मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
'........'
------
'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही.
'काय पाहणार हिंदमध्ये?'
तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं.
मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.'
मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.'
मी दरवाजे लावून बसते.
.....
प्रतिक्रिया
13 Apr 2018 - 2:47 pm | एस
सहवेदना पोहोचली. इतका संताप आलाय की आता अशा वांझोट्या संतापाचाही संताप वाटू लागला आहे.
13 Apr 2018 - 2:52 pm | मर्द मराठा
कोर्या बातमी नुसार.. फाशीची शिक्षा होणारेय.. कायद्यात बदल वगैरे वगैरे .. होय शिवाय 'केन्डल मार्च' आहेच.
फाशी देणार म्हणजे.. ज्याने 'तिला' मरणप्राय यातना दिल्या सलग काही दिवस..मग तिच्या कुटुंबाला... त्याला फक्त ५-१० सेकन्दात संपवणार ?
13 Apr 2018 - 9:19 pm | अर्धवटराव
माझं पिल्लू जर अशा परिस्थितीत सापडलं तर... कल्पना देखील करवत नाहि. व्हिक्टीम कुटुंबाला कुठल्या तोंडाने कायद्याच्या गोष्टी सांगणार आपण :( आपले भिकारचोट राजकारणी या परिस्थितीचासुद्धा फायदा करुन घ्यायला बघतील. खरच मेरा भारत महान.
14 Apr 2018 - 11:52 am | सांरा
जेव्हा या अत्याचाराचा बदला म्हणून लहान मुलांना तुरुंगात छळले जाते, कुटुंबांना घर सोडून पळून जावे लागते तेव्हाही मला असाच संताप येतो....
जेव्हा एका बलात्कारी पुरुषालाच तपासाची सूत्रे देण्यात येतात तेव्हाही मला असाच संताप येतो...
आसामात एका महिन्या पूर्वीच एका पाचवीतल्या मुलीवर अत्याचार करून तिला जिवंत जाळण्यात आले होते तेव्हा मला पण असाच संताप आला होता...
जेव्हा लोक मुलींमुलींमध्ये भेदभाव करतात आणि दुसऱ्यांना दांभिक म्हणतात तेव्हाही मला असाच संताप येतो....
14 Apr 2018 - 12:54 pm | गामा पैलवान
शिवकन्या,
वेदना पोहोचली. आयसिसवाल्यांचे हातपाय तोडायला हवेत. बघा ना त्यांचीच अवलाद कशी फोफावलीये अल हिंद मध्ये.
आ.न.,
-गा.पै.
15 Apr 2018 - 12:09 pm | शिव कन्या
हो ना गामा पैलवान. त्यांचे तर आधी तोडायला पाहिजेत. त्यांचेच काय, जगभरात वेगवेगळ्या नावाने पसरलेल्या अशा सगळ्यांच्याच अवलादी नामशेष व्हायला पाहिजेत बघा.
14 Apr 2018 - 5:41 pm | प्राची अश्विनी
भारतात घडताहेत त्या घटना भयंकरच पण अरब राष्ट्रांमध्ये स्त्रिया मुली सुरक्षीत आहेत असं म्हणायचं आहे का?
14 Apr 2018 - 6:08 pm | पैसा
जे झाले ते फार वाईट, पण isis active असलेल्या देशात मुली जास्त सुरक्षित आहेत आणि भारतात मात्र रस्तोरस्ती बायकांवर अत्याचार होत आहेत असा काहीसा अर्थ लेखातून निघतो आहे. त्याशिवाय लेखाचे शीर्षक सुद्धा जरा खटकले. मान्य की समोरच्या मुलीच्या नजरेतून अल हिंद "तुमचा देश" आहे, तरी...
15 Apr 2018 - 12:50 pm | शिव कन्या
माझ्या लेखनात एक चुकले. मी ज्या देशात राहते, त्या ओमानचा उल्लेख केला नाही. हा अरब राष्ट्रातील सर्वात शांतता प्रिय, आणि मध्य आशियातील घडोघडीला युद्ध उकरून काढणाऱ्या देशांमध्ये शांतीदूताची भूमिका बजावणारा देश म्हणून ओळखला जातो. सध्याचे सुल्तान असेपर्यंत तरी हे आहे (हे सुल्तान १९७५ पासून आजपर्यंत कार्यरत आहेत).... पुढचे माहित नाही. बाकी सरसकट सगळ्याच अरब राष्ट्रांना ईसीसच्या रांगेत बसवणे गैर. त्यातून कुणी कसा अर्थ काढायचा याची मोकळीक ज्याला त्याला आहेच.
दुसऱ्याच्या नजरेतून बघताना, कितीही कळले तरी आपल्या देशावरचे प्रेम आपल्याला तसे वळू देत नाही, हे ही समजण्या सारखेच. माझे हेच झाले, आणि अगतिकतेने शेवटी त्या शाळकरी मुलीला सांगितले, 'कुठेही जा, पण माझ्या देशात जाऊ नको.' खाली एका प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे , आत्मताडनात आपला हात धरणारे कुणी नाही. नसावेच. शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो.
15 Apr 2018 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो.
हे ठीक आहे. फक्त असे करताना, "आपण स्वतःच्याच देशाची आणि नागरिकांची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) नाचक्की करू नये", किमान इतका सारासारविवेक बाळगावा ही अपेक्षा अवाजवी नाही.
एखाद्या दुर्दैवी घटनेसाठी सगळ्या देशाला जबाबदार धरून, तो परदेशी प्रवाश्यांसाठी असुरक्षित आहे, अशी अतिशयोक्ती करणे कितीसे बरोबर आहे ?
प्रत्येक प्रवासी/अनिवासी व्यक्ती, प्रवास/वास्तव्य करत असलेल्या देशात, आपापल्या देशाची अनधिकृत (unofficial) प्रतिनिधी असते. तिच्या वागण्या-बोलण्यावरून इतरांच्या मनात तिच्या देशाची भली-बुरी प्रतिमा तयार होत असते. या जबाबदारीची जाणीव असणे ही सुजाण नागरीकत्वाची खूण आहे.
15 Apr 2018 - 6:50 pm | टवाळ कार्टा
+११११११११११११११११११
15 Apr 2018 - 8:38 pm | Nitin Palkar
शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो.
हे ठीक आहे. फक्त असे करताना, "आपण स्वतःच्याच देशाची आणि नागरिकांची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) नाचक्की करू नये", किमान इतका सारासारविवेक बाळगावा ही अपेक्षा अवाजवी नाही.
एखाद्या दुर्दैवी घटनेसाठी सगळ्या देशाला जबाबदार धरून, तो परदेशी प्रवाश्यांसाठी असुरक्षित आहे, अशी अतिशयोक्ती करणे कितीसे बरोबर आहे ?
अनंत वेळा सहमत
15 Apr 2018 - 11:58 pm | पैसा
पण ओमान gender ineqality इंडेक्स मध्ये युनो आकडेवारीत भारताहून वरच्या नंबरला आहे. एकूण लोकसंख्या फक्त ४४ लाख. याहून जास्त लोक मुंबईत राहतात. गुन्ह्यांच्या प्रमाणात तुलना अशक्य आहे.
तुम्ही ओमानला गेलात. तुमच्या बाकी नातेवाईक मित्र मैत्रिणींचे काय? त्यातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या तुमच्या मते या नरकात राहत आहेत. कोणी सुहृद पुरुष असतील त्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार का?
आरोपी पकडले गेलेत. तपास करणारा स्वतः बेघर झालेला हिंदू पंडित आहे. जात धर्म मध्ये कोण आणतोय? गुन्हेगारांना शिक्षा होईल. एवढी वाट तर न्यायपालिकेवर विश्वास ठेवून बघितली पाहिजे. आपल्या देशात कसाबला सुद्धा बचावाची संधी पुरेपूर दिली गेली होती.
16 Apr 2018 - 6:04 pm | तेजस आठवले
+1
19 Apr 2018 - 4:51 pm | prasanna_kop
शिव कन्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे ओमान शांती प्रिय आहे हे ठीक तसेच शांतिदूतांची भूमिका साकारणारा देश आहे तेही योग्य आहे पण ओमान मध्येही मुली आणि विशेषतः स्थानिक सोडून इतर देशीय स्त्रिया सुरक्षित नाहीत. तेथे हुकूमशाही असल्यामुळे असले झालेले प्रकार वार्तापात्रात चर्चिले जात नाहीत. सलालाह च्या नर्सची हत्या व बलात्कार विसरलात का? तिच्या हत्येवरून तिच्या नवऱ्यालाच ६ महिने कैदेत ठेवले होते शेवटी सुषमा स्वराज ना मध्यस्थी करून त्याला सोडवावे लागले. घाला मधील फिलिपिनो हत्या व बलात्कारासाठी तिच्या मित्रालाच अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला. मुक्त विचारांच्या फिलिपिनो स्त्री पुरुषांना बलात्कार करायची गरज नसते, सर्वाना माहित आहे कि हे गुन्हे स्थानिकांनी केले होते पण देशाचे नाव खराब होते म्हणून भारतीय/बांगलादेशी/पाकिस्तानी इत्यादींवर हे गुन्हे टाकले जातात दगडाने चेचणे हात पाय छाटणे तर दूरच राहिले तुम्ही तुमच्या ओमानी मैत्रिणीला एक गोष्ट जरूर विचारा कि ओमानमध्ये असली शिक्षा किती वर्षांपूर्वी दिली होती. तुम्ही कधी ओमान मध्ये ऑरेंज टॅक्सीने ड्राइवर च्या बाजूला बसून प्रवास केला आहे का? अशावेळी ९०% टॅक्सीवाले स्त्रीवर हात फिरवतातच यामध्ये त्यांना स्वतःच्या (८० +) किंवा स्त्री व मुलगी हिच्या वयाचहि (५ ते ६०) बंधन नसते कधी कधी तर जाणून बुजून आडबाजूला घेऊन जातात अशा वेळी कित्येक भगिनींनी चालत्या गाडीतून उडया घेतल्या आहेत. कधीतरी रुवी मध्ये शुक्रवारी फिरणाऱ्या घरकाम करणाऱ्या स्त्रियांची कैफियत ऐका म्हणजे येथे या बायकांवर त्यांचे स्थानिक मालक कोणत्या थराचे अत्याचार करतात ते समजेल बिचार्या भारतातील कुटुंब सांभाळायचे असते म्हणून मुकाट्याने सहन करत असतात. अशा दुधाने न्हालेल्या देशात (येथे मला ओमानची बदनामी करायची नाही आहे) स्वतःच्या सवंग प्रसिद्धी साठी तुम्ही आपल्या देशाची बदनामी करत फिरत आहात . मान्य आहे कि आसिफावर झालेला अत्याचार घृणास्पद व निंदनीय आहे व कायदा तिला योग्य न्याय मिळवून देईल व अपराध्याला कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजे. पण त्याच्यासाठी माझ्या देशाचे नाव बदनाम करत फिरणे मलातरी योग्य वाटत नाही.
19 Apr 2018 - 5:06 pm | arunjoshi123
+११
===============
ही सर्व मंडळी शुद्ध कांगावेखोर आहे. भारतात दरवर्षी अमानुष बलात्कारांच्या घटना शेकडोंनी होतात, यांना नेमकी स्वतःची परंपरा, संस्कृती, देव, धर्म आणि देश बदनाम करायला पुरेशी संधी असते त्यावेळीच जाग येते. आणि इतके भावनात्मक लोक होतात कि .... बस्स..... समस्येबद्दल बोलायचंच नाही.
15 Apr 2018 - 12:32 pm | शिव कन्या
जरा उलटा प्रवास .... मी जेव्हा इकडे (ओमान) यायचे ठरवत होते, तेव्हा 'अय्या, नको बाई तिकडे जाऊ, फार बंधने बायकांवर !' असे भारताची हद्द कधीच न ओलांडलेली मंडळी सांगत होती. तर आधीच या देशात राहणारे, नेट वरून जोडलेली मंडळी सांगत होती, 'या, काहीच problem नाही. सौदीसारखी बंधने नाहीत. ओमान लिबरल आहे.' मला ठरवता येत नव्हते बरेच दिवस. पण शेवटी विचार केला, 'नाही पटले तर निघून येऊ.' आले , राहिले , अजून रहात आहे. होय, मला, माझ्या कुटुंबाला सुरक्षित वाटते. कारण कायद्याचा बडगा. एकूण सुरक्षेची आकडेवारी मला मिळाली तर इथे नक्कीच टाकेन. म्हणजे तुलनेला बरे जाईल. भारतच काय पण जगातल्या कोणत्याही देशातली मुलींच्या सुरक्षितेतची टक्केवारी वाढती रहावी यासाठी त्या त्या देशातील महिला संघटना, सरकारे कायकाय करतात, ते पाहणेही या निमित्ताने मोलाचे ठरेल.
पण शेवटी, आपल्या घरात जळत असेल, तर जास्त दुखते, प्राची.
15 Apr 2018 - 11:23 pm | प्राची अश्विनी
हे आधीचे संदर्भ लेखात स्पष्ट होत नसल्याने सद्ध्याच्या घटनेशी तुलना होते. असो.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे freedom of expression. रेप किंवा स्त्रियांवरील अत्याचारांच्या किती घटना गुन्हा म्हणून नोंदवल्या जातात आणि किती प्रत्यक्ष घडतात यात प्रचंड तफावत असू शकते. ज्या देशात धर्माधिष्ठित सत्ता आहे. आणि मिडीयाला freedom of expression नाही तिथे हे गुन्हे बाहेर येतील का याबाबत शंकाच आहे. त्यामुळे अशा अमानुष घटना घडूनही भारत आणि इतर अरब देश यामध्ये स्त्रियांची सुरक्षितता incomparable आहे.
16 Apr 2018 - 6:05 pm | तेजस आठवले
सहमत.
14 Apr 2018 - 8:01 pm | तेजस आठवले
लेख पटला नाही. घडलेली घटना वाईट आहे पण त्यासंबंधित ह्या लेखातले चित्रण एकांगी आहे.तुम्ही कळत नकळत काळे/पांढरे अशी विभागणी करून टाकली आहे असं वाटतंय.दुसऱ्या कुठल्याही देशात जा म्हणताय तर असं एखादा देश सांगू शकाल का की जिथे सगळे काही आलबेल आहे ?बरं हे सगळं एका अश्या देशातल्या मुलीला तुम्हाला सांगावसं वाटतंय की ज्या देशाच्या अधिकृत धर्मात एक स्त्री म्हणून तिचं स्थान नगण्य आहे ?नात्यातल्या पुरुषाला बरोबर घेतल्याशिवाय तिला घराबाहेरही पडता येत नाही का तिला कसलेही अधिकार नाहीत. बलात्कारासारख्या गुन्ह्यात साक्ष देताना तिची एकटीची साक्ष पुरी ठरू शकत नाही?
माझा हा प्रतिसाद सरसकटीकरण करणारा वाटत असला तर तुमच्या ह्या लेखात पण असेच सरसकटीकरण होते आहे असे वाटते.
14 Apr 2018 - 9:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
"एखाद्या एकेरी मुद्द्याचा पर्वत बनवून स्वताडन करणे" या प्रकारात भारतियांचा हात धरणारा दुसरा जनसमुदाय जगभरात सापडणे कठीण आहे. (कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी) :(
14 Apr 2018 - 10:27 pm | नाखु
इथं सगळं आलबेल आणि सुसंस्कृत आहे असं भाबडा आशावाद व्यक्त करणं जितकं बिनडोक आणि शहामृगावस्था आहे, तितकं किंबहुना काकणभर अधिकच सगळं नासल्यात जमा करणे आणि अतिरंजित प्रकटीकरण करणे आहे
वास्तव या दोन्हींच्या मध्ये अगदी अंग चोरुन उभं राहिलं आहे,ते ना कुणाला दिसत नाही का दखलपात्र नाही हेच कळेना.
अदखलपात्र नाखु खिजगणतीतही नसलेला
15 Apr 2018 - 1:01 pm | शिव कन्या
जे मधलं चांगलं वास्तव आहे, ते तरी कुठं समोर येतं?
भाबड्या आशावादातून बाहेर येईना आणि शहामृग अवस्थेतून कोण डोकं वर काढेना, ही गत अशा प्रसंगी आणखी बळजोर होते.
16 Apr 2018 - 9:21 am | नाखु
प्रत्यक्ष आरोपी असलेल्या व्यक्तीच्या मुलीची प्रतिक्रिया आजच्या लोकसत्ता वृत्तपत्रात छापून आली आहे.ती वाचली तर कदाचित या प्रकरणी आणखी काही बाजू असेलही असे वाटते
आरोपी कोणीही , कुठल्याही धर्माचे, पक्षाचे असो तरी कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि तीही जलदगतीने निकाली निघाली पाहिजे हीच मनापासून इच्छा.
नाखु पांढरपेशा
16 Apr 2018 - 6:09 pm | तेजस आठवले
मधलं चांगलं वास्तव हे बारा पानी वर्तमानपत्रात आठव्या-नवव्या पानावर कोपऱ्यात अंग चोरून उभं असतं.
15 Apr 2018 - 7:05 am | ट्रेड मार्क
डॉक्टर म्हात्रे वर म्हणालेत तसं स्वताडन करण्यात भारतीयांचा हात धरणारे दुसरे कोणी नाही. घडलेली घटना नक्कीच दुर्दैवी आणि संतापजनक आहे. पण लगेच हिंदू असल्याची लाज वाटते, भारत स्त्रियांसाठी कसा असुरक्षित आहे याची चर्चा जोरात होते. तरी अजून गुन्हा सिद्ध व्हायचाय. पण नेहमीप्रमाणे आरोपी मुस्लिम असले की गुन्हा सिद्ध झाला तरी त्यात धर्म आणला जात नाही. पण हिंदू आरोपी असले की मात्र संपूर्ण हिंदू धर्मच दोषी असतो.
जगातले कुठले देश स्त्रियांसाठी सुरक्षित आहेत? स्त्रियांना अगदी नखशिखांत झाकून ठेवणाऱ्या देशांमध्ये स्त्रिया अगदी सुरक्षित आहेत का? इंग्लंड सारख्या देशात झालेले Rotherham Scandal आणि Rochdale Grooming Scandal हे माहित आहेत का? स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या दोन आणि इतरही काउंटीमधल्या वय वर्षे ८ ते ५० मधील एकही स्त्री अशी नव्हती की जिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नव्हता.
अमेरिकेत ओप्रा विन्फ्रे, मॅडोना सारख्या प्रथितयश स्त्रियांनी जाहीरपणे त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांविषयी सांगितलंय. सामान्य स्त्रियांची परिस्थिती काय असेल बघा. जगात कुठेही कुठल्याही वयाच्या मुली/ स्त्रियांवर सतत अत्याचार होत असतात, पण त्याला इतर कुठल्याही देशात धार्मिक किंवा देशाशी संबंधित रंग दिला जात नाही. पण जर वर दिलेल्या बातम्या नीट वाचल्यात तर त्यात अत्याचार करणारे पाकिस्तानी/ बांग्लादेशी आहेत. पण बातमीत मात्र एशियन म्हणलं गेलंय. आता समस्त भारतीय हिंदू पण एशियन आहेत, मग म्हणजे त्यांचा पण सहभाग गृहीत धरला गेलाय का? या बाबतीत पाकिस्तानी मुस्लिम असं का नीट म्हणलं गेलं नाही? या घटनेबद्दल भारतातील किंवा इतर देशातील मुस्लिमांनी काही बोलल्याचं सुद्धा आठवत नाही.
जर्मनी सारख्या स्त्रियांसाठी अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देशात सुद्धा घडलेली ही घटना बघा. अगदी अँजेला मर्केलनी सुद्धा या घटनेबाबत पुरोगामी पवित्र घेतला.
हे आणि हे वाचा. यात उल्लेखलेल्या इतर घटना गेल्या २-३ महिन्यातल्याच आहेत आणि तितक्याच घृणास्पद आहेत. मग फक्त मुस्लिम मुलीवर हिंदू पुरुषांनी केलेल्या अत्याचाराची घटना का सगळीकडे एवढी पुढे आणली जातेय? फक्त काश्मीर मध्ये घडलेल्या घटनेची या पुरोगाम्यांना आणि कलाकारांना लाज वाटते? जिथे हिंदू मुलगी आणि मुस्लिम बलात्कारी आहेत तिथे एकाही मुस्लिम कलाकाराने किंवा विचारवंताने मुस्लिम असल्याची लाज वाटते म्हणलं नाही. किंवा हिंदूंना नावं ठेवणाऱ्या एकही हिंदू पुरोगाम्याने मुस्लिम धर्मावर निशाणा साधला नाही.
आहे काही स्पष्टीकरण?
15 Apr 2018 - 12:57 pm | शिव कन्या
आपण विपुल माहिती पुरवलीत. धन्यवाद. माझ्या स्वतः च्या लेखात मी कुठेही हिंदू असल्याची लाज म्हटलेले नाही, वा अमुक एक आहे, त्याचा अभिमान आहे असे म्हटलेलं नाही..... पण स्वतः च्या घरात जळत असले कि कुणाचे जळते, यापेक्षा घरचे जळते, हे जास्त सलते बघा साहेब. आणि, बाई म्हणून जास्त दुखते. म्हणून इरीशिरीत सांगते, जा बाई कुठेही, पण जाऊ नको माझ्या देशात. बाकी चर्चा, वाद चालू द्या.....
16 Apr 2018 - 5:01 am | ट्रेड मार्क
तुम्ही म्हणताय ओमान तुम्हाला सगळ्यात सुरक्षित देश वाटतोय. ४४ लाख लोकसंख्या असणाऱ्या देशाची तुलना तुम्ही १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाबरोबर करताय. ओमान मध्ये गुन्हे होत नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? गूगल सर्च केलात तरी कळेल. त्यातूनही किती घटना रिपोर्ट होतात आणि किती बाहेर येतात ही अजूनच वेगळी गोष्ट आहे.
या रिपोर्ट मधील ओमान मधलेच स्त्रियांचे हक्क बघा. ओमान मध्ये तर घरगुती हिंसा आणि मॅरिटल रेप साठी काही कायदा सुद्धा नाहीये. याच रिपोर्ट मध्ये ओमान मधील १४०००० स्थलांतरित घरगुती काम करणाऱ्या (मुख्यतः स्त्रिया) या अत्याचाराच्या बळी आहेत, ज्यात लैंगिक अत्याचार सुद्धा आला. इथे वाचा. मग आता ओमान सुद्धा असुरक्षित मानायचा का?
एखाद्या अर्धवट वयाच्या मुलीला तुम्ही ज्या देशात जन्माला, वाढलात त्याच देशाबद्दल इतकी निगेटिव्ह इन्फॉर्मेशन देताय. घटना घृणास्पद आहे हे मान्यच आहे, पण म्हणून संपूर्ण देश इतका वाईट आहे का? पुढचा प्रश्न विचारायला सुद्धा मला अप्रशस्त वाटतंय, पण मुद्दा सिद्ध करण्यासाठी नाईलाजाने विचारायला लागतोय, त्याबद्दल आधीच माफी मागतो. तुमच्या ओळखीच्या भारतात राहणाऱ्या सगळ्या स्त्रियानी असा कुठला अत्याचार प्रत्यक्ष अनुभवलाय का?
आता तुम्ही या एका घटनेवरून भारत असुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढलात. तर तोच तर्क पुढे वाढवून मी म्हणतो की भारतात स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये मुस्लिम पुढे आहेत. सन २०१८ मध्ये आत्तापर्यंत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या ६-७ घटना बघितल्या तर किमान ५ घटनांमध्ये मुस्लिम आरोपी आहेत. तसेच जगभरात झालेल्या बहुतांशी अतिरेकी कारवाया मुस्लिमांनीच केलेल्या आहेत.
मग ओमान मध्ये हे उघडपणे तुम्ही तिथल्या लोकांना सांगू शकता का? या मुलीच्या पालकांना तुम्ही सांगितलं का की सन २०१८ मध्ये आत्तापर्यंत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या बहुतांश घटनांमध्ये मुस्लिम आरोपी आहेत. भारत असुरक्षित झालाय कारण मुस्लिमांची संख्या वाढते आहे?
असो, आता तुम्ही भारत असुरक्षित असल्याचा निर्णय देऊनच टाकलाय तर तुमचे मत बदलणे अवघड दिसते आहे.
15 Apr 2018 - 11:55 am | Topi
As a Hindu I'm scared of Muslim in India. I'm sad my Religion Hinduism is declining and other religion are growing. I'm sad that people can nowadays can mock Hinduism and get away with that. Yes you heard it right this is thought of Most of Hindus nowadays. In name of Secularism Hinduism will die soon. Islam is taking over watch and see. All the Muslim actors are marrying Hindu girls that is nothing more than a love jihad.
Islam is taking over India making me sad. Nobody can speak against Islam in India. So many rape happened against Hindu girls but no Bollywood and Tv serial actors can hold a sheet of paper or do Candle march. It's sad whatever happened to Asifa i condemned it. I'm worry about my children who will suffer in future because of this so called politician who are mocking Hinduism. Islam is taking over India sooner you realize would be better.
Not only Islam I'm scared of every religion because every other religion is growing but Hinduism not.
A Muslim guy us mocking Hinduism by this Post. But no one can do anything.
Actors like SRK, Salman, Aamir can't attend Event when Netanyahu came. Reason Religion is more important.
There is page called Humans of Hinduism in FB where so many jokes are made even my hindu friends are liking and laughing. I reported that page guess what my appeal rejected. I see many Anti Islam page are getting banned.
15 Apr 2018 - 12:13 pm | उगा काहितरीच
बलात्काराच्या केसमधे पिडीत व्यक्ती किंवा कुटुंबातील व्यक्तींची ओळख उघड करीत असतात का ? यासंबंधी काही लिखीत वा स्विकृत नियम आहेत का ?
15 Apr 2018 - 12:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
Section 228 A of the Indian Penal Code lays down the provisions barring the disclosure of identity of the victim of certain offences.
It say that:
“Whoever prints or publishes the name or any matter which may make known the identity of any person against whom an offence under section 376 (rape), section 376A (rape leading to death or making victim go into a permanent vegetative state), section 376B (sexual intercourse by husband upon his wife during separation) , section 376C (sexual intercourse by person in authority) or section 376D (gang rape) is alleged or found to have been committed (hereafter in this section referred to as the victim) shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years and shall also be liable to fine.”
The only circumstances under which the identity can be revealed is either
(a) by or under the order in writing of the officer-in-charge of the police station or the police officer making the investigation into such offence acting in good faith for the purposes of such investigation; or
(b) by, or with the authorisation in writing of, the victim; or
(c) where the victim is dead or minor or of unsound mind, by, or with the authorisation in writing of, the next of kin of the victim.
In the case of the third exception it is further stated that it only applies “provided that no such authorisation shall be given by the next of kin to anybody other than the chairman or the secretary, by whatever name called, of any recognised welfare institution or organization”.
Even in the case of printing or publishing “any matter in relation to any proceeding before a court” in these offences, without the previous permission of the court, punishment can mean imprisonment of up to two years along and a fine.
As these sections clearly lay out, it is wiser not to report the name of a rape victim or a victim of any kind of sexual assault under any circumstances.
दुवा : https://thewire.in/law/identity-of-rape-victims
15 Apr 2018 - 1:12 pm | उगा काहितरीच
धन्यवाद म्हात्रेसाहेब.
15 Apr 2018 - 6:07 pm | माहितगार
ईतर इस्लामिक देशांपेक्षा अल्पसंख्य धर्मीयांशी चांगली वागणूक ठेवणारा देश म्हणून ओमान कौतुकास पात्र आहेच. प्रोटेस्टन्ट जसे इतरांशी वागताना जसे अधिक सौजन्यपूर्ण असतात पण तत्वज्ञानानी कदाचित कॅथॉलिकांपेक्षा कट्टर असत (चुभूदेघे प्रोटेस्टन्ट तत्वज्ञानाबद्दल हे माझे व्यक्तीगत इम्प्रेशन आहे) तसेच काहीसे ओमानीन्चे असावे . त्यांच्या स्वतःच्या नागरीक मुस्लीम लोकांसाठी ते कट्टरच असावेत. (एकदा कट्टरतेची सवय झाली की कट्टरता वाटत नाही)
पण लेखिकेने लेख टाकण्या आधी गूगलवर पुरेसा अभ्याकरुन लेख टाकला की बातम्यांच्या प्रभावात भावनेने ?
लेखिका नेमकी कसली फेकुगिरी करत आहेत ? ओमान मध्ये 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' ह्या जावई शोधाचा नेमका संदर्भ कोणता ? गूगलल्यावर मला दिसणारी माहिती ओमान मध्ये ओमान पिनल कोड आहे, कोर्ट आहे आणि बलात्काराच्या गुन्ह्यास अधिकतम शिक्षा १५ वर्षान्ची जेल आहे. तुर्तास तरी भारतात अधिक शिक्षेची तरतूद असावी.
इंग्रजी विकिपीडियातील Human rights in Oman लेखातून
खालील बातम्यांच्या लिन्का आपल्या अभ्यासासाठी
* Oman crime: Filipina expat body found, rape and murder suspected
* Rape in Oman
* Omani national arrested for raping expat woman
* RAPE IN OMAN: Men Pretend to be ROP and Kidnap a Woman for the Purposes of Rape
* Outrage erupts in Oman after judge gives child rapist minimum sentence
* Oman police arrest 20 expat women for wearing 'inappropriate' clothes
* Ugandan women recount ordeal in Oman. भारतीय हैदराबादेत दुसरी पत्नी ठेऊन ओमानी शेखाने फोनवर ट्रिपल तलाक दिल्याचे उदाहरनाची बातमी मागे होती जरा अधिक गूगलल्यास मिळून जाईल .
*
15 Apr 2018 - 11:29 pm | nanaba
I am a Hindu. I love my religion. But a 8 Ur old gets gang raped. Is tortured.. killed.. and people talk abt religion?
This is beyond me!
She is 8 Ur old defense less child bloody hell.
Stop defending what has happened.what happens in Oman or other countries doesn't make it better in India.
Any lady & parents of any kids that step out of home have constant fear in their mind. Isn't that bad enough? What will make u say - it's not that bad?
Just because this lady is staying abroad?
I live here, in india & I feel ashamed that every single person doesn't condemn this, but brings religion in picture instead.
16 Apr 2018 - 12:10 am | माहितगार
अहो मॅकॉले पूत्र आम्ही म्राठीतन लिवा विन्ग्रजीतन लिवून आपण शाने हो नाई, असल्ये पाष्कळ इचार आपल्या पाशीच ठिवा . वाईट गोष्टीला कोणी बी डिफेंड केल नाय . धागा लेखिकेनेच धर्माचे नाव न घेता फसवा धार्मीक आधार घेतल्याचे संदर्भा सहित सिद्ध केले हाय.
आमचा देश इतरांपेक्षा लाखपटीने चांगला हाय हे आकडेवारीने बी सिद्ध व्हतय .
16 Apr 2018 - 12:39 am | डॉ सुहास म्हात्रे
छ्या, छ्या ! विंग्लिशम्द्ये लिवलं म्हंजे कसं एकदम इम्प्रेशिव वाट्टं नाय का ? विंग्लिशम्दी आणि वर उद्धट भाषेत काहीही दामटून सांगितले व त्यात आस्तित्वात नसलेले आरोप बेमालूमपणे मिसळले (दुसर्या कोणी असे केले की त्याला, गोल पोस्ट बदलणे, असे म्हटले जाते, ती गोष्ट वेगळी) की मग एकदम भारी वैश्विक सत्य सांगण्याचा आव आणता येतो ! ;) :)
16 Apr 2018 - 10:44 am | nanaba
अहो, असे वैयक्तिक होण्या पूर्वी इतर शक्य तांचा विचार केलात का? ब्राऊजर इश्युज वगैरे ऐकलेत का?
वर २-३ इन्ग्रंजी प्रतिसाद आहेत, त्यां च्या अंगावर तुटून पडलात का?
असो,वि षयांतर नको.
तुम्ही स्त्री आहात का? तुम्हाला लहान मुले आहेत का?
घरातील स्त्री शी बोलून बघा. जाऊन निवांत टेकडीवर एकटं बसलीये, नदीकिनारी बसलीये, हे करण्याची हिम्मत आज त्या करू शकतात का? किती बेसिक गोष्ट आहे ही!
ओमान मधे काय घडतय ह्याच्या शी मला काय घेणं देणं आहे?
माझ्या देशात मला सुरक्षित वाटत नाही हे सत्य पुरेसं त्रासदायक आहे.
रोजच्या बेसिस वर.
ह्यात धर्म, देश हे मुद्दे ये ऊच शकत नाहीत.
एका प्रति कारासाठी सक्षम नसलेल्या जीवाब रोबर असे ८ -८ जण एकत्र ये ऊन वागतात तेव्हा लाज, वाझोंटा संताप, ते आपण /आपल्या घ रातलं नसावं म्हणून प्रार्थ ना, सततची काळजी, खबरदारी - हे किती भया नक आहे, हे एखाद्याला का कळू नये?
मिपा सोडा, बाहेर तरी धार्मिक समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरली आहेत ना? हे तरी पुरेसं लाजीरवाणं वाटतं का नाही?
अशांना (ब लात्कारी) खरोखरच दगडाने ठेचून मारावे , ती ही शिक्षा कमीच होईल असे वाटते.
16 Apr 2018 - 11:18 am | अंतरा आनंद
+१
16 Apr 2018 - 12:30 am | डॉ सुहास म्हात्रे
I live here, in india & I feel ashamed that every single person doesn't condemn this, but brings religion in picture instead.
तुमची गल्ली पार चुकली आहे (पक्षी: मुद्दा ध्यानात आलेला नाही) हे खेदाने सांगत आहे.
बालकांवर अत्याचार आणि तेही लैंगीक अत्याचार असलेल्या निर्घृण गुन्ह्याचे समर्थन होऊच शकत नाही, याबद्दल इथेतरी कोणाचेच दुमत होण्याचे कारण नाही. अश्या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कायद्यांत अनुकरणीय (exemplary) शिक्षेची तरतूद करावी असे मला स्वतःला वाटते. याशिवाय, धर्म हा मुद्दा तर इथे तरी, एखादा चुकार प्रतिसाद सोडता, तुम्हीच इतक्या टोकाच्या स्वरूपात अध्याहृत धरून घुसवलेला आहे !
तुमच्या ध्यानात आले नसले तर... मुख्य मुद्दा असा आहे की, "एखादा गुन्हा घडला म्हणून सगळ्या देशाला वेठीस धरण्याचा आणि सरसकट सगळ्या परदेशी नागरिकांसाठी देश असुरक्षित आहे, असे म्हणणे चूक आहे." कारण तसे करणे, देशाची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) बदनामी होईल इतपत अतिशयोक्ती करणे होते. जणू काय, त्या मुलीने "ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असलं" तरी तिला भारतात निर्घृण गुन्ह्यांशिवाय इतर काहीच बघायला मिळणार नाही, अशी लेखिकेची खात्री झालेली आहे !
अश्या एखाद्या दुर्दैवी घटनेच्या पायावर परदेशप्रवासाचे निर्णय केले तर सर्व जगभरचे आंतरराष्ट्रीय दळणवळण बंद करावे लागेल, नाही का ?!
तसेही, "काहीही कारण असो वा नसो, आपल्या देशाबद्दल अपमानास्पद लिहिणे-बोलणे हा भारतीय घटनेने दिलेला अधिकार आहे" असे म्हणणारे बरेच उदारमतवादी लोक भारतात आहेतच, तर मग परदेशात राहून असे केले तर काय बिघडले !" :(
==================
अवांतर :
मी स्वतः ओमानमध्ये १४ वर्षे वास्तव्य केलेले आहे. तेथिल जमिनी वस्तूस्थितीबद्दल मला चांगली माहिती आहे. सर्व स्तरांच्या ओमानी नागरिकांबरोबर माझे व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर सौहार्दाचे संबंध होते/आहेत. सर्वसाधारण ओमानी माणसाला भारताबद्दल आणि भारतिय माणसाबद्दल ममत्व व आदर आहे... आणि त्यांचे ते मत ओमानमध्ये काम करणार्या भारतिय नागरिकांशी आलेल्या संबंधातून आणि त्यांच्या भारतभेटींच्या अनुभवातून बनलेले आहे. तसेही भारत देशाशी ओमानचे व्यापारी संबंध आजचे नसून, शेकडो वर्षांचे आहेत... ब्रिटिश भारतात येण्याच्या बर्याच अगोदरपासूनचे. किंबहुना, ओमानमध्ये खनिज तेलाचा शोध लागण्याअगोदर भारतात येऊन काम करणारे अनेक ओमानी लोक (किंवा त्याचे पालक) मला तेथे भेटले आहेत.
त्यामुळे, जेव्हा लेखिकेने "एक आडनीड्या वयातली शाळकरी पोरीला" भारताबद्दल प्रतिकुल मत सांगितले तेव्हा, इतर कोणापेक्षा, तिला आणि तिच्या पालकांना जास्त आश्चर्य वाटले असेल, असे मला वाटते. तरीही, 'कुर्हाडीचा दांडा...' बनणे टाळणे तर बरे होईल, असेच वाटते.
16 Apr 2018 - 10:46 am | nanaba
सरसकट सगळ्या परदेशी नागरिकांसाठी देश असुरक्षित आहे, >> अहो परदेशी सोडा हो. देशी बायकांसाठी तरी सरसकट सेफ आहे का?
पब्लिक ट्रांसपोर्ट ने प्रवास केलेल्या कुठल्याही बाईला विचारा!
16 Apr 2018 - 12:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
परत गल्ली चुकली !
देशी बायकांसाठी तरी सरसकट सेफ आहे का? पब्लिक ट्रांसपोर्ट ने प्रवास केलेल्या कुठल्याही बाईला विचारा!
१, पर्यटनासाठी भारतात आलेले किती परदेशी लोक पब्लिक ट्रांसपोर्टने प्रवास करतात ?
२. पब्लिक ट्रांसपोर्टमधल्या समस्येचा उपाय काय ? इथे देशात असे प्रसंग होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायचे, की त्याचे सरसकटीकरण करून आपला देश अत्यंत धोकादायक आहे अशी परदेशात जाहिरात करायची ? "आग रामेश्वरी सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी" असा प्रकार नाही काय हा ?!
विकृत लोक ही काही केवळ भारताची खासियत नाही. अश्या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वच सुजाण लोकांच्या मनात चीड आहे, परंतू, त्यामुळे सर्व देशाची (आणि पर्यायाने सर्व भारतियांची ज्यात लेखिका, तुम्ही व आम्ही सर्वच गणले जातो) प्रतिमा मलिन करण्याने काय साधणार आहे ??? तसे करणे समतोल विचार/कृती करणे होईल का ?
भारताची परदेशात नाचक्की करून परिस्थिती सुधारणार आहे की मुळ समस्या तशीच राहील आणि त्यावर अजून भारताची प्रतिमा खराब झाल्यामुळे अनेक नवीन समस्या निर्माण होतील ? किंबहुना, अशी नाचक्की करणार्या भारतियांकडे परदेशी लोकांनी संशयाने/तिरस्काराने/चेष्टेने पहायला सुरुवात केली तर ते त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे असेल... पण अश्या कृतीमुळे इतर भारतियांना झळ पोचली तर त्याची जबाबदारीही नि:संशय नाचक्की करणार्यांवरच असेल.
विशेषतः, संस्कारक्षम वयाच्या परदेशी नागरिक मुलीसमोर आपल्या देशाची प्रतिमा खराब करण्याच्या कृतीत कितीसा समतोलपणा आहे ?
अशी अस्थायी आणि अप्रमाणबध्द (out of proportion) स्वताडन कृती करून वर तिची प्रसिद्धी करणे व तिचे समर्थन करत राहणे, यामुळे अश्या कृतीमागच्या कारणपरंपरेबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले तर आश्चर्य वाटू नये !
16 Apr 2018 - 12:18 pm | पुंबा
इथे धर्माचा इश्यु मध्ये आणला गेला नाही हे खरे आहे. परंतू, जर बातम्या नीट वाचल्या तर या घृणास्पद गुन्ह्याचं समर्थन करणारे कुठल्या आधारे करताहेत हे लगेच कळून येईल. गेले अनेक दिवस हिंदू एकता मंच नावाची संघटना गुन्हा दडपून टाकण्याचा, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा जो प्रयत्न करते आहे, सत्ताधारी भाजपचे लोक ज्या घाणेरड्या प्रकारे पिडितेवर जरासुद्धा सहानुभुती न दाखवता गुन्हेगारांना अटक न करावी यासाठी प्रयत्न करताहेत त्याचा निषेध इथे करायचा नाही? ८ वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर इतक्या अमानुष पद्धतीने बलात्कार करणार्या नराधमाचे समर्थन धर्माच्या आधारे केलं जात असेल तर त्याची प्रतिक्रिया उमटणार नाही का? आज चक्क तिला न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढणार्यांना पाकिस्तानी म्हटले जात आहे पेड ट्रोलांकडून हे सगळं खरंच इतकं लाईटली घेण्यासारखं वाटतं तुम्हाला?
माझ्या मते नानबांच्या म्हणण्यावर इतकी टोकाची प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे..
16 Apr 2018 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
बाकी मुद्द्यांबद्दल मतभेत नाहीतच. पण...
मात्र, "परदेशात भारताची नाचक्की करणे हा त्यावरचा दुरान्वयानेही उपाय होऊ शकत नाही" हे माझे म्हणणे आहे.
त्यापुढे जाऊन, अशी नाचक्की एका संस्कारक्षम वयाच्या परदेशी मुलीपुढे करणे म्हणजे,... असो.
17 Apr 2018 - 7:38 am | nanaba
मी एक स्त्री आहे. हे होताना दिसत तेव्हा आतून काय वाटत ते कदाचित पुरुषान्ना त्या प्रमाणात कळत नसाव अस वरच्या रिअॅक्शन्स वरून वाट ले.
उद्वी ग्न. I read this need first when I read this article (limited tv, news paper).
Felt so devastated,couldn't sleep!
Irrespective of what they do in Oman, irrespective of any details about involved , this is terrible.
Can't express what I feel.
16 Apr 2018 - 12:20 am | पिलीयन रायडर
मला कोणत्याही आकडेवारी मध्ये आणि राजकारणात पडायचं नाही, पण आपला देश बायकांसाठी फार बेक्कार होत चालला आहे हे माझंही मत आहे. प्रश्न स्वातंत्र्य वगैरे नसून एकंदरीत बायकांना बघण्याची, वागवण्याची पद्धत गचाळ आहे. फेसबुक वगैरे वर कित्येकदा कुणी पुरुषाने काही केलं की ट्रॉल्स असतील भले, पण ह्याच्या घरातल्या बायकांचा रेप केला पाहिजे असं लोक खुले आम लिहितात. गर्दीच्या जागी काय प्रकार होतात हे वेगळं लिहायला नको. कपडे हा तर भलता सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. फॉरेनर येतात त्या बायकांच्या मागे कसे लागतात ह्या बातम्या आता दुर्मिळ नाहीत. रात्री बेरात्री निर्धास्त फिरण्याची सोय नाही. कुठं एकटं असण्याची सोय नाही.
रेप हा फिजकली दिसतो, पण रोजच्या आयुष्यात जे घडतं ते सांगताही येत नाही. त्यामुळे बाकीचे देश काही का करत असेनात, भारत बायकांसाठी अवघड देश आहे हे मला मान्य आहे. आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे.
16 Apr 2018 - 6:33 am | अंतरा आनंद
योग्य प्रतिसाद.
16 Apr 2018 - 12:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
अशी मानसिकता ही भारतात एक मोठी समस्या आहे यात वाद नाहीच. त्यासाठी भारतातच काही कडक उपाय करणे योग्य असेल.
मात्र, "परदेशात भारताची नाचक्की करणे हा त्यावरचा दुरान्वयानेही उपाय होऊ शकत नाही" हे माझे म्हणणे आहे.
त्यापुढे जाऊन, अशी नाचक्की एका संस्कारक्षम वयाच्या परदेशी मुलीपुढे करणे म्हणजे,... असो.
16 Apr 2018 - 12:31 pm | विशुमित
<<त्यापुढे जाऊन, अशी नाचक्की एका संस्कारक्षम वयाच्या परदेशी मुलीपुढे करणे म्हणजे,... असो.>>
==>> म्हात्रे साहेब, परदेशात जाऊन संस्कारक्षम पब्लिक समोर देशाची नाच्चकी करण्यात "एक" व्यक्ती अव्वल स्थानी आहे. उगाच एक आठवण आली. असो..
16 Apr 2018 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
गाडी नको नको म्हणता राजकारणावर आलीच ना शेवटी ?! (कपाळावर हात मारणारी स्मायली)
वादासाठी तुमच्या मनात काय आहे ते खरे मानले तरी, दुसर्या चुकीने पहिली चुक सुधारते का... विशेषतः त्यांचे संदर्भ फार वेगवेगळे असले तरी केवळ मुद्दा जिंकण्यासाठी त्यांची तुलना करण्याच्या मोहात पडावे काय ? नाही असे माझे मत आहे. तुमचे काय म्हणणे आहे ?
16 Apr 2018 - 12:55 pm | विशुमित
<<<गाडी नको नको म्हणता राजकारणावर आलीच ना शेवटी ?>>
==>> ह्या प्रकरणावर राजकारण सुरु झाले म्हणूनच तर देशातील सर्व स्तरातून लोक पेटून उठून आवाज उठवायला लागले. नाहीतर ही चर्चा कठुआ आणि जम्मू पुरतीच सीमित राहिली असती.
===
<<<वादासाठी तुमच्या मनात काय आहे ते खरे मानले तरी,>>
==>> ह्या वादात काहीच हाशील नाही हे मला चांगले ठाऊक आहे.
===
<<< विशेषतः त्यांचे संदर्भ फार वेगवेगळे असले तरी केवळ मुद्दा जिंकण्यासाठी त्यांची तुलना करण्याच्या मोहात पडावे काय ? नाही असे माझे मत आहे. तुमचे काय म्हणणे आहे ?>>
==>> मुद्दा जिंकण्यासाठी तुलनात्मक मतमतांतरे कोठून सुरु झाली हे वाचकांना अगदी स्पष्ट दिसत आहे. माझे म्हणणे मांडण्याची आवशक्यता वाटत नाही.
16 Apr 2018 - 12:24 pm | पुंबा
अगदी सहमत.
आपल्या देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्यांना खरेच देशात सुधारणा व्हाव्यात असे वाटते की नाही याबद्दल निश्चितच संदेह निर्माण होतो. आज, कठुवा रेपबद्दल ज्या निर्विकारपणे, निर्लज्जपणे पिडितेच्या मुस्लिम असण्याबद्दल आनंद व्यक्त होतो किंवा विरोध करणार्यांबद्दल पाकिस्तानचे हस्तक असल्याचे आरोप केले जातात त्यावरून अ॑अम्ही जो देश आपला मानतो तो हा नाही अशी भावना मनात येणे अस्वाभाविक नाहीच. निर्भया हत्याकांडातील आरोपींचा निषेध करणारे आज 'नाही पण या प्रकरणात दुसरी बाजू असू शकते' असा कांगावा करतात तेव्हा यांना 'न्याय' होण्यापेक्षा धर्म-र्धर्म खेळण्यातच रस आहे हे सिद्ध होतं..
16 Apr 2018 - 1:18 pm | प्रसाद_१९८२
आपल्या देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्यांना खरेच देशात सुधारणा व्हाव्यात असे वाटते की नाही याबद्दल निश्चितच संदेह निर्माण होतो.
--
एक वेळ असे मानून चालू की देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्यांनी देशात सुधारणा घडवण्यात काहीच हातभार लावला नाही, बर मग तुम्ही देशाला नावे ठेवणार्यांनी देशात सुधारणा घडवायला किती हातभार लावलाय ?
16 Apr 2018 - 12:42 am | मार्मिक गोडसे
रेप हा फिजकली दिसतो, पण रोजच्या आयुष्यात जे घडतं ते सांगताही येत नाही. त्यामुळे बाकीचे देश काही का करत असेनात, भारत बायकांसाठी अवघड देश आहे हे मला मान्य आहे.
ह्यापेक्षा अधिक पुरावा कोणता असू शकेल?
16 Apr 2018 - 2:27 am | गामा पैलवान
मा.गो.
भारतात बायकांना वावरणं उत्तरोत्तर कठीण होत चाललंय हे खरं! मात्र तरीही भारतातल्या बलात्कारांची दरडोई संख्या उर्वरित जगाच्या मानाने नगण्य आहे. अर्थात हे भारतातल्या अनागोंदीचे समर्थन नाही. सांगायचा मुद्दा इतकाच की ठोस पुरावा वेगळा आणि सर्वसाधारण आकलन (=परसेप्शन) वेगळं.
आ.न.
-गा.पै.
16 Apr 2018 - 11:26 am | मार्मिक गोडसे
सांगायचा मुद्दा इतकाच की ठोस पुरावा वेगळा आणि सर्वसाधारण आकलन (=परसेप्शन) वेगळं.
नक्की काय म्हणायचंय तुम्हाला?
कुलाब्या पासून फोर्ट पर्यंतच्या फुटपाथवर परदेशी स्त्रियांना किंचाळताना व त्यांच्याकडून आपल्या देशबांधवांना मिळालेला प्रसाद प्रत्यक्ष बघितला आहे. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये आपल्याबरोबर स्त्रीला घेवून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य प्रकार असतो. प्रत्येक घटनेची नोंद होतेच असं नाही.तुलनेनं बलात्कारांच प्रमाण कमी आहे म्हणून ह्या देशात स्त्री सुरक्षित आहे असं म्हणणाऱ्यास दंडवत! विकृत पुरुषांपासून मुबईत फक्त स्त्रीच नव्हे , तर तरुण मुलंही सुरक्षित नाहीत. हां, मुंबई भारतात येत नसेल तर गोष्ट वेगळी.
16 Apr 2018 - 12:23 pm | गामा पैलवान
मा.गो.,
'भारत हा असुरक्षित देश वाटंत असेल तर खुशाल सोडून जावे' असा आडमुठा प्रतिसाद देणं सोपं आहे. मात्र तसा देत नाही.
जे तुम्ही बघितलंय तेच मीही बघितलंय. पण चर्चा करतांना भावनांच्या आधारे करता येत नाही ना. त्यासाठी ठोस आकडेवारी लागते. सर्वात गंभीर अपराध अधोरेखित होईल अशी आकडेवारीच जमवायला हवी ना? जेणेकरून सत्वर तोडगा निघेल.
अशी आकडेवारी जमवतांना प्रस्तुत स्त्रीकडे वैयक्तिक लक्ष देणं जमणार नाही. पण तो काही मलीन हेतू नव्हे. तसंच स्त्रियांविरुद्धच्या गुन्ह्याच्या दरडोई आकडेवारीनुसार भारतात जास्त सुरक्षितता आहे हे देखील मलीन विधान धरण्यात येऊ नये.
आ.न.,
-गा.पै.
16 Apr 2018 - 1:44 pm | मार्मिक गोडसे
त्यासाठी ठोस आकडेवारी लागते. सर्वात गंभीर अपराध अधोरेखित होईल अशी आकडेवारीच जमवायला हवी ना?
हे काम कोणाचे आहे? करताहेत का ते काम जबाबदारीने?का आमच्या आयाभगिनींनी रोज घरातून बाहेर पडलं की कामावर पोचण्यापूर्वी आणि कामावरून घरी परतन्यापूर्वी पो. स्टे. तक्रार नोंदवावी अशी आपली अपेक्षा आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये CCTV लावा आपोआप डाटा मिळेल.
'भारत हा असुरक्षित देश वाटंत असेल तर खुशाल सोडून जावे' असा आडमुठा प्रतिसाद देणं सोपं आहे. मात्र तसा देत नाही.
उपकार करत नाही तुम्ही. घटनेनं कोणाला तसा अधिकार दिलेला नाहीये.
16 Apr 2018 - 6:25 pm | गामा पैलवान
मा.गो.,
मला नेमकं हेच बरळायची इच्छा नव्हती. ती तुम्ही पुरी केलीत. याचसाठी थांबलो होतो. त्याबद्दल धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.
17 Apr 2018 - 6:42 pm | मार्मिक गोडसे
मला नेमकं हेच बरळायची इच्छा नव्हती. ती तुम्ही पुरी केलीत. याचसाठी थांबलो होतो.
मला तुमच्या सापळ्यात अडकवल्याबद्दल तुमचे अभिनंदन!
मला वाटलं होतं महिला अत्याचार आकडेवारी संकलन ह्यावर तुम्ही काहीतरी उपाय सुचवाल.
16 Apr 2018 - 6:33 am | अंतरा आनंद
लेखातल्या वेदना पोचल्या. लेखात कुठेही ठराविक कोणावर दोषारोप नसतानाही ’अल हिंद’ वरून देशभक्त लोकांच्या भावना दुखावलेल्या दिसता आहेत. थोडा ललित अंगाने लिहीलय हे लक्षात न घेता लेखिकेनं आपल्या राष्ट्राची मुस्लीम देशातल्या लहान मुली जवळ बदनामी केली ह्यावर दु:ख, संताप व्यक्त करणारी मेंबरं बघून वाईट वाटलं. आपल्या देशाच्या बदनामीनं खूपच दु:ख झालेलं दिसतय लोकांना. एवढंच दु:ख लोकांना, " हिंदू एकता मंच" आरोपींना पाठिंबा देण्यासाठी तिरंगा फडकवत निदर्शनं करते, या मोर्च्यात सरकारमधील दोन मंत्री सहभागी होतात, हे बघून होतय की नाही? जबाबदार अधिकारपदावर (राजस्व अधिकारी) , पोलीस यासारख्या व्यक्ती या घटनेत आरोपी-सहअरोपी आहेत याचं वाईट वाटतय की नाही?
अर्थात, मुलीचं चित्र आणि नाव उघड होणं हे मिडीया किती नीच पातळीला पोहोचू शकतो याचं उदाहरण आहे, यात वाद नाही.
आणि हो, सिरिया, पाकिस्तान, इराण, इराक या मुस्लिम देशांशी तुलना करता आपण खूपच मागे आहोत. लाजच वाटली पाहिजे याची आपल्याला. अर्थात उनाव, कथुआ आणि आता सूरत या सारखा अनेक घटना , मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा करण्या ऐवजी विचारी नागरीकही कथुआ प्रकरणी हिंदू -मुस्लीम धुळवडीत ज्या हिरीरीनं सहभागी झालेय ते बघून आपण आपलं ध्येय्य लवकर गाठू खात्री पटतेय .
16 Apr 2018 - 9:05 am | माहितगार
@ अंतरा आनंद दुसर्यांकडे बोट दाखवताना तीन बोटे आपल्या बाजूला आहेत का ? हे तपासण्याची आपणास आणि धागा लेखिकेस गरज असावी असे प्रांजळ मत आहे . जिथ पर्यंत अत्याचाराची निंदाकरणे असो की स्त्रीयांना सामोरे जावयास लागणार्या वीषमते बाबत या पुर्वी वेळोवेळी लिहून झाले आहे -धर्मावरुन या विषयात फरक करु नये या विषयावरही यशस्वीपणे बाजू मिपावर यापुर्वी मांडून झाली आहे, ते प्रतिसाद शोधावयास वेळ लागेल- तसे ते इतर मिपाकरांनी ही लेखन केले असणार आहे. याच धाग्याला समांतर सुधीर देवरेंचा धागा आला आहे आणि इथे ज्या साशंकता व्यक्त केल्या जात आहेत त्या देवरेंच्या लेखावर अद्यापतरी केल्या गेलेल्या दिसत नाहीत.
आणि धागा लेखिका
या लेखनातील आपलेच अंतरंग धार्मीक फरक विवादात आणणारे आहेत आणि आपणच उपस्थीत केलेल्या वादाच्या विरोधात ससंदर्भ असंख्य पुरावे उभे करता येतात . आणि तसे पुरावे उपस्थित केले की "मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा " मुद्याच्या आधारे गोलपोस्ट शीफ्ट केला जतोय किंवा कसे ? मला वाटले ओमान मधलीच उदाहरणे पुरेसे ठरावे पण तेवढ्याने
विरुद्ध बाजूच्या धर्मांधांचे डोळे उघडलेले दिसत नाहीत, सौदी अरेबीयाच्या राजदूतांवर आरोप झाले आहेत त्यांच्यावर झालेल्या आरोप बद्दल सौदी अरेबीयाने कोणत्या शीक्षा दिल्या ? हा प्रश्न तुमचे मुद्दे खोदण्यास पुरेसा असावा नसेल तर सांगा ईस्लामिक देशातील स्त्रीयांची स्थिती हा वेगळा धागा लेख असंख्य पुरावे आणि संदर्भांच्या आधारावर उभा करुन दाखवेन .
मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा " एवढ्या मुद्यावर चर्चा करावयाची असेल तर धागा लेख तेव्ढ्याच मुद्यावर काढावा , ईस्लामीक अथवा अगदी युरोमेरिकी किंवा इतर देशांशी तुलना अस्थानी आहे. तुलना आपण चालू केली तर प्रतिवाद झेलण्यास तयारही असावे . अतार्कीक युक्तीवादाच्या मागे लपू नये असे वाटते.
16 Apr 2018 - 10:25 am | अंतरा आनंद
या शिक्षा इतर मुस्लिम देशात आहेत, वा शरियतमध्येआहेत या माहितीवरून त्या मुलीने हा प्रश्न केला अस्ण्याची शक्यता नाही वाटत का? लेखिकेनं कोणतही धार्मिक दृष्टओकोन व्यकत केलेला नाही पण इतर प्रतिक्रिया मात्र विनाकारण तो रंग देतायत याचा खेद वाटतो. "हे इथे नाही का होत? " असं विचारण्यापेक्षा "हे असं माझ्या देशात होतय याची मला लाज वाटते ' यावर सहमत का असू नये? इतर राजकारण करत आहेत असं म्हणत " मुस्लिम देशांकडे बघा" असं म्हणताना घटनेकडे बघण्याचा दूषित नजर देतोय असं नाही का वाटत? हे करताना आपण राजकारण्यांपेक्षा ( कारण त्यांना मतं तरी मिळवायची असतात आपण कुठलेही हेतू नसताना हे करतो ते) चुकीचं करत आहोत असं नाही का वाटत? कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला हवे तेच शब्द तोलून मापूनच बोलावं या हेका का असावा?
16 Apr 2018 - 10:37 am | माहितगार
१) आपणच चुकीचा गोलपोस्ट उभा केला तर गोल करणारे त्या दिशेने येतात त्यावर टिका केली तरी तार्कीकता शिल्लक रहत नाही. योग्य गोल पोस्टचा नवा चर्चा धागा मी काढला आहे तिकडे चर्चा सहभागाचे स्वागत आहे .
२) भावनांचा आदर न करणारे इथे कुणीच नाही. भावना आहेत म्हणून त्यातील अज्ञान आणि चुकीच्या माहिती आणि चुकीच्या दृष्टीकोणांची चिकित्सा एकदा पब्लिक फोरम मध्ये होणार नाही होऊ नये अशी अपेक्षा चुकीची असावी . सदर लेखिका स्ट्राँग चर्चांना तोंड देऊ शकणार्ञा जुन्या मिपाकर आहेत तेव्हा चिकित्सेत काहीही गैर नाही.
लेखिका अप्रत्यक्सपणे अवजवी शिक्षांचे आणि अवाजवी स्त्रीयांवर अन्याय्य संस्कृती आणि ग्रंथाचे समर्थन करत आहेत
16 Apr 2018 - 10:51 am | प्राची अश्विनी
@अंतरा आनंद,
जे घडलंय त्याबद्दल सात्त्विक संताप, लाज वाटणं सगळं मान्य. तुमच्या भावनाही पोचलेल्या. पटल्या.
पण जेव्हा तुलना होते तेव्हा ती योग्य अयोग्य अशा प्रतिक्रिया येणारच.
" कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला हवे तेच शब्द तोलून मापूनच बोलावं या हेका का असावा?" हेका नाहीच. पण त्याविरोधात कुणी बोलूच नये असाही हेका नसावा.
इथे तर या घटनेबद्दल, आपल्या समाजाला सुधारणेची अत्यंत गरज आहे इ.वर कुणाचेही दुमत नाही. तुलना चुकीची आहे असं म्हणणं आहे.
उदा. " तुमच्या गावात दारू पिऊन नव-याने बायकोचा गळा दाबून जीव घेतला. त्यापेक्षा आमच्याकडे बरं , दारू पिऊन नवरा बायकोला मारझोड करतो, कोंडून ठेवतो पण जीव नाही घेत हो." असं म्हणण्यासारखं आहे. तेही भयंकर पण हेही भयंकरच.
16 Apr 2018 - 11:20 am | अंतरा आनंद
हे धागाकर्तीने स्पष्ट केल्यावरही आपल्या आणि त्या देशाच्या लोकसंख्येची तुलना करणे, ओमानच्या कट्टरतेची मापे काढणे, यातून काय साध्य होणार ?
धागाकर्तीनं एखाद दुसर वावगं वाटणारं लिहीलंही असेल तरी या घटनेत कोणत्याही कारणास्तव एका अजाण मुलीचा असा घृणास्पद वापर, आरोपीँच्या बाबतीत सुरु असलेल्या कायदेशीर प्रक्रियेला खीळ घालण्याचा प्रयत्न याचा निषेध करण्याकडे चर्चा वळवणे एक सामान्य, प्रामाणिक नागरीक म्हणून आपलं कर्तव्य नाही का ?
त्याऐवजी घटनेला कोणत्याही तुलनेकडे वऴवून आपण या प्रकरणी सुरू असलेल्या राजकारणातलं एक अगदी नगण्य का होईना प्यादं बनतोय हे लक्षात घ्यायला नको का? या अश्या भावनाप्रधानतेमुळेच राजकारणी आपाआपली पोळी भाजून घेतात आणि देश्यातल्या कायदासुव्यवस्था असूनही नसल्यासारख्या अवस्थेत काहीही बदल होत नाहीय.
16 Apr 2018 - 11:41 am | माहितगार
...भावनाप्रधानतेमुळेच .....
पुन्हा तीन बोटे आपल्याकडे आहेत. ( इथे राजकरण्यांच्या तमाशांचे स्वागत कुणीच करत नाही हे वे सानल )
पुन्हा तीन बोटे , चुकीचे गोलपोस्ट उभारण्याची जबबदारी किती नाकारली तरी तर्क सुसंगत ठरत नाही.
आपण स्वतः ह्या चर्चा मुद्यावर चर्चा मर्यादीत ठेवल्ली तर चर्चा तिकडे जाण्याच्या सम्धी वाढल्या असत्या . अपणही लेखिकेच्या चुकीच्या गोलपोस्ट जवळ अजून एक
चुकीचे गोलपोस्ट उभे करता आणि गोल दुसरी कडे करा म्हणता याला काय अर्थ आहे ? इथेही तीन बोटे आपल्या स्वतःकडे आहेत
ओमान मधल्या आणि भारतातल्या कायद्याच्या बडग्यात फारसा फरक नाही हे संदर्भासहीत सिद्ध करुनही चुकीच्या इंप्रेशन मध्ये रहाण्याचा आणि तुलना नको म्हणत तुलना ओढवून घेणारे प्रतिसाद आणि उपप्रतिसाद देत चुकीचा गोलपोस्ट सांभाळत बसणारी बोटे आपलीच आपल्याच दिशेस निर्देश करतात किंवा कसे ?
20 Apr 2018 - 11:27 pm | भंकस बाबा
शरीयतनुसार दंड देणार असतील तर एका स्त्री ची साक्ष प्रमाण मानण्यात येणार नाही आहे, म्हणजे पीडित स्त्रीने तक्रार करताना साक्षिदार पण घेऊन जावा
मुस्लिम देशात स्त्रियावर अत्याचार म्हणजे लाहोलबिलाकुवत !
16 Apr 2018 - 8:38 am | यशवंत पाटील
ताई, तुम्हारा चुक्याच..
तुम्हाला काय वाटल तरी मेरा देश महान असच बोलायला पाहिजे - अस सांगणारे आयडी थोर आहेत.
औघड आहे.
तुम्ही लिहिल ते पोचल आणि पटल. बायांची आबाळ पाहिलेला...
16 Apr 2018 - 11:45 am | विशुमित
प्रॉब्लेम काय झालाय माहिती का, या प्रकरणात भाजपचे २ आमदार, हिंदू एकता मंच, आरोपी हिंदू, नरेंद्र मोदींचे बराच वेळ धरलेले मौन (उपोषण) आणि तुम्ही म्हणता तसे "मेरा राष्ट्र (?) महान" या सर्व गोष्टींना डिफेन्ड करायचे म्हंटल्यावर तुलनात्मक (?) मतमतांतरं होणारच.
(हिंदू आरोपीना डिफेन्ड करतात हे म्हणणे अतार्तीक होईल पण विरुद्ध बाजूला बकरवाल आहेत म्हंटल्यावर चर्चा तर होणारच ना पाटील)
16 Apr 2018 - 11:55 am | माहितगार
मेरा देश महान
अयोग्य तुलनेने देशाच्या नावे बोटे मोडणारे अधिक शहाणे असतात किंवा कसे ?
16 Apr 2018 - 1:43 pm | यशवंत पाटील
साहेब, जरा थंड घ्या.
मनात आलं ते त्यांनी लिहिलं ते कुणाला पटल, कुणाला नाही. लगे त्यांना नागरिक शास्त्र शिकवायला लागले लोकं... अहो, त्यांना बी कळत असणार की.
तस बघायला गेल तर काथ्याकूटमधी लेख नसताना इतकी चर्चा कशापायी?
तुमच्यावाणी काय मला जास्ती लिहता येत नाही. समजुन घ्या जराशीक.
16 Apr 2018 - 2:12 pm | माहितगार
अंशतःच बरोबर , सार्वजनिक मंच आहे, प्रतिसाद सुविधा समीक्षेसाठीच दिलेली आहे . आमचा आक्षेप नसलेला स्वतंत्र धागा चर्चा सुद्धा चालू केली आहे . आक्षेप तुलनेचा चुकीचा मुद्दा लावून धरण्यावर आहे . लेखिका चर्चेत अनुभवी आहेत ज्यांना तुलनेचा मुद्दा लावून धरायचा आहे त्यांच्या मुद्याची योथोचीत चिकित्सा ओघाने येतेच .
आज माझ्या घरातील स्त्रिया बाहेर सुरक्षित पाने वावरून आल्या आहेतच बाकीच्यां कोट्यावधी स्त्रिया बाहेर या क्षणी भारतात सुरक्षित पाने वावरत असतील , काळजीच्या गोष्टी भारतात नाही असे नाही पण काळजीच्या गोष्टींची काळजी सुरक्षे विषयी चर्चा करून करणार कि stereotype तयार करून भीती चे वातावरण वाढवण्यात हात भार लावणार नेमके काय तर्क सुसंगत आहे ? हे आपणच सांगा
16 Apr 2018 - 9:22 am | वीणा३
" मी दरवाजे लावून बसते."तुम्हाला काय म्हणायचं आहे ते नीट कळलं. इथल्या वादात नाही पडणार, पण असं काही वाचलं ना कि घरातून बाहेर पडायची सुद्धा भीती वाटते. ८ वर्षाच्या मुलीचे (खरंतर कोणाचेही) हाल करणाऱ्याची "जनावर" हि एकाच जात / धर्म असतो.
मीडिया वर असले फोटो दाखवण्यासाठी अतिशय स्ट्रिक्ट नियम केले पाहिजेत, विचारही करवत नाहीये त्या मुलीचा आणि तिच्या घरच्यांचा, माझा ८ महिन्याचा मुलगा घरात झोपला होता, हि बातमी वाचल्यावर ४ वेळा त्याच्या कडे बघून आले.
"त्यामुळे बाकीचे देश काही का करत असेनात, भारत बायकांसाठी अवघड देश आहे हे मला मान्य आहे. आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे. "
अतीवेळा सहमत. मध्ये एक बातमी अली होती कि लो वेस्ट जीन घालून बाईक वर बसलेल्या एका मुलीच्या जीन्स मध्ये जळती सिगारेट टाकली. ओळखीतल्या कित्येक "बायकांची" प्रतिक्रिया होती कि असे कपडे घातले कि असंच होणार, नीट कपडे घालावे. काय बोलावं कळत नाही.
16 Apr 2018 - 10:27 am | अंतरा आनंद
+१
16 Apr 2018 - 11:52 am | माहितगार
आपण आपल्या मुलावर सुयोग्य संस्कार नेमके कसे कराल ? की पुढेचालून तो योग्य मार्गावर राहील
..
लेखिका आणि लेखिकेचे समर्थक चर्चा सुरक्षा कशी वाढवता येईल एवजी स्वतःला आणि इतरांना भितीच्या वातवरणात गुरफटवत तर नाही आहेत. आपण वर्णन केलेल्या कपडे कसे घालावे सांगणार्या स्त्रीयाही भितीच्या वातावरन निर्मितीत गुरफटवून घेत नाही किंवा कसे ?
16 Apr 2018 - 12:26 pm | गामा पैलवान
अंतरा आनंद,
खरंय हे. देशात बायका सुद्धा येतात. त्या स्त्रियांचीही नाहक बदनामी होतेय.
आ.न.,
-गा.पै.
16 Apr 2018 - 12:52 pm | गवि
भावनेच्या भरात काहीसा आमिर खान इफेक्ट (देशात असुरक्षित वाटतं, देश सोडण्याविषयी) घडून गेला असावा. त्यात उद्वेगाचा भर हा फॅक्टर जास्त असावा.
भावना समजल्या.
16 Apr 2018 - 1:35 pm | पिलीयन रायडर
म्हात्रे काका, आपल्या देशाची बदनामी परदेशी लोकांसमोर करु नये हे तत्वतः मान्य असलं तरी जर एखादी परदेशी स्त्री भारतात येणार असेल तर मी तिला ह्या वास्तवाची नक्कीच जाणीव करून देईन.
ह्याचं कारण सध्या सतत कानावर येणाऱ्या ह्या रेपच्या बातम्या इतकं मर्यादित नाही. भारतात सगळीकडेच स्त्रियांना निर्धोक फिरता येत नाही. परिस्थिती कमी अधिक प्रमाणात वाईट असेल पण वाईट आहे हे नक्की. एकंदरीतच स्त्रियांना कमी लेखणे पासून ते निव्वळ उपभोगाची वस्तू समजणे ह्या सर्रास घडणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याची नोंद ठेवून आकडेवारी तयार केली जाते का ते माहीत नाही, पण हे सत्य आहे. म्हणजे बाईशी बोलताना नजर कुठे असावी इतके साधे संकेत सुद्धा सहज मोडले जातात, अगदी चकचकीत कॉर्पोरेट मध्ये सुद्धा. ही गोष्ट कुणी रिपोर्ट करणार नसलं तरी ती किती किळसवाणी आहे हे स्त्री झाल्याशिवाय कळणार नाही. (पण अंदाज येऊ शकतोच).
पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये तर मन निगरगट्ट करूनच जावं लागतं. अगदी शाळकरी पोरं सुद्धा वाट्टेल तसे हात लावतात. मुळात आपण कोणत्याही बाईला कुठेही हात लावू शकतो असं वाटणं हेच किती विकृत आहे..
आता मी फक्त अमेरीका हा देश पाहिला आहे. तो ही फार थोडासा. किमान न्यू यॉर्क मेट्रो मध्ये तरी, कितीही गर्दी असली तरी तुम्हाला किळसवाणे स्पर्श होत नाहीत. तुम्ही वीतभर कपडे घालून फिरलात तरी कुणी नजरही वर करून बघत नाही. स्विमिंग पूल मध्ये अमेरिकन पुरुष असेल तर तो आहे की नाही हे ही लक्षात येणार नाही अशा बेताने अलुफ राहून पोहत असेल. तेच तिथे भारतीय पुरुष असेल तर एका क्षणात माझे सेन्सेस अलर्ट व्हायचे. सरसकटीकरण करायच नाहीये मला, पण एकुणात परिस्थिती अशी आहे... असावी.. तिथेही रेप होतात ना, पण बायका ते खुले आम सांगतात की माझ्यावर रेप झाला होता. समाज त्यांना वेगळं वागवत नाही.
अर्थात भारत आणि अमेरिकेत फार फार फरक आहेत. संस्कृतीच वेगळी. पण उद्या एखादी अमेरिकन बाई भारतात येणार असेल तर स्त्री म्हणून मी तिला ह्या फरकांची जाणीव करून देईनच. देशाच्या वगैरे पलीकडच्या गोष्टी आहेत ह्या. मेरा भारत महान वगैरे भ्रम मला तसेही नाहीचेत, आणि स्त्री असणं हे माझ्यासाठी जास्त मोठं कनेक्शन आहे.
तेव्हा ओमान बद्दलचे तांत्रिक मुद्दे चुकले असतीलही, पण भावना नीट समजल्यात मला लेखातल्या.
16 Apr 2018 - 1:58 pm | माहितगार
आपल्या भावना लक्षात घेऊन अपल्याच विधाना वर आधारीत वेगळा चर्चा धागा भारत बायकांसाठी अवघड देश आहे ... ... काढला आहे, आपले त्या चर्चेत स्वागत आहे.
तुलनेचा गोलपोस्ट वर चर्चा केंद्रित करणे आपली प्रायोरिटी असेल ससंदर्भ तर्कसुसंगत अभ्यासपूर्ण चर्चेची तयारी आहेच . पण आधीच्या सदस्यांप्रमाणे तुलनेच्या गोलपोस्ट ला का फोकस केले म्हणू नका, ते गोलपोस्ट आपणण स्वत: उभे केलेले आहेत आणि आपण त्या गोलपोस्ट ला सांभाळू इच्छित आहात हे लक्षात घ्यावे हि नम्र विनंती
16 Apr 2018 - 2:34 pm | श्वेता२४
आपल्य मताशी मीही सहमत आहे. चर्चा करणाऱ्यांनी दुसऱाय देशासमोर आपल्या देशाची बदनामी, आकडेवारी इ. पोकळ चर्चेत न पडता देशात जे भयानक घडत आहे त्यावर लक्ष देणे अधीक महत्वाचे. मिपावर बऱ्याच स्त्रिया कामानिमित्त घराबाहेर पडत असतील तशाच या देशातीलही कामानिमित्त रोज घराबाहेर वावरतात याचा अर्थ बाहेरचे वातावरण सुरक्षित आहे म्हणून त्या बाहेर पडतात असे नाही. बाहेर पडताना त्यातील किती जणींना बिनधास्त वाटत असेल याचा विचार करणे ही खरी गरज आहे. आणि याचे मूळ कुठेतरी पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टीकोनात आहे. तसा दृष्टीकोन का तयार होतो याचा विचार करावा लागेल.
16 Apr 2018 - 4:29 pm | माहितगार
अगदी पिलीयन रायडर यांच्याच विधानावर आधारीत भारत बायकांसाठी अवघड देश आहे ...
हा धागा फिअर मॉन्गरीन्ग न करता रचनात्म्क चर्चा व्हावी म्हणून काढला आहे . त्या धाग्यात आपल्या उपरोक्त विधाना संदर्भाने चर्चेत स्वागत आहे.
16 Apr 2018 - 2:47 pm | राही
प्रतिसाद आवडला. पाश्चात्य देशांत महिलांशी बोलताना पुरुषांची नजर बहुतेक वेळा नितळ आणि सभ्य असते. भारतात मात्र ती सतत वखवखलेली असते. कुलाबा फोर्ट भागात फेरीवाले टॅक्सीवाले परदेशी बायकांशी किती विकृत वागतात ते पाहिले आहे. एक तर कुठल्याही महिलेशी सभ्य रीतीने वागावे ही इथली संस्कृतीच नसावी किंवा असलीच तर ती धुडकावण्यात काही गैर वाटत नसावे.
16 Apr 2018 - 5:58 pm | टवाळ कार्टा
हे फार चुकीचे वाक्य आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो....बहुतेकवेळा (प्रत्येकवेळा नाही) प्रत्येक पुरुष कोणत्याही स्त्रीशी बोलताना एकदातरी "natural attraction to opposite sex" या नजरेने बघतोच....फक्त ते बघणे "काही सेकंद ते नजरेसमोर असेपर्यंत" यामध्ये कुठेही असू शकते...पाश्चात्य देशांत लोकांना शारिरीक जवळीक फार लवकर आणि जास्त वारंवारीतेने मिळते त्यामुळे "तसे" बघणे जास्त वेळ लांबत नाही...मध्य-पुर्वेत किंवा आशियायी देशांत (Indian subcontinent) असा प्रकार नसल्याने बहुतेकदा "जमेल तितके आणि जमेल तेव्हा" काहीतरी बघावे/मिळावे याची तीव्रता जास्त असते...अर्थात परस्पर संमतीशिवाय अथवा समोरच्या व्यक्तीला uncomfortable काहिहि करणे हे चूकच आहे
त्यामुळे "पाश्चात्य देशांत महिलांशी बोलताना पुरुषांची नजर बहुतेक वेळा नितळ आणि सभ्य असते." हे सरसकटीकरण करुन काळ्या-पांढर्यात विभागणी करणे चूक
16 Apr 2018 - 7:19 pm | बिटाकाका
काही अंशी सहमत. पण मुळात ते पण तेच करतात असं म्हणणं तितकंच चूक आहे जितकं इथले पुरुष करतात असं म्हणणं आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
--------------------------------
ही अशी सरसकटीकरण आणि एक प्रकारचा उपहास यांनी भरलेली वाक्ये ऐकली की वाटतं "इतर स्त्रियांकडे, माझा भाऊ फार वखवखलेल्या नजरेने बघतो, माझे वडील फार वखवखलेल्या बघतात, माझा नवरा फार वखवखलेल्या नजरेने बघतो, माझा मुलगा फार वखवखलेल्या नजरेने बघतो" वगैरे वाक्ये सर्रास कानावर पडू लागतील की काय. आणि मग एक खिन्नता आणि उदासीनता वाटते.
16 Apr 2018 - 8:40 pm | पिलीयन रायडर
माझा भाऊ बघतही असेल, उद्या मुलगा विचित्र वागेलही. नाही कोण म्हणतंय? हे बलात्कारी लोक कुणाचे न कुणाचे नातेवाईक आहेतच की!
बिटकाका, बहुतांश वेळा घरातच असे प्रसंग घडतात. एखादा अनामिक सर्व्हे घेऊन पहा, अनेक जणी कबूल करतील की घरातल्याच कुणीतरी त्यांना त्रास दिलेला आहे. अगदी मुलीवर अत्याचार करणारे बाप ह्या जगात आहेत.
माझं असं मत आहे की बायकांना बाप, भाऊ, नवरा हे कसे आहेत हे नीट माहिती असतं. फक्त त्या बोलायला घाबरतात. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं कुणी बोलताना सापडणार नाही, पण घडत आहेच.
16 Apr 2018 - 9:48 pm | बिटाकाका
त्याचं प्रमाण नावाची गोष्ट असेलच की?
********************
स्टेरिओटाइप करताना थोडाही विचार केला जाऊ नये? माझ्या आजूबाजूच्या लोकांपैकी ०.५ टक्केही अशी वखवखलेली नजर घेऊन फिरत नाहीत. तुमचेही प्रमाण हेच असावे असे मत नाही, पण वरील वक्तव्य १००% प्रमाण गृहीत धरतंय आणि ते अतिशय खेदजनक तर आहेच शिवाय संतापजनकही आहे असे मला वाटते. माझ्या सज्जनपणावर असा सरसकट हल्ला करण्याचा अधिकार (किंवा स्वातंत्र्य) कोणी का घ्यावा? मला माझी सज्जनता आणि माझे संस्कार कुणासमोरही सिद्ध करण्याची तिळमात्रही गरज वाटत नाही. आणि माझ्यासारखेच बहुतेक सगळे वडील, भाऊ, नवरा मुलगा बाजूला असतात. कुठल्या मोजक्या नतद्रष्ट नीच लोकांसाठी सगळ्या पुरुषजातीवर आसूड उगारणे अजिबात योग्य नाही. याउपरही कोणी, कदाचित वैयक्तिक अनुभवांमुळे, असे स्वातंत्र्य उपयोगी आणत असल्यास अशा वक्तव्यांना फाट्यावर मारण्याशिवाय काय पर्याय उरतो?
*************************
माझ्या मतातून कोणाला उद्धटपणा किंवा महिलांबद्दल अनादर भासत असल्यास, फारफारतर मी आगाऊ दिलगिरी व्यक्त करू शकतो, तसा हेतू असणे कदापि शक्य नाही.
16 Apr 2018 - 10:08 pm | पिलीयन रायडर
तुम्ही वैयक्तिक का घेताय हे? आपण जनरल मानसिकतेबद्दल बोलत आहोत. भारतात स्त्रियांना कमी लेखले जाते असं जेव्हा विधान केलं जातं तेव्हा माझ्या घरातल्या स्त्रियांना तर मी मनाने वागवतो ह्या प्रतिवादाला अर्थ नसतो. हे विधान स्त्रिया करतात तेव्हा त्याला अनेक अनुभवांची जोड असते आणि त्यातून त्या हे बोलतात.
आम्ही जेव्हा म्हणतोय की भारतात पुरुष स्त्रियांकडे विचित्र नजरेने बघतात तेव्हा सगळेच्या सगळे भारतीय असेच आहेत असा अर्थ नसतोच. पण बहुतांश जागी स्त्रियांना हा अनुभव येतो. चांगल्या घरातले, एरवी सभ्य वाटणारे पुरुषही विचित्र वागू बोलू शकतात.
पण ह्याचा अर्थ तमाम जनता अशीच आहे आणि तमाम बायका अत्यन्त पवित्र आणि सात्विक आहेत असाही होत नाही. हे चर्चेचे अध्याहृत संकेत आहेत असं मला वाटतं.
भारतात कठुआ, उन्नव, आसाम, सुरत अशा अनेक ठिकाणी पाशवी बलात्काराच्या बातम्या एकत्र कानावर येत असताना स्त्रियांनी त्यांचा उद्वेग मांडला तर त्यात असे तांत्रिक मुद्दे का काढले जावेत?
आपल्या देशात स्त्रियांची सुरक्षितता हा मोठा चिंतेचा विषय आहे हे मान्य करायला इतका त्रास का होत असावा? इतर देशातल्या ह्या संदर्भातल्या काही चार दोन भल्या गोष्टी इथे मांडल्या तर त्याचा त्रास का व्हावा?
इथे कुणी कुणावर वैयक्तिक बोट दाखवत नाहीये आणि चांगले सभ्य पुरुष जगात नाहीतच असंही म्हणत नाहीये. पण दैनंदिन आयुष्यात "ट्रॉमा" वाटावा इतका त्रास मुली रोज सहन करतात. मनोरुग्ण माणसाने वागावं तसे विकृत बलात्कार भारतात होतात, घरातल्या माणसानेच वर्षानुवर्षे त्रास दिल्याच्या घटना सुद्धा इथे घडतात.
काही मोजक्या पुरुषांचा सभ्यपणा इतका महत्वाचा वाटतो तिथे ह्या मुलींचा त्रास नगण्य आहे का? मी भारताबद्दल देशप्रेमाची भावना समजू शकते, पण ह्या नादात आपण प्रचंड शाररिक आणि मानसिक त्रासाला सामोऱ्या गेलेल्या स्त्रियांना विसरत आहोत का?
चर्चेचा मुद्दा हाच आहे ना?
16 Apr 2018 - 10:20 pm | माहितगार
मॅडम, तुमचंच बरोबर आहे , आपल्याशी चर्चा करताना 'वुमेन आर फ्रॉम व्हीनस'चा अनुभव आला आणि अधिक शहाणा झालो. खाली सुखी माणूसचा प्रतिसाद सुद्धा बरोबर आहे की काय अशी भावना होते आहे.
17 Apr 2018 - 8:00 am | बिटाकाका
१. माझी वाक्ये तुम्ही तरी का वैयक्तिक म्हणून घेताय? मी भारतातील एक पुरुषांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय असं समजा की!
२. आपण मुद्द्याभोवती गोल गोल फिरक्त आहोत. किती टक्के पुरुष तुम्ही म्हणता तसे आहेत? ही टक्केवारी अजिबात महत्वाची नाही असे गृहीत धरून वारंवार "सर्व पुरुष" असा उल्लेख अत्यंत खटकणारा आहे. काही पुरुष म्हणण्यात नेमकी अडचण काय?
३. इथे स्त्रियांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय नाहीये असं म्हणणारा कुठल्या आणि कुणाच्या प्रतिसादाचा संदर्भ आपण देताय? मला तरी असं सुचवणार कुठला प्रतिसाद दिसला नाही, तुम्ही दाखवून देता का?
४. काही मोजक्या पुरुषांचा सभ्यपणा? तुम्ही मुद्दा सोडताय. माझा मुद्दा काही मोजक्या लोकांचा नतद्रष्टपणा आहे. मुलींचा त्रास नगण्य वगैरे कोणालाच वाटत नसतो पण म्हणून सरसकट पुरुषांवर का दोषारोप? आणि यात देशभक्तीचा काय संबंध? स्त्रियांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांवर पण असेच लेबल लावले जाते का?
५. माझं तर उलट मत आहे की भारतातील पुरुष हा दिवसेंदिवस स्त्रियांबद्दल अतिशय संवेदनशील बनत चालला आहे आणि हे चांगले लक्षण आहे. त्याबरोबरच स्त्रियाही सेल्फ डिपेंडंट आणि कॉन्फिडन्ट होत चालल्या आहेत. यामुके खरतर काही दशकांपूर्वीपेक्षा अतिशय आशादायक चित्र आहे. हे सगळं बाजूला ठेवून वारंवार हा समाज स्त्रियांसाठी धोकादायक आहे म्हणणं अजिबात पटत नाही आणि खासकरून यासाठी समस्त पुरुषवर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे क्लेशदायक आहे.
17 Apr 2018 - 12:18 pm | nanaba
ज्याच जळत त्यालाच कळत ही म्हण आठवतेय इथले प्रतिसाद वाचून.
जे चा न्गले आहेत त्यान्नी विरो धी पक्शात न जाता , आम्हाला ज्या मानसिक त्रासातून जाव लागतय असल्या सततच्या बातम्या वाचून त्याबद्दल तुम्ही आमच्या बरोबर आहात. तुम्ही स्वतः चा न्गले असल्याने असे वागणार नाही. ़ऊनी क वागताना दि सले तर यथा शक्ती ते वू थाम्बवू , असे म्हणायला काय हरकत आहे. आअपण विरोधी पक्शात असण्याची गरज नाहीये