लोहगडला जाउ जाउ अस करत करत बरेच रविवार नुसतेच येत आणि जात होते.
प्रत्येक वेळी प्रत्येकाची वेगळी कारण. होय नाही करत शेवटी मी आणि राजा दोघच जायच फिक्स केल.
तर आता नमनालाच जास्त तेल न घालता घ्या फोटू.
हा जाताना पायवाटेवरुन काढलेला फोटु.
हा जाताना दिसणारा विसापुर. अवाढव्य आहे हा किल्ला.
हा दिसतोय लोहगड. हा त्याचा डावीकडचा भाग. बुलंद किल्ला आहे एकदम. :)
हा उजवीकडचा भाग. त्यातील सगळ्यात उजवीकडचा गोल बुरुज म्हणजे विंचु काटा.
लोहगडाच्या पायथ्यापासुन दिसणारा विसापुर
गडाच्या दरवाजाच्या बाजुला असलेली गणेश मुर्ती.
बुलंद लोहगड
हाच तो ढासळलेला बुरुज. :(
मस्त आहे ना बांधणी :) त्या ढासळलेल्या बुरुजाचे काहि दगड दिसत आहेत पायर्यांवर.
मुख्य दरवाजातील नक्षी
पसरलेला विसापुर. लोहगडावरुन.
गडावरुन दिसणार धरणाच (बहुद्धा पवना धरण) बॅकवॉटर.
विंचुकाटा
विंचुकाट्यावरुन लोहगड असा दिसतो
सोळा कोनी तलाव. (नाना तलाव)
अजुन काही फोटो आहेत ते
ह्या लिन्क वर. :)
http://picasaweb.google.com/zakasrao/Lohagad02#
हल्ली गडावर बरच पब्लिक वाढलय. त्यामुळे कचरा देखील.
चार वर्षे झाली त्यावेळी अख्ख्या गडावर फक्त आम्ही ५ मित्र आणि एका शाळेतुन दोन मास्तरानी आणलेले २०-२५ मुल एवढीच लोक होतो.
कचरा दिसलाच नाही त्यावेळी.
त्यावेळी माकड जास्त दिसली होती. आता माकडं तुरळकच दिसली पण आधुनिक माकडं एफ एम लावुन फिरताना गडावर जास्त दिसलीत. बहुतेक लोणावळ्याकडुन गडाकडे येणारा रस्ता बराच सुस्थितीत आलेला असावा. त्याशिवाय एवढी गर्दी शक्यच नाही. असो.
लोहगडाचा पुर्ण सिंहगड व्हायच्या आधी एकदा तरी जावुन या. सुख आहे त्यात.
जास्त दमछाक करणारा गड नाही हा.
प्रतिक्रिया
11 Nov 2009 - 2:21 am | पक्या
सुंदर फोटोज. सर्वच छान आले आहेत. लोहगड ची चित्र सफर आवडली.
- जय महाराष्ट्र , जय मराठी !
11 Nov 2009 - 4:45 am | प्रभो
मस्त रे.....जबरा आलेत फोटो......
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
11 Nov 2009 - 7:03 am | स्वाती२
मस्त आहेत फोटो.
11 Nov 2009 - 7:12 am | रेवती
मस्त फोटो!
ढासळलेला भाग दुरुस्त व्हावा ही इच्छा (पुरातत्व खात्याकडून)!
आधुनिक माकडं एफ एम लावुन फिरताना गडावर जास्त दिसलीत.
ही ही ही! छान!
रेवती
11 Nov 2009 - 7:39 am | सहज
मजा आली.
11 Nov 2009 - 7:55 am | संदीप चित्रे
कॉलेजमधे असताना लोहगडवर गेलो होतो त्या आठवणी आल्या.
तेव्हा धो धो कोसळत्या पावसात अप्रतिम खिमा खाल्ला होता :)
11 Nov 2009 - 8:10 am | मदनबाण
झकासराव एकदम झकास फोटो आले आहेत...
मदनबाण.....
11 Nov 2009 - 10:51 am | पाषाणभेद
आक्षी ह्येच म्हनूं र्ह्यायलोय.
जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
11 Nov 2009 - 10:52 am | विशाल कुलकर्णी
झकास ! ;-)
आमच्या लोहगड दौर्याची आठवण झाली. ;-)
तो सोळा कोनी (नाना) तलाव, त्यालाच हत्ती टाके असेही म्हटले जाते. आम्ही त्याच्या शेजारीच तंबू टाकला होता.
इथे
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
11 Nov 2009 - 10:41 pm | झकासराव
धन्यवाद मित्रहो. :)
रेवती, सध्या तिथे काम सुरु आहे. पायर्या बनवण्याच काम सुरु आहे. त्यामुळे डागडुजी होइल अशी अपेक्षा आहे.
विशालभो मी आणि राज्याने तुझी आठवण काढली होती.
दरी बघताना :D
तु लिहिलेला अनुभव लक्षात आहे अजुन.
11 Nov 2009 - 11:11 am | दिपक
सगळे फोटो मस्त आहेत. आवडले.
11 Nov 2009 - 11:25 am | विमुक्त
छान!!! मस्त फोटो...
11 Nov 2009 - 12:04 pm | jaypal
सुंदर दर्शन घडवलेत. फोटो छानच ..
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
11 Nov 2009 - 1:20 pm | गणपा
झक्कास, राव मस्त आहे त फोटो.
11 Nov 2009 - 11:06 pm | लवंगी
विहिरीचातर क्लासच!!
12 Nov 2009 - 9:21 am | ज्ञानोबाचे पैजार
झकासराव,
अप्रतिम फोटोंची मेजवानी दील्या बद्द्ल धन्यवाद. लोहगडला कितीही वेळा जा प्रत्येक वेळी तेवढीच मजा येते.
लोहगडाच्या वाटेवरच भाजे लेणि आहेत, विसापुर डोंगराच्या कुशीत. ही सुध्धा अतिशय सुंदर जागा आहे. लोहगड आणि भाजे दोन्ही ठिकाणे एका दीवसात आरामात पाहुन होतात.
पैजारबुवा
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
12 Nov 2009 - 10:20 am | चिंतामणराव
फोटो बघुन खरोखर स्फुर्ति आलेली आहे.
खुप वर्शापुर्वी गेलो होतो.
धन्य्वाद.
चिंतामणराव .....आमचा हरी आहे...
13 Nov 2009 - 9:09 am | लवंगीमिरची
सुंदर फोटो..
8>
13 Nov 2009 - 12:06 pm | मसक्कली
मी ही गेले होते ... जाइ पर्यन्त मित्राला फार शिव्या घतल्या X( ~X( ..येवढ चालायच.. #:S .पण गडावर गेल्यावर सगळा शिन गेला.. ;;) मस्त वाटत होत...वातावरण तर खुपच छान होत.. 8>
मस्त पावसात भिजले सगळे न मग गरमा गरम भजी, न पिठल भाकरि दनकुन हानल.. :D कारन वर चढुन आल्यावर सगल्यान्च्या पोटातले कावळे ओरडुन ओरडुन मेले होते.. :S त्या वेळी कळाल...
अन्न हेच परब्रम्ह आहे ते.. :)
13 Nov 2009 - 4:36 pm | टारझन
=)) =)) =)) कसला बिचारा आहे "मित्रा" .. उचलून घे म्हणायचं ना ?
=))
अवांतर : मित्राला कोणत्या शिव्या दिल्या ह्याचा खुलासा केलात तर इथे .. जाहीर खुलाश्याबद्दल धन्यवाद करता येईल !
अतिअवांतर : लेका झकासा .. लाष्ट टाईम ताजा ताजा लेख वाचून पहिलीच प्रतिक्रिया देणार होतो .. पण तांत्रीक कारणांमुळे राहून गेलं .. आणि ह्या खुलाश्याबद्दल स्वतःचेच आभार.
- विश्वामित्रा
14 Nov 2009 - 12:06 pm | अवलिया
मस्त रे झकासा ! अगदी झकासच !!!
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
28 Nov 2009 - 2:37 pm | साजिरा
सही रे! :)