आपल्याकडे लहान बाळाचे - दर महिन्याला (एक वर्षापर्यंत) वाढदिवस साजरे करण्याची प्रथा आहे.
दर महिन्याला वेगवेगळे पदार्थ करुन हे साजरे केले जातात, हे पदार्थ बाळाची वाढ-दर्शवणारे असतात.
उदा: १ महिना -घावन / धिरडे, महिना २ - जिलेबी / कडबोळी - रिंगण घातल्यावर / गोल फिरल्यावर
महिना ३ - करंजी (कुशीवर झाल्यावर)
असे आणि या पुढील वाढदिवस कसे साजरे केले जातात याविषयी माहिती हवी आहे !
प्रतिक्रिया
3 Jun 2010 - 10:57 pm | शुचि
मला हे माहीत नव्हतं. सुंदर माहीती.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
3 Jun 2010 - 11:10 pm | शिल्पा ब
मला हे माहिती नव्हते...मी माझ्या बाळाचे वाढदिवस ओवाळून आणि काहीतरी गोडधोड करून साजरे केले...वर्षानंतर मात्र एकदाच मित्रमंडळी आमंत्रित करून केक कापून आणि ओवाळून छोटी पार्टी करून साजरे करते...बाकी इतर काही प्रथा असतील माहिती करून घ्यायला आवडेल.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
3 Jun 2010 - 11:35 pm | बेसनलाडू
वय वर्षे १ आणि ५ पूर्ण झाल्यावरचे वाढदिवस दणक्यात साजरे होतात, हे माहीत होते. मात्र प्रत्येक महिन्याला वाढदिवस भारीच! मजा आहे राव!
(बालक)बेसनलाडू
3 Jun 2010 - 11:39 pm | चतुरंग
हे ऐकून होतो पण मला कसे साजरे करतात हे माहीत नाही.
(बराच वाढलेला)चतुरंग
4 Jun 2010 - 3:53 am | पाषाणभेद
हे काही बरोबर नाही. आताच्या समृद्धीच्या युगात बाळाचा 'वाढदिवस' दररोज साजरा करायला हरकत नाही. नविन प्रथा तयार केली पाहीजे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
4 Jun 2010 - 5:34 am | मीनल
मला ही माहित नव्हते.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
4 Jun 2010 - 7:18 am | समिधा
हो मी माझ्या मुलीचे केले होते.
पण सगळे पदार्थ माझ्या आजीने सांगितले होते.
मी आजीला विचारुन सांगेन. पण ४थ्या महिन्यात बाळ दोन्ही हाताच्या मुठी वळुन हुंकारते तेव्हा लाडु करतात.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
4 Jun 2010 - 9:32 am | बेसनलाडू
पण ४थ्या महिन्यात बाळ दोन्ही हाताच्या मुठी वळुन हुंकारते तेव्हा लाडु करतात.
याच न्यायाने जेव्हा बाळ पाय आपटू लागेल, दोन पायांवर उभे राहून धडपडत चालायचा, दुडदुडायचा किंवा उड्या मारायचा प्रयत्न करू लागेल, तेव्हा द्राक्षांची उत्तम वाईन आणि जोडीला पावभाजीचा पाव करावा, असे सुचवावेसे वाटते. (ह. घ्या. ;) )
(सूचक)बेसनलाडू
4 Jun 2010 - 9:36 am | चतुरंग
खतरनाक सूचना! ;)
(अधूनमधून दुडदुडणारा) चतुरंग