शेजारचे जातियवाद व राजकारण

सतीश वळीव's picture
सतीश वळीव in जनातलं, मनातलं
9 Feb 2008 - 1:44 am

सध्याच्या युगात जातियवाद व राजकारण आजुनही ज्वलंत समस्या आहे. मी ऐक मध्यम वर्गीय नोकरधार असुन प्रामाणिक व सरळ साधा व दुसर्‍यास उपयोगी पडनारी व्यक्ती आहे. मी मागासवर्गीय असुन शेजारच्या स्त्रीया आमच्या स्त्रीयांच्या बरोबर अंतकरनापासुन व्यवस्तीत वागत नाहीत. हे जहाले स्त्रीयांचे. पुरषांचे कही कमी नाही. इतर कोनत्याही गोष्टीत आडकाठी घालुन आम्हाला खाली खेचतात. अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्‍यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे. मला एकमात्र माहीत आहे की जो कोनी चांगले वागतो त्याचे त्याला चांगलेच फळ मीळनार. जो कोनी वाईट वागतो त्याचे त्याला वाईटच फळ मीळनार. कारन जसे तुम्ही वागाल तसे तुमचे विचार, आचार, आन्न, हवा, पाणी, संगत, कार्य वगैरे ह्या सर्वंचा एकंदरीत परिनाम हा त्याचा विनाश करतो. मला खुप काही संगायचे आहे पन शब्दांत सागुं शकत नाही.
हे माझे वीचार वाचल्याबद्दल मी आपला आभारी आहे.
कळावे, ०९-०२-२००८ नवीन सदस्य ......... सतीश वळीव.

धर्मसमाजराजकारणविचारमतअनुभवप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

9 Feb 2008 - 2:46 am | ऋषिकेश

सर्वप्रथम या मिपाच्या कट्ट्यावर आपले स्वागत!..

मला खुप काही संगायचे आहे पन शब्दांत सागुं शकत नाही.

या स्थळावर येत रहा . इथे खूप दिलदार मंडळी आहेत. या दिलखुलास स्थळाने मनात कोणाविषयी दुराग्रह/तेढ बाळगून होणारे वर्तन/लेखन होऊ दिलेले नाहि तेव्हा इथे आपले विचार खुशाल प्रकट करावेत.
इथे इतरांच्याही लिखाणाचा आस्वाद घ्या आणि तुमचेही विचार बोलून दाखवा ... बोले तो बिंदास!! ;)

-ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

9 Feb 2008 - 11:38 am | विसोबा खेचर

म्हणतो..!

सतीशरावांचे मिपावर मनापासून स्वागत! आजपासून सतीशराव मिपाचे आहेत, मिपा सतीशरावांचं आहे...

बरं का सतीशराव, जातीपातींचे जात, पोटजात, उपजात आणि कुठली कुठली जात असे अनेक प्रकार आहेत, त्याचप्रमाणे धर्मही अनेक आहेत. परंतु आपल्या मिसळपाव या संस्थळापुरतं बोलायचं झालं तर इथे येणार्‍यांची फक्त आणि फक्त "मिसळपाव" ही एकच जात आणि "मिसळपाव" हा एकच धर्म आहे/ असावा असाच मिसळपावचा आग्रह आहे! सतीशराव, आपण मागासवर्गीय आहात, की उच्चवर्गीय आहात की आणखी कुठले वर्गीय आहात याच्याशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही!

हां, परंतु जर का आपल्याला मिसळपाव हा पदार्थ आवडत नसेल आणि जर आपलं या पदार्थावर प्रेम नसेल तर मात्र आपल्या येथील सभासदत्वाबद्दल मिसळपावला फेरविचार करावा लागेल! :))
(ह घ्या!)

आपला,
(जातीने मिसळपावप्रेमी आणि धर्माने मिसळपावधर्मी !)
संत तात्याबा महाराज,
संस्थापक - मिसळपावधर्म!

--
मिसळपाव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा! :)

तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे |
तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Feb 2008 - 2:53 am | llपुण्याचे पेशवेll

आपल्या वेदना वाचून दःख झाले.
आपण शहरी भागात राहता का ग्रामीण भागात?
शहरी भागात सध्यातरी जातीयता कमी आहे असे मी मानतो. तरी आपण धीर सोडला नाहीत हे वाचून आनंद वाटला. देव तुम्हाला या ही परीस्थितीतून नक्की बाहेर काढेल.
-आशावादी.
पुण्याचे पेशवे

पिवळा डांबिस's picture

9 Feb 2008 - 3:31 am | पिवळा डांबिस

प्रिय सतीशराव,
सर्वात आधी तुम्ही मनमोकळे लिहील्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!!

जातीयवादाची समस्या उग्र आहे हे तर सत्यच आहे. त्यापायी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना होणारया त्रासाबद्दल अत्यंत खेद होतो.

अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्‍यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे. मला एकमात्र माहीत आहे की जो कोनी चांगले वागतो त्याचे त्याला चांगलेच फळ मीळनार.

तुम्ही म्हणता ते पूर्णपणे खरे आहे. पण तुम्ही जर तुमचा चांगुलपणा सोडून दिलात तर तो तुम्हाला कमी लेखणारयांचा विजय नाही का? तुम्ही तुमचे प्रयत्न चालूच ठेवावे अशी तुम्हाला विनंती आहे. सतत प्रयत्न करणारयाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. "जाको राखे साईंया, मार सके ना कोय!"

आणखी एक, तुम्ही मागासवर्गीय असल्याबद्द्ल मुळीच न्यूनगंड मनात बाळगू नये. माणसाची लायकी त्याच्या जन्मावर अवलंबून नसते. तुकोबांनी म्हटलंच आहे,
"बरे झाले कुणबी केलो, नाहितर दंभेची असतो मेलो"
तुकोबांना तथाकथित उच्चवर्णियांनी काय कमी त्रास दिला? पण आज तीनशे वर्षे झाली, तुकोबा माहित नसलेला मराठी माणूस सापडणार नाही, आणि त्यांना त्रास देणारयांची नांवेही राहिली नाहीत.

बाबा आमट्यांनी म्हटल्याप्रमाणे,
"सत्ता असते महंतांची, नांवे राहतात ती संतांची,
पण महंत फक्त गादी चालवू शकतात, मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत"

तुमचे विचार निर्भीडपणे मांडत रहा.

आपला स्नेहाभिलाषी,
पिवळा डांबिस

धनंजय's picture

9 Feb 2008 - 3:37 am | धनंजय

येथे मनमोकळेपणाने लिहा.

चतुरंग's picture

9 Feb 2008 - 4:15 am | चतुरंग

आपले अनुभव वाचून दु:ख झाले पण आपली आणि आपल्या कुटुंबियांची वेदना खरी आहे.
आपल्या समाजाचा हा रोग आपल्या सर्वांच्या प्रयत्नानेच एक दिवस जाईल.

"मिसळपाव"च्या ह्या कट्टयावर जगातल्या अनेक देशातून लोक मनमोकळ्या गप्पा मारायला इथे येतात.
सगळ्यांची इथली भाषा "मराठी" आणि जात एकच "मिसळपाववाले भारतीय!"

"चांगले वागणे सोडू का? मदत करणे थांबवू का?" असे तुम्ही विचारता आहात - तसे करु नका कारण तीच तुमच्या मनाची शक्ती आहे - पण फसवणार्‍या माणसांशी, तुमची मदत घेऊन तुम्हालाच खेचणार्‍याशी सावधपणेच वागा, नाहीतर तुमचा गैरफायदा घेतला जाईल, असे सांगावेसे वाटते.

तेव्हा असेच या, लिहीत रहा, वाचत रहा. पुन्हा एकदा आपले स्वागत!

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

9 Feb 2008 - 4:32 am | मुक्तसुनीत

नवीन सभासदाचे मनःपूर्वक स्वागत. मनमोकळेपणे लिहा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2008 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतीशराव,
आपले इथे स्वागत आहे, आपले लेखन या संस्थळावर वाचायला आम्हाला आवडेल.
बाकी आपला अनुभव वाचला, वाईटच वाटले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर's picture

10 Feb 2008 - 12:13 am | भडकमकर मास्तर

सतीशराव,
आपले स्वागत...आपले विचार ऐकण्यास उत्सुक...

(मिसळपाव धर्मी) स.भडकमकर

प्राजु's picture

10 Feb 2008 - 1:13 am | प्राजु

बघा बरं.. इथे किती लोक आहेत तुम्हाला आपलं मानणारे..!
तुम्ही हे जातियवाद... सगळं डोक्यातून काढोन टाका. इथे या गप्पाटप्पा करा.. तुमचे विचार मांडा, इतरांचे ऐका.
मिसळीवर ताव मारा..
बाकी सगळं विसरून जा.

- प्राजु

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 8:24 pm | सुधीर कांदळकर

इथे येणार्‍यांची फक्त आणि फक्त "मिसळपाव" ही एकच जात आणि "मिसळपाव" हा एकच धर्म आहे/ असावा असाच मिसळपावचा आग्रह आहे! सतीशराव, आपण मागासवर्गीय आहात, की उच्चवर्गीय आहात की आणखी कुठले वर्गीय आहात याच्याशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही!

असे म्हणणे आहे. एक काम करा. जगातील सगळे धर्म, जाती, उपजाती, पोटजाती एकत्र करा आणि यंदा होळीत जाळा. तेवढा धीर नसेल तर मस्त थंडी पडली आहे. शेकोटी पेटवा व त्यात जाळा. मी ते लहानणीच जाळले.