अहो सहज,
त्याला बोली भाषा का काय त्ये म्हणतात.. तुम्ही अगदीच सुदलेकनवादि आहात बॉ.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
पूर्वगृह नाही रे डान्या, पूर्वग्रह...
त्याचे ठीक आहे हो ... त्याचे पूर्वगृह मुम्बैत नाहिये. तुमचे पूर्वगृह मुम्बैत आहे आणि सध्याचे पुण्यात आहे म्हणून तुम्ही असे म्हणताय.
ग्रह उद्योग हा एक उत्तम गृह उद्योग होउ शकतो का यावर डॉन्या त्याच्या गृहात संशोधन करतोय . अर्थात योग्य ग्रह असतील तर गृह उद्योग उत्तम चालतात
काय हो डानबाबा बंगलोरी, तुमच्या पुण्याचा कैवार घेणार्या बंगलोरी मराठीत पूर्वग्रह हा शब्द पूर्वगृह असा लिहीतात का?
त्यावरून आठवलं, तुम्ही ठाण्याला पूर्वेच्या गृहात होतात का पश्चिमेच्या? ठाणे पूर्व विरूद्ध ठाणे पश्चिम हा वाद हिरव्या माजाएवढाच सनातन आणि स्फोटक आहे हो! ;-)
मी जेव्हा एकेकाळी अनिच्छेने लोकलने प्रवास करायचे ते दिवस आठवले. कसला वैताग यायचा मुंबईबाहेरचे आणि येडे (मुंबैबाहेरचे याचा अर्थ येडे असा मी तरी घेतलेला नाही, खुलासा संपला.) लोकं ट्रेनमधे आले की ... शिस्त नाही, काही नाही आणि घुसले गर्दीत गाड्या पकडायला! गाड्या पकडायचे का कुठे झेंडे गाडायचे कोण जाणे!!
असो, आम्ही सध्या स्वतंत्र संस्थानात रहातो त्यामुळे पोस्टड पत्ता काही का असेना, आम्ही आमचा वेगळाच माज दाखवतो! ;-)
अदिती
अवांतरः लिखाळ ... एक लंबर प्रतिसाद रे! तुझी शब्दांची वही सापडलेली दिसते.
अर्र... संपादक चुकलं वो... तो प्रवास लोकलचा आहे याविषयी आमच्या मनात तीळमात्र संशय नाही. आम्ही त्याविषयी कुठंही, काहीही म्हटलेलं नाही. पण लोकलच्या प्रवासाशी तुम्ही नातं जोडलेले इतर अनुभवांचा लोकलशी संबंध नाही, इतकाच आमचा युक्तिवाद आहे. तोच संपादित करतो म्हणालात तर आम्ही काय लिहायचं? ;)
पुण्याची पीमटी हा मोक्ष आहे
ह्या वाक्याशी शब्दशः सहमत सुहासच्या एका प्रतिसादात पीमटीच्या खाली मोक्ष संपादन करणार्याची आकडेवारी होती भेटला तर विदा देतोच
सुहासचा प्रतिसादातील मुद्दे पिएमटी च्या खाली मृत झालेल्यांची संख्या गेल्या दहा वर्षात ११३ ....९६ जण वय वर्षे ५० आणी वय वर्षे १८ च्या खाली....काल ह्या नुकसानीसाठी स्थायी समितीने नुकसान भरपाई साठी २६ लाख वसुल केले ...११३ जणांपैकी केवळ २ जणांना पीएमटी तर्फे आजवर नुकसान भरपाई दिली गेली आहे. ४० हजार दोघांना मिळुन . ही देखील फुलकरांची कृपा (कोण फुलकर माहीत आहेत का ? पुण्यातले एक सुप्रसिध्द वकील ..मागील वर्षी निधन झाले..)
चालक तीन महिने सस्पेंड आणी आता पेन्शनधारी....
______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम
पीएमटी ने मला जवळजवळ स्वर्गापाशीच नेऊन सोडलं होतं...पण बहुतेक दार बिघडले असावे किंवा माझा मौक्षिक ब्यालंस कमी असावा मी खालीच राहिले आणि तळहातावर तिथपर्यंत जाऊन आल्याची खुण राहिली.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
पीएमटी ने मला जवळजवळ स्वर्गापाशीच नेऊन सोडलं होतं...पण बहुतेक दार बिघडले असावे
पीएमटीला दार???
असो. पीएमटीचा आम्हाला जाज्ज्वल्य अभिमान आहे. त्यामुळे 'पीएमटीने ईप्सित* स्थळी आपल्याला पोहोचवण्यात हलगर्जीपणा केला' असा गलिच्छ आरोप करून पीएमटीच्या कार्यक्षमतेबद्दलच्या कीर्तीवर** पूर्वग्रहदूषित शिंतोडे उडवण्याबद्दल (आणि एकंदरीतच पीएमटीच्या कीर्तीस आणि प्रतिष्ठेस क्षति पोहोचवल्याबद्दल) आपला तीव्र*** निषेध!
(*स्पष्टीकरण आणि डिस्क्लेमरः पीएमटीला ईप्सित स्थळी. आपल्याला ते स्थळ ईप्सित असेलच, असा दावा नाही. असल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.)
(**उगीच नाही काही त्याला पब्लिक मर्डर ट्रान्स्पोर्ट म्हणत!)
(***निषेध हा तीव्रच असावा, असा अलिखित दंडक आहे. अलिकडे हा दंडक पाळण्याच्या बाबतीत समाजाचे दुर्लक्ष होते आहे. पण लक्षात कोण घेतो?)
- पंडित गागाभट्ट.
असे कसे हो तुम्ही भाषापंडित? दार स्वर्गाचे पीएमटीचे नाही...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
आम्ही सगळ्यांना फाट्यावर मारतो म्हणून कोणी संबंधित प्रतिसाद दिले किंवा नाही दिले तरी आम्ही धागा उडवणार नाही....हे तुम्ही (आणि कोणीही) कसेही घ्या.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
नाईल,
आपला उपप्रतिसाद अजिबात आवडला नाही.
यापुढे आपण सद्स्य रेवतीला प्रतिसाद अथवा उपप्रतिसाद न द्याल तर बरे होइल.
संपादक म्हणून जे माझे काम आहे ते करीनच. आपण काळजी करू नये.
कोणत्या धाग्यावर मौन पाळायचे हे ठरवण्याचे अधिकार मला आहेत.
रेवती
<<कोणत्या धाग्यावर मौन पाळायचे हे ठरवण्याचे अधिकार मला आहेत.
म्हणजे मराठीत ज्याला पार्शलिटी म्हणतात तसा प्रकार वाटतो..दुटप्पी धोरण म्हणा हवे तर.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
मौन पाळणे आणि संपादनाच्या कामात हलगर्जीपणा करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या धाग्यावर बरेच अवांतर प्रतिसाद आले. त्यात जर मिसळपावच्या धोरण क्र. ५ मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आले असते तर अप्रकाशीत केले असते. तरीही (कोणाला फारसे न दुखावणार्या) अवांतरपणाला ब्रेक लावण्यासाठी म्हणून माझी उपस्थिती दाखवून देण्याचे काम केले. हा दुट्टप्पीपणा नव्हे तर थोडी मोकळीक दिली होती. त्यावर अश्याप्रकारचे उपप्रतिसाद येणे अपेक्षित नव्हते. याउपर आपली तक्रार असेल तर संपादक मंडळाला व्य. नि.तून कळवावी.
रेवती
हा अनुभव एखाद्याला थरारक वाटु शकतो हे कळाल्यावर इतरांच्या 'थरारक' अनुभवांना काय म्हणायच असा प्रश्न पडला.
काही विनोदी वाचायला मिळेल म्हणुन लेख वाचला पण डोक्यात फक्त प्रश्न चिन्ह बाकी राहील.
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
तुम्हाला पुणेकर व्हायचे आहे, मुंबईकर का मिपाकर ? मिपाकर व्हायचे असेल तर अवांतर प्रतिक्रिया बंद करा.
हाच 'थरारक'प्रसंग त्या पर्स चोरणार्या बाईच्या दृष्टिकोनातून .....
दादर यायच्या आधीच मी माझं 'गिर्हाईक' हेरुन ठेवलं होतं. बाई मुंबईची वाटत नव्हती. बावळटपणा हा, लपवायचा प्रयत्न केला तरी आमच्यासारख्या सराईताच्या नजरेतून कसा सुटणार ? पर्स जरा जास्तच संभाळत होती. तेंव्हाच वाटलं, 'माल' असणार! दादरला ती उतरताना अलगद पर्सचा पट्टा धरुन ठेवला.पण बाई लई खमकी, पुणेरी वाटली. पर्स सोडायला तयार नाही. नशिबानी गाडी सुटली. तर ती गाडीबरोबर धावायला लागली, गुद्दे मारत. म्हटलं आता पर्स नाही सोडली तर ही पडून मरायची, म्हणून दिली सोडून! आतल्या बायका विचारायला लागल्या, काय झालं ? मी म्हटलं माझी पर्स चोरून गेली हो ती भामटी! जाऊ दे.
आपल्याला काय फरक पडतो? एक गिर्हाईक कमी तर कमी. भूतदया दाखवली का नाही ? म्हणजे पुण्य मलाच मिळालं की!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
च्यामारी!!! तिरशिंगराव, दृष्टीकोन असावा तर असा... लै भारी!!!
तसेही आम्ही आमचा बावळटपणा कबुल सुद्धा केलेला आहे...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
शिल्पातै, 'बावळटपणा' हा उल्लेख त्या बाईच्या दृष्टिकोनातून. आम्ही तुम्हाला तसे म्हणणार नाही. प्रतिसाद खेळकरपणे घेतल्याबद्दल धन्यवाद.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
प्रतिक्रिया
अहो
:-)
तेच ना ...
कधीकधी
पूर्वगृह
काय हो
अर्र...
तेव्हाच
आतले अन बाहेरचे
सत्य आणि मोक्ष
पुण्याची
पीएमटी ने
दार?
असे कसे हो
तसे असेल तर .... पुण्याची पीमटी हा मोक्ष आहे
धत्तड धत्तड तत्तड तत्तड
अरे वा
शू: तसे
किती लोक
त्यातले
धाग्यावरी
(पण)धाग्याब
आम्ही
आम्ही
एवढ्या
नाईल, आपला
<<कोणत्या
मौन पाळणे
माझी
बापरे
हा अनुभव
मिपाकर
च्यामारी!!!
धन्यवाद