पोटपुजेची ठिकाणे

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
9 Dec 2010 - 7:22 pm

रोमनाचा धागा बघितला .. आणि वाटले ज्याला जिथले पदार्थ आवडतात तो येथे त्या ठिकाणाची माहिती लिहिन ..
त्यामुळे केंव्हाही कोठे ही महाराष्ट्रभर फिरलो तरी कळेल की कोठे काय छान मिळते.
परवाच एका च्या सांगण्यावरुन .. शिंदेवाडिच्या पुढे कैलास मध्ये रात्री जेवन केले पिठल भाकरी थाली अआणि इतर महाराष्ट्रियन पदार्थ .. जबराट आहे एकदम सगळे ..

असो ... खालील माहितीचा बाकीच्यांना उपोयोग होयील असे वाटते.
-------------------------------------

मिसळ :
१. सिन्नर ची मिसळ ही अतिशय उत्कृष्ठ आहे असे मला वाटते.. नंतर नाशिकची ..

२. कोल्हापुरची मिसळ खुप प्रसिद्ध आहे , पण मी कोल्हापुरमध्ये मेन ठिकाणी खाल्ली नसेन म्हणुन येव्हडी आवडली नाही, शिवाय त्याबरोबर ब्रेड होते म्हणुन मज्जा आली नाही. (कोल्हापुरला २ दाच गेलो आहे फक्त म्हणुन माहीती नाही काही)

३. पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे) - जनता मिसळ हाउस मध्ये खुप भारी मिसळ मिळते .. दर विकएंड ला जातो मी घरी गेल्यावर.. मसाला ते कोल्हापुर मधुन मागवतात आणि फरसान घरीच बनवतात म्हणुन तर खुप जबरी लागते ...
जवळच तेथे निसर्ग म्हणुन हॉटेल आहे तेथे ही छान मिळते मिसळ.
बाकी अजुनहि खुप भारी ठिकाणे असतीलच ...

वडापाव :

१. कृष्णा वडापाव- सारंग, सहकारनगर - मला येथील वडापाव खुप आवडतो.
तळजाईला जाताना हमखास येथे वडापाव खातोच .. खुप मोठी रांग असते येथे.;
२. अहमदनगर : येथील एका चौकातील वडापाव खुप फेमस आहे, पण नेमके नाव विसर्लो त्याचे .. नगरकरांनी सांगावे .. खुप पुर्वी गेलो होतो म्हणुन आठवत नाहिये .
३. कुंजविहार, ठाणे पश्चिम.

पिठल भाकरी /शेव भाजी
१. सोहम , डेक्कन जिमखाना, पुणे
२. कैलास , निअर शिंदेवाडी आणि निअर खेड शिवापुर, मुंबई-बँगलोर हायवे.

चहा :
१. टिळकरोड, पुणे येथील कुठल्याही अमृततुल्य मध्ये , खास करुन टिळक येथे आणि शक्तीस्पोर्ट समोर ( बहुतेक नाव : आंबाई आहे.. देवीचे नाव आहे हे नक्की पण)
२. त्रिवेणी : जंगली महाराज रोड.
३. भवानी : गजानन महाराज मठा शेजारी.. पर्वती पायथ्याकडुन मठाकडे येताना. (क्रिमरोल पण खुप छान आहे इथला).
४. माऊली : पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे)

तवा सुरमई:
१. पुना गेट , निगडी. NH4 पुणे -मुंबई हायवे.
( नक्की खा, मी कायम खातो .. खुप वेगळी अआणि मस्त आहे. मुंबईत ही नाही मिळाळी अशी अजुन.

चिकन/चिकन थाली
१. हॉटेल सिंधुदुर्ग, निअर शिवसेना भवन, दादर , मुंबई.
२. गोमंतक , दादर , मुंबई.
३. गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर, पुणे. (मुर्ग मसल्लम)

- बाकी आठवेन तसे देइन .. आपण ही आपल्या जवळील माहिती द्यावी
(नोट : असो आपली माहिती देत रहा अशी विनंती .. आणि आम्हीच दिलेले भारी आणि तुम्ही दिलेले टुकार असे म्हणुन भांडन करु नये ही सुचना )

पाकक्रियाशिफारसअनुभवमदतमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

जय - गणेश's picture

25 Feb 2011 - 12:21 pm | जय - गणेश

काहिहि आसो, पण घरच्या जेवणाचि चव कुठेच नाहि.

पप्पू's picture

26 Feb 2011 - 4:21 pm | पप्पू

खाते रहो

सहज हा धागा पाहिला.. पुन्हा वर काढत आहे.. कोणाला काही हेल्प मिळेल या अनुशंघाने..
लवकरच.. जुनी-नवी ठिकाणे मिळुन सुची करण्याचे काम हाती घ्यावे म्हणतो.. कोण तयार असले तरी चालेल

कराडला गेलात तर दत्त चौकात गजानन ची मिसळ आणि चावडी चौकात बॉम्बे ची आंबोली खाऊनच पहा ...

मालोजीराव's picture

29 May 2015 - 3:27 pm | मालोजीराव

हॉटेल शिवेंद्र (कोंढवा -फुरसुंगी रोड)- मटण दालचा एकदम खल्लास !

जगदंबा ,खेड शिवापूर - मटण भाकरी तुपातला भात जबरी, आजपर्यंत अनेक ठिकाणी मटण भाकरी खाल्ली, त्यात इथली झकास होती.

भोर कडून वरंध घाटाकडे जाताना आपटी गावाच्या पुढेच एक मटण खानावळ आहे, बोउल भर मटण आणि रस्सा कितीबी वरपा, ठिकाणहि निसर्गरम्य नदीला लागुनच

आपटी

आपटी

तोरणा आणि वेल्ह्याची भटकंती 'स्वप्नील' शिवाय पूर्ण नाहीच, इथली मटण भाकरी उत्तम, मिरच्या घातलेलं आम्लेट पण मस्त…आणि जाताजाता तिथला चहाही !

टिनटिन's picture

29 May 2015 - 6:50 pm | टिनटिन

गावठी चिकन आणि तान्दळाची भाकरी झकास. क्वार्टर घेउन गेलात तर फक्त सर्विस चार्ज लागतो.

टिनटिन's picture

29 May 2015 - 6:51 pm | टिनटिन

डोम्बिवली जवळ..

श्वेता२४'s picture

10 Apr 2018 - 1:47 pm | श्वेता२४

पुण्यातील अलका चोकातील रिगल हॉटेलजवळ गौरीशंकर नावाचे छोटेसे दुकान आहे तेथील पोहे अप्रतीम असतात. शिवाय साबुदाणा खिचडी, उपमा व शिरा देखील बेस्ट. जंगली महाराज रोडवरील सोहम व मथुरा एक नं. पेरुगेट पोलिस चौकीजवळील साईबा मधील भडंग भेळ व पाणीपुरी खूप आवडीची. गिरीजा मधील मेथी पिठलं व भाकरी म्हणजे स्वर्गच. मुंबईमध्ये माटुंगामध्ये इडली हाउस मध्ये खाल्लेली इडली व त्याचा अजून एक प्रकार (नाव आठवत नाही) क्लासच. अशी चव पुन्हा कुठएही मिळाली नाही.

पगला गजोधर's picture

10 Apr 2018 - 2:24 pm | पगला गजोधर

पुण्यातील कर्वे नगर मधील गिरिजाशंकर विहार सोसायटीजवळचा रोड, कि जो पुढे कॉर्पोरेशन बँक (जुनी भगिनी निवेदिता बॅंक) च्या दिशेनं जातो ,
तिथे तो रोड आडव्या रोडला T सारखा येऊन मिळतो , तिथे शिवदीप वडापाव ट्राय केलाय का कोणी ?
मला थोडा बरा वाटतो तो वडापाव.

https://goo.gl/maps/aWN3M2CAW9w

पत्ता द्या

मनिमौ's picture

10 Apr 2018 - 7:25 pm | मनिमौ

कर्वे रस्त्यावरून डेक्कन कडे जाताना सह्याद्री हाॅस्पिटल खाली बिपीन स्नॅक. ईडली ब. वडा पोहे मस्त मिळतात.
कासट च्या दुकानाशेजारून आत सीड ईन्फोटेक कडे जाताना भाडाईत मिसळ मिळते. अप्रतीम चव आहे.
ताथवडे बागे समोर मनिषा भेळ. रगडा पॅटीस सोडून बाकीचे पदार्थ छान.
ही झाली पुण्यातली यादी

सोलापूर बद्दल बोलायचं म्हणलं तर कन्ना चौकात मिळणारी पापु सारखी कुठेच नाही मिळत.
पुतळ्याला वळसा घालुन आपण आत ढंगे फर्नीचर कडे जाते त्याच कोपर्यावर हा पाणीपुरी वाला उभा असतो.
तळहात झाकला जाईल ईतकी मोठी आणी कडक पुरी आणी आतलं थंडगार पाणी.....
सात रस्त्यावर संगमेश्वर काॅलेज च्या लेडीज हाॅस्टेल शेजारी बाबुराव ची भेळ आणी कृष्णा फालुदा.
बाळे गावात बारशी रोड ला असणारा हज्जू चा वडापाव आणी भजी.
अगदी पुर्वी मी लहान असताना नव्या पेठेत एक स्वीट मार्ट होत. तिथली कचोरी फार फार आवडायची.
झालच तर चित्रमंदिर च्या कॅन्टीन चा (जिथे आता इंदोर कपडा सेल लागतो) त्याचा सोडा.
गदग चा डोसा.
ह्या सगळ्यात एक लई महत्त्वाचं ठिकाण रायल.
मंगळवार पेठ मीठ गल्लीत असलेलं सुधा ईडली गृह.

अभ्या..'s picture

11 Apr 2018 - 10:46 am | अभ्या..

अरे वा मौताई,
पक्के सोलापूरकर तुम्ही. चक्क हज्जूचा वडापाव म्हैते म्हणजे काय. आहे अजून हज्जू बरका. साधीशी टपरी आहे पण धंदा जबरदस्त.
कना चौकातल्या पापुची हेड ब्रँच दाजी पेठेत. बालाजी मंदिराजवळ चौकात. त्या चौकातून पुढे गेले की एक भज्यांचा अड्डा आहे. पातळ पुदिना चटणी आणि कुरकुरीत भजी.
रायचूर भजी म्हणजे कोळाच्या मिरच्यांची दांडगी आंध्र भजी पण मिळतात.
इंदूर कॉटनपासले लोमटेचे प्रजा कोल्ड्रिंक बंद झाले. ते कन्न चौकात आलेय. पापुची गाडी आहे तिथेच. अक्सीस बँकेसमोर.

मनिमौ's picture

10 Apr 2018 - 7:27 pm | मनिमौ

हुतात्मा बागेकडचा वसंत पैलवान चा रस किंवा टिळक चौकातले कंदले आणी डफरीन चौकातले पुणेकर कामठे याला पर्याय नाही

पगला गजोधर's picture

10 Apr 2018 - 7:32 pm | पगला गजोधर

(वारजे पुणे) येथील एकदा हा चहा ट्राय करून पहा.

https://goo.gl/maps/aCo3djFvP9P2

भरपूर प्रतिसाद झाल्याने कोणीतरी आता नवीन धागा (पुढचा भाग) काढावा.

पगला गजोधर's picture

11 Apr 2018 - 10:56 am | पगला गजोधर

कोथरूड पुणे येथे कोकण एक्सप्रेस च्या डायगोणली समोर, स्फूर्ती मिसळ मधे हिरवट पोपटी टिंज ग्रेव्ही वाली मटार उसळ मिळते, अगदी ग्रेट नाही, पण तेच अन तेच लाल भडक ग्रेव्ही ला जर कंटाळला असाल तर् ट्राय करून पाहा....

मनिमौ's picture

11 Apr 2018 - 12:27 pm | मनिमौ

अरे मी बाळेकरच आहे. बाकी चिकीता चा ऊल्लेख कसा काय राहुन गेला कुणास ठाऊक. आद्य हाॅटस्पाॅट होता तो. अजुनही असावा . अर्थात महिना अखेरीस येणार आहे तेव्हा समक्ष जाऊन बघते.

पगला गजोधर's picture

11 Apr 2018 - 1:58 pm | पगला गजोधर

बाळेकरच म्हणजे काय ?

प्रचेतस's picture

11 Apr 2018 - 2:30 pm | प्रचेतस

बाळे गावच्या.