तुमच्या देशात....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
13 Apr 2018 - 1:33 pm

मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
'........'
------
'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही.
'काय पाहणार हिंदमध्ये?'
तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं.
मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.'
मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.'
मी दरवाजे लावून बसते.
.....

धोरणसमाजजीवनमानविचारबातमी

प्रतिक्रिया

ट्रेड मार्क's picture

17 Apr 2018 - 8:26 pm | ट्रेड मार्क

हे आरोप सिद्ध करणारा सज्जड पुरावा आहे का? क्रेडिबल न्यूज चॅनेलची बातमी, एडिट न केलेले व्हिडीओ आणि फोटोशॉप न केलेले फोटो टाका.

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2018 - 1:06 pm | श्रीगुरुजी

पुरावा मागितल्यानंतर पुंबामहाराज धाग्यावरून गायब झालेले दिसताहेत.

पुंबा's picture

18 Apr 2018 - 2:55 pm | पुंबा

१.

http://indianexpress.com/article/india/kathua-gangrape-jk-bjp-ministers-...

२. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/kathua-rap...
३. https://qz.com/1252951/the-kathua-gang-rape-and-murder-is-a-cause-of-cel...
४. https://www.ndtv.com/india-news/kathua-rape-murder-bandh-called-by-lawye...
५. https://timesofindia.indiatimes.com/india/kathua-minor-rape-murder-lawye...

फेबुवर या विषयीच्या बातम्यांवर येणार्‍या विषारी कमेंट्सची लिंक इथे देऊ शकत नाही. आपण स्वत: पहाल तर रक्त उकळवणार्‍या टिप्पण्ण्या पिडितेबद्दल, तिच्या कुटुंबावर केलेल्या आढळतील.
माझ्यासाठी हा विषय राजकारणाचा नक्कीच नाही. मात्र, इथेसुद्धा ज्यांना हिंदू- मुस्लिम दिसतेय त्यांच्या माणूस असण्याबद्दल शंका वाटते एवढं नक्की..

धार्मिक आणि राजकीय अँगलने बघू नये हेच खरे ,

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2018 - 4:56 pm | श्रीगुरुजी

सर्व लिंक्स व त्याखालील प्रतिक्रिया वाचल्या. सर्व प्रतिक्रियांमध्ये या घटनेचा भरपूर निंदा करून गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

मग कोठे आहे पिडितेवरच चिखलफेककरत व आरोपींचं निर्लज्जपणे समर्थन? कोठे आहे बलात्काराचे सुद्धा आडून आडून समर्थन करणारे? कोठे आहेत क्रूर घटनेवर सुद्धा धर्माच्या आधारे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न्म करणारे?

जर तुम्हाला वरील लिंक्स मध्ये हे दिसले असतील तर दाखवा आणि ते १) भाजपचा, २) पेड आणि ३) ट्रोल्स आहेत हे सिद्ध करा.

श्रीगुरुजी's picture

19 Apr 2018 - 10:01 am | श्रीगुरुजी

पुराव्यांची वाट पाहतोय.

श्रीगुरुजी's picture

20 Apr 2018 - 10:42 am | श्रीगुरुजी

पुंबा,

आपला तीव्र संताप ओसरला असेल तर आपण जे आरोप केलेत त्याच्या समर्थनार्थ पुरावे द्याल का? आपण आधी ज्या लिंका दिल्यात त्यात आपण जे आरोप केलेत तसे काहीही आढळले नाही.

धन्यवाद.

आपला नम्र,
श्री गुरूजी

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2018 - 5:05 pm | श्रीगुरुजी

पुंबमहाराजांकडे पुरावे नव्हतेच. तसंही त्यांना बलात्काराची शिकार झालेल्या मुलीविषयी काही देणंघेणं दिसत नाही. फक्त या घटनेचा वापर करून भाजपबद्दल असलेला आपला राग व्यक्त करण्याची संधी साधून घेतली. त्यासाठी अर्थातच भाजपवर खोटेनाटे आरोप करून आगपाखड करावी लागली.

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2018 - 5:10 pm | श्रीगुरुजी

माझ्यासाठी हा विषय राजकारणाचा नक्कीच नाही. मात्र, इथेसुद्धा ज्यांना हिंदू- मुस्लिम दिसतेय त्यांच्या माणूस असण्याबद्दल शंका वाटते एवढं नक्की..

बरोबर आहे. पण कोण हिंदू-मुस्लिम करतंय ते दाखवा आणि ते १) भाजपचे, २) पेड व ३) ट्रोल्स आहेत हे तीनही आरोप सिद्ध करा.

अभ्या..'s picture

18 Apr 2018 - 5:23 pm | अभ्या..

अशा प्रकारे हे ही प्रकरण टिपिकल मोडवर गेलेले आहे.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
.
ठयांकस मोदीकाका, आज नाश्ता सुरेख होता.
मिपा मात्र अधून मधून बंद पडू देऊ नकात.
थ्यांक्स अ लॉट

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2018 - 5:41 pm | श्रीगुरुजी

जेव्हा पुंबा महाराजांनी भाजप, पेड, ट्रोल्स इ. फेकायला सुरूवात केली, तेव्हा हे होणारच.

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2018 - 8:36 pm | श्रीगुरुजी

आज सोशल मिडियावर पाहिले तरी भाजपाचे पेड ट्रोल्स ज्या प्रकारे पिडितेवरच चिखलफेक करत आहेत, आरोपींचं निर्लज्जपणे समर्थन करत आहेत, कित्येकजन तर बलात्काराचे सुद्धा आडून आडून समर्थन करत आहेत ते तीव्र संताप आणणारे आहे.

याला काही पुरावा? का आपलं दिलं ठोकून?

ट्रेड मार्क's picture

18 Apr 2018 - 2:22 am | ट्रेड मार्क

ही कठुआची घटना जानेवारीमध्ये घडली, स्थानिक लोक तेव्हापासून निष्पक्ष तपासाची मागणी करत आहेत. कठुआ मधील स्थानिकांचं काय म्हणणं आहे बघा. केस CBI कडे द्यावी म्हणून लोक आधीपासून निदर्शनं करत होते पण आता आवई अशी उठवण्यात आली की बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ लोक निदर्शन करत आहेत.

आता ३ महिन्यानंतर अशी काय चक्र फिरली की एकदम सगळ्यांना जाग आली? नवीन बनवलेल्या SIT ने एका पुजाऱ्याला आरोपी केल्यानंतर कलाकारांपासून ते राहुल गांधीपर्यंत सगळे एकदम ऍक्टिव्ह झाले? आश्चर्याची गोष्ट म्हणजे कठुआनंतर लहान मुलींवरच्या तितक्याच घृणास्पद अत्याचाराच्या ६ घटना भारतातच घडल्या आहेत. पण त्यातल्या सुद्धा फक्त युपी मधल्या बातमीवर फोकस केला गेला. बाकी मुलींवर झालेल्या अत्याचाराबद्दल कोणाला फारसं काही वाटलेलं दिसत नाही. याचं कारण काय असावं? असं विचारलं की फक्त सारवासारव म्हणून काहीतरी उत्तर द्यायचं की झालं. पण असिफा सोडून बाकी कुठल्या घटना, त्यात नक्की काय झालं, कोण आरोपी, कोण पीडित हे पण बहुतेकांना माहित नसेल.

राहुल गांधी वरही बलात्काराची केस चालू आहे म्हणल्यावर तत्परतेने कोर्टानी बाइज्जत बरी केलंय म्हणून दाखवणारे हे मात्र सोयीस्कर रित्या विसरतात की आसिफाच्या घटनेत पण पुजाऱ्यावर फक्त पोलिसांनी आरोप ठेवलेत. पण संपूर्ण देश, समस्त भारतीय पुरुष आणि हिंदू धर्म बदनाम करायला फक्त पोलिसांचे आरोपच पुरेसे आहेत नाही का?

पुंबा's picture

18 Apr 2018 - 3:02 pm | पुंबा

On February 15, Chander Prakash along with another BJP leader Lal Singh had participated in a rally organised by right-wing Hindu Ekta Manch to demand the release of a special police officer, Deepak Khajuria, who is accused in the rape and murder case.

हे वाचा. पोलिसास सोडून द्या यासाठी काढलेला मोर्चा होता तो.

https://thewire.in/politics/hindu-ekta-manch-bjp-protest-support-spo-arr...

हे आरोपी पोलिसाच्या समर्थनार्थ काढलेल्या तिरंगा मार्चबद्दल.

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2018 - 5:05 pm | श्रीगुरुजी

घटना जानेवारीत घडल्यानंतर लगेच बलात्कार व खुनासाठी एका १५ वर्षीय मुलाला अटक झाली होती. त्याचे पुढे काय झाले ते समजलेले नाही.

http://m.greaterkashmir.com/news/jammu/15-year-old-boy-accused-of-murder...

ट्रेड मार्क's picture

18 Apr 2018 - 7:53 pm | ट्रेड मार्क

वायर हे घटना ट्विस्ट करून बातम्या देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही वायर सोडून अजून कोणाच्या बातम्या बघितल्यात?

ही बातमी वाचा. तिथल्या लोकल पेपरने दिलेली आहे आणि तुमचा पुढचा संशय फिटवण्यासाठी बातमीदाराचं नाव बघा.

हिंदू एकता मंचमध्ये आणि सगळ्या निदर्शनांमध्ये भाजप, काँग्रेस सहित सगळ्या पक्षांचे लोक सामील होते. सगळ्यांची मागणी एवढीच आहे की सीबीआय चौकशी व्हावी. कोणीही गुन्हेगाराला सोडून द्या म्हणून म्हणत नाहीये. त्या देवळाचे फोटो, व्हिडिओ आंतरजालावर उपलब्ध आहेत. फक्त एक खोली असलेल्या देवळाला तीन दारं, त्यातली दोन अर्धी जाळी असलेली, बंद न होणाऱ्या खिडक्या आहेत. कोणाला लपण्यासाठी/ लपवण्यासाठी योग्य जागाही नाहीये. त्यात ३ गावातले लोक रोज सकाळ संध्याकाळ पूजेसाठी आणि दर्शनासाठी येत असताना, त्या मुलीला ३ दिवस देवळात कोंडून ठेवणं आणि अत्याचार करणं कसं शक्य आहे? शेकडो लोकांपैकी कोणालाच ना आवाज आला ना मुलगी दिसली. नंतर त्या मुलीला मारून देवळापासून थोडं दूर आणून टाकलं, ते पण कुठे? तर स्वतःच्याच घरापासून १० फुटावर? म्हणजे एवढं ३ दिवस शेकडो लोकांपासून लपवून ठेवलं आणि मग मृतदेह टाकायची वेळ आली तर स्वतःच्या घराजवळ टाकला?

त्यावर कडी म्हणजे आरोपींमधला मुलगा गुन्हे घडले त्यावेळेला कठुआ पासून ११०० किमी दूर परीक्षा देत होता. याचे साक्षीदार प्रोफेसर आणि विद्यार्थी आहेत पण त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. हॉल तिकीट आणि उत्तर पत्रिका दाखवल्या तर दुसरंच कोणीतरी परीक्षा देत होता असा आरोप होतो?

यात तुम्हाला काहीच संशयास्पद वाटत नाही? घडलेली घटना अतिशय घृणास्पद आणि संतापजनक आहे, जो दोषी असेल त्याला चौरंगा करून म्हणजे हातपाय तोडून सोडून द्यावे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. फाशी देऊन एवढं पटकन यातनांतून सुटका का करावी? पण निष्पक्ष तपास होऊन गुन्हेगार कोण हे तर सिद्ध होउ दे. त्याच्या आधीच संपूर्ण देश आणि हिंदू धर्माला/ लोकांना बदनाम का करताय?

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2018 - 8:01 pm | श्रीगुरुजी

जानेवारीत घटना घडल्यानंतर लगेचच एका १५ वर्षीय मुस्लिम मुलाला पकडले होते. नंतर तपासणीत त्याचे वय १९ असल्याचे दिसले होते. त्या मुलाचे पुढे काय झाले ते अजून समजले नाही.

श्वेता२४'s picture

17 Apr 2018 - 5:09 pm | श्वेता२४

एवढी चर्चा इथे करण्यापेक्षा माहितगार यांनी भारत हा स्त्रियांसाठी अवघड बनत चाललाय यावर काहीच प्रतिक्रीया दिलेल्या नाहीत याचं आश्चर्य वाटतं. (मी तीथेही व्यक्त होणारच आहे.) केवळ 5-6 प्रतिसाद आहेत त्यावर.

अलिकडे बलात्कारांच्या संख्येत आणि त्यातील निर्घृणपणात जी वाढ झालेली दिसून येत आहे, त्यामागचे एक महत्वाचे कारण जे असावे असे वाटते, त्याकडे फारसे कुणी लक्ष दिल्याचे दिसत नाही.
हल्ली प्रत्येकाच्या खिशात मोबाईल, त्यात अगदी स्वस्त इंटरनेट आणि त्यामुळे केंव्हाही, कुठेही, कितीही पोर्न बघण्याची झालेली सोय, यामुळे शाळकरी मुलापासून ते तथाकथित थोर आदरणीय स्वामी बापू इ. पर्यंत पुरुषांमधील बेछूट सुटलेली कामांधता ... हे एक महत्वाचे कारण असावे. काट्याने काटा निघतो तसे आधुनिक तंत्राज्ञानानेच यावर मात करण्यासाठी सरकारने नेट संबंधी जास्तीत जास्त कठोर निर्बंध घालणे अगत्याचे आहे. भलेही यामुळे तथाकथित व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आल्याची हाकाटी पिटली जावो.

मार्मिक गोडसे's picture

17 Apr 2018 - 11:17 pm | मार्मिक गोडसे

सरकारने नेट संबंधी जास्तीत जास्त कठोर निर्बंध घालणे अगत्याचे आहे.
नका हो असा अत्याचार करू ,'त्या'साठीच तर अनलिमिटेड नेटपॅक घेतो की राव आम्ही. जियो और जिने दो.

ट्रेड मार्क's picture

18 Apr 2018 - 2:20 am | ट्रेड मार्क

मारिया बाईंनी अतिशय मुद्देसूद मांडलं आहे. काही लोकांचा भारताला बदनाम करायचा अजेंडा आहेच आणि आपण एक सामान्य माणूस म्हणून त्याला किती बळी पडायचं हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. नशीब हा ब्लॉग एका गोऱ्या आणि त्यातून स्त्रीने लिहिलाय. पण आता लोक तिच्यावरही आरोप करू नये म्हणजे झालं.

ट्रेड मार्क's picture

18 Apr 2018 - 2:20 am | ट्रेड मार्क

मारिया बाईंनी अतिशय मुद्देसूद मांडलं आहे. काही लोकांचा भारताला बदनाम करायचा अजेंडा आहेच आणि आपण एक सामान्य माणूस म्हणून त्याला किती बळी पडायचं हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. नशीब हा ब्लॉग एका गोऱ्या आणि त्यातून स्त्रीने लिहिलाय. पण आता लोक तिच्यावरही आरोप करू नये म्हणजे झालं.

पैसा's picture

18 Apr 2018 - 12:10 pm | पैसा

John Swinton, 
former Chief of Staff of the most powerful and prestigious newspaper on earth, The New York Times, when asked to give a toast to the "free press" at the New York Press Club stated:

"There is no such thing, at this date of the world's history, in America, as an independent press. You know it and I know it. There is not one of you who dares to write your honest opinions, and if you did, you know beforehand that it would never appear in print. I am paid weekly for keeping my honest opinion out of the paper I am connected with. 

Others of you are paid similar salaries for similar things, and any of you who would be so foolish as to write honest opinions would be out on the streets looking for another job. If I allowed my honest opinions to appear in one issue of my paper, before twenty-four hours my occupation would be gone. 

The business of the journalists is to destroy the truth; to lie outright; to pervert; to vilify; to fawn at the feet of mammon, and to sell his country and his race for his daily bread. You know it and I know it and what folly is this toasting an independent press? We are the tools and vassals of rich men behind the scenes. We are the jumping jacks, they pull the strings and we dance. Our talents, our possibilities and our lives are all the property of other men. 

*"We are intellectual prostitutes."*

मीडियाच्या रोल बद्दल वरच्या पत्रकारिय प्रांजळ कबुलीस हसण्याचा स्मायली द्यावा कि खेदाचा हे ठरवणे कठीण आहे . ट. का. नि दिलेला मारियांच्या ब्लॉगचा दुवा मुख्यत्वे तुलनेच्या संदर्भाने असल्याने एका घटक वगळता https://mariawirthblog.wordpress.com/2014/01/27/why-this-focus-on-rapes-...

बाकी मत या चर्चेत व्यक्त करणे सयुक्तिक असावे . सालेक्टीव्ह बातमीदारी मागे काही अजेंडा असला तरी सिद्ध करणे तसे जिकिरीचे असते . कारण मूळ कारणातही तथ्य असते , माध्यमे केवळ कोणत्या बातमीला वर आणायचे त्यावर खेळतात . भारतात माध्यमांना पहले लक्ष वाचक वर्ग श्रोता वर्ग टिकवण्याचा असतो आणि मालकांच्या जाहिराती उत्पन्नाची काळजी घेणे आणि सोबत जमले तर पत्रकार आपले व्यक्तिगत हितसंबंध आणि मतप्रवाह जपत असतात . दक्षिण आशिया आणि विकसनशील संसदीय लोकशाहीत दुसरा सरळ प्रभाव सत्तेतील राजकीय पक्ष मग कॊणताही असो कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रश्टाचार या दोन पैकी एका समस्येवर रान उठवण्याची संधी सत्ताधारीपक्षाअंतर्गतच बऱ्याचदा पाहिली जाते कारण लक्ष्य अकार्यक्षम ठरवून मंत्री/मुख्यमंत्री / पंतप्रधान बदलण्याचे असते . या अंतर्गत गटबाजीला साथ देण्यात विरोधीपक्षांचा लॉंग टर्म फायदा असतो . सोबतीला पडद्या मागे बर्याचदा कोट्यावधीची कंत्राटे नेमकी कोणत्या गटा च्या कंत्राटदाराला मिळणार यावर बरेच हिशेब असतात आणि हे साटेलोटे ना सिद्ध करता येते ना जाणते समोर येते . हा देशांतर्गत मामला झाला .

परदेशातील शत्रूराष्ट्रांचे तुमची व्यवस्था ढळमळीत करण्याचे लक्ष्य असते जसे रशियाच्या पुतिनने अमेरिकेत ढवळाढवळ करून जशास ताशाचा प्रत्यय दिला हे शत्रूराष्ट्रांचे कारनामे वेगळे . पण युरोमेरीकी विकसित देशांचे सामरिक आणि त्यांच्या संरक्षण आणि व्यापारी आस्थापनांचेही हितसंबंध असतात त्यावर दुसर्या देशातील ढवळाढवळ योग्य वेळी अस्थिरता आंदोलने छेडून केली जाते (आताशा शीत युद्धातल्या काळाप्रमाणे सीआयए आणि केजीबी तेवढा सरळ हस्तक्षेप करण्याचे अतिरेकी कारवायांना समर्थन देण्याचे टाळतात पण तरीही सिरीयात होणाऱ्या हस्तक्षेपासारखे प्रकार होतातच पण आताच्या काळात हे अपवाद झाले ) आता नव्या काळात सरळ हस्तक्षेप तर करता येत नाही मग एन.जी. ओ नामक प्रकरणे हाताशी धरली जातात . (आता मिपावरच महिन्याकाठी दीडलाख पेकेज ची एका धाग्यावर चर्चा चालू आहे . त्याचे करते करविते कोना आहेत फन्डिंग कुठंन येते याची काहीही माहिती नाही -हे एका जस्ट उदाहरण म्हणून काही अनुचित असेलच असे नाही ) एनजीओचे फँन्डीन्ग परदेशातून कुठून तरी होता असते मल्टि नॅशनलचे अप्रत्यक्ष लागे बांधे असतात . सोईचे लोक पुढे आणले जातात हि मंडळी बातम्या लिहिण्यात अथवा बातमीदारांशी संवादात प्रशिक्षित असतात . मग आपल्याला अपेक्षित नकारात्मक बातम्या परदेशी मीडियात छापून आणल्या कि संबंधित कॉज साठी यरोमेरिकाना माणूस क्रेडिट कार्डावरून पैसे देतो तर शिवाय मल्टीनेशनल पैसा मागे उभा ठेवतात देखाव्यासाठी थोडाफार स्थानिक पैसाही उभा केला जातो . या समाजसेवी एनजीओनाही पैसे सोयीच्या बातम्या पसरवून फन्डिंग मिळवण्याच्या टेक्निकची सवय होऊन व्हीसीएस सर्कल तयार होते . पण यातील एनजीओत जॉईन होणारे बरेचसे पब्लिक लौकराच ऐय्याशी आणि उंची कार उंची हॉटेले विमान प्रवास उंची जीवनशैली आणि बऱ्याचदा अगदी भ्रष्टाचारासही सरावते याचा एका फायदा असा कि थातुरमातुर कामे आणि परदेशी मीडियासाठी चकचकीत रिपोर्ट पलीकडे काही होत नाही तेवढा सरकारलाही त्रास कमी :) मीडियाच्या प्रभावाखाली बरेच स्थानिकही काळाची उबळ आलेल्या मानसिक अवस्थेस पोहोचतात , निवडणूक आली कि नवी सरकारे नित्य नवे डाव !!

उगा काहितरीच's picture

18 Apr 2018 - 2:59 pm | उगा काहितरीच

काही तरी चुकतंय असं वाटत होतंच...
आता ही बातमी ..
आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी. शिवाय हे असं नाव , ओळख जाणिवपुर्वक उघड केली त्यांनाही शिक्षा व्हायला हवी.

सुबोध खरे's picture

19 Apr 2018 - 10:09 am | सुबोध खरे

सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'

हे काही पटलं नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Apr 2018 - 11:20 am | डॉ सुहास म्हात्रे

हे तर आहेच, पण सुरुवातीचा...

मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'

...हा सगळा मजकूर विचारात घेतला तर धागाकर्तीने कोर्टाच्या प्रक्रियेचा उपहास केला आहे आणि तिच्या मते कोर्टाच्या प्रक्रियेपेक्षा, 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?', ही प्रक्रिया जास्त योग्य आणि न्याय्य आहे असे सूचीत केले आहे. भावनेच्या भरात इकडे बहुतेक जणांचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. :(

गब्रिएल's picture

20 Apr 2018 - 11:42 am | गब्रिएल

Police deployed in UP village fearing communal tensions after Muslim ‘pradhan’ rapes a minor girl

Kerala priest who spoke against child abuse arrested for raping minor girl

ब्वोला मंडली लंडनमदी म्येणबत्तीमोर्चा कवा काडायचा ?!

श्रीगुरुजी's picture

20 Apr 2018 - 1:04 pm | श्रीगुरुजी

हा 'सेक्युलर' रेप असल्याने मेणबत्ती मोर्चा, निषेध इ. ची गरज नाही.

चित्रगुप्त's picture

20 Apr 2018 - 5:55 pm | चित्रगुप्त

'सेक्युलर' रेप .. आणि 'निधर्मांध' हे दोन्ही शब्द आवडले.

arunjoshi123's picture

23 Apr 2018 - 5:45 pm | arunjoshi123

खरंच कि, जम्मूच्या प्रकरणाबद्दल दाब्बून भावना उचंबळून आलेली मंडळी तीन दिवसांपासून गप्प आहेत.
==================================
कालची मध्य प्रदेशातली ४ महीन्यांची (टाईप करायला सुद्धा शहारे येतात हे वय) केस आहे. आणि सन्नाटा आहे.