ह्या घटनेमागची आणि घटनास्थळाबाबत पार्श्वभुमी माहित नसल्याने ( किंवा माहित असल्याचे मान्य करायचे नसल्याने ) आपली किंचित गल्लत झाली आहे .

माझ्य प्रतिसादातील 'तुम्ही' कोट केलेल्या वाक्यात आलेले 'स्थानक, माणसे आत घुसली, प्रवास' इत्यादी बाबी ठळकपणे आल्यने हा नक्की लोकलचाच प्रवास होता ह्यात दुमत रहात नाही. तसेच ह्या प्रतिसादात तसा स्पष्ट उल्लेख झाला आहे.

आत राहता राहिली बाब ती पोटातल्या द्रव्याची तर आम्ही "तो आपला पुर्वगृह आहे आणो कोणताही पुर्वगृह वाईटच!" एवढेच सांगतो.

------
(विस्तारित)छोटा डॉन

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jul 2010 - 1:18 pm | बिपिन कार्यकर्ते

पूर्वगृह नाही रे डान्या, पूर्वग्रह... च्यायला शाईन मारायची तर आधी शब्द तरी नीट लिहावे ना माणसाने? नाहीतर हसतात लोकं... ;)

(जाज्ज्वल्य मुंबईकर) बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

16 Jul 2010 - 1:23 pm | सहज

संपादक जरा हे पण दुरुस्त करा की -

बसायला जागा मिळाली नाही व उभारुन प्रवास करणे नशिबी आले,

विठ्ठल विठ्ठल!

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Jul 2010 - 1:25 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो सहज,
त्याला बोली भाषा का काय त्ये म्हणतात.. तुम्ही अगदीच सुदलेकनवादि आहात बॉ.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

सहज's picture

16 Jul 2010 - 1:31 pm | सहज

ह्याला प्रीएम्पशन म्हणतात. ती टिंग्याची उद्बोधक घोषणा कोणी दुसरे देण्याअगोदर आपण टंकनदोष सुधारायचा म्हणायचे :-)

मी कुठे सुदलेखनाचा इशय काढला? :-)

छोटा डॉन's picture

16 Jul 2010 - 1:31 pm | छोटा डॉन

>>.. तुम्ही अगदीच सुदलेकनवादि आहात बॉ.
+१, असेच म्हणतो.
कधीकधी सहजरावही गल्ली चुकतात आणि उपक्रमाचा प्रतिसाद तिसरीकडेच लिहुन बसतात.

असो, त्या पुर्वग्रह प्रकरणात "शेपुट घातले आहे".
कळावे !

------
छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2010 - 2:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कधीकधी सहजरावही गल्ली चुकतात आणि उपक्रमाचा प्रतिसाद तिसरीकडेच लिहुन बसतात.

सहजरावही पुणेरीच ना? ;-)

(काडीगावकर) अदिती

विजुभाऊ's picture

16 Jul 2010 - 1:25 pm | विजुभाऊ

पूर्वगृह नाही रे डान्या, पूर्वग्रह...
त्याचे ठीक आहे हो ... त्याचे पूर्वगृह मुम्बैत नाहिये. तुमचे पूर्वगृह मुम्बैत आहे आणि सध्याचे पुण्यात आहे म्हणून तुम्ही असे म्हणताय.
ग्रह उद्योग हा एक उत्तम गृह उद्योग होउ शकतो का यावर डॉन्या त्याच्या गृहात संशोधन करतोय . अर्थात योग्य ग्रह असतील तर गृह उद्योग उत्तम चालतात

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2010 - 1:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय हो डानबाबा बंगलोरी, तुमच्या पुण्याचा कैवार घेणार्‍या बंगलोरी मराठीत पूर्वग्रह हा शब्द पूर्वगृह असा लिहीतात का?
त्यावरून आठवलं, तुम्ही ठाण्याला पूर्वेच्या गृहात होतात का पश्चिमेच्या? ठाणे पूर्व विरूद्ध ठाणे पश्चिम हा वाद हिरव्या माजाएवढाच सनातन आणि स्फोटक आहे हो! ;-)

मी जेव्हा एकेकाळी अनिच्छेने लोकलने प्रवास करायचे ते दिवस आठवले. कसला वैताग यायचा मुंबईबाहेरचे आणि येडे (मुंबैबाहेरचे याचा अर्थ येडे असा मी तरी घेतलेला नाही, खुलासा संपला.) लोकं ट्रेनमधे आले की ... शिस्त नाही, काही नाही आणि घुसले गर्दीत गाड्या पकडायला! गाड्या पकडायचे का कुठे झेंडे गाडायचे कोण जाणे!!

असो, आम्ही सध्या स्वतंत्र संस्थानात रहातो त्यामुळे पोस्टड पत्ता काही का असेना, आम्ही आमचा वेगळाच माज दाखवतो! ;-)

अदिती

अवांतरः लिखाळ ... एक लंबर प्रतिसाद रे! तुझी शब्दांची वही सापडलेली दिसते.

श्रावण मोडक's picture

16 Jul 2010 - 2:52 pm | श्रावण मोडक

अर्र... संपादक चुकलं वो... तो प्रवास लोकलचा आहे याविषयी आमच्या मनात तीळमात्र संशय नाही. आम्ही त्याविषयी कुठंही, काहीही म्हटलेलं नाही. पण लोकलच्या प्रवासाशी तुम्ही नातं जोडलेले इतर अनुभवांचा लोकलशी संबंध नाही, इतकाच आमचा युक्तिवाद आहे. तोच संपादित करतो म्हणालात तर आम्ही काय लिहायचं? ;)

Nile's picture

16 Jul 2010 - 11:53 pm | Nile

तेव्हाच नव्हे तर हे प्रतिसाद टंकतानाही द्रव्याचा अंमल आहे हे दिसतेच आहे, नाही का गुर्जी?

-Nile

राजेश घासकडवी's picture

16 Jul 2010 - 3:44 pm | राजेश घासकडवी

आत राहता राहिली बाब ती पोटातल्या द्रव्याची

डान्राव, ती पोटातल्या द्रव्याची बाब आतच राहिली ते बरं नाही का? ;)

विजुभाऊ's picture

16 Jul 2010 - 11:32 am | विजुभाऊ

मुंबईची लोकल म्हणजे एक भयानक सत्य आहे.

तसे असेल तर .... पुण्याची पीमटी हा मोक्ष आहे

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Jul 2010 - 3:05 pm | घाशीराम कोतवाल १.२

पुण्याची पीमटी हा मोक्ष आहे

ह्या वाक्याशी शब्दशः सहमत सुहासच्या एका प्रतिसादात पीमटीच्या खाली मोक्ष संपादन करणार्‍याची आकडेवारी होती भेटला तर विदा देतोच

सुहासचा प्रतिसादातील मुद्दे
पिएमटी च्या खाली मृत झालेल्यांची संख्या गेल्या दहा वर्षात ११३ ....९६ जण वय वर्षे ५० आणी वय वर्षे १८ च्या खाली....काल ह्या नुकसानीसाठी स्थायी समितीने नुकसान भरपाई साठी २६ लाख वसुल केले ...११३ जणांपैकी केवळ २ जणांना पीएमटी तर्फे आजवर नुकसान भरपाई दिली गेली आहे. ४० हजार दोघांना मिळुन . ही देखील फुलकरांची कृपा (कोण फुलकर माहीत आहेत का ? पुण्यातले एक सुप्रसिध्द वकील ..मागील वर्षी निधन झाले..)
चालक तीन महिने सस्पेंड आणी आता पेन्शनधारी....
______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम

शिल्पा ब's picture

17 Jul 2010 - 12:56 am | शिल्पा ब

पीएमटी ने मला जवळजवळ स्वर्गापाशीच नेऊन सोडलं होतं...पण बहुतेक दार बिघडले असावे किंवा माझा मौक्षिक ब्यालंस कमी असावा मी खालीच राहिले आणि तळहातावर तिथपर्यंत जाऊन आल्याची खुण राहिली.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

17 Jul 2010 - 1:20 am | पंगा

पीएमटी ने मला जवळजवळ स्वर्गापाशीच नेऊन सोडलं होतं...पण बहुतेक दार बिघडले असावे

पीएमटीला दार???

असो. पीएमटीचा आम्हाला जाज्ज्वल्य अभिमान आहे. त्यामुळे 'पीएमटीने ईप्सित* स्थळी आपल्याला पोहोचवण्यात हलगर्जीपणा केला' असा गलिच्छ आरोप करून पीएमटीच्या कार्यक्षमतेबद्दलच्या कीर्तीवर** पूर्वग्रहदूषित शिंतोडे उडवण्याबद्दल (आणि एकंदरीतच पीएमटीच्या कीर्तीस आणि प्रतिष्ठेस क्षति पोहोचवल्याबद्दल) आपला तीव्र*** निषेध!

(*स्पष्टीकरण आणि डिस्क्लेमरः पीएमटीला ईप्सित स्थळी. आपल्याला ते स्थळ ईप्सित असेलच, असा दावा नाही. असल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.)
(**उगीच नाही काही त्याला पब्लिक मर्डर ट्रान्स्पोर्ट म्हणत!)
(***निषेध हा तीव्रच असावा, असा अलिखित दंडक आहे. अलिकडे हा दंडक पाळण्याच्या बाबतीत समाजाचे दुर्लक्ष होते आहे. पण लक्षात कोण घेतो?)

- पंडित गागाभट्ट.

शिल्पा ब's picture

17 Jul 2010 - 5:56 am | शिल्पा ब

असे कसे हो तुम्ही भाषापंडित? दार स्वर्गाचे पीएमटीचे नाही...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

=)) =)) =)) =)) =))

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विजुभाऊ's picture

16 Jul 2010 - 3:08 pm | विजुभाऊ

त्या पुर्वग्रह प्रकरणात "शेपुट घातले आहे".
हे धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड

शेखर's picture

16 Jul 2010 - 3:28 pm | शेखर

अरे वा बरेच अवांतर प्रतिसाद आले आहेत ह्या धाग्यावर.

विजुभाऊ's picture

16 Jul 2010 - 3:32 pm | विजुभाऊ

शू: तसे बोलायचे नाही........

Dhananjay Borgaonkar's picture

17 Jul 2010 - 12:33 am | Dhananjay Borgaonkar

किती लोक जळतात रे देवा आमच्या पुण्यावर...
कोणीही कितीही बोलल तरी जगात रहाण्या लायक दोनच शहरं पुणे किंवा पॅरीस.

मृत्युन्जय's picture

17 Jul 2010 - 10:11 am | मृत्युन्जय

त्यातले पॅरीस खुपच महाग असल्यामुळे (पुण्यापेक्षासुद्धा महाग.) उरते केवळ पुणेच.

रेवती's picture

17 Jul 2010 - 3:31 am | रेवती

धाग्यावरील बरेचसे प्रतिसाद अवांतर आहेत.

रेवती

Nile's picture

17 Jul 2010 - 5:21 am | Nile

(पण)धाग्याबद्दल पाळलेले मौन इंटरेस्टींग आहे. ;)
(हलके घेणे.)

-Nile

शिल्पा ब's picture

17 Jul 2010 - 6:01 am | शिल्पा ब

आम्ही सगळ्यांना फाट्यावर मारतो म्हणून कोणी संबंधित प्रतिसाद दिले किंवा नाही दिले तरी आम्ही धागा उडवणार नाही....हे तुम्ही (आणि कोणीही) कसेही घ्या.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jul 2010 - 11:01 am | परिकथेतील राजकुमार

आम्ही सगळ्यांना फाट्यावर मारतो म्हणून कोणी संबंधित प्रतिसाद दिले किंवा नाही दिले तरी आम्ही धागा उडवणार नाही....हे तुम्ही (आणि कोणीही) कसेही घ्या.

मस्तच ! हे आवडले.
तुम्ही 'फेडअप' झाला नाहीत ह्याचे कौतुक वाटते.

सहजश्रीचा मित्र
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

शिल्पा ब's picture

17 Jul 2010 - 11:04 am | शिल्पा ब

एवढ्या बारीक सारीक कारणांनी फेडअप व्हायला आम्ही काही अगदीच "हे" नाही.. :D

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

रेवती's picture

17 Jul 2010 - 5:13 pm | रेवती

नाईल,
आपला उपप्रतिसाद अजिबात आवडला नाही.
यापुढे आपण सद्स्य रेवतीला प्रतिसाद अथवा उपप्रतिसाद न द्याल तर बरे होइल.
संपादक म्हणून जे माझे काम आहे ते करीनच. आपण काळजी करू नये.
कोणत्या धाग्यावर मौन पाळायचे हे ठरवण्याचे अधिकार मला आहेत.

रेवती

शिल्पा ब's picture

17 Jul 2010 - 9:16 pm | शिल्पा ब

<<कोणत्या धाग्यावर मौन पाळायचे हे ठरवण्याचे अधिकार मला आहेत.

म्हणजे मराठीत ज्याला पार्शलिटी म्हणतात तसा प्रकार वाटतो..दुटप्पी धोरण म्हणा हवे तर.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

रेवती's picture

18 Jul 2010 - 2:12 am | रेवती

मौन पाळणे आणि संपादनाच्या कामात हलगर्जीपणा करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या धाग्यावर बरेच अवांतर प्रतिसाद आले. त्यात जर मिसळपावच्या धोरण क्र. ५ मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आले असते तर अप्रकाशीत केले असते. तरीही (कोणाला फारसे न दुखावणार्‍या) अवांतरपणाला ब्रेक लावण्यासाठी म्हणून माझी उपस्थिती दाखवून देण्याचे काम केले. हा दुट्टप्पीपणा नव्हे तर थोडी मोकळीक दिली होती. त्यावर अश्याप्रकारचे उपप्रतिसाद येणे अपेक्षित नव्हते. याउपर आपली तक्रार असेल तर संपादक मंडळाला व्य. नि.तून कळवावी.

रेवती

शिल्पा ब's picture

18 Jul 2010 - 2:21 am | शिल्पा ब

माझी अजिबात तक्रार नाही...फक्त खटकणारे वाक्य दाखवले इतकेच...असो.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

जागु's picture

17 Jul 2010 - 9:32 pm | जागु

बापरे वाचुनच भिती वाटते. मी बर्‍याच जणांचे असे प्रकार ऐकते. खरच कसे कसे अनुभव येतात ना ?

शानबा५१२'s picture

17 Jul 2010 - 10:32 pm | शानबा५१२

हा अनुभव एखाद्याला थरारक वाटु शकतो हे कळाल्यावर इतरांच्या 'थरारक' अनुभवांना काय म्हणायच असा प्रश्न पडला.
काही विनोदी वाचायला मिळेल म्हणुन लेख वाचला पण डोक्यात फक्त प्रश्न चिन्ह बाकी राहील.

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

तिमा's picture

18 Jul 2010 - 10:47 am | तिमा

तुम्हाला पुणेकर व्हायचे आहे, मुंबईकर का मिपाकर ? मिपाकर व्हायचे असेल तर अवांतर प्रतिक्रिया बंद करा.
हाच 'थरारक'प्रसंग त्या पर्स चोरणार्‍या बाईच्या दृष्टिकोनातून .....

दादर यायच्या आधीच मी माझं 'गिर्‍हाईक' हेरुन ठेवलं होतं. बाई मुंबईची वाटत नव्हती. बावळटपणा हा, लपवायचा प्रयत्न केला तरी आमच्यासारख्या सराईताच्या नजरेतून कसा सुटणार ? पर्स जरा जास्तच संभाळत होती. तेंव्हाच वाटलं, 'माल' असणार! दादरला ती उतरताना अलगद पर्सचा पट्टा धरुन ठेवला.पण बाई लई खमकी, पुणेरी वाटली. पर्स सोडायला तयार नाही. नशिबानी गाडी सुटली. तर ती गाडीबरोबर धावायला लागली, गुद्दे मारत. म्हटलं आता पर्स नाही सोडली तर ही पडून मरायची, म्हणून दिली सोडून! आतल्या बायका विचारायला लागल्या, काय झालं ? मी म्हटलं माझी पर्स चोरून गेली हो ती भामटी! जाऊ दे.
आपल्याला काय फरक पडतो? एक गिर्‍हाईक कमी तर कमी. भूतदया दाखवली का नाही ? म्हणजे पुण्य मलाच मिळालं की!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शिल्पा ब's picture

18 Jul 2010 - 11:47 am | शिल्पा ब

च्यामारी!!! तिरशिंगराव, दृष्टीकोन असावा तर असा... लै भारी!!!
तसेही आम्ही आमचा बावळटपणा कबुल सुद्धा केलेला आहे...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

तिमा's picture

18 Jul 2010 - 1:24 pm | तिमा

शिल्पातै, 'बावळटपणा' हा उल्लेख त्या बाईच्या दृष्टिकोनातून. आम्ही तुम्हाला तसे म्हणणार नाही. प्रतिसाद खेळकरपणे घेतल्याबद्दल धन्यवाद.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|