तुमच्या देशात....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
13 Apr 2018 - 1:33 pm

मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
'........'
------
'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही.
'काय पाहणार हिंदमध्ये?'
तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं.
मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.'
मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.'
मी दरवाजे लावून बसते.
.....

धोरणसमाजजीवनमानविचारबातमी

प्रतिक्रिया

माझा भाऊ बघतही असेल, उद्या मुलगा विचित्र वागेलही. नाही कोण म्हणतंय?

इन द स्पिरीट ऑफ ओरिजनल सेंटेंस -
माझा भाऊ बघतो. मुलगा बघणार.
-------------------
बी फेअर.

दुसर्‍या धाग्याचे आमंत्रण देऊन , विषय थांबवणार होतो पण राहींनी तुलनेचा गोलपोस्ट सांभाळायचे ठरवले आहेच तर स्टिरीओ टायपींगचा विरोध म्हणुन हा तुमच्या लाडक्या आमेरीकेतील स्विमींग क्षेत्रातल्याच बातमीचा दुवा स्पृहणीय नक्कीच नसावा 100s of USA swimmers were sexually abused for decades and the people in charge knew and ignored it, investigation finds
बातमीची तारीख PUBLISHED: February 16, 2018 at 10:59 am | UPDATED: February 20, 2018 at 8:27 am

आणि आमेरीकन मरिन्सच्या उद्योगांच्या यादीचे स्मरण पुरेसे असावे दुव्यांची आवश्यकता नसावी. आपल्यातील वाईटाचे हे समर्थन नाही पण तुलनेचा गोल्पोस्ट सांभाळणे अनावश्यक पोकळ आधारावर आहे . तुलनेचा गोलपोस्ट वर चर्चा अजूनही केंद्रीत ठेवायची असेल तर गोलपोस्ट सांभाळणे चालू ठेवा

पिलीयन रायडर's picture

16 Apr 2018 - 5:35 pm | पिलीयन रायडर

"तुमच्या लाडक्या अमेरीकेत"

.....

बाकी आपण स्विमिंग आणि अमेरिका असं गुगलल की झालं असं वाटत असेल तर मुद्दा काय हे समजून घेण्याचे अजून कष्ट घ्यायचा स्कोप आहे.

तुमचे इतर धाग्यावरचे निमंत्रण सस्नेह नाकारत आहे. धन्यवाद!

...मुद्दा काय हे समजून घेण्याचे अजून कष्ट घ्यायचा स्कोप आहे.

ठिक आहे, भारतीय सोडून बाकी सगळ्या जगातले पुरुष वेगळे पाणि पीत असल्या मुळे शुकासारखे वैरागी आहेत, त्यामुळे बाकी जगाची लोक्संख्या अत्यंत रोडावली आहे ;) भारतातील सर्व सरसकट पुरुष वर बिटाकाकांनी म्हटल्यासारखे वखवखलेल्या नजरेचेच आहेत. आता समजा भारताची तुम्हाला सर्व आधीकाराम्ची हुकूमशाहाचे आधीकार दिले तर परिस्थिती बदलण्यासाठी आपण नेमके काय कराल ?

पिलीयन रायडर's picture

16 Apr 2018 - 8:36 pm | पिलीयन रायडर

आपण अत्यंत मुद्द्याचं आणि लॉजिकल बोलतो, त्यात कोणताही पूर्वग्रह नसतो, भावनिक मुद्दे नसतात.. असतात ती केवळ तथ्ये!

हा मुखवटा गळून पडला की मग असे प्रतिसाद येतात तर..

चर्चेला ना नसतेच कधीच माझी.. पण तुमच्यावर वेळ वाया घालवणार नाही. यदाकदाचित पूर्वग्रह गळून पडला आणि नसलेले अर्थ न काढता प्रतिसाद वाचता आले, तर जरूर प्रयत्न करा. फक्त मला सांगायला येऊ नका.

जय महाराष्ट्र!

लवकर जिंकलात की अभिनंदन हं अभिनंदन :) पण आता पुढे काय मग ?

माहितगार's picture

16 Apr 2018 - 9:15 pm | माहितगार

की नण्तरच उद्गारवाचक चिन्ह राहीले होते , ती उद्गार चिन्हाची भेट !

अभिदेश's picture

16 Apr 2018 - 4:41 pm | अभिदेश

मग तसंच भारतातून अमेरिकेत येणार्याना तुम्ही सांगता का , की इकडे कोणीही , कुठेही बंदूक घेऊन गोळीबार करतो . शाळेत , कॉलेज मध्ये तर नक्कीच होतो.
प्रबोधन हे दोन्ही बाजूनी व्हावे. भारतात जाणार्या आणि अमेरिकेत येणार्याना.

पिलीयन रायडर's picture

16 Apr 2018 - 5:31 pm | पिलीयन रायडर

अर्थातच! गोळीबार, रेसिझम, ड्रग्ज इ मुद्द्यावर मी भारतात कायम बोलते आणि स्पेसिफिकली ह्या न्यूज फॉलो सुद्धा करते.

बादवे मी भारतात रहाते. उगाच कुणाला मुद्दा नको की तिथे बसून भारताची बदनामी करतेय वगैरे.

बादवे मी भारतात रहाते.

परत आल्याबद्दल धन्यवाद. आनंद आहे.

आधीचे कट्टा इ. धागे वाचताना असा समज झाला होता की तिकडे जाऊन तिकडचेच कायमचे होणाऱ्या 99% पैकी तुम्हीही आहात की काय..

पिलीयन रायडर's picture

16 Apr 2018 - 6:43 pm | पिलीयन रायडर

नाही हो गवि! तो ही देश चांगला आहे पण अनेक कारणांसाठी मला भारत जास्त योग्य वाटला. म्हणून मग जास्त ताण न वाढवता परत आले.

टवाळ कार्टा's picture

16 Apr 2018 - 6:04 pm | टवाळ कार्टा

तुम्ही वीतभर कपडे घालून फिरलात तरी कुणी नजरही वर करून बघत नाही. स्विमिंग पूल मध्ये अमेरिकन पुरुष असेल तर तो आहे की नाही हे ही लक्षात येणार नाही अशा बेताने अलुफ राहून पोहत असेल.

याबाबत तुम्ही चूक आहात....तुम्ही कितीवेळा अमेरिकन पुरुषांचे boys talk ऐकले आहे? मी ऐकले आहेत....तेही बर्याच्दा

बहुतेकवेळा (प्रत्येकवेळा नाही) प्रत्येक पुरुष कोणत्याही स्त्रीशी बोलताना एकदातरी "natural attraction to opposite sex" या नजरेने बघतोच....फक्त ते बघणे "काही सेकंद ते नजरेसमोर असेपर्यंत" यामध्ये कुठेही असू शकते...पाश्चात्य देशांत लोकांना शारिरीक जवळीक फार लवकर आणि जास्त वारंवारीतेने मिळते त्यामुळे "तसे" बघणे जास्त वेळ लांबत नाही...मध्य-पुर्वेत किंवा आशियायी देशांत (Indian subcontinent) असा प्रकार नसल्याने बहुतेकदा "जमेल तितके आणि जमेल तेव्हा" काहीतरी बघावे/मिळावे याची तीव्रता जास्त असते

जाता जाता....कसे बघावे हि एक कला आहे....जी स्त्रीयांकडे जन्मजात असते....आणि बहुतांश पुरुषांना शिकवण्याची नितांत गरज आहे

पिलीयन रायडर's picture

16 Apr 2018 - 6:47 pm | पिलीयन रायडर

तुझा घोळ होतोय. Boys talk भारतात होत नाहीत? बादवे गर्ल्स talk सुद्धा अस्तित्वात आहेत. पण तो मुद्दा आहे का? तर नाही.

एक तर मी आधीच वर म्हणलं आहे की सरसकटीकरण होऊच शकत नाही. पण तरीही ओव्हरॉल बायकांकडे बघण्यातली वखवख बरीच कमी आहे. भारतात मात्र सर्रास लोक विचित्र बघतात.

तुझ्या लॉजिकची गल्ली किंचित चुकली आहे असं मला वाटतंय.

टवाळ कार्टा's picture

17 Apr 2018 - 7:03 pm | टवाळ कार्टा

आपणांस मुद्दा समजलेला नाही*

तुमच्या वाक्यातून सरसकटपणे अमेरिकन पुरुषांना सोज्वळतेचे सर्टिफिकेट दिले गेलेय त्याबद्दल माझा आक्षेप होता....त्या अनुषंगाने Boys talk चा विषय काढलेला (मुली गर्ल्स टॉक करतात हे जगजाहिर आहे आणि त्याबद्दल काहिच म्हणणे नाहीये)

ओव्हरॉल बायकांकडे बघण्यातली वखवख बरीच कमी आहे. भारतात मात्र सर्रास लोक विचित्र बघतात. याबद्दलच मी म्हणालेलो कि "कसे बघावे"** ही एक कला आहे जी स्त्रीयांकडे जन्मजात असते आणि पुरुषांना शिकण्याची नितांत गरज आहे

* कित्ती दिवसांनी गुर्जींचे कॉपीराईट असलेले वाक्य वापरले =))
** देखो मगर प्यार से

माहितगार's picture

17 Apr 2018 - 10:24 pm | माहितगार

या विषयावर माझ्या या (जाने २०१६) धाग्यावर आदिती तै नी त्यांचे विचार मोकळेपणाने मांडलेले दिसतात.

पण तरीही ओव्हरॉल बायकांकडे बघण्यातली वखवख बरीच कमी आहे.

भारतात स्वतःस सुंदर मानणार्‍या वा सर्व तसे मानत असलेल्या स्त्रीयांस पाश्चात्य देशांत काळ्या नि खालच्या वंशाच्या मानतात. उदा. नाशिकवरून आलेल्या मोर्च्यातल्या आदिवासी स्त्रीयांस अप्पर क्लास मुंबईकर वखवखलेल्या नजरेनं पाहत नाहीत तसं काहीसं. भारतात असणार्‍या आफ्रिकन स्त्रीयांत भारतीयांचा रस नसतो, तेच गोर्‍या स्त्रीयांत खूप जास्त रस असतो. त्या खालोखाल स्वतःच्या देशातल्या स्त्रीयांत. (हा रस केवळ सार्वजनिक स्थळांवरील नजरा, इ वरून ठरवला आहे.)
हेच अमेरिकन लोकांना लागू आहे.
======================================
स्त्रीयांचा सन्मान कोणत्या देशात किती आहे हे ठरवण्यासाठी त्या त्या देशातले पॉर्नचे प्रकार पाहावेत. प्रकारांची नावे आणि पाहणारांची संख्या, दिलेली रेटींग वरून त्या देशाबद्दल बरेच काही सांगता येईल. जितकं विकृत पॉर्न तितका वाईट देश हे साधं सूत्र लावावं.
====================
भारत सर्वात सोज्वळ देश असेल याबद्दल दुमत नाही.

टवाळ कार्टा's picture

19 Apr 2018 - 6:56 pm | टवाळ कार्टा

======================================
स्त्रीयांचा सन्मान कोणत्या देशात किती आहे हे ठरवण्यासाठी त्या त्या देशातले पॉर्नचे प्रकार पाहावेत. प्रकारांची नावे आणि पाहणारांची संख्या, दिलेली रेटींग वरून त्या देशाबद्दल बरेच काही सांगता येईल. जितकं विकृत पॉर्न तितका वाईट देश हे साधं सूत्र लावावं.
====================
भारत सर्वात सोज्वळ देश असेल याबद्दल दुमत नाही.

salute

कसले पोर्न बनवले जाते यावरून कोणत्याही देशाचे मुल्यमापन करायची वेळ आलीये?
प्रत्येक देशात लोकसंख्येच्या प्रमाणात किती लोक पोर्न बनवतात? आणि पोर्न बनवणार्यांमध्येसुद्धा विकृत पोर्न बनवणारे किती असतील? तितक्या लोकांवरुन अख्ख्या देशाचे मुल्यमापन?
आणि भारताच्या सोज्वळपणाबद्दल बोलायचे झाल्यास कोणत्याही पोर्न साईट्सवर MMS video असे शोधून बघितल्यावर रिझल्टमध्ये भारतीय स्त्रीयांचे किती व्हिडिओ येतात ते बघा जरा....मग भारत हा "स्त्रीयांचे चोरुन व्हिडिओ बनवणार्यांचा" देश असे म्हणायचे का? हाच सोज्वळपणा का?

बिटाकाका's picture

19 Apr 2018 - 7:48 pm | बिटाकाका

निकषांमध्ये पाहणाऱ्यांची संख्या याचा उल्लेख आपल्या नजरेतून सुटला असेल कदाचित म्हणून.....
*******************
अवांतर शंका - एमएमएस याचा सार्वत्रिक अर्थ शूट केलेला घाणेरडा विडिओ असा होतो का? किंवा आपल्याकडे तो तसा कोडवर्ड वापरतात तास तो जगभरात वापरतात का?

ट्रेड मार्क's picture

20 Apr 2018 - 6:28 pm | ट्रेड मार्क

एमएमएस म्हणजे Multimedia Messaging Service. कुठलाही व्हिडिओ, फोटो (फक्त अश्लीलच नव्हे) जेव्हा तुम्ही फोनमधले Messaging App (कायप्पा किंवा तत्सम नव्हे) वापरून पाठवता तेव्हा तो एमएमएस मध्ये जातो. तर लिखित स्वरूपातलं (type करून/ Text) जेव्हा पाठवता ते एसएमएस प्रकारात मोडतो.

अमेरिकेत अश्या चोरून काढलेल्या व्हिडिओजला बहुतेक Voyeur व्हिडीओ म्हणतात. नक्की माहित नाही.

स्विमिंग पूल मध्ये अमेरिकन पुरुष असेल तर तो आहे की नाही हे ही लक्षात येणार नाही अशा बेताने अलुफ राहून पोहत असेल.

बे वॉच खास भारतीयांसाठी बनवलेला कार्यक्रम दिसतो.
====================================
शिवाय पॅरिसमधे फॅशन शोज मध्ये अत्यंत वैराग्यपूर्ण दृष्टीने अंतवस्त्रधारी स्त्रीयांचे फोटो काढणं चाललेलं असतं.

मार्मिक गोडसे's picture

16 Apr 2018 - 2:01 pm | मार्मिक गोडसे

मेरा भारत महान वगैरे भ्रम मला तसेही नाहीचेत, आणि स्त्री असणं हे माझ्यासाठी जास्त मोठं कनेक्शन आहे.
+१११११११

माहितगार's picture

16 Apr 2018 - 2:21 pm | माहितगार

देशा बद्दल अभिमान नसलेल्यांनी, देशाची चिन्ता अभिमान असणार्‍यांवर सोडून देणे अधिक श्रेयस्कर असेल का ? आम्ही देशा बद्दल आभिमान आहे , देशास महान ठेवण्याचि आस आहे म्हणूनच सकारात्मक योगदान देतो . अभिमान नसलेलीच मंडळी कुकृत्ये करण्यात पुढे आणि अभिमान नसलेल्यांचीच भावंडे असतात का अशी साशंकता वाटते.

मार्मिक गोडसे's picture

16 Apr 2018 - 3:38 pm | मार्मिक गोडसे

देशाभिमान बाळगत २४*७ अत्याचार सहन करायचे काय? उलट थोडी नाचक्की केल्याने उरली सुरली लाज शिल्लक असेल तर निदान वठणीवर तरी येतील.

माहितगार's picture

16 Apr 2018 - 3:53 pm | माहितगार

देशाभिमान शिल्लक असेल किंवा वापस आला तरच शक्य व्हावे. खरा देशाभिमान असलेले अत्याचार करतही नाहीत आणि सहनही करत नाहीत. अत्याचार सहन न करण्यासाठी देशाभिमानाशी तडजोड करण्याची गरज नसते.

मार्मिक गोडसे's picture

16 Apr 2018 - 4:04 pm | मार्मिक गोडसे

मेरा भारत महान वगैरे भ्रम मला तसेही , आणि स्त्री असणं हे माझ्यासाठी जास्त मोठं कनेक्शन आहे.
मग लेखिकेने खरी वस्तुस्थिती समोर आणली तर ती देशाची नाचक्की कशी होते ब्बॉ?

मार्मिक गोडसे's picture

16 Apr 2018 - 4:11 pm | मार्मिक गोडसे

खरा देशाभिमान असलेले अत्याचार करतही नाहीत आणि सहनही करत नाहीत.
मग लेखिकेने खरी वस्तुस्थिती समोर आणली तर ती देशाची नाचक्की कशी होते ब्बॉ?

माहितगार's picture

16 Apr 2018 - 4:25 pm | माहितगार

मग लेखिकेने खरी वस्तुस्थिती समोर आणली तर ती देशाची नाचक्की कशी होते ब्बॉ?

एक मिनीट , किमान मी स्वतः देशाची नाचक्की वाली भूमिका कोणत्याही प्रतिसादातून मांडलेली नाही, तुलनेचा गोलपोस्ट नसलेला धागालेख मी स्वतःही काढला आहे. तो न पहाता आपण माझ्यासमोर प्रश्न ठेवता याचे आश्चर्य वाटते. आपले त्या धागा चर्चेत स्वागत आहे.

त्याच वेळी ओमान इस्लामी देश असोत जी युरोमीरेक्चे समर्थक त्यांचे तुलनेचे दावे गोलपोस्ट कमकुवत आधारावर व वस्तुनिष्ठ माहितीवर आधारलेले नाहीत हा माझा पहिला आक्षेप आहे . दुसरा आक्षेप सुरक्षा वाढवण्या बद्दल चर्चा करण्या एवजी स्वतः भ्यावे दुसर्‍यां स्त्रीयांनाही भिती घालावी यास आ़षेप आहे.

समस्या थोड्या फार फरकाने सर्वच देशात आहेत तशाच आपल्याही देशात आहेत . त्या बद्दल भितीचे वातावरण निर्माण करणे स्त्रीयांच्या स्वतंच्या फायद्याचे आहे का या बाबत साशंक ता आहे. ओमानी किंवा परदेशी किंवा भारतीय स्त्रीस भारतात फिरताना कोणती काळजी कशी घ्यावी . भारतात उपलब्ध सुरक्षेचे उपाय कोणते , काय सुधारणा करता येतील अशी रचनात्मक चर्चा न करता केवळ मानसीक भिती वाढवत नेणारे वातावरण निर्मिती बद्दल साशंकता आहे.

सुखीमाणूस's picture

16 Apr 2018 - 2:03 pm | सुखीमाणूस

मुसलमान बायका बुरखा घालतात हे अगदी योग्य आहे. किती सुरक्षित असतात ना त्या!!

आपल्या हिन्दु/ ख्रिश्चन /बौद्ध/शीख स्त्रिया फार पुढारलेल्या आहेत. तोकडे कपडे घालताहेत आणि अनर्थ होतोय.

चला पुढच्या काही वर्षात आख्खा भारत बुरख्यात आणू शरियत कायदे आणू मग स्त्रिया एकदम सुरक्षित आणि दुय्यम वागणुक मिळाली तरी सुरक्षितता किती महत्वाची!!

तेव्हा भारतीय स्त्रियानो परंपरा पाळा मग तुम्ही भारताबाहेर असलेल्या स्त्रियान्सारख्या सुरक्षित राहाल.

कवयित्रीच्या भावना समजावून न घेता शब्दांचा काहीही किस पाडणे चालू आहे ह्या धाग्यावर

माहितगार's picture

16 Apr 2018 - 5:06 pm | माहितगार

@ प्रचेतस , भावनांच्या भांडवलावर वस्तुनिष्ठता आणि तर्कसुसंगतते शी तडजोडीची भलावण कशा साठी. याच लेखीकेच्या एका कवितेची बाजू तर्कसुसंगत विश्लेषणाने मी स्वतः लावून धरलेली आहे म्हणजे व्यक्तिगत आकसाचे प्रश्न नाहीत. स्त्री विषयक प्रश्नावर दुसर्‍या धाग्याचा पर्यायही उभा केला आहे. भारत बायकांसाठी अवघड देश आहे ... तिथे आपापले इगो बाजूस ठेऊन हा धागा लेख वस्तुनिष्ठतेच्या प्रश्नावर फसला आहे हे ईगो बाजूस ठेऊन स्विकारावे अथवा न स्विकारता इथला चुकीचा तुलनेचा गोलपोस्ट सांभाळत ही का असेना दुसर्‍या रचनात्मक चर्चेत सहभागी का होता येणार नाही ?

माहीतगारसाहेब डोंट माइंड, पण आपल्याइतके सुसंगत, विषयाच्या परफेक्ट चाकोरीतून जाणारे, व्याकरणदृष्ट्या, राजकीय, सामाजिक, वैज्ञानिकदॄष्ट्या परफेक्ट वाचायचे असते तर मिपावर कशाला आलो असतो?
मिपा हा कट्टा आहे, जड विचारवंतांचा अतिजड शब्दातला बोजड परिसंवाद नाही.

साहेब परिसंवाद हरला आहे हे मन मोकळ्या मनाने स्विकारुन द्राक्षांना आंबट म्हणायचे सोडून चर्चा तुलने सोडून कन्स्ट्रक्टीव्ह सुधारणांकडे न्यावी

कन्स्ट्रक्टिव्ह सुधार्णा अशा प्रकारच्या परिसंवादातून कशा निर्माण होतात आणि त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात कितपत परिणाम होतो ह्याचे सध्याच्या बघण्यातले एखादे दुसरे उदाहरण दिले तर फार आभारी राहीन साहेब.
उदाहरणांसाठी आगामी धन्यवाद.
पटणार्‍या उदाहरणांचा उल्लेख न करुन, न पटणार्‍या उदाहरणाकडे दुर्लक्ष करण्याचा हक्क राखून ठेवित आहे.

प्रसाद_१९८२'s picture

16 Apr 2018 - 4:59 pm | प्रसाद_१९८२
माहितगार's picture

16 Apr 2018 - 5:14 pm | माहितगार

हे असले उद्योग कन्स्ट्रक्टीव्ह नाहीत , पाकीस्तानसारखे शत्रुरास्।ट्र उत्साहात असे टि शर्ट तयार करुन वाटेल आणि असे टिशर्ट असे टि शर्ट दुसर्‍या देशांबद्दलही तयार करुन भारतीयांना वितरीत करता येतील .

कन्स्ट्रक्टीव्ह चर्चेच्या धाग्यात चर्चेचे आवाहन अहे

श्रीगुरुजी's picture

16 Apr 2018 - 9:07 pm | श्रीगुरुजी

धागा लेखिकेच्या भावना समजू शकतो. हा अत्यंत घृणास्पद व गंभीर गुन्हा घडला आहे. या गुन्हेगारांना फाशीच शिक्शा सुद्धा सौम्य ठरेल.

या प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत. त्याचे कारण आपली अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर न्यायव्यवस्था आहे.

त्याचे कारण आपली अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर न्यायव्यवस्था आहे.

ऊपाय योजना ?

या गुन्हेगारांना फाशीच शिक्शा सुद्धा सौम्य ठरेल.

फाशीच्या पुढे काय काय शिक्षा वाढवता येतील ?

धर्मराजमुटके's picture

16 Apr 2018 - 9:44 pm | धर्मराजमुटके

पुरुषांची मानसिकता एका रात्रीत बदलणार नाही.
कदाचित ह्या बातमीत दाखविल्याप्रमाणे उपाय केले तर काही होऊ शकेल.

राज्यात आणि केंद्रात १००% स्त्रियांचं सरकार आणावं. आपल्या लोकसंखेच्या जवळपास ४८-४९% स्त्रिया आहेत. शिवाय त्यांना सपोर्ट करणारे ५-२५% पुरुष सहजच मिळू शकतील. स्त्रियांना स्त्रियांचं दु:ख चांगल्या प्रकारे कळत असं म्हणतात त्यामुळे काही सुधारणा होऊ शकेल.

आणि हो, हे सगळे होईपर्यंत सगळ्या पुरुषांनी घराबाहेर पडताना गॉगल घालणे बंधनकारक करावे, कमीतकमी स्त्रियांना वाईट नजरांचा सामना करावा लागणार नाही.

टवाळ कार्टा's picture

19 Apr 2018 - 6:57 pm | टवाळ कार्टा

शेवटच्या वाक्यासाठी सहमती

पिलीयन रायडर's picture

16 Apr 2018 - 10:15 pm | पिलीयन रायडर

चर्चा ही भारतातली स्त्रियांची सुरक्षितता ह्या सर्वसाधारण मुद्द्यावर होती. आणि माझं मत काय आहे हे मी विस्ताराने वर लिहिलं आहे.

एक दोन मिनिटांसाठी भारतीय असणं, पुरुष किंवा स्त्री असणं विसरून विचार केला तर घडलेल्या घटना कोणत्याही व्यक्तीला हादरवून टाकतील इतक्या क्रूर आहेत. मला वाटतं त्याचं गांभीर्य मिपाच्या स्वभावाप्रमाणे धागा पुढे गेला तर नक्कीच हरवून जाईल आणि धागा स्त्री वि पुरुष, भारत वि अमेरिका वगैरे नेहमीच्या मुद्द्यावर घसरेल. किमान मला त्यात पडण्याची इच्छा नाही. मुद्दाम ओढल्या जाण्याची तर अजिबात नाही.

माझ्या कडून संपूर्ण चर्चेस इथेच पूर्णविराम. जे घडलं त्याच्या उद्वेगातून स्त्रिया बोलणार हे सत्य आहे. लेख त्याच भावनेतून आला आहे. किमान त्याचा आदर केला जावा इतकीच इच्छा.

धर्मराजमुटके's picture

16 Apr 2018 - 10:19 pm | धर्मराजमुटके

+१

ट्रेड मार्क's picture

17 Apr 2018 - 3:35 am | ट्रेड मार्क

आक्षेप या वाक्याला आहे - मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.'. यातून एका अडनिड्या वयातल्या शाळकरी मुलीच्या मनात काय प्रतिमा निर्माण होत असेल? एक स्त्री म्हणून तुम्हाला आलेली उद्विग्नता मान्य आहे पण म्हणून संपूर्ण देशाला आणि पर्यायाने समस्त भारतीय पुरुष स्त्रियांवर अत्याचार करतात असं चित्र उभं करण्यावर आक्षेप आहे. भारतात किती परदेशी पर्यटक दर वर्षी येतात याचे स्टॅटिस्टिक्स या रिपोर्ट मध्ये आणि या बातमी मध्ये बघा.

रिपोर्ट प्रमाणे ८-१० मिलियन परदेशी लोक भारतात दर वर्षी येतात. यात अगदी ३०-३५ टक्के स्त्रिया धरल्या तरी या सगळ्या स्त्रियांवर बलात्कार होतात काय? जरा इंटरनेट वर ट्रॅव्हल ब्लॉग्स धुंडाळलेत तरी सोलो फिमेल ट्रॅव्हलर्सचे भारतातले अनुभव वाचायला मिळतील. काही अपवाद वगळता बहुतेक स्त्रिया म्हणतात की त्यांना चांगला अनुभव आला आहे. अर्थात टॅक्सीवाले फसवतात किंवा गाईड मागे लागतात हे आहेच पण ते बहुतांशी आर्थिक फायद्यासाठी असतं. या स्त्रियांच्या मते लोक त्यांच्याकडे बघत बसतात किंवा त्यांच्याबरोबर फोटो काढायला येतात, पण त्यात त्या स्त्रियांना फार काही वावगं वाटत नाही. अर्थात बार किंवा पब मध्ये गेल्यावर सावध राहावं असा सल्ला पण या स्त्रिया देतात. पण बार/ पब सारख्या ठिकाणी हे प्रकार तर कुठल्याही देशात घडतात. इतर ठिकाणी होणाऱ्या sexual abuse बद्दल नुकतेच झालेले #metoo campaign बघा. अमेरिकेसारख्या देशात हायस्कुल आणि कॉलेजमध्ये एकदा जाऊन बघाच. या देशांमध्ये तरी सेक्स हा taboo मानला जात नाही तसेच स्ट्रीप क्लब वगैरेसारख्या ठिकाणी लोक्स हौस भागवून घेऊ शकतात तरीही बलात्काराचे, कुमारी मातांचे तसेच अल्पवयात झालेल्या लैंगिक आजारांचे स्टॅटिस्टिक्स बघा.

बाकी देशांची तुलना होणं स्वाभाविक आहे कारण धागालेखिका दुसऱ्या देशातील मुलीला भारताबद्दल सांगत आहेत. बरं कौतुक कशाचं तर दगडाने ठेचून किंवा हात पाय तोडून मारतात याचं? तिथे तर स्त्रीने बलात्कार झाला हे स्वतः सांगून मानत नाहीत, त्यासाठी २ पुरुषांची साक्ष लागते. वर ती सिद्ध करू शकली नाही तर दगडाने ठेचून मरण तिच्या वाट्याला पण येऊ शकतं.

त्यामुळे असं सरसकट विधान करण्यापेक्षा त्या मुलीला खालील प्रमाणे सांगणं उचित ठरलं असतं -

- भारतात बहुतेक सर्व ठिकाणी गर्दी असते, त्यामुळे चुकामुक होण्याची शक्यता आहे. तरी सतत आपल्या कुटुंबाबरोबर रहा.
- आईवडिलांना सोडून एकटं कुठेही जाऊ नकोस.
- प्रवासात अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या गोष्टी स्वीकारू नकोस/ खाऊ नकोस.
- जर आपल्या कुटुंबाबरोबर चुकामुक झालीच तर काय करावं.

या आणि अश्या सारख्या सूचना दिल्या असत्या तर योग्य ठरलं असतं. भारतात सगळं आलबेल आहे असं मुळीच म्हणणं नाहीये पण म्हणून अगदी सरसकट सगळ्या मुलींवर बलात्कार होतात किंवा सगळे पुरुष वासनांध आहेत आणि संधी मिळेल तेव्हा लैंगिक अत्याचार करतात हे सांगणं पण चुकीचंच आहे.

माझ्या आधीच्या प्रतिसादात युरोपात आणि अमेरिकेत घडलेल्या घटनांचा उल्लेख करण्याचं कारण हेच होतं की स्त्रियांवर अत्याचार या प्रगत देशातही होतातच. अमेरिकेत तर इतकी मस्त गोंडस लहान मुलं दिसतात सहज नुसता गालाला हात लावायची इच्छा होते. पण नुसतं बोट जरी लावलं तरी पेडोफाईल म्हणून तुमच्यावर संशय घेतला जातो. हे काय अकारण होतं का? तशी लोक होती आणि आहेत म्हणून तर असे कायदे बनवलेत. पण म्हणून काय अश्या लोकांची संख्या आणि असे गुन्हे कमी झाले का? तुमच्या आसपास कुठले गुन्हे घडले आणि किती गुन्हेगार राहतात याची माहिती देणारी मोबाईल ऍप्स उपलब्ध आहेत. न्यू यॉर्क, जर्सी सारख्या भागात पहिल्यांदा जेव्हा मी ऍप डाऊन्लोड केलं तेव्हा मला धक्का बसला. बरं अमेरिकेत तर काय गन सहज मिळते आणि वापरता येते. पण म्हणून अजून तरी कुठल्या अमेरिकनाने त्याच्या देशात फिरायला येऊ पाहणाऱ्याला माझा देश असुरक्षित आहे आणि तू येऊ नकोस असं सांगितल्याचं ऐकिवात नाही.

इंग्लंड मधली उदाहरणं दिली आहेत, संपूर्ण एका काउंटी मधल्या वय ८ ते ५० मधल्या एकूण एक मुली/ स्त्रिया लैंगिक अत्याचाराच्या बळी आहेत. नुसता एकदा एका नराधमाने केलेला बलात्कार नाही, तर वर्षानुवर्षे सतत होणारे गँगरेप आणि त्यातून या मुलींना लावलेली ड्रग्सची सवय. जवळपास १५ वर्ष हे चालू होतं आणि पोलिसांनाही माहित असून त्यांनी काही केलं नाही. कुठल्या ब्रिटिश व्यक्तीने, वर्तमान पत्राने किंवा न्यूज चॅनेलने ब्रिटन महिलांसाठी धोकादायक आहे असं सरसकट विधान केलं? या उलट निर्भयाच्या केसच्या वेळेला BBC ने India's Daughter प्रसारित केली.

या अश्या घटना जश्या उद्विग्नजनक आहेत त्याचप्रमाणे अश्या घटनांचा कुठल्यातरी अजेंड्यासाठी होणारा वापरसुद्धा उद्विग्नजनक आहे. तुम्ही तसा वापर करताय असं म्हणणं नाहीये पण या अश्या विधानांनी त्या अजेंड्याला पुष्टी कशाला द्यायची?

बिटाकाका's picture

17 Apr 2018 - 8:05 am | बिटाकाका

बहुतेक मुद्द्यांशी सहमत!!

सुबोध खरे's picture

17 Apr 2018 - 9:58 am | सुबोध खरे

एक अनुभव --
एका तरुण बलात्कारित मुलीची तपासणी करण्याचा प्रसंग. तिला बेदम मारहाण करून तिच्या वर बलात्कार झाला होता त्यामुळे तिच्या पोटातील अवयवांना काही इजा झाली आहे का हे तपासण्यासाठी सोनोग्राफी करत होतो. त्या दुर्दैवी मुलीशी बोलताना किंवा तिच्या यावर उपचार करताना लक्षात आलेला एक अतिशय महत्त्वाचा फरक असा आहे.
तिच्या बरोबर असणारी स्त्री डॉक्टर आणि नर्स तिच्याशी अतिशय जवळीकीने वागत होत्या आणि त्याच इतर पुरुष डॉक्टरांबरोबर "थोड्याशा" विचित्र वागत होत्या. या वागण्याचे विश्लेषण स्वतःशी करत असताना एक लखलखीत सत्य माझ्या समोर आले ते म्हणजे

प्रत्येक स्त्रीच्या मनात "आपल्यावरसुद्धा" केंव्हाही बलात्कार होऊ शकतो हा विचार असतो. हा विचार ८ ते ८० वयाच्या स्त्रीमध्ये कायम असतोच.

या विचारामुळेच कदाचित अशा मुलीशी अतिशय सहानुभूतीने ( सह + अनुभूती) वागत होत्या.

त्याच जागी माझ्या मनात असा कोणताच विचार( आपल्यावरसुद्धा" बलात्कार होऊ शकतो ) नव्हता त्यामुळे मी तिला दाखवत होतो ती एक "कणव" म्हणता येईल. व्याख्येप्रमाणे "सहानुभूती" म्हणता येणार नाही.

अशा प्रसंगी स्त्रिया या "आपण आणि ते (पुरुष) असा भेदभाव नैसर्गिक रीत्या करत होत्या.

याबद्दल वाचन करत असताना असाच अनुभव पाश्चात्य देशातील अनेक पुरुष डॉक्टरांना आल्याचे वाचनात आले.

या धाग्यावर मला हा फरक परत एकदा स्पष्टपणे जाणवतो आहे.

स्त्रिया बलात्काराबद्दल आणि एकंदर स्त्रियांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोटतिडीकेने किंवा सहानुभूती ने लिहीत आहेत. त्यात परत आपण आणि ते( पुरुष) यातील फरक जाणवतो आहे. येथे आपला बाप भाऊ आणि मुलगा याबद्दल भवन कशा व्यक्त कराव्या याची शंका दिसते

आणि पुरुष "कणव" असल्याने लिहीत आहेत. त्यात भावनाप्रधानता कमी आणि वस्तुनिष्ठता जास्त जाणवते.

पहा विचार करून परत एकदा.

स्त्रिया बलात्काराबद्दल आणि एकंदर स्त्रियांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोटतिडीकेने किंवा सहानुभूती ने लिहीत आहेत.

डॉक्टर , काल पिरा ताई सोबतच्या चर्चेत वुमेन आर फ्रॉम व्हीनस प्रमाणे केवळ मन मोकळे करण्याच्या गरजेचा अनुभव आला , ज्यात परिस्थिती बदलण्यासाठी कोणत्याही सोल्युशन्सची त्यांची अपेक्षा नसते , आणि पुरुष मंडळी सहसा सोल्युशन्स शोधण्यावर भर देतात .

मन मोकळे करणे संताप व्यक्त करणे, एकंदर स्त्रियांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोटतिडीकेने किंवा सहानुभूतीने व्यक्त होणे या कशा बद्दलच आक्षेप नाही . पण त्यासाठी वास्तुनिष्ठतेशी फारकत करण्याची काय जरुरी आहे . धागा लेखिके साहित काही जण आले पिंक टाकल्यासारखे निव्वळ सहानुभूती दाखवणे औपचारिकतेसारखे पूर्ण करून गेले . आपण पॉलिटिकली करेक्ट लिहिले कि संपले , नसता झमेला कशाला ? वाला हा एटीट्युड नाहीना याची बर्याच ठिकाणी शंका आली .

स्त्रीची स्त्रीला अमुक कारणाने सहानुभूती असते असे आपण म्हणता , भारताचे क्षण भर बाजूस ठेऊन बॉईज टॉक करणाऱ्या ट्रम्प महोदयांना स्त्रियांची मते कशी मिळतात ? अमेरिकेत कुणासही काहीही बोलले तरी त्यांची पहिली घटना दुरुस्ती १०१ टक्के भाषण स्वातंत्र्य म्हणजे वाईट संभाषणाचे स्वातंत्र्यही देते , कुणी स्त्रीस अपशब्द बोलले तर त्या बद्दल न्यायालयात दाद मिळण्याची कायद्यात काहीच व्यवस्था नाही , त्या मुले ट्रम्प किंवा अजून कुणी काही बोलले तर कायद्यात व्यवस्थेचा अभाव आहे . आता भारतात येऊ अमेरिकेचे गुणगान करणारी मंडळी या बाबत आपल्याकडे विशेष कायदा आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा वेळी मर्यादाही अंशतः का होईना उपलब्ध आहेत . आणि हा कायदा वापरता येतो हे सोईस्कर विसरू इच्छितात . भारतात महिला आयोग आहेत , राष्ट्रपती ते पंतप्रधान सर्व राजकीय पदावर थोड्या फार प्रमाणात का होईना महिला येऊन गेल्या आहेत . सध्या ज्या केसबाबत गवगवा होतो आहे तिथे हि मुख्यमंत्री एक महिलाच आहे. अमेरिकेत अद्याप एक हि महिला अध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकलेली नाही . एवढेच नाही अमेरिकी संसदेच्या स्त्री स्थानिक स्वराज्य संस्थात ३३ टक्के आरक्षण आहे . संसदेत स्त्रियांना आरक्षण मिळावे म्हणून मतदार पातळीवरून दबाव टाकण्याचा किती स्त्री संघटनांनी प्रयत्न केला आणि किती स्त्रियांनी साथ दिली असेल.

या सर्व दूरच्या गोष्टी आहेत . मी स्वतः: स्त्री विषयक कायद्याबद्दल किंवा अगदी स्त्रियांसाठी कॉपीराईट अशा विषयावर लिहिले आहे. - तेथील चर्चेत महिलांनी सहभाग धागा लेखक पुरुष आहे म्हणून टाळणे हास्ययास्पद ठरणार नाही का ? माझे लेखन क्लिष्ट असल्याची तक्रार असते पण कमीत कमी प्रयत्न तर केला . ( एका धाग्यात आदिवासी स्त्रीवर झालेल्या सामूहिक अत्याचारा बद्दल मी स्वतः लिहिले , संबंधित आदिवासी स्त्री दुसरा विवाह करू इचछीत मुस्लीमा सोबत पळून गेलेली आहे हे माहीत असूनही तिच्या त्या निवडी बद्दल तिला घरणास्पद शिक्षा देणे आणि त्या पुरुषी वागण्याचे त्या गावातील स्त्रियांकडून कड घेतली जाणे चुकीचेच वाटले . टीकाकारताना त्या अत्याचार भोगलेल्या स्त्रीचा मित्र मुसलमान आहे का अजून कोण हा विचार डोक्यातही आला नाही आणि त्या धाग्यात मी उल्लेखही केला नाही , पण पिंक टाकणारे मिपाकर अभ्या राव असोत अथवा स्त्रियांची बाजू फक्त स्त्रियाच घेऊ शकतात याचे पोकळ प्रदर्शन करणारे असोत त्यांना काही सोयर सुतक दिसत नाही )

मी स्त्री आहे , या धागा लेखाची लेखिका स्त्री आहे म्हणून आम्ही तिची बाजू घेतो , हे वरकरणी आकर्षक दिसणारे गृहीतक आहे . याझिदी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारां बद्दल मी लिहितो तेव्हा त्या अत्याचार झालेल्या स्त्रियांबाबत आपल्याला म्हणजे स्त्रियांना सहानु भुतीची गरज नाही कारण याझिदी स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल लिहिणारा पुरुष आहे , कोणते लॉजिक आहे हे ?

आम्ही ओमान , गल्फ किंवा युरोमेरिकेत होणाऱ्या स्त्रीवरील अत्याचाराबाबत उल्लेख करतो ते, पुरुषांनी लिहिले म्हणून ते अत्याचार झेलणार्या स्त्रिया नसतात कि भारता बाहेर च्या असल्यामुळे त्यांच्या वेदना कमी असतात ?

दहा पुरुष आले भावनेच्या भरात वस्तुनिष्ठ नसलेल्या पिंका टाकून गेले स्त्रियांना चालते का ? मग त्यांनी त्यांच्या वस्तुनिष्ठता साशंकित आहेत तिथे इतरांनी तडजोड करावी अशी अपेक्षा पुरुषांसाठी असणे नसणे दूर ठेवा . सुरक्षे ऐवजी भीतीच्या वातावरणाची निर्मिती स्त्रियांसाठी योग्य आहे का ? किमान याचा विचार करून काही कंस्ट्रक्टिव्ह विचार विमर्षातही सहभागी होण्यास तयार असू नये याचे आश्चर्य नाही कारण प कारण बर्याचदा पुरुषाचे दृष्टिकोन स्त्रियांपेक्षा अधिक पुरोगामी असू शकतात हे असंख्य वेळा सिद्ध झालेले असावे. असो.

इराण मधील अन्याझ ऐनी सायरस हिचा इराण मध्ये तिला कोणत्या दिव्यातून जावे लागले या बद्दलचा व्हिडीओ पण येथील काहींच्या लेखी त्यांच्या वेदना वेदना नसाव्यात कारण त्या भारतीय नाहीत .

इराण मधील अन्याझ ऐनी सायरस हिचा इराण मध्ये तिला कोणत्या दिव्यातून जावे लागले या बद्दलचा व्हिडीओ पण येथील काहींच्या लेखी त्यांच्या वेदना वेदना नसाव्यात कारण त्या भारतीय नाहीत .

वुमेन आर फ्रॉम व्हीनस प्रमाणे केवळ मन मोकळे करण्याच्या गरजेचा अनुभव आला , ज्यात परिस्थिती बदलण्यासाठी कोणत्याही सोल्युशन्सची त्यांची अपेक्षा नसते , आणि पुरुष मंडळी सहसा सोल्युशन्स शोधण्यावर भर देतात .

कुडंट एग्री मोअर..

इन जनरल स्त्रियांना सॉल्यूशन नको असतं, फक्त काहीही न बोलता ऐकणारा "लिसनर" हवा असतो. Sad but true...

माहितगार's picture

17 Apr 2018 - 2:51 pm | माहितगार

सॉरी आपल्या खालच्या प्रतिसादात डिस अ‍ॅग्रीमेंट होता ना हे अ‍ॅग्रीमेंट पाहिले नव्हते . प्रतिसादासाठी अनेक आभार

टवाळ कार्टा's picture

19 Apr 2018 - 7:00 pm | टवाळ कार्टा

लय राडा होउ शकतो या वाक्यामुळे =))

पिंक टाकणारे मिपाकर अभ्या राव असोत अथवा स्त्रियांची बाजू फक्त स्त्रियाच घेऊ शकतात याचे पोकळ प्रदर्शन करणारे असोत त्यांना काही सोयर सुतक दिसत नाही

माहीतगारजी आपण अद्याप सुतकात असलात तर ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायची कृपा करावी अथवा अभ्या पिंक टाकतो हा आरोप मागे घ्यावा हि नम्र विनंती. https://misalpav.com/comment/991489#comment-991489

...पटणार्‍या उदाहरणांचा उल्लेख न करुन, न पटणार्‍या उदाहरणाकडे दुर्लक्ष करण्याचा हक्क राखून ठेवित आहे.

या वाक्याचे दोन दिशांनी वेगवेगळे अर्थ निघू शकतात.

.....कन्स्ट्रक्टिव्ह सुधार्णा अशा प्रकारच्या परिसंवादातून कशा निर्माण होतात आणि त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात कितपत परिणाम होतो ह्याचे सध्याच्या बघण्यातले एखादे दुसरे उदाहरण दिले तर फार आभारी राहीन साहेब.

ह्या वाक्याचा सर्वसाधारण कल पुर्व गृहीत होत नाही असा आहे . आज चांगले लेख सोशल मिडीयावर सहज फॉर्वर्ड होऊ शकतात. आजचीच कुणाचि पोस्ट आहे ' आंब्याची पारख कशी करावी या संदर्भातला लेख सोशल मिडीयावर फिरत असल्याची. अजून एक उदाहरण सामाजिक - राजकीय विवाद टाळायचा म्हणून उल्लेख करत नाही , पण मी मिपावर अभ्यासपूर्ण पणे प्रथमच संकलीत केलेली माहिती गैरसमज दूर करण्यासाठी वापरली गेलेली स्वतः पाहिली आहे. स्गळ्यात महत्वाचे सकारात्मक दृष्टीकोण .

आणि सकारात्मक दृष्टीकोण नसेल तर समजा मी म्हणतो तशी रचनात्मक सुधारना नाही सुचवल्या आणि केवळ भावनाम्चे प्रदर्शन केले तरी शेवटी साध्य काय आहे ? पुढच्या अत्याचारानंतर आधीच्याच प्रतिक्रीया कॉपीपेस्ट मारायच्या ? मधल्या काळात काही सुधारणेची इच्छा हवी की नको .

एनी वे आपली आणि अंतरा आनंदाम्ची न्याय व्यवस्थे बाबतची रचनात्मक चर्चा आवडली गेलि आहे.

गामा पैलवान's picture

17 Apr 2018 - 11:52 am | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

आणि पुरुष "कणव" असल्याने लिहीत आहेत. त्यात भावनाप्रधानता कमी आणि वस्तुनिष्ठता जास्त जाणवते.

अगदी अगदी. याचं कारण म्हणजे बलात्काराच्या घटना ऐकल्या की पुरुषांचा कल ती समस्या सोडवण्याकडे असतो.

आ.न.,
-गा.पै.

झेन's picture

17 Apr 2018 - 12:09 pm | झेन

वारंवार घडणा-या या प्रकारच्या घटना मनाला अत्यंत क्लेश देतात. यात पीड़ित कोण आहे आणि देश कुठला आहे यानि काय फरक पडतो व्यक्ति तर माणूसच आहे. पण या परिस्थित मी काय करू शकतो. कैंडल घेवून मोर्चात जावू की whatsaap चा DP बदलू की सोशल मिडिया वर राग व्यक्त करू ?

"मी माझ्या कुटुम्बामधले पुरुष, स्त्री कड़े वस्तु म्हणून बघणार नाहीं हे आणि कुटुम्बातली स्त्री, स्वत: वस्तू बनुन गैरफायदा घेणार नाहीं/घेवू देणार नाही याची खात्री करेन. मला नाहीं वाटत हे अवघड आहे कारण मी माणूस असल्याने स्वत: हे नैसर्गिकपणे पाळतो कुणावर उपकार करत नाही."

नुसतं “metoo” म्हणून प्रश्न सुटणार नाहीं आणि दुस-याकडे बोट दाखवून मी जबाबदारी टाळू शकत नाही.

बाकी “तुमच्या देशात” नी होणारी सुरवात आणि “दरवाजे लावून बसण्याचा” शेवट फ़क्त दुस्र्याकडे बोट दाखवून आपली उद्विग्नता दाखवणे वाटते.

"मी माझ्या कुटुम्बामधले पुरुष, स्त्री कड़े वस्तु म्हणून बघणार नाहीं हे आणि कुटुम्बातली स्त्री, स्वत: वस्तू बनुन गैरफायदा घेणार नाहीं/घेवू देणार नाही याची खात्री करेन. मला नाहीं वाटत हे अवघड आहे कारण मी माणूस असल्याने स्वत: हे नैसर्गिकपणे पाळतो कुणावर उपकार करत नाही."

आवडले. यानंतर आपल्या मुलग्यांना स्त्रियांशी माणूस म्हणून वागायला शिकवणे आणि मुलींना स्वसंरक्षणाचे मार्ग शिकवणे हे झाले पाहिजे. एखादी दुर्दैवी घटना तरीही घडली तर ती लपवून, त्यावर पांघरूण न घालता संवाद झाला पाहिजे. प्रत्येक घरात, नात्यात संवाद असला पाहिजे हे महत्त्वाचे आहे.

आरोपीना तत्काळ फाशी द्या म्हणून मोकळे होउन आपण आपल्या कामाला लागतो. कोणी असा विचार करत नाही की एखाद्या निरपराधाला त्यात शिक्षा होउ नये. एकांगी कायदे झाले आणि त्याचा फायदा घेऊन उद्या कोणी तुमच्या मुलाला अडकवले तर त्याला फाशी द्या म्हणून तुमच्याकडून मागणी होईल का?

या धाग्यावर सुरुवातीला ठीकठाक असलेली चर्चा नंतर आक्रस्ताळी होत गेली. ते अपेक्षित होतेच. धागालेखिकाही सुरुवातीला चर्चेत भाग घेत होत्या नंतर त्या दिसेनाशा झाल्या. कदाचित धाग्याची हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहून असेल. प्रत्येकाने आपल्यापुरते बोला ना! ते आणि आम्ही असे सरसकटीकरण कशाला? मागे दिल्ली बलात्कारानंतर हे म्हटले होते की पुन्हा असे काही घडले की मेणबत्त्या मोर्चे वगैरे होईल आणि पुन्हा सगळे थंड होईल. तेव्हा राजकारणासाठी फायदा उठवणे ही गोष्ट विचारात घेतली नव्हती. आता तेही सगळ्यांकडून पुरेपूर होताना दिसत आहे.

न्यायालयांच्या आणि पोलिसांच्या नावे बोटे मोडताना ते किती कमी संख्येने आहेत, त्यांच्यावर किती प्रकारचे किती दबाव आहेत याचा कोणी विचार करत नाही. सगळे जे जसे आहे ते तसे माझे आहे. माझा देश आहे. त्यात कितीही कमतरता असो, वैगुण्य असो. "आम्ही घरात आपसात भांडू पण बाहेरच्यांशी वागताना आम्ही १०५" हे जुने शहाणपण आता लोकांना का आठवत नाही?

माहितगार's picture

17 Apr 2018 - 3:00 pm | माहितगार

+१

राजकारण्यांचे म्हणाल तर बहुतांश सर्वच राजकीय पक्षात स्थिती वाईट असावी. मी अगदी लहानपणी राज्याच्या गृहमंत्र्याने त्याच्या पाठीराख्यांना पाठीशी घातलेले अनुभवले आहे आणि ती व्यक्ती पुढे गृहमंत्री झाली. अनेक किस्से आहेत कोणत्याच राजकारण्यांची बाजु घेण्यात पॉईंट नाही. ३३ % सम्सदीय आरक्षणासाठी प्र्यत्न करणेही पुरेसे नाही घराणेशाहीला आणि मतदानातील वोट बॅन्क प्रकार बंद व्हावयास हवेत. राजस्थानातील एक व्यक्ती सध्या केंद्रीय मंत्रीपदावर असणे खटकते . पण वोट बॅन्क लूज न करणे प्रत्येक पक्ष करत आला आहे. मला वाटते हा विषय सिंहासन या सुपरिचीत मराठी ग्रन्थातही चर्चीत आहे.

* ती व्यक्ती पुढे मुख्यमंत्री झाली.

जूलिया's picture

17 Apr 2018 - 3:04 pm | जूलिया

+१.............. नूसता भीती, हतबलता, सन्ताप येवून काहिच होणार नाहिये. भावनिक स्वातंत्र्य शिकवणे खूप महत्वाचे आहे.
स्त्री नेच स्त्री ला मदत करायला हवी, judgemental न होता.

बिटाकाका's picture

17 Apr 2018 - 3:07 pm | बिटाकाका

स्त्री नेच स्त्री ला मदत करायला हवी, judgemental न होता.

लाख वेळा सहमत. आणि या प्रक्रियेत पुरुषांनी स्त्रियांसोबत खांद्याला खांदा लावून भक्कम उभे राहावे.

बिटाकाका's picture

17 Apr 2018 - 3:07 pm | बिटाकाका

+१००००.

पुन्हा पुन्हा चुकतेय. धागा स्त्रीचा आहे, म्हनून कुणीच सपोर्ट करत नाहिये.
आअम्ही सगळ्याच जणी डॉक्टर खर्‍या.नी नमूद केलेली भीती, हतबलता, सन्ताप अनुभवतोय.

तुम्ही समस्या सोडवण्यावर चर्चा भारताबाहेरील लेखिका विरुद्ध भारतातील घटना इकडे नेलीत. आअमच्या मनात , आमच्या देशात कुठल्याही क्शणी आम्ही सुरक्शित नाही ह्याब द्दल जे वाटते ते तुमच्या प्॑र्यन्त पोचतच नहिये.

सुबोध खरे's picture

17 Apr 2018 - 12:57 pm | सुबोध खरे

@nanaba
आपल्यावर बलात्कार होऊ शकतो हि भीती देशातीत आहे. (जगातील प्रत्येक देशातील स्त्रीच्या अंतर्मनातील असलेली भीती).

जिथे जितकी जास्त यौनशुचिता तितकी भीती जास्त.

आणि या भीतीतुन ८० वर्षाची स्त्री सुद्धा सुटलेली नाही. म्हणूनच मी ८ ते ८० हे वय लिहिले आहे

(अर्थात ८ वर्षापेक्षा लहान मुलीला बलात्कार म्हणजे काय हे समजतच नाही)

आअम्ही सगळ्याच जणी डॉक्टर खर्‍या.नी नमूद केलेली भीती, हतबलता, सन्ताप अनुभवतोय.

तुम्ही समस्या सोडवण्यावर चर्चा भारताबाहेरील लेखिका विरुद्ध भारतातील घटना इकडे नेलीत. आअमच्या मनात , आमच्या देशात कुठल्याही क्शणी आम्ही सुरक्शित नाही ह्या ब द्दल जे वाटते ते तुमच्या प्॑र्यन्त पोचतच नहिये.

अहो मॅड म , भारतात होणार्‍या अत्याचारांबाबत मी स्वतः सुद्धा मागे मिपावर लिहिले आहे याचा वर उल्लेख केला आहे ते काय काही ना पोहोचता शो पीस म्हणून लिहिले होते , काही शेंडा बुडुख ? स्त्री समस्या ते कायदे बरेच लेखन आहे माझे मिपावर . - अगदी मेघालयतील स्त्रीला पोषाखावरून दिल्ली क्लब बाहेर काढले ते तृप्ती देसाईंचे आंदोलन चालू असताना शनी मंदिर प्रवेशाची बाजू उचलून धरली आहे ते मनुस्म्र्तीतील स्त्री विषमते बद्दलही आवर्जून लिहिले आहे . तर त्याबद्दलही मी लिहिले आहे -मंदिरात स्त्रियांना पो शाखा सक्ती नसावी वादलो आहे शाखा सक्ती असू नये या बद्दल डॉ खर्यांशी वादलो आहे , आणि स्त्रियांच्या बाजूने मिपावर अनेक वेळा वादलो आहे . स्त्रिया नां जे वाटते पर्यंत पोहोचत नाही ह्या दाव्याला आपल्या कडे नेमके काय आधार आहेत ? दाव्याला काही बूड आहे की नाही ?

आणि केवळ भीती घालू नका सुरक्षे बद्दल विचार करा हा रचनात्मक विचार तुमच्या पर्यंत पोहोचतोय कि नाही ? इतर देशातील स्त्रियांच्या वेदना तुमच्या पर्यंत पोहोचतात कि नाही ? माझ्या पर्यंत इतर सर्व देशातील स्त्रियांच्या वेदना पोहोचू शकता असतील तर भारतीय स्त्री बद्दलच्य वेदना पोहोचत नाहीत हा जावई शोध आपण परस्पर कसा काय लावता ? या बद्दल सर्टिफिकेटची माझ्या कडुन अपेक्षेत नेमका पॉईंट काय आहे ?

त्या पिरा ताई म्हणतात गुगल शोधून माहिती देतोय पण त्याने परदेशातील वस्तुस्थिती परदेशी स्त्रीच्या वेदनांचे गांभीर्य कसे कमी होते ? बाया द वे माझे ज्ञानकोशीय लेखन वाचन आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वाचन अत्यंत जुने आहे . चिलीच्या चर्च मधील स्त्रियांवरील अन्याय हा हा धागा पाहिल्या नंतर वाचलेला नसतो तो आधीच वाचून झालेला असतो . ओमानच्या पोलीस दलाचा मी अतिथी राहून आलेला असतो तरीही त्यान्चे खाल्ले म्हणुन आन्धळी भूमिका घेत नाही. मी पिराताईंना त्या च बरोबर आहेत याचे सर्टिफिकेट कालच दिले आहे ते आपल्या प्रमाणे इतरांनाही ज्यांना हवे त्यांनी घेऊन जावे . असो

माहितगार's picture

17 Apr 2018 - 10:46 pm | माहितगार

हे पहा माझ्या धाग्यावर salishi sabha खाप आणि जात पंचायत
मी वर उल्लेख केलेल्या पश्चिम बंगाल मधील एका आदीवासी स्त्रीवरील सामुहीक अत्याचाराच्या केसचा उल्लेख केला आहे. त्यावर केवळ पैसा ताईंचा प्रतिसाद आहे. मी उपस्थित केलेल्या प्रतिसादाची तारीख आणि त्याच तारखेच्या आसपास उर्वरीत चर्चेत सहभागी माननीय सदस्यांची नावे पहा. आताचे सोईस्कर मापदंड किती खुजे आहेत आपण कसे केवळ टिव्हीच्य बातम्यांनुसार रिअ‍ॅक्ट होतो हे लक्षात येण्यास फारसा वेळ न लागावा. पण एका माननीय सदस्या महोदयांनी म्हटलेच आहे धागा प्रतिसाद लेखक स्त्री असेल तरच कनेक्ट येतो , अत्याचार झालेल्या व्यक्तींशी देणे घेणे नसावे . अजून कुठे खीस पाडायचा ? असो चालायचेच .

एकन्दरीत भारताबाहेर सेफ जागी पोहोचू शकलेल्या इंडियन ओरिजिन नागरिकांनी आहे तिथेच कायम सेफ राहावं. उगीच भारतात परत येऊन जिवाला जोखमीत टाकू नये असं कन्क्लूजन करता यावं.

अभ्या..'s picture

17 Apr 2018 - 1:12 pm | अभ्या..

गवि द ग्रेट.
.
.
.
कधीपासून येऊ ट्युशनला?

अंतरा आनंद's picture

17 Apr 2018 - 1:13 pm | अंतरा आनंद

थेट लिहायचं टाळत होते ते लिहीतेच. माहितगार, गापै आणि इतर काही यांचा सात्विक संताप समजला. कोणतं सोल्युशन शोधताय? स्त्री हे सॉफ्ट टार्गेट आहे, काही प्रमाणात असणार. त्यामुळेच सक्षम राज्य आणि न्यायव्यवस्थेचा तिला आधार वाटतो. लोकशाही देशात ही व्यवस्था नामक काही चीज असते. ती कुठे हरवलीय ते शोधा. कठुआ इथल्या घटनेत वकीलांनी आरोपींवर गुन्हा दाखल होताना घातलेला हैदोस थोर वाटतोय का? का, जगात असंही कुठे कुठे होतं त्याचीही आकडेवारी फेकणार आहात? भले ते निरपराध असतील , मग न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का वकीलांचाच? हे धोकादायक नाही वाटत? आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा निघणे त्यात राज्यातील दोन मंत्र्यांनी सहभागी होणे हे व्यवस्थेचे काय बारा वाजलेत हे दाखवतं आणि माझ्या दृष्टीने हे जास्त भीतिदायक आहे. (प्रकरण फार गाजल्यावर त्यांना राजीनामे द्यावे लागले ते गाजलं नसतं तर या मंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात आजून काय काय केलं असतं?)
उन्नावमध्ये पिडीतेच्या वडिलांचाच पोलिस कोठडीत झालेला मृत्यू, हे माझ्या दृष्टीने जास्त धोकादायक आहे. कुठली उदाहरणं देताय? कुठेय ते सुशासन? (भले गेली साठ वर्षही ते विजनवासातच होतं असं मानूया) कुणाची पाठराखण करताय? का, कश्यासाठी? कुठे नेताय विषय? घाणेरड्या गुन्ह्याला, गुन्हा करणार्‍याला राज्यव्यवस्थेत कळीच्या पदावर असणार्‍यांनी पाठीशी घालायचा, उघड गुंडागर्दीच्या जोरावर वाचवायचा प्रयत्न करणं हे फार फार धोकादायक नाही वाटत का? आणि या अश्या गोष्टी माझ्या देशात घडाव्यात हे पुरेसं वेदनादायक नाही का? अश्यावेळी इतर देशातही महिलांवर अत्याचार होतात, उघड खून पडतात ह्याची भली थोरली आकडेवारी वाचून आम्ही मेरा देश महान गाणं गात बसायचं का?
गुन्हा हीणकस आहेच पण तो करणार्‍याला निव्वळ गुंडागर्दीच्या जोरावर वाचवणारे जास्त गुन्हेगार आहेत आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्याची तीव्रता कमी दाखवण्याचे प्रयत्न करणारेही.

माहितगार's picture

17 Apr 2018 - 1:21 pm | माहितगार

एक मिनीट इथे कुणीही कशाची पाठराखण करत नाहीए . हा गोड गैरसमज डॉक्यातून लौकरात लौकर काढून टाकावा हि नम्र विनन्ती

बिटाकाका's picture

17 Apr 2018 - 1:51 pm | बिटाकाका

एक मिनीट इथे कुणीही कशाची पाठराखण करत नाहीए .

याला अनुमोदन, वरही मी हेच विचारले आहे कि एखादा (कोणाचाही) प्रतिसाद समर्थनार्थ असेल तर तो दाखवून द्यावा.

अभ्या..'s picture

17 Apr 2018 - 2:14 pm | अभ्या..

हो ना, आणि सोल्युशन कसले हुडकताय म्हणजे?
सक्षम न्यायव्यवस्था हा फक्त सॉफ्ट टार्गेट असल्याने स्त्रियांनाच नव्हे तर सर्वच गरीब, पीडीत, शोषित, पापभिरुंना हक्काचा न्याय मार्ग वाटतो ह्यात वेगळे काही नाही. किंबहुना ह्या सर्वानाच का वाटतो हे महत्त्वाचे आहे. ह्या सर्वांवरचे अन्याय, अत्याचार, शोषण हे काही नवीन नाही पण त्यावरचा मार्ग आपल्यालाच काढावा लागेल ना? न्यायव्यवस्था ही किती सक्षम आहे, ती कशी स्व समर्थ होईल हे पाहणे महत्वाचे आहे. झुंडशाही, अधिकार, पैशाची मस्ती, राजकीय फायदे ह्या सर्वांपेक्षा न्यायव्यवस्था परे असली पाहिजे. उलट ह्या सर्वांना न्यायव्यवस्थेचाच धाक असला पाहिजे. आपापल्या सोयीने कायदा वाकवणारा प्रत्येक जण गुन्हेगारच असतो. लोकशाही, न्यायव्यवस्था, दंडव्यवस्था ह्या काही समाजापेक्षा वेगळ्या नाहीत. भले स्त्रीपुरुषांसाठी काही कायदे वेगळे असतील पण अंतिमतः माणुस हे सर्वोच्च मुल्य मानून कायदे तयार करुन त्याची सर्व निरपेक्ष अंमलबजावणी होणे हेच समाजासाठी हितकर आहे. हे करताना स्त्री/पुरुष, गरीब/श्रीमंत, सबल/दुर्बल असा भेद न करता जे आतापर्यंत झालेय ते आपणच केलेय, होतेय त्यामध्ये पण आपला सहभाग होता आणि जे काही करायचेय ते आपल्याहातूनच होणारे इतका विश्वास असला तरी बस्स. तात्पुरता फायदा पाहून स्वताडनापेक्षा कठोर स्वपरिक्षण आणि सुजाणत्व अंगी बाण्वणे व ते आपण जिथे बदल घडवू शकतो त्या येणार्‍या पिढीत जास्त रुजवणे जास्त महत्वाचे आहे. निदान ह्या गोष्टींसाठी तरी स्त्रियांचा रोल खूपच महत्वाचा आहे.

अंतरा आनंद's picture

17 Apr 2018 - 2:32 pm | अंतरा आनंद

न्यायव्यवस्था ही किती सक्षम आहे, ती कशी स्व समर्थ होईल हे पाहणे महत्वाचे आहे. झुंडशाही, अधिकार, पैशाची मस्ती, राजकीय फायदे ह्या सर्वांपेक्षा न्यायव्यवस्था परे असली पाहिजे. उलट ह्या सर्वांना न्यायव्यवस्थेचाच धाक असला पाहिजे.

हेच म्हणतेय मी. पण 'इथेही असं होतं तिथेही असं होतं', ह्या सगळ्यामध्ये ही चर्चा भलतीकडेच जाते आहे.

बिटाकाका's picture

17 Apr 2018 - 2:55 pm | बिटाकाका

ती चर्चा कोणीही भलतीकडे घेऊन गेलेलं नाही हे नम्रपणे नमूद करतो. धागाकर्त्याने मुळात भारतात जाऊ नका इथूनच सुरुवात केलेली आहे आणि म्हणून इतर लोक हा भारत आहे म्हणून असे आहे असे नसून इतर देशातही घडते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे परत एकदा वरपासून धागा आणि प्रतिसाद (क्रमाक्रमाने) वाचा असे सुचवेन म्हणजे लक्षात येईल कि सगळे मुद्दे कसे एकमेकांशी निगडित आहेत.
---------------------------------------
राहता राहिला प्रश्न व्यवस्थेचा, लोकशाहीचा तर मोर्चे काढणारे जोपर्यंत - गुन्हा सिद्ध न झालेल्या आरोपींसाठी लोकशाही मार्गाने मोर्चे काढत आहेत तोपर्यंत त्याला आक्षेप व्यवस्था कोणत्या आधारावर घेईल? कृपया इथे मुद्दा नीट समजून घ्यावा, हे आरोपींचे समर्थन नाही. न्यायालयाने फाशी दिलेल्या, राष्ट्र्पतीने दयाअर्ज फेटाळलेल्या गुन्हेगारांसाठी सुद्धा इथे मोर्चे निघतात आणि ते नक्कीच गैर आहे असे माझे स्पष्ट मत आहे. पण लोकशाही मार्गाने मोर्चे काढले तर त्रास काय असा प्रश्न विचारला जातो. इथे अजून त्यांचे गुन्हे सिद्ध व्हायचे आहेत. ते गुन्हेगार असतील तर ते नक्की सिद्ध व्हावं आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी हि कुठल्याही सामान्य माणसाची मनोमन इच्छा असणारच, याबद्दल शंका बाळगू नये. पण म्हणून कुठल्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये हेही व्यवस्थेने पाहणे गरजेचे आहे. गुन्हेगारांच्या कायदेशीर कारवाईत कोणी आड येत असेल तर कायदा त्याची काळजी घेत आहेच.
-----------------------------------------
कठोर शिक्षांमुळे समाज बदलेल याबाबत मी वैयक्तिकरित्या साशंक आहे. माझ्यामते तरी प्रत्येकाने स्वतःच्या घरातील स्त्री-पुरुष यांना याबाबीतीत जागरूक आणि सुसंस्कृत करणं हा वर आलेला उपाय जास्त परिणामकारक वाटतो.

माहितगार's picture

17 Apr 2018 - 1:33 pm | माहितगार

आणि परदेशातील अत्याचारांवर वेगळी अभ्यासपूर्ण धागा लेख चर्चा आता नक्कीच लावणार आहे .

गवि's picture

17 Apr 2018 - 1:40 pm | गवि

लावणार आहे .

काय समर्पक शब्दरचना आहे... !!!

माहितगार's picture

17 Apr 2018 - 1:43 pm | माहितगार

हेच आहे ना , तोंड देखले समर्थ करुन प्रत्यक्षात मनात वेगळे विचार आणावेत नाही का ? चालु द्या !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

अहो.. विनोदनिर्मितीचा एक क्षीण प्रयत्न करुन पाहिला बस्स. पण तो विनोद चोच वासून उताणा पडला.. इ.मृ.शां.दे.

माहितगार's picture

17 Apr 2018 - 3:03 pm | माहितगार

माझ्या डोक्यावरुन गेले असल्यास क्षमस्व

अभ्या..'s picture

17 Apr 2018 - 3:07 pm | अभ्या..

तुम्ही "अभ्या पिंक टाकतो" ह्या विधानाबाबत अद्याप काही बोललेला नाही आहात.

माहितगार's picture

17 Apr 2018 - 3:26 pm | माहितगार

१ ) अभ्या नव्हे अभ्याराव म्हटले आहे . आदर यथास्थित आहे .

२) पिंक टाकली गेली वाटळ्याचे कारण उपप्रतिसाद देऊन नमुद केले आहे.

माहितगार's picture

17 Apr 2018 - 3:27 pm | माहितगार

* वाटण्याचे

यथास्थित आदराबद्दल धन्यवाद,
पण पिंक नव्हती ना ती. जरी तुम्हाला वाटली तरी. त्याचे काय?

सुबोध खरे's picture

17 Apr 2018 - 7:37 pm | सुबोध खरे

@अंतरा ताई
लोकशाही देशात ही व्यवस्था नामक काही चीज असते. ती कुठे हरवलीय ते शोधा.
आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा निघणे त्यात राज्यातील दोन मंत्र्यांनी सहभागी होणे हे व्यवस्थेचे काय बारा वाजलेत हे दाखवतं आणि माझ्या दृष्टीने हे जास्त भीतिदायक आहे.

सलमान खान काळवीट प्रकरणापासून ते झोपलेल्या लोकांकर गाडी चालवून त्यांना जीवे मारण्याच्या खटल्यात आरोपी होता तेंव्हा हि

असेच मेणबत्त्या लावून बॉलिवूड मधील गणंग आणि उदारमतवादी लोक मोर्चे काढले होते

तेंव्हा काही कुणाचा संताप अनावर झाल्याचे वाचले नव्हते किंवा लोकशाहीला खतरा असल्याचे वाचले नव्हते. आणि याच सलमान खान ने याकूब मेमनला पाठिंबा दिला होता हे हि हेच लोक विसरले होते.

http://www.india.com/showbiz/salman-khan-defends-yakub-memon-morcha-ousi...
https://www.thequint.com/news/india/under-attack-salman-khan-retracts-hi...

शेवटी माणसे आपल्याला पाहिजे तोच अर्थ काढत असतात हे खरे.

आणि याचा राजकारणी पुरेपूर फायदा घेतात हेही तितकेच खरे.

पुंबा's picture

17 Apr 2018 - 8:05 pm | पुंबा

काळवीट प्रकरण आणी सदर अत्याचार प्रकरणाची ग्रॅव्हिटी समान आहे का?
घटनेच्या पालनाची शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधींनी रेपच्या आरोपींना अटक होऊ नये, साधी केसदेखिल रजिस्टर होऊ नये यासाट्।ई मोर्चे काढणे, प्रशासनावर दबाव आणणे हे लोकशाहीला खतरा मध्ये येत नाही का?

असेच मेणबत्त्या लावून बॉलिवूड मधील गणंग आणि उदारमतवादी लोक मोर्चे काढले होते

याचा काही पुरावा? की आपलं असंच ठोकून दिलंत?
सदर प्रकरणात हिंदूत्ववादी संघटना आणी जम्मुतील भाजपच्या आमदारांनी जे केलं त्याला सुद्धा समर्थन करायचे असेल तर अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.

तेंव्हा काही कुणाचा संताप अनावर झाल्याचे वाचले नव्हते किंवा लोकशाहीला खतरा असल्याचे वाचले नव्हते.

तुम्ही सिलेक्टिव्ह रीडींग करता त्यात बाकीच्यांचा काय दोष? त्यावेळीदेखिल सलमानच्या विरोधात प्रचंड रोष सोशल मिडियात दिसला होता. न्यायालयाच्या निकालातील कमजोर मुद्दे दाखवून देणारे वृत्तांकन कित्येक माध्यमातून झाले होते.

आणि याच सलमान खान ने याकूब मेमनला पाठिंबा दिला होता हे हि हेच लोक विसरले होते.

झालं आणलंत याकुब मेमनला? आता कुठल्याही प्रतिवादाला देशद्रोही ठरवण्याची सोय झाली. नाही?

सुबोध खरे's picture

17 Apr 2018 - 8:23 pm | सुबोध खरे

याकूब मेमन ला न्यायालयाने खालील गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले होते आणि ते खालच्या न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत ग्राह्य धरले गेले होते म्हणूनच त्याला फाशी झाली होती. संशयाचा फायदा सुद्धा न देता ते सुद्धा रात्री ३ वाजता सर्वोच्च न्यायालय चालू ठेवून .
Criminal conspiracy to carry out terrorist act and disruptive activities, and murder -- Death
Aiding and abetting and facilitating in a terrorist act -- Life imprisonment
Illegal possession and transportation of arms and ammunition --- Rigorous imprisonment for 14 years
Possessing explosives with intent to endanger lives ---- Rigorous imprisonment for 10 years

तेंव्हा याकूब मेमन हा दोषी आणि देशद्रोहीच आहे आणि त्याला पाठिंबा देणारा कोणीही माणूस हा देशद्रोहाच्या गुन्ह्यात सामील आहे असेच मझे स्पष्ट मत आहे.

बाकी गुन्ह्यांच्या गंभीरतेचा आणि मोर्चांचा संबंध आपण लावला आहे.

आणि तेच बॉलिवूड मधील गणंग तेंव्हा "लोकशाहीला धोका" म्हजणून टाहो फोडत होते त्यांनी तर आता लोकशाही मृत जाहीर करून तिचे श्राद्धहि घालायला पाहिजे.

की आपलं असंच ठोकून दिलंत?

असंच ठोकून दिलं समजा.

http://zeenews.india.com/people/salman-khan-convicted-b-town-celebs-exte...

https://tribune.com.pk/story/1678105/4-salman-khans-jail-sentence-sends-...

सध्या त्याला ५ वर्षाची शिक्षा झाली आहे तरी हे बोकड त्याला "SUPPORT"करत आहेत. त्यांच्या दृष्टीने कायदा न्यायालये यांची काहीच किंमत नाही. पैसे हेच सर्वस्व असणाऱ्या संस्थेबद्दल( बॉलिवूड) मला तिळमात्र आदर नाही.

In his book Being Salman Khan, journalist and writer Jasim Khan investigates the incident in some detail, but finally decides the only thing bhai is really guilty of is his own bad boy image. Khan the writer offers up several theories to bolster Khan the actor's innocence – Salman has Pashtun ancestors, and ...
https://thewire.in/culture/the-toxic-masculinity-of-salman-khan

खणलं तर जुनं सुद्धा भरपूर सापडेल

पण जाऊ द्या मी वरच म्हटलं आहे कि

शेवटी माणसे आपल्याला पाहिजे तोच अर्थ काढत असतात हे खरे.

सुबोध खरे's picture

17 Apr 2018 - 8:31 pm | सुबोध खरे

माझ्यापुरता वाद मी इथेच थांबवत आहे कारण मूळ विषय जास्त गंभीर आहे आणि श्री पुम्बा यांच्याशी वितंडवाद घालण्याची माझी बिलकुल इच्छा नाही.
त्यांचा प्रतिसाद शेवटचा असला तरी चालेल आणि मी चूक आहे असे त्यांनी म्हटले तरी चालेल.

माझा अंतरा ताईंना प्रतिसाद एवढाच होता कि असे मोर्चे स्वतःच्या अजेंड्यासाठी निघत आले आहेत. त्याला घाबरून लोकशाही हरवली वगैरे म्हणण्याचे कारण नाही. अफझल तेरे कातिल जिंदा है सारख्या घोषणा भर दिल्लीत देऊनही लोकशाही एक मायक्रॉन सुद्धा हलणार नाही.

आपल्या माहितीसाठी लिहीत आहे कि श्री राहुल गांधी यांच्यावर सुद्धा बलात्काराचा आरोप आहे आणि तो समाजवादी पक्षाच्या आमदाराने केलेला आहे आणि प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.श्री राहुल गांधींना अजामीनपात्र गुन्ह्यात अटक का झाली नाही यासाठी मोर्चा काढल्याचे मला तरी आठवत नाही.
दुवा पाहून घ्या नाही तर परत म्हणतील असेच ठोकून दिले.

https://www.firstpost.com/politics/rahul-gandhi-asks-sc-to-dismiss-basel...

माहितगार's picture

17 Apr 2018 - 9:58 pm | माहितगार

डॉक, मायनर करेक्शन ,, शेवटच्या परिच्छेदात क्रियापद आहे एवजी होता असे करुन घ्यावे . (बाकी अमुक एका =कोणत्याही अ ते ज्ञ -पक्षाचे राजकारणी धुतल्या तांदळा सारखे आहेत अशी स्थिती दुर्दैवाने भारतात नसावी असे वाटते असो.)

कपिलमुनी's picture

17 Apr 2018 - 11:17 pm | कपिलमुनी

डॉक्टर ,

हा दुवा सुद्धा वाचून घ्या आणि पुढच्या वेळी आरोप करताना माहिती पडताळून घेत चला .

सुबोध खरे's picture

18 Apr 2018 - 10:39 am | सुबोध खरे

मुनीवर

पुढच्या वेळी आरोप करताना माहिती पडताळून घेत चला .

आपला दुवा पाहिला

श्री राजीव गांधी याना आरोपातून मुक्त केले आहे हे बरोबरच आहे.

मीच काय कोणीही सामान्य माणूसच काय अगदी टोकाचा त्यांचा द्वेष्टा असला तरी श्री राजीव गांधी यांनी बलात्कार केला असेल असे म्हणणार / मानणार नाही.

मुळात मी आरोप केलेलाच नाही. मी त्यांच्यावर आरोप आहे आणि तो एका आमदाराने केला आहे असेच लिहिलेले आहे.

हि माहीती देण्याचे कारण एवढेच कि श्री राहुल गांधींना अजामीनपात्र गुन्ह्यात अटक का झाली नाही यासाठी मोर्चा काढल्याचे मला तरी आठवत नाही.

पुरोगामी, समाजवादी साम्यवादी आणि उदारमतवादी याना कुठेही "हिंदुत्व" दिसले कि काही तरी जळल्याचाच वास येतो. आणि

मग भारत कसा असहिष्णू झाला आहे याबद्दल त्यांचा टाहो फोडणे सुरु होते

यावर हि टिप्पणी होती.

खाली श्री ट्रेंड मार्क यांनी लिहिलेला प्रतिसाद जसाच्या तसा देत आहे.

राहुल गांधी वरही बलात्काराची केस चालू आहे म्हणल्यावर तत्परतेने कोर्टानी बाइज्जत बरी केलंय म्हणून दाखवणारे हे मात्र सोयीस्कर रित्या विसरतात की आसिफाच्या घटनेत पण पुजाऱ्यावर फक्त पोलिसांनी आरोप ठेवलेत. पण संपूर्ण देश, समस्त भारतीय पुरुष आणि हिंदू धर्म बदनाम करायला फक्त पोलिसांचे आरोपच पुरेसे आहेत नाही का?

बिटाकाका's picture

18 Apr 2018 - 10:45 am | बिटाकाका

कायतर गडबड हाय काय? तुमाला राहुल गांधी म्हणायचे असेल बहुतेक.
****************************************
प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे यावर स्पष्टीकरण म्हणून त्यांचा दुवा असेल असे घ्या. अर्थात तुमच्या आणि ट्रेडमार्क यांच्या नुसत्या आरोपांवरून केल्या जाणाऱ्या दांभिक प्रचाराच्या मुद्द्याशी सहमत!

सुबोध खरे's picture

18 Apr 2018 - 11:43 am | सुबोध खरे

हो
राहुल गांधी च.
टायपो बद्दल क्षमस्व

संपूर्ण सहमत झुंडशाहीच्या जोरावर कायद्याला आपले काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न बार असोशिएशन, हिंदू एकता मंच आणी भाजपाच्या आमदारांनी केला आहे. आज सोशल मिडियावर पाहिले तरी भाजपाचे पेड ट्रोल्स ज्या प्रकारे पिडितेवरच चिखलफेक करत आहेत, आरोपींचं निर्लज्जपणे समर्थन करत आहेत, कित्येकजन तर बलात्काराचे सुद्धा आडून आडून समर्थन करत आहेत ते तीव्र संताप आणणारे आहे. जिकडे तिकडे धर्म घुसडणारे आज इतक्या क्रूर घटनेवर सुद्धा धर्माच्या आधारे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न्म करताहेत.
शेम! शेम! शेम!